Van Shakti 2025 national forest women conference
Van Shakti 2025 national forest women conference : चंद्रपूर – वन हे आपल्या जीवनाचे फुफ्फुस आहे, पर्यावरणाचे संतुलन राखणारे शक्तिस्थान आहे. मात्र आजच्या काळात जंगल केवळ पर्यावरणपूरक बाब नाही, तर ते स्थानीक अर्थव्यवस्थेचा आणि रोजगारनिर्मितीचा आधार ठरू शकते. त्यामुळे वनावर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य शासनाने विशेष धोरण राबवावे. यामुळे जंगलालगतच्या भागातील युवक-युवतींना गावातच रोजगार मिळेल, स्थलांतर थांबेल आणि त्याच वेळी वनपर्यटनालाही नवे बळ मिळेल अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी बोलतांना वनमंत्री गणेश नाईक यांना केली. women leadership in forest conservation India
चंद्रपुरात वन नियंत्रण कक्षाची सुरुवात
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वनशक्ती 2025, वन क्षेत्रातील महिलांची राष्ट्रीय परिषद या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे, वरोरा भद्रावती विधानसेभेचे आमदार करण देवतळे यांच्यासह वन विभागातील सर्व अधिका-यांची उपस्थिती होती.

यावेळी पूढे बोलताना आ. किशोर जोरगेवार म्हणाले कि, वनांचे ‘सर्वांगीण वनसंवर्धन’ करण्यासाठी स्थानिकांचा सहभाग अत्यावश्यक आहे. यासाठी “वनपाटील आणि वनपाटलीन” ही संकल्पना राबविण्यात यावी. ग्रामपंचायत स्तरावर वनपाटील आणि वनपाटलीन पदासाठी निवडणुका घेतल्या गेल्या तर त्या गावातील नागरिकांना वनसंवर्धनाच्या निर्णयप्रक्रियेत थेट सामावून घेता येईल.
या पदांना महिलांचे प्रतिनिधित्व दिल्यास हुमन इज फॉरेस्ट लिडरशिप या महत्वाकांक्षी संकल्पनेला चालना मिळेल. या संकल्पनेतून जंगलालगतची गावे फक्त वनसंवर्धक नव्हे, तर विकासाचे केंद्र बनतील. जंगल आणि गाव एकमेकांचे पूरक बनून या भागातील लोकांचा आत्मविश्वास वाढेल असा विश्वास यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार व्यक्त केला.
Leave a Reply