Tag: चंद्रपूर

  • financial aid for poor patients Chandrapur । आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना मोठा आधार – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून लाखोंची मदत

    financial aid for poor patients Chandrapur

    financial aid for poor patients Chandrapur : चंद्रपूर, दि. 19 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी अंतर्गत जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना उपचारासाठी दिलासा मिळत असून, मागील आठ महिन्यांच्या कालावधीत एकूण 64 रुग्णांना 57 लाख 48 हजार रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.

    चंद्रपूर नागपूर महामार्गावर कार ने घेतला पेट

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांच्या देखरेखीखाली कार्यरत असलेल्या जिल्हा कक्षामार्फत ही मदत वितरित करण्यात आली. जानेवारी ते जुलै या कालावधीत 54 रुग्णांना 47 लाख 48 हजार, ऑगस्टमध्ये 7 रुग्णांना 6 लाख, तर 15 सप्टेंबरपर्यंत 3 रुग्णांना 4 लाख रुपये इतकी मदत मंजूर करण्यात आली आहे.

    सदर निधीतून हृदय, यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस व अस्थिमज्जा प्रत्यारोपण, कॅन्सर उपचार, कॉकलियर इम्प्लांट, अस्थिबंधन, गुडघा व खुब्याचे प्रत्यारोपण, नवजात शिशु व बालकांच्या शस्त्रक्रिया तसेच अपघातग्रस्त रुग्णांच्या उपचारांसाठी सहाय्य दिले जाते. निधी प्राप्त न झाल्यास रुग्णांना महात्मा फुले जनआरोग्य योजना, आयुष्मान भारत व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपचाराची पर्यायी माहिती दिली जाते. government support for transplant surgeries

    वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजार रुपयांपेक्षा कमी

    निधीसाठी पात्रता निकषांनुसार अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा. वार्षिक उत्पन्न 1 लाख 60 हजार रुपयांपेक्षा कमी असावे व उपचार सरकारी/धर्मादाय/मान्यताप्राप्त रुग्णालयात झालेले असावेत. आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव संबंधित रुग्णालयाकडून सादर होऊन जिल्हा कक्षामार्फत मंत्रालयाकडे पाठविला जातो. समिती परीक्षणानंतर निधी मंजूर केला जातो.

    संपर्कासाठी टोल फ्री क्रमांक 1800 123 2211, संकेतस्थळ cmrf.maharashtra.gov.in तसेच प्रशासकीय इमारत, पहिला मजला, चंद्रपूर आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, चंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कक्षाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कविश्वरी कुंभलकर यांनी केले आहे.

  • Raksha Bandhan ceremony । राखीचा धागा – भावनिक नात्याचे, आदर आणि जबाबदारीचे प्रतीक – आ. किशोर जोरगेवार

    Raksha Bandhan ceremony

    Raksha Bandhan ceremony : चंद्रपूर – आज असंख्य बहिणींनी माझ्या हातावर राखी बांधून प्रेम, आपुलकी आणि स्नेहाचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रत्येक राखीत मला बहिणींच्या मनातील माया, विश्वास आणि आपल्या नात्यातील अढळ बांधिलकीची अनुभूती झाली. हे नाते केवळ धाग्याचे नसून, भावनिक नात्याचे, परस्पर आदराचे आणि बहिणींप्रती भावाच्या जबाबदारीचे प्रतीक असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    आमदार जोरगेवार यांच्या पुढाकाराने २० अभ्यासिका होणार सुरु

    गुरुदेव सेवा समितीच्या महिला मंडळाच्या वतीने चैतन्य ज्येष्ठ नागरिक संघ येथे रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक संगिडवार, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, पुरुषोत्तम राऊत, बबन मत्ते, टिपले, मंडळ अध्यक्ष स्वप्नील डुकरे, मंजुश्री कासनगोट्टूवार, कल्पना गिरडकर, नकुल वासमवार, चंदा ईटनकर आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

    नवी प्रेरणा आणि लोकसेवेची निष्ठा

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, आज रक्षाबंधनाच्या या पवित्र पर्वानिमित्त चंद्रपूर महिला गुरुदेव सेवा मंडळातर्फे आयोजित या भव्य कार्यक्रमात सहभागी होण्याचा मला आनंद आहे. या सुंदर आणि भावनिक क्षणांचे साक्षीदार होणे, हे माझ्यासाठी केवळ सन्मानच नाही तर जीवनभर जपून ठेवावा असा एक अमूल्य ठेवा आहे. मंडळाच्या सर्व महिला सदस्यांनी घेतलेला सक्रिय सहभाग आणि कार्यक्रमातील उत्साहामुळे सणाचा आनंद द्विगुणित झाला आहे. आपल्याकडून मिळालेल्या या प्रेमाच्या उबेने माझ्या आयुष्याला नेहमीच नवे बळ, नवी प्रेरणा आणि लोकसेवेची निष्ठा मिळत राहील. MLA Kishor Jorgewar

    या प्रसंगी आपण सर्वांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना देखील राखी पाठवली आहे. हा भावनिक संदेश नक्कीच आपल्या बहिणींच्या प्रेमाचा आणि आपल्या संस्कृतीतील स्नेहबंधाचा गौरव वाढवणारा आहे.  असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला गुरुदेव सेवा मंडळाच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • amruta fadnavis chandrapur visit । 💥 ५५ नद्यांचं जल, १.५५ लाख बेलपत्र! अमृता फडणवीस यांनी केला चंद्रपूरच्या शिवलिंगाचा रुद्राभिषेक!

    amruta fadnavis chandrapur visit

    amruta fadnavis chandrapur visit : चंद्रपूर – देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाच्या निमित्ताने आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून पहिल्या श्रावण सोमवारी आयोजित विशेष कार्यक्रमात राज्यातील सर्वात मोठ्या प्राचीन शिवलिंगाचा जलाभिषेक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ५५ नद्यांचे पवित्र जल आणि १ लाख ५५ हजार बेलपत्र अर्पण करण्यात आले. या भव्य धार्मिक कार्यक्रमाला हजारो भाविकांची उपस्थिती लाभली. आमदार किशोर जोरगेवार आणि त्यांच्या पत्नी तथा माजी मंत्री शोभा फडणवीस यांची यावेळी उपस्थिती होती. ही एक जागृत देवस्थान असल्याची अनुभूती झाल्याचे अमृता फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

    आधारकार्ड मध्ये अनेक चुका, खासदार धानोरकर यांचा अधिवेशनात प्रश्न

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह साजरा करण्यात येत असून, त्याअंतर्गत ३५५ हून अधिक विविध सेवाभावी उपक्रम राबवले जात आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून भिवापूर वॉर्डातील प्राचीन आणि राज्यातील सर्वात मोठ्या शिवलिंगाच्या रुद्राभिषेकाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी राज्यातील तसेच राज्याबाहेरील नामवंत पंडितांना आमंत्रित करण्यात आले होते. 55 rivers water abhishek ritual

    amruta fadnavis chandrapur visit 2025

    दरम्यान, या कार्यक्रमासाठी अमृता फडणवीस आज चंद्रपुरात दाखल झाल्या. सायंकाळी चार वाजता त्या कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. कावड घेऊन त्या शिवलिंगाजवळ आल्या आणि राज्यभरातून आणलेल्या ५५ नद्यांच्या पवित्र जलाने व १ लाख ५५ हजार बेलपत्रांनी शिवलिंगाचे जलाभिषेक केले. त्यानंतर त्यांनी शिवलिंगाची आरती केली.

    यावेळी बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, “चंद्रपूर ही विविध रूपातील सौंदर्याने नटलेली नगरी आहे. हे सुंदर आणि प्राचीन मंदिर आहे. त्याचा विकास व्हायला हवा. मी वर्षातून किमान दोनदा तरी चंद्रपूरला भेट देईन, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी महामृत्युंजय मंत्राचे पठण केले आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचे कौतुक केले.

    अमृता फडणवीस यांच्या हस्ते सायकल वाटप व चित्रप्रदर्शनाचे निरीक्षण

    देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहानिमित्त २०५५ विद्यार्थिनींना सायकली वाटप करण्यात येणार आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ आज अमृता फडणवीस यांच्या हस्ते झाला. आमदार किशोर जोरगेवार यांच्या ‘राजमाता निवासस्थान’ येथे आयोजित कार्यक्रमात त्यांनी ५५ विद्यार्थिनींना सायकली वाटप करून या उपक्रमाचा प्रारंभ केला.

    Somayya institute of technology

    तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनपटावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचीही त्यांनी पाहणी केली.

  • leopard road accident । 🐆वन्यजीव मरताहेत, प्रशासन झोपलंय! चंद्रपूरमध्ये बिबट्याचा मृत्यू!,

    leopard road accident

    leopard road accident : चंद्रपूर – अहेरी-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्गावर, गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापूरजवळ एका बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी (२७ जुलै रोजी) सकाळी ८ वाजताच्या सुमारास झरण वनपरिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १२१ आणि १२२ च्या मध्ये घडली, ज्यामुळे वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

    असा झाला अपघात

    मिळालेल्या माहितीनुसार, बिबट्या रस्ता ओलांडत असताना एका भरधाव अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच झरण वनपरिक्षेत्राचे अधिकारी संदीप मडावी, कर्णेवाड, क्षेत्रसहायक रुपाली आडे, आक्सापूरचे पोलीस पाटील सूरज वैरागडे, उपसरपंच चंद्रजित गव्हारे आणि गावातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. leopard road accident

    चंद्रपुरात मेफेड्रोन ची विक्री, २ आरोपीना अटक १ पसार

    क्षेत्रसहायक रुपाली आडे यांनी पंचनामा केला असता, मृत बिबट्या तीन ते चार वर्षांचा नर असून, त्याने नुकतीच रानडुकराची शिकार केली होती. अपघातामुळे त्याच्या शरीरातून रानडुकराचे मांस बाहेर आलेले दिसत होते. झरण वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप मडावी यांनी सांगितले की, मृत बिबट्याला चंद्रपूर येथे नेण्यात येणार असून, शवविच्छेदनानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

    वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

    या घटनेमुळे परिसरातील वन्यजीव सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, अवघ्या पंधरा दिवसांपूर्वीच आक्सापूर गावाजवळ आणि शेतात वाघाचे दर्शन झाल्याने तसेच वाघाचे पाऊलखुणा (पगमार्क) आढळल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग, चंद्रपूर यांना १४ जुलै रोजी निवेदनही देण्यात आले होते. शेतकरी आपला जीव धोक्यात घालून शेतीची कामे करत आहेत, तर वानरांमुळे वेलवर्गीय आणि फळबागा वाचवणेही कठीण झाले आहे, अशी कैफियत गावकऱ्यांनी मांडली आहे. highway animal crossing danger zones

    Somayya institute of technology

    कान्हाळगाव अभयारण्य आणि वन्यप्राण्यांचा भ्रमणमार्ग

    नुकतेच कान्हाळगावला अभयारण्य घोषित करण्यात आले असल्याने, हा परिसर वन्यप्राण्यांचा महत्त्वाचा भ्रमणमार्ग बनला आहे. यामुळे रस्त्यावर वन्यप्राण्यांना वारंवार अपघातांना सामोरे जावे लागत आहे. या घटनेला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. वनविभाग, महामंडळ आणि शासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष घालून वन्यजीवांच्या संरक्षणासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

    या घटनेमुळे वन्यजीव आणि मानवी वस्ती यांच्यातील संघर्ष आणि वन्यजीव संरक्षणाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने त्वरित पाऊले उचलणे आवश्यक आहे.

  • Raanbhaji Mahotsav Chandrapur । 🥬 रानावरून थेट शहरात! रानभाजी महोत्सवाने चंद्रपूरमध्ये गाजवली धमाल विक्री

    Raanbhaji Mahotsav Chandrapur

    Raanbhaji Mahotsav Chandrapur : चंद्रपूर, दि. 22 : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर द्वारे आयोजित रानभाजी महोत्सवाला चंद्रपूरकरांनी उत्सफुर्त प्रतिसाद दिला असून दररोज सरासरी एक लाख रुपयांची आर्थिक उलाढाल या महोत्सवादरम्यान अनुभवास मिळाली.

    शहरातील मौलाना अबुल कलाम आझाद गार्डन येथे 18 जुलै रोजी रानभाजी महोत्साचे उद्घाटन झाल्यनंतर सलग पाचही दिवस शहरातील नागरीक, नामवंत व्यक्ती, डॉक्टर्स, वकील, प्राध्यापक, पर्यावरणप्रेमी, शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच विविध शासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचा-यांनी या महोत्सवाला भेट दिली. तसेच येथील स्टॉलवरील उत्पादने आणि माळरानातील भाज्यांची खरेदी केली. 

    अवैध बांधकाम विरोधात ऑनलाईन तक्रार करा, चंद्रपूर मनपाचे आवाहन

    जिल्ह्यातील रानभाज्या संकलन करणारे आदिवासी बांधव, बचत गट, माविम, आत्मा, उमेद, वनधन विकास केंद्र, फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी इत्यादी संस्थांकडे नोंदणीकृत असलेले महिला व पुरूष बचतगट यांनी रानभाजी महोत्सवामध्ये भाग घेऊन आपल्या उत्पादनांची विक्री केली. या महोत्सवामध्ये दररोज सरासरी एक लाखापेक्षा अधिक रूपयांची आर्थिक उलाढाल होऊन आदिवासी बांधवांना त्याचा प्रत्यक्ष फायदा पोहोचला आहे. Tribal forest product fair Azad Garden Chandrapur

    या रानभाजी महोत्सवामध्ये रानभाजी, रानफळे, रानमेवा, वनौषधी, अन्नधान्य इत्यादी क्षेत्रात उत्पादन, संकलन, विपणन करणारे नोंदणीकृत आदिवासी बचतगट, व्यक्ती, संस्था यांनी प्रकर्षाने सहभाग नोंदविला. शेती किंवा निगा न करता निसर्गत:च उगवलेल्या व विशेषकरून चंद्रपूर जिल्ह्यामधील रानावनातून, बांधावरून गोळा केलेल्या शेरडीरे, मशरूम, टेकोडे, काटवल, पांढरा कुडा, कुळमुळी, केना, कोंबडा, तरोटा, धानभाजी, पातूर, गोपण, टट्टूची फुले, केना, चुचूर, इकदोडे, पानवेल, मसाला, बांबूवाष्टे, भराटी,  मटारू,  राजगिरा, रानआले, रानकोचई, रानमटाळू, वाघोटी, रानकोचई इत्यादी रानभाज्या व रानफळे तर पानफुटी, कांडवेल, गुळवेल, अमरवेल, अश्वगंधा, पळस, अर्जून अश्या औषधी वनस्पती प्रदर्शनास व विक्रीस उपलब्ध होत्या. विविध पारंपारीक आदिवासी खाद्यपदार्थांचे स्टॉल्सदेखील या महोत्सवादरम्यान लावण्यात आले होते. Wild herbs and vegetables market

    वनधन केंद्रांनी मोहफुलांपासून बनविलेले विविध पदार्थ, बांबुपासून बनविलेली उत्पादने देखील ठेवण्यात आली होती. तद्वतच शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ यांचेकडील शबरी नॅचरल ब्रँडची विविध उत्पादने प्रदर्शन व विक्रीस ठेवण्यात आली होती.

    प्रकल्प अधिका-यांनी मानले चंद्रपूरकरांचे आभार : 

    आझाद गार्डन येथे आयोजित केलेल्या रानभाजी महोत्सवास चंद्रपूर येथील नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन आदिवासी बांधवांना रोजगार मिळविण्यास मदत केली. त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले, त्याबद्दल आदिवासी विकास विभागातर्फे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी सर्व नागरिकांचे आभार मानले.

  • Journey of Panther Sports Academy Champions । 🔥 पँथर्स स्पोर्ट्सचा ‘गुरुपौर्णिमा’ कार्यक्रम ठरला प्रेरणादायी! १० हून अधिक विजेत्यांचा सत्कार

    Journey of Panther Sports Academy Champions

    Journey of Panther Sports Academy Champions : चंद्रपूर: १२ जुलै २०२५ रोजी पँथर्स स्पोर्ट्स फाऊंडेशनने गुरुपौर्णिमे निमित्त गुरु आणि शिष्यांसाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. या कार्यक्रमात खेळाडूंच्या गुणवत्तेला आणि गुरूंना आदराने गौरवण्यात आले.

    कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुरलीधर बागला हायस्कूलचे प्राचार्य श्री. उमेश पंधरे सर उपस्थित होते. त्यांच्यासोबतच सामाजिक कार्यकर्ते श्री. किशोर भैया रायपुरकर, मनसे जिल्हाप्रमुख श्री. मनोज तांबेकर, तसेच पालक प्रतिनिधी म्हणून श्री. अमित अग्रवाल सर, श्री. जगन दुर्गम सर, सौ. प्रशांती दुर्गम मॅडम, सौ. हिना दरबार मॅडम, श्रीमती. पद्मा पांडे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती होती. खेळाडू विद्यार्थ्यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मान केला.

    चंद्रपूर जिल्हा परिषदेचा नाविन्यपूर्ण उपक्रम

    यावेळी, पँथर्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर चंद्रपूर जिल्हा आणि राज्याचे नाव उज्वल केलेल्या पदक विजेत्या खेळाडूंचा विशेष सत्कार करण्यात आला. जिल्हा व राज्यस्तरीय पदक विजेत्यांमध्ये कु. मानसी गजेंद्रसिंह दरबार, कु. श्रुती जगन दुर्गम, कु. निर्जला अनिल कराडे, कु. रिया नवनीत कातकर, कु. चहक अमित अग्रवाल, कु. काजल पवन देवांगन, कु. रेशमी सुखदेव देवांगन, कु. यामिनी रवी देवांगन, कु. शगुन राकेश चौहान यांचा समावेश होता. मुलांमध्ये पूर्वेश अमित अग्रवाल, आलोक जगन दुर्गम, राजकुमार राकेश चौहान यांचाही गौरव करण्यात आला. taekwondo championship winners 2025

    taekwondo championship winners 2025

    पँथर्स स्पोर्ट्स अकॅडमीसाठी हा क्षण अत्यंत अभिमानाचा ठरला, कारण राष्ट्रीय स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या कु. रिया नवनीत कातकर, आंतरराष्ट्रीय निवड प्रक्रियेसाठी निवड झालेल्या आदित्य बाजीराव निकालजे, राष्ट्रीय ग्रेपलिंग स्पर्धा जयपूरसाठी निवड झालेल्या कु. मानसी गजेंद्रसिंह दरबार आणि कु. श्रुती जगन दुर्गम यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच, ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी पदक विजेत्या आणि AIU खेलो इंडियासाठी निवड झालेल्या कु. रिया नवनीत कातकर हिचेही कौतुक झाले. sports academy achievements

    ७ वर्षाची चहक मुख्य आकर्षण

    कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरली ती अवघ्या ७ वर्षांची कु. चहक अमित अग्रवाल, जिने जिल्ह्यात सुवर्णपदक जिंकून नाशिक येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायक्वांदो चॅम्पियनशिपसाठी निवड मिळवली. तिच्या या यशाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

    उपस्थित मान्यवरांनी खेळाचे फायदे, पँथर्स स्पोर्ट्स अकॅडमीचे अथक प्रयत्न आणि त्यांच्या यशाबद्दल खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच, या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पँथर्स स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि चंद्रपूर जिल्ह्यातील पहिले कुस्ती NIS कोच श्री. मुकेश पांडे सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले. अकॅडमीतील सर्व खेळाडूंच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

  • safety of Christian priests and pastors । ख्रिश्चन समाजाचा चंद्रपुरात भाजप आमदारविरुद्ध निषेध मोर्चा

    safety of Christian priests and pastors

    safety of Christian priests and pastors : चंद्रपूर ३ जुलै – राज्याच्या राजकारणात सत्ताधारी मंत्री असो कि आमदार सध्या ते विविध जातीधर्माबाबत बेताल वक्तव्य करत सुटले आहे, याचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे भाजपचे जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार गोपीचंद पडळकर, यांच्यावर कठोर कारवाई करीत आमदारकी रद्द करण्याची मागणी चंद्रपूर ख्रिश्चन समाजाच्या वतीने करण्यात आली.

    चंद्रपुरात डास नियंत्रण मोहिमेला सुरुवात

    ३ जुलै रोजी चंद्रपुरात संत अँड्रयूज चर्च ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत ख्रिश्चन समुदायाने आमदार पडळकर विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. सदर निषेध मोर्च्याचे आयोजन चंद्रपूर जिल्हा पास्टर्स असोसिएशन तर्फे करण्यात आले होतेे. protests against politicians for hate speech

    ११ लाखांची सुपारी

    सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील कुपवाड येथे ऋतुजा राजगे नावाच्या गर्भवती तरुणीने आत्महत्या केली. या प्रकरणात धर्मांतरासाठी सासरच्या लोकांनी छळ केल्याचा आरोप आहे. या घटनेच्या निषेधार्थ आयोजित मशाल मोर्चादरम्यान गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांनी “धर्मांतरासाठी गावात येणाऱ्या ख्रिश्चन पाद्रींना सैराट करा, आणि जो हे करेल त्याला मी स्वतः ११ लाखांचे बक्षीस देईन” असे विधान केले. या वक्तव्याने ख्रिश्चन समाजात संताप आणि भय निर्माण झाले असून, त्यांनी याला हिंसाचाराला चिथावणी देणारे वक्तव्य ठरवले आहे. धर्मगुरूंना ठार मारणाऱ्याला पडळकर यांनी 11 लाखांची सुपारी देण्याचं काम केले.

    चंद्रपुरात आयोजित निषेध मोर्च्यात आमदार पडळकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली, त्यांना आमदार पदावरून पदमुक्त करीत कारवाई करा अशी मागणी ख्रिश्चन समाजाने मोर्च्यात केली.

    जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निषेध मोर्चा पोहचल्यावर जिल्हाधिकारी गौडा यांना निवेदन देण्यात आले.

    यावेळी पास्टर निर्मल यांनी सांगितले की जनतेतून निवडून आलेल्या प्रतिनिधीने एखाद्या समाजाविरुद्ध असे बेताल वक्तव्य करणे म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे काम होय. church protest march against political statements

    आमच्या धर्मात येणारे नागरिकांना आमच्या धर्मात येण्यासाठी आम्ही जबरदस्ती करीत नाही, ज्यांना आमच्या धर्मात यायचे आहे ते स्वखुशीने येतात. पडळकर यांच्या या आक्षेपार्ह विधानाने ख्रिश्चन समाजात दहशत निर्माण झाली असून शासनाने आमच्या समाजाच्या रक्षणासाठी महत्वाचे पाऊले उचलत आम्हाला सुरक्षा प्रदान करावी व पडळकर यांच्यावर कठोर कारवाई शासनाने करावी अशी मागणी पास्टर्स यांनी केली. आयोजित निषेध मोर्चात हजारो ख्रिश्चन समाजातील नागरिकांची उपस्थिती होती.

  • campus placement after iti course । 🎯 ITI नंतर थेट नोकरी! कॅम्पस प्लेसमेंटमध्ये अनेकांची निवड

    campus placement after iti course

    campus placement after iti course : चंद्रपूर (२७ जून) – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे गुरुवारी घेण्यात आलेल्या शिकाऊ उमेदवारी रोजगार भरती मेळाव्यात 70 विद्यार्थ्यांची निवड झाली असून 20 जणांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात आले.

    शहरात निकृष्ठ दर्जाचे रस्ते, आप ने केली कारवाईची मागणी


    कार्यक्रम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तसेच प्राचार्य वैभव बोंगीरवार यांच्या मार्गदर्शनात मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषांगिक सूचना केंद्र, चंद्रपूर द्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकावू उमेदवारी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या भरती मेळाव्याकरिता व्हेरॉक इंजिनिअरिंग, धूत ट्रान्समिशन, पटले प्लेसमेंट सर्विसेस, स्पीक अँड स्पेन एज्युकेशन सोल्युशन्स लिमिटेड, ब्रह्मा इंजीनियरिंग अँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, वैभव एंटरप्राइजेस अँड प्लेसमेंट सर्विसेस इत्यादी आस्थापनांनी सहभाग नोंदविला. या रोजगार भरती मेळाव्यात एकूण 260 विद्यर्थ्यांनी सहभाग नोंदविला. iti apprenticeship benefits for students

    विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा

    यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मुख्य अधिकारी तथा सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे यांनी विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप करण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच मेळाव्याद्वारे मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन यशस्वी होण्याचे आवाहन केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

    शिकाऊ उमेदवार रोजगार भरती मेळाव्याकरिता अप्रेंटिसशिप सेल तथा राईट वॉक फाउंडेशन चंद्रपूर व गडचिरोली विभागाचे समन्वयक कपिल बांबोडे यांनी अप्रेंटिसशिप, त्याचे फायदे, निवड प्रक्रिया आणि सॉफ्ट स्किल याची माहिती दिली.


    कार्यक्रमाचे संचालन योगेश धवणे यांनी केले. यावेळी कंपनी कोऑर्डीनेटर म्हणून विजय तांदळे, मनोज पाटील, श्री. खोब्रागडे तसेच इतर समन्वयक, बीटीआरआयच्या श्रीमती लोखंडे, श्री. महातो तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनदेशक श्री. नंदेश्वर, निमसरकार, चांदेकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.

  • Van Shakti 2025 national forest women conference । जंगलालगतच्या गावांचा विकास ‘वनपाटील-वनपाटलीन’ संकल्पनेतून शक्य – आ. किशोर जोरगेवार

    Van Shakti 2025 national forest women conference

    Van Shakti 2025 national forest women conference : चंद्रपूर – वन हे आपल्या जीवनाचे फुफ्फुस आहे, पर्यावरणाचे संतुलन राखणारे शक्तिस्थान आहे. मात्र आजच्या काळात जंगल केवळ पर्यावरणपूरक बाब नाही, तर ते स्थानीक अर्थव्यवस्थेचा आणि रोजगारनिर्मितीचा आधार ठरू शकते. त्यामुळे वनावर आधारित उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य शासनाने विशेष धोरण राबवावे. यामुळे जंगलालगतच्या भागातील युवक-युवतींना गावातच रोजगार मिळेल, स्थलांतर थांबेल आणि त्याच वेळी वनपर्यटनालाही नवे बळ मिळेल अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी बोलतांना वनमंत्री गणेश नाईक यांना केली. women leadership in forest conservation India

    चंद्रपुरात वन नियंत्रण कक्षाची सुरुवात

       राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते वनशक्ती 2025, वन क्षेत्रातील महिलांची राष्ट्रीय परिषद  या दूरदृष्टीपूर्ण उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. या कार्यक्रमाला राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे, वरोरा भद्रावती विधानसेभेचे आमदार करण देवतळे यांच्यासह वन विभागातील सर्व अधिका-यांची उपस्थिती होती.
    woman leadership in forest conservation

      यावेळी पूढे बोलताना आ. किशोर जोरगेवार म्हणाले कि,  वनांचे ‘सर्वांगीण वनसंवर्धन’ करण्यासाठी स्थानिकांचा सहभाग अत्यावश्यक आहे. यासाठी “वनपाटील आणि वनपाटलीन” ही संकल्पना राबविण्यात यावी. ग्रामपंचायत स्तरावर वनपाटील आणि वनपाटलीन पदासाठी निवडणुका घेतल्या गेल्या तर त्या गावातील नागरिकांना वनसंवर्धनाच्या निर्णयप्रक्रियेत थेट सामावून घेता येईल.

    या पदांना महिलांचे प्रतिनिधित्व दिल्यास हुमन इज फॉरेस्ट लिडरशिप या महत्वाकांक्षी संकल्पनेला चालना मिळेल. या संकल्पनेतून  जंगलालगतची गावे फक्त वनसंवर्धक नव्हे, तर विकासाचे केंद्र बनतील. जंगल आणि गाव एकमेकांचे पूरक बनून या भागातील लोकांचा आत्मविश्वास वाढेल असा विश्वास यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार व्यक्त केला.

    1. What is Van Shakti 2025?

    Van Shakti 2025 is a national-level initiative focused on empowering women in the forest sector, promoting sustainable forest conservation, and boosting forest-based employment in India.

    2. How can forests support local village economies?

    Forests can support village economies by promoting eco-tourism, forest produce-based industries, and community-led conservation programs. These create jobs locally and reduce migration.

    4. What is the concept of Forest Patil and Patilin?

    This is a proposed model where villagers elect a Forest Patil (male) and Forest Patilin (female) to participate directly in local forest management and conservation decision-making at the Gram Panchayat level.
  • Save Ram Bagh Ground campaign । रामबाग मैदानावर ‘मातीचा सत्याग्रह’!, झेडपीच्या इमारतीसाठी मैदानाचा बळी?

    Save Ram Bagh Ground campaign

    मैदानात खड्डा, नागरिकांत खदखद! चंद्रपूरमध्ये उभारला मातीचा सत्याग्रह

    Save Ram Bagh Ground campaign : रामबाग मैदान बचाव संघर्ष समिती च्या आवाहनानंतर आज गुरुवार दिनांक 8 मे रोजी सकाळी 7 वाजता शेकडो नागरिक,खेळाडू तसेच पोलीस व सैन्य भरतीसाठी सराव करणारे युवक यांनी एकत्रित येऊन कंत्राटदराने मैदानावर खोदलेल्या खड्ड्यात माती टाकली व ‘मातीचा सत्याग्रह’ केला. कोणत्याही परिस्थितीत रामबाग मैदानावरील नैसर्गिक सौंदर्य नष्ट करू देणार नाही, या मैदानावर सिमेंट काँक्रीटचे जंगल होऊ देणार नाही, झेडपी इमारतीचे बांधकाम होऊ देणार नाही, ‘नाही म्हणजे नाही’, असा संकल्प यावेळी आंदोलनात सहभागी नागरिकांनी केला. Mati Satyagraha at Ram Bagh ground

    नागरिकांनी रामबाग वर सुरु असलेले काम बंद पाडले

    मैदानाचे अस्तित्व धोक्यात

    झेडपीच्या नविन इमारतीमुळे भविष्यात या मैदानाचे अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली. गेल्या चार-पाच दशकापासून नागरिक या मैदानाचा सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी किंवा खेळण्यासाठी वापर करीत आहेत. सिंधी व ताडाच्या वृक्षांनी या मैदानाच्या सौंदर्यात विशेष भर टाकली. मैदानाशी अनेक नागरिकांच्या भावना जुळलेल्या असल्याने कोणत्याही परिस्थितीत या मैदानावर इमारतीचे बांधकाम करू नये अशी स्थानिक नागरिक व खेळाडूंची जनभावना आहे. Citizens oppose ZP office construction


    बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराने मैदानावर खड्डा खोदल्यानंतर नागरिक संतप्त झाले व त्यांनी आंदोलनाचा पवित्र घेतला. जोपर्यंत झेडपीची इमारत इतरत्र स्थलांतरित होत नाही तोपर्यंत आमचा विरोध सुरू राहील अशी भूमिका रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीने घेतली आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता मुकेश टांगळे यांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता एक बैठक संपन्न झाली. या बैठकीला पप्पू देशमुख,भरत गुप्ता व रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे इतर अनेक सदस्य उपस्थित होते. मात्र बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही.

    Mati Satyagraha at Ram Bagh ground

    जिप प्रशासन नागरिकांची दिशाभूल करीत आहे

    नविन इमारत बांधण्याकरिता इतर ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध असतांना प्रदूषित शहरातील सौंदर्याने नटलेल्या एका निसर्गरम्य क्रीडांगणावर जिल्हा परिषदेची इमारत बांधण्याचे नियोजन करणे योग्य नाही. या प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासन जनतेची दिशाभूल करीत आहे. उद्या दिनांक 9 मे रोजी पुराव्यानिशी जिल्हा परिषद प्रशासनाचा पर्दाफाश करणार अशी माहिती रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे पप्पू देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.