Tag: चंद्रपूर

  • Gadchandur zendi mundi gambling news । गडचांदूरात सट्टेबाजांचा दबदबा: पोलिस का गप्प?

    Gadchandur zendi mundi gambling news

    Gadchandur zendi mundi gambling news : चंद्रपूर जिल्ह्यात अनेक छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरु आहे, मात्र जिल्ह्यातील गडचांदूर मधील लक्ष्मी टॉकीज परिसरात गडचांदूर (gadchandur) पोलिसांच्या नाकावर टिच्चून सट्टा केंद्र खुलेआम सर्रासपणे सुरु आहे. विशेष म्हणजे news३४ च्या बातमीनंतर २ मे रोजी पोलिसांनी कारवाई केली मात्र ती कारवाई फक्त देखावा असल्याची चर्चा नागरिकांमध्ये चांगलीच रंगली आहे. Gadhchandur betting racket Laxmi Talkies

    घुग्गुस पोलिसांची महत्वपूर्ण कामगिरी, अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या

    गडचांदूरात सट्टेबाज पोलिसांना घाबरत नाही

    गडचांदूर हे औद्योगिक नगरी आहे याठिकाणी बाहेरील कामगार रोजगारासाठी येत असतात मात्र तिथे या मजूर व कामगार वर्गाला लुटण्यासाठी सट्टेबाज (Gambling) अलिखित परवानगी घेऊन धंदा सुरु करून बसले आहे. पोलिसांच्या कारवाई नंतर सुद्धा हा सट्टा सर्रासपणे पुन्हा येईन च्या पार्श्वभूमीवर सुरु झाला, याचाच अर्थ पोलिसांची वचक आता गुन्हेगारांवर व अवैध धंद्यावर राहिली नाही असे दिसून येत आहे. Illegal gambling in Chandrapur district

    gambling in small towns

    हे आहे मुख्य सूत्रधार

    गडचांदूर शहरातील या सट्ट्याच्या धंद्यात काही भागीदार आहे, ज्यामध्ये शेरू, किट्टु, गणेश आणि लल्लू यांचा समावेश आहे. इसाफ बँक जवळ लक्ष्मी टॉकीज असा या सट्टेबाजांचा पत्ता आहे. Gadchandur zendi mundi gambling news

    सकाळी व सायंकाळी ओपन व नेट च्या जाळ्यात अलगद अडकून आकड्यांचा खेळ सुरु होतो, कुणाला आकडे लागतात तर कुणाचा क्षणभंगुर होतो, तर कुणी गेम लागला म्हणून त्याठिकाणी उड्या मारत बसतो, झटपट पैसे कमविण्याचे आमिष हे सट्टेबाज नागरिकांना देत आहे.

    police ignoring local crime
    पाठबळ कुणाचं?

    जिल्ह्यात अवैध धंदे सुरु करण्यापूर्वी व्यावसायिकांना अलिखित परवानगी घ्यावी लागते, त्यासाठी वरिष्ठ ते कनिष्ठ पर्यंत आर्थिक देवाणघेवाण होते, देवाणघेवाण झाल्यावर व्यवसाय करण्याच्या अटी सांगितल्या जातात, त्यानंतर जागा ठरवीत, आकड्यांचा खेळाला सुरुवात होते. गडचांदूरमध्ये सट्टा, झेंडी मुंडी असे खेळ खेळल्या जातात, पण पोलिसांची यांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत का बरं होत नसेल? हा एक प्रश्नचं आहे. सट्टेबाज यांच्याकडे अशी कोणती शक्ती आहे कि ते पोलिसांना सुद्धा घाबरत नाही.

  • Chandrapur school bus safety committee meeting । ब्रेकिंग! चंद्रपूरमध्ये शालेय बसच्या सुरक्षिततेसाठी मोठे निर्णय! आता नियम मोडल्यास खैर नाही!

    Chandrapur school bus safety committee meeting

    Chandrapur school bus safety committee meeting :  चंद्रपूर जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक पोलिस अधिक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, महानगर पालिकेचे उपायुक्त संदिप चिद्रवार, परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रक स्मिता सुतवणे, पोलीस निरिक्षक (वाहतूक प्रविण पाटील), शिक्षणाधिकारी प्राथमिक/ माध्यमिक यांचे प्रतिनिधी, सर्व तालुक्यातील शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य / मुख्याध्यापक व त्यांचे प्रतिनिधी, स्कूल बस संघटनेचे प्रतिनिधी, ऑटोरिक्षा चालक मालक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये सर्व स्कुल बसधारकांना व संबंधित शाळा व्यवस्थापन यांना पुढीलप्रमाणे सुचना देण्यात आल्या. School transport safety rules Maharashtra

    काम करा व कमवा, चंद्रपूर मनपाची भन्नाट योजना, जाणून घ्या

    विद्यार्थ्यांबाबत माहिती द्यावी

                  स्कूल बस मालकाने सुट्टीच्या कालावधीमध्ये सर्व स्कूल बस वाहनाचे मेन्टनन्स करावे. फिटनेस मुदतीत असेल तरी वाहन तपासणीसाठी आरटीओ कार्यालयाकडे सादर करावे. त्यासाठी आरटीओ कार्यालयामध्ये तपासणी कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. प्रत्येक स्कूल बसला सीसीटीव्ही लावावेत. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिका-यांच्या माध्यमातून पब्लिक ट्रान्सपोर्टने किती विद्यार्थी येतात, याबाबतची माहिती वाहतूक शाखा तसेच प्रादेशिक परिवहन विभागाकडे सादर करावी.

    school transport safety rules

    अनधिकृतपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये

    विद्यार्थ्यांची सुरक्षितता, बस थांब्यावर बस थांबविण्यात यावे, वाहनांचे मेन्टनन्स नियमित करावे, वाहनाचे पार्किंग योग्य ठिकाणी करावे. बस चालकाने मद्यपान करून वाहन चालवु नये, आसनक्षमतेचे उल्लंघन करू नये, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी स्कूलबस नियमावलींचे काटेकोरपणे पालन करावे, मुलींची वाहतूक करणाऱ्या बसमध्ये महिला मदतनिस असणे बंधनकारक आहे. सर्व शाळांनी शालेय परिवहन समितीची स्थापना करून विद्यार्थ्यांच्या वाहतुकीच्या सुरक्षिततेची खात्री करावी. अनाधिकृत ऑटोमध्ये विद्यार्थ्यांची वाहतूक करू नये,

    विद्यार्थ्यांच्या सुरक्षा विषयक काही सुचना गोपनियरित्या घ्यावयाच्या असल्यास वाहतूक पोलीस निरिक्षक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस अधिक्षक यांना देऊ शकतात. अशा व्यक्तिचे नाव गुप्त ठेवण्यात येइल, असे पोलिस अधिक्षक यांनी सांगितले.

  • man dies due to electric wire । सायलवरून जाताना चाकात अडकला मृत्यू, चंद्रपुरात भयावह दुर्घटना

    man dies due to electric wire

    man dies due to electric wire : चंद्रपूर: आकाशवाणी पासून जगन्नाथ बाबा नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर काल रविवार दिनांक 4 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्यामुळे रस्त्यावरून सायकलने जाणाऱ्या एका 60 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यु झाला. प्रभाकर गणपत क्षीरसागर असे मृतकाचे नाव असुन ते दाताळा येथील रहिवासी होते.

    शॉर्ट सर्किट आणि मृत्यू


    सविस्तर असे की जगन्नाथ बाबा नगर येथील ए 65 क्रमांकाच्या खांबावरून उच्च दाबाची 11 केव्ही विजेची तार जाते. काल सायंकाळी 5.30 च्या सुमारास मोठे वादळ आले. परंतु त्याच्या 1 तास आधीच जवळपास सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किट सारखा आवाज झाला व ही 11 केव्हीची तार तुटून रस्त्यावर पडली.

    ७ मे रोजी महावितरणचा लकी ड्रॉ

    काही स्थानिक नागरिकांनी विज वितरण कंपनीला याची तातडीने ऑनलाईन तक्रार केली.4 वाजून 59 मिनिटांनी तक्रार केल्याची नोंद आहे. सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विज पुरवठा बंद केला नाही. पडलेली तार सुद्धा उचलली नाही. तक्रारकर्त्याच्या मोबाईलवर मात्र सायंकाळी 6 वाजता तक्रारीचा निपटारा झाल्याचा ऑनलाइन मेसेज महावितरणकडून पाठविण्यात आला. electricity department negligence case

    सायकलच्या चाकात विजेचा तार अडकला


    यादरम्यान जनता महाविद्यालयात कंत्राटी तत्वावर सुरक्षा रक्षक असलेले दाताळा येथील रहिवासी प्रभाकर गणपत क्षीरसागर सायकलने सायंकाळच्या ड्युटीवर चालले होते. रस्त्याने जात असताना सायकलच्या चाकात विजेचा तार अडकून ते पडले व तारेला स्पर्श झाला.11 केव्हीच्या तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
    वडगाव प्रभागाचे माजी नगरसेवक जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. live wire accident due to storm

    नागरिकांचे आंदोलन

    देशमुख यांनी रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा तसेच रामनगर विज वितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता कुणाल पाटील यांना घटनास्थळी पाचारण केले. यावेळी मृतकांचे कुटुंबीय तसेच दाताळा व जगन्नाथबाबा नगर मधील रहिवाशांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. नुकसान भरपाईचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका उपस्थित नागरिक व मृतकाच्या कुटुंबीयांनी घेतली. अखेर सहाय्यक अभियंता पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला.

    महावितरणच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – जनविकास सेनेची मागणी


    नागपूर व दाताळा मार्गाला जोडणाऱ्या या रस्त्याने हजारो नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थी ये-जा करतात. अशा वर्दळीच्या रस्त्यावर दीड तास 11 केवी विजेची जिवंत तार पडून राहणे अत्यंत धोकादायक आहे. यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी सर्वस्वी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच मृतकाच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे.

  • mahadiscom drama competition winners । चंद्रपूरच्या ‘रंग बावरी’ने मारली बाजी; महावितरण नाट्यकुंभात सहा प्रथम पुरस्कार!

    mahadiscom drama competition winners

    mahadiscom drama competition winners : चंद्रपूर, दि. 5 मे 2025: महावितरणच्या नागपूर प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत चंद्रपूर परिमंडलाच्या ‘रंग बावरी’ या नाटकाने उत्कृष्ट अभिनयासह सर्वोत्कृष्ट नाटकाचा मान पटकावला. दोन दिवस रंगलेल्या या नाट्यकुंभ-2025 मध्ये ‘रंग बावरी’ने विविध गटांमध्ये तब्बल सहा प्रथम पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. अकोला परिमंडलाच्या ‘सिकॅरिअस’ या नाटकाने उपविजेतेपद मिळवले. mahadiscom natya spardha 2025 results

    ७ मे रोजी महावितरणचा लकी ड्रा

    या स्पर्धेतील विजेत्या कलाकारांना महावितरणचे संचालक (संचलन) अरविंद भादिकर आणि संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत, मुख्य अभियंता सर्वश्री सुहास रंगारी, दिलीप दोडके, ज्ञानेश कुलकर्णी, राजेश नाईक आणि स्वागताध्यक्ष हरिश गजबे यांच्यासह नाट्य परिक्षक विनोद दुर्गेपुरोहित, जयदेव सोमनाथे, अँड. चैताली बोरकुटे यांसारखे मान्यवर उपस्थित होते. sicarius drama play review

    जय – पराजय हा स्पर्धेचा भाग

    या सोहळ्यात बोलताना संचालक अरविंद भादिकर यांनी नाट्य कलाकारांचे कौतुक केले आणि स्पर्धेनंतरही त्यांनी एकमेकांशी संवाद कायम ठेवण्याचे आवाहन केले. अपयश आले तरी निराश न होता प्रयत्न सुरू ठेवण्याचा संदेश त्यांनी दिला. संचालक प्रसाद रेशमे म्हणाले, “जय-पराजय हा स्पर्धेचा भाग असला तरी, कलाकारांनी आपली कला सादर करताना मिळवलेला आनंद आणि रसिकांना दिलेला आनंद हेच त्यांचे खरे पारितोषिक आहे.” स्पर्धेचे अध्यक्ष तथा प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी नाटकांच्या माध्यमातून केवळ आनंदच नव्हे, तर अनेक अनुभव मिळाल्याचे मत व्यक्त केले. chandrapur mahadiscom drama winner

    कर्मचाऱ्यांनी आपली कला जोपासली

    नाट्यकुंभ-2025 चे उद्घाटन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या शुभहस्ते झाले होते. यावेळी बोलतांना त्यांनी महावितरणमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामातील या अनमोल अनुभवांना नाट्यकृतींच्या माध्यमातून समाजासमोर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. महावितरण एक मोठा परिवार आहे आणि या कुटुंबातील सदस्यांमध्ये अनेक उत्कृष्ट कलागुण दडलेले आहेत. दैनंदिन कामाचा व्याप सांभाळूनही कर्मचाऱ्यांनी आपली कला जोपासली आहे, हे कौतुकास्पद आहे. ‘नाट्यकुंभ’ सारख्या स्पर्धांमुळे या कलाकारांना त्यांची प्रतिभा सादर करण्याची संधी मिळते. यासोबतच, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद वाढतो आणि सांघिक भावना अधिक दृढ होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या भाषणातून राजेंद्र पवार यांनी विदर्भातील नाट्य परंपरेचाही विशेष उल्लेख केला. mahadiscom natya spardha 2025 results

    chandrapur mahadiscom drama winner

    चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिश गजबे यांनी निर्मिती केलेल्या, श्रीपाद जोशी लिखित आणि संध्या चिवंडे दिग्दर्शित ‘रंग बावरी’ या नाटकाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. तर, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक निर्मित, डॉ. चंद्रकांत शिंदे लिखित आणि नितीन नांदुरकर दिग्दर्शित ‘सिकॅरिअस’ या सस्पेन्स थ्रिलर नाटकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके निर्मित, प्रदीप फाटक लिखित आणि हेमराज ढोके दिग्दर्शित ‘ये रे घना’ आणि गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी निर्मित, अतुल साळवे लिखित व राजेंद्र गिरी दिग्दर्शित ‘दि ॲनॉनिमस’ या नाटकांनाही रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

    या नाट्यस्पर्धेसाठी अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया परिमंडलातील वरिष्ठ अधिकारी आणि नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    नाट्यस्पर्धेचे विजेते

    स्पर्धेचा अंतिम निकाल:
    • सर्वोत्तम नाटक:
    o प्रथम: ‘रंग बावरी’ (चंद्रपूर परिमंडल)
    o द्वितीय: ‘सिकॅरिअस’ (अकोला परिमंडल)
    • दिग्दर्शन:
    o प्रथम: संध्या चिवंडे (‘रंग बावरी’)
    o द्वितीय: नितीन नांदुरकर (‘सिकॅरिअस’)
    • अभिनय (पुरुष):
    o प्रथम: गणेश राणे (रघुपती – ‘सिकॅरिअस’)
    o द्वितीय: सुमित खोरगडे (सुभाष – ‘ये रे घना’)
    • अभिनय (स्त्री):


    o प्रथम: रोहिणी ठाकरे (नेहा – ‘रंग बावरी’)
    o द्वितीय: स्नेहांजली तुंबडे (स्मिता – ‘ये रे घना’)
    • नेपथ्य:
    o प्रथम: रमेश सानप (‘रंग बावरी’)
    o द्वितीय: गजानन जैवाल (‘दि ॲनॉनिमस’)
    • प्रकाश योजना:
    o प्रथम: प्रकाश खांडेकर (‘रंग बावरी’)
    o द्वितीय: विवेकानंद वाध (‘सिकॅरिअस’)
    • पार्श्वसंगीत:
    o प्रथम: राकेश बोरोवार (‘रंग बावरी’)
    o द्वितीय: योगेश सोनुने (‘सिकॅरिअस’)
    • रंगभूषा-वेशभूषा:
    o प्रथम: पौर्णिमा कदम (‘सिकॅरिअस’)
    o द्वितीय: आनंद जैं (‘दि ॲनॉनिमस’)
    • उत्तेजनार्थ पारितोषिक:
    o सामली सायंकाळ (मेधना – ‘रंग बावरी’)
    o अमित पेढेकर (डॉ. विध्वंस – ‘ये रे घना’)
    o नावेद शेख (जरासंघ – ‘दि ॲनॉनिमस’)
    o संतोष पाटील (इन्स्पेक्टर कश्यप – ‘सिकॅरिअस’)

  • Mhada House : कंत्राटी कामगारांना मिळणार अल्प दरात घरं – सुधीर मुनगंटीवार

    Mhada House : कंत्राटी कामगारांना मिळणार अल्प दरात घरं – सुधीर मुनगंटीवार

    Mhada House कामगार हा औद्योगिक क्षेत्रातील कणा असून त्यांचे प्रश्न सोडविणे हे आपले कर्तव्य आहे. महानिर्मिती मधील कंत्राटी कामगारांच्या वेतनात 19 टक्के वाढ मिळाल्याने कामगारांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला आहे. मात्र, कंत्राटी कामगारांच्या मागण्या बाकी आहे. त्या उर्वरित मागण्या भविष्यात सर्वशक्तीनिशी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही, राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तसेच चंद्रपूरच्या म्हाडामध्ये कंत्राटी कामगारांना अल्पदरात घरे उपलब्ध करून देणार असल्याचे ना.सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

    Mhada house महाराष्ट्र राज्य महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने आयोजित विजयी जल्लोष सभेत ना. मुनगंटीवार बोलत होते. यावेळी, महानिर्मिती कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे अध्यक्ष भाई भालाधरे, संयोजक नचिकेत मोरे, कार्याध्यक्ष बंडू हजारे,महानगराचे अध्यक्ष राहुल पावडे, भाजपा महामंत्री ब्रिजभुषण पाझारे,भाजपा महामंत्री डॉ. मंगेश गुलवाडे, गणेश सपकाळे, सतीश तायडे, शंकर गडाख, प्रमोद कोलारकर, अमोल मेश्राम, वामन मराठे, वामन बुटले तसेच कंत्राटी कामगार संघटनेचे पदाधिकारी, तसेच मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. (Mhada House)

    अवश्य वाचा : वडेट्टीवार यांनी केले त्या शेतकरी कुटुंबाचे सांत्वन

    कंत्राटी कामगारांनी आंदोलनाच्या यशानंतर मला निमंत्रित केले असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी सर्व संघटनांनी मिळून एकतेचा नारा दिला. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत सह्याद्री येथे बैठक पार पडली. सर्व संघटनांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संयमी भूमिका घेत योग्य पद्धतीने मांडल्या.

    70 वर्षीय नागरिकांना मिळणार आयुष्यमान योजनेचा लाभ


    Mhada house सर्व संघटनेचे नेते एक विचाराने मागण्यांच्या संदर्भात तर्कसंगतीने विचार मांडत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्मचाऱ्यांच्या निर्णयाबाबत सकारात्मक भूमिका घेतली. आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये 19 टक्के पगारवाढीचा निर्णय घेतला.त्यामुळे आंदोलनाला यश प्राप्त झाले.कंत्राटी कामगारांच्या अद्यापही ज्या मागण्या अपूर्ण आहे. त्या सर्व मागण्या शक्तीनिशी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

    महत्वाचे

    विविध प्रश्न मार्गी:
    चंद्रपूर नगरपरिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आणि 606 कर्मचारी स्थायी झाले. विधिमंडळात वनविभागातील वनमजुरांचा आवाज बुलंद करत त्यांच्यासाठी अधिसंख्य पदे निर्माण केली आणि 11 हजारपेक्षा जास्त वनमजूर स्थायी झाले.
    ऑटो रिक्षावाल्यांचा व्यवसाय कराचा प्रश्न निर्माण झाला होता. स्वतःच कर्ज घेऊन व्यवसाय करणाऱ्यांच्या मागे व्यवसाय कर रद्द करण्याची भूमिका घेतली आणि ऑटो-रिक्षावाल्यांचे व्यवसाय कर रद्द करण्याचे कार्य केले.ऑटो रिक्षावाल्यांना पहिला घरकुलाचा टप्पा देत स्वतःच्या हक्काचे घर उपलब्ध करून दिले.

    कामगारांना अल्पदरात घरे
    चंद्रपूरच्या म्हाडामध्ये योजनेच्या माध्यमातून अल्पदरात घरे निर्माण करण्यात येत आहे. त्यांना स्वतःच्या हक्काचे घर नसेल अशा कंत्राटी कामगारांची यादी तयार करावी. या कंत्राटी कामगारांना अल्पदरात घरे उपलब्ध करून देणार असून घरकुलासाठी अडीच लाख रुपये अनुदान आहे. मात्र, केंद्र व राज्य शासनाच्या वतीने 2 लक्ष रुपये असे मिळून एकूण साडेचार लक्ष रुपये अनुदान उपलब्ध करून देणार असल्याचे पालकमंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

    100 खाटाच्या ई.एस.आय.सी हॉस्पिटलला मान्यता:-
    आरोग्याच्या संदर्भात, कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या रोजंदारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना ई.एस.आय.सी चा फायदा व्हावा याकरीता, केंद्र शासनाने अतिशय उत्तम तंत्रज्ञान असणारे 100 खाटाच्या ई.एस.आय.सी हॉस्पिटलला मान्यता दिली आहे. महाराष्ट्रात नसेल असे उत्तम व अत्याधुनिक हॉस्पिटल ई.एस.आय.सी चे होणार आहे. या रुग्णालयाचा फायदा कंत्राटी कर्मचाऱ्यांना निश्चितपणे होईल, असा विश्वास पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.

  • Pride March : चंद्रपुरात LGBTQIA समुदायाची प्राईड मार्च रॅली

    Pride March : चंद्रपुरात LGBTQIA समुदायाची प्राईड मार्च रॅली

    News34 chandrapur

    चंद्रपूर – प्रेम म्हणजे प्रेम असत तुमचं आणि आमचं सेम असत हे ब्रीदवाक्य अनुसरून आज चंद्रपूर शहरात LGBTQIA समुदायाने प्राईड रॅली काढली, आम्हाला सुद्धा समाजात जगण्याचा अधिकार आहे अश्या घोषणा देत 17 फेब्रुवारीला जिल्हा सामान्य रुग्णालय ते शहरात भ्रमण करीत पुन्हा सामान्य रुग्णालय पर्यंत दुपारी 1 वाजता काढण्यात आली. Lgbtqia rights

     

    संबोधन ट्रस्ट या LGBTQIA हक्कांचे समर्थन करणाऱ्या प्रमुख संस्थेने नुकतेच चंद्रपूर येथे वार्षिक प्राइड मार्च रॅलीचे आयोजन केले होते. हा महत्त्वाचा कार्यक्रम LGBTQIA समुदायासाठी त्यांच्या हक्कांबद्दल आणि समाजातील सर्वसमावेशकतेच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो. प्राईड मार्च रॅली, दरवर्षी आयोजित केली जाते, ही एकता, लवचिकता आणि दृढनिश्चयाचे शक्तिशाली प्रदर्शन आहे. Sambodhan trust

     

     

    हे LGBTQIA समुदाय साजरा करण्यासाठी आणि समान हक्क आणि स्वीकृतीची मागणी करण्यासाठी विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना एकत्र आणते. या रॅलीद्वारे, LGBTQIA समुदायाचा उद्देश सामाजिक पूर्वग्रह, भेदभाव आणि कलंक यांना आव्हान देण्याचा आहे. हे स्मरणपत्र म्हणून काम करते की प्रत्येक व्यक्ती, त्यांची लैंगिक प्रवृत्ती किंवा लिंग ओळख विचारात न घेता, भय, पूर्वग्रह आणि भेदभावापासून मुक्त जीवन जगण्यास पात्र आहे. एलजीबीटीक्यूआयए अधिकारांसाठी अथक प्रयत्नांसाठी ओळखल्या जाणाऱ्या संबोधन ट्रस्टने हा कार्यक्रम आयोजित करण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. Pride march rally

     

     

    समुदायाला एकत्र येण्यासाठी आणि व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करून, ट्रस्ट व्यक्तींना सक्षम बनवण्यात आणि अधिक समावेशक समाजाला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. प्राइड मार्च रॅली हा केवळ विविधतेचा उत्सवच नाही तर LGBTQIA समुदायासमोरील आव्हानांबद्दल लोकांना शिक्षित करण्याची संधी देखील आहे. हे बदलासाठी उत्प्रेरक म्हणून काम करते, संवादाला प्रोत्साहन देते आणि समजूतदारपणा वाढवते. Chandrapur

     

    या रॅलीचे आयोजन करून, संबोधन ट्रस्टने चंद्रपूरमधील LGBTQIA समुदायासाठी सुरक्षित आणि आश्वासक वातावरण निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे एक शक्तिशाली संदेश पाठवते की प्रत्येकजण आदर, सन्मान आणि समान अधिकारांना पात्र आहे, त्यांची लैंगिक प्रवृत्ती किंवा लिंग ओळख विचारात न घेता.

     

    प्राईड मार्च रॅलीला दरवर्षी गती मिळत असल्याने, ती LGBTQIA हक्कांसाठी लढा चालू असल्याची आठवण करून देते. हे व्यक्तींना भेदभावाविरुद्ध उभे राहण्यास आणि अधिक समावेशक आणि स्वीकारार्ह समाजासाठी कार्य करण्यास प्रेरित करते.

  • नवीन शिक्षण धोरणातून ब्राह्मणी मूल्य रुजविण्याचा अजेंडा – डॉ. सुखदेव थोरात यांचे मत

    नवीन शिक्षण धोरणातून ब्राह्मणी मूल्य रुजविण्याचा अजेंडा – डॉ. सुखदेव थोरात यांचे मत

    News34 chandrapur

    चंद्रपूर: प्रचलित शिक्षण व्यवस्थेत अमुलाग्र बदल करून नवीन शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीतून संविधानाला छेद देऊन कोवळ्या वयापासूनच मुलांमध्ये ब्राह्मणी मूल्य रुजविण्याचा अजेंडा असल्याचा आरोप यूजीसी चे माजी अध्यक्ष पद्मश्री डॉ. सुखदेव थोरात यांनी केला.
    स्थानिक प्रियदर्शनी सांस्कृतिक सभागृहात दिनांक 17 रोजी विदर्भस्तरीय शिक्षण बचाव परिषद संपन्न झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते उद्घाटन सत्रात (आॅन लाईन) बोलत होते.

     

    शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. अध्यक्षस्थानी शिक्षण संघर्ष समन्वय समितीचे मुख्य समन्वयक रमेश बीजेकर होते. परिषदेचे स्वागताध्यक्ष नेत्ररोग तज्ञ डॉक्टर चेतन खुटेमाटे होते यांनी मान्यवरांचे स्वागत केले.यावेळी विचार पिठावर धनोजे कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष अॅड. पुरुषोत्तम सातपुते, गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हा सेवाधिकारी अॅड. दत्ताभाऊ हजारे, समता सैनिक दलाचे खुशाल तेलंग, मुस्लिम हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष अनवार अली, पुरोगामी ग्रामीण पत्रकार संघाचे किशोर पोतनवार, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. डॉक्टर सतीश कन्नाके, राज्य मध्यवर्ती सरकारी कर्मचारी संघटनेचे दीपक जेऊरकर, गुरुद्वारा कमिटीचे अध्यक्ष चमकोर सिंग बसरा आदिंची उपस्थिती होती.

     

    पुढे बोलताना थोरात म्हणाले की केंद्र सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण लागू करताना ते संसदेसमोर चर्चेला ठेवले नाही आणि ते अत्यंत कमी वेळात लोकांवर लादले. या धोरणातील अनेक तरतुदींमुळे ओबीसी, एस सी एसटी समुहातील विद्यार्थी तसेच मुलींना शिक्षण प्रवाहाच्या बाहेर फेकले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. या धोरणाचा सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात विरोध होणे गरजेचे आहे त्यासाठी राज्यकर्त्यांपर्यंत या धोरणाचे धोके व दष्परिणाम पोहोचविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

     

    यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना आमदार सुधाकर अडबाले म्हणाले की राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून जो चुकीचा अजेंडा राबविला जात आहे त्याबाबत विधान परिषदेत आवाज उठविणार असल्याचे आश्वासन दिले. यावेळी उद्घाटन सत्राचा अध्यक्षीय समारोप करताना शिक्षण बचाव समन्वय समितीचे निमंत्रक रमेश बीजेकर म्हणाले की, भारतीय राज्यघटनेतील शिक्षण हक्क कायद्यामुळे केजी टू पीजी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाला मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचा कायदा आहे. असे असताना केंद्र सरकारने 2020 मध्ये लागू केलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या माध्यमातून शिक्षण हक्क कायद्याला पायदळी तुडविले आहे. ज्यांच्याकडे पैसा तोच शिक्षण घेऊ शकेल अशी परिस्थिती निर्माण करणारा हा कायदा आहे. त्यामुळेच राष्ट्रीय शिक्षण धोरणाला सर्व स्तरातून विरोध होत आहे. शिक्षण वाचविण्यासाठी कार्यरत असलेल्या विविध चळवळीच्या माध्यमातून शासनाचा हा अजेंडा आम्ही कदापिही यशस्वी होऊ देणार नाही. यासाठी गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात प्रबोधनाची चळवळ उभी करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

     

    प्रास्ताविक व भूमिका डाॅ. राकेश गावतुरे यांनी केले. उद्घाटन सत्राचे संचालन ऍड प्रशांत सोनूले आभार भास्कर मून यांनी मानले. परिषदेला विदर्भातील विविध जिल्ह्यातील शिक्षप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    परिषदेच्या दुसऱ्या सत्रामध्ये प्राध्यापक डॉक्टर संतोष सुरडकर गुन्हा विद्यापीठ यांनी नवीन शैक्षणिक धोरणाची चिरफाड केली आणि बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित करण्यासाठी आणि 85 टक्के समूहाला शिक्षणा पासून दूर करण्यासाठी हे नवीन शैक्षणिक धोरण कसे कारणे विठ्ठल याची मीमांसा केली तर वाशिमचे रेणुकादास उबाळे यांनी शिक्षण हक्क कायद्याचा विवाह केला आणि तो कायदा सुद्धा पूर्णतः शिक्षणाला न्याय देणारा नसला तरी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्या कायद्याला विपरीत असे धोरण कसे आखले गेले याचा उलगडा केला तसेच डॉक्टर अभिलाषा गावतुरे यांनी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये स्त्रियांच्या शिक्षणावर सर्वात जास्त नकारात्मक परिणाम कसा होईल याची मीमांसा केली आणि एकूणच समाजावर याचा विपरीत प्रमुख परिणाम कसा होईल हे स्पष्ट केले.

     

    या सत्राचे अध्यक्ष भाषण करताना ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हिराचंद बोरकुटे यांनी असा असेवैधानिक शैक्षणिक धोरण राबवणाऱ्या सरकारला उचलून टाकले पाहिजे असे आवाहन उपस्थित यांना केले सत्राचे सूत्रसंचालन तर आभार प्रदर्शन प्राध्यापक माधव गुरणुले यांनी केले
    तिसऱ्या आणि शेवटच्या सत्रामध्ये डॉक्टर सचिन भेदे यांनी भारतीय शिक्षणाचा इतिहास हा सुद्धा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास आहे आणि नवीन शैक्षणिक धोरण हे प्रतिक्रांतीचे लक्षण आहे अशी मीमांसा केली गडचिरोलीतील प्रसिद्ध आदिवासी आंदोलक देवाजी तोफा यांनी भावा नाटे मावा सरकार ची संकल्पना उद्धत केली आणि आपल्याच सरकारला आपणच निवडून दिलेले असताना आपले सरकार आपल्या गावात का असू नये असा प्रश्न केला आणि सरकार जर आपलेच आहे तर इथल्या जल जंगल जमीन या संपत्तीवर जनतेचाच अधिकार आहे हे स्पष्ट केले या परिषदेत एकूण 14 ठराव घेण्यात आले आणि ते आबाजी मतदानाने मंजूर करण्यात आले ठराव वाचन सामाजिक कार्यकर्ता जितेश कुळमेथे यांनी केले.

     

    या शब्दाचे अध्यक्षता कुरपणा येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री प्रभाकर गेडाम यांनी केली आणि केवळ परिषद घेऊन न थांबता त्याच्या पाठोपाठ तळागडातील गाव खेड्यामध्ये ही शिक्षण बचाव मोहीम राबविण्याचे आवाहन श्रोत्यांना केले परिषदेच्या यशस्वीतेसाठी
    भीम आर्मीचे सुरेंद्र भाऊ रायपुरे, अविनाश आंबेकर, विजय मुसळे, प्राध्यापक डहाके, इरफान शेख, अमोल खोब्रागडे, नंदकिशोर शेरकी, वाशिमचे गजानन धामणे,
    एडवोकेट पुनमचंद वाकडे यांनी परिश्रम घेतले.

  • सर्व धर्म जातींच्या विचाराचा मेळ म्हणजे गोपालकाला – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    सर्व धर्म जातींच्या विचाराचा मेळ म्हणजे गोपालकाला – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

    News34 chandrapur

    ब्रह्मपुरी – अध्यात्म मार्गाची वाट धरून सत्संगाची शिकवण घेण्यासाठी पवित्र मनाने आपल्या भूत काळातील चुकांची माफी मागून ईश्वराची आराधना करणे व महायज्ञात दृष्ट वृत्तीचे दहन करून मनातील अहंकार, द्वेष भावना याचा नाश करणे हेच भागवत सप्ताहा मागील उदांत हेतू होय.या अध्यात्म सप्ताहाचा समारोप म्हणजे हा सर्व घराघरातील विचारांनी एकत्र येऊन घातलेला मेळ हा गोपालकाला होय. असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रम्हपुरी तालुक्यातील बेटाळा येथे आयोजित श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह निमित्ताने बोलत होते.

     

    या प्रसंगी प्रामुख्याने मंचावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ. नामदेव कीरसान, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी जि.प.सदस्या स्मिताताई पारधी, महिला काॅंग्रेसच्या शहराध्यक्षा योगिताताई आमले, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष नामदेव लांजेवार, माजी नगरसेवक जगदीश आमले, चौगानचे सरपंच उमेश धोटे, काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते नानाजी तुपट, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके, सरपंच दौलत ढोंगे, उपसरपंच सोनाली सुर्यवंशी, बाजार समितीचे संचालक ब्रम्हदेव दिघोरे, ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष पांडुरंग दिघोरे, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सहसचिव डि.के.मेश्राम, संजय मिसार यांसह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

     

     

    यावेळी पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, अध्यात्म व सत्संगाचा मार्ग हा ईश्वर प्राप्तीचा खरा मार्ग आहे. या भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह निमित्ताने संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण पसरले असून यातून गाव एकोब्याचे दर्शन घडते.असेही ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी आयोजकांकडून विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

     

    तर गावात स्वच्छता अभियान राबवून गाव नेहमी स्वच्छ ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा. तसेच गाव हा विश्वाचा नकाशा असुन गावांच्या समृध्ततेवरून देशाची ओळख होत असते. त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत पुढाकार घ्यावा असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांनी मार्गदर्शनपर भाषणातून केले. यानंतर संपूर्ण ग्राम वासियांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.आयोजित श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ सप्ताह कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजक कमिटी व संपूर्ण बेटाळा ग्राम वासी यांनी अथक परिश्रम घेतले.

  • चंद्रपुरात पसरली धुक्याची चादर

    चंद्रपुरात पसरली धुक्याची चादर

    News34 chandrapur

    चंद्रपूर – पहाटेपासून आज चंद्रपूर जिल्ह्यात धुक्याची चादर पसरली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे वातावरणात बदल पाहायला मिळत आहे. ढगाळ वातावरण, रिमझिम पाऊस तर आज सकाळी मोठ्या प्रमाणात धुके पडले आहे. त्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांना अडचण निर्माण होत असून तापमानात घट झाली आहे.

    सकाळी बाहेर फिरायला पडलेले नागरिक सुद्धा आजचे वातावरण बघून संभ्रमात पडले, कधी पाऊस तर कधी पावसात थंडी असे बदल नागरिक आता रोज बघत आहे, मात्र अचानक घर, मार्ग, उद्यान हे आज धुक्याच्या चादरेखाली लपल्याने आता नेमका वातावरणात काय बदल होणार याबाबत नागरिकांची आज चर्चा रंगली होती.

     

    यावर चंद्रपुरातील पर्यावरण तज्ञ सुरेश चोपणे यांनी आपली प्रतिक्रिया दिली…

     

    अवकाळी पाऊस व वातावरणात झालेला बदल यामुळे चंद्रपुरात धुक्याची चादर पसरली, हवेतील बाष्प मोठ्या प्रमाणात असल्याने आज चंद्रपुरात हा बदल झाला असून हे चित्र पुन्हा 2 दिवस दिसणार.

    सध्या दक्षिण भारतात वादळी पाऊस वाढल्याने राज्यात थंडीचे प्रमाण वाढण्याचे हे संकेत आहे अशी प्रतिक्रिया पर्यावरण तज्ञ सुरेश चोपणे यांनी news34 सोबत बोलताना दिली.

  • चंद्रपूर युवासेनेत असंख्य युवकांचा प्रवेश

    News34 chandrapur

    चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा युवासेना मध्ये असंख्य युवकांनी 3 नोव्हेम्बरला शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

     

    चंद्रपूर युवासेनेची सूत्रे हाती घेतल्यावर विक्रांत सहारे यांनी पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम केले, युवक व युवतीच्या समस्यांना न्याय सुद्धा त्यांनी आपल्या माध्यमातून न्याय देण्याचा अनेकदा प्रयत्न केला.

    मागील अनेक महिन्यापासून असंख्य युवक युवासेनेत प्रवेश घेत आहे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कार्यशैलीवर प्रभावित होत, शहरातील असंख्य युवक आज युवासेनेत सामील झाले.

     

    यावेळी युवासेना शहर अधिकारी शहबाज शेख, उपशहर प्रमुख संघदीप रामटेके व प्रवेश घेणारे राहुल कोवे, सिधु कोवे, आदेश वाघमारे, यश भडके, मोहित कांबळे, अरबाज खान, तन्मय उमाटे, श्रेयस कांबळे, जय निखारे व आदी युवकांची उपस्थित होती.