PM Surya Ghar free solar scheme Chandrapur । चंद्रपूर जिल्ह्यात सौरक्रांती! 5616 घरांवर बसले सोलर – तुम्ही अजूनही वाट पाहताय?

PM Surya Ghar free solar scheme Chandrapur

PM Surya Ghar free solar scheme Chandrapur : चंद्रपूर – प्रधानमंत्री ‘सूर्यघर’ – मोफत वीज योजना चंद्रपूर वेगाने आकार घेत आहे. या योजनेत चंद्रपूर जिल्ह्यात अक्षरशः नेतृत्व स्वीकारले असून, सौर ऊर्जा निर्मितीत उत्कृष्ट कामगिरी नोंदवत जिल्हयात 5616 ग्राहकांनी लाभ घेतलेला आहे. 5616 households benefit from Surya Ghar Chandrapur

दहशतीचा कट उधळला, बल्लारपूर पोलिसांची धडक कारवाई

चंद्रपूरच्या या यशामागे नागरिकांचा वाढता सहभाग, स्थानिक प्रशासनाचे प्रभावी नियोजन आणि योजनेच्या लाभांची योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न कारणीभूत आहेत. यामुळे केवळ विजेच्या खर्चात बचतच होत नाही, तर पर्यावरणाची देखील काळजी घेतली जात आहे. प्रधानमंत्री ‘सूर्य घर’ योजनेमुळे चंद्रपूरकर आता खऱ्या अर्थाने ‘सूर्यशक्ती’ चा अनुभव घेत आहेत आणि हरित भविष्याच्या दिशेने एक नवा अध्याय लिहित आहेत.

चला,आपणही ‘सूर्य घर’ योजनेत सहभागी होऊया!


भविष्यातही चंद्रपूर जिल्हा याच वेगाने सौर ऊर्जा क्षेत्रात प्रगती करेल आणि देशाला ऊर्जा आत्मनिर्भर बनवण्यात सिंहाचा वाटा उचलेल अशी अपेक्षा आहे. आपणही या अभियानाचा भाग होऊन आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा संच स्थापित करून वीज बचतीसोबतच पर्यावरण संवर्धनात हातभार लावू शकता.

अधिक माहितीसाठी आजच महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart/index.php या संकेतस्थळाला किंवा नजिकच्या कार्यालयाशी अथवा केंद्र शासनाच्या https://pmsuryaghar.gov.in/#/ या संकेतस्थळाला भेट द्या आणि या पर्यावरण संवर्धनाच्या क्रांतीमध्ये सहभागी व्हा! असे आवाहन चंद्रपूर महावितरणने केले आहे.

Comments

One response to “PM Surya Ghar free solar scheme Chandrapur । चंद्रपूर जिल्ह्यात सौरक्रांती! 5616 घरांवर बसले सोलर – तुम्ही अजूनही वाट पाहताय?”

  1. Ramesh Pise Avatar
    Ramesh Pise

    That’s why, no raining in this area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *