MSEDCL security deposit deduction policy : चंद्रपूर :- 23 जुलै – दोन महिने ज्यांचे वीज देयक थकेल त्यांच्या सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाईल असा नवीन नियम महावितरणने 15 जुलैपासून लागू केला आहे. सर्व संवर्गातील ग्राहकांकडे वीज देयकाची थकबाकी प्रत्येक वर्षी वाढत आहे.
यामुळे महावितरण ही वीज कंपनी आर्थिक अडचणीत सापडली आहे. त्यामुळे आता सलग दोन महिन्यांचे वीज देयक थकल्यास तिसऱ्या महिन्यात वीज ग्राहकाच्या सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाणार आहे. ही रक्कम एकदा कपात झाली की नंतर वीज ग्राहकाला प्रथम सुरक्षा ठेवीची रक्कम व त्यानंतर देयकातील इतर शिल्लक रक्कम भरणे बंधनकारक असेल. what happens if electricity bill is unpaid for 2 months
महावितरणकडून प्रत्येक वर्षी वाढीव वीज देयकानुसार पाठवले जात असलेल्या सुरक्षा ठेवीची रक्कम ज्या ग्राहकांनी भरली नसेल त्याला ही संपूर्ण रक्कम भरावी लागेल. त्यानंतरच संबंधित ग्राहकाचे शिल्लक देयक भरता येईल ही रक्कम न भरल्यास ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित केला जाईल. त्यानंतर ग्राहकाला पुरवठा पुन्हा सुरू करण्यासाठी पूर्वीची सुरक्षा ठेव, देयकाची थकबाकी भरावी लागेल.
विज जोडणी शुल्क भरूनच वीज जोडणी पूर्ववत करता येऊ शकेल. हा नियम लागू होण्यापूर्वी दोन महिन्यांचे देयक थकल्यास तिसऱ्या महिन्यात पंधरा दिवसांची नोटीस दिली जात होती. त्यानंतरही देयक न भरल्यास वीजपुरवठा तात्पुरता खंडित केला जात होता. कायम विजपुरवठा खंडित झाल्यावर मात्र सुरक्षा ठेवीतील रक्कम थकबाकीतून वळती केली जात होती.
नियम
15 जुलैपासून महावितरणाचा नवा नियम लागू
दोन महिने वीज बिल न भरल्यास, तिसऱ्या महिन्यात ठेवीतून वसुली
नंतर सुरक्षा ठेव पुन्हा भरावी लागणार, अन्यथा सेवा प्रभावित होणार
महावितरणच्या कर्मचाऱ्यांची वीज खंडित करण्याची जबाबदारी होणार कमी
मोठ्या थकबाकीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न
कंपनीच्या आर्थिक स्थेर्याला बळकटी देण्यासाठी निर्णय
Power restoration during flood conditions : चंद्रपूर, ११ जुलै, २०२५: महावितरणचे कर्मचारी दररोज आपल्या जीवाची पर्वा न करता, विशेषतः पावसाळ्यात, जोखमीची कामे करत असतात. बुधवार आणि गुरुवारी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले होते, ज्यामुळे वीजपुरवठ्यात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. मात्र, महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता युद्धपातळीवर काम करत, खंडित झालेला वीजपुरवठा काही तासांतच सुरळीत केला आणि ग्राहकांकडून कौतुकाची थाप मिळवली.
गावाभोवती पुराची परिस्थिती असताना, सर्वत्र पाणीच पाणी साचलेले असताना, मानवी गरजांपैकी एक महत्त्वाची गरज असलेली विद्युत व्यवस्था सुरू राहणार की नाही, हा नागरिकांच्या मनातील एक मोठा प्रश्न असतो. अशा परिस्थितीत वीज येणारच नाही, असे नागरिक गृहीत धरतात, कारण या पुराच्या पाण्यात जर विद्युत पुरवठा खंडित झाला, तर आपला जीव धोक्यात घालून तो सुरळीत कोण करणार, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होतो. MSEDCL flood emergency response team efforts
परिस्थिती कशीही असो, महावितरणचे कर्मचारी अशा परिस्थितीतही नागरिकांना अंधारात न ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करतात आणि पुराच्या परिस्थितीतही जाऊन विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे काम करतात. अशीच एक घटना गेल्या दोन दिवसांत गांगलवाडी वीज वितरण केंद्रात घडली आहे.
बोटीच्या साहाय्याने कर्मचारी पोहोचले
दिनांक ९ आणि १० जुलै, २०२५ रोजी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पुराच्या पाण्याखाली आलेल्या विद्युत व्यवस्थेला सुरळीत करण्याचे काम पूर्ण केले. बोटीच्या साहाय्याने पुराच्या ठिकाणी जाऊन बंद झालेली विद्युत वाहिनी कापून, उर्वरित गावांचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आला.
महावितरणच्या गांगलवाडी शाखेचे अधिकारी श्री. दिनेश हनवते (सहाय्यक अभियंता) आणि कर्मचारी श्री. बोंडेजी (मुख्य तंत्रज्ञ), श्री. राकेश मलोडे (वरिष्ठ तंत्रज्ञ), श्री. आकाश नखाते (वरिष्ठ यंत्रचालक), श्री. बारेवाड (यंत्रचालक), श्री. रोहित करंजीकर (तंत्रज्ञ), श्री. सूरज खोब्रागडे (बाह्यस्त्रोत यंत्रचालक), श्री. नागदेवते (बाह्यस्त्रोत यंत्रचालक), श्री. सचिन चहांदे (बाह्यस्त्रोत तंत्रज्ञ) आणि अन्य गांगलवाडी वीज वितरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे हा विद्युत पुरवठा सुरळीत केला. त्यांच्या या कामगिरीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
MSEDCL strike day power backup plan : चंद्रपूर, दि. ८ जुलै २०२५: महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांनी बुधवारी (दि. ९) एका दिवसाचा संप पुकारला आहे. या संपकाळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालिन नियोजन पूर्ण झाले राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज राहणार आहे. वीजपुरवठ्याबाबत काही तक्रारी किंवा शंका असल्यास २४ तास सुरु असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व संपाच्या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन महावितरण कडून करण्यात आले आहे.
राज्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या सहा संघटनांच्या संयुक्त कृती समितीने राज्यपातळीवरील विविध मागण्यांसाठी बुधवारी (दि. ९) २४ तासांचा संप जाहीर केला होता. हा संप होऊ नये यासाठी कृती समितीमधील संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत दोन वेळा बैठक झाली. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र व संचालक (मानव संसाधन) श्री. राजेंद्र पवार यांनी प्रमुख मागण्यांबाबत बैठकीत सकारात्मक प्रतिसाद दिला. वीज ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी संप टाळण्याचे आवाहन केले. how to manage power supply during employee strike
महावितरण तर्फे आपत्कालीन व्यवस्था
आपत्कालिन नियोजन व पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध- या २४ तासांच्या संप काळासाठी महावितरणकडून आपत्कालीन व्यवस्था उभारण्यात आली आहे. यामध्ये मुख्यालय व क्षेत्रीय परिमंडल कार्यालयांमध्ये स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. दर तासाला राज्यातील वीजपुरवठ्याची स्थिती वरिष्ठ अधिकारी व मुख्यालयास कळविण्यात येणार आहे.
संपकाळात प्राधान्याने सुरळीत वीजपुरवठ्यासाठी पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येत असून संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्य स्त्रोत कर्मचारी, महावितरणच्या निवड सूचीवरील कंत्राटदार व कर्मचारी यांची सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या कंत्राटदारांना अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे. या सर्वांसाठी वाहन व्यवस्था व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबतच्या लेखी सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. government action plan for electricity during labour strike
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द
रोहीत्र, वीजवाहिन्यांसह इतर साधनसामुग्री उपलब्ध- संपकाळामध्ये सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सर्व क्षेत्रीय विभाग कार्यालयांच्या निवडसूचीवर असलेल्या सर्व कंत्राटदारांना आवश्यक साधनसामुग्री, मनुष्यबळ व वाहनांसह संबधीत कार्यालयांमध्ये उपलब्ध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच महावितरणकडून वितरण रोहीत्र, ऑईल, वीजतारा, केबल्स, वीजखांब, फिडर पिलर्स, डिस्ट्रीब्यूशन बॉक्सेस, वाहतुकीसाठी वाहने आदी आवश्यक साधनसामुग्री महावितरणच्या विविध कार्यालयांमध्ये उपलब्ध ठेवण्यात आली आहे. यासह गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून इतर अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बुधवारच्या (दि. ९) रजा रद्द करण्यात आल्या आहेत.
घरगुतीसह अत्यावश्यक क्षेत्रात वीजपुरवठ्याची खबरदारी- संपकाळात प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसह पाणी पुरवठा योजना, रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालये आदींचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. ज्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला त्या ठिकाणी सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून (बॅकफिड) वीजपुरवठा सुरू करण्यात येईल.
येथे साधा कधीही संपर्क- संपकाळात वीजसेवा देणारे अभियंते व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. वीजपुरवठा संदर्भात काही तक्रारी असल्यास शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत. MSEDCL power outage support contact number
Maharashtra discom power supply strategy :चंद्रपूर:- दिनांक 30 जून – वीज सेवा अखंडित देणे ही महावितरणची जबाबदारी आहे. त्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याची कारणे शोधा, फिडरची लांबी जास्त असेल तर त्याची विभागणी करा, नविन डिटीसी लावा, नविन एबी स्विच लावा, तसेच वीज पुरवठा अखंडित रहावा यासाठी पर्यायी व्यवस्थेतून वीज पुरवठा करता येईल त्यादृष्टिने कायमस्वरूपी नियोजन करा. तसेच आरडीएसएस योजनेअंतर्गत सुरू असलेल्या वीज यंत्रणा सुधारणा आणि मजबूतीकरणाच्या कामांना गती द्या असे निर्देश संचालक (प्रकल्प/संचालन) सचिन तालेवार यांनी दिले. feeder level power outage analysis
चंद्रपूर परिमंडळ येथे दि. 29/06/2025 ला झालेल्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता हरीश गजबे ,अधीक्षक अभियंता चंद्रपूर मंडळ संध्या चिवंडे, अधीक्षक अभियंता गडचिरोली मंडळ प्रकाश खांडेकर, कार्यकारी अभियंता विकास शहाडे, विलास नवघरे, चंद्रशेखर दारवेकर, सत्यदेव पेगलपट्टी,वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) राकेश बोरीवर, कार्यकारी अभियंता बल्लारशा रागीट, कार्यकारी अभियंता ब्रह्मपुरी भारतभूषण औगड, कार्यकारी अभियंता गडचिरोली पारेख, कार्यकारी अभियंता आलापल्ली वाघमारे तसेच महावितरणच्या परिमंडळातील सर्व विभागीय कार्यकारी अभियंते आणि जिल्ह्यातील उपविभागीय अभियंते उपस्थित होते.
वीज पुरवठा बंद करण्यापूर्वी ग्राहकाला सूचना द्या
यावेळी संचालक (प्रकल्प/संचालन) यांनी फिडर निहाय झालेला वीज पुरवठा खंडिताचा आढावा घेतला. कार्यकारी अभियंता यांनी देखभाल दुरूस्तीच्या कामावर नियंत्रण ठेवावे तसेच ग्राहकांची तक्रार होणार नाही यासाठी सक्षम अधिकारी यांच्या परवानगीने आणि वीज ग्राहकाला पुर्व सुचना देवूनच देखभाल दुरूस्तीसाठी वीज पुरवठा बंद करण्यात यावा, औद्योगिक ग्राहकाची भूमिका जिल्ह्याच्या विकासात महत्वाची आहे.
औद्योगिक ग्राहकांसाठी विजेच्या महत्व लक्षात घेऊन त्यांना सुरळीत वीज सेवा देण्यासोबत त्यांच्या वीज सेवे विषयक अडचणी जाणून घ्या आणि त्यांच्या तक्रारी तत्परतेने सोडवा. तसेच अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता यांनी प्रत्येक महिन्यातून एकदा जिल्ह्यातील उद्योजकांसोबत बैठक घेत पुढाकार घेऊन वीज पुरवठ्याशी संबंधित प्रश्न सोडविण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. तक्रार घेऊन येणाऱ्या ग्राहकांना सौजन्याची वागणूक द्या, ग्राहकांच्या नावात बदल करण्याची आणि नविन वीज जोडणीसाठी महावितरणने ग्राहकांसाठी ऑनलाईन व्यवस्थेची सोय केली आहे, त्यामुळे वीज जोडणीचे अर्ज प्रलंबित राहणार नाही.
यावेळी सचिन तालेवार संचालक (प्रकल्प/संचालन) बोलतांना म्हणाले की, वीज ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवून महावितरणमध्ये अनेक धोरणात्मक बदल करण्यात आले आहे. त्यामुळे चंद्रपूर परिमंडळातील शेवटच्या कर्मचाऱ्यांना महावितरणची ध्येय धोरणे, तसेच मुख्य कार्यालयातील बैठकितील निर्देश, सुचना यांची माहिती देण्यासाठी, नियमित लाईनस्टाफ पर्यंत संवाद साधा असेही निर्देश त्यांनी दिले.
PM Surya Ghar free solar scheme Chandrapur : चंद्रपूर – प्रधानमंत्री ‘सूर्यघर’ – मोफत वीज योजना चंद्रपूर वेगाने आकार घेत आहे. या योजनेत चंद्रपूर जिल्ह्यात अक्षरशः नेतृत्व स्वीकारले असून, सौर ऊर्जा निर्मितीत उत्कृष्ट कामगिरी नोंदवत जिल्हयात 5616 ग्राहकांनी लाभ घेतलेला आहे. 5616 households benefit from Surya Ghar Chandrapur
चंद्रपूरच्या या यशामागे नागरिकांचा वाढता सहभाग, स्थानिक प्रशासनाचे प्रभावी नियोजन आणि योजनेच्या लाभांची योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न कारणीभूत आहेत. यामुळे केवळ विजेच्या खर्चात बचतच होत नाही, तर पर्यावरणाची देखील काळजी घेतली जात आहे. प्रधानमंत्री ‘सूर्य घर’ योजनेमुळे चंद्रपूरकर आता खऱ्या अर्थाने ‘सूर्यशक्ती’ चा अनुभव घेत आहेत आणि हरित भविष्याच्या दिशेने एक नवा अध्याय लिहित आहेत.
चला,आपणही ‘सूर्य घर’ योजनेत सहभागी होऊया!
भविष्यातही चंद्रपूर जिल्हा याच वेगाने सौर ऊर्जा क्षेत्रात प्रगती करेल आणि देशाला ऊर्जा आत्मनिर्भर बनवण्यात सिंहाचा वाटा उचलेल अशी अपेक्षा आहे. आपणही या अभियानाचा भाग होऊन आपल्या घराच्या छतावर सौर ऊर्जा संच स्थापित करून वीज बचतीसोबतच पर्यावरण संवर्धनात हातभार लावू शकता.
अधिक माहितीसाठी आजच महावितरणच्या https://www.mahadiscom.in/ismart/index.php या संकेतस्थळाला किंवा नजिकच्या कार्यालयाशी अथवा केंद्र शासनाच्या https://pmsuryaghar.gov.in/#/ या संकेतस्थळाला भेट द्या आणि या पर्यावरण संवर्धनाच्या क्रांतीमध्ये सहभागी व्हा! असे आवाहन चंद्रपूर महावितरणने केले आहे.
msedcl celebrated 20th anniversary – चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित 20 व्या वर्धापन दिनानिमित्त सांघिक कार्यालय मुंबई यांचेकडून दिलेल्या कार्यक्रमानुसार 1 जून ते 6 जून 2025 विद्युत सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला. त्या अनुषंगाने दिनांक 6 जून 2025 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित चंद्रपूर मंडळ यांचे वतीने वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 10.10 वाजता सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सुरक्षेची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. त्यानंतर शकुंतला सेलिब्रेशन हॉल चंद्रपूर येथे कार्यक्रमाचा उदघाटन सोहळा माननीय अधीक्षक अभियंता श्रीमती संध्या चिवंडे चंद्रपूर मंडळ यांचे अध्यक्षतेखाली व श्री रमेश सानप अधीक्षक अभियंता (पा.आ.) चंद्रपूर परिमंडळ, श्री सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) (प्र.) सुशिल विखार, श्री. विशाल पिपरे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी, चंद्रपुर विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर दारव्हेकर, तसेच यावेळी चंद्रपूर परिमंडळातील सर्व सन्माननीय अभियंते,यंत्रचालक, वाहिनी कामगार व इतर तांत्रिक अतांत्रिक कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते. msedcl 20th foundation day celebration in chandrapur
चंद्रपूर मंडल वर्धापन दिन आयोजन समितीतर्फे मंडळातील सर्व अधिकारी कर्मचारी यांचे करिता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये सर्व अभियंता, तांत्रिक अतांत्रिक कर्मचाऱ्यांनी त्यांचे कुटुंबीय व पाल्य यांचे सह उस्फूर्तपणे सहभाग नोंदवून कार्यक्रमाचा आनंद घेतला.
बक्षीस वितरण सोहळा
सायंकाळी बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. श्रीमती संध्या चिवंडे चंद्रपूर मंडळ यांनी इतर तांत्रिक अतांत्रिक कर्मचारी यांचे सह केक कापून महावितरण कंपनीचा 20 वा वाढदिवस साजरा केला व सर्व अधिकारी कर्मचारी यांना विद्युत सुरक्षा सप्ताह व वर्धापन दिनानिमित्त मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर चंद्रपूर मंडलातील सर्व अधिकारी कर्मचारी त्यांचे कुटुंबीय व पाल्य यांच्याकरिता गीतांचा संगीत रजनी कार्यक्रम आयोजित करण्यात आला व सोबतच सर्वांकरिता स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. रात्री 10 वाजेपर्यंत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी संगीत रजनी व स्नेहभोजनाचा आनंद घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
Chandrapur power outage solutions : चंद्रपूर शहरातील वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी विश्रामगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी वीजपुरवठा खंडित होण्यामागची कारणे शोधून, कायमचा तोडगा काढण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार (mla kishor jorgewar) यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
या बैठकीला कार्यकारी अभियंता दारवेकर, उपकार्यकारी अधिकारी राजेश खडसे, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, भाजप नेते प्रकाश देवतळे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टुवार, मनोज पाल आदींची उपस्थिती होती.
तातडीने उपाययोजना करा
शहरातील नागरिकांना वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्यामुळे उद्भवणाऱ्या त्रासाबाबत यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी महावितरण अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना राबवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तांत्रिक बिघाड, देखभाल व इतर अडचणींचा त्वरित आढावा घेऊन, वीजपुरवठा नियमित व सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ हाती घेण्याचे आदेश यावेळी त्यांनी महावितरणच्या (msedcl)अधिकाऱ्यांना दिले आहेत. Chandrapur electricity supply issues 2025
स्वतंत्र हेल्पलाईन सुरु करा
महावितरणकडून शहरातील विविध भागांत होणाऱ्या वारंवार खंडित वीजपुरवठ्याची कारणे तपासून, दुरुस्तीसाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे, अशी सूचना बैठकीत देण्यात आली. याशिवाय, नागरिकांच्या तक्रारी आणि अडचणी तातडीने निवारण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्याच्या दृष्टीनेही चर्चा झाली. नागरिकांना नियमित, अखंड आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरणने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश आमदार जोरगेवार यांनी दिले. नागरिकांचा संयम संपत चालला आहे. सतत वीजपुरवठा खंडित होणे ही गंभीर समस्या असून, त्यावर त्वरीत तोडगा काढणे गरजेचे असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.
man dies due to electric wire : चंद्रपूर: आकाशवाणी पासून जगन्नाथ बाबा नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर काल रविवार दिनांक 4 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्यामुळे रस्त्यावरून सायकलने जाणाऱ्या एका 60 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यु झाला. प्रभाकर गणपत क्षीरसागर असे मृतकाचे नाव असुन ते दाताळा येथील रहिवासी होते.
शॉर्ट सर्किट आणि मृत्यू
सविस्तर असे की जगन्नाथ बाबा नगर येथील ए 65 क्रमांकाच्या खांबावरून उच्च दाबाची 11 केव्ही विजेची तार जाते. काल सायंकाळी 5.30 च्या सुमारास मोठे वादळ आले. परंतु त्याच्या 1 तास आधीच जवळपास सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किट सारखा आवाज झाला व ही 11 केव्हीची तार तुटून रस्त्यावर पडली.
काही स्थानिक नागरिकांनी विज वितरण कंपनीला याची तातडीने ऑनलाईन तक्रार केली.4 वाजून 59 मिनिटांनी तक्रार केल्याची नोंद आहे. सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विज पुरवठा बंद केला नाही. पडलेली तार सुद्धा उचलली नाही. तक्रारकर्त्याच्या मोबाईलवर मात्र सायंकाळी 6 वाजता तक्रारीचा निपटारा झाल्याचा ऑनलाइन मेसेज महावितरणकडून पाठविण्यात आला. electricity department negligence case
सायकलच्या चाकात विजेचा तार अडकला
यादरम्यान जनता महाविद्यालयात कंत्राटी तत्वावर सुरक्षा रक्षक असलेले दाताळा येथील रहिवासी प्रभाकर गणपत क्षीरसागर सायकलने सायंकाळच्या ड्युटीवर चालले होते. रस्त्याने जात असताना सायकलच्या चाकात विजेचा तार अडकून ते पडले व तारेला स्पर्श झाला.11 केव्हीच्या तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. वडगाव प्रभागाचे माजी नगरसेवक जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. live wire accident due to storm
नागरिकांचे आंदोलन
देशमुख यांनी रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा तसेच रामनगर विज वितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता कुणाल पाटील यांना घटनास्थळी पाचारण केले. यावेळी मृतकांचे कुटुंबीय तसेच दाताळा व जगन्नाथबाबा नगर मधील रहिवाशांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. नुकसान भरपाईचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका उपस्थित नागरिक व मृतकाच्या कुटुंबीयांनी घेतली. अखेर सहाय्यक अभियंता पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला.
महावितरणच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – जनविकास सेनेची मागणी
नागपूर व दाताळा मार्गाला जोडणाऱ्या या रस्त्याने हजारो नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थी ये-जा करतात. अशा वर्दळीच्या रस्त्यावर दीड तास 11 केवी विजेची जिवंत तार पडून राहणे अत्यंत धोकादायक आहे. यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी सर्वस्वी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच मृतकाच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे.
mahadiscom drama competition winners : चंद्रपूर, दि. 5 मे 2025: महावितरणच्या नागपूर प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत चंद्रपूर परिमंडलाच्या ‘रंग बावरी’ या नाटकाने उत्कृष्ट अभिनयासह सर्वोत्कृष्ट नाटकाचा मान पटकावला. दोन दिवस रंगलेल्या या नाट्यकुंभ-2025 मध्ये ‘रंग बावरी’ने विविध गटांमध्ये तब्बल सहा प्रथम पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. अकोला परिमंडलाच्या ‘सिकॅरिअस’ या नाटकाने उपविजेतेपद मिळवले. mahadiscom natya spardha 2025 results
या स्पर्धेतील विजेत्या कलाकारांना महावितरणचे संचालक (संचलन) अरविंद भादिकर आणि संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत, मुख्य अभियंता सर्वश्री सुहास रंगारी, दिलीप दोडके, ज्ञानेश कुलकर्णी, राजेश नाईक आणि स्वागताध्यक्ष हरिश गजबे यांच्यासह नाट्य परिक्षक विनोद दुर्गेपुरोहित, जयदेव सोमनाथे, अँड. चैताली बोरकुटे यांसारखे मान्यवर उपस्थित होते. sicarius drama play review
जय – पराजय हा स्पर्धेचा भाग
या सोहळ्यात बोलताना संचालक अरविंद भादिकर यांनी नाट्य कलाकारांचे कौतुक केले आणि स्पर्धेनंतरही त्यांनी एकमेकांशी संवाद कायम ठेवण्याचे आवाहन केले. अपयश आले तरी निराश न होता प्रयत्न सुरू ठेवण्याचा संदेश त्यांनी दिला. संचालक प्रसाद रेशमे म्हणाले, “जय-पराजय हा स्पर्धेचा भाग असला तरी, कलाकारांनी आपली कला सादर करताना मिळवलेला आनंद आणि रसिकांना दिलेला आनंद हेच त्यांचे खरे पारितोषिक आहे.” स्पर्धेचे अध्यक्ष तथा प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी नाटकांच्या माध्यमातून केवळ आनंदच नव्हे, तर अनेक अनुभव मिळाल्याचे मत व्यक्त केले. chandrapur mahadiscom drama winner
कर्मचाऱ्यांनी आपली कला जोपासली
नाट्यकुंभ-2025 चे उद्घाटन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या शुभहस्ते झाले होते. यावेळी बोलतांना त्यांनी महावितरणमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामातील या अनमोल अनुभवांना नाट्यकृतींच्या माध्यमातून समाजासमोर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. महावितरण एक मोठा परिवार आहे आणि या कुटुंबातील सदस्यांमध्ये अनेक उत्कृष्ट कलागुण दडलेले आहेत. दैनंदिन कामाचा व्याप सांभाळूनही कर्मचाऱ्यांनी आपली कला जोपासली आहे, हे कौतुकास्पद आहे. ‘नाट्यकुंभ’ सारख्या स्पर्धांमुळे या कलाकारांना त्यांची प्रतिभा सादर करण्याची संधी मिळते. यासोबतच, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद वाढतो आणि सांघिक भावना अधिक दृढ होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या भाषणातून राजेंद्र पवार यांनी विदर्भातील नाट्य परंपरेचाही विशेष उल्लेख केला. mahadiscom natya spardha 2025 results
चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिश गजबे यांनी निर्मिती केलेल्या, श्रीपाद जोशी लिखित आणि संध्या चिवंडे दिग्दर्शित ‘रंग बावरी’ या नाटकाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. तर, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक निर्मित, डॉ. चंद्रकांत शिंदे लिखित आणि नितीन नांदुरकर दिग्दर्शित ‘सिकॅरिअस’ या सस्पेन्स थ्रिलर नाटकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके निर्मित, प्रदीप फाटक लिखित आणि हेमराज ढोके दिग्दर्शित ‘ये रे घना’ आणि गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी निर्मित, अतुल साळवे लिखित व राजेंद्र गिरी दिग्दर्शित ‘दि ॲनॉनिमस’ या नाटकांनाही रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
या नाट्यस्पर्धेसाठी अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया परिमंडलातील वरिष्ठ अधिकारी आणि नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाट्यस्पर्धेचे विजेते
स्पर्धेचा अंतिम निकाल: • सर्वोत्तम नाटक: o प्रथम: ‘रंग बावरी’ (चंद्रपूर परिमंडल) o द्वितीय: ‘सिकॅरिअस’ (अकोला परिमंडल) • दिग्दर्शन: o प्रथम: संध्या चिवंडे (‘रंग बावरी’) o द्वितीय: नितीन नांदुरकर (‘सिकॅरिअस’) • अभिनय (पुरुष): o प्रथम: गणेश राणे (रघुपती – ‘सिकॅरिअस’) o द्वितीय: सुमित खोरगडे (सुभाष – ‘ये रे घना’) • अभिनय (स्त्री):
o प्रथम: रोहिणी ठाकरे (नेहा – ‘रंग बावरी’) o द्वितीय: स्नेहांजली तुंबडे (स्मिता – ‘ये रे घना’) • नेपथ्य: o प्रथम: रमेश सानप (‘रंग बावरी’) o द्वितीय: गजानन जैवाल (‘दि ॲनॉनिमस’) • प्रकाश योजना: o प्रथम: प्रकाश खांडेकर (‘रंग बावरी’) o द्वितीय: विवेकानंद वाध (‘सिकॅरिअस’) • पार्श्वसंगीत: o प्रथम: राकेश बोरोवार (‘रंग बावरी’) o द्वितीय: योगेश सोनुने (‘सिकॅरिअस’) • रंगभूषा-वेशभूषा: o प्रथम: पौर्णिमा कदम (‘सिकॅरिअस’) o द्वितीय: आनंद जैं (‘दि ॲनॉनिमस’) • उत्तेजनार्थ पारितोषिक: o सामली सायंकाळ (मेधना – ‘रंग बावरी’) o अमित पेढेकर (डॉ. विध्वंस – ‘ये रे घना’) o नावेद शेख (जरासंघ – ‘दि ॲनॉनिमस’) o संतोष पाटील (इन्स्पेक्टर कश्यप – ‘सिकॅरिअस’)
mahadiscom lucky draw 2025 : महावितरणच्या लकी डिजिटल ग्राहक योजनेचा दुसरा लकी ड्रॉ ऑनलाईन पध्दतीने दि. ७ मे २०२५ रोजी काढण्यात येणार आहे. यातून प्रत्येक उपविभाग स्तरावर एक प्रमाणे पहिल्या क्रमांकाकरिता 29 विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन बक्षिस म्हणून दिला जाणार आहे. तर प्रत्येक उपविभागात प्रत्येकी दोन प्रमाणे दुसऱ्या क्रमांकासाठी 58 विजेत्या ग्राहकांना स्मार्ट फोन व प्रत्येकी दोन प्रमाणे तिसऱ्या क्रमांकासाठी 58 विजेत्या ग्राहकांना स्मार्ट वॉच बक्षिस म्हणून दिले जाणार आहे. online bill payment reward scheme
पहिला लकी ड्रॉ दि. ७ एप्रिल २०२५ रोजी काढण्यात आला असून विजेत्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले आहे. यापुढील लकी ड्रॉ जून २०२५ या महिन्यात काढण्यात येणार आहेत.महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज ग्राहक पात्र ठरणार आहेत. १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत सलग तीन वा तीन पेक्षा अधिक वीज बिले भरणाऱ्या ग्राहकांना या संधीचा फायदा होणार आहे.
लघुदाब वीजग्राहकांसाठी योजना
ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू (एल टी- लाईव्ह) वीजग्राहकांसाठी लागू असून, ज्यांनी ०१ एप्रिल २०२४ पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे ०१.०४.२०२३ ते ३१.०३.२०२४ या कालावधीत एकदाही वीज देयकाचा ऑनलाईन भरणा केलेला नाही किंवा ऑनलाईन वीज देयक भरणा पर्याय वापरलेला नाही. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळासwww.mahadiscom.in भेट द्यावी.ग्राहक रांगेत उभे राहण्यापेक्षा वेळ, श्रम व पैशांची बचत करीत डिजिटल पध्दतीने वीज बिल भरणा करण्यास प्राधान्य देत आहेत. electricity bill payment reward in Maharashtra
ऑनलाईन वीजबिल भरून जिंका आकर्षक बक्षिसे
ग्राहकांना डिजिटल पध्दतीने वीज बिलाचा भरणा करता यावा, यासाठी महावितरणकडून संकेतस्थळ, महावितरण मोबाईल ॲपची सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिलेली आहे. ग्राहकांना देय रक्कमेवर ०.२५ टक्के डिजिटल वीज बिल भरणा सूट दिली जाते. परिणामी सध्या राज्यात ७० टक्के हून अधिक वीज ग्राहक ऑनलाईन पध्दतीने वीज बिलाचा भरणा करीत आहेत. हे प्रमाण वाढविण्यासाठी ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना राबविण्यात येत आहे. mahadiscom smartphone reward scheme
या योजनेच्या कालावधीत ग्राहकाने नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, वॉलेट, कॅश कार्ड, एनएसीएच, क्यूआर कोड, एनईएफटी, आरटीजीएस इ. ऑनलाईन वीज बिल भरणा पर्याय वापरून लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर दरमहा एकप्रमाणे सलग तीन किंवा तीन पेक्षा जास्त महिने वीज बिल भरणे आवश्यक राहील. अधिक माहितीसाठी महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळास www.mahadiscom.in भेट द्यावी.