Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • new cyber frauds : चंद्रपूर पोलीस म्हणतात या पोलिसांपासून सावध रहा

    new cyber frauds : चंद्रपूर पोलीस म्हणतात या पोलिसांपासून सावध रहा

    new cyber frauds देशात आज नवनवीन फसवे प्रकरण समोर येत आहे, देश तंत्रज्ञानात पुढे जात आहे त्याचप्रमाणे या तंत्रज्ञानाचा वापर नवनवीन गुन्ह्यासाठी होत आहे. या गुन्ह्यात आतापर्यंत नामवंत व्यक्तींची फसवणूक झाली हे विशेष.

    महत्त्वाचे : वरोरा विधानसभा क्षेत्रात खासदार धानोरकर यांचे बंधू प्रवीण काकडे यांनी भरला उमेदवारी अर्ज

    New cyber frauds हॅलो मी पोलीस बोलत आहो, आपल्या मुलाला गंभीर गुन्ह्यात आम्ही अटक केली असून त्याला सोडवायचं असेल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील अश्या प्रकारचे व्हाट्सएप कॉल अनेक नागरिकांना येत आहे, काही या कॉल ला बळी पडतात तर काही सजग असतात.

    विशेष म्हणजे कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या डीपीवर पोलिसांचा फोटो असतो, चंद्रपुरातील काही सराफा व्यापाऱ्यांना त्यांच्या खाजगी मोबाईल क्रमांकावर पोलीस डीपी असणारे व्हाट्सएप कॉल येत असून पुढचा व्यक्ती धमकी देत अटकेती भीती दाखवीत आहे. New cyber frauds

    यावर आज चंद्रपूर पोलिसांनी सराफा व्यापारी व नागरिकांना आवाहन केले की इतर राज्यातील पोलीस हे स्थानिक पोलिसांच्या मदतीशिवाय कुणालाही अटक करू शकत नाही, सीबीआय, पोलीस व ईडी अधिकारी म्हणून कुणी कॉल करीत असेल किंवा व्हिडीओ कॉल करण्यास आग्रह करीत असेल तर अश्या कॉल पासून सावध रहावे कारण हा एक नवीन सायबर फसवणुकीचा प्रकार असून त्याला बळी पडू नका.

    आपल्याला कुणी अश्याप्रकारे धमकी, पैश्याची मागणी किंवा ब्लॅकमेल करीत असेल तर तात्काळ HTTPS://cybercrime.gov.in या संकेत स्थळावर रिपोर्ट and check suspect करावी किंवा 1930 वर कॉल करून सायबर गुन्ह्यांची तक्रार करावी.

  • Safety Chandrapur Municipal Corporation : तर फटाके विक्रेत्यांचे दुकान होणार सील – चंद्रपूर मनपाचा इशारा

    Safety Chandrapur Municipal Corporation : तर फटाके विक्रेत्यांचे दुकान होणार सील – चंद्रपूर मनपाचा इशारा

    Chandrapur Municipal Corporation येत्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे निश्चित केलेल्या अधिकृत ठिकाणीच स्टॉल्स लावण्याचे व फटाक्यांची विक्री करण्याचे निर्देश मनपाद्वारे दिले गेले असुन अनधिकृत स्थळांवरून फटाके विक्री केल्यास प्रसंगी दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

     
     Chandrapur Municipal Corporation  मनपातर्फे कोहिनुर तलाव व मुल रोडवरील कुंभार सोसायटी ग्राऊंड ही स्थाने फटाके विक्री करण्याची दुकाने लावण्यास निश्चित करण्यात आली आहेत. जनहित याचिका क्र. 152 / 2015 मध्ये मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार फटाके विक्रेत्यांनी विस्फोटक व अधिनियम 1884 आणि त्या अंतर्गत केलेले विस्फोटक नियम 2008 मधील प्रतिबंध व नियम यांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे यासाठी फटाके स्टॉल्सच्या उभारणीत नियमांची काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी पथके गठीत करण्यात आली आहे.

    महत्त्वाचे : बल्लारपूर नगरपालिका मध्ये आरोग्य विमा घोटाळा – मनसेचा आरोप


      परवानगी नअसलेल्या ठिकाणांहुन फटाके विक्री करणे हा कायद्याने गुन्हा असुन अश्या प्रसंगी दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. बंदी असलेले फटाक्यांची विक्री करता येणार नसुन परवानगी असलेले फटाके महानगरपालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणी परवानगी घेऊनच विक्री करावयाची आहे. तसेच फटाके विक्री असलेल्या जागी आतिशबाजी करण्यास मनाई आहे.


       भारत सरकार अधिसूचना क्रमांक जी.एस.आर. 682(ई), दि. 05/10/1999 अन्वये 125 डेसिबल (एआय) पेक्षा जास्त आवाज निर्माण करणा-या फटाक्यांचे उत्पादन, विक्री किंवा वापर बेकायदेशीर आहे. मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार बेरियम सॉल्ट, लिथीयम, अर्सेनिक, लीड, मर्क्युरी यासारखे घटक असणारे फटाके वापरण्यास बंदी आहे. Chandrapur Municipal Corporation

    गुन्हे : चंद्रपुरात पुष्पा स्टाईल दारू तस्करी

    या घटकांमुळे विषारी वायू तयार होतात आणि हे वायू प्राणी व वनस्पती या दोघांना घातक आहेत.त्यामुळे शक्यतो हरित दिवाळीच साजरी करावी व फटाके फोडायचे असल्यास सायंकाळी ७ ते १० दरम्यानच फोडण्याचे तसेच ज्या फटाक्यांवर ग्रीन फटाके असल्याचे नमुद असेल तेच फटाके घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • Health Insurance Scam : बल्लारपूरात आरोग्य विमा घोटाळा, मनसेचा आरोप

    Health Insurance Scam : बल्लारपूरात आरोग्य विमा घोटाळा, मनसेचा आरोप

    health insurance scam बल्लारपूर नपा येथील कर्मचारी आरोग्य विमा निविदेत भ्रष्टाचार, भ्रष्टाचारात सहभागी कर्मचारी व अधिकायांवर कारवाई करा मनसे कामगार नेते जिल्हाध्यक्ष अंधेवार यांची पत्रकार परिषदेत मागणी

    health insurance scam चंद्रपूर – बल्लारपूर नगरपालिका कार्यालयातील कर्मचायांच्या आरोग्य विम्यासाठी सन 2024_25 साठी निविदा काढण्यात आली होती. स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनी, एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स कंपनी आणि इफको टोकियो यांनी ही निविदा भरली होती. नियमानुसार 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या निविदा ऑनलाइन मागवणे बंधनकारक आहे असे असतानाही निविदेची रक्कम जास्त असतानाही लेखापालाने ऑफलाइन पद्धतीने निविदा चालवून या प्रक्रियेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन गंधेवार यांनी केला आहे. Health Insurance Scam

    गुन्हेगारी : चंद्रपुरात पुष्पा चित्रपटासारखी दारू तस्करी

    या संदर्भात भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या लेखापाल व संबंधित अधिकायांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ते म्हणाले की, कोणतीही निविदा प्रक्रिया स्पष्ट आणि पारदर्शक होण्यासाठी निविदा प्रक्रिया ऑनलाइन करणे आवश्यक आहे. मात्र तसे न करता ऑफलाइन प्रक्रिया करून निविदा प्रक्रियेचे उल्लंघन केले आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करताना प्रक्रियेशी संबंधित संपूर्ण माहिती आणि रेट संबंधित बॉक्स भरणे आवश्यक आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यात 4 दिवस दारूबंदी

    परंतु स्टार हेल्थ फायनांस इन्शुरन्स कंपनीने लिफाफ्यात दर पत्रकात चार पैकी दोन दर सादर केल्यामुळे हे दरपत्रक अपात्र ठरले आहे. उर्वरित 2 निविदाधारक एचडीएफसी लाईफ आणि इफको टोकियो पात्र असूनही, त्यांना जाणीवपूर्वक अपात्र दाखवून अपात्र असलेल्या स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीला निविदा दिल्याची पुष्टी झाली आहे. प्रक्रियेदरम्यान, निविदाधारकांनी देऊ केलेल्या दरांमध्ये, विशेषत: एचडीएफसी लाइफ इन्शुरन्सने देऊ केलेल्या दरांमध्ये अनावश्यक दुरुस्त्या करण्यात आल्या. स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीच्या हिताचे हे टेंडर पास करून या कंपनीला नफा मिळवून देण्यासाठी हा भ्रष्टाचार केला जात असल्याची माहिती देण्यात आली. Health Insurance Scam

    यात गोरगरीब कर्मचायांचे अतोनात हाल होत आहेत. या संदर्भात महापालिकेच्या लेखापाल यांना आरोग्य विमा वर्ष २०२४_२५ च्या महत्त्वाच्या कागदपत्रांबाबत विचारणा केली असता, ती कागदपत्रे गहाळ असल्याची माहिती गंधेवार यांनी दिली.


    यामध्ये संबंधित लेखापालाने आपल्या पदाचा गैरवापर करून शासनाच्या निधीचा गैरवापर करून शासनाचे नुकसान केले आहे, निविदा प्रक्रियेच्या दरात फेरफार करून गैरव्यवहार केला आहे, शासनाची दिशाभूल करणे, वरिष्ठांची दिशाभूल करणे, फसवणूक करणे आदी गंभीर गुन्हे करून चौकशीअंती कठोर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात मागणी करण्यात आली आहे, अन्यथा मनसे कामगार सेनेतर्फे जनआंदोलन उभारण्याचे संकेत अमन गंधेवार यांनी पत्रपरिषदेत दिले आहेत.

    पत्रपरिषदेत अमन गंधेवार, अरुणा तोडसाम, उमेश कोंडले, अजित पांडे उपस्थित होते.

  • cotton procurement : शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात, कापूस खरेदी केंद्र सुरू करा

    cotton procurement : शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात, कापूस खरेदी केंद्र सुरू करा

    cotton procurement राज्यकर्त्यांच्या साठमारीत शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात, कापूस खरेदी केंद्र सुरू करा व सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याची आमदार सुधाकर अडबाले यांची मागणी

    cotton procurement चंद्रपूर : दिवाळी तोंडावर आली असताना अजूनही कापूस खरेदी केंद्र सुरु झालेले नाही. सोबतच सोयाबीनला भाव नाही. मात्र, राज्यकर्ते स्वतःची पोळी शेकण्यात मग्‍न असून शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाईल, अशी स्‍थिती आहे. त्‍यामुळे कापूस खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे व सोयाबीन हमीभावाप्रमाणे खरेदी करण्यात यावे, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी केली आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यात 4 दिवस दारूबंदी

    केंद्र व राज्य सरकारने घोषणा करूनही कापूस खरेदी केंद्र अजूनही सुरू झालेले नाही. दिवाळी तोंडावर आली असताना सोयाबीनलाही हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्यांना नाईलाजाने ३५०० ते ३८०० रुपये या भावाने व्यापाऱ्यांना सोयाबीन विकावे लागत आहे.

    प्रत्येक क्विंटलमागे शेतकऱ्यांना १००० ते ११०० रुपयांचे नुकसान होत आहे. राज्यकर्ते स्वतःची पोळी शेकण्यात इतके मग्न आहे की, शेतकऱ्यांकडे त्यांचे पूर्ण दुर्लक्ष करीत आहे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असून, योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. या परिस्थितीत कापूस खरेदी केंद्र सुरु न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, असे आमदार अडबाले यांनी सांगितले. cotton procurement

    गुन्हेगारी : दृश्यम सिनेमासारखी हत्या

    कापूसाचा १० वर्षांपूर्वीचा भाव ७ हजार रुपये होता. आज उत्पादन खर्च दुपटीने वाढले असताना केंद्र सुरू न झाल्याने व्‍यापारी ६००० ते ६५०० रुपयांच्या भावाने शेतकऱ्यांकडून खरेदी करीत आहे. त्यामुळे कापूसाचा उत्‍पादन खर्चही निघत नाही. आज २०१२ ला असणारा रासायनिक खताचा व फवारणी औषधीचा खर्च तिपटीने वाढला आहे. भाव मात्र ‘जैसे थे’च आहे.

    सोयाबीन बियाणांचे व खताचे भाव प्रचंड वाढल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ३५०० ते ३८०० हा भाव परवडत नाही, ही वास्तविकता आहे. शेतमजुरांचे वाढलेले दर, सोयाबीन कापणी व काढणी यांचे वाढलेले दर, यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे आणि शेतकऱ्यांच्या या दयनीय परिस्थितीकडे राज्यकर्त्यांचे अजिबात लक्ष नाही. जी गत सोयाबीनची झाली आहे तीच गत कापूसाचे होण्याची शक्यता आहे. cotton procurement

    शिताईचा (पहिली वेचणी) कापूस घरी येऊन पडत असताना आणि दिवाळी तोंडावर आली असताना अजूनही राज्यकर्त्यांनी कापूस खरेदी केंद्र सुरू केले नाही, ही शरमेची बाब आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दिवाळीपूर्वी कापूस खरेदी केंद्र त्‍वरीत सुरू करावे व सोयाबीन हमीभावाप्रमाणे खरेदी करण्यात यावे, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी केली आहे.

  • Limited Prohibition of alcohol : चंद्रपूर जिल्ह्यात 4 दिवस दारूबंदी

    Limited Prohibition of alcohol : चंद्रपूर जिल्ह्यात 4 दिवस दारूबंदी

    Prohibition of alcohol विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 ही खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक कालावधीत चंद्रपूर जिल्हयातील सर्व ठोक व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या चार दिवस बंद राहणार आहेत.

    महत्त्वाचे : दहावीची परीक्षा झाली सोप्पी

    Prohibition of alcohol 18 नोव्हेंबरच्या सायंकाळी 6 वाजतापासून 19 व 20 नोव्हेंबरचा संपूर्ण दिवस तसेच मतमोजणीचा दिनांक 23 नोव्हेंबर रोजी संपूर्ण दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहे.

    Prohibition of alcohol विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून सदर कार्यक्रमानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभेच्या सर्व जागांकरीता बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तसेच मतमोजणी शनिवार, दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी होणार आहे.

                 लोकप्रतिनिधीत्व अधिनियम, 1951 च्या कलम 135 (सी) च्या तरतुदीनुसार तसेच महाराष्ट्र देशी दारु नियम 1973 नियम 26(1)(सी) (1) महाराष्ट्र विदेशी मद्य (सेल ऑन कॅश, रजिस्टर ऑफ सेल्स इ.) नियम 1969 मधील नियम 9 ए (2) (सी )(1) तसेच विशेष परवाने व अनुज्ञप्ती नियम 1952 चे नियम 5(10) (बी) (सी) (1) व महाराष्ट्र ताडी दुकाने (अनुज्ञप्ती) आणि ताडी झाडे (छेदणे)  नियम 5 (अ) (2) मधील तरतुदीनुसार विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 ही खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणुक कालावधीत चंद्रपूर जिल्हयातील सर्व ठोक व किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्त्या नमुना (सीएल-2, सीएल-3, सीएल/ एफएल/टिओडी-3  एफएल-1,  एफएल-2  एफएल-3  एफएल-4, एफएल/बीआर-2, टिडी-1 (ताडी) इत्यादि सर्व प्रकारच्या अनुज्ञप्त्या खालीलप्रमाणे पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.

                 नमुद कालावधीत सदर ओदशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित अनुज्ञप्ती धारकांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये कडक कारवाई करण्यांत येईल, तसेच ते धारण करीत असलेली अनुज्ञप्ती निलंबीत अथवा रद्द करण्यात येईल, त्यांनी नोंद घ्यावी, असेही आदेशात नमुद आहे.

  • Teacher training : ते प्रशिक्षण स्थगित करा – आमदार सुधाकर अडबाले

    Teacher training : ते प्रशिक्षण स्थगित करा – आमदार सुधाकर अडबाले

    Teacher training राज्‍यातील नवनियुक्‍त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर सात दिवसांचे प्रशिक्षण ०४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत आयोजित केले आहे.

    Teacher training या कालावधीत दिवाळी सुट्ट्या व निवडणुक ड्युट्या असल्‍याने सदर प्रशिक्षण स्‍थगित करून विधानसभा निवडणुकीतनंतर घेण्याची मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्‍य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पूणेचे संचालक यांच्याकडे केली आहे.

    निवडणूक : चंद्रपुरात कुणी भरला उमेदवारी अर्ज?

    राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील मुद्दा क्रमांक ५.१५ ते ५.२१ मध्ये शासकीय, खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित, स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था शाळांतील सर्व नवनियुक्‍त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर सात दिवसांचे (५० तासांचे) प्रशिक्षण ०४ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२४ या कालावधीत राज्‍य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पूणेच्या वतीने आयोजित केले आहे.

    सदर कालावधीमध्ये दिवाळीच्‍या सुट्ट्या आहेत. त्‍यामुळे अनेक शिक्षक बाहेरगावी जात असतात. तसेच या कालावधीदरम्‍यान विधानसभेची निवडणूक आहे. या विधानसभा निवडणुकीसाठी शिक्षकांच्या ड्युट्या सुद्धा लागलेल्‍या आहेत.

    गुन्हेगारी : चंद्रपुरात वाघ नखे जप्त

    अशावेळी सदर प्रशिक्षण योग्‍यरित्‍या होणे शक्‍य नाही. त्‍यामुळे हे प्रशिक्षण तात्‍पुरते स्‍थगित करून विधानसभा निवडणुकीनंतर घेण्यात यावे, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्‍य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पूणेचे संचालक, प्रधान सचिव, आयुक्‍त (शिक्षण), संचालक (प्राथ./माध्य/उच्च माध्य.) यांच्याकडे केली आहे.

  • Health Care Center : बल्लारपूर विधानसभा आरोग्यसेवेत तत्पर

    Health Care Center : बल्लारपूर विधानसभा आरोग्यसेवेत तत्पर

    Health Care Center बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील आरोग्यसेवा अद्ययावत करण्यासाठी सदैव कटिबद्ध असलेले राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सदैव तत्परता दाखवली आहे. त्याचाच परिणाम म्हणून त्यांच्या पाठपुराव्यानंतर आता मुल व पोंभुर्णा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सात उपकेंद्रांना राज्य शासनाची मंजुरी मिळाली आहे.

    राजकीय – वाहनचालक विरोधी पक्ष नेत्याला विधानसभा निवडणुकीत भिडणार

    Health Care Center बल्लारपूर विधानसभेतील मुल व पोंभुर्णा तालुक्यातील  सर्वसामान्य नागिरकांची अनेक वर्षांपासून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उपकेंद्राची मागणी होती. त्याची दखल घेत ना. श्री. मुनगंटीवार यांनी तसा प्रस्ताव तातडीने संबंधित मंत्रालयाला पाठविला होता.

    पत्रकार परिषद

    या प्रस्तावाची दखल घेत राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने उपकेंद्राच्या मंजुरीची अधिसूचना जारी केली आहे. यामध्ये मुल तालुक्यातील चितेगांव, पिंपरी दीक्षित, फिस्कुटी, सुशी, तर पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम, फुटाणा व जामतुकूम या गावांमध्ये उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘विशेष बाब’ म्हणून या केंद्रांना मंजुरी दिल्याचे पत्रात नमूद आहे.

    ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने उपकेंद्रांची मागणी मंजूर झाल्यामुळे खेड्यापाड्यातील सर्वसामान्य, गोरगरीब जनतेला तत्परतेने आरोग्यसेवा मिळणार आहे. त्यामुळे स्थानिकांनी ना. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. आयुष्यात रुग्णसेवेचे कार्य सर्वोपरी आहे, असे ना. श्री. मुनगंटीवार सातत्याने म्हणत असतात. त्याची पुन्हा एकदा प्रचिती यानिमित्ताने आली आहे. Health Care Center

    जिल्ह्यात कर्करोग रुग्णालय
    ना. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांतून जिल्हात १४० खाटांचे कर्करोग रुग्णालय उभारले जात आहे. याचा उपयोग संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णांना होणार आहे. एक धर्मशाळा देखील उभारण्यात येणार आहे. खनिज निधितून कॅन्सर व्हॅनसाठी निधी मंजुर केला आहे. त्याचे नुकतेच लोकार्पण करण्यात आलेले आहे. या व्हॅनचा फायदा गावागावातील नागरिकांना होणार आहे. Health Care Center

    मुल येथे १०७ कोटी रुपयांचे आधुनिक रुग्णालय
    मुल येथे १०७ कोटी रुपयांचे १०० खाटांचे आधुनिक रुग्णालयाचे भूमिपूजनही नुकतेच पार पडले. केवळ मुल नव्हे तर परिसरातील प्रत्येकाला हे आरोग्य मंदिर वाटेल, अशी त्यामागची संकल्पना ना.मुनगंटीवार यांची आहे. यापूर्वी आरोग्यक्षेत्रातील अनेक कामे ना.मुनगंटीवार यांनी केली आहे. बल्लारपूर येथे ग्रामीण रुग्णालय, ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र,पोंभुर्णा येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती,पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथे प्राथमिक आरोग्य केंद्र अशी असंख्य कामे झाली आहे.

    दिव्यांग, नेत्र रुग्णांची सेवा
    ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून आतापर्यंत नेत्र चिकित्सा शिबिरातून ५० हजार रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात आली. ५ हजारांपेक्षा जास्त मोतीबिंदू ऑपरेशन केले. ३५ हजारांहून अधिक जास्त चष्मे दिले आहेत.

    मुलांची मोफत हृदय शस्त्रक्रिया
    लहान मुलांच्या हृदय शास्त्रक्रियेकरिता खाजगी रुग्णालयात १० लाख रुपये लागत असताना या शस्त्रक्रिया मुंबईतील फोर्टीज हॉस्पिटलच्या चमूद्वारे मोफत करून देण्यात आल्या. ना. श्री. मुनगंटीवार यांच्या पुढाकारातूनच हे शक्य झाले. २ ते १० वर्षांपर्यंतच्या ६० लहान मुलांचे ऑपरेशन करण्यात आले.

  • Maharashtra Assembly Elections 2024 : वाहन चालक मालक संघटना ब्रह्मपुरी विधानसभा निवडणूक लढविणार

    Maharashtra Assembly Elections 2024 : वाहन चालक मालक संघटना ब्रह्मपुरी विधानसभा निवडणूक लढविणार

    Maharashtra Assembly Elections 2024 22 ऑक्टोबर पासून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. विविध राजकीय पक्षातील इच्छुक व अपक्ष उमेदवार आजपासून अर्जप्रक्रियेला प्रारंभ करतील.

    महत्त्वाचे : राजुरा विधानसभा क्षेत्रात यंदा परिवर्तनाचे वारे

    Maharashtra Assembly Elections 2024 अश्यातच राज्यातील जय संघर्ष संस्था प्रणित वाहन चालक मालक संघटना यंदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे, त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात उमेदवार घोषित केला आहे.

    जय संघर्ष संस्था प्रणित संघर्ष वाहन चालक मालक संघटना महाराष्ट्र राज्य मागील दहा वर्षापासून राज्यातील वाहन चालक आणि मालक यांच्या समस्या घेऊन मागण्यांची पूर्तता करण्यासाठी मोर्चे, आंदोलने, करून शासन दरबारी मागण्या मागत आहेत. मात्र कोणत्याही लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष दिले नाही.

    राजकीय : सुधीर मुनगंटीवार सातव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

    अखेर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात संघटनेच्या वतीने १५ उमेदवार उभे करून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला असून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात सुधीर महादेव टोंगे यांना संघटनेकडून उमेदवारी दिली असल्याची माहिती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विनोद चांदेकर यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

    पत्रकार परिषदेतून केली उमेदवारीची घोषणा


    जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना संस्थापक अध्यक्ष संजय माणिकराव हाळनोर यांचे नेतृत्वात मागील अनेक वर्षापासून सदर संघटना काम करीत असून ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात संघटनेचे १५ हजार सदस्य कार्यरत आहेत. ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रात सुधीरभाऊ टोंगे या ओबीसी प्रवर्गातील कार्यकर्त्याला जय संघर्ष वाहन चालक मालक संघटना कडून उमेदवारी घोषित केली आहे.

  • Ballarpur Assembly Constituency : सुधीर मुनगंटीवार सातव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात, यंदा कुणाचं असेल आव्हान?

    Ballarpur Assembly Constituency : सुधीर मुनगंटीवार सातव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात, यंदा कुणाचं असेल आव्हान?

    Ballarpur Assembly Constituency विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे, त्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर व चिमूर विधानसभा क्षेत्रातील दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार व बंटी भांगडीया यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

    Ballarpur Assembly Constituency बल्लारपूर विधानसभा यंदा चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे परंतु महाविकास आघाडीने अजूनही आपला उमेदवार जाहीर केला नसल्याने संभाव्य उमेदवार अजूनही विधानसभा क्षेत्रात भेटी देत आहे.

    महत्त्वाचे : भाजपचे चंद्रपूर जिल्ह्यातील 4 उमेदवार वेटिंगवर

    विधानसभा निवडणूक लढण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावल होत मात्र त्यावेळी त्यांना दोनदा पराभव स्वीकारावा लागला, वर्ष 1995 मध्ये मुनगंटीवार यांनी पहिल्यांदा चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढवली, मुनगंटीवार यांनी मंत्री व कांग्रेसचे नेते शाम वानखेडे यांचा पराभव केला, त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांना 94 हजार 379 मते मिळाली होती तर कांग्रेसचे शाम वानखेडे यांना 29 हजार 915 मतांवर समाधान मानावे लागले. Ballarpur Assembly Constituency

    वर्ष 1999 मध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर कांग्रेसचे उमेदवार विनय बांगडे यांनी आव्हान निर्माण केले मात्र त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांना 84 हजार 688 मते मिळाली व कांग्रेसचे बांगडे यांना 54 हजार 101 मतांवर समाधान मानावे लागले होते. Sudhir mungantiwar

    वर्ष 2004 मध्ये कांग्रेसचे गजानन गावंडे यांनी मुनगंटीवार यांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला मात्र कांग्रेसचा प्रयत्न त्यावेळी फसला, सुधीर मुनगंटीवार यांना 94 हजार 3 मते तर कांग्रेसचे गावंडे यांना 67 हजार 102 मतांवर समाधान मानावे लागले, मुनगंटीवार यांनी विजयाची हट्रिक मारली.

    वर्ष 2009 मध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्र अनुसूचित जातीकरिता राखीव झाले, त्यावेळी बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अस्तित्वात आले, सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा निवडणुकीत आपलं नशीब आजमावलं, 15 वर्षाच्या अनुभवाला सोबत घेत मुनगंटीवार मैदानात उतरले, त्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांना 86 हजार 196 मते तर कांग्रेसचे राहुल पुगलिया यांना 61 हजार 460 मते मिळाली. Ballarpur Assembly Constituency

    वर्ष 2014 मध्ये सुधीर मुनगंटीवार यांना 1 लाख 3 हजार 718 मते तर कांग्रेसचे घनश्याम मूलचंदानी यांना 60 हजार 118 मते मिळाली.

    वर्ष 2019 मध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या मतांचा आकडा घटला आणि त्यांना 86 हजार 2 मते तर कांग्रेसचे विश्वास झाडे यांना 52 हजार 762 मते मिळाली.

    वर्ष 2024 मध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी लोकसभा निवडणुकीत नशीब आजमविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना 2 लाख 60 हजार मतांनी पराभव पत्करावा लागला, कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर लोकसभेतून विजय मिळविला, धानोरकर यांना प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 1 लाखांच्या वर मते मिळाली होती.

    विधानसभेत 6 वेळा विजय तर लोकसभेत तीनदा पराभव स्वीकारल्यावर सुधीर मुनगंटीवार हे सातव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे, सध्या त्यांच्यासमोर कांग्रेस पक्षातर्फे डॉ.अभिलाषा गावतुरे व संतोष रावत किंवा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांची नावे चर्चेत आहे. Sudhir mungantiwar

    कांग्रेस पक्षाला बल्लारपूर विधानसभा निवडणूक लढण्याचा मोठा अनुभव आहे, वर्ष 2014 मध्ये शिवसेनेने केशवराव कटरे यांना बल्लारपूर विधानसभेची उमेदवारी दिली होती त्यावेळी त्यांना केवळ 2 हजार 555 मते मिळाली होती.

    सध्याच्या स्थितीत डॉ.अभिलाषा गावतुरे व शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गिर्हे यापैकी एक मुनगंटीवार यांच्या विरुद्ध बल्लारपूर विधानसभा निवडणूक लढवू शकतात.

  • condolence message : आम्ही जोरगेवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी – उपमुख्यमंत्री अजित पवार

    condolence message : आम्ही जोरगेवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी – उपमुख्यमंत्री अजित पवार

    condolence message अम्मांच्या निधनाची बातमी समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून, “ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही” या शब्दांत दु:ख व्यक्त केले आहे. अम्मांचे आज सकाळी निधन झाले असून, उद्या सकाळी 9 वाजता बिनबा गेट येथील शांतीधाम येथे अंत्यविधी पार पडणार आहे.

    मजुराच्या अंगावर पडलं 200 किलो स्टील स्क्रॅप, झाला मृत्यू

    condolence message आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांचे दीर्घ आजाराने आज रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच नागरिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी राजमाता निवासस्थानी मोठी गर्दी केली. अनेकांनी शोकसंदेशातून आपल्या भावना व्यक्त करत अम्मांना आदरांजली अर्पण केली. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पत्राद्वारे शोकसंवेदना व्यक्त करत अम्मांना आदरांजली अर्पण केली आहे.

    “अम्मांच्या निधनाची वार्ता ऐकून अतिशय वाईट वाटले, परंतु ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो. आम्ही आपल्या दु:खात सहभागी आहोत,” असे अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.