Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Assembly General Election 2024 : चंद्रपूर, बल्लारपूर व वरोरा विधानसभा निवडणुकीत 2 ईव्हीएम मशीनचा होणार वापर

    Assembly General Election 2024 येत्या 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे. जिल्ह्यात खुल्या, मुक्त, नि:स्पक्ष वातावरणात अतिशय पारदर्शक पध्दतीने निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबध्द असून यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे, असा विश्वास जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी व्यक्त केला.

    भाजपचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस चंद्रपुरात

     Assembly General Election 2024 जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.

                लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी 3 ने वाढली होती, असे सांगून जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गौडा म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये ही टक्केवारी आणखी वाढण्यासाठी विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहे. यात सायकल रॅली, रन फॉर व्होट, पोस्टर्स, रिल्स, निबंध, प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धासुध्दा आयोजित करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील दिव्यांग मतदार तसेच ज्येष्ठ मतदारांच्या मदतीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर स्वयंसेवक नेमण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर किमान मुलभूत सुविधा पुरविण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. Assembly General Election 2024

    अट्टल गुन्हेगाराला पोलिसांनी केले स्थानबद्ध

    जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात ईव्हीएम : जिल्ह्यातील चंद्रपूर, बल्लारपूर आणि वरोरा विधानसभा मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार असल्याने प्रत्येक मतदान केंद्रावर दोन ईव्हीएमचा उपयोग होणार आहे. जिल्ह्यात अतिरिक्त ईव्हीएम असून कुठेही कमतरता नाही. जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील एकूण 2077 मतदान केंद्राकरीता 3808 बॅलेट युनीट, 2490 कंट्रोल युनीट आणि 2678 व्हीव्हीपॅट उपलब्ध आहे. Assembly General Election 2024

                अतिशय पारदर्शक पध्दतीने ईव्हीएमची तपासणी : जिल्ह्यात आलेल्या ईव्हीएम कडक सुरक्षा बंदोबस्तात स्ट्राँग रुममध्ये ठेवल्या जातात. 24 बाय 7 येथे सुरक्षेचे कवच असून संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोरच स्ट्राँग रुम उघडली जाते. त्यातही स्ट्राँग रुमसाठी डबल लॉक सिस्टीम असल्यामुळे कोणताही हस्तक्षेप होण्याचा प्रश्नच येत नाही. ईव्हीएमच्या तपासणीवेळी संबंधित कंपनीचे अभियंते बाहेरून येतात. तसेच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोरच पारदर्शक पध्दतीने तपासणी केली जाते. Assembly General Election 2024

                आतापर्यंत जिल्ह्यात 2 कोटी 90 लक्षाची जप्ती : आदर्श आचारसंहितेची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असून जिल्ह्यात आतापर्यंत रोकड, दारू, ड्रग्ज व इतर बाबी मिळून एकूण 2 कोटी 90 लक्ष रुपये / वस्तुंची जप्ती करण्यात आली आहे. यात बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात 16 लक्ष 30 हजार, ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात 54 लक्ष 39 हजार, चंद्रपूर मध्ये 43 लक्ष, चिमूर 19 लक्ष 88 हजार, राजुरा 24 लक्ष 67 हजार आणि वरोरा विधानसभा मतदारसंघात 1 कोटी 32 लक्षाची जप्ती करण्यात आली आहे.

    असे आहेत जिल्ह्यातील एकूण मतदार : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ असून यात 70- राजुरा, 71 –चंद्रपूर, 72 –बल्लारपूर, 73 –ब्रह्मपुरी, 74 -चिमूर आणि 75 वरोरा या मतदारसंघाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 18 लक्ष 50 हजार 102 मतदार असून यात पुरुष मतदार 9 लक्ष 39 हजार 115, स्त्री मतदार 9 लक्ष 10 हजार 939, इतर 48 मतदारांचा समावेश आहे.

    राजूरा विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 167895, स्त्री मतदार – 157381, इतर 2, एकूण – 325278), चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 188724, स्त्री मतदार – 185168, इतर 35, एकूण – 373927), बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 158628, स्त्री मतदार – 153720, इतर 7, एकूण – 312355), ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 137752, स्त्री मतदार – 137914 एकूण – 275666), चिमूर विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 141153, स्त्री मतदार – 139674, एकूण – 280827), आणि वरोरा विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 144963, स्त्री मतदार – 137082, इतर 4, एकूण – 282049).

  • Important notices : जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या महत्वाच्या सूचना

    Important notices मतदानाच्या दिवशी निवडणूक प्रक्रियेवर सर्वसाधारण नियंत्रण ठेवण्यासाठी विविध पथके कार्यान्वित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिका-यांना पथकाबाबत पुर्तता करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

    Important notices विधानसभा मतदारसंघाकरीता मतदारसंघ नियंत्रण कक्ष : प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये नियंत्रण कक्षाची स्थापना करणे. नियंत्रण कक्ष प्रमुख म्हणून एका अनुभवी वरिष्ठ अधिका-याची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करणे तसेच त्यांचे नाव, संपर्क क्रमांक, मेल आयडी जिल्हा नियंत्रण कक्षाकडे सादर करणे.

    चंद्रपुरात या गुन्हेगारांची दहशत, पोलिसांनी केले स्थानबद्ध

    सदर अधिका-याला जिल्हा नियंत्रण कक्षातील समन्वय अधिका-यांच्या संपर्कात राहण्याबाबत निर्देशित करणे. नियंत्रण कक्षाअंतर्गत प्रत्येक विधानसभा मतदारसंघाकरीता मतदानाच्या दिवशी सर्व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याकरीता विविध पथकांची नेमणूक करणे. Important notices

    संपर्क व्यवस्था पथक : पथक प्रमुख म्हणून एका जबाबदार अधिका-याची नेमणूक करावी. पथक प्रमुखांनी क्षेत्रीय अधिकारी व मतदान केंद्राध्यक्ष यांना संपर्क साधून आयोगाने निर्देशित केल्याप्रमाणे मतदानाची आकडेवारी व इतर अहवाल प्राप्त करून घेण्यासाठी अधिकारी व कर्मचा-यांनी नेमणूक करावी. या पथकास आवश्यक ते नमुने उपलब्ध करून द्यावे व कामकाजाबाबत आवश्यक प्रशिक्षण घ्यावे.

    मुलभूत सोयी-सुविधा/ साहित्य समन्वय पथक : सदर पथक प्रमुखाने मतदानाच्या दिवशी सर्व मतदान केंद्रावर मुलभूत सोयीसुविधा, मतदानाशी संबंधित साहित्य/ ईव्हीएमची पुरेशी व्यवस्था असल्याबाबत खात्री करावी व ज्या सुविधा उपलब्ध नाहीत, त्या तात्काळ उपलब्ध करून घ्याव्यात. जेणेकरून मतदान प्रक्रियेमध्ये कोणताही खंड पडणार नाही. पथक प्रमुखांना या कामासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे. सर्व सोयीसुविधा उपलब्ध असल्याचा अहवाल मतदानाच्या चार दिवसांपूर्वी म्हणजे 16 नोव्हेंबर पर्यंत निवडणूक निर्णय अधिका-यांना सादर करावा. Important notices

    असंख्य महिलांचा आमदार जोरगेवार यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

    वेबकास्टींग मॉनेटरिंग पथक : पथक प्रमुखांना सहाय्य करण्यासाठी वेबकास्टींग असणा-या प्रत्येक 40-50 मतदान केंद्राच्या मॉनेटरिंग करीता एका कर्मचा-याची नेमणूक करावी. मतदान केंद्रावर घडणा-या आक्षेपार्ह बाबी निदर्शनास येताच सदर बाब मतदान केंद्राचे नाव, नंबरसह संबंधित पथक प्रमुखांच्या माध्यमातून निवडणूक निर्णय अधिकारी यांना अवगत करावी. Important notices

    जीपीएस मॉनेटरींग पथक : 8 ते 10 क्षेत्रीय अधिका-यांच्या मॉनेटरींग करीता एका कर्मचा-याची नेमणूक करावी. सर्व क्षेत्रीय अधिकारी फिरते राहतील तसेच कोणताही क्षेत्रीय अधिकारी मतदान केंद्र व्यतिरिक्त दुस-या ठिकाणी थांबणार नाही, याबाबत मॉनेटरींग करावे. कायदा सुव्यवस्था / मतदान केंद्रावरील तक्रारी / ईव्हीएमबाबत तक्रारी, संपर्क व्यवस्था पथकामधील नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्यास संबंधित क्षेत्रीय अधिका-यांना कळविण्याची कार्यवाही करावी.

    मिडीया मॉनेटरींग पथक : पथक प्रमुख म्हणून एका जबाबदार अधिका-याची नेमणूक करणे व त्यास सहाय्य करण्यासाठी पुरेशा कर्मचा-यांची नियुक्ती करणे. मतदानाच्या दिवशी संबंधित विधानसभा मतदार संघामध्ये प्रसारीत होणा-या बातम्या तात्काळ संबंधित निवडणूक निर्णय अधिका-यांच्या निदर्शनास आणून देणे. मतदानासंबंधित बातम्यांचे निरीक्षण करण्याकरीता स्थानिक केबल नेटवर्कसह राज्य/राष्ट्रीय पातळीवरील बातम्या प्रसारीत होणारे चॅनल्स व टीव्हीसंच उपलब्ध करून द्यावेत.

    जलद प्रतिसाद पथक : पथक प्रमख म्हणून तहसीलदार यांची नेमणूक करावी. मतदान केंद्राचे भौगोलिक दृष्ट्या स्थान व मतदान केंद्रावर तात्काळ पोहचणारे दळणवळणाचे मार्ग गृहीत धरून आवश्यक तेवढ्या जलद प्रतिसाद पथकाची नेमणूक करणे. सदर पथकामध्ये मतदान प्रक्रियेबाबत जाणकार व ईव्हीएम- व्हीव्हीपॅट कार्यप्रणाली अवगत असणा-या कर्मचा-याची नेमणूक करावी. आवश्यकतेच्या वेळी सदर पथक आवश्यक त्या ठिकाणी / मतदान केंद्रावर पोहचून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विषयाची हाताळणी करण्याबाबत नियेाजन करावे. Important notices

                मतदानाच्या दिवशी नियंत्रण व नियोजनाबाबत सर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिका-यांनी योग्य कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहे.

  • Exclusive Assembly Election 2024 : निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे- हिर्देशकुमार

    Assembly Election 2024 छत्रपती संभाजीनगर – निवडणूक प्रक्रिया राबवितांना त्यात कोणत्याही शंकेला वाव असता कामा नये याची खबरदारी  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घ्यावी व निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त  हिर्देशकुमार यांनी आज निवडणूक यंत्रणांना दिले.

    Assembly Election 2024 येथील स्मार्ट सिटी कार्यालयात छत्रपती संभाजीनगर,  नागपूर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमधील निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक आज पार पडली. या बैठकीस राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, अति.मुख्य निवडणूक अधिकारी बी. प्रदीपकुमार, उपसचिव सुमनकुमार, संजयकुमार, अभिलाष कुमार,  अनिलकुमार, अविनाशकुमार तसेच विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी.श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा, पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड आदी उपस्थित होते.

    गुन्हेगारी : चंद्रपूर शहरात दोन गुन्हेगारांची खुनी फाईट

    प्रत्येक टप्प्यावर पारदर्शकता जपा

    प्रत्येक विधानसभा क्षेत्रात निवडणूक निर्णय अधिकारी यांनाच सर्व प्रक्रिया राबवावयाची आहे. राबवित असलेल्या निवडणूक विषयक कामकाजाबाबत प्रत्येक टप्प्यावर राजकीय पक्ष, उमेदवार यांच्या प्रतिनिधींना माहिती द्यावी व प्रक्रिया राबवावी. त्याचे दस्तऐवजीकरण करावे. त्यांचे शंकानिरसन करावे. निवडणूक प्रक्रिया राबवितांना पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे,असे हिर्देशकुमार यांनी सांगितले. Assembly Election 2024

    मतदान केंद्रांवर सर्व सुविधा पुरवा

    मतदार याद्यांबाबतही योग्य ती काळजी घेऊन त्या याद्या अधिक बिनचूक असाव्यात. प्रत्येक मतदारापर्यंत मतदान चिठ्ठ्या वेळत पोहोचतील याचे नियोजन करा. मतदार याद्यांविषयी असलेल्या तक्रारींबाबत तात्काळ दखल घ्यावी.  मतदान केंद्रांबाबतही सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी. प्रत्येक मतदान केंद्रांवर पुरेशी सुरक्षा व्यवस्था,  तात्पुरत्या मतदान केंद्रांची मान्यता घेणे, मतदान केंद्राचे ठिकाण बदलले असल्यास त्याबाबत मतदारांपर्यंत माहिती पोहोचविणे, त्याची प्रसिद्धी करणे, विशेष मतदान केंद्रांची निर्मिती करणे जसे.

    राजकारण : बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात परिवर्तनाची लाट

    पर्यावरणपूरक, महिलांनी, दिव्यांग कर्मचाऱ्यांनी संचलित केलेले इ, मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, रॅम्प, सावली इ. सुविधांची निर्मिती, तसेच वेब कॅमेरे व सीसीटीव्ही कॅमेरे लावून मतदान केंद्रांचे वेबकास्टिंग करणे, मतदान केंद्राच्या बाहेर व आत कॅमेरे लावावे इ. सुचना दिल्या. तसेच या सर्व सुविधांची पूर्तता झाल्याबाबत व आवश्यकतांबाबत स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त यांनी स्वतः पाहणी करुन खातरजमा करावी,असे निर्देशही देण्यात आले. Assembly Election 2024

    यंदा मतदान हे नोव्हेंबर महिन्यात असून आता सुर्यास्त लवकर होईल, अशा वेळी सायंकाळी मतदान केंद्रांवर पुरेशा प्रकाशासाठी दिवे लावण्याची सुविधा करावी,अशी सुचना देण्यात आली. कोणत्याही परिस्थितीत मतदान केंद्रात मोबाईल नेता येणार नाही, याबाबत योग्य ती काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले. टपाली मतदान व गृह मतदान प्रक्रियेबाबतही यंत्रणांनी पूर्ण प्रक्रिया व्यवस्थित राबवावी. गृह मतदान कार्यक्रम अगोदर जाहीर करावा. त्याबाबत उमेदवारांना कळवावे. Assembly Election 2024

    मतदान कर्मचाऱ्यांसाठी सुविधा द्या

    निवडणूक कामकाजासाठी लागणारे पुरेस मनुष्यबळ उपलब्ध असल्याची खात्री करावी. आवश्यकतेनुसार मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे. नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांना जेवण, पिण्याचे पाणी, कामकाजाची सुविधा, मतदान केंद्रांवर गेल्यावर मुक्काम, मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता, सुरक्षितता, भोजन, पाणी याबाबतची व्यवस्था पुरविण्यात यावी. महिला कर्मचाऱ्यांना विशेष सुरक्षा व सोयी सुविधा द्याव्या.

    निवडणूक कामकाजात कर्मचाऱ्यांना अचानक उद्भवणाऱ्या आजारांसाठी तात्काळ वैद्यकीय सेवा देण्याचे नियोजन असावे. त्यासाठी स्थानिक पातळीवर रुग्णालयांमध्ये खाटा राखीव ठेवाव्या. प्रत्येक निवडणूक कर्मचाऱ्याची योग्य काळजी घेतली जाईल, याची खबरदारी घ्यावी. Assembly Election 2024

    सी व्हिजील वरील तक्रारींचे तात्काळ निराकरण करा

    प्रत्येक जिल्ह्यात व विधानसभा क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी  सर्व संलग्न जिल्ह्यांच्या पोलीस यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवावा.

    मद्य, अंमलीपदार्थ, मौल्यवान वस्तू, रोकड यांच्या अवैध वाहतुकीवर नजर ठेवून कारवाई करावी. याबाबत सी व्हिजील ॲपवर येणाऱ्या तक्रारींची दखल घेऊन कारवाई करावी. या तक्रारींचे तात्काळ निराकरण  झाले पाहिजे, याबाबत विशेष काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले.

    फेक न्यूजला तात्काळ पायबंद

    निवडणूक काळात माध्यमांमध्ये येणाऱ्या बनावट बातम्या, फेक न्यूज अर्थात खोट्या माहितीचे प्रसारण तात्काळ रोखावे. खोटी माहिती असल्यास तिचे प्रसारण रोखून सत्य माहितीचे तात्काळ प्रसारण करावे.  याबाबत या विभागाशी संबंधित बातम्या असतील त्यांनी तात्काळ योग्य माहिती पुरवावी व वस्तूस्थिती जनतेसमोर मांडावी,  जेणेकरुन निवडणूक प्रक्रियेवर परिणाम होणार नाही व त्याबाबत गैरसमज निर्माण होणार नाही. Assembly Election 2024

    मतदार जनजागृतीवर भर द्या

    मतदारांचे मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी आयोगामार्फत लवकरच ‘स्विप’ उपक्रम मोठ्याप्रमाणावर राबविले जाणार आहेत. ते सर्व उपक्रम आपल्या विधानसभा क्षेत्रात राबवावे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करावे. मतदारांना मतदान करणे सोईचे व सुलभ व्हावे यासाठी उपाययोजना राबवाव्या. Assembly Election 2024

    अचूक आकडेवारीसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी

    मतदानाचे प्रमाण नेमके कळावे व त्यातील आकडेवारीत अधिक अचूकता यावी यासाठी या निवडणूकीत झालेल्या मतदानाच्या टक्केवारीसाठी स्वतंत्र नोडल अधिकारी विधानसभा मतदार संघस्तरावर, जिल्हास्तरावर आणि राज्यस्तरावर नेमण्यात येणार आहे. मतदान टक्केवारीची आकडेवारी बुथनिहाय पडताळणी करुन मतदान टक्केवारी अचूक देण्यात येईल यासाठी ही उपाययोजना करण्यात आल्याचेही निवडणूक उपायुक्त यांनी सांगितले. Assembly Election 2024

    मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

    मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. एस. चोकलिंगम म्हणाले की, राजकीय पक्ष उमेदवारांना वेळोवेळी अद्यावत निर्णय व माहिती देऊन अवगत करावे.मतमोजणी साठी मतमोजणी केंद्राच्या पुनर्रचनेचा आराखडा नव्याने मंजूर करावयाचा असल्यास त्याचे प्रस्ताव तातडीने पाठवावे. टपाली मतमोजणीबाबतच्या व्यवस्थेसह आराखडा मंजूर करावा.

    निवडणूक कामकाजाविषयी सर्व अहवाल वेळेत व अचूक पाठविणे आवश्यक आहे. त्यात कोणतीही दिरंगाई व हयगय खपवून घेतली जाणार नाही. सर्व आकडेवारी अचूक पाठवावी. जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी आपल्या अंतर्गतअसलेल्या सर्व विधानसभा क्षेत्रातील कामकाजावर लक्ष ठेवावे. पैशांचा वापर. माध्यमांमध्ये येणारी माहिती, आणि असामाजिक तत्वांचा वावर याबाबत सजग राहून वेळीच कारवाई करावी. Assembly Election 2024

    यांची होती उपस्थिती

    बैठकीस नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, लातूरचे जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर घुगे,नांदेड जिल्हाधिकारी अभिजीत  राऊत, परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, बीड जिल्हाधिकारी अविनाश पाठक, लातूर जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे,चंद्रपूर जिल्हाधिकारी. विनय गौडा जी सी, गोंदिया जिल्हाधिकारी प्राजित नायर, भंडारा जिल्हाधिकारी संजय कोलते, वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी.एस, वर्धा जिल्हाधिकारी राहूल कर्डिले, गडचिरोली, जिल्हाधिकारी संजय दैने, हिंगोली जिल्हाधिकारी अभिनव गोयल, धाराशिव जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओबांसे, लातूर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, नागपुरचे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंघल तसेच बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,जालना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, नांदेड पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, धाराशिव पोलीस अधीक्षक संजय जाधव,गोंदिया पोलीस अधीक्षक  गोरख भामरे,चंद्रपूर पोलीस अधीक्षक रिना जानबंधू,लातूर पोलीस अधीक्षक सोमय मुंढे, गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल,  परभणी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी,  हिंगोली पोलीस अधीक्षक एस. डी. कोकाटे, भंडारा पोलीस अधीक्षक नुरुल हसन, वर्धा पोलीस अधीक्षक अनुराग जैन  तसेच दुरदृष्य पद्धतीने  सर्व जिल्ह्यातील अधिकारी व या निवडणूकीसाठी नेमलेले निवडणूक आयोगाचे निरीक्षक सहभागी झाले होते.

  • Cdcc bank chandrapur : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक पदभरती वरून आरोप-प्रत्यारोप

    Cdcc bank chandrapur चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पदभरती वरून सध्या चांगलंच राजकारण तापलं असून मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी संचालक मंडळ पैसे द्या पद घ्या ही प्रक्रिया राबवित असल्याचा आरोप करीत बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर कारवाई करीत त्यांची विधानसभेची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली आहे.

    Cdcc bank chandrapur या आरोपावर बँकेचे अध्यक्ष संतोष रावत म्हणाले की सदर भरती प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने होत असून यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार होत नाही आहे, मी निवडणुकीत उमेदवार असल्याने मला हेतुपुरस्सर बदनाम करण्याचा डाव विरोधी पक्षमार्फत सुरू असल्याची प्रतिक्रिया रावत यांनी दिली.

    मनसेचे राजू कुकडे यांचे आरोप काय?

    चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेमध्ये येत्या 15 ते 17 नोव्हेंबर ला 360 पदाकरिता होत असलेली परीक्षा ही वादात सापडली आहे, कारण उच्च न्यायालयात ही भरती प्रक्रिया टी.सी.एस या नामांकित कंपनी मार्फत पारदर्शकपणे पार पाडू असे बँकेमार्फत शपथपत्रावर लिहून देण्यात आले होते आणि त्यानंतरच न्यायालयाने या भरतीस मान्यता दिली, मात्र बैंक अध्यक्ष संतोषसिंग रावत व संचालक मंडळाने ठराव घेऊन आपल्या मार्जिच्या ITI या कंपनीला नोकर भरतीच्या परीक्षेचे काम देऊन न्यायालयाचा अवमान केला आहे.

    अवश्य वाचा : ब्रह्मपुरी मध्ये भाजप पक्षाला खिंडार

    शासनाच्या लाभाच्या अनेक योजना बैंक राबवित असल्याने शासन निर्णयानुसार मागासवर्गीय असलेल्या ओबीसी एससी, एसटी व एनटी उमेदवारांना आरक्षण लागू असतांना त्यांचे आरक्षण रद्द करून आणि अवैध पद्धतीने शैक्षणिक व वयोमर्यादेत बदल करून प्रत्येक विद्यार्थ्याकडून 30 ते 50 लाख रुपये ITI कंपनी एजंट व संचालक मंडळाकडून घेतले जात आहे, त्यामुळे या भरतीस पात्र असणाऱ्या सर्व सामान्य विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याने आचारसंहितेत बेकायदेशीरपणे घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेची चौकशी करून ही पद भरती रद्द करण्यात यावी अन्यथा जिल्ह्यातील सर्व ओबीसी, एसएसी, एसटी व एनटी विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मनसे तर्फे बैंकेच्या भ्रष्ट संचालक मंडळा विरोधात आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे. Cdcc bank chandrapur

    दरम्यान 30/10/2024 ला आचारसहिंता असतांना बैंक अध्यक्ष संतोषसिंग रावत यांनी बैंकेतर्फे गटसचिव व आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे व्यवस्थापक व कार्यालयीन नियमीत, कंत्राटी कर्मचारी यांना सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा करून मतदारास प्रलोभन दिल्याचे स्पष्ट होत असल्याने त्यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी पण त्यांनी केली.

    मागील कित्तेक वर्षांपासून चंद्रपूर मध्यवर्ती सहकारी बैंकेत नोकर भरती झाली नसल्याने बैंकेच्या कामकाजावर परिणाम होत असल्याचे बोलल्या जात होते, मात्र जेंव्हा जेंव्हा पद भरती करण्याची घोषणा व्हायची तेंव्हा तेंव्हा न्यायालयीन व तांत्रिक बाबीमुळे पद भरती राखडली, आता या पद भारतीला मार्च 2024 ला सहकार आयुक्त पुणे यांच्याकडून टी.सी.एस या नामांकित कंपनी मार्फत परीक्षा घेण्याकरिता मान्यता मिळाली असतांना पाच महिन्यांनतर आचारसहिंता काळात बैंकेचे अध्यक्ष संतोससिंग रावत यांना विधानसभा निवडणुकीत फायदा होण्यासाठी ही पद भरती होत असल्याचे दिसत आहे. Cdcc bank chandrapur


    दरम्यान सध्याचे बँकेचे संचालक मंडळ २०१२ साली अस्तित्वात आले होते व त्यांची ५ वर्षाची मुदत २०१७ सालीच संपली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नोकर भरती प्रक्रिया राबविणे यासारखे धोरणात्मक निर्णय घ्यायचा अधिकार या संचालक मंडळास नाही. बैंकेने जाहिरात काढताना शासनाने ठरवून दिलेल्या आरक्षण धोरणानुसार सर्व प्रवर्गासाठी जागा आरक्षित केल्या नाहीत. कारण यांना गेल्या ५ वर्षांपासून बँकेत तात्पुरत्या स्वरूपात कामावर घेतलेल्या आणि ज्यांच्याकडून नोकरीच्या बदल्यात पैसे घेतले आहेत अशांची निवड यांना करावयाची आहे.

    या जुन्या लोकांना नोकरी देता यावी म्हणून अवैध पद्धतीने वयोमर्यादा शिथिल करणे, शैक्षणिक पात्रतेत बदल करणे व फॉर्म भरण्याची मुद्दत वाढविणे या गोष्टी केल्या आहेत. यामुळे चुकीचे आरक्षण, अवैध पद्धतीने शैक्षणिक व वयोमर्यादेत केलेले बदल हे भरतीस पात्र असणाऱ्या सर्व सामान्य विद्यार्थ्यांवर अन्यायकारकच आहे.

    संचालक मंडळ व नोकर भरती विरोधात न्यायालयात याचिका

    मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात बैंकेने दिलेल्या शपथपत्रानुसार नोकर भरतीची कार्यवाही होतांना दिसत नसून न्यायालयाची परवानगी न घेता चुकीच्या पद्धतीने भरती केली जात असल्याबाबत उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. दरम्यान न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान होत असल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार योग्य कार्यवाही करण्याच्या सूचनाही शासनाने बँकेला दिल्या आहेत. या बैंकेच्या संचालक मंडळाची मुदत 2017 लाचं संपून आता जवळपास 6 वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला असल्याने बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून कायद्यानुसार निवडणुका घ्याव्यात याबाबतची याचिका सुद्धा न्यायालयात अंतिम टप्प्यात आहे. Cdcc bank chandrapur

    बँकेचे विद्यमान अध्यक्ष रावत हे सध्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. दरम्यान आचारसंहिता लागू झाल्यानंतरही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची मुदत 19 ऑक्टोबर असतांना पैसे देणाऱ्या विद्यार्थ्यांना समाविष्ट करण्यासाठी ती 22 ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर बँकेच्या अध्यक्ष आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही भरती प्रक्रिया घाई घाईने उमेदवारांना पैशांच्या बदल्यात नोकरी देण्यासाठी राबविली असल्याचे स्पष्ट होते व बैंकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत यांचा या भरती प्रक्रियेतून निवडणुकीसाठी मोठा निधी उभा करण्याचा मानस असल्याचे सिद्ध होते. Cdcc bank chandrapur

    परंतु ही सर्व भरती प्रक्रिया अवैधरित्या, चुकीच्या पद्धतीने पैशासाठी राबविली जात असल्याने याबाबत शासन, निवडणूक आयोग, न्यायालय, पोलीस विभाग या विविध स्तरांवर अनेक लोकांनी तक्रारी केल्या आहेत त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन संबंधितांवर लवकरच कारवाई होईल आणि भरती प्रक्रिया रद्द होईल त्यामुळे जिल्ह्यातील ओबीसी एससी, एसटी व एनटी च्या सर्व पात्र विद्यार्थ्यांनी या भरती प्रक्रियेतून नोकरी लावण्याचे आमिष कोणी देत असेल तर त्या भूलथापांना बळी पडू नका. Cdcc bank chandrapur

    किंबहुना असे कोणी आमिष दाखवत असेल तर त्याची तक्रार पोलिसांकडे करा आणि या चुकीच्या आणि आर्थिक लाभासाठी बेकायदेशीरपणे मागासवर्गीयांचे हक्काचे आरक्षण संपविणाऱ्या बैंक अध्यक्ष संतोषसिंग रावत व संचालक मंडळ यांच्या विरोधात एकत्र या असे आवाहन मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी केले आहे. Cdcc bank chandrapur

    नियमाबाह्य संचालक मंडळ?

    चंद्रपूर जिल्हा बँकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2012 मध्ये 5 वर्षासाठी झाल्या. वास्तविक पाहता 2017 मध्ये निवडणूक काही न्यायालयीन अडथळा निर्माण झाल्याने अजुनपावेतो निवडणुका झाल्या नाही. या 12 वर्षाच्या कालावधीत संचालक मंडळाविरुद्ध 4 पोलीस/ACB च्या कार्यवाह्या,न्यायालयात चार्ज शीट दाखल, म.रा.सहकारी कायद्याच्या कलम 88 अंतर्गत आर्थिक नुकसान ₹3.47 कोटी वसुलीची कार्यवाही, कलम 79 चे निर्देश इत्यादी अनेक तक्रारी असतांना त्याच संचालक मंडळाकडून नोकर भरती करण्यास सहकार विभाग सहकार्य करून भष्ट्राचारास खतपाणी घालत आहे. Cdcc bank chandrapur

    बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांची प्रतिक्रिया काय?

    विधानसभा निवडणुकीत मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने विरोधकांचे षडयंत्र – संतोषसिंह रावत यांचा आरोप

    मूल – चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची नोकर भरती उच्च न्यायालय आणि शासनाच्या निर्देशान्वये पादर्शकपणणे सुरू असतांना काही मंडळी विधानसभा निवडणुकीत मी उमेदवार असल्याने विरोधकांच्या आमिषाला बळी पडून आपल्याला हेतुपुरस्सर बदनाम करू पाहत आहेत. बँकेच्या नोकर भरती बाबत ज्यांना आक्षेप आहे. त्यांना कायदेशीर मार्ग मोकळा आहे. असे मत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले आहे. Cdcc bank chandrapur

    प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाद्वारे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी ग्राहकांची मागणी आणि बँकेची निकड लक्षात घेवून शासनाने दिनांक १७ फेब्रुवारी २०२२ रोजी ३६० पदे भरण्यास परवानगी दिली, शासनाच्या परवानगी आदेशानुसार बँकेने कार्यवाही सुरू करताच काही जणांनी दबावतंत्राचा वापर करून भरती प्रक्रियेला स्थगिती आणली. याविरूध्द बँक प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात रिट पिटीशन दाखल केली. दाखल रिट पिटीशन नुसार सर्व दस्तऐवजांची पडताळणी करून उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने शासनाने बँकेच्या नोकर भरती बाबत दिलेले स्थगिती आदेश रद्द करीत शासन तालीकेतील संस्था/एजंसीकडून बँकेची नोकर भरती करण्यास मान्यता दिली. Cdcc bank chandrapur

    त्यानुषंगाने बँक प्रशासनाने शासनाच्या तालीकेवर असलेल्या टीसीएस कंपनीला नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्यास इच्छुक असल्यास संम्मती कळविण्यास विनंती केली. त्यानुसार प्रथमता टिसीएस कंपनीने होकार दर्शविल्याने टिसीएस कंपनीच्या मागणीनुसार त्यांना आवश्यक असलेली माहिती पुरवून बँकेने करारनामा करण्यास टिसीएस कंपनीला कळविले असता टिसीएस कंपनीने प्रतिसाद दिला नाही. याबाबत बँकेने पाच ते सहा वेळा नोकर भरती संदर्भात टिसीएस कंपनीशी पत्रव्यवहार केला. परंतू टिसीएस कंपनीने करारनामा करण्यास प्रतिसाद दिला नाही. Cdcc bank chandrapur

    या सर्व घडामोळीत पाच ते सहा महिण्यांचा कालावधी लोटून गेल्यानंतर बँक प्रशासनाने पुन्हा शासनाशी पत्रव्यवहार केला. त्या दरम्यान शासनाने राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती करीता नव्याने सहा संस्था/एजंसीचे पॅनलची नामावली बँकेला कळविली. टिसीएस कंपनीने बँकेशी करारनामा न केल्यामूळे बँकेने शासनाच्या तालीके मधील इतर संस्थाशी पत्रव्यवहार करून नोकर भरती संदर्भात प्रस्ताव मागविले. Cdcc bank chandrapur

    प्राप्त प्रस्तावाची छाणनी अंती सर्वात कमी दर असलेल्या कंपनीचे दरपत्रक मान्य करत त्या एजंसीकडून नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मान्य करण्यांत आल्यानंतर बँकेच्या नोकर भरती बाबत नियमानुसार व पारदर्शपणाने कार्यवाही सुरू केली. नोकर भरती संदर्भातील ही प्रक्रिया विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीपासून सुरू आहे. आचारसंहितेच्या कालावधीत राज्यातील इतरही विभागाकडून नोकर भरतीची प्रक्रिया राबविण्यांत येत आहे, त्यामूळे बँकेच्या नोकर भरती संदर्भात आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचा आरोप निराधार असल्याचेही मत संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले. Cdcc bank chandrapur

    शासनाच्या विधी व न्याय विभाग तसेच सहकार आयुक्त यांचे निर्देशाप्रमाणे ज्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकाकडे शासनाचे भाग भांडवल नाही, त्या बँकाना आरक्षण अधिनियम २००१ लागु होत नाही, त्यामूळे आरोपकर्त्यांनी नोकर भरती प्रकियेत आरक्षणा संदर्भात भ्रम निर्माण करून जनतेची दिशाभूल करू नये. असा सल्ला संतोषसिंह रावत यांनी दिला.

    गटसचिवांना सानुग्रह अनुदान वितरीत केल्याच्या मुद्द्याचे खंडण करतांना संतोषसिंह रावत यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका शेतकरी बंधु आणि भगिनींना पिक कर्ज व शेती पुरक कर्ज बँकेला संलग्न असलेल्या सेवा सहकारी संस्था/वि.का./आदिवासी वि.का. संस्थांच्या मार्फतीने करीत असतात. संबंधीत संस्थेचे गटसचिव यांना त्यांच्या दैनदिन कामात प्रौत्साहन मिळावे करीता बैंक कित्येक वर्षांपासून दिवाळीच्या काळात दिवाळीचा सण उत्साहाने साजरा करता यावा म्हणून सानुग्रह अनुदान वितरीत करीत आहे. त्यानुसारच गटसचिवांना सानुग्रह अनुदान वितरीत करण्यांत आले. Cdcc bank chandrapur

    यामध्यें कोणत्याही प्रकारच्या आचारसंहितेचे उल्लंघन झाले नाही. याची जाणीव असतांना काही मंडळी शासनाच्या सदर पत्राचे अवलोकन किंवा वास्तविकता न तपासता नोकर भरती बाबत पुरावे असल्याचे पोकळ वल्गना करून विधानसभा निवडणुकीत निष्कारण त्रास देण्याच्या उद्देशाने आपल्याविरूध्द बिनबुडाचे आरोप करीत आहे. हे विरोधकांचे षडयंत्र असल्याचे मत बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांनी व्यक्त केले.

  • Election Observator : विधानसभा निवडणुक पारदर्शक वातावरणात होणार – निवडणूक निरीक्षक

    Election Observator भारत निवडणूक आयोगाने चंद्रपूर जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेल्या निवडणूक निरीक्षकांनी जिल्ह्यातील संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेऊन संबंधितांना सुचना केल्या. तसेच जिल्हा प्रशासनाची टीम उत्तम असून राजकीय पक्षांमध्येसुध्दा येथे सौहार्दाचे वातावरण आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुका पारदर्शक पध्दतीने खुल्या, मुक्त आणि निर्भयपूर्ण वातावरणात होईल, असा विश्वास निवडणूक निरीक्षकांनी व्यक्त केला.

    Election Observator नियोजन सभागृह येथे पार पडलेल्या बैठकीला सामान्य निवडणूक निरीक्षक संजयकुमार, आर. मुत्यालाराजु  रेवु, संगिता सिंग, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक अवधेश पाठक, खर्च पथक निवडणूक निरीक्षक आदित्य बी. आणि धमेंद्र सिंह यांच्यासह जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अपर जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी आदी उपस्थित होते.

    शासकीय : महावितरण ने दिला कारवाईचा गंभीर इशारा, काय आहे प्रकरण?

    यावेळी सामान्य निवडणूक निरीक्षक संजयकुमार म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुका खुल्या आणि मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे. दिव्यांग मतदारांचे मतदान आणि 85 वर्षांवरील नागरिकांच्या गृहमतदानावर विशेष लक्ष द्यावे. सर्व मतदान केंद्रात किमान मुलभूत सुविधा त्वरीत पूर्ण करा. नागरिकांमध्ये मतदान जनजागृतीकरीता महानगर पालिका, नगर परिषद, नगर पंचायत, ग्रामपंचायत आदींनी स्वीप उपक्रम वाढवावे. बाजारपेठेत व इतर गर्दीच्या ठिकाणी मतदान जनजागृती करावी. Election Observator

    आंतरराज्यीय चेक पोस्टसह जिल्ह्यातील सर्व चेक पोस्टवर गांभिर्याने तपासणी करावी. दारू, रक्कम, ड्रग्ज, अवैध मार्गाने येणा-या वस्तुंची जप्ती करावी. सी-व्हिजीलवर येणा-या तक्रारींची तात्काळ दखल घ्यावी. निवडणूकीच्या कामात असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांच्या टपाली मतदानाची टक्केवारी वाढवावी. सोशल मिडीयावर विशेष लक्ष देऊन आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची विशेष दक्षता घ्यावी. तसेच निवडणूक प्रक्रियेकरीता अधिकारी व कर्मचा-यांचे उत्तम प्रशिक्षण घ्यावे. जेणेकरून निवडणुकीमध्ये कोणतीही अडचण येणार नाही, अशा सुचना सामान्य निरीक्षक संजयकुमार यांनी दिल्या. Election Observator

    सामान्य निवडणूक निरीक्षक आर. मुत्यालाराजू रेवू म्हणाले, मतदार चिठ्ठी वाटप 100 टक्के करा. मतदारांना मतदानासाठी कोणतीही अडचण जावू नये. संगिता सिंग म्हणाल्या, मतदान केंद्रांची किरकोळ दुरुस्ती त्वरीत पूर्ण करारी. दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प सुव्यवस्थित असावे. कायदा व सुव्यवस्था निरीक्षक अवधेश पाठक म्हणाले, स्ट्राँग रुमची सुरक्षा व्यवस्था सर्वोच्च असावी. चेकपोस्टसह सर्व नाके, रस्त्यांवर नाईट पेट्रोलिंग वाढवावी. खर्च पथक निवडणूक निरीक्षक आदित्य बी. म्हणाले, वाहनांची परवानगी किती वेळेसाठी आहे, त्यानुसारच दर आकारण्याचे नियोजन करावे. धर्मेंद्र सिंह म्हणाले, विधानसभा मतदारसंघनिहाय खर्च पथकामध्ये मनुष्यबळ वाढविणे गरजेचे आहे. Election Observator

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्ह्यातील निवडणूक विषयक पूर्वतयारीचे सादरीकरण केले. बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, विविध विभागाचे नोडल अधिकारी आदी उपस्थित होते.

    राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींशी संवाद : तत्पुर्वी निवडणूक निरीक्षकांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींशी वीस कलमी सभागृह येथे संवाद साधून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. निवडणुकीदरम्यान ज्या ठिकाणी गडबडीची शक्यता, पैसे, दारु पुरवठा आदी संशयास्पद बाबी आढळल्या तर लगेच जिल्हा प्रशासनाशी किंवा निवडणूक निरीक्षकांसोबत संपर्क साधावा,  अशा सुचना त्यांनी  केल्या.

  • Unauthorized power flow : अनाधिकृत वीज प्रवाह सोडल्यास गुन्हा होणार दाखल

    Unauthorized power flow महावितरणने घेतली गंभीर दखल…कुंपणात वीज प्रवाह सोडल्यास होणार गुन्हा दाखल


    Unauthorized power flow चंद्रपूर : – वन्य प्राण्यांपासून होणारी पिकाची नासाडी रोखण्यासाठी काही शेतकरी कुंपणात वीज प्रवाह सोडत असल्याचे महावितरणच्या निदर्शनास आले आहे. परंतु त्यामुळे वन्य प्राण्यांबरोबरच शेतात कामांसाठी गेलेल्या आणि अनावधानाने कुंपणास स्पर्श करणा-या शेतकऱ्यांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू होत असल्याची बाब समोर आली आहे.

    शिवाय यासाठी वीजही आकडे टाकून चोरून वापरत असल्याचे दिसून आले आहे. याची महावितरणने गंभीर दखल घेतली असून यापुढे कुंपणात अनधिकृत वीज प्रवाह सोडलेला आढळल्यास संबंधितावर विद्युत कायद्याच्या विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
    मागिल काही महिन्यांपासून विजेचा शॉक लागून शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना वारंवार घडत आहे. Unauthorized power flow

    याची अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता महावितरणच्या असे लक्षात आले की, शेतकरी पिकाच्या संरक्षणासाठी वीज वाहिन्यांवर आकोडे टाकून वीज प्रवाह थेट कुंपणात सोडतात. त्यामुळे अनावधानाने संपर्कात आलेल्या प्राण्यांसोबत शेतक-यांचेही मृत्यू झाल्याच्या काही घट्ना उघडकीस आल्या आहेत.

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या पक्ष प्रवेशाने भाजप पक्षात….

    एकंदरीत हा प्रकार वाटतो तितका साधा नसून वीजचोरी बरोबरच सदोष मनुष्यवध यांसारख्या गंभीर गुन्ह्यांशी संबंधित आहे. तसेच जीवितहानी झाल्यानंतर त्याचा दोष विनाकारण महावितरणवर थोपण्याचा आणि महावितरण कडून भरपाई मागण्याचा कल देखील दिसून येत आहे. Unauthorized power flow


    महावितरणने घेतली गंभीर दखल:
    वीज वाहिन्यांवर अनधिकृतपणे आकोडे टाकून कुंपणात थेट वीज प्रवाह सोडण्याच्या या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी महावितरणने कायदेशीर कारवाई करण्याचे ठरविले आहे. यासाठी, तांत्रिक कर्मचारी तसेच भरारी पथकाच्या माध्यमातून शेतशिवारात गस्त घालण्यात येणार आहे. त्यावेळी हा प्रकार आढळला तर संबंधित शेतक-यावर विद्युत कायदा 2003 च्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे तसेच संभाव्य जीवितहानीची शक्यता लक्षात घेऊन संबंधितावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची विनंती पोलिस विभागाला करण्यात येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.

    निवडणूक : चंद्रपूर जिल्ह्यात 30 उमेदवारांचे अर्ज बाद

    आकोडे टाकून वीज चोरी करून शेताच्या कुंपणामध्ये वीज प्रवाह सोडणा-या शेतक-याला यापुढे गंभीर कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असून संभाव्य जीवित हानीची शक्यता लक्षात घेता याबाबत फौजदारी गुन्हाही नोंदविला जाऊ शकतो याची दखल घेत शेतकऱ्यांनी स्वतः या प्रकारामध्ये सहभागी होऊ नये आणि कोणी सहभागी होत असल्यास त्याला तसे करण्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन देखील महावितरणने केले आहे.

  • BJP manifesto : भाजपचा जाहीरनामा राज्याच्या प्रगतीचा गेम चेंजर ठरणार – सुधीर मुनगंटीवार

    BJP manifesto : भाजपचा जाहीरनामा राज्याच्या प्रगतीचा गेम चेंजर ठरणार – सुधीर मुनगंटीवार

    BJP manifesto विकासाच्या बाबतीत मुल, पोंभुर्णा, बल्लारपूर हा विधानसभा मतदारसंघ महाराष्ट्रात अग्रेसर आहे. तो कायम अग्रेसर रहावा यासाठी जनता पाठीशी आहे. जनतेच्या सूचनांमधूनच निवडणुकीचा जाहीरनामा तयार करण्यात आलेला आहे. हा जाहीरनामा राज्याच्या प्रगतीचा गेम चेंजर ठरणार आहे, असा विश्वास राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    गुन्हेगारी : चंद्रपूर शहर पोलिसांचे कारवाई सत्र

    BJP manifesto ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे भाजपा व महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सोमवारी (ता.२८) अर्ज भरला. अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘महाराष्ट्र राज्याच्या विकासाचा आणि प्रगतीचा जाहीरनामा भारतीय जनता पक्ष आणि महायुतीने मांडला आहे. आमचा जाहीरनामा हा केवळ जाहीरनामा नाही तर रयतेचे वचन पत्र आहे.

    या वचनपत्राला जनताही डोक्यावर घेईल.’ राज्यातील महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. राज्यातील लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या भावांचे महायुतीचे सरकार पुन्हा राज्यात आणण्यासाठी भाजपा महायुतीला निवडून देतील हा विश्वास आहे, असेही ना.मुनगंटीवार म्हणाले.

    राजकीय : चंद्रपूर जिल्ह्यात तीन वारांचे जोरदार शक्ती प्रदर्शन

    माझ्या मतदारसंघाशिवाय स्टार प्रचार म्हणूनही माझ्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे. या मतदारसंघातून जास्तीत जास्त वेळ काढून मी इतर मतदारसंघात प्रचार करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. BJP manifesto

    राज्याचा सांस्कृतिक मंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे राज्यगीत जाहीर करण्याचे भाग्य लाभले. दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा हा विश्वास राज्य गीतातून महाराष्ट्राला दिलेला आहे. त्याच दिल्लीतील सरकारचे हात बळकट करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीचे स्थिर सरकार आम्ही आणणार आहोत, असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचा आमदार म्हणून या क्षेत्राचा सामाजिक, आर्थिक आणि पायाभूत सुविधांचा विकास करण्याकडे विशेष भर दिला. विविध समाजाच्या हक्काचे समाजभवन गावागावांमध्ये निर्माण करण्यात आले. ग्रामिण भागातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि बळकट करण्यासाठी ग्रामिण आरोग्य केंद्रांचे आधुनिकीकरण केले. विविध रोजगाराभिमुख प्रकल्पांच्या माध्यमातून क्षेत्रातील गावागावांतील हजारो युवक, महिला, नागरिकांना हक्काचे रोजगार देण्याचेही काम झाले. BJP manifesto

    याशिवाय गावागावांमध्ये रस्ते आणि पुलांचे जाळे निर्माण करून पायाभूत सुविधांना उभारी देण्याचे काम केले. या सर्व कामांमुळे जनतेच्या जीवनात सुलभता आली आहे. त्यामुळे जनता जनार्दन यावेळी देखील खंबीरपणे आपल्या पाठीशी उभी राहिल. केवळ बल्लारपुरमध्येच नव्हे तर संपूर्ण राज्यातील जनता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या पाठीशी राहिल, असाही विश्वास ना.श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

  • All indian Republican party : अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी स्वबळावर लढणार विधानसभा निवडणूक

    All indian Republican party : अखिल भारतीय रिपब्लिकन पार्टी स्वबळावर लढणार विधानसभा निवडणूक

    All indian Republican party अ.भा. रिपब्लिकन पक्ष विधानसभा स्वबळावर लढणार, पत्रपरिषदेत पक्षाध्यक्ष प्रविण खोब्रागडे यांची माहिती

    All indian Republican party चंद्रपूर – लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत संविधान आणि आरक्षणाच्या रक्षणाकरिता एकत्रित येत अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने महाविकास आघाडी सोबत कॉंग्रेस पक्षाला पाठिंबा दिला होता. कांग्रेस तर्फे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत सन्मानजनक वाटा मिळणार असा शब्द दिला होता. पण तो शब्द कांग्रेस कडून पाळण्यात आला नसल्याने 25 ते 30 जागा अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष स्वबळावर लढणार असल्याची माहीती पक्षाध्यक्ष प्रविण खोब्रागडे यांनी पत्रपरीषदेत दिली.

    बल्लारपूर विधानसभा : डॉ.अभिलाषा गावतुरे निवडणुकीत मुनगंटीवार यांना देणार आव्हान


    सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे जोर पकडू लागले आहे. कांग्रेस सोबत झालेल्या वाटाघाटीत अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाला सोबत घेऊन सन्मानजनक वाटा दिल्या जाणार असे शब्द दिले असतांना सुद्धा तसा शब्द पाडण्यात आला नसून हक्काच्या आणि निवडून येणा_या जागा सुद्धा रिपब्लिकन पक्षासाठी सोडल्या नाही, त्यामुळे महाराष्ट्रातील अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे नेते, कार्यकर्ते यांच्या मनात संताप व्यक्त करण्यात येत असून आता आम्ही सर्व अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते आरक्षणवादी आघाडीत सोबत आहेत असेही ते म्हणाले. All indian Republican party

    भाजप च्या उमेदवाराला माजी आमदारांचा विरोध


    या आघाडीत खासदार चंद्रशेखर रावण, आनंदराज आंबेडकर, प्रकाश शेंडगे, वामन मेश्राम, सुरेश माने इत्यादी नेत्यांचा समावेश आहे. या आघाडीत अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष पंचवीस ते तीस मतदारसंघात उमेदवार उभे करत आहे. त्याच अनुषंगाने संबंधीत जिल्हाध्यक्ष यांना ए.बी फॉर्म पोहोचता करून देण्यात आले आहे.

    पत्रपरिषदेला पक्षाध्यक्ष प्रविण खोबरागडे, अशोक निमगडे, राजस खोबरागडे, प्रेमदास बोरकर, मृणाल कांबळे, गिता रामटेके, निर्मला नगराळे, महादेव कांबळे, सचिन पाटील, शंकर वेल्हेकर, हरिदास देवगडे, अश्विनी आवळे, प्रेरणा करमरकर, पंचफुला वेल्हेकार ,शिला कोल्हे, छाया थोरात, वैशाली साठे, ज्योती शिवणकर, दिलीप डांगे सर, यशवंत मृजमकर, प्रभूदास माऊलीकर , केशव रामटेके, माणिक जुमळे, सिध्दार्थ शेंडे, विजय करमरकर उपस्थित होते.

  • Rebellion in the Congress Party : डॉ. अभिलाषा गावतुरे उमेदवारी अर्ज दाखल करणार

    Rebellion in the Congress Party : डॉ. अभिलाषा गावतुरे उमेदवारी अर्ज दाखल करणार

    Rebellion in the Congress Party कांग्रेस पक्षाची यादी जाहीर झाल्यावर अनेक इच्छुकांचे निवडणूक लढण्याचे स्वप्न भंगले, चंद्रपूर जिल्ह्यात कांग्रेस पक्षाने जाहीर केलेले अधिकृत उमेदवार हे हरण्यासाठी उभे केले असल्याची प्रतिक्रिया जनमानसात उमटू लागली आहे.

    राजकीय : आघाडीत बिघाडी, शिवसेना जिल्हाप्रमुखाची बंडखोरी


    Rebellion in the Congress Party चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातून प्रवीण पडवेकर जे नगरसेवक निवडणूक हरले आहे, विधानसभा क्षेत्रात त्यांचा काडीमात्र संपर्क नाही, वरोरा विधानसभा क्षेत्रातून प्रवीण काकडे पक्षाशी संबंध नसलेले निव्वळ खासदार प्रतिभा धानोरकर यांचे भाऊ अशी त्यांची ओळख तर बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात संतोष रावत यांना उमेदवारी दिल्या गेली आहे.

    देवराव भोंगळे यांच्या उमेदवारीला विरोध


    रावत यांचा जनसंपर्क मूल क्षेत्रापर्यंत मर्यादित आहे.
    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात कांग्रेस पक्षातर्फे डॉ. अभिलाषा गावतुरे व शिवसेना ठाकरे गटातर्फे शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी शेवटच्या घटकापर्यंत जनसंपर्क वाढविला. मात्र ऐनवेळी तिसऱ्याचे नाव जाहीर झाल्याने आघाडीत बिघाडी झाल्याचे चिन्ह दिसू लागले.

    राजकीय : कांग्रेसची यादी जाहीर आणि अनेकांचे स्वप्न भंगले


    शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे 29 ऑक्टोबर रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे तर कांग्रेसच्या अभिलाषा गावतुरे आज 28 ऑक्टोबर रोजी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. Rebellion in the Congress Party


    डॉ. गावतुरे यांनी मागील अनेक वर्षांपासून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात काम सुरु केले होते, पक्षाने तयारीला लागा असा आदेश दिल्यावर त्यांनी कांग्रेस व भूमिपुत्र ब्रिगेडच्या माध्यमातून तळागाळात स्वतःची चांगली ओळख निर्माण केली. विधानसभा क्षेत्रात गावतुरे या अल्पावधीत लोकप्रिय झाल्या.


    विशेष म्हणजे जिल्ह्यातील 6 विधानसभा जागेवर कांग्रेसने दावा केला होता मात्र ज्या विधानसभा क्षेत्रात जो लोकप्रिय आहे त्याला उमेदवारी न देता भलत्याला उमेदवारी दिल्याने सध्या निष्ठावंत कांग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच रोष निर्माण झाला आहे.


    लोकसभा निवडणुकीनंतर कांग्रेसचे अच्छे दिन सुरु झाले होते मात्र विधानसभा निवडणुकीच्या काळात पुन्हा वाईट दिवसाचा शनी कांग्रेसच्या मागे लागला आहे.


    नेत्यांचे विरोधी पक्षासोबत असलेले हितसंबंध आणि साट्या लोट्याचे राजकारण हे कांग्रेसच्या पराभवाचे मुख्य कारण या विधानसभा निवडणुकीत असणार आहे.

  • A big blow to Mahavikas Aghadi : बल्लारपूर विधानसभेतून संदीप गिर्हे यांची अपक्ष उमेदवारी

    A big blow to Mahavikas Aghadi : बल्लारपूर विधानसभेतून संदीप गिर्हे यांची अपक्ष उमेदवारी

    A big blow to Mahavikas Aghadi 27 ऑक्टोबर रोजी कांग्रेसची यादी जाहीर झाली त्यामध्ये चंद्रपूर, वरोरा व बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांची नावे घोषित झाल्यावर महाविकास आघाडी मधील घटक पक्ष शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी कांग्रेस उमेदवार संतोष रावत पुढे बंड करण्याचा निर्णय घेत 29 ऑक्टोबर ला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.

    निवडणूक : चंद्रपूर जिल्ह्यातील 3 विधानसभा क्षेत्रात कांग्रेस पक्षाने दिले दुर्बल उमेदवार


    A big blow to Mahavikas Aghadi महाविकास आघाडी साठी चंद्रपूर जिल्ह्यातून पहिला झटका मिळणार असून मागील वर्षभरापासून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात संदीप गिर्हे हे कार्यरत आहे, क्षेत्रातील शेवटच्या घटकापर्यंत संदीप गिर्हे यांनी पक्षाची मशाल पोहचविली. विशेष म्हणजे त्यांनी भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यापुढे निवडणुकीत आव्हान निर्माण करीत विधानसभा क्षेत्रात जनतेच्या हिताचे काम केले.


    जिल्ह्यातील 6 विधानसभा क्षेत्रापैकी 1 जागा शिवसेनेला सुटायला हवी अशी मागणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापुढे करण्यात आली होती. यासाठी पूर्व विदर्भ प्रमुख आमदार भास्कर जाधव हे स्वतः विधानसभा क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी बल्लारपूर येथे दाखल झाले होते:
    संदीप गिर्हे यांची जनतेमधील लोकप्रियता लक्षात घेत याबाबत अहवाल त्यांनी पक्षप्रमुख ठाकरे समोर सादर केला होता. A big blow to Mahavikas Aghadi


    पक्षाने गिर्हे यांना तयारीला लागा असा आदेश दिला मात्र ऐनवेळी बल्लारपूर विधानसभा कांग्रेसच्या कोट्यात गेली.
    नेहमीप्रमाणे कांग्रेसने भाजप पुढे दुर्बल उमेदवार दिला, मात्र सदर बाब गिर्हे यांना खटकली आणि त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आता बल्लारपूर विधानसभा निवडणुकीत खरी चुरस बघायला मिळणार हे नक्की. विशेष बाब म्हणजे विदर्भातून महाविकास आघाडी मध्ये बिघाडीची सुरुवात झाली आहे.