Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • National Deworming Day 2024 : चंद्रपूर मनपा हद्दीतील 67 हजार 448 मुलांना देणार जंतनाशक गोळी

    National Deworming Day 2024

    National Deworming Day 2024 राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 4 डिसेंबर रोजी महानगरपालिका कार्यक्षेत्रात राष्ट्रीय जंतनाशक दिन साजरा करण्यात येणार असुन या दिवशी 1 ते 19 वर्षे वयोगटातील 67448 मुला-मुलींना शाळा तसेच अंगणवाडीमध्ये जंतनाशक गोळ्या देण्यात येणार आहे. तसेच 4 डिसेंबर रोजी गोळी घेणे शक्य न झालेल्या मुला-मुलींना मॉप अप राउंडद्वारे 10 डिसेंबर रोजी जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे.

    आयुध निर्माणी चांदा येथे नोकरीची सुवर्णसंधी

     
         राष्ट्रीय जंतनाशक दिन (एन.डी.डी.) हा कार्यक्रम मुले व पौगंडावस्थेतील मुला-मुलींसाठी जंताच्या आजाराचा सामना करण्यासाठी फेब्रुवारी 2015 मध्ये सुरु करण्यात आला. National Deworming Day

    हा कार्यक्रम फेब्रुवारी आणि ऑगस्ट महिन्यात (राज्य विशिष्ट STH व्याप्तीवर आधारित) शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये एकाच निश्चित दिवशी जंतनाशक गोळ्या देऊन दोनदा घेण्यात येतो, जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनानुसार मातीतून प्रसार होणाऱ्या कृमींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन जंतनाशक मोहिमेमधील अंतर ६ महिन्यांपेक्षा जास्त नसावे. म्हणून,जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यासाठी राष्ट्रीय जंतनाशक मोहिम डिसेंबरमध्ये आयोजित करण्यात येत आहे.

    जगप्रसिद्ध ताडोबा येथे नोकरीची सुवर्णसंधी, आजच करा अर्ज


           1 ते 19 वयोगटातील बालकांमध्ये आढळणाऱ्या आतड्यांचा कृमीदोष हा मातीतून प्रसारित होणाऱ्या जंतापासून परिसर स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे होतो. कृमीदोष हा रक्तक्षय आणि  कुपोषणाचे  कारण असून त्यामुळे बालकांची शारीरिक व बौद्धिक वाढ खुंटते. याकरिता राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून1 ते19 वर्ष वयोगटातील सर्व मुला – मुलींना शाळा व अंगणवाडी केंद्र स्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्यरक्षण, उत्तम पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्याचे उदि्दष्ट ठेवण्यात आले आहे. National Deworming Day 2024


         जंताचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जंतनाशक गोळी घेण्याबरोबरच हात स्वच्छ धुणे, शौचालयाचा वापर करणे, भाज्या व फळे स्वच्छ धुवून खाणे, नखे नियमित कापणे व स्वच्छ ठेवणे, बाहेर जाताना बूट अथवा चपलांचा वापर करणे,सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवणे ही खबरदारी घेणेही आवश्यक आहे. ही मोहीम शहरी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत राबविण्यात येणार आहे.


           सदर गोळी खाल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. तथापि बालकाच्या शरीरामध्ये जंताचा प्रादुर्भाव असल्यास किरकोळ पोटदुखी, जळजळ अथवा क्वचित प्रसंगी मुलांना उलटी होऊ शकते. हे दुष्परिणाम किरकोळ स्वरूपाचे असल्याने पालकांनी घाबरून जाऊ नये.सदर गोळी लाभार्थ्यांच्या हातात न देता प्रत्यक्ष समोर खाऊ घालणे आवश्यक आहे. National Deworming Day

    1 वर्षाखालील लाभार्थ्याला ही गोळी दिली जात नाही.1 ते 2 वर्षाच्या मुलांना अर्धी गोळी, 2 ते 3 वर्षाच्या मुलांना चारशे ग्रामची पूर्ण गोळी पाण्यात विरघळुन तर 3 ते 19 वर्षाच्या वयोगटातील मुलांना पुर्ण गोळी चाऊन खाणे आवश्यक आहे. गोळी घेतल्यावर स्वच्छ पाणी पिणे आवश्यक असुन किमान 2 तास शाळेतच थांबणे आवश्यक आहे.

  • gondwana university exam time table : सिनेट सदस्य बेलखडे यांच्या मेल नंतर परीक्षा वेळापत्रकात बदल

    gondwana university exam time table

    gondwana university exam time table चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण सुकर व्हावे यासाठी गडचिरोली जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती.

    या विद्यापीठाचा उद्देश काही पूर्ण होताना दिसत नसून अनेक वादग्रस्त निर्णय या विद्यापीठाच्या माध्यमातून होत असल्याने विद्यार्थी सुद्धा विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे चांगलेच त्रासून गेले आहे.

    86 हजारांची कायमस्वरूपी नोकरी हवी तर आजच करा अर्ज

    असाच एक निर्णयामुळे विद्यार्थ्यांवर शैक्षणिक अभ्यासक्रम बाबत नुकसानीची वेळ येणार होती मात्र विद्यापीठाचे सिनेट सदस्य निलेश बेलखेडे यांच्या गंभीर दखलते मुळे विद्यापीठाला निर्णय बदलावा लागला.

    गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत हिवाळी परीक्षेचा हंगाम सुरू आहे, विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या काळात विद्यापीठाने परीक्षेच्या तारखा घोषित केल्या, यामध्ये काही पेपरच्या वेळापत्रकात ऐनवेळी बदल करण्यात आला होता.

    परीक्षेच्या या हंगामात B. ed च्या परीक्षा सुरू आहे, त्याबाबत वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले होते, 14 व 15 डिसेंबर रोजी बीएड व केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या CTET अभ्यासक्रमाच्या परीक्षा पेपर एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना एकाच दिवशी 2 पेपर देणे शक्य नव्हते. कारण असंख्य विद्यार्थी सदर परीक्षा देण्यासाठी बाहेर गावातून येणार होते. gondwana university exam time table

    केंद्रीय शिक्षण विभागाच्या संपूर्ण देशात एकाच दिवशी CTET च्या परीक्षा घेतल्या जातात असे असतानाही गोंडवाना विद्यापीठाने बीएड अभयसक्रमाच्या परीक्षा त्या दिवशी घेतल्याने विद्यार्थी वर्गात चांगलाच गोंधळ उडाला होता, याबाबत विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे सिनेट सदस्य निलेश बेलखडे यांच्याकडे तक्रार देत मदतीची विनंती केली.

    विद्यापीठाचा गलथान कारभार सिनेट सदस्य बेलखडे यांना लक्षात आल्यावर त्यांनी विद्यापीठाला जाब विचारला, आपण अश्या चूका वारंवार का करीत आहोत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करीत विद्यापीठाला मेल करीत बीएड अभ्यासक्रमाच्या परीक्षा वेळापत्रकात तात्काळ बदल करावा हो मागणी केली. gondwana university exam time table

    निलेश बेलखडे यांच्या मेल नंतर आपला निर्णय चुकला ही बाब विद्यापीठाच्या लक्षात आली त्यांनी तात्काळ परीक्षा वेळापत्रकात बदल करीत 15 डिसेंबर रोजी बीएड अभ्यासक्रमाचा पेपर आता 18 डिसेंबर रोजी घेण्यात येणार असल्याचे परिपत्रक काढले.

    बेलखडे यांच्या तत्परतेने दोन्ही परीक्षा देण्यासाठी बाहेर गावावरून येणारे व स्थानिक विद्यार्थ्यांनी सिनेट सदस्य निलेश बेलखडे यांचे आभार मानले आहे.

    गलथान कारभार

  • Latest Crop weed competition : कडधान्य व अन्नधान्य पिकांच्या स्पर्धा

    Crop weed competition

    Crop weed competition पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना, मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती, मनोबल यामध्ये वाढ होऊन आणखी उमेदीने नवनवीन अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास प्रोत्साहन मिळते.

    चंद्रपुरात फ्लाईंग क्लब होणार सुरू

    तसेच त्यांचे मार्गदर्शन परिसरातील इतर शेतकऱ्यांना होऊन राज्याच्या एकूण उत्पादनात मोलाची भर पडेल, हा उद्देश ठेवून राज्यांतर्गत पीकस्पर्धा योजना राबविण्यात येत आहे.

                रब्बी हंगाम 2024 मध्येही तालुका, जिल्हा व राज्य पातळीवर पीक स्पर्धा राबविण्यात येत आहेत. त्यानुसार कृषी विभागामार्फत रब्बी हंगाम सन 2024 मध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहु, हरभरा,  करडई व जवस या पाच पिकासाठी पिकस्पर्धेंचे आयोजन करण्यात येत आहे. Crop weed competition

    1) पीकस्पर्धेतील पीके :  रब्बी पीके – ज्वारी, गहू, हरभरा, करडई व जवस

    2) पात्रता निकष :  स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वत:च्या नावेजमीन असणे व ती जमीन तो स्वत: कसत असणे आवश्यक आहे. स्पर्धेत भाग घेणाऱ्या शेतकऱ्याला एकाच  वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. पिकस्पर्धेमध्ये सहभागी लाभार्थी स्वत:च्या शेतावर त्या पिकाखाली किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

    3) अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :  विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ ) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन 7/12, 8- अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास ) पिकस्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित 7/12  वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा Crop weed competition

    4) अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : रब्बी हंगामामध्ये पीकस्पर्धेचा अर्ज दाखल करण्याची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे.

    5) स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क  : पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये राहील व  आदिवासी गटासाठी 150 रुपये राहील.

    बक्षिसाचे स्वरुप : तालुका पातळीवर पहिले बक्षीस 5 हजार, दुसरे 3 हजार आणि तिसरे बक्षीस 2 हजार रुपये. जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस 10 हजार, दुसरे 7 हजार आणि तिसरे 5 हजार रुपये तर राज्य पातळीवर पहिले बक्षीस 50 हजार, दूसरे 40 हजार आणि तिसरे बक्षीस 30 हजार रुपये आाहे.

    येथे करा संपर्क : पीक स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी.

    उपरोक्त नमुद पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरीता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

  • Now flying club : आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवती यांचा वैमानिक होण्याचा मार्ग मोकळा

    Flying Club

    Flying club राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या चंद्रपूरच्या ‘फ्लाईंग क्लब’ने आता उड्डाण घेतले आहे.

    नक्षलग्रस्त व आदिवासी जिल्ह्यातील युवक-युवतींना वैमानिक होता यावे, यासाठी ना. श्री. मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून चंद्रपूर येथे फ्लाईंग क्लब स्थापन करण्यात येत आहे. त्यासाठी ना. श्री. सुधीर मुनगंटीवार दिल्लीमध्ये पाठपुरावा करत आहेत. महत्त्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन लवकरच या प्रकल्पाला गती मिळण्यासाठी त्यांनी पाऊल टाकले आहे. Flying club

    पहिल्या टप्प्यात 10 प्रशिक्षणार्थ्यांना येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ऑक्टोबर 2023 रोजी नागपूर फ्लाईंग क्लबच्या ‘सेस्ना – 172 आर’ या चार आसनी विमानाचे मोरवा विमातनळावर प्रात्यक्षिकसुध्दा घेण्यात आले. तसेच मोरवा येथे धावपट्टी, संरक्षण भिंत व इतर अनुषंगीक कामेसुध्दा करण्यात आली आहे.

    आता अंतिम टप्प्यात असलेल्या फ्लाईंग क्लबच्या कामाला गती मिळावी, तसेच लवकरात लवकर येथे वैमानिकाचे प्रशिक्षण सुरू व्हावे, यासाठी ना. मुनगंटीवार यांनी नुकतीच दिल्ली येथे ऐरो क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय उड्डाण मंत्री राजीव प्रताप रुडी यांच्याशी चर्चा केली.

    चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा होणार प्रभावित

    डीजीसीने काढलेल्या तांत्रिक मुद्द्यांची तातडीने पूर्तता करण्यासंदर्भात तसेच एरो क्लब ऑफ इंडिया यांनी नागपूर फ्लाईंग क्लबला लीजने दिलेल्या 2 विमानाची लीज वाढवून देण्यासंदर्भात राजीव प्रताप रुडी यांच्यासोबत मुंबई येथे बैठक घेण्यात येणार आहे. Flying club

    एखाद्या विद्यार्थ्याला वैमानिक होण्यासाठी 200 तास फ्लाईंग अवर्स पूर्ण करणे आवश्यक आहेत. मात्र नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे मोठ्या संख्येने होत असलेल्या विमानांच्या आवागमनामुळे वैमानिक प्रशिक्षणासाठी फ्लाईंग अवर्स पूर्ण होण्यास विलंब होतो. त्यामुळे नागपूर येथील फ्लाईंग क्लबसाठी पर्यायी ऑपरेशनल बेस म्हणून वेगळ्या धावपट्टीची गरज आहे.

    आता थेट रस्त्यावर उतरून संघर्ष करणार – वामनराव चटप

    याबाबत चंद्रपूरातील मोरवा विमानतळाचा पर्याय शोधण्यात आला असून विद्यार्थ्यांना वैमानिक प्रशिक्षणासाठी आवश्यक बाबींची मोरवा येथे  पूर्तता करण्यात येत आहे.

    याच अनुषंगाने ऑक्टोबर 2023 मध्ये मोरवा विमानतळ येथे विमानाची प्राथमिक चाचणी करण्यात आली होती. फ्लाईंग क्लब संदर्भात अनुषंगिक कामांच्या सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करण्यासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 10 जानेवारी 2024 रोजी मुंबई येथे बैठक घेतली होती. Flying club

    86 हजारांची कायमस्वरूपी नोकरी करायची आहे? तर आजच अर्ज करा

    मोरवा विमानतळावर ज्या तांत्रिक बाबींची पूर्तता अद्याप बाकी आहे, त्या अनुषंगाने महाराष्ट्र विमान प्राधिकरण, विभागीय आयुक्तालय, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद या यंत्रणांनी त्यांना सोपविलेली कामे वेळेत मार्गी लावावीत.

    भारतीय विमान प्राधिकरणाची ज्या बाबींना परवानगी आवश्यक आहे, ती मिळण्याबाबत तात्काळ पाठपुरावा करावा. तांत्रिक मान्यतेच्या अनुषंगाने ज्या बाबींची पूर्तता करण्याबाबत भारतीय विमान प्राधिकरणाने कळविले आहे, त्या बाबी पूर्ण कराव्यात, अशा सुचना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या होत्या.

  • Now Jatayu Conservation Project : ताडोब्यात 3 गिधाडांचा मृत्यू

    Jatayu Conservation Project

    Jatayu Conservation Project चंद्रपूर – 21 जानेवारी 2024 रोजी अयोध्या येथे प्रभु रामाच्या प्राणप्रतिष्ठेचे औचित्य साधून ताडोबा येथील बोटेझरी जंगलात राज्यातील जटायु संवर्धनाचा महत्वाचा प्रकल्प साकारण्यात आला होता.

    प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात पांढरी पाठ असणारे 10 जटायु पक्षी हरियाणा राज्यातील पिंजोर जिल्ह्यातून आले मात्र नोव्हेंबर महिन्यात 3 जटायू चा मृत्यू झाल्याने वनविभागात चांगलीच तारांबळ उडाली आहे. Jatayu Conservation Project

    86 हजारांची कायमस्वरूपी नोकरी हवी तर आजच करा अर्ज

    बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या पिंजोर (हरयाणा) येथील गिधाड प्रजनन व संशोधन केंद्रातून प्रथम टप्यात पांढऱ्या पाठीचे 10 गिधाड पक्षी रीतसर शासनाची परवानगी घेऊन ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोळसा परिक्षेत्रातील बोटेझरी भागात तयार केलेल्या प्रिरीलीज अव्हीयारी मध्ये संशोधकांच्या देखरेखित ठेवण्यात आले होते. साधारणत: 3 महिन्यानंतर त्यांना निसर्ग मुक्त करणार होते मात्र तसे काही झाले नाही. Jatayu Conservation Project

    चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी जंगलात सोडलेल्या 3 गिधाडांचा मृत्यू झाला आहे. याच वर्षीच्या जानेवारी महिन्यात हरियाणा राज्यातील पिंजोर येथून आणण्यात आलेल्या धोकाग्रस्त व नष्टप्राय होण्याच्या उंबरट्यावर असलेल्ल्या 10 गिधाडांना जिएसम ट्रॉन्समिशन ट्रकिंग डिव्हाईस लावून बोटेझरी येथे सोडण्यात आली होती. Jatayu Conservation Project

    वनविभागाने मृत गिधाडांचे अवशेष अधिक तपासणीसाठी पाठविले आहे. या गिधाडांची संख्या कमी झाल्याने निसर्गसाखळीतील संतुलन राखण्यासाठी या अद्यावत  तंत्रज्ञानाने  अभ्यासातून गिधाडांचे संवर्धन व संरक्षणासाठी उपाय-योजना निश्चित केल्या जाणार आहेत.  Jatayu Conservation Project

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामधील २१ जानेवारी २०२४ ला जटायु संवर्धन केद्राची निर्मिती करण्यात आली. या केंद्रामध्ये बिएनएसएस (BNHS) या संस्थेच्या पिंजोर येथील संशोधन केद्रातील धोकाग्रस्त व नष्टप्राय होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या १० पाढऱ्या पुठ्यांचे गिधाडे (White-rumped vulture) आणण्यात आले होते. त्यांना व्याघ्र प्रकल्पाच्या वनक्षेत्रात उभारण्यात आलेल्या प्री-रिलीज एवेयरीमध्ये (Pre-realise Aviary) तज्ञांच्या देखरेखित ठेवण्यात आले होते.

    या सर्व गिधाडांना प्रथम या वनक्षेत्रातील वातावरणाची सवय व्हावी या हेतून प्री-रिलीज  एवेयरीमध्ये ठेवण्यात आले. या गिधाडांचा मागील ६ महिन्याचा दैनदिन व शुक्ष्म अभ्यास बिएनएसएस (BNHS) संस्थेच्या वैज्ञानिकांनी केला. या सर्व गिधाडांना निसर्ग मुक्त करणे आवश्यक होते.

    त्यामुळे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई या संस्थेच्या वरिष्ठ वैज्ञानीकांनी सर्व १० गिधाडांना जिएसम ट्रॉन्समिशन ट्रकिंग डिव्हाईस (GSM Transmission Tracking Device) लावले. सदर डिव्हाईस युरोपमधून आयात करण्यात आली होती. Jatayu Conservation Project

    सदर जिपीएस लावल्यानंतर काही दिवसांच्या निरीक्षणानंतर या गिधाडांना निसर्गमुक्त करून या तंत्रज्ञानामुळे या पक्ष्यांचे रोजचा दैनदिन हालचालीची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

    तसेच या अभ्यासातून गिधाड संवर्धन व संरक्षणासाठी उपाय-योजना निश्चित केल्या जाणार असल्याने 21 जानेवारी 2024 ला ताडोबातील बोटेझरी जंगलात 10‍ गिधांडाना सोडण्यात आले. त्यैकी 3 गिधाडांचा मृत्यू झाला आहे. ही घटना आज गुरूवारी उजेडात आली आहे.

    वनविभागाने मृत गिधाडांचे शव एकत्रित करून शवविच्छेदनासाठी नागपुरात प्रयोगशाळेत पाठविले आहेत. ही सर्व गिधाडे पांढ-या पाठीच्या प्रजातीची होती.  निसर्गातील स्वछतादूत गिधाडांची संख्या कमी झाली होती. निसर्गसाखळीतील संतुलन राखण्यासाठी हा प्रयोग करण्यात आला होता.

    उद्देश काय होता?

    जटायु (गिधाड) हा निसर्गातील सफाई कामगार म्हणून ओळखला जातो. गावाच्या वेशीवर टाकल्या जाणा-या मृत प्राण्यांना खाऊन गिधाड निसर्ग स्वच्छ ठेवत असे. भारतात जटायुच्या 9 प्रजाती आढळतात. सन 1990 मध्ये गिधाडांची संख्या चार कोटी होती पण, आता ती संख्या कमी होऊन केवळ 50 हजारांवर आली आहे. जटायु प्रजाती नष्ट होण्यास डाईक्लोफिनेक नावाचे रसायन कारणीभूत असल्याचे संशोधनाअंती सिध्द झाले आहे. पाळीव गुरांना देण्यात येत असलेल्या औषधामध्ये या रसायनाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात होता. मृत झालेल्या देहातून या रसायनाला बाहेर टाकण्यास खूप वेळ लागतो. जटायु या प्राण्यांचे भक्षण करतात. अशा प्रकारे डाईक्लोफिनेक रसायन जटायुंच्या शरीरात जाते आणि परिणामी जटायु मरण पावतात. जटायुची संख्या कमी होणे जैवविविधता व निसर्ग चक्रालाघातक आहे.

  • Child marriage free district : भविष्यात आपल्या जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही : विवेक जॉन्सन

    Child marriage free district आपल्या देशात बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे. जिल्ह्यातील बालविवाह प्रतिबंधासाठी जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. भविष्यात आपल्या जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही, असा संकल्प करणे गरजेचे आहे.

    Child marriage free district यात नवीन पिढीचे आणि विद्यार्थ्यांचे योगदान आवश्यक आहे. नवीन पिढीच ही परिस्थिती बदलवू शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सहकार्यातून आपला जिल्हा 100 टक्के बालविवाह मुक्त करू, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी व्यक्त केला.

    भारतीय ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरद्वारा संचालित भवानजीभाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे बालविवाह मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते.

    यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बासरकर, बाल न्याय मंडळाच्या सदस्या भावना देशमुख, रुदय संस्थेचे संचालक काशिनाथ देवगडे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर आदी उपस्थित होते.

    मतदानाचा सेल्फी काढला आणि नशीबच चमकलं

    जिल्हा महिला व बाल विकास विभाग चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात बाल संरक्षण कक्ष व असेस्ट टु जस्टिस फॉर चिल्ड्रन प्रकल्प या संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. Child marriage free district

    पुढे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन म्हणाले, बालविवाहाचे प्रमाण शहरी भागात कमी असून ग्रामीण भागात जास्त असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे जास्तीत जास्त जनजागृती करून बालविवाह प्रतिबंधासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. मुख्य मार्गदर्शक सुमित जोशी यांनी बालविवाहाचे भारतातील वय व त्यासंदर्भात असलेल्या कायद्यांबाबत माहिती दिली.   Child marriage free district

    When taking an oath
    शपथ घेताना विद्यार्थी

    यावेळी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या हेतूने बालविवाह रोखण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रतिज्ञा देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी बालविवाह मुक्त भारत पथसंचालन करून रॅली काढली. रॅलीची  सांगता शाळेच्या पटांगणात करण्यात आली. Child marriage free district

    awareness rally
    विद्यार्थ्यांनी काढली जनजागृती रॅली

    कार्यक्रमाचे संचालन प्रा. राजेश बारसागडे यांनी तर आभार शशिकांत मोकाशे यांनी मानले. कार्यक्रमाला परिविक्षा अधिकारी दिवाकर महाकाळकर, मोरेश्वर झोडे, सहायक पोलिस निरीक्षक अश्विनी वाकडे, गीता चौधरी, शाळेचे प्राचार्य  सी.डी. तन्नीरवार, उपमुख्याध्यापक जे.एम टोंगे, पर्यवेक्षक श्रीमती मुप्पिडवार, डी. एल कुरेकार यांच्यासह शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Voting selfie contest : मतदानाचा सेल्फी काढला आणि नशीबचं चमकलं

    Voting selfie contest लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वीप उपक्रमांतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

    Voting selfie contest यात प्रामुख्याने मतदान केल्यानंतर सेल्फी अपलोड करण्याच्या स्पर्धेत 8080 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला. लकी ड्रॉ द्वारे या स्पर्धेचा निकाल जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे यांच्या उपस्थितीत आज (दि. 27) घोषित करण्यात आला.

    चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाची निराशाजनक वाटचाल

    लकी ड्रॉ द्वारे काढण्यात आलेल्या या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस (बुलेट मोटारसायकल) ब्रम्हपूरी तालुक्यातील शंकर धर्मा भर्रे यांना, द्वितीय क्रमांकाचे बक्षीस (15 ग्रॅम सोन्याचे नाणे) सिंदेवाही तालुक्यातील सोनल श्यामराव गभने व तृतीय क्रमांकाचे बक्षीस (मोबाईल फोन) चिमुर तालुक्यातील गितेश मदनकर यांना घोषित करण्यात आले.

    Chandrapur conteste
    विजेत्यांची नावे जाहीर करताना जिल्हाधिकारी गौडा

    जिल्ह्यातील मतदारांमध्ये मतदानाप्रती जनजागृती होऊन मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वीप उपक्रमांतर्गत सायकल रॅली, निबंध स्पर्धा,  प्रश्नमंजुषा,  टॅगलाईन, रिल्स तयार करणे, सेल्फी अपलोड करणे इ. स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

  • best adoption process : पालकत्व मिळण्याकरीता तीन प्रकारे पालक बनण्याची संधी उपलब्ध

    adoption process चंद्रपूर : ज्यांना नैसर्गिक पालकत्वापासून वंचित राहावे लागते, अशा नागरिकांसाठी आता शासनाने सुवर्ण संधी उपलब्ध करून दिली आहे.

    adoption process पालकत्व मिळण्याकरीता तीन प्रकारे पालक बनण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून अधिक माहितीकरीता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशी आहे प्रक्रिया.

    1) अनाथ बालक दत्तक घेणे  : यामध्ये अनाथ, परित्याग केलेले आणि सोडून दिलेल्या  बालकांचा समावेश होतो. अशा बालकाचे संरक्षण, जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि चाइल्ड हेल्पलाईनच्या माध्यमातून केले जाते. अशा बालकाचे संरक्षण, पालन पोषणकरिता किलबिल दत्तक योजना संस्था कार्यरत असून बालकल्याण समिती, चंद्रपूर, यांच्या आदेशाने दाखल करण्यात येते. यानंतर सदर बालकांना, बालकल्याण समिती चंद्रपूर द्वारे दत्तक मुक्त केले जाते. दत्तक इच्छुक पालक CARA (Central Adoption Resource Authority)  cara.wcd.gov.in या संकेत स्थळावर जाऊन पोर्टलवर नोंदणी करून बालक दत्तक घेऊ शकतात. adoption process

    चंद्रपुरात पुन्हा देशी कट्टा जप्त

    2) नात्याअंतर्गत (रक्तातील नाती )/सावत्र दत्तक : बाल न्याय बालकांची काळजी आणि संरक्षण अधिनियम 2015  चे कलम  2(52)  नुसार दत्तक जाणाऱ्या मुलाचे काका- काकू, मामा- मामी, मावसा -मावशी, आजी – आजोबा (आईकडील / वडीलांकडील) हे नात्यांतर्गत दत्तक  घेण्यास पात्र असतात. सावत्र दत्तक यामध्ये पती/ पत्नीमध्ये घटस्फोट झाल्यास, तसेच पती /पत्नी यापैकी एकाचे  मृत्यू झाल्यास, सदर व्यक्ती दुसरे  लग्न  करत असल्यास व त्याचे मुल/ मुली असतील, त्या मुलांना लग्न झालेल्या व्यक्तीचे नाव जोडण्याकरीता सावत्र दत्तक केल्या जाते. अशा दत्तक इच्छुक पालकांनी CARA (Central Adoption Resource Authority)  यांचे cara.wcd.gov.in या संकेत स्थळावर जाऊन cara पोर्टलवर नोंदणी करून बालक दत्तक घेऊ शकतात.

     3)  प्रतिपालकत्व दत्तक घेणे : काळजी आणि संरक्षणाची गरज असणारी बालके बालकल्याण समिती चंद्रपुर यांच्या आदेशान्वये बालगृहात दाखल होतात. अशा बालकांना त्यांचे पालक बालकांचे पालन पोषण करण्यास असमर्थ ठरविले जाते. किंवा बालकांना 6 महिन्यापासून  भेटायला आले नाही, अशा बालकांना बाल कल्याण समिती द्वारे प्रतिपालकत्व तत्वावर पालन पोषण करण्यास असमर्थ ठरविले जाते. किंवा इच्छुक पालकांना बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी व  कुटुंबाचे प्रेम मिळण्यासाठी दत्तक देण्यास येते. यासाठी इच्छुक पालकांनी https://fcdcommpune.com/admin  या संकेत स्थळावर जाऊन नोंदणी करावी. adoption process

    यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समिती SFCAC (Sponcership and Fostercare ApprovalCommittee) द्वारे पात्र ठरविल्यानंतर बालकल्याण समिती मार्फत बालकाचा ताबा देान वर्षकरीता पालन पोषण करण्यासाठी पात्र कुटुंबाकडे देण्यात येतो. बालकाचे नाव / आडनाव बदलण्याचा अधिकार पात्र कुटुंबाला राहत नाही व दोन वर्षानंतर बालक जर त्या कुटुंबात रुळले तर अशा बालकाला दत्तक घेण्याची प्रक्रिया पालक  कोर्टामार्फत करु शकतो. adoption process

    दत्तक प्रक्रिया जाणून घेणे व दत्तक प्रक्रियेकरिता नोंदणी विषयी जाणून घेण्याकरीता जिल्हा महिला व बालविकास अधिकारी  कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाला  भेट देण्याचे आवाहन जिल्हा महिला व बालाविकास अधिकारी दीपक बानाईत आणि जिल्हा  बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी केले आहे.

  • vidhan sabha winner : चंद्रपुर जिल्ह्यात या उमेदवाराने रचला इतिहास

    vidhan sabha winner 23 नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली, चंद्रपूर जिल्ह्यातील 6 विधानसभा पैकी भाजपने 5 जागा जिंकत आपले वर्चस्व सिद्ध केले, विजय वडेट्टीवार यांनी कांग्रेसची जिल्ह्यात लाज राखत ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात विजय मिळविला.


    vidhan sabha winner चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात भाजपचे किशोर जोरगेवार यांनी कांग्रेस उमेदवार प्रवीण पडवेकर यांचा 22 हजार 804 मतांनी पराभव केला, जोरगेवार यांना एकूण 1 लाख 6 हजार 841 मते मिळाली तर कांग्रेसचे पडवेकर यांना 84 हजार 47 मते मिळाली.

    प्रवीण काकडे यांच्या पराभवानंतर खासदार धानोरकर यांची प्रतिक्रिया काय?


    आधी भाजप, मग कांग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व पुन्हा भाजप प्रवास असा दलबदलू चा ठपका विरोधी पक्षाने लावल्यावर सुद्धा जोरगेवार यांच्या विरुद्ध कांग्रेस पक्षाने सक्षम उमेदवार दिला नाही. विशेष म्हणजे 200 युनिट चा मुद्दा ही कांग्रेस कॅच करू शकली नाही. vidhan sabha winner

    Kishor jorgewar rally
    किशोर जोरगेवार यांची विजयी रॅली

    या निवडणुकीत भाजप चे ब्रिजभूषण पाझारे यांनी तिकीट न मिळाल्याने बंडखोरी केली, भाजपने निवडणुकीत अपक्ष उमेदवार पाझारे यांची छुपी मदत केली, हा बंड नाही उठाव म्हणत पाझारे यांनी रडगाणं केलं, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही, प्रचार दरम्यान सामान्य जनतेकडे न जाता त्यांनी भाजप पक्षातील पदाधिकारी यांच्याकडे जाणं पसंत केल्याने जनतेने त्यांना सपेशल नाकारले.


    वर्ष 2019 च्या निवडणुकीत जोरगेवार हे अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेच्या रिंगणात होते त्यावेळी त्यांना 1 लाख 17 हजार 570 मते मिळाली होती, यंदा जोरगेवार यांची लीड कमी झाली. vidhan sabha winner

    बल्लारपूर विधानसभा

    बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून सातव्यांदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांनी कांग्रेसचे संतोष रावत यांचा 25 हजार 985 मतांनी पराभव केला.

    Sudhir mungantiwar rally
    सुधीर मुनगंटीवार यांची विजयी रॅली


    मुनगंटीवार यांना 1 लाख 5 हजार 969 मते तर रावत यांना 79 हजार 984 मते मिळाली. 3 वेळा मुनगंटीवार हे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले असले तरी त्यांनी सलग 7 वेळा विधानसभा निवडणूक जिंकत त्यांनी विदर्भात इतिहास रचला हे विशेष. vidhan sabha winner

    राजुरा विधानसभा

    राजुरा विधानसभा क्षेत्रात भाजपचे देवराव भोंगळे यांनी कांग्रेस आमदार व जिल्हा कांग्रेस अध्यक्ष सुभाष धोटे यांचा 3 हजार 54 मतांनी पराभव केला.
    भोंगळे यांना 72 हजार 882 मते तर कांग्रेसचे सुभाष धोटे यांना 69 हजार 828 मते मिळाली.


    भोंगळे हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष होते, ते मूळचे घुग्गुस शहरातील निवासी असून त्यांनी राजुरा विधानसभा निवडणुकीत सहभाग घेत विजय मिळविला, मतदानाच्या पूर्वी त्यांच्या कार्यकर्त्याच्या घरून 60 लाखांची रोकड जप्त करण्यात आली होती. vidhan sabha winner

    चिमूर विधानसभा

    चिमूर विधानसभा क्षेत्रातून भाजपचे किर्तीकुमार उर्फ बंटी भांगडीया यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळविला.
    भांगडीया यांना 1 लाख 16 हजार 495 मते तर कांग्रेसचे सतीश वारजूरकर यांना 1 लाख 6 हजार 642 मते मिळाली, भांगडीया यांनी 9 हजार 853 मतांनी वारजूरकर यांचा पराभव केला. vidhan sabha winner

    भांगडीया यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी सभा घेतली होती तर वारजूरकर यांच्यासाठी कांग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी सभा घेतली मात्र चिमूर क्षेत्रातील जनतेने गांधी यांना नाकारले.

    वरोरा विधानसभा

    वरोरा विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा भाजपचा आमदार निवडून आला, वरोरा विधानसभा मतदारसंघ हा कांग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदारसंघ होता, दिवंगत बाळू धानोरकर यांनी शिवसेनेतून निवडणूक लढवीत वरोरा विधानसभा जिंकली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर कांग्रेस पक्षातून निवडून आल्या. vidhan sabha winner

    आजारपणाने बाळू धानोरकर यांचं निधन झालं आणि खासदार पदी प्रतिभा धानोरकर निवडून आल्या, चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात खासदार धानोरकर यांना 2 लाख 60 हजारांची आघाडी घेतली, वरोऱ्याची जागा कांग्रेसकडे व आपल्या घरी रहावी यासाठी धानोरकर यांनी पक्षातून अनेकांचा विरोध पत्कारीत सख्खा भाऊ प्रवीण काकडे यांना उमेदवारी दिली, मात्र जनतेने काकडे यांना नाकारले.


    माजी मंत्री संजय देवतळे यांचे सुपुत्र करन देवतळे यांनी 15 हजार 450 मतांनी शिवसेना उबाठा चे बंडखोर अपक्ष उमेदवार मुकेश जीवतोडे यांचा पराभव केला.
    देवतळे यांना 65 हजार 170 मते तर अपक्ष उमेदवार जीवतोडे यांना 49 हजार 720 मते व कांग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांना 25 हजार 48 मते घेत तिसरे स्थान मिळाले, या निवडणुकीत कांग्रेस पक्षाचा लाजिरवाणा पराभव झाला.

    ब्रह्मपुरी विधानसभा

    ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात कांग्रेसचे दिग्गज नेते विजय वडेट्टीवार यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवीत कांग्रेस पक्षाची जिल्ह्यात लाज राखली.


    विजय वडेट्टीवार यांना एकूण 1 लाख 12 हजार 377 मते मिळाली तर भाजपचे कृष्णा सहारे यांना 98 हजार 289 मते मिळाली, वडेट्टीवार यांनी सहारे यांचा 14 हजार 88 मतांनी पराभव केला.

    Vijay wadettiwar rally
    विजय वडेट्टीवार यांची विजयी रॅली

    चंद्रपूर जिल्ह्यात 6 पैकी 5 जागा भाजपच्या वाट्याला तर 1 जागा कांग्रेस पक्षाला मिळाली, लोकसभा निवडणुकीनंतर कांग्रेस पक्ष अति आत्मविश्वासात होता, आपलं जिल्ह्यात वर्चस्व राहावं यासाठी मित्र पक्षांना त्यांनी एकही जागा दिली नाही.

    6 पैकी 3 जागेवर क्षमता नसलेले उमेदवार उभे केले, विशेष म्हणजे जिल्ह्यात धानोरकर-वडेट्टीवार यांचा संघर्ष बघता अनेक इच्छुकांना उमेदवारी मिळू शकली नाही.
    भाजपने लोकसभा निवडणुकीत मिळालेला पराभवाची कारणे शोधली आणि त्यावर संघटन शक्तीच्या आधारावर मात केली.


    राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बहिणीच्या मनात जागा मिळविली, ही योजना चंद्रपूर जिल्ह्यात गेमचेंजर ठरली.
    कांग्रेसला त्यांचा आत्मविश्वास या निवडणुकीत घेऊन बुडाला तर भाजपने गनिमी कावा करीत निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध केले.

  • Counting of votes : ठरलं तर…चंद्रपूर विधानसभेच्या होणार 28 फेऱ्या

    Counting of votes येत्या शनिवारी दि. 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मतमोजणी होणार आहे.

    Counting of votes या मतमोजणीकरीता जिल्हा प्रशासनासह संबंधित विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण यंत्रणा सज्ज असून याबाबत कर्मचा-यांचे प्रशिक्षणसुध्दा घेण्यात आले.

    चंद्रपूर विधानसभेतील चर्चेतला आमदार

    महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. उद्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

    याकरीता संबंधित विधानसभा मतदारसंघात तयारी झाली आहे. यात चंद्रपूर मध्ये मतमोजणीचे सर्वाधिक 28 फे-या तर बल्लारपूरमध्ये 27 फे-या होणार आहेत. Counting of votes

    Chandrapur District Administration
    चंद्रपूर यंत्रणा सज्ज

                विधानसभानिहाय टेबल आणि राऊंडची संख्या : 70 – राजुरा विधानसभा मतदारसंघात मतमोजणीकरीता एकूण 14 ईव्हीएम टेबल, 25 फे-या आणि  10 पोस्टल बॅलेट टेबल राहणार आहे.  71 – चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 28 फे-या आणि  10 पोस्टल बॅलेट टेबल, 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 27 फे-या आणि  7 पोस्टल बॅलेट टेबल, 73 – ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 23 फे-या आणि  10 पोस्टल बॅलेट टेबल, 74 – चिमूर विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 23 फे-या आणि  6 पोस्टल बॅलेट टेबल, तर 75 – वरोरा विधानसभा मतदारसंघात मतमोजणी करीता 14 ईव्हीएम टेबल, 25 फे-या आणि  10 पोस्टल बॅलेट टेबल राहणार आहेत.  Counting of votes

    चंद्रपुरातील हा मार्ग राहणार बंद

                या ठिकाणी होणार मतमोजणी : राजुरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, राजुरा येथे,  चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे, बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत मुल येथे, ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन, नागभीड रोड, ब्रम्हपूरी येथे, चिमूर  विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी राजीव गांधी सभागृह, उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर चिमूर येथे आणि वरोरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती, गोडावून क्रमांक 2 मोहबाळा रोड वरोरा येथे होणार आहे.

    Employee training
    कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

    कर्मचा-यांचे प्रशिक्षण : मतमोजणी संदर्भात तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे उजळणी प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी चंद्रपूरचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संजय पवार, सहायक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विजय पवार, सीमा गजभिये व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार सचिन खंडाळे यांनी सादरीकरणातून उपस्थितांना प्रशिक्षण दिले.