Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Dr Kalpana Gulwade : डॉ. कल्पना गुलवाडे यांचा सन्मान

    Dr Kalpana Gulwade इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या “बेस्ट सेक्रेटरी” म्हणजेच उत्कृष्ट सचिव या प्रतिष्ठित पुरस्काराने चंद्रपूरच्या डॉ. कल्पना गुलवाडे यांचा गौरव करण्यात आला.

    पोस्टल बॅलेट मुळे शिक्षक व कर्मचारी मतदानापासून वंचित

    Dr Kalpana Gulwade डॉ. कल्पना गुलवाडे या अतिशय होतकरू आणि कर्तव्यनिष्ठ कार्यकर्त्या असून, त्यांच्या या योगदानाची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला आहे.

    IMA महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. संतोष कदम आणि सचिव डॉ. अनिल आव्हाड यांच्या उपस्थितीत डॉ. कल्पना गुलवाडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

    या पुरस्कार सोहळ्यात डॉ. मंगेश गुलवाडे, आयएमए महाराष्ट्रचे माजी उपाध्यक्ष, तसेच आयएमए चंद्रपूरचे अध्यक्ष डॉ. संजय घाटे, सचिव डॉ. प्रवीण पंत, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

    हे आहे चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे नवे आमदार

    या यशस्वी कार्यप्रदर्शनाबद्दल डॉ. कल्पना गुलवाडे यांचे डॉ. संजय घाटे, डॉ. प्रवीण पंत, डॉ. कीर्ती साने, डॉ. अपर्णा देवळीकर, डॉ. मनीषा घाटे आणि डॉ. अप्रतिम दीक्षित यांनी अभिनंदन केले.

    चंद्रपूर जिल्ह्यासाठी हा अभिमानाचा क्षण असून, या सन्मानाने वैद्यकीय क्षेत्रात महिला डॉक्टरांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

  • Trending Now Postal ballot : धक्कादायक, हे कर्मचारी पोस्टल बॅलेटमुळे मतदानापासून वंचित

    Postal ballot चंद्रपूर : राज्यात विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया २० रोजी पार पडली. या निवडणुकीत मतदानाचा टक्‍का देखील मोठ्या प्रमाणात वाढला.

    Postal ballot यासाठी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. मात्र, निवडणूक कर्तव्यावर असलेल्या राज्‍यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना पोस्टल बॅलेट मिळाले नसल्याने त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

    चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात नागरिकांच्या चर्चेत हा आमदार

    या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्‍याचे मुख्य निवडणूक अधिकारी व मुख्य सचिव (म.रा.) यांच्याकडे केली आहे. Postal ballot

    विधानसभा निवडणूक व्यवस्थित पार पाडण्यासाठी राज्‍यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसह विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. यासाठी त्यांना प्रशिक्षणसुद्धा देण्यात आले होते. पहिल्या प्रशिक्षणाच्या वेळी पोस्टल बॅलेटसाठी त्यांच्याकडून फॉर्म नंबर १२ भरून घेण्यात आला होता.

    त्यासोबत मतदान कार्डची झेरॉक्ससुद्धा घेण्यात आली होती. परंतु, फॉर्म नंबर १२ भरूनही राज्‍यातील निवडणुकीसाठी कर्तव्यावर असणाऱ्या अनेक शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व बी.एल.ओ. यांना अद्यापही पोस्टल बॅलेट मिळाले नसल्याने राज्‍यातील अनेक कर्मचारी मतदानापासून वंचित राहिले आहे. Postal ballot

    “निवडणूक कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क मिळालाच पाहिजे. त्यांना पोस्टल बॅलेट न मिळाल्याने त्यांचा हक्क नाकारला गेला आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे.”

    काही शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी याबाबत आपली नाराजी आमदार अडबाले यांच्याकडे व्यक्त केली. निवडणूक प्रक्रियेत ते स्वतः योगदान देत असतानाही त्यांचा मतदानाचा हक्क नाकारला गेला.

    अनेकांनी वेळेत अर्ज सादर करूनही पोस्टल बॅलेट मिळाले नसल्याचा आरोप केला आहे. यावर आमदार अडबाले यांनी या तक्रारींची दखल घेऊन शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जाणीवपूर्वक मतदानापासून वंचित ठेवण्यात येत असल्‍याचा आरोप केला आहे.

    त्‍यामुळे या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्‍याचे मुख्य निवडणूक अधिकारी व मुख्य सचिव (म.रा.) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

  • Polling Center Restrictions : मतमोजणी केंद्र परिसरात निर्बंध लागू

    Polling Center Restrictions येत्या शनिवारी दि. 23 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे यथायोग्य पालन होण्याचे दृष्टीने तसेच आचारसंहिता अंमलात असेपर्यंतच्या कालावधीकरीता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये निर्बंध लागू करण्यात आले असून मतमोजणी केंद्राच्या 100 मीटर परिसरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

    Polling Center Restrictions सदर आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी यांनी निर्गमित केले आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत कुणाची आघाडी?

    त्यामुळे मतमोजणी केंद्राच्या परीसरात 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजेपासून ते मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खालील बाबी करण्यास मनाई करण्यात आली आहे. Polling Center Restrictions

    1. मतमोजणीची प्रक्रिया होत असलेल्या ठिकाणापासून बाहेरील 100 मीटर परीसरात सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध असेल. तसेच मतमोजणी केंद्राचे बाहेरील 100 मीटर परीसरातील सर्व दुकाने /आस्थापना/व्यवसाय केंद्र बंद राहतील.
    2. 2. मतमेाजणी केंद्राचे परीसरात मतमोजणी कामावर नेमणुक झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकरीता वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली असून, मतमोजणी करीता नियुक्ती झालेल्या अधिकरी व कर्मचारी यांची वाहने, पोलिस विभाग, विदयुत विभाग, अग्निशमन विभाग व सुरक्षा व्यवस्थेकरीता असलेली वाहने यांनाच प्रवेश राहील. इतर सर्व प्रकारच्या वाहनांस प्रतिबंध असेल.
    3. भारत निवडणुक आयोगाचे वतीने वितरीत केलेल्या अधिकृत ओळखपत्राशिवाय इतर व्यक्तिंना मतमोजणी परिसरात प्रवेश प्रतिबंधीत असेल. मतमोजणीचे दिवशी मतमोजणी केंद्राच्या बाहेरील 100 परीसरात 2 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती समुहास जमा होण्यास प्रतिबंध असेल. उमेदवार व पत्रकार यांना ठरवून दिलेल्या बैठक व्यवस्थेच्या ठिकाणी आवश्यकतेप्रमाणे संपर्क साधण्यासाठी मोबाईल फोनचा वापर करता येईल, परंतू प्रत्यक्ष मतमोजणी कक्षात मोबाईल फोन वा कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅजेट नेण्यास/ वापरण्यास प्रतिबंध असेल. Polling Center Restrictions
    4. मतमोजणी केंद्राच्या परिसरात सभोवताल 1 कि.मी.चे क्षेत्रात/ परीसरात ड्रोन वा ड्रोन सदृश्य वस्तु उडविण्यास 23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6 वाजतापासून मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत प्रतिबंध असेल, असे जिल्हाधिका-यांच्या आदेशात नमुद आहे.

    या ठिकाणी होणार मतमोजणी : 70- राजुरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय, राजुरा येथे, 71- चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी तहसील कार्यालय, चंद्रपूर येथे, 72 – बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत मुल येथे, 73 – ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन, नागभीड रोड, ब्रम्हपूरी येथे, 74- चिमूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी राजीव गांधी सभागृह, उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर चिमूर येथे आणि 75-वरोरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती, गोडावून क्रमांक 2 मोहबाळा रोड वरोरा येथे होणार आहे.

  • Latest Total voting percentage : मतदानाची टक्केवारी वाढली, चंद्रपूर जिल्ह्यात कुणाची आघाडी?

    Total voting percentage चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले, ग्रामीण भागातील जनतेने यंदा लोकशाहीच्या या उत्सवात मोठ्या संख्येत सहभाग घेतला पण शहरी भागातील जनता निरुत्साही निघाली.

    Total voting percentage जिल्ह्यात एकूण 71.27 टक्के मतदान झाले, असले तरी विधानसभा क्षेत्रात बाजी कोण मारणार हे अद्यापही स्पष्ट झाले नसले तरी नागरिक गल्ली बोळात कोण जिंकून येणार याची चर्चा करताना दिसून येत आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात ईव्हीएम मशीनची तोडफोड

    वर्ष 2019 च्या तुलनेत यावर्षी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. वर्ष 2019 मध्ये चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात 51.42 टक्के, बल्लारपूर – 62.53, राजुरा – 71.02, ब्रह्मपुरी – 71.53, चिमूर – 75.01 तर वरोरा विधानसभा मतदारसंघात एकूण 62.68 टक्के मतदान झाले होते. Total voting percentage

    वर्ष 2024 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर विधानसभा मतदार संघात 57.98 (6.50 टक्के वाढ), ब्रह्मपुरी – 80.54 (9 टक्के), बल्लारपूर – 69.70 (7 टक्के), चिमूर – 81.75 (6.74 टक्के), राजुरा 72.71 (1.50 टक्के), वरोरा मतदारसंघात 69.48 (7 टक्के) मतदानात वाढ झाली आहे.

    ग्रामीण भागातील नागरिकांनी भरघोस मतदान केले तर चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील नागरिक लोकशाहीच्या उत्सवात कमी प्रमाणात सहभागी झाले.

    विजय कुणाचा?

    राजुरा विधानसभा मतदारसंघात वामनराव चटप यांचे नाव आघाडीवर तर बल्लारपूर – सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूर – किशोर जोरगेवार, चिमूर – सतीश वारजूरकर, वरोरा – अपक्ष/भाजप, ब्रह्मपुरी मतदारसंघात विजय वडेट्टीवार यांचं नाव आघाडीवर आहे.

  • electronic voting machine : संविधान बचाव चा नारा देत महिलेचा ईव्हीएम मशीनवर धावा

    electronic voting machine चंद्रपूर जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत दिवसभरात काही ठिकाणी कांग्रेस-भाजप कार्यकर्ते यांचा वाद बघायला मिळाला.

    electronic voting machine वरोरा विधानसभा क्षेत्रातील भद्रावती येथे एका महिलेने थेट ईव्हीएम मशीनच आदळली, या घटनेमुळे उपस्थित मतदान केंद्र अधिकारी यांची तारांबळ उडाली.

    ग्रामीण भागातील जनता हुशार, शहरी भागातील जनता मतदानात निरुत्साही

    सदर कृत्य करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले, विशेष म्हणजे संविधान बचाव, ईव्हीएम मशीन हटाव असा नारा त्या महिलेने यावेळी दिला.

    वरोरा – भद्रावती विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीदरम्यान भद्रावती येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान टाकण्यासाठी गेलेल्या एका राजकीय पक्षाची महिलेने संविधान बचाव चा नारा देत थेट ईव्हीएम मशीनवर धावा बोलला. electronic voting machine


    लता मंसराम शिंगाडे वय ६५ वर्षे राहणार सुरक्षा नगर भद्रावती असे त्या महिलेचे नाव आह . ही महिला बहुजन मुक्ती पार्टीची कार्यकर्ता आहे. ही महिला दुपारी ३.३० वाजताच्या दरम्यान मतदान करण्यासाठी जिल्हा परिषद शाळेच्या बूथ क्रमांक ३०९ गेली असता तिथे मतदान करते वेळी ईव्हीएम मशीन उचलून जोराने त्या टेबलावर आदळली आणि ईव्हीएम हटाव संविधान बचाव अशी नारेबाजी करत तिने बॅलेट पेपरवर मतदान घ्या अशा घोषणा करत होती.

    ही घटना होताच येथील मतदान केंद्रावरील अधिकारी तसेच सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात घेतले या घटनेने येथे अर्धा तास मतदान केंद्राची प्रक्रिया थांबली होती पोलिसांनी लता शिंगाडे या महिलेवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे पुढील तपास ठाणेदार अमोल काचोरे करीत आहे.

  • violation code of conduct : चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचे महत्वाचे आवाहन

    violation code of conduct महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीचा जाहीर प्रचार 18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता संपला आहे. त्यानंतरचे 48 तास हे शांतता झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.

    violation code of conduct या कालावधीत आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्यास याबाबत त्वरीत तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

    बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेसाठी मतदान होणार आहे. जाहीर प्रचार संपल्यानंतर 48 तासांच्या कालावधीत कोणताही जाहीर प्रचार करता येत नाही.

    बल्लारपूर राजकीय राडा, दोन उमेदवारांवर गुन्हे दाखल

    त्यामुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनाची कुठलीही बाब आढळल्यास नागरिकांनी त्वरित सी-व्हीजील ॲप वर तक्रार करावी किंवा 1950 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा.

    जिल्हा प्रशासनाकडून याबाबत दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी सर्व नागरिकांना केले आहे.

  • New awards Take a selfie : सेल्फी काढा आणि जिंका आकर्षक बक्षिसे

    Take a selfie लोकशाही प्रक्रियेमध्ये 18 वर्षांवरील नागरिकाला मतदान करण्याचा अधिकार मिळाला आहे. या अधिकाराचा प्रत्येकाने वापर करून लोकशाहीच्या बळकटीकरणसाठी तसेच देशाचे भविष्य उज्वल करण्यासाठी हातभार लावणे अपेक्षित आहे.

    Take a selfie जास्तीत जास्त मतदारांनी या लोकशाही प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने मतदारांसाठी आकर्षक बक्षीस योजना जाहीर केली आहे. यात एनफिल्ड बुलेट, सोन्याचे नाणे आणि मोबाईल ही बक्षीसे तुम्ही जिंकू शकता, त्याकरीता बस, मतदान करून आपला सेल्फी फोटो अपलोड करायचा आहे. 

    प्रतिभा धानोरकर मध्ये दिसली दिवंगत खासदार बाळूभाऊ ची झलक

    20 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुकीकरीता मतदान होणार आहे. यात मतदारांनो तुमचे मत द्या आणि लकी ड्रॉमध्ये आकर्षक बक्षिसे जिंकण्याच्या संधीचा फायदा घ्या, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. लकी ड्रॉद्वारे काढण्यात येणा-या पहिल्या क्रमांकाचे बक्षीस आहे 2.15 लाखांची  रॉयल एनफिल्ड बुलेट (प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा आणि विमा खर्च समाविष्ट). सदर बाईक सध्या विसापूर येथील अटलबिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डनमध्ये प्रदर्शित करण्यात आली आहे. इतर बक्षिसांमध्ये 15 ग्राम सोन्याचे नाणे, आणि एस-23, फाईव्ह जी सॅमसंग गॅलक्सी फोनचा समावेश आाहे. Take a selfie

    अशी आहे पात्रता : 1) चंद्रपूर जिल्ह्यातील नोंदणीकृत मतदार असणे आवश्यक. 2) 20 नोव्हेंबर 2024 रोजी यशस्वीरित्या मतदान करणे आवश्यक.

    सहभागी होण्यासाठी : इच्छुक मतदारांनी मतदानाच्या दिवशी सेल्फी घ्यावा आणि तो दिलेल्या Google फॉर्मवर (https://forms.gle/L9hkapkUuR3c46jBA) अपलोड करावा. दिलेला QR कोड देखील त्यात प्रवेश करण्यासाठी स्कॅन केला जाऊ शकतो.

  • Voting awareness : लोकशाहीचा किल्ला मजबूत करा, मतदान करा

    Voting awareness एस.एन.डी.टी महिला विद्यापीठ, मुंबईचे  महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपूर कॅम्पसच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत आज मतदान जनजागृती अभियान राबवण्यात आले.

    पॉवर स्टार पवन कल्याण यांचा चंद्रपुरात रोड शो

    Voting awareness या उपक्रमाची सुरुवात बल्लारपूर बसस्थानक येथे पथनाट्य सादरीकरणाने झाली. कॅम्पसचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांनी बल्लारपूर बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक राकेश कांबळे यांचे स्वागत केले.

    सुमारे २०० नागरिकांनी पथनाट्य पाहून मतदानाचे महत्त्व समजून घेतले आणि त्यावर सकारात्मक प्रतिक्रिया दिली.

     विद्यार्थिनींनी शहीद भगतसिंह वॉर्डमध्ये घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधला. सुमारे १००-१५० घरांमध्ये जाऊन त्यांनी मतदानाचे महत्त्व समजावून सांगितले.

    यादरम्यान नागरिकांकडून मतदानासाठी उत्स्फूर्त पाठिंबा व्यक्त करण्यात आला. याशिवाय, नागरिकांना त्यांचे मत बजावण्याचे अधिकार आणि त्याच्या महत्त्वाची जाणीव करून दिली. Sndt woman university

    अभिलाषा गावतुरे यांना मिळाली बसपाची साथ

    रेल्वे स्थानकावर पथनाट्य सादर करताना सुमारे २५०-३०० लोकांनी पथनाट्य पाहिले. याठिकाणी उपस्थित नागरिकांनी फक्त पथनाट्य पाहून प्रेरणा घेतली नाही, तर त्यांच्याकडून मतदानाची प्रतिज्ञा घेण्यात आली. नागरिकांनी या प्रतिज्ञेमार्फत आपापले मतदानाचा हक्क न चुकवण्याचा निर्धार व्यक्त केला.

    कार्यक्रम पोलिस निरीक्षक श्री. गाडे यांच्या देखरेखीखाली पार पडला. निवडणूक विभाग, तहसील कार्यालय बल्लारपूरचे श्री. सचिन उमरे आणि नीरज बेहेरे यांचाही या उपक्रमात महत्त्वाचा सहभाग होता. Sndt woman university

    संपूर्ण कार्यक्रम कॅम्पसचे संचालक डॉ. राजेश इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. सहाय्यक कुलसचिव डॉ. बाळू राठोड आणि समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांनी या उपक्रमाला विशेष प्रोत्साहन दिले.

    पथनाट्याचे सादरीकरण सहाय्यक प्राध्यापिका अपेक्षा पिंपळे आणि सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्रुतिका राऊत यांच्या नेतृत्वाखाली झाले, तर कार्यक्रम अधिकारी खुशबू जोसेफ यांनी उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

    राष्ट्रीय सेवा योजनेच्या या अभियानात विद्यार्थिनींनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतरांचे सहकार्य लाभले. Sndt woman university

    या अभियानाद्वारे नागरिकांना मतदानाची जबाबदारी समजावून सांगण्यात आली आणि त्यांना त्यांच्या लोकशाही हक्काचा उपयोग करण्याचे आवाहन करण्यात आले.

  • Illegal liquor : चंद्रपूर जिल्ह्यात अवैध दारूवर 300 गुन्हे दाखल

    Illegal liquor विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत असून जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निवडणूक कालावधीत रोकड, दारु जप्ती, चेक पोस्टवर वाहनांची कडक तपासणी आदींबाबत सुचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत जिल्हाभरात टाकलेल्या धाडीत 300 गुन्हे नोंदविले असून यात 15770 लिटर दारूसह 29 वाहने जप्त केली आहेत.

    Illegal liquor जिल्ह्यात मतदान प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे पार पाडावी, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्हाभरात सहा विशेष पथके तयार केली असून या पथकात एक निरिक्षक, तीन दुय्यम निरिक्षक व जवान संवर्गीय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

    निवडणुकीच्या धामधुमीत चंद्रपुरात प्रदूषणाचा पूर

    या पथकांकडून सहाही विधानसभा मतदारसंघात रात्रंदिवस अवैध दारूविरुद्ध पाळत ठेवून कारवाई करण्यात येत आहे. आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून 300 गुन्ह्यात 280 आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे नोंदविण्यात आले असून या संपूर्ण कारवाईत 826 हातभट्टी दारू, 11930 लिटर मोहा सडवा, 2538 लिटर देशी दारू, 240 लिटर विदेशी दारू, 88 लिटर बियर, 142 लिटर ताडी, पाच लिटर परराज्यातील विदेशी दारू अशी एकूण 15770 लिटर दारू जप्त करण्यात आलेली आहे. Illegal liquor

    भाषणावेळी विरोधीपक्ष नेत्याच्या कन्येची जीभ घसरली

    यादरम्यान दारुची अवैधरीत्या वाहतूक करणारी 29 वाहनेही विभागाने जप्त केली असून एकूण मुद्देमालाची किंमत 40 लाख 61 हजार 105 रुपये आहे. याव्यतिरिक्त राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तेलंगणा राज्याच्या सीमेवर परसोडा (ता. कोरपना) व लक्कडकोट (ता.राजुरा) या ठिकाणी सीमा तपासणी नाके स्थापन करण्यात आले असून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. तसेच वर्धा व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरही अवैध वाहतुकीवर पाळत ठेवण्यात येत आहे. Illegal liquor

    नागरिकांना आवाहन : कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितिन धार्मिक यांनी केले आहे.

  • chandrapur pollution : चंद्रपूर झाले प्रदूषण “पूर’

    chandrapur pollution चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन मधील आधीच 2 जुने संच राख ओकत असताना गेल्या 22 महिन्यापासून चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनचे नवे संच क्रमांक 8 व 9 हे प्रचंड धूळ व राख ओकत आहे. त्यामुळे दररोज हजारो टन राख शहरावर फेकल्या जात आहे.

    chandrapur pollution स्टेशन व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रार करूनही अजूनही त्यावर कारवाही केल्याचे दिसत नाही. विशेष म्हणजे निवडणूक प्रचार सुरु असूनही प्रशासन,भावी आमदार,राजकीय पक्ष आणि शहरातील जागरूक मतदार कुणीही ह्याकडे लक्ष देत नसल्यामुळे कुणालाच प्रदूषण आणि आरोग्य हा महत्वाचा विषय वाटत नसल्याचे आश्चर्य वाटत आहे.अशी खंत ग्रीन प्लानेट सोसायटी अध्यक्ष सुरेश चोपणे यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

    प्रचार करीत असताना वीज गेली आणि शिवानी वडेट्टीवार यांचा संयम सुटला


    सध्या हिवाळा असल्याने वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे येत आहे,नेमके ह्याच महिन्यात थर्मल पॉवर स्टेशनचे नवीन संच इ एस पी च्या बिघाडामुळे २ ते ३ महिन्यापासून प्रचंड राख ओकत आहेत.प्रदूषण नियंत्रण कायद्या प्रमाणे ही प्रचंड राख सोडणे हा गुन्हा ठरतो. chandrapur pollution

    आधीच जुने ५ संच प्रचंड राख ओकीत असताना ह्या नव्या संचातून राख बाहेर येणे अपेक्षित नाही. सुरेश चोपणे यांनी अनेकदा स्टेशन प्रशासनाशी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाकडे बोलून आणि लेखी तक्रारी दिल्या आहेत.

    परंतु थर्मल प्रशासनाने सर्व कामे ठेकेदारी पद्धतीने दिले असल्याने तिथे सर्वत्र गोंधळ सुरु आहे आणि पर्यावरणाचे निःयम पाळल्या जात नाही.परंतु ह्याचा दुष्परिणाम निष्पाप चंद्रपूर कराना भोगावे लागत आहे. chandrapur pollution

    कांग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांची उमेदवारी रद्द करा

    दररोज हजारो टन राख शहरावर आणि लोकाच्या नाका-तोंडात जात असून पर्यावरणाला आणि चंद्रपूरच्या लोकांना विविध रोगांना बळी पडावे लागत आहे.

    सध्या निवडणुकांचा प्रचार सुरु आहे.परंतु निवडनुकीत राजकीय पक्ष,उमेदवार प्रदूषणाचा मुद्दा घेत नाही आणि नागरीक सुद्धा हा जीवघेणा मुद्दा उचलायला तयार दिसत नाही. प्रशासन देखील कारवाई करीत नाही ही खेदाची बाब आहे. आता नागरिकांनीच प्रदुषना विरोधात मोर्चे आणि आंदोलन केले पाहिजे, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ह्यांना जबाबदार धरले पाहीजे. chandrapur pollution

    विदेशात अशी घटना असती तर लोकांनी मोर्चे काढले असते. लोक,लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीनते बाबत ग्रीन प्लानेट सोसायटीच्या वतीने खंत व्यक्त करण्यात आली आहे.


    चंद्रपूर चा हवा गुणवत्ता निदेशांक खराब – गेल्या महिन्यापासूनच्या थर्मल पॉवर स्टेशन च्या राखेमुळे शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक ( AQI ) खराब झाला आहे.

    तो २३ तारखेपासून वाईट श्रेणीत असून निर्देशांक २०० ते २१३ पर्यंत होता.आणि नोव्हेंबर महिन्याच्या १ ते १२ तारखेपर्यंत सुद्धा निर्देशांक खराब श्रेणीत १४१ ते २०० पर्यंत आहे आणि पुढे सुद्धा राहील. खुटाळा येथील हवा गुणवत्ता ह्यापेक्षा खराब असून गेल्या महिन्यापासून तो २०० ते ३०० श्रेणीत आहे. chandrapur pollution

    विद्युत केंद्रात दररोज ४०००० मेट्रिक टन पेक्षा अधिक कोळसा जाळला जातो आणि त्यातून दररोज १५००० मेट्रिक टन अधिक राख बाहेर निघते. ह्यात केवळ १२००० टन राख हवेत सोडली जात आहे जी सर्व चंद्रपूर शहरात येत आहे. ह्याच सोबत दररोज ६०० टन सल्फर डाय ओक्साइड आणि तितकेच नायट्रोजन डाय ओक्साइड वातावरणात सोडीत असते आणि ह्यामुळे हवामान बदलाच्या समस्या आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. chandrapur pollution

    इतके प्रदूषण असूनही चंद्रपूर शहरातील लोकांचा २० वर्षापासून आरोग्य अभ्यास केला गेला नसून लोकांना मोफत उपचार देखील केल्या जात नाही.विशेष म्हणजे इतके प्रदूषण सहन करीत लोकांना दवाखान्यात लाखो रुपयाचा खर्च होतो.चन्द्रपुरकराना २००-३०० युनिट मोफत केले जावे आणि प्रदूषण भत्ता द्यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.


    चंद्रपूर जिल्ह्यातील ४ ओध्योगिक क्षेत्र हे केंद्रीय प्रदूषण मंडळाने गेल्या १५ वर्षापासून प्रदूषित म्हणून घोषित केलेले आहे.त्यात चंद्रपूर शहर हे सुद्धा हवा गुणवत्ता निर्देशांकात (AQI) हा २००-३०० श्रेणीत सून अतिशय प्रदूषित श्रेणीत मानले गेले आहे. सेपि निर्देशांक सुद्धा ६०-७० दरम्यान प्रदूषित श्रेणीत आहे. आतापर्यंत अनेक कृती आराखडे आखले गेले असून ते कागदावरच आहेत.२००६ मध्ये आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्शनात चंद्रपूर,बल्लारपूर तालुक्यात ५२ टक्के लोक विविध रोगाने बाधित असल्याचे स्पस्ट झाले होते. chandrapur pollution

    आजही हीच स्थिती आहे. म्हणूनच केंद्र शासनाच्या स्वच्छ हवा सर्वेक्षण कार्यक्रमात २०१९ पासून चंद्रपूरचा समावेश असून अजूनही त्यात प्रगती झाली नाही.
    असेच प्रदूषण सुरु राहिले तर पुन्हा चंद्रपूर शहर वासियां कडून आंदोलन करण्यात येईल असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.


    ग्रीन प्लानेट सोसायटीच्या मागण्या-
    त्वरित संच ८ आणि ९ ची त्वरित दुरुस्ती करून धूळ आणि वायू प्रदूषण थांबवावे-
    जुने प्रदूषणकारी सर्व संच दुरुस्ती होत पर्यंत बंद करण्यात यावे
    विद्युत केंद्राने शहरवासियांना मोफत औशध उपचार द्यावे.
    आरोग्य विभागाने ह्याच वर्षी हेल्थ सर्व्हे करावा-
    शासनाने / थर्मल पॉवर स्टेशन ने लोकांना प्रधुषण भत्ता द्यावा –


    सिटीपीएस वर मोठा दंड आकारून ते पैसे प्रदूषण कमी करण्यास वापरावे-
    गरीब-मध्यम वर्गीय लोकांना २००-३०० युनिट मोफत द्यावे-
    कोळसा खाणी आणि इतर उद्योगाचे प्रदूषण सुद्धा कमी करण्यात यावे.
    शहरातील वाहने,रस्ते आणि इतर स्त्रोतातून होणारे प्रदूषण सुद्धा कमी करावे-
    प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ह्यांना प्रदुषनासाठी जबाबदार धरण्यात यावे.