Pravin kakade congress वरोरा – विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी कार्यकर्ते जात आहेत. या कार्यकर्त्यांसाठी रात्रीच्यावेळी जेवण अर्थात पार्टीचे नियोजन असते. त्यानुसार एका उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित एका पार्टीत गेलेल्या माजी उपसरपंचाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना उघड झाली. यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
हंसराज अहिर यांनी साधला भाजप कार्यकर्त्यांशी संवाद
Pravin kakade congress जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील फत्तेपूर इथे प्रमोद मगरे या काँग्रेसशी जुळलेल्या कार्यकर्त्याने आपल्या गिट्टी क्रशर परिसरात कार्यकर्त्यांसाठी रात्री भोजन आयोजित केले होते.
यात जवळच्या पांझुर्णी येथील माजी उपसरपंच गजानन काळे हे सहभागी झाले. पार्टी सुरू असतानाच काळे एका सहकाऱ्यासह लगतच्या मोकळ्या जागेत गेले असता अंधारात ते तेथील विहिरीत पडले. Pravin kakade congress
चंद्रपूर शहरात जिवंत बुलेट सह एकाला अटक
आवाज येताच सगळे धावले. यात एकाला पोहता येत असल्याने तो वाचला. मात्र गजानन काळे हे विहिरीत बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी आज सकाळी मृतदेह बाहेर काढला. दुसरा दिवस उजाडला तरीही गुन्हा अद्याप दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे पोलिसांवर दबाव असल्याचे बोलले जात आहे. विहिरीत पडलेल्या व्यक्ती नशेत होता का? त्यांना कुणी धक्का दिला का, हा अपघात आहे की घातपात, अशा शंका आता उपस्थित केल्या जात आहेत. Pravin kakade congress
निवडणुकीचा माहोल असताना एका पक्षाच्या पार्टीत अशी घटना घडल्याने उलटसुलट चर्चांना पेव फुटले आहे.
प्रवीण काकडे यांची उमेदवारी रद्द करा
11 नोव्हेंबर रोजी वरोरा विधानसभा क्षेत्रांतील अपक्ष उमेदवार अतुल ईश्वर वानकर यांनी पत्रकार परिषदेतून कांग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांची उमेदवारी रद्द करण्याची मागणी केली.
वानकर म्हणाले की 10 नोव्हेंबर रोजी कांग्रेस समर्थक प्रमोद मगरे यांच्या गिट्टी क्रॅशर वर दारू – मटण पार्टीत घडलेल्या घटनेची योग्य चौकशी करीत त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला कळवावा व कांग्रेस पार्टीचे उमेदवार यामध्ये दोषी आढळल्यास आचार संहितेचा गुन्हा दाखल करीत प्रवीण काकडे यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी वानकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
Leave a Reply