Category: राजकारण

महाराष्ट्रातील राजकारण बातम्या (Maharashtra Politics News) आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व राजकीय घडामोडींसाठी news34.in हे आपले विश्वसनीय व्यासपीठ आहे. आम्ही तुम्हाला स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या-छोट्या अपडेट्सचे कव्हरेज देतो. राजकीय विश्लेषण, पक्षांची धोरणे, नेत्यांची मते आणि महत्त्वाचे शासकीय निर्णय. कोणत्याही राजकीय बातम्या चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. राजकारण या क्षेत्रातील विश्वसनीय आणि ताज्या बातम्या मिळवण्यासाठी नियमितपणे भेट द्या.

  • बसपा माजी नगरसेवक सुधीर कारंगल यांचा भाजपा प्रवेश

     Sudhir Karangal Joins BJP चंद्रपूर १२ डिसेंबर २०२५ (News३४) – नागपूर येथे भारतीय जनता पक्षात महत्त्वपूर्ण प्रवेश घडला. बहुजन समाज पार्टीचे इंडस्ट्रियल प्रभागाचे सलग तीन दा नगर सेवक राहिलेले माजी नगरसेवक सुधीर कारंगल यांनी आज (शुक्रवार) भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, आमदार किशोर जोरगेवार, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश कार्यकारणी सदस्य तुषार सोम, तसेच प्रकाश देवतळे, सुमित गुप्ता, हर्ष जयस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

         गेल्या काही महिन्यांमध्ये विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मोठ्या संख्येने भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत. कॉंग्रेससह इतर पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला असून, पक्षाचा संघटनात्मक विस्तार वेगाने वाढत आहे. (हे हि वाचा – मोरवा विमानतळासाठी ६ कोटी मंजूर, मुनगंटीवार यांचा पाठिंबा)

        आज सुधीर कारंगल यांनीही ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी पक्ष प्रवेश करून भाजपच्या विचारधारेवर विश्वास व्यक्त केला. त्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद अधिक मजबूत होणार आहे. Sudhir Karangal Joins BJP

               यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, भारतीय जनता पक्ष हा सामान्य कार्यकर्त्यांच्या श्रमांवर उभा असलेला पक्ष आहे. आम्ही विकास, पारदर्शकता आणि लोकहित यांना प्राधान्य देणारे समाजकारण करतो. सुधीर कारंगल यांसारख्या समाजाभिमुख नेत्याचा पक्षात प्रवेश हा आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.

        गेल्या काही महिन्यांमध्ये विविध पक्षांतील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आमच्यात सामील झाले आहेत. हा विश्वास आम्ही विकासकामांद्वारे आणि जनसेवेच्या माध्यमातून मिळवला आहे. असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

  • हिवाळी अधिवेशनात आमदार मुनगंटीवार करणार विधेयकांचा विक्रम

    Winter Session Non-Governmental Bill : चंद्रपूर ८ डिसेंबर (News३४) -दिनांक ४ जुलै २०२५ रोजी विधानसभेच्‍या पावसाळी अधिवेशनात माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी एकाच दिवशी तब्‍बल ३० अशासकीय विधेयकांची पुरःस्‍थापना करून महाराष्‍ट्राच्‍या संसदीय इतिहासात अभूतपूर्व विक्रम प्रस्‍थापित केला. पुरःस्‍थापनार्थ मांडण्‍यात येणा-या अशासकीय विधेयकांचा हा विक्रम पुढे नेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नवा विक्रम विद्यमान हिवाळी अधिवेशनात प्रस्थापित केला आहे. त्‍यांची तब्‍बल ३७ अशासकीय विधेयके या अधिवेशनात विचारार्थ ठेवण्‍यात आली आहेत. 

    अशासकीय विधेयके विचारार्थ ठेवण्‍याच्‍या प्रक्रियेत हा एक नवा विक्रम आहे. विचारार्थ असलेली ही विधेयके शेतकरी, विद्यार्थी, महिला, ग्रामविकास, पर्यावरण आणि लोकहिताशी संबंधित असून त्‍यामध्‍ये सामाजिक समतोल आणि प्रगतीचा दृष्‍टीकोन अंतर्भुत आहे. विचारार्थ असलेल्‍या या ३७ विधेयकांपैकी काही विधेयके या अधिवेशनातच चर्चेला येणार आहेत. Winter Session Non-Governmental Bill (हे हि वाचा : युवक कांग्रेसचे महासचिव भाजपात)

    विधायक पर्याय सुचविण्‍याचे साधन अशासकीय विधेयक

    विधीमंडळाच्‍या कामाकाजात अशासकीय विधेयकांना अनन्‍यसाधारण महत्‍व आहे. विधीमंडळ सदस्‍यांना समाजातील विविध प्रश्‍नांना थेट कायद्याच्‍या स्‍वरूपात मांडण्‍याची संधी अशासकीय विधेयकांमुळे मिळते. अनेकदा शासनाने विचारात न घेतलेल्‍या मुद्दयांवर विधायक पर्याय सुचविण्‍याचे साधन अशासकीय विधेयक ठरते.

    काही वेळा हे विधेयक शासनाला धोरणपर बदल करण्‍यात प्रवृत्‍त करते. एखादया अशासकीय विधेयकाला व्‍यापक समर्थ मिळाले तर ते जनभावनेचे निदर्शक ठरते व अनेकदा सरकार त्‍या विषयावर पुढाकार घेते. अशासकीय विधेयके काही वेळा कायद्यात रूपांतरीत होतात, परंतु चर्चा करणे, जनभावना मांडणे, शासनाला दिशा देणे आणि विधायक वातावरण निर्माण करणे यादृष्‍टीने त्‍यांचा प्रभाव अमुल्‍य असतो. त्‍यामुळे विधीमंडळाच्‍या कामाकाजात अशासकीय विधेयकांचे स्‍थान अत्‍यंत महत्‍वाचे व अपरिहार्य आहे.

    अशासकीय विधेयकांवर कायम भर

    अशासकीय विधेयकांचे हे महत्‍व ओळखुन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी त्‍यांच्‍या ३० वर्षांच्‍या संसदीय कारकीर्दीत अशासकीय विधेयकांवर कायम भर दिला आहे. त्‍यांनी अशासकीय विधेयकांच्‍या माध्‍यमातुन मांडलेल्‍या अनेक प्रश्‍नांवर शासनाने निर्णय घेतले असून त्‍यामुळे लोकहित साधले गेले आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांची ही कामगिरी केवळ विक्रम नसून जनतेच्‍या प्रश्‍नांशी असलेली त्‍यांची असामान्‍य तळमळ आणि संवेदनशीलता यांचे प्रतीक आहे. Winter Session Non-Governmental Bill

    ३७ अशासकीय विधेयक

    या अधिवेशात विचारार्थ असलेल्‍या ३७ अशासकीय विधेयकांमध्‍ये सुधीर मुनगंटीवार, वि.स.स. यांचे कारागृहे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र जमीन महसूलाच्या माफीबाबत (क्रमांक-१) (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र हिंसाचार व लैंगिक गुन्ह्यांना प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती व जाहिरात्न-फलक लावण्यास प्रतिबंध करण्याबाबत विधेयक,

    मुंबई महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (सुधारणा) विधेयक

    महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (तिसरी सुधारणा) विधेयक,महाराष्ट्र खाजगी वने (संपादन) (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध (दुसरी सुधारणा) विधेयक, बाल कामगार (प्रतिबंध आणि विनियमन) (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक,  

    महाराष्ट्र अल्पभूधारक शेतकरी निवृत्ती वेतन, महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र धुम्रपानास व थुंकण्यास मनाई करण्याबाबत विधेयक, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन आणि पुनर्विकास) विधेयक, 

    विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) (सुधारणा) विधेयक, विवाह (महाराष्ट्र सुधारणा), मोटार वाहन (महाराष्ट्र दुसरी सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (दुसरी सुधारणा) विधेयक,

    मुंबई न्यायालय फी (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र कुळवहिवाट आणि शेतजमीन (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र राज्यात लैंगिक गुन्ह्यांना प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती व जाहिरात फलक लावण्यास, Winter Session Non-Governmental Bill

    विविध विधेयकाचा समावेश

    समाज माध्यमांवर व संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध करण्याबाबत विधेयक, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (तिसरी सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र माथाडी, हमाल व इतर श्रमजीवी कामगार (नोकरीचे नियमन व कल्याण) (दुसरी सुधारणा) विधेयक, औषधिद्रव्ये व सौंदर्यप्रसाधन (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 

    महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक

    महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (चौथी सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन (सुधारणा) विधेयक, मुंबई ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र गृहनिमार्ण व क्षेत्रविकास (सुधारणा) विधेयक,

    महाराष्ट्र खाजगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) विनियमन (दुसरी सुधारणा) विधेयक, महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, हिंदू अज्ञानात्‍व व पालकत्‍व (महाराष्‍ट्र सुधारणा) विधेयक, महाराष्‍ट्र भाडे नियंत्रण (सुधारणा) विधेयक या विधेयकांचा समावेश आहे.

    अशासकीय विधेयकांच्‍या माध्‍यमातुन नागरिकांना त्‍यांच्‍या न्‍याय्य हक्‍कांसाठी आवाज मिळेल. ही अशासकीय विधेयके केवळ आकडयांची मांडणी नाही तर सामान्‍य जनतेच्‍या वास्‍तविक गरजांवर आधारित ही विधेयके आहेत, असे मनोगत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्‍यक्‍त केले आहे. जनतेच्‍या प्रश्‍नांसाठी आपला हा लढा असाच अविरत सुरू राहील असेही त्‍यांनी म्‍हटले आहे

  • ब्रेकिंग: पक्षफोडी सरकारवर धानोरकरांचा हल्लाबोल!

    Maharashtra politics : चंद्रपूर ५ डिसेंबर (News३४) –महाराष्ट्र राज्यात ‘दोन पक्ष फोडून’ स्थापन झालेल्या वर्तमान सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्य सरकारच्या कामगिरीवर जोरदार टीका केली आहे. ‘संतभूमी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राचे चित्र गेल्या वर्षभरात अत्यंत निराशाजनक झाले असून, राज्याचे जगासमोर ‘तीन तिघाडा आणि महाराष्ट्राचे काम बिघाडा’ असे लाजिरवाणे झाले आहे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली आहे.

    राज्यातील शेतकरी संकटात

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी म्हटले आहे की, एकीकडे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम आहे, मात्र सध्या राज्यातील शेतकरी पूर्णपणे संकटात सापडले आहेत आणि राज्याची घडी पूर्णपणे मोडलेली आहे. “राज्यात कायद्याची आणि सुव्यवस्थेची स्थिती इतकी बिघडली आहे की, राज्यातील महिलांना निवडणूक अर्ज भरण्यासाठीसुद्धा बंदूकधारी  घेऊन जावे लागते, ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि लाजिरवाणी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. (हे हि वाचा : चंद्रपूर स्थानिक निवडणुकीतील उमेदवारांसाठी दिलासादायक बातमी)

    वर्षभरात पक्ष फोडण्याचे काम

    “या एका वर्षात सरकारने दोन प्रमुख पक्ष फोडून हे सरकार बनवले. पण या सत्तासंघर्षातून आणि पक्षफोडीच्या राजकारणातून सामान्य नागरिकांसाठी काय साध्य केले आहे?” असा थेट प्रश्न खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपस्थित केला आहे. केवळ सत्ताकारणासाठी धडपडणाऱ्या या सरकारने महाराष्ट्राची प्रतिमा आणि प्रगती दोन्ही धोक्यात आणले आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या सरकारला आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला देत, त्वरित राज्याच्या मूलभूत समस्यांवर आणि शेतकरी व महिलांच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याची मागणी केली आहे.

  • चंद्रपूर स्थानिक निवडणुकीत उमेदवारांना सुखद बातमी!

    Election expenses : चंद्रपूर ५ डिसेंबर (News३४) – महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (नगर परिषद व नगर पंचायत) निवडणुका न्यायालयीन प्रक्रियेमुळे पुढे ढकलल्या गेल्याने, उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचे व्यवस्थापन एक कळीचा मुद्दा बनले आहे. या पार्श्वभूमीवर, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांच्याकडे एक अत्यंत महत्त्वपूर्ण मागणी केली आहे.

    दिलासादायक मागणी

    उमेदवारांना आर्थिक ताणातून दिलासा देण्यासाठी, निवडणूक खर्चाची गणना नवीन वेळापत्रकानुसार निवडणूक चिन्ह वाटपाच्या दिवसापासून (११ डिसेंबर) सुरू करावी, अशी स्पष्ट भूमिका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मांडली आहे. यापूर्वी झालेला सर्व खर्च निवडणूक खर्च म्हणून ग्राह्य धरू नये, अशी त्यांची आग्रही विनंती आहे. (हे हि वाचा – ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात नियमांची पायमल्ली)

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, मुंबई यांना पत्र लिहून, सध्याच्या न्यायालयीन प्रक्रिया व निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकांमधील उमेदवारांच्या खर्चाबाबत स्पष्ट मार्गदर्शक सूचना जारी करण्याची विनंती केली आहे.

    खर्च ग्राह्य धरू नये

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी पत्रात नमूद केले आहे की, मा. न्यायालयीन प्रक्रिया व आयोगाच्या आदेशानुसार, ज्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत, त्यासाठी उमेदवारांनी यापूर्वी केलेला सर्व खर्च हा निवडणूक खर्च म्हणून ग्राह्य धरू नये. Election expenses

    उमेदवारांवर अनावश्यक आर्थिक ताण पडू नये आणि निवडणुकीत समान संधी मिळावी यासाठी, निवडणुकीच्या नवीन वेळापत्रकानुसार दिनांक ११ डिसेंबर रोजी निवडणूक चिन्हांचे वाटप होणार आहे.खासदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी आहे की, ११ डिसेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटप झाल्यानंतर, त्या दिवसापासून उमेदवारांनी केलेला प्रत्येक खर्च हा निवडणूक खर्च म्हणून ग्राह्य धरण्यात यावा,

    मार्गदर्शक सूचना निर्गमित करा

    तर या तारखेपूर्वी झालेला खर्च कोणत्याही परिस्थितीत ग्राह्य धरला जाऊ नये. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी या अतिशय महत्त्वाच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून, संबंधित जिल्हाधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी आणि निवडणुकीतील उमेदवार यांना या संदर्भात स्पष्ट आणि त्वरित मार्गदर्शक सूचना त्वरित निर्गमित करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

  • Congress campaign rally in Brahmpuri । वडेट्टीवारांचा दावा: ब्रम्हपुरीचा चेहरामोहरा पुन्हा बदलणार!

    Congress campaign rally in Brahmpuri : ब्रह्मपुरी १ डिसेम्बर (News३४) – लोकप्रतिनिधी म्हणून सूत्रे हाती घेताच शहराचा विकास केला. कालची ब्रम्हपुरी व आजची ब्रम्हपुरी यातील तुलनात्मक बदल आपल्याला जाणवतो आहे. या शिक्षणाच्या पंढरीला पुनश्च प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी आपण पुन्हा एकदा काँग्रेस उमेदवारांना भरभरून आशीर्वाद द्या. असे आवाहन विधिमंडळ पक्षनेते आ विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेतून केले.

    आयोजित सभेस प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहेरे,प्रा. देविदास जगनाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप गड्डमवार, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष खेमराज तिडके, शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, डॉ. राजेश कांबळे, प्रमोद चिमूरकर, डॉ.थाणेश्वर कायरकर, इकबाल जेसानी, सोनू नाकतोडे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश मिसार व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, काँग्रेस पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.

    भाजपच्या काळात विकासाला खीळ

    यावेळी पुढे बोलतांना विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजप सत्ताकाळात ब्रम्हपुरी शहराच्या विकासाला पूर्णतः खीळ बसली होती. आज दिल्ली ते गल्ली पर्यंत सत्ता आली असताना भाजपने केवळ नागरिकांना काँग्रेस काळात कार्यान्वीत केलेल्या योजनां व्यतिरिक्त काहीच दिले नाही. या उलट महागाई बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड दरवाढ केली. गेल्या ६ महिन्यांपासून श्रावण बाळ, वृद्धापकाळ, निराधार योजनेचे पैसे दिले नाही. जाचक अटी लादून फसवी लाडकी बहीण योजना हे महायुती सरकार गुंडाळण्याचा तयारीत आहेत. Congress campaign rally in Brahmpuri

    वन्यप्राणी : रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू

    आम्ही शहराच्या विकासासह येथील महिलांना काम देण्यासाठी रेडिमेड गारमेंट उद्योगाच्या माध्यमातून शहरातील २हजार महिलांना रोजगार देणार आहोत.येथील विद्यार्थी मी कार्यान्वीत केलेल्या इ- लायब्ररीतून प्रशासकीय सेवेत मोठे अधिकारी होणार आहेत. येणाऱ्या काळात शहराचा सर्वांगीण विकास करून पूर्ण चेहरामोहरा बदलविण्याचे मोठे व्हिजन हे आमच्या माझ्याकडे व आमच्या काँग्रेस  उमेदवारांकडे आहे. आपण पुन्हा एकदा आम्हाला मतदार रुपी आशीर्वाद देऊन आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

    तर ब्रम्हपुरी विधानसभेचे नेतृत्व करणारे विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शिक्षणाची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मपुरी शहरातील अंतर्गत रस्ते, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय, पथदिवे,गडार लाईनची कामे, रेल्वे लाईन वरील उडान पूल, प्रशस्त शासकीय इमारती, वातानुकू लित ई – लायब्ररी, सामाजिक व सांस्कृतिक सभागृह, क्रीडा संकुल या सर्व बाबींचा शहरात कसोशीने केलेल्या विकास कामांचा आढावा प्रा. देविदास जगनाडे यांनी उपस्थितांपुढे मांडला.आयोजित सभेस काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते तथा हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

  • Rajura political rally Chandrapur । मत चोरांच्या भुलथापाला, आमीशाला बळी पडू नका : माजी आमदार चटप व धोटे यांचे आवाहन

    Rajura political rally Chandrapur : राजुरा ३० नोव्हेम्बर २०२५ (News३४) :– कांग्रेस, शेतकरी संघटना आणि मित्रपक्ष यांच्या संयुक्त पुढाकाराने स्थापन झालेल्या नगरविकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अरुणभाऊ धोटे तसेच प्रभाग क्र. १ ते १० मधील सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ आझाद चौक आणि जवाहर नगर येथे भव्य जाहीर सभा घेण्यात आल्या. दोन्ही सभांना तसेच कार्नर सभांना हजारो स्वाभिमानी नागरिकांची उसळलेली गर्दी पाहता, राजुरा शहरातील जनतेचा विकासाभिमुख कल अधिक ठळकपणे दिसून आला.

    सेलिब्रेटी : सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू चंद्रपुरात

    सभेत बोलताना शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार ॲड. वामनराव चटप आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी नागरिकांना जोरदार आवाहन केले. मत चोर, बनवेगीरी करणारे, रेती-कोळसा चोरीतून शहराला लुटणारे, परवानगी करात भ्रष्टाचार करणारे, आणि आमचे उमेदवारही चोरी करून घेऊन जाणारे पार्सल लोक पुन्हा फसवणुकीच्या भुलथापात पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या आमीशाला बळी पडू नका, असे आवाहन नेत्यांनी केले.


    राजुराच्या शाश्वत विकासासाठी आणि शहरातील तरुणांचे भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी नगरविकास आघाडीच एकमेव सक्षम पर्याय असल्याचे स्पष्ट करत चटप-धोटे म्हणाले, आम्ही दोन्ही माजी आमदार कोणाला घाबरून एकत्र आलो नाही. राजुराच्या जनतेच्या हितासाठी, शहराचा विकास अधिक भक्कम करण्यासाठी आणि सध्याच्या बेबंदशाहीला पूर्णविराम देण्यासाठी एकत्र आलो आहोत. तसेच भाजपचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाचे उमेदवार भाजपच्या आमदारांनाच सक्षम वाटत नसल्याने ते जीथे तिथे मला पाहून मत द्या असे आवाहन करीत असून तसे न झाल्यास नधी मिळणार नाही असा खोटा कांगावा करीत फिरत आहेत. मात्र आम्ही दोन्ही आमदार आणि अरूण धोटे यांनी अनेक वर्षे केंद्रात, राज्यत आमचे सरकार नसतांना आणि पालकमंत्री आपले नसतांनाही राजुराचा विकास करून दाखविला आहे. या पुढेही शाश्वत विकासासाठी झटत राहु असा विश्वास व्यक्त केला.


    यावेळी सभे पूर्वी स्थानिक नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसाद मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मंचावर नगर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अरूणभाऊ धोटे, सर्व प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार यांचेसह काँग्रेस, शेतकरी संघटना आणि मित्र पक्षातील सर्व महत्त्वाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते.

  • Ghugghus election rally updates । काँग्रेस बुडते जहाज, भाजप मजबूत – घुग्घूसच्या सभेत बावनकुळे यांचं वक्तव्य

    घुग्घूस वासीयांना कायमस्वरूपी घरपट्टे देणार – ना. चंद्रशेखर बावनकुळे

    Ghugghus election rally updates : घुग्गुस २९ नोव्हेम्बर (News३४) – केंद्र आणि राज्य सरकारच्या 124 शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी घुग्घूस येथील नगराध्यक्षांसह सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करा असे आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घुग्घूसच्या सभेत केले. यावेळी बोलताना त्यांनी ड्रोन सर्व्हे करून प्रत्येक घराला प्रॉपर्टी कार्ड देत कायमस्वरूपी घरपट्टे देणार असल्याचे सांगितले आहे.

    भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आज शनिवारी महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या घुग्घूस येथील फटाका मैदान येथे जाहिर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी घुग्घूसवासीयांना संबोधित करताना ते बोलत होते. या सभेला आमदार किशोर जोरगेवार, राजूरा विधानसभेचे आमदार देवराव भोंगळे, भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, एचएमएच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवकुमार यादव, 

    वाघाचा हल्ला – चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

    भाजप मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अशोक जिवतोडे, युवा नेता रघुवीर अहिर, घुग्घूस अध्यक्ष संजय तिवारी, निवडणूक प्रभारी प्रकाश देवतळे, विधानसभा प्रमुख दशरथसिंह ठाकुर, वंदना हातगावकर, महामंत्री सविता दंढारे, रवी गुरुनुले, मनोज पाल, श्याम कनकम, माजी महापौर राखी कंचर्लावार, अंजली घोटेकर, जिल्हा संघटन महामंत्री नामदेव डाहुले, नगराध्यक्ष उमेदवार शारदा उर्फ पूजा दुर्गम, विनोद चौधरी, हेमंत उरकुडे, सोनल भरडकर, निरीक्षण तांड्रा, मल्लेश भल्ला आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

    यावेळी बोलताना ना. बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य प्रगतीची नवी उंची गाठत आहे. आपण आजवरचे सर्वात मजबूत सरकार निवडून दिले आहे. त्यामुळे जनहिताचे मोठे निर्णय आपण घेऊ शकत आहोत. भाजप सत्तेत असेपर्यंत लाडकी बहिण योजना सुरु राहणार आहे. घुग्घूस येथील बचत गटांना एक लाख रुपये अनुदान आपण देणार आहोत. यातून जवळपास एक हजार महिलांना स्वयंरोजगार सुरू करता येणार आहे. सूर्य घर योजनेचा लाभ घुग्घूस येथील नागरिकांना मिळणार आहे, असे ते यावेळी म्हणाले. Ghugghus election rally updates

    पुढील पाच वर्षांचे घुग्घूस विकासाचे मोठे व्हिजन आपल्याला तयार करायचे आहे. 45 लाख शेतकऱ्यांच्या शेतपंपांचे वीजबिल आपण माफ केले आहे. 30 जून 2026 पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार आहे. आमदार किशोर जोरगेवार सतत पाठपुरावा करून कामे मार्गी लावतात. त्यांनी येथील पाणीपुरवठा योजनेसाठी 93 कोटी रुपयांच्या निधीची मंजुरी मिळवून घेतली आहे. त्यामुळे लवकरच येथील पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे. आपण तुकडेबंदी कायदा हटविला आहे. आता घुग्घूस येथील घरांची ड्रोन मॅपिंग केली जाणार आहे. त्याला लागणारा खर्चही राज्य सरकार करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ना. नितीन गडकरी आणि स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांची  विकासदृष्टी असलेली चार चाकांची विकासाची गाडी आपल्यापुढे उभी आहे. काँग्रेस हे बुडते जहाज आहे. त्यामुळे काँग्रेसचे अनेक नेते आणि कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करत आहेत. घुग्घूस च्या विकासासाठी नगराध्यक्ष पदासह सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी ना. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

    घुग्घूसवासी विकासाच्या बाजूने उभे राहतील – आ. किशोर जोरगेवार

    पालकमंत्री असताना विजय वडेट्टीवार यांनी घुग्घूसच्या विकासासाठी निधी दिला नाही. आता भारतीय जनता पक्षाने केलेल्या कामाचे श्रेय घेण्याची नामुष्की त्यांच्यावर आली आहे. केवळ जातीय राजकारण ते करत असून घुग्घूसची जनता त्यांच्या भुलथापांना बळी पडणार नाही. घुग्घूसवासी विकासाच्या बाजूने उभे राहतील, असा विश्वास यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. या सभेला नागरिकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती.

  • Warora city Congress leaders resign । वरोरा काँग्रेस संकटात! प्रचाराच्या तोंडावर महिला अध्यक्षांचा राजीनामा

    Warora city Congress leaders resign : वरोरा/चंद्रपूर २९ नोव्हेम्बर (News३४): चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली पूर्ण शक्ती पणाला लावली आहे. प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू असतानाच, वरोरा शहरात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

    काँग्रेसच्या महिला आघाडी शहर अध्यक्ष दीपाली माटे यांनी दिनांक २८ नोव्हेंबर रोजी आपल्या पदासह काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. निवडणुकीच्या ऐन तोंडावर शहर महिला अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने वरोरा काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली आहे.

    बातमी जंगलाची : चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला, वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

    नाराजीमुळे पक्षाला गळती

    नगर परिषद निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच वरोरा काँग्रेसमध्ये नाराजीचे वातावरण दिसून येत आहे. दीपाली माटे यांच्या राजीनाम्यापूर्वी देखील अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. Warora city Congress leaders resign

    • जिल्हा महासचिव शिरोमणी स्वामी आणि तहसील महासचिव मनोहर स्वामी यांनी यापूर्वीच आपल्या पदांचे राजीनामे दिले होते.
    • त्याचप्रमाणे, तीन वेळा नगर परिषद स्वीकृत सदस्य राहिलेले राजू महाजन आणि दोन वेळा नगरसेविका राहिलेल्या त्यांच्या पत्नीनेही काँग्रेस सोडली आहे.

    आता शहर महिला अध्यक्षा दीपाली माटे यांनीही राजीनामा दिल्यानंतर, काँग्रेसने त्यांच्यासोबत लावलेल्या उमेदवारांचे फलक आणि बॅनर तातडीने उतरवण्यास सुरुवात केली आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत महत्त्वाच्या नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे राजीनामे झाल्याने, वरोरा नगर परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.

  • घुग्घुस BJPची दमदार पदयात्रा! विकासाच्या बळावर विजयाचा आत्मविश्वास – आमदार जोरगेवार

    ठोस विकासकामांच्या आधारावर निवडणूक जिंकू  – आ. किशोर जोरगेवार

    MLA Kishor Jorgewar election rally Ghugghus : चंद्रपूर २८ नोव्हेम्बर (News३४) – घुग्घुस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, घुग्घुसतर्फे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुवारी आमदार किशोर जोरगेवार आणि आमदार देवराव भोंगळे यांच्या प्रमूख उपस्थितीत भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. टिळक नगर येथून निघालेल्या पदयात्रेचे आठवडी बाजार चौक येथ सभेत रूपांतर झाले. यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी विकासाच्या मुद्यावर आपण निवडणुकीला समोर जात असुन नगराध्यक्ष पदासह सर्व नगर सेवकांना निवडणुन देण्याचे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

    राजकीय : भाजप उमेदवारावर महिलांचा संताप, भद्रावती नगरपरिषद निवडणूक

       यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, नगराध्यक्ष पदाच्या उमेदावार शारदा उर्फ पूजा दुर्गम, घुग्घुस शहर अध्यक्ष संजय तिवारी, निवडणूक प्रमूख प्रकाश देवतळे, महामंत्री नामदेव डाहुले, विवेक बोडे, तालुका अध्यक्ष विनोद खेवले, चिन्ना नलभोगा यांच्यासह ईतर पदाधिका-यांची उपस्थिती होती.

    खोट्या आश्वासनावर नाही तर विकासावर निवडणूक

       सदर सभेत बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि, घुग्घुस मध्ये आम्ही जात-पात, भेदाभेद किंवा खोट्या आश्वासनांवर नाही, तर ठोस विकासकामांच्या आधारावर निवडणूक लढवत आहोत. आमदार म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर घुग्घुसमध्ये अनेक महत्त्वाची कामे पूर्ण केली आहेत. रस्ते, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, क्रीडा सुविधा ते नागरिकांच्या दैनंदिन गरजांपर्यंत विकासाचा वेग वाढवण्याचे काम आम्ही केले आहे. MLA Kishor Jorgewar election rally Ghugghus

    bjp padyatra
    प्रचार सभेत उपस्थित जनसमुदाय

    घुग्घुसचा सर्वांगीण विकास हा आमचा प्रामाणिक हेतू आहे. आजच्या पदयात्रेत नागरिकांनी जो प्रेम आणि विश्वास व्यक्त केला, तोच आम्हाला विजयाकडे घेऊन जाणार आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाचे सर्व भाजपा उमेदवार सक्षम, प्रामाणिक आणि कार्यक्षम आहेत. या विकासाच्या बळावरच ते निश्चित विजयी होतील, असा ठाम विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. वेकोलिच्या तलावामुळे घुग्घुस शहरातील नाल्यांना पूर येतो त्यामुळे या तलावाचे खोलीकरण करण्यासाठी सात कोटी रुपयांचा निधी आपण मंजूर केला आहे.

    येथील रुग्णालय लवकर पुर्ण क्षमतेने सुरु होणार आहे. येथील अनेक विकासकामे मागील काही वर्षात आपण पुर्ण करु शकलो आहे. कॉंग्रेसकडे आज विकासाच्या नावावर सांगण्यासारखे काही नाही.  ते केवळ घुग्घूस वासियांची दिक्षाभुल करण्याचे काम करत त्यांच्या खोट्या प्रचाराला घुग्घुसवासी बळी पडणार नाही असे ते यावेळी बोलतांना म्हणाले. या सभेला घुग्घुस वासियांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने निवडणुका मोकळ्या, पण ओबीसी जागा धोक्यात!

    स्थानिक स्वराज्य निवडणुका सुरू; पण ओबीसींचं भविष्य अजूनही अनिश्चित – वडेट्टीवारांची टीका

    SC updates on Maharashtra civic polls : चंद्रपूर २८ नोव्हेम्बर (News३४) – आज सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली नाही, हा थोडा दिलासा असला तरी या निवडणुकांचा निकाल हा न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहणार आहे. त्यामुळे ओबीसींच्या जागांवर असलेली टांगती तलवार कायम राहणार आहे. आज न्यायालयाच्या अंतरिम आदेशाने ओबीसी समाजाला दिलासा नाहीच अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.

    राजकीय – भाजप नगराध्यक्ष उमेदवाराचा व्हिडीओ व्हायरल, महिलांचा संताप आणि पळवाट

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयात आज महत्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीकडे आमचे लक्ष होते. आज न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला असला तरी ओबीसींच्या जागांवरील टांगती तलवार मात्र कायम राहिलेली आहे, अस वडेट्टीवार म्हणाले.


    आज न्यायालयाने निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देताना, ५०% आरक्षणाची मर्यादा ओलांडू नये असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याचा अर्थ, ज्या ठिकाणी ओबीसी आरक्षणामुळे एकूण आरक्षण ५०% च्या वर गेले आहे, त्या जागांवर निवडणूक होऊ शकणार नाही. त्यामुळे भाजपाने ओबीसी आरक्षणासंदर्भातील केलेलं सगळे दावे पूर्णपणे फोल ठरले आहेत. ही सपशेल बनवा बनवी आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. SC updates on Maharashtra civic polls

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या तरी ओबीसी जागांचा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहणार आहे. याचा स्पष्ट अर्थ आहे की, ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व पुन्हा एकदा अनिश्चिततेच्या छायेखाली राहणार आहे. भाजप सरकार सातत्याने आम्ही ओबीसींना २७% आरक्षण दिले म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत होते. मात्र, आजच्या परिस्थितीमुळे हे सर्व दावे फोटे ठरले आहेत. ओबीसींसाठी दिलेले २७% आरक्षण गेले कुठे? याचे उत्तर भाजपने द्यावे. निवडणुका घेण्यास सांगूनही निकाल न्यायालयावर अवलंबून ठेवणे म्हणजे ओबीसी बांधवांची राजकीय दिशाभूल करणे आहे. भाजपने केवळ घोषणांची बनवाबनवी करून ओबीसी बांधवांना मूर्ख बनवले, अशी घणाघाती टीका वडेट्टीवार यांनी केली.

    ओबीसी बांधवांना त्यांचे संवैधानिक प्रतिनिधित्व तातडीने मिळावे यासाठी भाजपने केवळ घोषणाबाजी न करता ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.