Category: राजकारण

महाराष्ट्रातील राजकारण बातम्या (Maharashtra Politics News) आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व राजकीय घडामोडींसाठी news34.in हे आपले विश्वसनीय व्यासपीठ आहे. आम्ही तुम्हाला स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या-छोट्या अपडेट्सचे कव्हरेज देतो. राजकीय विश्लेषण, पक्षांची धोरणे, नेत्यांची मते आणि महत्त्वाचे शासकीय निर्णय. कोणत्याही राजकीय बातम्या चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. राजकारण या क्षेत्रातील विश्वसनीय आणि ताज्या बातम्या मिळवण्यासाठी नियमितपणे भेट द्या.

  • Sunil Namojwar vs Anil Dhanorkar । भद्रावती पालिकेच्या निवडणुकीवरून धानोरकर-नामोजवार आमनेसामने; एकमेकांविरुद्ध केले हे आरोप

    Sunil Namojwar vs Anil Dhanorkar

    Sunil Namojwar vs Anil Dhanorkar : चंद्रपूर/भद्रावती – २० नोव्हेम्बर (News३४) – भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील नामोजवार विरुद्ध अनिल धानोरकर यांच्यात गंभीर आरोपांचा सामना रंगला आहे. भद्रावती नगरपरिषदेचे दोन माजी नगराध्यक्ष एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उभे असून दोघांनी एकमेकांवर आयात उमेदवार असल्याचा आरोप यावेळी लावला.

    भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील नामोजवार आणि भाजपचे उमेदवार अनिल धानोरकर यांच्यात गंभीर आरोपांचा सामना रंगला आहे. News34 शी बोलताना त्यांनी एकमेकांविरोधात गंभीर आरोप केले आहेत.

    मी भाजपची 8 वर्षे सेवा केली आणि मिळाले काय? : सुनील नामोजवार

    मागील ८ वर्षांपासून मी भाजपात प्रामाणिकपणे काम केले, भद्रावती शहरात भाजपचे अस्तित्व नसताना पक्षवाढ आणि संघटना मजबूत करण्यासाठी रात्रंदिवस एक केले नगर परिषद निवडणूक जवळ आल्यावर पक्षाने मला काम करा उमेदवारी तुम्हाला मिळणार असे आश्वासन दिले होते. मात्र दोन महिन्यापूर्वी भाजपात सामील झालेले अनिल धानोरकर यांना पक्षाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. पक्षाने माझ्यावर अन्याय केला, त्या अन्यायाला कंटाळून मी कांग्रेस पक्षात प्रवेश केला. अनिल धानोरकर यांची प्रतिमा जनमानसात चांगली नाही, ते निष्क्रिय आहेत. भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याने ते हरणारचं आहेत. अनेक वर्षांपासून नगराध्यक्ष असलेले धानोरकर यांनी काय काम केले ते सांगावे. माझ्या अडीच वर्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात अनेक विकासकामे झाली आहे त्यामुळे जनता माझ्या पाठीशी आहे.

    Read Also : ब्रह्मपुरीत इथेनॉल कंपनीत स्फोट

    मी दिवसरात्र एक करीत पक्षाचे काम करीत राहिलो आणि २ महिन्यापूर्वी भाजपात सामील झालेले अनिल धानोरकर यांना पक्षाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. पक्षाने माझ्यावर अन्याय केला, त्या अन्यायाला कंटाळून मी कांग्रेस पक्षात प्रवेश केला. अनिल धानोरकर यांची प्रतिमा जनमानसात चांगली नाही, भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याने ते हरणारचं आहे. अनेक वर्षांपासून नगराध्यक्ष असलेले धानोरकर यांनी काय काम केले ते सांगावे. माझ्या अडीच वर्षाच्या भद्रावती नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात अनेक विकासकामे झाली आहे त्यामुळे जनता माझ्या पाठीशी आहे. Sunil Namojwar vs Anil Dhanorkar

    माझ्या घरच्या लोकांनी मला साथ दिली नाही : अनिल धानोरकर

    मला भाजप पक्षाने उमेदवारी दिली, तर ती माझ्या क्षमतेनुसार मिळाली आहे, राहिला निष्ठावंतांवर अन्याय वर्ष २०१८ मध्ये नामोजवार यांनी शिवसेना सोडून भाजपात प्रवेश केला आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक माझ्याविरोधात लढले, त्यावेळी त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या निष्ठावंतांवर अन्याय झाला नव्हता काय? त्यांनी हे आधी सांगावं. भद्रावती मध्ये मी आणि माझे भाऊ दिवंगत खासदार बाळू धानोरकर मिळून शिवसेना पक्ष मोठा केला, भद्रावती नगरपरिषदेची सत्ता अनेक वर्षे आमच्या हातात होती. राज्यात सत्तांतर झाले पक्ष विखुरले. विधानसभा निवडणुकीत मी कांग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली मात्र खासदार प्रतिभा धानोरकर यांनी माझ्यावर अन्याय करीत विधानसभेचे तिकीट आपल्या भावाला दिले. Sunil Namojwar vs Anil Dhanorkar

    लोकसभा निवडणुकीत मी खासदार प्रतिभा धानोरकरांचा खूप प्रचार केला होता, प्रामाणिक कार्य करण्याचे फळ मला अन्याय स्वरूपात मिळाले. नामोजवार यांनी जो आरोप लावला आहे, त्यावर मी इतकंच बोलणार ज्यावेळी. मी भाजपात प्रवेश केला होता तेव्हा नगरपरिषदेचे आरक्षण व निवडणूक घोषित झाली नव्हती. मला उमेदवारी मिळाली ती पक्षाने केलेल्या सर्व्हेत मी आघाडीवर असल्याने मिळाली. माझ्या कार्यकाळात मी नगरपरिषदेला स्वच्छ भद्रावती मध्ये केंद्रात स्थान मिळवून दिले. असे अनेक काम मी माझ्या कार्यकाळात केली आहे, त्या कामावर जनता माझ्या सोबत आहे. असे ते news34 शी बोलताना म्हणाले.

  • Ghugghus BJP Nomination Rally । भव्य शक्ती प्रदर्शनासह आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत उमेदवारांनी दाखल केले नामांकन अर्ज

    Ghugghus BJP Nomination Rally

    Ghugghus BJP Nomination Rally : घुग्घूस १७ नोव्हेम्बर (News३४) : घुग्घूस नगरपरिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटच्या दिवशी भारतीय जनता पक्षातर्फे आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत भाजपाच्या सर्व उमेदवारांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत मिरवणूक काढली त्यानंतर  नगरपरिषद कार्यालयात पोहोचून सर्व उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी शारदा दुर्गम यांनी अधिकृतरीत्या भारतीय जनता पक्षा तर्फे अर्ज सादर केला.

    Read Also : ब्रह्मपुरीत कांग्रेस-वंचित आघाडीचे शक्तिप्रदर्शन, २४ उमेदवारांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

    सोमवारी दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुरुवात झालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण घुग्घूस शहरात निवडणुकीचा रंग आणला. बँक ऑफ इंडिया चौक, गांधी चौक आणि पंचशील चौक मार्गे जात ही रॅली थेट नगरपरिषद कार्यालयात दाखल झाली. ढोल-ताशांचा दणदणाट, घोषणाबाजी आणि भारतीय जनता पक्षाच्या विकासाभिमुख भूमिकेचा जयघोष यामुळे परिसरातील वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. पक्षाचे पदाधिकारी, महिला, युवक आणि विविध समाजघटकांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरपरिषद कार्यालयात पोहोचल्यानंतर सर्व उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण केली. Ghugghus BJP Nomination Rally

    यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, घुग्घूसची ही निवडणूक केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नसून शहराच्या भविष्याचा निर्णायक टप्पा आहे. घुग्घूसचा सर्वांगीण विकास, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व रोजगारनिर्मिती या सर्व क्षेत्रांतील प्रगती हीच भारतीय जनता पक्षाची प्राथमिकता आहे.

    ते पुढे म्हणाले, घुग्घूसमध्ये आजवर झालेल्या कामांची यादी मोठी आहे. नागरिकांनी दाखविलेला विश्वास हा आमच्या विकासकार्यासाठी महत्त्वाचा प्रेरणास्रोत आहे. भाजपाच्या उमेदवारांमध्ये प्रामाणिकपणा, काम करण्याची क्षमता आणि जनतेशी असलेला आत्मीय संवाद हीच आमची ताकद आहे.

    शारदा दुर्गम या अभ्यासू, समर्पित आणि सर्व समाजमन जिंकणाऱ्या नेत्या आहेत. त्यांच्या नेतृत्वात घुग्घूस शहर सर्वसमावेशक विकासाची नवीन उंची गाठेल, असा विश्वास आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला.

    यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, घुग्घूस शहर अध्यक्ष संजय तिवारी, विवेक बोढे, घुग्घूस निवडणूक प्रमुख प्रकाश देवतळे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, विविध आघाड्यांचे प्रतिनिधी, महिला मोर्चा व युवा मोर्चा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Ghugghus BJP Nomination Rally

    हे आहेत भाजपचे उमेदवार…

    नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार – शारदा मोहन दुर्गम, प्रभाग क्रमांक १ शास्त्रीनगर-आंबेडकर नगर प्रभाग – अ – प्रेमा तगरपवार, ब – विशाल दामेर, प्रभाग क्रमांक २ रामनगर – अ – राजकुमार गोडशेलवार, ब – सरिता इसारप, प्रभाग क्रमांक ३ अ – सुचिता लुटे, ब – शिवराजन गोहणे, प्रभाग क्रमांक ४ अ – विवेक बोढे, ब – चैताली सातपुते, प्रभाग क्रमांक ५ अ – रुपेश कोहळे, ब – पल्लवी सोदारी, प्रभाग क्रमांक ६ अ – कविता तकल्ला, ब – संतोष नुने, प्रभाग क्रमांक ७ अ – गणेश पिंपळकर, ब – मधू तिवारी, प्रभाग क्रमांक ८ अ – शीतल आत्राम, ब – प्रकाश बोबडे, प्रभाग क्रमांक ९ अ – मीना मोरपाका, ब – वैशाली ढवस, प्रभाग क्रमांक १० अ – हेमंत पाझारे, ब – नितु चौधरी, प्रभाग क्रमांक ११ अ – आशिष मासिरकर, ब – सुनीता पाटील.

  • Congress Vanchit alliance municipal elections । वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली ब्रम्हपुरीत शक्तीप्रदर्शन; नगराध्यक्ष व २४ उमेदवारांचे नामांकन दाखल

    Congress Vanchit alliance municipal elections

    Congress Vanchit alliance municipal elections : ब्रह्मपुरी १७ नोव्हेम्बर (News३४) – संपूर्ण राज्यात निवडणुकीची धामधूम सुरू असताना आज नामांकन दाखल करण्याच्या अंतिम दिनी राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारों कार्यकर्त्यांच्या साक्षीने ब्रम्हपुरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी प्रणित पॅनलचे नगराध्यक्ष पदासह एकूण २४ उमेदवारांचे नामांकन दाखल करण्यात आले.

    Read Also : माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी ला मुदतवाढ द्या – आमदार मुनगंटीवार

    आज सकाळपासूनच संपूर्ण ब्रह्मपुरी शहरांमध्ये नामांकन दाखल करण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.तर आज नामांकन दाखल करण्याच्या अंतिम दिनी विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी येथील जनसंपर्क कार्यालय ते नगरपरिषद कार्यालय पर्यंत हजारोंच्या संख्येने उपस्थितीत विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक नेते, तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ढोल ताशांच्या गजरात पदयात्रा काढून नगराध्यक्ष व नगरसेवक पदाकरिता नामांकन दाखल करण्यात आले. ब्रह्मपुरी शहरात स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी पक्षाची आघाडी झाल्याने आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांनी देखील नामांकन अर्ज सोबतच दाखल केले. Congress Vanchit alliance municipal elections

    public rally during municipal nomination

    यात नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार म्हणून योगेश मिसार यांनी नामांकन दाखल केले. तर नगर सेवक पदाकरीता प्रभाग १ (अ)सौ. काजल राजेश तलमले, (ब)चंद्रकांत ज्ञानेश्वर बावनकुळे, प्रभाग २ (अ)सौ. बबीता किशोर आमले,(ब)प्रकाश शामराव खोब्रागडे, प्रभाग ३ (अ)मनोज प्रभाकर कावळे (ब) सौ. रेणुताई राहुल ठेंगरी, प्रभाग ४ (अ) डॉ.प्रेमलाल मेश्राम (ब) सौ. जयश्री दिलीप कुथे,

    प्रभाग ५ (अ)सतिश ज्ञानेश्वर हुमने,(ब)सौ. रंजना नंदू पिसे, प्रभाग ६ (अ) हेमलता सिंहगडे (ब) जगदिश नंदूजी पिलारे, प्रभाग ७ (अ) गिता मेश्राम (ब)सचिन केवळराम राऊत, प्रभाग ८ (अ) पुष्पलता सुधाकर पोपटे,(ब)नितीन जनार्धन उराडे, प्रभाग ९ (अ)अनिल श्रीराम दोनाडकर, (ब)सौ. सपना संजय बल्लारपूरे, प्रभाग १० (अ) राकेश रामचंद्र पडोळे, (ब)सौ. ज्योती मुकुंदा राऊत, प्रभाग ११ (अ) सौ. माधुरी सोमेश्वर उपासे, (ब) सौ. रंजना गिरीश बुराडे, (क) सारंग रमेश बनपुरकर या उमेदवारांच्या समावेश आहे. Congress Vanchit alliance municipal elections


    काँग्रेस व वंचित आघाडीच्या उमेदवारांची नामांकन दाखल करतेवेळी प्रामुख्याने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्राचार्य देविदास जगनाडे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष खेमराज तिडके, शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेश कांबळे, प्रमोद चिमूरकर, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती प्रभाकर सेलोकर , प्रदेश सचिव डॉ. थानेश्वर कायरकर, जिल्हा बँक संचालक दामोदर मिसार, जिल्हा काँग्रेस सचिव वासु सोंदरकर, ऋषींजी राऊत, फाल्गुन राऊत, सोनू नाकतोडे, गाजी पटेल, इकबाल जेसानी, माजी नगराध्यक्ष वनिता ठाकूर, बालू पिसे, संजय ठाकूर, अण्णा ठाकरे,महिला काँग्रेस शहराध्यक्ष योगिता आमले, कृऊबा उपसभापती सुनीता तिडके वंचित बहुजन आघाडीचे नेते लिलाधर वंजारी, तथा तालुका काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

  • BJP candidate post of Municipal President । नगराध्यक्षपदाच्या उमेदवार; घुग्घूस नगराध्यक्षपदाकरिता शारदा दुर्गम मैदानात

    BJP candidate post of Municipal President

    BJP candidate post of Municipal President : घुग्घूस 17 नोव्हेम्बर (News34) : घुग्घूस नगरपरिषद निवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून, अंतिम टप्प्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भारतीय जनता पार्टीने नगराध्यक्ष पदासाठी आपल्या अधिकृत उमेदवार म्हणून शारदा उर्फ पूजा दुर्गम यांची निवड जाहीर केली आहे.

    Read Also : चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक, भाजपकडे इच्छुकांची गर्दी

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रमुख उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार, घुघूस शहर अध्यक्ष संजय तिवारी यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. उमेदवारी जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. शारदा दुर्गम या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व स्थानिक प्रश्नांवर सक्रिय असून, स्थानिक महिलांमध्ये त्यांचा चांगला संपर्क व कार्याचा ठसा असल्याने पक्षाने त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. BJP candidate post of Municipal President

    घुघूस शहरातील पाणीपुरवठा, रस्ते-विकास, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, रोजगाराच्या संधी अशा विविध प्रलंबित प्रश्नांना गती देण्यासाठी सक्षम व पारदर्शक नेतृत्व आवश्यक असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. घुघूसच्या सर्वांगीण विकासासाठी शारदा दुर्गम यांना नगराध्यक्षपदासाठी आम्ही अधिकृत उमेदवार म्हणून पुढे केले आहे. लोकांना विश्वास देणारे नेतृत्व देणे हाच उद्देश आहे, असेही ते म्हणाले.

    उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शारदा दुर्गम यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत, नागरिकांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. घुघूस नगरपरिषद निवडणुकीत आता भाजपने उमेदवारी स्पष्ट केल्याने राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे. इतर पक्ष आणि उमेदवारांकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.

  • BJP ticket demand for civic polls chandrapur । चंद्रपूर महानगर निवडणुकीचा जलवा; BJP तिकिटासाठी उमेदवारांची रांग वाढली

    BJP ticket demand for civic polls chandrapur

    BJP ticket demand for civic polls chandrapur : चंद्रपूर १६ नोव्हेम्बर (News३४) – आगामी चंद्रपूर महानगर पालिकेच्या निवडणुकांसंदर्भात इच्छुक उमेदवारांनी निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात आज (रविवार) पासून आवेदनपत्रे दाखल करण्यास सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी तब्बल १४२ उमेदवारांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करत आपली आवेदनपत्रे दाखल केली.

    Read Also : बल्लारपुरात नूतन दिवाणी न्यायालयाचे भूमिपूजन

    चंद्रपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले असून, आजवर प्रभागांमध्ये सातत्याने जनसंपर्क ठेवत नगरसेवक होण्याची तयारी दर्शविणारे अनेक इच्छुक आता पक्षाचा पाठिंबा मिळविण्यासाठी सक्रिय झाले आहेत. केंद्र आणि राज्यात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाकडे इच्छुकांची अधिक पसंती दिसून येत आहे.

    चंद्रपूर महानगर निवडणूक प्रमुख आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात आजपासून निशुल्क आवेदनपत्र स्वीकृतीची प्रक्रिया सुरू झाली असून, २१ नोव्हेंबरपर्यंत आवेदनपत्रे स्वीकारली जाणार आहेत. पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात इच्छुक उमेदवारांनी कार्यालयात गर्दी केली होती. आज रविवारी १४२ इच्छुक उमेदवारांनी आवेदन पत्र दाखल करत भारतीय जनता पक्षाच्या टिकिटावर निवडणुक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

  • rajura nagar parishad nomination । राजुराच्या राजकारणात रंगत! अरुण धोटे यांच्यासह सर्व उमेदवारांचे नामांकन दाखल

    rajura nagar parishad nomination

    rajura nagar parishad nomination : राजुरा १६ नोव्हेम्बर (News३४) :– राजुरा नगरपरिषदेसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी संघटना व आरपीआय समर्थित नगरविकास आघाडीच्या वतीने नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार अरूण धोटे यांनी आज दुपारी २ वाजता तहसील कार्यालय, राजुरा येथे आपला उमेदवारी अर्ज विधिवत दाखल केला.

    Read Also : निवडणुकीच्या कामात निष्काळजीपणा नको – जिल्हाधिकारी गौडा

    त्यांच्यासह नगरविकास आघाडीच्या नगरसेवक पदाचे उमेदवार प्रभाग क्र. १ मधून स्वप्नील मोहुर्ले (नामाप्र) व सौ. मंगला विरुटकर (सर्व साधारण महिला) , प्रभाग क्र. २ मध्ये सिद्धार्थ पथाडे (अनुसूचित जाती) आणि मंगलाताई मोकळे (सर्व साधारण महिला), प्रभाग क्र. ३ मध्ये ईश्वर ऊर्फ गोलू ठाकरे (सर्वसाधारण) व पोर्णिमा सोयाम ऊर्फ पोर्णिमा विजय खनके, (अनुसूचित जमाती महिला) प्रभाग क्र. ४ मधून सय्यद जहीर सय्यद नसीम (सर्वसाधारण) आणि सौ. नीता किशोर बानकर (नामाप्र महिला) , प्रभाग क्र. ५ मध्ये भाऊजी कन्नाके (अनुसूचित जमाती) व सय्यद फरिना शाकिर सय्यद(सर्वसाधारण महिला) , rajura nagar parishad nomination

    प्रभाग क्र. ६ मध्ये रमेश नडे (सर्वसाधारण) व इंदुबाई निकोडे( नामाप्र महिला) , प्रभाग क्र. ७ मधून घनश्याम हिंगणे (सर्वसाधारण) आणि पुणम गिरसावळे(सर्वसाधारण महिला) , प्रभाग क्र. ८ मधून दिलीप देरकर (सर्वसाधारण) व वज्रमाला बतकमवार (नामाप्र महिला) , प्रभाग क्र. ९ संध्या चंद्रशेखर चांदेकर (अनुसूचित जाती महिला) , अनंता ताजने (नामाप्र) आणि अन्नु हरजीतसिंग संधू (सर्वसाधारण महिला) , प्रभाग क्र. १० मधून भारत रोहणे (सर्वसाधारण) व गीता पथाडे (अनुसूचित जाती महिला) या उमेदवारांनीही नामांकन पत्र भरून निवडणूक रणशिंग फुंकले. rajura nagar parishad nomination

    congress nomination


    नामांकन दाखल करण्यापूर्वी अरूणभाऊ धोटे यांनी साईनगर वार्ड येथील जगन्नाथ बाबा देवस्थान आणि राजुराचे आराध्य दैवत भवानी माता मंदिर येथे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. त्यानंतर नगर परिषद जवळील हनुमान मंदिर येथे सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि मोठ्या समर्थकांच्या उपस्थितीत संकट मोचन हनुमानजीचे दर्शन घेतले. धार्मिक स्थळांवरील भाविक वातावरणात उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमाची सुरुवात झाली.


    तहसील कार्यालयात नामांकन दाखल करताना परिसरात कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. (arun dhote congress candidate rajura) या वेळी शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार अॅड. वामनराव चटप, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाषभाऊ धोटे, तालुकाध्यक्ष रंजन लांडे, माजी उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सभापती विकास देवाळकर, शे. संघटना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष अॅड. दीपक चटप, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनू धोटे, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा कुंदाताई जेनेकर,

    जिल्हा महासचिव एजाज अहमद, धनराज चिंचोलकर, अँड. रामभाऊ देवईकर, दिलीप देठे, कपिल इददे, मधुकर चिंचोलकर, गजानन पहानपटे, किशोर हिंगणे, किशोर ताजने, वैभव अडवे, मंगेश कोंडेकर, सय्यद जाकीर यांच्यासह काँग्रेस, शेतकरी संघटना, आरपीआय व नगरविकास आघाडीचे मान्यवर नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगरविकास आघाडीने दाखल केलेले हे नामांकन आगामी नगरपरिषद निवडणुकीत आघाडीची भक्कम एकजूट आणि जनसमर्थनाचे द्योतक ठरल्याचे निरीक्षण व्यक्त केले जात आहे.

  • village leaders joining BJP in Chandrapur । जोरगेवारांच्या नेतृत्वावर विश्वास; शेनगाव-सोनेगावातील महिला व युवकांचा भाजपात प्रवेश

    village leaders joining BJP in Chandrapur

    village leaders joining BJP in Chandrapur : चंद्रपूर १५ नोव्हेम्बर (News३४) – आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात झालेल्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वात शेनगाव येथील सरपंच पुष्पाताई मालेकर, संभाजी ब्रिगेड आणि कॉंग्रसच्या कार्यकर्त्यांसह अनेक महिला व युवकांनी शुक्रवारी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्व नवनियुक्त सदस्यांच्या गळ्यात पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे स्वागत केले.

    Read Also : कांग्रेसने चंद्रपूर मनपा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराकडून मागविले अर्ज

    यावेळी विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले, महामंत्री श्याम कनकम, सविता दंढारे, तालुका अध्यक्ष विनोद खेवले, युवा मोर्चा अध्यक्ष आशिष वाढई, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, गौरव गोहणे, गौरव ठावरी, मनोज जाधव यांची उपस्थिती होती.

    मोठ्या संख्येने झालेल्या या प्रवेशामुळे तालुक्यातील भाजपाची संघटनशक्ती आणखी बळकट झाल्याचे चित्र दिसून आले. शेनगाव येथील सरपंच पुष्पाताई मालेकर यांच्यासह सुवर्णा बोबडे, शिवानी मडावी, लता मालेकर, कमलाबाई ताजने, मीरा मासिरकर, सुनीता बादूरकर, मनिषा मासिरकर, कल्पना मेसेकर यांचा पक्षप्रवेश झाला. सोनेगाव येथील स्वप्नील बादुरकर, सोनाली वराट्रे, शुभांगी गोहणे, वैशाली बोबडे, रेखा चटकी, साधना गावडी, नमित गोहणे, स्वप्नील कोराशे, नामेश येरगुडे, गणेश काकडे, विकास गोहणे, गणेश बोबडे, अतुल पिंगे, स्वप्नील जोगी यांचा तसेच महाकुर्ला येथील रोशन भोयर, कुणाल भोयर, मनोज बोधे, हितेश वाटेकर, ओम भोयर व रजित बोबडे यांचा भाजपात प्रवेश झाला. village leaders joining BJP in Chandrapur

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आज शेनगाव, सोनेगाव आणि महाकुर्ला येथील मोठ्या संख्येने महिला, युवक आणि सरपंचांनी भारतीय जनता पक्षावर ठेवलेला विश्वास हा आमच्यासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे. भाजपा हा केवळ राजकीय पक्ष नसून विकास, पारदर्शकता आणि सामान्य नागरिकांच्या प्रगतीसाठी लढणारी सशक्त लोकशाही चळवळ आहे.

    ते पुढे म्हणाले, आपल्या प्रत्येक गावाच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. चंद्रपूर तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी गेल्या काही वर्षांत आम्ही प्रामाणिक प्रयत्न केले आणि पुढेही त्यात वाढ करत राहू. महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि युवा वर्गाला संधी देण्यासाठी भाजपा योग्य ते निर्णय घेत आहे, असेही ते म्हणाले.

      पक्षाच्या विकासाभिमुख कामावर, तसेच चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वावर ठेवलेल्या विश्वासातून हा प्रवेश झाल्याचे जिल्हा महामंत्री नामदेव डाहुले यांनी सांगितले. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

  • Chandrapur Congress candidate nomination । चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक: काँग्रेस उमेदवार अर्ज प्रक्रिया सुरू

    Chandrapur Congress candidate nomination

    Chandrapur Congress candidate nomination : चंद्रपूर १५ नोव्हेम्बर (News३४) : चंद्रपूर शहर महानगरपालिकेची निवडणूक आता तोंडावर आली असून, राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाला आव्हान देण्यासाठी इंडियन नॅशनल काँग्रेस (काँग्रेस) पक्षानेही जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार, चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया जाहीर केली आहे.

    Read Also : बिहार विधानसभेत एनडीए चा विजय, चंद्रपुरात जल्लोष

    चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संतोष लहामगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपले अर्ज दिनांक १५ नोव्हेंबर २०२५ पासून ते २० नोव्हेंबर २०२५ पर्यंत भरून द्यायचे आहेत. अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया दररोज सकाळी ११:०० ते सायंकाळी ४:०० वाजेपर्यंत चालणार आहे. उमेदवारी अर्ज मिळवण्याचे व ते भरून स्वीकारण्याचे ठिकाण युनिक फर्निचर, महात्मा गांधी पुतळ्यासमोर, गांधी चौक, चंद्रपूर हे निश्चित करण्यात आले आहे. Chandrapur Congress candidate nomination

    अर्ज सादर करताना उमेदवारांनी निश्चित केलेले शुल्क जमा करणे अनिवार्य आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि सर्व प्रवर्गातील महिला उमेदवारांसाठी हे शुल्क ₹ २,५००/- (अडीच हजार रुपये) असून, इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी ₹ ५,०००/- (पाच हजार रुपये) निश्चित करण्यात आले आहे.

    इच्छुक आणि पात्र असलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्षाच्या नियमांनुसार वेळेत अर्ज सादर करून पक्षश्रेष्ठींना सहकार्य करावे आणि पक्षाला बळ द्यावे, असे आवाहन चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने केले आहे.

  • municipal polls BJP candidate shortage । भद्रावती पालिका निवडणुकीत भाजपला उमेदवारांची वानवा

    municipal polls BJP candidate shortage

    municipal polls BJP candidate shortage : भद्रावती : राज्याच्या सत्तेत सहभागी असलेल्या भारतीय जनता पक्षाला भद्रावती नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारीवरून मोठी अडचण (गोची) निर्माण झाली आहे. शिवसेनेतून आलेल्या अनिल धानोरकर यांना पक्षात घेतल्यानंतर स्थानिक पातळीवर भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारीवरून मोठा संभ्रम आणि नाराजी पसरल्याचे चित्र आहे. या ‘आयारामां’च्या राजकारणामुळे मूळ भाजप कार्यकर्त्यांना डावलले जाण्याची भीती असल्याने अनेक इच्छुकांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्याचे वृत्त आहे.

    Read Also : घुग्गुस नगपरिषद प्रभाग क्रमांक ६ मधील मजबूत उमेदवार

    परिणामी, भाजपसमोर नगरसेवक पदाकरिता तिकीट देण्यासाठी उमेदवारांची मोठी वानवा निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे भाजपला आता आपल्या प्रतिस्पर्धी पक्षाच्या, म्हणजेच काँग्रेसच्या विद्यमान नगरसेवकांना पक्षाचे तिकीट देण्यासाठी थेट गळ घालावी लागत आहे. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या उमेदवारीची ही बिकट स्थिती दूर करण्यासाठी खुद्द आमदार करण देवतळे आणि माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे नवनिर्वाचित नेते अनिल धानोरकर यांना एका काँग्रेसच्या नगरसेवकाच्या घरी जावे लागले. या नेत्यांनी त्या नगरसेवकाला भाजपचे तिकीट घेण्यासाठी विनंती केल्याचे चित्र सध्या भद्रावतीच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहे. अनिल धानोरकर यांच्या प्रवेशानंतर भाजपला स्थानिक पातळीवर ताकद मिळेल अशी अपेक्षा होती, पण आता उमेदवारी वाटपात झालेले हे नाट्य भाजपसाठी ‘गोची’ (अडचण) ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. municipal polls BJP candidate shortage

    भाजपच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह

    एकीकडे राज्यात सत्ता स्थापनेचे आकडे गाठण्यासाठी भाजप प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना, भद्रावतीसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थेत तिकीट वाटपासाठी त्यांना ‘स्थापित’ चेहऱ्यांची ‘भीक’ मागावी लागणे, हे भाजपच्या स्थानिक संघटनेतील कमजोरीचे स्पष्ट संकेत देत आहे. भाजपच्या या रणनीतीवर आता राजकीय वर्तुळात प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या सगळ्या प्रकारामुळे भद्रावती शहरातील निवडणुकीची रंगत वाढणार असून, काँग्रेसचे ते नगरसेवक भाजपच्या विनंतीला मान देतात की नाही, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

    याउलट परिस्थिती हि चंद्रपूर शहरात आहे, भाजप कडे उमेदवार आहे मात्र तो समर्थक कुणाचा हे महत्वाचे आहे, कारण यंदाची निवडणूक हि जोरगेवार यांच्या नेतृत्वात लढणार आहे, सुधीर मुनगंटीवार यांचे संस्थक माजी नगरसेवक यांना तिकीट मिळणार कि नाही यामध्ये सध्या तरी मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.

  • Social worker Umesh Gupta public support । प्रभाग क्रमांक ६ मधून उमेश गुप्ता यांची मजबूत दावेदारी

    Social worker Umesh Gupta public support

    Social worker Umesh Gupta public support : घुग्घुस १३ नोव्हेम्बर (News३४) : राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणूका जाहीर झाल्यावर राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे, सोबतच राखीबं जागेवर उमेदवारांचा शोध राजकीय पक्ष घेत आहे. चंद्रपूर तालुक्यातील घुग्गुस नगरपरिषदेची हि पहिली निवडणूक आहे. घुग्गुस नगरपरिषदेत एकूण ११ प्रभाग असून २२ सदस्य व नगराध्यक्ष अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव करण्यात आले आहे. घुग्गुस शहरातील प्रभाग क्रमांक ६ मधून प्रस्थापित पक्षासमोर सामाजिक कार्यकर्ते उमेश गुप्ता पूर्ण तयारीनिशी उतरले आहे.

    Read Also : चंद्रपूर महानगरपालिकेचा जाहीर धुत्कार

    प्रभाग क्रमांक ६ मधून उमेश गुप्ता यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून सध्यातरी गुप्ता कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढणार याबाबत सध्यातरी माहिती नाही.

    घुग्घुस शहरात उमेश गुप्ता हे दीर्घकाळापासून एक सक्रिय समाजसेवक आणि जनहितैषी व्यक्ती म्हणून ओळखले जातात. त्यांनी अनेक वर्षांपासून प्रभाग क्रमांक 6 च्या विकास, नागरिकांच्या समस्या आणि प्रशासकीय सुधारणांबाबत सातत्याने आवाज उठवला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला लोखंडी पूल (लोहा पूल) लवकर सुरू करण्याची, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता. याच कारणामुळे ते आज सामान्य नागरिकांमध्ये एक विश्वासार्ह आणि प्रामाणिक चेहरा म्हणून ओळखले जातात. Social worker Umesh Gupta public support

    स्थानिक स्तरावर होत असलेले राजकीय बदल आणि उमेदवारांमध्ये वाढत असलेल्या चढाओढीमुळे, जनता आता विकास आणि स्वच्छ प्रतिमेच्या नेतृत्वाच्या शोधात आहे, आणि हीच बाब उमेश गुप्ता यांची उमेदवारी अधिक बळकट करत आहे.

    शहरातील अनेक सामाजिक संघटना, व्यापारी वर्ग आणि तरुणांनी त्यांच्या समर्थनात आपले मत उघडपणे व्यक्त केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, “घुग्घुसला आता अशा नेत्याची गरज आहे जो केवळ आश्वासने देणार नाही, तर स्थानिक स्तरावर काम करून दाखवेल.”

    राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, सध्याच्या परिस्थितीत नगरसेवक पदाच्या शर्यतीत उमेश गुप्ता यांची स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत झाली आहे. त्यांच्याकडे जनतेशी असलेले मजबूत जोडणी, स्वच्छ प्रतिमा आणि विकासाची स्पष्ट दृष्टी आहेत. Social worker Umesh Gupta public support

    आगामी निवडणुकांमध्ये जर हेच वातावरण कायम राहिले, तर घुग्घुस नगरसेवक पदासाठी उमेश गुप्ता यांचा दावा खूपच मजबूत ठरू शकतो. आता हे पाहणे महत्त्वाचे आहे की, उमेश गुप्ता यांना कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळते.