महाराष्ट्रातील राजकारण बातम्या (Maharashtra Politics News) आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व राजकीय घडामोडींसाठी news34.in हे आपले विश्वसनीय व्यासपीठ आहे. आम्ही तुम्हाला स्थानिक ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंतच्या प्रत्येक मोठ्या-छोट्या अपडेट्सचे कव्हरेज देतो. राजकीय विश्लेषण, पक्षांची धोरणे, नेत्यांची मते आणि महत्त्वाचे शासकीय निर्णय. कोणत्याही राजकीय बातम्या चुकणार नाहीत याची खात्री बाळगा. राजकारण या क्षेत्रातील विश्वसनीय आणि ताज्या बातम्या मिळवण्यासाठी नियमितपणे भेट द्या.
Congress leader Balasaheb Thorat threatened : चंद्रपूर : संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे झालेल्या कीर्तन कार्यक्रमात कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी “आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल” असे विधान करून बाळासाहेब थोरात यांच्यावर उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली. या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामुळे समाजात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना देण्यात आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे.
याप्रकरणी जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात निवेदन दिले. या निवेदनात संबंधित व्यक्तीवर कठोर कायदेशीर कारवाई करून तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मनीष तिवारी, भालचंद्र दानव, राहुल चौधरी, नौशाद शेख, अख्तर सिद्धिकी, प्रसन्ना सिरवार, काशिफ अली आदी कार्यकर्ते उपस्थित होते. political controversy in Maharashtra
काँग्रेसतर्फे करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे भूषण असून या संप्रदायाने नेहमीच समाजाला एकतेचा आणि कल्याणाचा संदेश दिला आहे.
मात्र काही समाजविघातक प्रवृत्ती राजकीय फायद्यासाठी या संप्रदायाचा वापर करत आहेत. अशा प्रवृत्तींना सरकारने आळा घालणे अत्यावश्यक आहे. काँग्रेसने पोलिस प्रशासनाला तातडीने गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
Aman Andhewar MNS grassroots leadership : चंद्रपूर | जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यात नवसंजीवनी आणणारा एक भव्य आणि ऐतिहासिक पक्ष प्रवेश सोहळा काल साक्षीला आला. पक्ष प्रमुख राज ठाकरे यांच्या स्पष्ट, ठाम आणि जनतेच्या मनाला भिडणाऱ्या राजकारणावर विश्वास ठेवत तसेच मनसे कामगार सेना जिल्हा अध्यक्ष अमन अंधेवार यांच्या झंझावाती नेतृत्वावर आणि तडफदार कार्यशैलीवर प्रभावित होऊन तब्बल २४ कार्यकर्त्यांनी मनसेच्या ध्वजाखाली प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा अंधेवार यांच्या चंद्रपूर कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला, ज्यामध्ये मनसेचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी उपस्थिती होती.
या पक्ष प्रवेशात विविध समाजघटक, व्यावसायिक, तरुण कार्यकर्ते, ग्रामीण भागातील नेते आणि स्थानिक पातळीवरील प्रभावी व्यक्ती एकत्र आले. यामध्ये प्रशांत जुलमे, विनोद गुप्ता, नाविन कोतले, करण चेतूलवार, संतोष सोयाम, सुधीर झाडे, गणेश सोनेकर, गणेश गोखरे, राकेश सल्लम, नितेश खनके, मयूर पावडे, नयन पेदोर, गौरव येकलवार, अशोक कातकर, श्रावण गडपल्ली, अरविंद पेंदाने, सुरज केवळ, राधाकृष्ण भोंगा, रोशन चव्हाण, संपूरणणंद चव्हाण, अभिजीत पांडे, अरविंद चंदनखेडे, ओम बावणे आणि राकेश गाडी या २४ कार्यकर्त्यांचा समावेश आहे. MNS Maharashtra organization strength
या सर्वांनी मनसेच्या विचारधारेवर पूर्ण निष्ठा ठेवत, जिल्हा पातळीवर पक्षाची पकड अधिक मजबूत करण्याची प्रतिज्ञा घेतली. या प्रवेशामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मनसेची संघटनात्मक ताकद केवळ वाढणार नाही, तर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांवरही त्याचा ठोस परिणाम होणार आहे. ग्रामीण आणि शहरी भागात मनसेचा झेंडा आता अधिक वेगाने फडकणार, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.
अमन अंधेवार यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, “मनसे म्हणजे फक्त पक्ष नव्हे, तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, स्थानिकांचा हक्क मिळवून देणारी आणि अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे. आज आमच्यात सामील झालेल्या कार्यकर्त्यांच्या पाठबळामुळे आमची ताकद अनेकपटीने वाढली आहे. येत्या काळात चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि प्रत्येक समाजघटकात मनसेचे अस्तित्व निर्माण करू.” mns adhikrut
पक्ष प्रवेश कार्यक्रमात उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमुखी घोषणा देत, स्थानिक प्रश्नांवर कठोर भूमिका घेण्याचा संकल्प केला. रोजगार, स्थानिकांना प्राधान्य, उद्योगात स्थानिकांचा सहभाग, भ्रष्टाचाराविरोधी भूमिका आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेविरुद्ध लढा या मुद्द्यांवर मनसे ठामपणे उभी राहणार असल्याचे ठरविण्यात आले.
कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
हा प्रवेश फक्त संख्येचा आकडा वाढवणारा नव्हे, तर तळागाळातील लोकांचा विश्वास जिंकणारा टप्पा असल्याचे स्पष्ट झाले. या कार्यक्रमात जुन्या आणि नव्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, एकजूट आणि लढाऊ वृत्तीचे दर्शन घडले. स्थानिक राजकारणात बदलाची चाहूल लागल्याची भावना यानंतर स्पष्ट झाली आहे. मनसेच्या या झंझावाती प्रवेशामुळे चंद्रपूरच्या राजकीय पटावर नव्या समीकरणांची बीजे रोवली गेली असून, येत्या काळात त्याचा परिणाम निवडणुकीत ठळकपणे दिसेल, अशी शक्यता आहे. Aman Andhewar MNS grassroots leadership
ही घटना केवळ पक्षासाठी नाही, तर जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात महत्त्वाचा टप्पा ठरेल, याबद्दल शंका नाही. मनसेच्या झेंड्याखाली नव्या जोमाने आणि नव्या रक्ताने पुढील लढती अधिक तीव्र होतील, हे निश्चित.
Chandrapur Metropolitan BJP Executive : चंद्रपूर – चंद्रपूर महानगर भाजपच्या कार्यकारिणीच्या पदाधिकारी व सदस्यांची नावे अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार यांनी आज जाहीर केली. यामध्ये १०१ जणांची नावे असून त्यामध्ये अनेकांना पक्ष संघटनेचा अनुभव नाही. विशेष बाब म्हणजे या कार्यकारणीत यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिकारी व सदस्यांना झुकते माप देण्यात आले आहे. Chandrapur BJP committee inexperience
अशी आहे कार्यकारणी
विधानसभा प्रमुख – दशरथसिंह ठाकूर, महिला विधानसभा प्रमुख – वंदना हातगावकर, महामंत्री – मनोज पाल, सविता दंडारे, रवींद्र गुरनुले, शाम कणकम, उपाध्यक्ष – राहुल घोटेकर, राजू गोलीवार, राजेंद्र अडपेवार (नाव घोषित होताच उपाध्यक्ष पदाचा राजीनामा), बलराम डोडानी, सुरेश तालेवार, प्रशांत चौधरी, विजय मोगरे, अनिल फुलझेले, विकास खटी, विजय पोहनकर. Chandrapur BJP new executive
सचिव – सलीम शेख, चंद्रशेखर देशमुख, प्रमोद शास्त्रकार, हरीश मंचलवार, अतुल रायकुंडलिया, अशोक आक्केवार, सुदामा यादव, पूनम तिवारी, राजेंद्र शास्त्रकार, भारती दुधाणी, विश्व्जीत शहा, कोषाध्यक्ष – अमोल शेंडे, प्रसिद्धी प्रमुख – रुपेश कोकावार, महिला मोर्चा प्रमुख – छबूताई वैरागडे, किसान मोर्चा प्रमुख – संजय बोरघाटे, युवा मोर्चा प्रमुख – मयूर हेपट, अनुसूचित जाती प्रमुख – विमल काटकर, अनुसूचित जाती प्रमुख – जितेश कुळमेथे, अल्पसंख्यांक आघाडी प्रमुख – राशिद हुसेन, ओबीसी आघाडी – विनोद शेरकी, उत्तर भारतीय आघाडी – उग्रसेन मथुराप्रसाद पांडे
कायम निमंत्रित सदस्य
हंसराज अहिर, सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, अशोक जीवतोडे, मनोहर पाउणकर, आचार्य मनीष महाराज, संजय कंचर्लावार, तुषार सोम, विजय राऊत, खुशाल बोन्डे, प्रकाश देवतळे, राजेंद्र गांधी, प्रमोद कडू, राहुल पावडे, संदीप आवारी, रवी आसवानी, देवानंद वाढई आदींचा समावेश आहे.
भाजपच्या कार्यकारणीमध्ये मुनगंटीवार-जोरगेवार व अहिर यांच्या निष्ठावंतांचा समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र प्रमुख पदाधिकारी मध्ये ज्यांना पक्ष संघटनेचा जरापण अनुभव नाही अश्याना संधी देण्यात आल्याने भाजपचे अनेक निष्ठावंत नाराज झाले आहे. ज्यांना पक्ष संघटनेचा चांगला अनुभव आहे त्यांना बाहेरून पाठिंबा अशी अवस्था तर ज्यांच्यामागे एकही कार्यकर्ते नाही अश्याना संधी अशी अवस्था भाजपच्या कार्यकारिणीची असून आगामी पालिकेच्या निवडणुकीत अनुभव नसलेली व अनुभवी कार्यकारणी चमत्कार करेल कि फटका बसणार हि तर येणारी वेळच सांगणार.
Kishor Jorgewar cycle distribution : चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून चंद्रपूरात सुरू असलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाचा समारोप विद्यार्थिनींना सायकल वाटप आणि ५५ पारंपरिक गुरूंच्या सन्मान सोहळ्याने संपन्न झाला. शकुंतला लॉन येथे पार पडलेल्या या भव्य समारोप कार्यक्रमात इयत्ता ८ वी ते १० वी वर्गातील २,०५५ विद्यार्थिनींना सायकलीचे वितरण करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील ५५ गुरूजनांचा आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सदर उपक्रमासाठी चंद्रपूर महानगरपालिकेचे विशेष सहकार्य लाभले. cycle empowerment initiative for school girls
या कार्यक्रमाला आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, उपायुक्त संजय चिद्रावार, भाजप महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, अमेरिकेतील भारतीय वैद्यानिक अनुप वाघ, संदिप बांटिया, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, रामनगर पोलिस ठाण्याचे ठाणेदार आसिफ रझा शेख, तुषार सोम, प्रकाश देवतळे, अजय जयस्वाल, नामदेव डाहुळे, मंडळ अध्यक्ष रवी जोगी, सुभाष आदमाने, रवी गुरनुले, वंदना हातगावकर, सविता दंढारे, आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले कि ,एकूण १०,००० सायकली वाटप करण्याचा संकल्प आम्ही केला आहे. मुलींच्या चेहऱ्यावरचे हसू हेच या उपक्रमाच्या यशाचे प्रतीक आहे. शिक्षण हा तुमच्या आयुष्याचा पाया आहे. आज तुमच्या हातात सायकल आहे, ती केवळ वाहन नाही, तर शिक्षणाच्या दिशेने वेग देणारे साधन आहे. मनापासून शिक्षण घ्या, आई-वडिलांचे आणि शिक्षकांचे ऐका. सोशल मीडियाच्या आहारी न जाता ज्ञानाच्या जवळ रहा. स्वप्न मोठी ठेवात प्रामाणिक मेहनत ठेवा असे ते म्हणाले. girls bicycle distribution event Chandrapur students
पडोली, संजय नगर या टोकावरच्या भागातून मुली शहरात पायदळ शाळेत जाताना पाहून मी गरजू विद्यार्थिनींसाठी सायकल वाटपाचा संकल्प केला होता. आज तो पूर्ण करताना समाधान वाटते. मतदारसंघातील सुमारे ८८ शाळांमधून २,०५५ पात्र विद्यार्थिनींची निवड करण्यात आली. पण यातच थांबायचं नाही – १० हजार सायकली वाटण्याचे आपले उद्दिष्ट आहे. परिस्थितीमुळे शिक्षण थांबू नये म्हणून अम्मा की पढ़ाई या उपक्रमातून आम्ही २८४ विद्यार्थ्यांना निशुल्क दर्जेदार शिक्षण देत आहोत असेही त्यांनी सांगितले. Kishor Jorgewar cycle distribution
सेवा सप्ताहाच्या निमित्ताने गेल्या आठवडाभरात आपण विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम राबवले. मात्र, आजच्या कार्यक्रमातील विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरचे आनंदाचे हास्य आणि नव्या आशेचा प्रकाश पाहून आमचाही सारा थकवा दूर झाला असून, अशा सामाजिक उपक्रमांना अधिक जोमाने गती देण्याची उर्जा मिळाली असे ते म्हणाले. कार्यक्रमात मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला विद्यार्थिनींसह पालक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. Kishor Jorgewar cycle distribution
४०० पेक्षा अधिक उपक्रमांतून साजरा झाला सेवा सप्ताह; ३ हजार रक्तदात्यांचे योगदान
सेवा सप्ताह अंतर्गत ४०० हून अधिक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये मतदारसंघात घेण्यात आलेल्या ५५ रक्तदान शिबिरांमध्ये ३ हजारांहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी दाखवली. हे चंद्रपूरातील आजवरचे सर्वात मोठे रक्तदान अभियान ठरले.
तसेच, ७५ मंदिरांमध्ये महाआरती, ७९ ठिकाणी योग शिबिर, ६८ ठिकाणी वृक्षारोपण, १७ ठिकाणी शालेय साहित्य वाटप, रोजगार मेळावे, कर्तव्य सेतूचे उद्घाटन, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, स्वच्छता अभियान, सामूहिक सूर्यनमस्कार, महाआरोग्य शिबिरे, राज्यातील सर्वात मोठ्या प्राचीन शिवलिंगाचा रुद्राभिषेक, कावड यात्रा, डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन, अम्मा संस्कार केंद्र, कार्यकर्ता मेळावे, पक्षप्रवेश कार्यक्रम, तसेच विविध धार्मिक स्थळी सामाजिक उपक्रम अशा अनेक सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. Kishor Jorgewar cycle distribution
५५ पारंपरिक गुरूंचा सन्मान..
समारोपाच्या दिवशी मंगळवारी, विविध पारंपरिक आणि व्यावसायिक क्षेत्रांतील ५५ गुरूजनांचा सत्कार आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आला. या सत्कार प्राप्त गुरूंमध्ये वकिली क्षेत्रातील रविंद्रजी भागवत, गायनिक डॉ. उषा अरोरा, योगगुरु शशिकांत मस्के, कथ्थक गुरू चारुशिला फेकडे, गरबा शिक्षक गुरुरूप मसराम, भरतनाट्यम शिक्षक प्रशांत कत्तूरवार, शिल्पकार सुहास ताटकंटीवार, शिंपी वर्गातील उबाळकर, आदर्श शिक्षिका विजया मुलकावार, दाई अरुणा सामंतपल्लीवार, लाठी-काठी शिक्षिका खोब्रागडे, हॉकी प्रशिक्षक जनक खान पठाण, इलेक्ट्रिशियन नरेश वानखेडे, ग्रामगीताचार्य अण्णाजी ढवस, हरिपाठ गुरू सिंधु चौधरी, स्वामी समर्थ संस्कार केंद्राचे सुधाकर टिपले, टायपिंग शिक्षिका विजया कोटकर, वेल्डर राजू वाहाडे, योग शिक्षिका सुवर्णा लोखंडे, वेटलिफ्टिंग प्रशिक्षक नरेश भुते, न्हावी शंकर चावके यांच्यासह इतर गुरूंचा समावेश होता.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, कोणत्याही समाजाची खरी प्रगती ही रस्ते, इमारती, सुविधा यावर नव्हे, तर संस्कार, शिक्षण, मूल्य आणि मार्गदर्शनावर अवलंबून असते. हे कार्य पार पाडणारे गुरू केवळ शाळांपुरते मर्यादित नाहीत. कला, क्रीडा, आरोग्य, अध्यात्म, शेती, समाजसेवा यांसारख्या सर्वच क्षेत्रातील मार्गदर्शक हेही समाजाचे ‘गुरू’ आहेत. आजचा हा सन्मान म्हणजे त्यांच्याप्रती कृतज्ञतेचा आणि आदराचा मुजरा असल्याचे ते यावेळी म्हणाले. 55 traditional gurus honor ceremony Chandrapur
sudhir mungantiwar latest news chandrapur : चंद्रपूर- छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं आधी आपण लंडनला जाऊन बघायचे अन् परत यायचो. ते भारतात आणण्याचे काम आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केले. ही वाघनखं त्यांनी पहिल्यांदा सातारा येथे आणली. सातारा ही मराठ्याची राजधानी होती. भाऊंनी सातारकरांचा मानसन्मान ठेवला. नाहीतर ही वाघनख ते पहिले नागपूरलाही घेऊन जाऊ शकले असते, तो त्यांचा अधिकारही होता. पण त्यांनी आधी साताऱ्याची ओळख ठेवली. मग वाघनखांचा पुढचा प्रवास सुरू झाला. सातारकर म्हणून आम्हाला सुधीरभाऊंबद्दल प्रचंड आदर आहे, असे गोरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री मा.ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी काढले.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे शनिवारी (२६ जुलै) चंद्रपूर येथे आगमन झाले. यावेळी त्यांनी राज्याचे माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानी भेट दिली. आ.मुनगंटीवार यांनी आपल्या परिवाराच्यावतीने आणि चंद्रपूरकरांच्यावतीने त्यांचे जोरदार स्वागत केले. या प्रसंगी आ.मुनगंटीवार परिवाराकडून बांबूपासून साकारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती आणि लाकडापासून तयार केलेली तलवार देऊन त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी ते बोलत होते. sudhir mungantiwar contribution to chandrapur development
याप्रसंगी आमदार श्री सुधीर मुनगंटीवार, सौ.सपनाताई मुनगंटीवार, आमदार देवराव भोंगळे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार अतुल देशकर, जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल,राहूल पावडे, प्रमोद कडू, राजेंद्र गांधी, विजय राऊत, सुरज पेदूलवार, प्रज्वलंत कडू, डॉ. मंगेश गुलवाडे, अल्काताई आत्राम, किरण बुटले, सविता कांबळे, मीनाताई देशकर, नम्रता ठेमसकर, सर्व तालुका अध्यक्ष, भाजपा शहर व ग्रामीणचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ना.शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, सुधीरभाऊ फक्त आमदार किंवा माजी मंत्री नाहीत, तर ते आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात आम्ही सर्व जण राज्यात काम करतोय. त्यांचे स्थान आमच्या सर्वाच्या दृष्टीने फार वरचे आणि महत्वाचे आहे. मी सुधीरभाऊंएवढा दांडगा अभ्यास आणि वक्तृत्व शैली आजवर बघितली नाही. इतिहास आणि वर्तमान स्थितीचा अभ्यास, प्रत्येक विषयाची आकडेवारीनिशी अचूक माहिती, हे भाऊंकडे बघूनही शिकणे शक्य नाही. आपण फक्त प्रयत्न करू शकतो. सुधीरभाऊंकडे बघून जेवढे शिकता येईल, तेवढे शिकण्याचा माझा प्रयत्न असतो. सुधीरभाऊ कुठल्या मंत्र्यांकडे, अधिकाऱ्याकडे किंवा एखाद्या विभागातही गेले. तरी सगळे अलर्ट मोडमध्ये येतात. भाऊंना काहीही उत्तर देऊन चालत नाही. जे कायद्यात असेल तेच त्यांना पाहिजे. विधानसभेतही आम्ही बघितलं की सरकारची, मंत्र्यांची चुकही ते दाखवतात, असे ना.शिवेंद्रराजे यांनी सांगितले. sudhir mungantiwar
लोकांसाठी आपल्याला काम करायचं आहे. भाजप आणि इतर पक्षांमध्ये हाच फरक आहे, आपल्यासाठी नाही तर ज्यांनी आपल्याला निवडून दिले, त्यांच्यासाठी काम करायचे आहे. त्याप्रमाणे काम झाले पाहिजे. अधिकाऱ्यांसाठी चंद्रपूर आणि गडचिरोली पहिले शिक्षा समजले जायचे. पण आता उलटं झालं आहे. भाऊंचे नेतृत्व असल्यामुळे विकास वेगाने झाला आहे. हा परिसर आता दुर्लक्षित राहिलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री फडणवीस, केंद्री मंत्री नितीन गडकरी आणि सुधीर मुनगंटीवार या नेत्यांनी या परिसराला नवी ओळख दिली. मंत्री झाल्यापासून असं स्वागत अद्याप कुणीही केलं नाही, हे त्यांनी आवर्जून नमूद केलं. sudhir mungantiwar latest news chandrapur
मा.सुधीरभाऊंच्या सुचनेप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यातील रस्ते, पूल सर्व कामे मार्गी लाऊ, असे आश्वासन देत त्यांनी आ.मुनगंटीवार यांना सातारा येथे प्रतापगड आणि सज्जनगडला येण्याचे निमंत्रण दिले.
यावेळी आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवेंद्रराजे यांनी त्यांच्या चंद्रपूर जिल्हा दौऱ्यात पहिली भेट सुधीर मुनगंटीवार यांची घेतल्याबद्दल त्यांच्या नम्रतेचे कौतुक करीत आभार मानले. आपल्या सहकारी आमदाराच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त करणं, हे खरं तर नम्रतेचं आणि मोठेपणाचं लक्षण आहे, असं ते म्हणाले. sudhir mungantiwar
एकच राजा
श्रीमंत शिवेंद्रराजे भोसले छत्रपती शिवरायांचे वारसदार आहेत. महाराजांच्या १३व्या पिढीचा वारसा चालवणारे आहेत. आपण मावळे म्हणून १३व्या पिढीतील शिवभक्त आहोत. ते घरी आल्यामुळे आज अत्यानंद झाला. आपसूक ‘जय भवानी जय शिवाजी’चा जयघोष निघत होता. या शब्दांमध्ये इतकी शक्ती आहे की, एक बेशुद्ध व्यक्तीसुद्धा शुद्धीवर येईल. १२ गडकिल्ले युनेस्कोकडे प्रस्ताव पाठविण्यासाठी इतर देशातील लोक बैठकीत बसले होते. तेव्हा आम्ही छत्रपतींचे वैशिष्ट्य सांगितले. आजवर झालेल्या सर्व राजा महाराजांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज सर्वार्थाने वेगळे राजे होऊन गेले. कारण सर्व राजे ‘हे माझे राज्य आहे..’, असे म्हणायचे. पण छत्रपती शिवराय म्हणायचे की ‘हे रयतेचे राज्य आहे..’, असे सांगणारा आणि माननारा हा एकच राजा होऊन गेला, असे आमदार मुनगंटीवार यांनी सांगितले. sudhir mungantiwar latest news chandrapur
छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर
आ.मुनगंटीवार पुढे म्हणाले,छत्रपतींच्या १२ गडकिल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांत समावेश करण्यात आला आहे. यासाठी आम्ही आपले सर्वस्व पणाला लावले होते. छत्रपतींच्या सर्व किल्ल्यांवरील मातीचा कण अन् कण जगातल्या कुठल्याही धातुपेक्षा महागडा आहे. कारण धातुपासून महागड्या वस्तू बनवता येतील. पण या मातीच्या कणाकणांतून माणूस घडवता येतो. या मातीची किंमत केवळ भारत देशच नाही, तर जगातील सर्वच देश मानतात. आता तर दरवर्षी छत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा रायगडावर सरकारच्यावतीने साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. महाराजांनी ज्या वाघनखाने अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला, ते वाघनख व्हिक्टोरीया अल्बर्ट म्युझीअमने आपल्याला तीन वर्षांसाठी दिले आहेत. वाघनख येथेच कायम रहावे, हा आपला पुढचा प्रयत्न असणार आहे. sudhir mungantiwar latest news chandrapur
शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे महत्वाचे खाते आहे. शिवेंद्रराजे यांना चांद्यापासून ते बांद्यापर्यंत रस्ते आणि टनेल बांधायचे आहेत. छत्रपतींच्या मातोश्री आपल्या विदर्भाच्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे जिजाऊंचे माहेर आहे. आजही तेथे त्यांचा वाडा दिमाखात उभा आहे. तेथे भव्य शिवसृष्टी उभारली जाते आहे, असे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
MNS rural expansion in Chandrapur district : बल्लारपूर – महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात बल्लारपूर तालुक्यातील ग्रामीण भागातून मनसे मधे भव्य पक्षप्रवेश करण्यात आला.मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक युवक आणि नागरिकांनी मनसे चा झेंडा हाती घेतला.
विसापूर येथील चुना भट्टी वॉर्ड क्र.६ येथे पार पडलेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमात नागरिकांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला. या वेळी आर्यन कोढापे, मुकेश अढिल, अमर नाग, सनी गुप्ता, गणेश भुजबळ,सुकणे मुजा, मनीष यादव, इंदू यादव,संगीता अत्राम, जयदीप अझिल, सुभाष कश्यप, गीता गुप्ता,विजेता मेश्राम यासह अनेक कार्यकर्ते मनसेत दाखल झाले.
या पक्षप्रवेशामुढे जिल्हात मनसेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून खासकरून ग्रामीण भागात मनसेला मिळणारा पाठिंबा लक्षवेधी ठरत आहे. अमन अंधेवार यांच्या सक्रिय कार्यामुळे आणि जनतेशी थेट संपर्कामुळे मनसेकडे आकर्षण वाढले असल्याचे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले. Aman Andhewar MNS leadership Ballarpur
या वेळी जनहित सेना जिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे ,जनहित सेना तालुका सचिव राजू लांडगे, प्रतीक चिकाटे, राकेश जवादे, अमन थुल, आसिफ कुरेशी, सह आदी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन यशस्वीपणे पार पडले असून, येत्या काळात संपूर्ण जिल्हाभरात मनसेच्या कार्यात अधिक जोमाने भर पडेल, असा विश्वास मनसे पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांच्या कार्यालयात सर्व विजय संचालकांचा सत्कार
BJP strategy in cooperative bank elections : तब्बल १३ वर्षांनंतर पार पडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे ११ सदस्य संचालक म्हणून निवडून आले आहेत. तर ३ संचालक भाजप पुरस्कृत आहेत. या निवडणुकीसाठी आमदार किर्तिकुमार भांगडिया आणि आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रभावी रणनिती आखली होती. काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या बँकेत आता (bjp)भारतीय जनता पक्षाचा अध्यक्ष बसेल, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
या विजयानंतर आमदार किशोर जोरगेवार यांच्या चंद्रपूर येथील जनसंपर्क कार्यालयात सर्व नवनियुक्त संचालकांचा आमदार जोरगेवार (kishor jorgewar) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गांधी चौक येथे फटाके फोडून जल्लोष साजरा करण्यात आला. cdcc bank chandrapur
१३ वर्षानंतर निवडणूक
जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक मागील १३ वर्षांपासून रखडली होती. मात्र, न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. काँग्रेसचे दीर्घकाळ वर्चस्व असलेल्या या बँकेच्या निवडणुकीत यंदा भाजपने सर्व ताकद पणाला लावत, आपल्या विचारसरणीच्या उमेदवारांना रिंगणात उतरवले. या दरम्यान अनेक राजकीय घडामोडी घडल्या. आमदार भांगडिया आणि आमदार जोरगेवार यांनी काटेकोर नियोजन करत रणनीती आखली होती.
काल (१० जुलै) रोजी मतदान पार पडल्यानंतर आज (११ जुलै) निकाल जाहीर झाला. यात भारतीय जनता पक्षाचे सुदर्शन निमकर, संजय डोंगरे, नंदा अल्लूरवार, गजानन पाथोडे, यशवंत दिघारे, उल्हास करपे, प्रा. डॉ. ललित मोटघरे, आवेश पठाण, गणेश तर्वेकर, रोहित बोमावार, निशिकांत बोरकर, हे उमेदवार संचालक म्हणून विजयी झाले आहेत.
या यशानंतर आमदार किशोर जोरगेवार यांच्या नेतृत्वाखाली चंद्रपूर जनसंपर्क कार्यालयात मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. सर्व नवनियुक्त संचालकांचा सत्कार करण्यात आला असून, या विजयामुळे जिल्हा बँकेतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
चंद्रपूर जिल्हा बँकेची 100 वर्षांपूर्वी कै.धनंजयराव गाडगीळ यांचे प्रेरणेतून कै. श्रीराम जाणी,बाबा आमटे ,जा.या.पाटील, श्रीधर पद्मावार, केशवराव नाकाडे या सारख्या श्रद्धेय मान्यवरांनी स्थापना केली होती. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सहकारास फार मोठा ईतिहास आहे. ही निवडणूक सोपी नव्हती. दीर्घकाळ काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या बँकेत भाजपच्या विचारसरणीची मुहूर्तमेढ रोवायची होती. त्यासाठी आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने काम केले.
आपल्याला आता या बँकेच्या कारभारात पारदर्शकता आणायची आहे, शेतकरी, कामगार, छोटे उद्योजक आणि सर्वसामान्य सदस्य यांना न्याय द्यायचा आहे. बँकेचा विकास, अर्थसहाय्य योजना, कर्ज वितरणात पारदर्शकता आणि गरीब, वंचित घटकांसाठी अर्थसहाय्य या सगळ्या गोष्टींसाठी आपण काम करणार आहोत असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. सदर निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रकाश देवतळे, मनोहर पाहूनकर, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, राजू पाटील झाडे, आमीन धामण्णी यांच्यासह भारतीय जनता पार्टीतील सहकार क्षेत्रातील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांचे सहकार्य लाभले.
AAP election campaign in Maharashtra : आम आदमी पार्टी येत्या काळात चंद्रपूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि नगर पंचायत निवडणुका कोणत्याही युतीशिवाय लढवेल आणि चंद्रपूर जिल्ह्यात त्याची अधिकृत तैयारी सुरू झाली आहे अशी घोषणा महाराष्ट्र प्रभारी दिल्ली आमदार प्रकाश जारवाल यांनी पत्रकार परिषदेत केली.
आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आगामी निवडणुका लक्षात घेऊन त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचा कार्यभार सोपवला आहे. त्यांनी दिलेली जबाबदारी पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका आयोजित केल्या जात आहे. बैठकां मध्ये पार्टीला मजबूत करणे, निवडणूक रणनीती ठरवणे, आप चे काम लोकांपर्यंत पोहोचवणे, त्यासाठी जनजागृती करणे, सर्वसामान्यांशी संपर्क वाढवणे, शहरातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी अधिकायांशी संपर्क साधणे याची कार्यकर्त्यांना माहिती देण्यात आली. aam aadmi party Maharashtra 2025 elections
चंद्रपूर शहरात ४५० कोटींची अमृत कलश योजना आणली गेली पण अनेक घरांपर्यंत पाणी पोहोचत नाही आहे. निवडणुकीदरम्यान भाजपने दिलेली सर्व आश्वासने फोल ठरत आहेत. सांडपाणी योजनेत मोठा घोटाळा झाला आहे. सरकारी निधीचा वापर जनतेच्या गरजा आणि सेवा पूर्ण करण्यासाठी करण्याऐवजी येथील लोकप्रतिनिधी त्याचा वापर विशेष व्यक्तींच्या घरांचे रक्षण करण्यासाठी करत आहेत. कोणत्याही प्रकारच्या विकासकामांच्या निविदा स्थानिक लोकप्रतिनिधीच्या जवळच्यांना दिल्या जात आहेत. यामध्ये अनेक प्रकारचे भ्रष्टाचारही समोर येत आहेत.
शहरातील बहुतेक सरकारी शाळा जीर्ण अवस्थेत आहेत, रस्ते खराब आहेत, मूलभूत सुविधा पुरविल्या जात नाही आहे, सरकारी रुग्णालयातील महत्त्वाच्या मशीना बंद स्थितित आहेत परंतु स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पुरेशा सुविधा मिळत नाहीत. लोकांपर्यंत पोहोचणाया योजनांऐवजी त्या फक्त कागदावरच राहिल्या जात आहेत असा आरोप आमदार जारवाल यांनी केला. लोकशाही, विकास कामांमध्ये पारदर्शकता आणि जनहितासाठी काम करण्यासाठी ‘आप’ने राज्यातील सर्व जागांवर उमेदवार उभे करून कोणत्याही युतीशिवाय निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. upcoming Zilla Parishad elections 2025 Maharashtra
पत्रकार परिषदेला अजित फाटक, भूषण ठाकूरकर, सुनील मुसळे, योगेश गोखरे, राजू कुडे, मयूर राईकवार, तबस्सुम शेख आदी उपस्थित होते.
Maharashtra Navnirman Kamgar Sena : चंद्रपूर :-जिल्ह्याच्या उद्योगात स्थानिक मराठी कामगारांना मोठया प्रमाणात कंपनी व्यवस्थापनाकडून जाणीवपूर्वक त्रास दिला जात असून जर कुणी मराठी कामगार आपल्या हक्कासाठी लढायला पुढे आला की त्याला कुठलीही नोटीस किंव्हा सूचना न देता कंपनी गेटच्या आत येण्यास मनाई केली जाते असाच प्रकार डालमिया कंपनीत घडला.
सुरुवातीला कंपनीने तीन कामगारांना कामावरून कमी केले कारण त्या तीन कामगारांना यासाठी कामावरून कमी केले की तें महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात मनसेच्या यूनियन मध्ये दाखल झाले, या दरम्यान तब्बल 30 कामगारांना कामावरून कमी केल्याने मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी केंद्रीय जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त यांच्याकडे तक्रार केली मात्र कंपनी व्यवस्थापन मानायला तयार नव्हते.
कामगारांनी मानले मनसेचे आभार
शेवटी दिनांक 7 जुलै ला कंपनी चे अधिकारी आणि मनसे पदाधिकारी यांची कामगारांसह आयुक्ताकडे बैठक झाल्यानंतर कंपनी मधून काढून टाकलेले 30 कामगार उद्यापासून कामावर घेण्याचा निर्णय झाल्याने कामगारांनी आनंद व्यक्त केला. workers reinstated after legal battle
या वेळी मनसे कामगार सेनेकडून अँड कल्याण कुमार यांनी बाजू मांडली तर त्यांचे सोबत मनसे विधी विभाग जिल्हाध्यक्ष अँड अजित पांडे यांनी कामगारांच्या मुळ मागण्या संदर्भात पक्षाची भूमिका मांडली, यावेळी मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचे सह मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, मनसे वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष सुनील गुढे व डालमिया कंपनीच्या चिअर इंडिया या कंत्राटी कंपनीचे कामगार मोठ्या संख्येने उपास्थित होते, दरम्यान कामगारांच्या प्रमुख मागण्या संदर्भात लवकरच केंद्रीय सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात निर्णय लागेल असे सांगण्यात आले आहें.
high budget wall for private land protection : चंद्रपूर – सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, अशी एक म्हण आहे मात्र या सत्तेविरोधात चंद्रपूर आम आदमी पार्टीने नाल्यावरील संरक्षक भिंतीच्या बांधकामाचा मुद्दा चंद्रपुरातील नागरिकांच्या लक्षात आणला, चंद्रपुरात वारंवार येणाऱ्या पुराने नागरिक त्रस्त आहे मात्र त्याच निराकरण न करता स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी आपल्या मित्राच्या जागेवर पुराचं पाणी येऊ नये याकरिता शासकीय निधीचा वापर करीत तब्बल ९५ लक्ष रुपयांची संरक्षक भिंत उभारली. या मुद्द्यावर २ जुलै रोजी अधिवेशनात भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार व आमदार विजय वडेट्टीवार यांनी त्या भिंतीवरून मंत्री संजय राठोड व आमदार किशोर जोरगेवार यांना चांगलंच घेरलं. high budget wall for private land protection
चंद्रपूर शहरातील हवेली गार्डन रस्त्यावरील नाल्यालागत बांधलेल्या संरक्षण भिंतीमुळे आमदार किशोर जोरगेवार व भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आलेला आहे. जोरगेवार यांनी शासकीय निधीचा वापर करून स्वतःच्या व मित्राच्या भूखंडासाठी संरक्षक भिंत बांधण्याचा आरोप आहे. याच संदर्भात मुनगंटीवार यांनी आज पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे. high budget wall for private land protection
शहरातील हवेली गार्डन परिसरातील नाल्याच्या डाव्या बाजूला पुराचे पाणी वस्तीत येऊ नये यासाठी 140 मीटर लांबीची भिंत बांधण्यात आली आहे. ज्याचा खर्च जवळपास ९५ लाख रुपये आहे. पाटबंधारे विभागाकडून हे बांधकाम करण्यात आले असून महापालिकेचे नाहरकत प्रमाणपत्र यासाठी घेण्यात आले नाही, व नाल्यात अतिक्रमण करून नियम तोडल्याचा आरोप आहे. ही भिंत फक्त दोन भूखंडाचे स्वरक्षण करते त्यापैकी एक जोरगेवार यांचे मित्र यांच्याशी संबंधित आहे. मात्र दुसऱ्या बाजूला जास्त लोकवस्ती असताना कमी लोकवस्ती असलेल्या ठिकाणी इतका खर्च का? असा प्रश्न उपस्थित करत आम आदमी पक्षाने जिल्हाधिकाऱ्यांकडे २५ मार्च रोजी तक्रार दाखल केली होती. आप च्या या गंभीर तक्रारीवर माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पावसाळी अधिवेशनात प्रश्न विचारला. AAP exposes corruption in Chandrapur
आ. सुधीर मुनगंटीवार
याच प्रश्नाला घेऊन मुनगंटीवार यांनी विधानसभेत मंत्र्यांना धारेवर धरत बांधकाम करणाऱ्या अभियंताला निलंबित करणार का असा प्रश्न उपस्थित केलाय यामुळे चंद्रपूर भाजप मधील जोरगेवार व मुनगंटीवार यांच्यातील गटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे.
आ. विजय वडेट्टीवार
याच प्रश्नाचा आधार घेत काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते आ. वडेट्टीवार यांनी मंत्र्यांनी मोका चौकशी करावी ही भिंत फक्त निकटवर्तियांसाठी बांधण्यात आली असून फक्त एक व्यक्तीला व त्याच्या जागेला संरक्षण देण्यासाठी हा ९५ लाखांचा निधी खर्च करण्यात आल्याचं सांगत दोषींवर कारवाई करणार आहात का असा प्रश्न उपस्थित केला आहे.
संजय राठोड मंत्री जलसंपदा
भिंत चुकीच्या ठिकाणी बांधली अस नाही आहे, माझ्याकडे गुगल मॅप लोकेशन आहे. दोन्ही बाजूने लोकवस्ती आहे. जिल्हा नियोजनातून पुन्हा कामे प्रस्तावित असून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून कारवाई करू
आ. किशोर जोरगेवार –
Vo – हा प्रश्न माझ्या मतदारसंघातील आहे. या नाल्यावर नवीन तीन कामे प्रस्तावित आहे. ज्यांची निविदा सुद्धा निघाली आहे. ज्या ठिकाणी मागणी होत असते तिथं काम केलं जाते. त्याठिकाणी झोपडपट्टी धारकांनी मागणी केली होती. त्यानंतर सदर भिंतीचे निर्माण करण्यात आले. high budget wall for private land protection
२ जुलै रोजी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी याबाबत पत्रकार परिषद घेत आमदार जोरगेवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली, राईकवार म्हणाले कि ज्याठिकाणी लोकवस्ती आहे तिथे हि संरक्षक भिंत बांधण्यात आली नाही, जोरगेवार यांनी मित्राच्या बंगल्याकरिता या भिंतीचे निर्माण शासकीय निधीतून केले आहे, विशेष बाब म्हणजे नाल्याची मूळ रुंदी हि ८ मीटर होती, संरक्षक भिंत नाल्यावर अतिक्रमण करीत बांधल्याने हा नाला आता ४ मीटर चा शिल्लक आहे, याबाबत आम आदमी पक्षाने जलसंधारण विभागात तक्रार दाखल केली होती, लोकवस्ती मध्ये दरवर्षी पावसाचे पाणी शिरते मात्र त्या दिशेला भिंतीचे बांधकाम करण्यात आलेले नाही. Chandrapur flood risk due to wall
शासकीय निधीचा गैरवापर करून सदर भिंतीचे बांधकाम करण्यात आले असल्याने या प्रकरणात सहभागी शासकीय व लोक प्रतिनिधी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे, प्रकरणातील दोषींकडून ९५ लाख रुपये वसूल करण्यात यावे. अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली. आयोजित पत्रकार परिषदेत आप चे प्रदेश सह सचिव सुनील मुसळे, युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, संगठन मंत्री संतोष बोपचे, शिक्षक जिल्हाध्यक्ष एकनाथ हांडेकर उपस्थित होते.