chandrapur pollution चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन मधील आधीच 2 जुने संच राख ओकत असताना गेल्या 22 महिन्यापासून चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशनचे नवे संच क्रमांक 8 व 9 हे प्रचंड धूळ व राख ओकत आहे. त्यामुळे दररोज हजारो टन राख शहरावर फेकल्या जात आहे.
chandrapur pollution स्टेशन व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला तक्रार करूनही अजूनही त्यावर कारवाही केल्याचे दिसत नाही. विशेष म्हणजे निवडणूक प्रचार सुरु असूनही प्रशासन,भावी आमदार,राजकीय पक्ष आणि शहरातील जागरूक मतदार कुणीही ह्याकडे लक्ष देत नसल्यामुळे कुणालाच प्रदूषण आणि आरोग्य हा महत्वाचा विषय वाटत नसल्याचे आश्चर्य वाटत आहे.अशी खंत ग्रीन प्लानेट सोसायटी अध्यक्ष सुरेश चोपणे यांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.
प्रचार करीत असताना वीज गेली आणि शिवानी वडेट्टीवार यांचा संयम सुटला
सध्या हिवाळा असल्याने वारे उत्तरेकडून दक्षिणेकडे येत आहे,नेमके ह्याच महिन्यात थर्मल पॉवर स्टेशनचे नवीन संच इ एस पी च्या बिघाडामुळे २ ते ३ महिन्यापासून प्रचंड राख ओकत आहेत.प्रदूषण नियंत्रण कायद्या प्रमाणे ही प्रचंड राख सोडणे हा गुन्हा ठरतो. chandrapur pollution
आधीच जुने ५ संच प्रचंड राख ओकीत असताना ह्या नव्या संचातून राख बाहेर येणे अपेक्षित नाही. सुरेश चोपणे यांनी अनेकदा स्टेशन प्रशासनाशी आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाकडे बोलून आणि लेखी तक्रारी दिल्या आहेत.
परंतु थर्मल प्रशासनाने सर्व कामे ठेकेदारी पद्धतीने दिले असल्याने तिथे सर्वत्र गोंधळ सुरु आहे आणि पर्यावरणाचे निःयम पाळल्या जात नाही.परंतु ह्याचा दुष्परिणाम निष्पाप चंद्रपूर कराना भोगावे लागत आहे. chandrapur pollution
कांग्रेस उमेदवार प्रवीण काकडे यांची उमेदवारी रद्द करा
दररोज हजारो टन राख शहरावर आणि लोकाच्या नाका-तोंडात जात असून पर्यावरणाला आणि चंद्रपूरच्या लोकांना विविध रोगांना बळी पडावे लागत आहे.
सध्या निवडणुकांचा प्रचार सुरु आहे.परंतु निवडनुकीत राजकीय पक्ष,उमेदवार प्रदूषणाचा मुद्दा घेत नाही आणि नागरीक सुद्धा हा जीवघेणा मुद्दा उचलायला तयार दिसत नाही. प्रशासन देखील कारवाई करीत नाही ही खेदाची बाब आहे. आता नागरिकांनीच प्रदुषना विरोधात मोर्चे आणि आंदोलन केले पाहिजे, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ह्यांना जबाबदार धरले पाहीजे. chandrapur pollution
विदेशात अशी घटना असती तर लोकांनी मोर्चे काढले असते. लोक,लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या उदासीनते बाबत ग्रीन प्लानेट सोसायटीच्या वतीने खंत व्यक्त करण्यात आली आहे.
चंद्रपूर चा हवा गुणवत्ता निदेशांक खराब – गेल्या महिन्यापासूनच्या थर्मल पॉवर स्टेशन च्या राखेमुळे शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक ( AQI ) खराब झाला आहे.
तो २३ तारखेपासून वाईट श्रेणीत असून निर्देशांक २०० ते २१३ पर्यंत होता.आणि नोव्हेंबर महिन्याच्या १ ते १२ तारखेपर्यंत सुद्धा निर्देशांक खराब श्रेणीत १४१ ते २०० पर्यंत आहे आणि पुढे सुद्धा राहील. खुटाळा येथील हवा गुणवत्ता ह्यापेक्षा खराब असून गेल्या महिन्यापासून तो २०० ते ३०० श्रेणीत आहे. chandrapur pollution
विद्युत केंद्रात दररोज ४०००० मेट्रिक टन पेक्षा अधिक कोळसा जाळला जातो आणि त्यातून दररोज १५००० मेट्रिक टन अधिक राख बाहेर निघते. ह्यात केवळ १२००० टन राख हवेत सोडली जात आहे जी सर्व चंद्रपूर शहरात येत आहे. ह्याच सोबत दररोज ६०० टन सल्फर डाय ओक्साइड आणि तितकेच नायट्रोजन डाय ओक्साइड वातावरणात सोडीत असते आणि ह्यामुळे हवामान बदलाच्या समस्या आणि आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहेत. chandrapur pollution
इतके प्रदूषण असूनही चंद्रपूर शहरातील लोकांचा २० वर्षापासून आरोग्य अभ्यास केला गेला नसून लोकांना मोफत उपचार देखील केल्या जात नाही.विशेष म्हणजे इतके प्रदूषण सहन करीत लोकांना दवाखान्यात लाखो रुपयाचा खर्च होतो.चन्द्रपुरकराना २००-३०० युनिट मोफत केले जावे आणि प्रदूषण भत्ता द्यावा अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील ४ ओध्योगिक क्षेत्र हे केंद्रीय प्रदूषण मंडळाने गेल्या १५ वर्षापासून प्रदूषित म्हणून घोषित केलेले आहे.त्यात चंद्रपूर शहर हे सुद्धा हवा गुणवत्ता निर्देशांकात (AQI) हा २००-३०० श्रेणीत सून अतिशय प्रदूषित श्रेणीत मानले गेले आहे. सेपि निर्देशांक सुद्धा ६०-७० दरम्यान प्रदूषित श्रेणीत आहे. आतापर्यंत अनेक कृती आराखडे आखले गेले असून ते कागदावरच आहेत.२००६ मध्ये आरोग्य विभागाने केलेल्या सर्वेक्शनात चंद्रपूर,बल्लारपूर तालुक्यात ५२ टक्के लोक विविध रोगाने बाधित असल्याचे स्पस्ट झाले होते. chandrapur pollution
आजही हीच स्थिती आहे. म्हणूनच केंद्र शासनाच्या स्वच्छ हवा सर्वेक्षण कार्यक्रमात २०१९ पासून चंद्रपूरचा समावेश असून अजूनही त्यात प्रगती झाली नाही.
असेच प्रदूषण सुरु राहिले तर पुन्हा चंद्रपूर शहर वासियां कडून आंदोलन करण्यात येईल असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आलेले आहे.
ग्रीन प्लानेट सोसायटीच्या मागण्या-
त्वरित संच ८ आणि ९ ची त्वरित दुरुस्ती करून धूळ आणि वायू प्रदूषण थांबवावे-
जुने प्रदूषणकारी सर्व संच दुरुस्ती होत पर्यंत बंद करण्यात यावे
विद्युत केंद्राने शहरवासियांना मोफत औशध उपचार द्यावे.
आरोग्य विभागाने ह्याच वर्षी हेल्थ सर्व्हे करावा-
शासनाने / थर्मल पॉवर स्टेशन ने लोकांना प्रधुषण भत्ता द्यावा –
सिटीपीएस वर मोठा दंड आकारून ते पैसे प्रदूषण कमी करण्यास वापरावे-
गरीब-मध्यम वर्गीय लोकांना २००-३०० युनिट मोफत द्यावे-
कोळसा खाणी आणि इतर उद्योगाचे प्रदूषण सुद्धा कमी करण्यात यावे.
शहरातील वाहने,रस्ते आणि इतर स्त्रोतातून होणारे प्रदूषण सुद्धा कमी करावे-
प्रदूषण नियंत्रण मंडळ, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ह्यांना प्रदुषनासाठी जबाबदार धरण्यात यावे.
Leave a Reply