Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • OMAT WEST LIMITED : मजुराच्या अंगावर पडले 200 किलो स्क्रॅप

    OMAT WEST LIMITED : मजुराच्या अंगावर पडले 200 किलो स्क्रॅप

    OMAT WEST LIMITED चंद्रपूर : ताडाळी एमआयडीसी येथील ओमॅट वेस्‍ट लिमिटेड (जुने सिद्धबली इस्पात लिमि.) या कंपनीमध्ये २० फुटावरून २०० किलो स्‍टील स्‍क्रॅप अंगावर पडल्‍याने एक कामगार (अजय रवींद्र राम, रा. बिहार) मागील रविवारी गंभीररित्‍या जखमी झाला. रुग्णालयात नेले असता त्‍याला मृत घोषित केले. सदर कामगाराच्या कुटूंबियांना कुठलाही मोबदला न देता कंपनी व्‍यवस्‍थापनाने मृतदेह त्‍याच्या मूळगावी पाठवून दिला.

    राजकीय : भाजपची पहिली यादी जाहीर

    OMAT WEST LIMITED मृत्यू झालेल्‍या कामगारास तात्‍काळ आर्थिक मदत देण्यात यावी व कंपनी व्‍यवस्‍थापकांवर मनुष्यवधाचा गुन्‍हा दाखल करून कंपनीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी उद्योग व कामगार विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    ओमॅट वेस्‍ट लिमिटेड (जुने सिद्धबली इस्पात लिमि.) कंपनीमध्ये झालेल्‍या घटनेनंतर आमदार सुधाकर अडबाले यांनी भेट देऊन पाहणी केली असता अनेक गंभीर बाबी दिसून आल्‍या. सदर कंपनीचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नाही. कंपनीत कामगारांना सुरक्षेच्या दृष्टीने नियमानुसार कोणत्याच सुविधा पुरविल्‍या जात नसून सेफ्टी ऑफिसर नाही. प्रदूषण मोठ्या प्रमाणात असून प्रदूषण नियंत्रणार्थ कुठल्‍याच उपाययोजना नाही. OMAT WEST LIMITED

    निवडणूक : विजय वडेट्टीवार यांची लीड किती?

    प्रदुषणामुळे कंपनी परिसरातील शेतपिकांचे मोठे नुकसान होत आहे. याकडे प्रदूषण नियंत्रण विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. कंपनीत स्‍थानिक कामगार कमी आणि परप्रांतीय कामगारच जास्‍त प्रमाणात घेण्यात आले आहे. या परप्रांतीय कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशन न करता कामगारांची भरती करण्यात आली आहे. या कामगारांकडून नियमानुसार ८ तासांऐवजी १२ तास काम करवून घेतले जाते. वेतनसुध्दा नियमानुसार दिले जात नाही. यासह अनेक बाबींमध्ये अनियमितता सदर कंपनीत सुरू असल्‍याचे आमदार अडबाले यांना आढळून आले. OMAT WEST LIMITED

    या कंपनीमध्ये आधीदेखील अनेक कामगारांचा कंपनी व्‍यवस्‍थापनाच्या निष्काळजीपणामुळे मृत्‍यू झालेला आहे. यामुळे अजय रवींद्र राम या मयत कामगारास तात्‍काळ आर्थिक मदत देण्यात यावी व सदर कंपनीत व्‍यवस्‍थापनाच्या निष्काळजीपणामुळे झालेल्‍या कामगारांच्या मृत्‍यूस कंपनी व्‍यवस्‍थापन सर्वस्‍वी जबाबदार असून या कंपनी व्‍यवस्‍थापकांवर मनुष्यवधाचा गुन्‍हा दाखल करून कंपनीची सखोल चौकशी करावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी उद्योग व कामगार विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

    तसेच येत्‍या हिवाळी अधिवेशनात सदर कंपनीच्‍या अनियमिततेबाबत प्रश्‍न उपस्‍थित करून कामगार व शेतकऱ्यांना न्‍याय मिळवून देणार असल्‍याचे आमदार सुधाकर अडबाले यांनी सांगितले.

  • Amma chandrapur : निराधारांना आधार देणारी ‘अम्मा” यांचं निधन

    Amma chandrapur : निराधारांना आधार देणारी ‘अम्मा” यांचं निधन

    amma chandrapur आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांचे आज आजाराने निधन झाले. चंद्रपूर येथील राजमाता निवासस्थानी सकाळी 9.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

    महत्त्वाचे : चंद्रपूर जिल्ह्यात बोगस मतदार, डाव कुणाचा?, प्रशासनाने केली पोलिसात तक्रार

    Amma chandrapur सोमवारी 21 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजता गांधी चौक येथील कोतवाली वार्ड येथील घरून अंत्ययात्रा निघणार आहे. बिनवा गेट येथील शांतीधाम येथे त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहे.

    अम्मांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना विविध संस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले होते. त्यांच्या नावाने चंद्रपूरात सुरु असलेल्या “अम्मा का टिफिन” आणि “अम्मा कि दुकान” या उपक्रमामुळे अनेकांना हक्काची साथ मिळाली होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने उपचारासाठी त्यांना नागपूर येथे दाखल करण्यात आले होते. amma chandrapur

    सामाजिक : त्या दोघांसाठी आमदार जोरगेवार बनले देवदूत

    जवळपास 10 दिवस नागपूर येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्याने काल शनिवारीच त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. घरी डॉक्टरांच्या निगराणीत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सकाळी त्यांच्या प्रकृतीत पुन्हा बिघाड झाला आणि सकाळी 9.30 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

    मागील अनेक वर्षांपासून गंगुबाई उर्फ अम्मा या गांधी चौकात टोपल्या विकायच्या, आपल्या साध्या भोळ्या स्वभावाने त्यांची एक वेगळीच ओळख निर्माण झाली होती, गरिबी व संघर्षांच्या काळात त्यांनी टोपल्या विणून मुलगा किशोर व प्रशांत यांना मोठं केलं, विशेष बाब म्हणजे अम्मा चा आशीर्वाद सोबत घेत किशोर जोरगेवार हे समाजकार्यात रुजू झाले, काळ लोटला आणि वर्ष 2019 ला किशोर जोरगेवार हे आमदार बनले, अनेक भाषणावेळी मी टोपली विकणाऱ्याचा मुलगा आहे माझी आई आजही टोपल्या विकते असा उल्लेख आमदार जोरगेवार करायचे.

    शहरातील असलेले निराधार नागरिक उपाशी झोपू नये यासाठी गंगुबाई यांनी किशोर जोरगेवार यांना निराधार नागरिकांना आपल्याद्वारे टिफिन उपलब्ध करूया अशी कल्पना दिली, मातोश्री चा आदेश मिळाल्यावर आमदार जोरगेवार यांनी अम्मा का टिफिन उपक्रम राबविला.

    आज निराधारांचा आधार हिरावला, आज अनेक निराधारांचे डोळे अम्माच्या जाण्याने अश्रूने पाणावले आहे.

  • Online Voter Registration : चंद्रपूर जिल्ह्यात बोगस मतदार आले कुठून?

    Online Voter Registration : चंद्रपूर जिल्ह्यात बोगस मतदार आले कुठून?

    Online Voter Registration राजुरा विधानसभा मतदार संघात अज्ञात व्यक्तिंकडून ऑनलाईन पध्दतीने मतदारांची नोंदणी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तसेच चुकीच्या पध्दतीने नोंदणी केलेल्या 6853 मतदारांच्या नावांचा समावेश मतदार यादीत करण्यात आला नाही. दरम्यान या प्रकरणाची योग्य तपासणी करून तात्काळ कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी पोलिस विभागाला दिले आहे.

    मानव वन्यजीव संघर्ष : वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

    Online Voter Registration 70-राजुरा विधानसभा मतदार संघातील मतदार यादीचा निरंतर कार्यक्रम भारत  निवडणूक आयोगाद्वारे सुरू आहे. यापुर्वी मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला व राजकीय पक्षाची बैठक घेऊन 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रारुप मतदार यादी व 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतिम मतदार यादी राजुरा विधानसभा मतदार संघातील प्रत्येक मतदान केंद्रावर प्रसिध्द करण्यात आली.

    याअंतर्गत 70- राजुरा विधानसभा मतदार संघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यांमधून 3 ऑक्टोबर 2024 पासून मोठया प्रमाणात ऑनलाईन स्वरुपात नवीन मतदार नोंदणी करीता अर्ज प्राप्त झाले होते. सदर नोंदणी अर्जाची सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी तथा राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरीच्या तहसीलदारांमार्फत सखोल तपासणी करण्यात आली.

    राजकीय : विजय वडेट्टीवार यांचं पारडं जड

    त्यापैकी 6853 अर्जांमध्ये अर्जदाराचा फोटो नसणे, अर्जासोबत जन्मतारीख व  रहिवासीचा पुरावा नसणे, अर्जामध्ये नमूद नाव व पुरावा हा वेगवेगळया व्यक्तीचा असणे, एकच फोटो एकापेक्षा अधिक अर्जावर असणे, वेगवेगळया नावाने अर्ज करणे, अशा स्वरुपाचे अर्ज निदर्शनास आले.

    या सर्व अर्जांची बीएलओ मार्फत पडताळणी करून सदरचे सर्व अर्ज नाकारण्यात आले असून त्यांचा समावेश मतदार यादीमध्ये करण्यात आलेला नाही. सदरचे सर्व अर्ज हे Voter Helpline App किंवा  NVSP Portal याद्वारे Online स्वरुपात करण्यात आले होते. वास्तविकपणे वयाचे 18 वर्ष पूर्ण झालेल्या नागरिकांकरीता मतदार यादीमध्ये नाव नोंदणी करणे, नाव कमी करणे, त्यामध्ये बदल करणे याकरीता भारत निवडणूक आयोगामार्फत ही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. Online Voter Registration

    परंतु या सुविधेचा गैरफायदा घेवून काही अज्ञात व्यक्तींनी चुकीचे फॉर्म ऑनलाईन भरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांचा शोध घेऊन संबंधित व्यक्तिंवर कायदेशीर कार्यवाही करण्याकरीता पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. Online Voter Registration

    मतदार नोंदणी करीता ऑनलाईन प्राप्त झालेले 6853 अपात्र अर्ज विहित कार्यपध्दतीचा अवलंब करून नामंजुर करण्यात आले आहेत व अशा अर्जदारांचा मतदार म्हणून मतदार यादीत समावेश करण्यात आला नसल्याचे राजुराचे उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी रविंद्र माने यांनी कळविले आहे.

  • Bogus Matdar : चंद्रपूर जिल्ह्यात बोगस मतदारांच्या नोंदणी

    Bogus Matdar : चंद्रपूर जिल्ह्यात बोगस मतदारांच्या नोंदणी

    bogus matdar चंद्रपूर – नुकतेच जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी लोकसभा निवडणुकीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 51 हजार 393 नव्या मतदारांची नोंदणी झाल्याचा गवगवा केला मात्र यामध्ये काही बोगस मतदारांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.


    Bogus matdar कोरपना तालुक्यात शहरात व ग्रामीण भागातील 52 गावातील एकूण 62 बुथवर हजारो बोगस मतदारांची ऑनलाइन नोंदणी झाल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. विशेष म्हणजे बोगस ऑनलाईन नोंदणी झालेले सर्व मतदार हे परप्रांतीय असल्याचे आडनावावरून दिसून येते. यात यादव, परमार, पांडे अशी नावे आहेत.

    गुन्हेगारी : चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या मागे सुरू होता हा खेळ, 7 जणांना अटक


    निवडणूक आयोगाच्या प्राथमिक चौकशीदरम्यान या मतदार नोंदणीतील अनियमितता उघडकीस आल्याने प्रशासनात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे आगामी निवडणुकीच्या निष्पक्षतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. Bogus matdar

    आदर्श आचारसंहिता : बनावट दारू व ट्रॅव्हल्स ची चौकशी करा

    यात तालुक्यातील गडचांदूर, कोरपना, लखमापूर, नांदा, बिबी, बाखर्डी, आवाळपूर, उपरवाही या मोठ्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात बोगस नावांची नोंद झालेली आहे. तर गेल्या 10 ऑक्टोंबर पर्यंत कोरपना तालुक्यात 3 हजार बोगस मतदार असल्याचं स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आलं असून हा आकडा निश्चितच वाढणार आहे.

    बोगस नोंदणी कशी उघड झाली?

    मतदार यादीतील नावे आणि नोंदणीकृत माहितीची सखोल छाननी सुरू असताना काही स्थानिकांच्या ही बाब लक्षात आली. त्यानंतर प्रशासनाने मतदार यादी तपासली असता, अनेक बोगस मतदारांची नोंदणी आढळली. हजारो परप्रांतीयांची नावे, खोटा मोबाईल क्रमांक व बनावट पत्ते आणि जन्मतारीख या नोंदवलेल्या मतदार यादीत आढळल्या आहेत. विशेष म्हणजे बहुतांश ऑनलाईन अर्ज रात्री 12.00 वाजताच्या नंतर भरण्यात आल्याचे दिसून आले.

    मी दोनदा लखमापूर ग्राम पंचायत उपसरपंच आहे मात्र 328 नवे मतदार एकच वेळेस नोंदणी झालेली ही पहिली वेळ आहे. आणि ते मतदार माझ्या गावात राहत नाही हे सर्व बोगस मतदार आहे याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आहे.

    प्रतिक्रिया – मोरेश्वर आस्वले उपसरपंच (लखमापूर)

  • spurious liquor : बनावट दारू व ट्रॅव्हल्स ची चौकशी करा – जिल्हाधिकारी गौडा

    spurious liquor : बनावट दारू व ट्रॅव्हल्स ची चौकशी करा – जिल्हाधिकारी गौडा

    spurious liquor महाराष्ट्र विधानसभा निवडणूक – 2024 च्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहाय्यक पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी नियोमी साटम, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, जीएसटीचे सहायक आयुक्त मोहन खोब्रागडे, आयकर अधिकारी सुरेश चौधरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी उपस्थित होते.

    अवश्य वाचा : त्या दोघांसाठी आमदार जोरगेवार ठरले देवदूत

    spurious liquor यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. मुक्त आणि पारदर्शक वातावरणात सदर निवडणुका घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या सुचना आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अतिशय चोख असणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान आयकर विभाग, केंद्रीय व राज्य जीएसटी विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग, रेल्वे पोलिस, प्रादेशिक परिवहन विभाग, पोलिस विभाग, वन विभाग व इतर यंत्रणांनी आदर्श आचारसंहितेच्या नोडल अधिका-यांशी नियमित संपर्क ठेवावा तसेच समन्वयातून काम करावे.

    अवैध रक्कम, दारूचा पुरवठा, संशयित बाबी, ड्रग्ज आदी बाबींच्या जप्तीबाबत निवडणूक आयोगाच्या अतिशय सक्त सुचना आहेत. त्याची काटेकोरपणे अंमलबजाणी करावी. महाराष्ट्र हे प्रगत राज्य असल्यामुळे इकडून तिकडे पैशाची वाहतूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सर्वांनी दक्ष असावे. आपापल्या सुत्रांच्या माध्यमातून गोपनीय माहिती मिळविण्यावर भर द्यावा व योग्य कारवाई करावी. जिल्ह्याच्या सीमेलगतच्या चेक पोस्टवर त्वरीत अधिकारी – कर्मचा-यांची नियुक्ती करावी. तपासणी दरम्यान एखादे वाहन पकडले तर त्याचा पुर्वइतिहास तपासावा. जिल्ह्यात येणारे पार्सल तसेच बस आणि ट्रॅव्हल्समधून होणारी पार्सल वाहतूकीची तपासणी करावी. spurious liquor

    गुन्हेगारी : स्थानिक गुन्हे शाखेने पकडला 20 लाखांचा सुगंधित तंबाखू

    विविध विभागांनी करावयाची कारवाई : निवडणूक प्रक्रियेदरम्यान संशयीत बाबींची जप्ती प्रकरणे वाढविणे आवश्यक आहे. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोपनीय माहिती गोळा करावी. अवैध व बनावट दारुवर गांभिर्याने लक्ष ठेवावे. गुटखा, ड्रग्ज प्रतिबंधित वस्तुंची तपासणी करावी. जिल्ह्यात अचानक एखाद्या वस्तुची मोठ्या प्रमाणात आवक वाढली असल्यास जीएसटी विभागाने सदर बाब प्रशासनाला कळवावी. आयकर विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाने नागपूर, हैद्राबाद, छत्तीसगड मधून येणा-या ट्रॅव्हल्स चेक कराव्यात. सर्व बँकांनी संशयास्पद व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवावे. अचानक मोठ्या प्रमाणात पैशांचे व्यवहार होत असेल तर निवडणूक खर्च पथकाला माहिती द्यावी. पैसे ट्रान्सफर करतांना संबंधितांची कागदपत्रे अधिकृत असल्याची खात्री करावी. (spurious liquor)

    उपविभागीय पोलिस अधिका-यांसाठी विशेष सुचना : मतदान यंत्र व स्ट्राँग रुमच्या सुरक्षाकवचाला सर्वोच्च प्राधान्य असावे. पोलिसांनी आवश्यक सुरक्षाव्यवस्था पुरवावी. यात कोणताही निष्काळजीपणा होऊ देऊ नये. नामांकन प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात केवळ 3 वाहनांना परवानगी द्यावी तसेच उमेदवारांसह एकूण पाच व्यक्तिंनाच आतमध्ये प्रवेश द्यावा. स्ट्राँग रुमला दिवसातून दोन वेळा नियमित भेट देऊन पाहणी करावी. प्रवेश आणि बाहेर जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही चेक करावे. मतदान केंद्रावर तैनात असलेल्या पोलिस अधिका-यांना सर्व सुचनांबाबत अवगत करावे व प्रशिक्षण द्यावे.

  • Popular Devdoot : त्या दोघांसाठी आमदार जोरगेवार ठरले देवदूत

    Popular Devdoot : त्या दोघांसाठी आमदार जोरगेवार ठरले देवदूत

    Devdoot आमदार किशोर जोरगेवार यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे मुख्यमंत्री सहायता निधीतून दोन रुग्णांना एकूण 2 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे. हिप रिप्लेसमेंट आणि अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोघांवर आता नागपूर येथे उपचार होणार आहेत. मदत मिळालेल्या रुग्णांमध्ये घुग्घूस येथील चिराग बेले (18) आणि चंद्रपूर येथील सुनिता कुंटावार यांचा समावेश आहे.

    महत्त्वाचे : 30 नोव्हेंबर रोजी विशेष लोक अदालत चे आयोजन

      Devdoot चिराग बेले या 18 वर्षीय युवकाला हिप रिप्लेसमेंट करण्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते, परंतु आर्थिक परिस्थिती खराब असल्याने त्याच्या कुटुंबाने आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे मदतीची मागणी केली. आमदार जोरगेवार यांनी तातडीने पुढाकार घेऊन मुख्यमंत्री सहायता निधीतून चिरागच्या शस्त्रक्रियेसाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळवून दिली.

    तसेच, चंद्रपूरच्या सुनिता कुंटावार यांचा अपघात झाल्याने त्यांना गंभीर दुखापतींचा सामना करावा लागत होता. त्यांच्या शस्त्रक्रियेसाठीही आमदार जोरगेवार यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख रुपयांची मदत मिळवून दिली आहे.

    आता दोन्ही रुग्णांवर नागपूर येथील खाजगी रुग्णालयात योग्य उपचार होणार असून, त्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांचे आभार मानले आहेत. यापूर्वीही आमदार जोरगेवार यांनी मतदारसंघातील अनेक गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून दिली आहे, ज्यामुळे त्यांना उपचार घेण्यासाठी आवश्यक आर्थिक आधार मिळाला आहे.

  • Special Lok Adalat : 30 नोव्हेंबर रोजी विशेष लोक अदालतीचे आयोजन

    Special Lok Adalat : 30 नोव्हेंबर रोजी विशेष लोक अदालतीचे आयोजन

    Lok Adalat महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या  निर्देशानुसार उच्च न्यायालय,  खंडपीठ नागपूर येथे 30 नोव्हेंबर 2024 रोजी तसेच औरंगाबाद खंडपीठ येथे 1 डिसेंबर 2024 रोजी विशेष लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

    महत्त्वाचे : विधानसभा निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर, तक्रार करा

    Lok Adalat विशेष लोक अदालतीमध्ये उच्च  न्यायालयात प्रलंबित असलेले प्रकरणे तडजोडीसाठी ठेवले जाणार आहेत. चंद्रपूर जिल्हयातील पक्षकारांची प्रकरणे उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे प्रलंबित असल्यास व ती तडजोडीने मिटावी, अशी इच्छा असल्यास ते प्रकरण विशेष लोक अदालतीमध्ये ठेवता येऊ शकते. विशेष लोक अदालतीमध्ये पक्षकार प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने  सहभाग घेवू शकतात.

    विशेष लोक अदालतीचे फायदे :  साध्या व सोप्या पद्धतीने वाद मिटवता येतो. झालेल्या तडजोडीचा निवाडा अंतिम व अंमलबजावणी होऊ शकणारा असतो. वेळेची व पैशाची बचत होते. तडजोड झाल्यास न्यायालयीन शुल्क परत मिळते.

    चंद्रपूर जिल्हयातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, विशेष लोक अदालतीमध्ये प्रकरणे ठेवण्यासाठी संबंधित वकिलांना कल्पना द्यावी किंवा अधिक माहिती  हवी असल्यास जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर किंवा संबंधीत तालुका विधी सेवा समिती यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृध्दी भीष्म यांनी केले आहे.

  • black money in politics : विधानसभा निवडणुकीत काळ्या पैश्याचा वापर…करा एक कॉल

    black money in politics : विधानसभा निवडणुकीत काळ्या पैश्याचा वापर…करा एक कॉल

    black money in politics महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 दरम्यान काळ्या पैशाचा वापर रोखण्यासाठी नागरिकांनी माहिती देण्याचे आवाहन आयकर विभागाने केले असून माहिती देणा-याचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर मनपाचे उत्कृष्ट नियोजन

    black money in politics निवडणुकी दरम्यान काळा पैसा वापरण्यात येत असलेली माहिती, रोख रकमेचे वाटप, रोख रकमेची हालचाल या बाबत विश्वसनीय माहिती असल्यास नागरिकांनी आयकर विभागाला नक्की कळवावे. माहिती देणा-याची ओळख गुप्त ठेवण्यात येईल, असे नागपूर येथील उप आयकर निदेशक (अन्वेषण) अनिल खडसे यांनी कळविले आहे.

    माहिती देण्यासाठी येथे करा संपर्क : 1. टोल फ्री क्रमांक : 1800-233-0355 /  1800-233-0356

    2. व्हॉटस्ॲप क्रमांक : छायाचित्रे, व्हीडीओ इत्यादी पाठविण्यासाठी व्हॉटस्ॲप क्रमांक 9403390980

    3. ई-मेल : nagpur.addldit.inv@incometax.gov.in  आणि nashik.addldit.inv@incometax.gov.in येथे संपर्क करावा.

  • Election process in maharashtra : निवडणुकीची प्रक्रिया जबाबदारीने पार पाडा – जिल्हाधिकारी गौडा

    Election process in maharashtra : निवडणुकीची प्रक्रिया जबाबदारीने पार पाडा – जिल्हाधिकारी गौडा

    Election process in maharashtra महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 ची घोषणा होताच जिल्ह्यात सर्वत्र आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करून अधिका-यांनी निवडणूक प्रक्रिया जबाबदारीने पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहे.

    अवश्य वाचा : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात राजकीय बालिशपणा

    Election process in maharashtra नियोजन सभागृह येथे नोडल अधिकारी व विभाग प्रमुखांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत देशपांडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक रीना जनबंधू,  उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार,  उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी,  उपजिल्हाधिकारी संजय पवार, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. अपूर्णा बासुर आदी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार निवडणूक प्रक्रिया अतिशय जबाबदारीने पार पाडावी. त्यासाठी जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या नोडल अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून योग्य नियोजन करावे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान मतदान केंद्रामध्ये किमान मूलभूत सुविधा पुरवणे आवश्यक आहे. यात फर्निचर, लाईट व्यवस्था, शौचालय आणि त्याची स्वच्छता, प्रतीक्षालय, शेडची व्यवस्था, मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या असल्यास ठराविक अंतरावर खुर्च्यांची व्यवस्था, आदी बाबी सज्ज ठेवाव्यात.

    तसेच मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर स्थानिक स्तरावरील एन.सी.सी. आणि एन.एस.एस. च्या विद्यार्थ्यांना स्वयंसेवक म्हणून नियुक्त करावे. शहरी भागात जेथे तीन पेक्षा जास्त मतदान केंद्र एकाच ठिकाणी आहे, अशा ठिकाणी पार्किंग व्यवस्था योग्य ठेवावी. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही अधिकारी -कर्मचाऱ्यांनी विनापरवानगी मुख्यालय सोडू नये. मुक्त आणि पारदर्शक निवडणुका पार पाडण्यासाठी आंतरराज्यीय चेकपोस्ट वर अधिकारी कर्मचाऱ्यांची तात्काळ ड्युटी लावावी. या चेक पोस्टवर पोलिस विभागासह राज्य उत्पादन शुल्क विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग आणि वनविभागाचे अधिकारी -कर्मचारी सुद्धा तैनात ठेवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या. Election process in maharashtra

    गुन्हेगारी : क्षुल्लक कारणावरून चंद्रपुरात एकाची हत्या, 3 आरोपीना अटक

    यावेळी सादरीकरण करताना मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी नोडल अधिकाऱ्यांनी करावयाची कारवाई, आदर्श आचारसंहितेच्या अनुषंगाने सर्व शासकीय विभागाने करावयाची कामे, तसेच आचारसंहितेच्या काळात काय करावे आणि काय करू नये, याबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. General Election

    जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली राजकीय पक्षांची बैठक : जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीची बैठक घेतली. यावेळी ते म्हणाले, प्रत्येक विधानसभा मतदारसंघांमध्ये राजकीय पक्षांनी दोन सहाय्यक नियुक्त करावेत. विधानसभा मतदारसंघ स्तरावर मदतीसाठी हेल्पडेस्क राहणार आहे. तसेच सर्व परवानगीसाठी सिंगल विंडो सिस्टीम सुद्धा कार्यान्वित केली जाईल. निवडणूक प्रचाराकरीता महत्त्वाचे, अति महत्त्वाचे व्यक्ती येत असल्यास याबाबत राजकीय पक्षांनी प्रशासनाला पूर्वसूचना द्यावी. राजकीय पक्षांनी प्रत्येक सभेसाठी परवानगी घ्यावी. वाहनांच्या वापरावर निर्बंध असून एका ताफ्यामध्ये जास्तीत जास्त 10 वाहने वापरण्याची परवानगी राहील, असे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र भरणे, अनामत रक्कम, निवडणुकीचा कार्यक्रम आदीबाबत राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना अवगत केले. General Election

    राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींची उपस्थिती : बैठकीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पाटी, शिवसेना, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष, आम आदमी पार्टी, बहुजन समाज पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी), स्वतंत्र भारत पक्ष, जय विदर्भ पार्टीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

  • Model Code of Conduct : चंद्रपूर जिल्ह्यात हे निर्बंध लागू

    Model Code of Conduct : चंद्रपूर जिल्ह्यात हे निर्बंध लागू

    Model Code of Conduct जिल्ह्यात महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 ची आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने लागू झाली आहे. संपूर्ण निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे यथायोग्य पालन करण्याचे दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.

    महत्त्वाचे : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात राजकीय बालिशपणा

    Model Code of Conduct तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता अंमलात असेपर्यंतच्या कालावधीकरिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 मधील तरतुदीनुसार खालील बाबींवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तसे आदेश जिल्हादंडाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी निर्गमीत केले आहेत.

    घटना : रोटाव्हॅटर मशीन मध्ये अडकला मजूर झाले शरीराचे तुकडे

    1. शासकीय कार्यालये/विश्रामगृहे इत्यादी परिसरात मिरवणुका काढण्यास, घोषणा देणे/सभा घेणे इत्यादीवर निर्बंध राहतील. 2. शासकीय/निमशासकीय सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपीकरण करण्यास निर्बंध, 3. उमेदवारांचे नामनिर्देशन दाखल करतेवेळीस ताफ्यामध्ये 3 पेक्षा जास्त मोटारगाडया/वाहने तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे 100 मिटर परिसरात व दालनात 5 व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश करण्यास निर्बंध राहतील. Model Code of Conduct

    4. निवडणुक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत इतर उमेदवाराचे नाव व चिन्ह वापरणे, आयोगाने निश्चीत केल्याप्रमाणे कागद वापरणे तसेच निश्चीत केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रीका छपाईस निर्बंध राहतील. 5. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत इतर उमेदवारांचे नाव व चिन्ह वापरणे, आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे तसेच निश्चित केलेल्या कागदपत्राच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छपाईस निर्बंध,6. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणुक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे 200 मी. परिसरात धरणे आंदोलन,  मोर्चा,  निदर्शने,  उपोषणे करण्यावर निर्बंध राहतील.

    6. धार्मिक स्थळे, रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरते पक्ष कार्यालय स्थापन करण्यास निर्बंध, 7. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जात/धर्म/भाषावार शिबिरांचे आयोजन करण्यावर निर्बंध, 8. निवडणुकीचे प्रचाराकरीता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे इत्यादी बाबींवर निर्बंध, Model Code of Conduct

    9. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खाजगी व्यक्तींच्या जागेवर/सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके जागा मालकाच्या व संबंधीत प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय लावण्यास निर्बंध राहतील. 10. निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत प्रचार/रॅली/रोड-शो याकरीता वाहनाच्या ताफ्यात 10 पेक्षा अधिक मोटार गाडया/वाहने वापरण्यास निर्बंध राहतील.

    सदर आदेश जिल्हाधिकारी यांच्या सहीनिशी कोर्टाच्या शिक्कानिशी 15 ऑक्टोबर 2024 रोजी देण्यात आला आहे.