Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • chandrapur development : 101 कोटी 90 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन

    chandrapur development : 101 कोटी 90 लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन

    chandrapur development आ. किशोर जोरगेवार यांच्या हस्ते मतदारसंघातील १०१ कोटी ९० लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये दीक्षाभूमी विकासकाम आणि वढा तीर्थक्षेत्राच्या विकासकामाचाही समावेश आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील 51 हजार 393 नवे मतदार बजावणार मतदानाचा हक्क

      chandrapur development मागील पाच वर्षांत आ. किशोर जोरगेवार यांनी मतदारसंघाच्या विकासासाठी शासनाकडून मोठा निधी खेचून आणला आहे. या निधीतून शहरी भागासह ग्रामीण भागाचा विकास केला जात आहे. दरम्यान, आज आ. किशोर जोरगेवार यांनी मतदारसंघातील तब्बल १०१ कोटी ९० लाख रुपयांच्या कामाचे भूमिपूजन केले आहे.

    आ. किशोर जोरगेवार यांचा चंद्रपूरच्या दीक्षाभूमीच्या विकासाचा संकल्पही पूर्ण झाला असून ५६ कोटी ९० लाख रुपयांतून होणाऱ्या दीक्षाभूमीच्या विकासकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले आहे. तसेच वढा येथील २५ कोटी रुपयांच्या विकासकामाचेही भूमिपूजन करण्यात आले आहे. Chandrapur development

    विदर्भाचे पंढरपूर मानल्या जाणाऱ्या वढा तीर्थक्षेत्राचा व्यापक विकास करण्याचा संकल्प आ. किशोर जोरगेवार यांनी केला होता. या कामासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, आणि त्याचेही आज भूमिपूजन करण्यात आले आहे. शहरातील प्रमुख मार्गासाठी मंजूर २० कोटी रुपयांच्या कामाचेही आ. जोरगेवार यांनी भूमिपूजन केले असून, या मार्गाचे कामही तातडीने सुरू होणार आहे.

      आ. किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर धानोरा बॅरेजला प्रशासकीय मान्यता

    चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा गावाजवळील वर्धा नदीवर बॅरेज बांधण्यासाठी निधी उपलब्ध करण्याची मागणी चंद्रपूर मतदारसंघाचे अपक्ष आ. किशोर जोरगेवार यांनी सातत्याने लावून धरली होती. त्यांच्या या मागणीला यश मिळाले असून, या कामाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. पहिल्या टप्यात ५ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

  • new voters : चंद्रपूर जिल्ह्यातील 51 हजार 393 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

    new voters : चंद्रपूर जिल्ह्यातील 51 हजार 393 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

    new voters मतदानाच्या हक्कापासून कोणीही वंचित राहू नये, मतदारांची नावे योग्यरीत्या मतदार यादीत समाविष्ट व्हावी, या उद्देशाने जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. तसेच याबाबत जनजागृती सुद्धा करण्यात आली. त्याची फलश्रुती म्हणून जिल्ह्यात 51393 नवीन मतदारांची नावे समाविष्ट करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिली.

    New voters महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी उपस्थित होते.

    राजकीय : बाबूपेठ उड्डाणपूल आता डॉ.बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल

    जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वीप अंतर्गत विविध उपक्रम सुरू केले आहेत. यात युवा मतदारांमध्ये जनजागृती, प्रत्येक आठवड्यात स्पर्धा, लकी ड्रॉच्या माध्यमातून बक्षीस स्पर्धा, प्रभात फेरी, विविध रॅलींचे आयोजन तसेच शाळा – महाविद्यालयामध्ये जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहे. New voters

    जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ असून यात 70- राजुरा, 71 –चंद्रपूर, 72 –बल्लारपूर, 73 –ब्रह्मपुरी, 74 -चिमूर आणि 75 वरोरा या मतदारसंघाचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण 18 लक्ष 43 हजार 540 मतदार असून यात पुरुष मतदार 9 लक्ष 36 हजार 418, स्त्री मतदार 9 लक्ष 7 हजार 74, इतर मतदार 48 यांचा समावेश आहे. राजूरा विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 167427, स्त्री मतदार – 156780, एकूण – 324209),

    चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 188140, स्त्री मतदार – 184280, एकूण – 372455), बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 158071, स्त्री मतदार – 153017, एकूण – 311094), ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 137589, स्त्री मतदार – 137632 एकूण – 275221), चिमूर विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 140670, स्त्री मतदार – 138911, एकूण – 279581), आणि राजूरा विधानसभा मतदारसंघात (पुरुष मतदार – 144521, स्त्री मतदार – 136454, एकूण – 280980) new voters

    जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्र तसेच ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची संख्या : राजूरा विधानसभा मतदार केंद्रात 344 अधिक 1 मतदान केंद्र, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात 390, बल्लारपूर 366, ब्रम्हपुरी 319, चिमूर 314 आणि वरोरा विधानसभा मतदारसंघात 343 असे एकूण संपूर्ण जिल्ह्यात 2076 अधिक 1 मतदान केंद्र आहेत. तसेच जिल्ह्यात एकूण 4636 बॅलेट युनीट, 2620 कंट्रोल युनीट आणि 2787 व्हीव्हीपॅट उपलब्ध आहेत. New voters

    नामनिर्देशन : विधानसभा सार्वत्रिक निवडणूककरिता इच्छुक उमेदवारास नाम निर्देशन पत्र (नमुना ब) व त्यासोबत शपथपत्र (नमुना 26) परिपूर्ण भरून देणे अनिवार्य आहे. एका उमेदवारास जास्तीत जास्त चार नामनिर्देशन पत्र सादर करता येईल. तसेच उमेदवारास एका वेळेस जास्तीत जास्त दोन मतदारसंघातून निवडणूक लढवता येऊ शकेल. सर्वसाधारण उमेदवारास नामनिर्देशन पत्रासोबत 10 हजार रुपये रोख आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारास 5 हजार रुपये रोख जमा करणे बंधनकारक आहे.

    उमेदवारास खर्चाची मर्यादा : उमेदवारास निवडणूक कालावधीत जास्तीत जास्त 40 लक्ष रुपये खर्चाची मर्यादा राखणे बंधनकारक आहे. निवडणूक कालावधीत दैनंदिन झालेल्या खर्चाचा हिशोब दररोज देणे आवश्यक असून निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत संपूर्ण खर्चाचा हिशोब शपथपत्रासह सादर करणे बंधनकारक आहे.

    बाबूपेठ उड्डाणपूल

    जिल्ह्यात विविध कक्ष कार्यान्वित : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर तसेच सर्व विधानसभा मतदारसंघ स्तरावर तक्रार निवारण /मतदार मदत केंद्र, एक खिडकी कक्ष, नियंत्रण कक्ष, आदर्श आचारसंहिता कक्ष तसेच मतदार हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आले आहे. Election news

    महत्वाचे : टिल्लू पंप लावला तर मनपा टाकणार काळ्या यादीत

    सी-व्हीजीलचा उपयोग करण्याचे आवाहन : निवडणूक प्रक्रियादरम्यान आचारसंहिता उल्लंघन संबंधाने कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवायची झाल्यास त्याकरिता नागरिकास सी-व्हीजील या ॲपद्वारे ऑनलाईन पद्धतीने तक्रार नोंदविता येऊ शकेल. अशा तक्रारी प्राप्त झाल्यापासून 100 मिनिटांच्या आत निकाली काढण्यात येईल. तसेच चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत विविध पथकांकडून /यंत्रणांकडून जप्त करण्यात येणाऱ्या अवैध रोख रक्कम, मद्य, मादक पदार्थ, फ्रीबीज इत्यादीसाठी ऑनलाईन ई.एस.एम.एस. या प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

  • Chandrapur City Municipal Corporation : तर मनपा नागरिकांना टाकणार काळ्या यादीत

    Chandrapur City Municipal Corporation : तर मनपा नागरिकांना टाकणार काळ्या यादीत

    Chandrapur City Municipal Corporation शहरातील तुकूम,गोपालपुरी व बाबुपेठ या परिसरात महानगरपालिकेमार्फत मीटर व टिल्लू पंप जप्तीची मोहीम राबविण्यात आली असुन काही ग्राहकांचे मीटर व टिल्लू पंप जप्त करण्यात आले असुन त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करून नळ कपात करण्यात आली आहे.

    महत्त्वाचे : बाबूपेठ येथे विपश्यना केंद्राचे भूमिपूजन


    Chandrapur City Municipal Corporation मनपातर्फे शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक ( मीटर ) लावण्यात आले असुन जानेवारी महिन्यापासुन मीटरचा प्रत्यक्ष वापर सुरु आहे. मात्र काही जागी मीटरला लावलेला पाईप काढुन पाणी भरत असल्याचे तसेच काही नागरिक टिल्लू पंपचा वापर करत असल्याचे आढळुन आल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून जप्ती करण्यात आली आहे.

    महत्त्वाचे : चंद्रपुरात धावणार इलेक्ट्रिक बस, बस डेपोचे पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते भूमिपूजन


        सर्व नळ जोडणींवर मीटर लावण्यात आले असल्याने पाण्याचा जेवढा वापर होईल तेवढेच देयक येत असुन अनावश्यक खर्च व अनावश्यक पाण्याच्या वापरावर नियंत्रण आले आहे.मात्र काही नागरिक नळाचे देयक कमी करण्याच्या दृष्टीने मीटरला लागुन असलेला पाईप काढतात ज्यामुळे पाण्याचा वापर करतांना मीटर बंद असते व बिल अतिशय कमी येते,शिवाय टिल्लु पंप द्वारे मोठ्या प्रमाणात पाणी एकाच कनेक्शनवर ओढले जाऊन इतर नळधारकांना अतिशय कमी प्रमाणात पाणी पुरवठा होतो.  


          त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यावर होणार परिणाम लक्षात घेता मनपातर्फे कारवाई सुरु असुन यापुढे अश्या प्रकारे पाणी भरतांना आढळल्यास त्यांना काळ्या यादीत टाकण्यात येणार असल्याचे महानगरपालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

  • Best Vipassana Center : आमदार जोरगेवार यांच्या हस्ते बाबूपेठ येथे विपश्यना केंद्राचे भूमिपूजन

    Best Vipassana Center : आमदार जोरगेवार यांच्या हस्ते बाबूपेठ येथे विपश्यना केंद्राचे भूमिपूजन

    Vipassana Center विपश्यना साधना केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठीच नाही तर मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी देखील प्रभावी आहे. ही ध्यान पद्धती आपल्याला आतल्या शांततेकडे घेऊन जाते, आपल्या मनातील तणाव, दुःख आणि नकारात्मक भावना दूर करते. समाजात जेव्हा अशा ध्यान साधनेचा प्रचार आणि प्रसार होतो, तेव्हा तो समाज अधिक स्थिर आणि संतुलित बनतो. आपणही बाबुपेठ येथे उत्तम विपश्यना केंद्र तयार करण्याचा संकल्प केला असून, आज त्याचे भूमिपूजन करताना आनंद होत असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.


    Vipassana Center आमदार किशोर जोरगेवार यांच्या प्रयत्नांमुळे बाबुपेठ येथील आंबेडकर नगर येथील धम्मभूमि महाविहार येथे विपश्यना केंद्र तयार करण्यात येणार आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात 50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या कामाचे भूमिपूजन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भिक्खु संघाच्या वतीने करण्यात आले. या प्रसंगी ते बोलत होते.

    या कार्यक्रमाला अखिल भारतीय भिक्खु संघाचे उपसंघनायक भन्ते बोधीपालो, मुंबई प्रदेश भिक्खू संघाचे अध्यक्ष भन्ते विनय बोधी महाथेरो,  महाथेरो डॉ. सुमनवण्णो, भन्ते सच्चक महाथेरो, भन्ते संघवंस थेरो, भन्ते रत्नमनी थेरो, भन्ते नागदीप थेरो, भन्ते आनंद थेरो, भन्ते धम्मप्रकाश, महाथेरो डॉ. सुमनवण्णो आदि प्रमुख अतिथी म्हणून मंचावर उपस्थित होते. यावेळी भव्य बुद्ध-भीमगीत कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. (Chandrapur)

    भूमिपूजन : चंद्रपुरात ई बस डेपोचे भूमिपूजन


    यावेळी बोलताना आ. जोरगेवार पुढे म्हणाले की, आपण मतदारसंघाचा विकास करत असताना तो सर्वसमावेशक असावा, या दिशेने काम केले आहे. अनेक मोठी कामे आपण या पाच वर्षांत मार्गी लावू शकलो. 50 वर्ष जुनी असलेली बाबुपेठ उड्डाणपूलाची मागणी आपण मार्गी लावली असून, नुकताच हा पूल वाहतुकीसाठी सुरू केला आहे.

    5 कोटी रुपयांतून आपण मतदारसंघातील 16 बुद्धविहारांमध्ये अभ्यासिका तयार करत आहोत. तसेच, चंद्रपूरच्या दीक्षाभूमीच्या विकासाचा संकल्पही आपला पूर्ण होत असून, येथील विकासकामांसाठी जवळपास 57 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. हे सर्व कार्य आपल्या सहकार्य आणि आशीर्वादामुळे शक्य झाले आहे. आज भिक्खु संघाच्या वतीने विजय स्तंभ देऊन सत्कार करण्यात आला, हे सूचक आहे. आपला आशीर्वाद नेहमी पाठीशी राहिला आहे आणि पुढेही राहील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. (Chandrapur)


      चंद्रपूरात विपश्यना केंद्र नव्हते, त्यामुळे येथे भव्य विपश्यना केंद्र तयार व्हावे, हा संकल्प होता. आज धम्मभूमि महाविहार येथील जागेवर यासाठी निधी देता आला, याचे समाधान आहे. विपश्यना केवळ वैयक्तिक स्तरावर फायदेशीर नसून, ती समाज स्तरावरही परिवर्तन घडवू शकते. जेव्हा समाजातील व्यक्ती मनःशांतीचा मार्ग अनुसरतात, तेव्हा समाजात सकारात्मकता, सहिष्णुता आणि एकमेकांप्रती आदर वाढतो. आपला समाज सध्या अनेक तणावांनी ग्रस्त आहे – दैनंदिन आयुष्यातील ताण, मानसिक आरोग्याच्या वाढत्या समस्या. अशा काळात विपश्यना केंद्र हे एक आधारस्थान ठरू शकते, असे ते यावेळी म्हणाले. (Chandrapur)


    या प्रसंगी सुप्रसिद्ध बुद्ध-भीम गायीका कळुबाई खरात आणि सुप्रसिद्ध गायक राहुल शिंदे यांनी बुद्ध-भीमगीत सादर केले. या कार्यक्रमाला नागरिकांची हजारोंच्या संख्येने उपस्थिती होती. धम्मभूमि महाविहारच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धाम्म्भूमी महाविहारच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांचा भव्य सत्कार करण्यात आला.  

  • Chandrapur parking : शहरातील हे ठिकाण पार्किंग स्थळ म्हणून घोषित

    Chandrapur parking : शहरातील हे ठिकाण पार्किंग स्थळ म्हणून घोषित

    Chandrapur parking 15 व 16 ऑक्टोबर 2024 रोजी होणा-या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभुमी येथील समारंभास उपस्थित राहण्याकरीता शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनुयायी / नागरीक मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

    Chandrapur parking त्यामुळे सदर परीसरात वाहतूक कोंडी, समारंभास येणा-या अनुयायांच्या ये-जा करण्यास अडथळा निर्माण होऊ नये, तसेच प्रवेश व निर्गम याचे विनियमन करण्याकरीता चंद्रपूर शहर आणि बाहेरून येणा या वाहनांकरीता तात्पुरत्या स्वरूपात पार्किंग स्थळे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

    राजकिय : 185 क्रिकेट संघाला क्रिकेट किट चे वितरण

    त्यानुसार जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी 15 ऑक्टोबरच्या सकाळी 7 वाजतापासुन 17 ऑक्टोबरचे सकाळी 7 वाजेपर्यंत चंद्रपूर हद्दीतील खालील नमुद स्थळे सर्व वाहनाकरीता “पाकींग स्थळ” म्हणून घोषित केले आहे.

    1. नागपूर रोडने दीक्षाभुमीकडे येणा-या वाहनांकरीता : अ) शकुंतला लॉन ब) जनता कॉलेज पटांगण क) जनता कॉलेज समोरीत ईदगाह मैदान.

    2. शहरातून दिक्षाभुमी कडे येणा-या वाहनांकरीता : अ) सेंट मायकल स्कूल मैदान ब) सिंधी पंचायत भवन (संत केवलराम चौक) क) न्यु इंग्लीश ग्राऊंड

    गुन्हेगारी : क्षुल्लक वाद आणि अल्पवयीन मुलाची हत्या, भाजप कार्यकर्त्याला अटक

    3. वडगाव, आकाशवाणी व लगतच्या परीसरातून दीक्षाभुमीकडे येणा-या वाहनांकरीता : अ) लोकमान्य टिळक हायस्कुल (जिल्हा स्टेडीयमच्या मागे) ब) जिवन साफल्य गृह निर्माण सहकारी संस्था (मनोमय दवाखान्याच्या पाठीमागे)

    4. मुल रोड, बंगाली कॅम्प, तुकुम या परीसरातून येणा-या वाहनांकरीता : अ) कृषि भवन जवळील मैदानात व टॅक्सी स्टैंड.

  • Haji Sarwar massacre : हाजी सरवर हत्याकांड, तो नेता कोण?

    Haji Sarwar massacre : हाजी सरवर हत्याकांड, तो नेता कोण?

    Haji Sarwar massacre ऑगस्ट महिन्यात चंद्रपूर शहरात कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे उडवीत भरदिवसा क्रूर हत्याकांडाची घटना घडली, यामध्ये कुख्यात गुंड हाजी सरवर यांची गोळ्या घालून व धारदार शस्त्राचे वार करीत हत्या करण्यात आली होती. घटनेनंतर आरोपीनी स्थानिक गुन्हे शाखेत आत्मसमर्पण केले होते, पोलिसांनी याप्रकरणी अनेक आरोपीना अटक केली.

    महत्त्वाचे : चंद्रपुरात आज बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम, प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात यांची उपस्थिती


    Haji Sarwar massacre नकोडा निवासी हाजी सरवर शेख यांचा 12 आगस्ट 2024 ला बिनबागेट, येथील होटल शाही दरबार येथे गोळया झाडुन तीक्ष्ण हत्यारांने निर्मम हत्या करण्यात आली होती. सदर प्रकरणात आता पर्यंत 13 आरोपींना अटक करण्यात आली तर एक आरोपी फरार आहे. या प्रकरणात मुलाचा खुण करण्यामागे कोणाचा हात आहे आणि कोण सदर आरोपींना आर्थिक मदत देत होता व त्यांना शस्त्र कोण पुरविले? असे अनेक प्रश्न अनुत्तरित आहे, याबाबत हाजी सरवर यांच्या कुटुंबीयांनी पत्रकार परिषद घेत धक्कादायक आरोप व खुलासे केले आहे.

    यासंदर्भात सीआईडी तपास करण्याची मागणी सलमा बेगम सरवर शेख यांनी पत्रकार परीषदेत केली आहे.
    घटनेपूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात अग्निश्स्त्रांचा वापर करून खून करणे किंवा खुनाच्या प्रयत्न करणे सारखे गुन्हे सतत घडत होते. त्यामुळे जिल्हा पोलीस विशेषतः स्थानिक गुन्हे शाखा यांनी शस्त्र जप्तीची मोहिम राबविली होती व सावधानता बाळगल्याचे जनतेला सांगण्यात आले होते. (Haji Sarwar massacre)

    राजकीय : डॉ.अभिलाषा गावतुरे यांना कांग्रेस पक्षाची बल्लारपूर विधानसभेतून उमेदवारी द्या, या पक्षाचा जाहीर पाठिंबा

    हाजी सरवर चे मारेकरी शस्त्र घेवून दुस_या जिल्ह्यातून चंद्रपूर शहरात दाखल झाले, दोन दिवस मुक्काम केला. तेव्हा पोलीस व अपराध शाखा पूर्णत अनभिज्ञ कसे होते? खून केल्यानंतर जवळचे शहर पो. स्टे. किंवा रामनगर पो. स्टे सोडून मारेकरी सरळ स्थानीय गुन्हा शाखा येथे का गेले?. (Haji Sarwar massacre)

    पत्रकार परिषद

    आरोपी समीर हा सराईत गुन्हेगार आहे. चंद्रपूर जिल्ह्या बाहेर इतर खुनाचे गुन्हे नोंद आहेत. तो गुन्हा केल्यानंतर तिथेच आत्मसमर्पण करतो जिथे पहिले पासून त्याचा संपर्क असतो व सर्वकाही ठरलेला प्लान होता. सर्व बाबींचे विचार केले असता स्था. गु. शाखेची भूमिका हि संशयास्पद आहे. म्हणून स्था. गु. शाखेचे भूमिकेची सखोल तपास होणे गरजेचे आहे. तसेच स्था. गु. शा. पूर्वी पासून आरोपींचा संपर्कात होते किंवा कसे हे जाणून घेण्याकरीता त्यांचे CDR व SDR काढणे सुद्धा गरजेचे आहे. वरील सर्व बाबींचा विचार करून हाजी सरवर खुनाचा गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआईडी) कडून किंवा स्वतंत्र तपास यंत्रणे कडून करण्याची मागणी हाजी सरवर ची पत्नी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. (Haji Sarwar massacre)

    त्या पुढे म्हणाल्या की वर्ष 2012 मध्ये हाजी सरवर यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता? त्यांचा सुद्धा या प्रकरणात सहभाग असू शकतो हे पोलिसांनी आपल्या तपासात घ्यायला हवे, आरोपी समीर हा ज्या वाळू घाटावर काम बघत होता तो घाट एका नेत्याचा आहे, तो त्याची पाठराखण करायचा, त्याबाबत त्या नेत्याचा यामध्ये सहभाग असू शकतो? यावर पोलिसांनी सखोल चौकशी करणे गरजेचे आहे, या हत्याकांडाचा मास्टरमाइंड कोण? याबाबत पोलिसांनी खुलासा करावा, जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मी माझे मूल बाळ सोबत घेत पोलीस अधीक्षक कार्यालय पुढे आमरण उपोषण करणार असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला.

  • Bhim geet : चंद्रपूर शहरात बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम

    Bhim geet : चंद्रपूर शहरात बुद्ध भीमगीतांचा कार्यक्रम

    Bhim geet प्रसिद्ध भीमगीत गायिका कळूबाई खरात उद्या चंद्रपूरात, आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते विपश्यना केंद्राचे भूमिपूजन, बाबूपेठ येथे भीमगीताचे आयोजन

    Bhim geet बाबूपेठ येथील आंबेडकर नगर येथे असलेल्या धम्मभूमी महाविहार येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी विपश्यना केंद्रासाठी ५० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या कामाचे उद्या, रविवारी सायंकाळी सहा वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे.

    कांग्रेस पक्षातर्फे डॉ गावतुरे यांना उमेदवारी मिळावी यासाठी जाहीर पाठिंबा

    या निमित्ताने भव्य बुद्ध-भीमगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, सुप्रसिद्ध गायिका कळूबाई खरात आणि प्रसिद्ध गायक राहुल शिंदे हे बुद्ध-भीमगीत गायणार आहेत.

    बाबूपेठ येथील आंबेडकर नगर येथे असलेल्या धम्मभूमी महाविहार येथे विपश्यना केंद्र तयार करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीची दखल घेऊन आमदार किशोर जोरगेवार यांनी विपश्यना केंद्रासाठी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. या निधीतून येथे तयार होणार असलेल्या विपश्यना केंद्राच्या कामाचे भूमिपूजन उद्या रविवारी सायंकाळी ६ वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते होणार आहे.

    दिक्षाभूमिसाठी चंद्रपुरात एल्गार महामोर्चा

    यानिमित्त महाथेरो डॉ. सुमनवंत्तो यांच्या वतीने भव्य बुद्ध-भीमगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या रविवारी या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध भीमगीत गायिका कळूबाई खरात आणि राहुल शिंदे चंद्रपूरात येणार असून, या कार्यक्रमाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन धम्मभूमी महाविहारच्या वतीने करण्यात आले आहे.

  • New Moharli gate tadoba : निसर्ग पर्यटन केंद्राला स्व. रतन टाटा यांचे नाव – मुनगंटीवार यांची घोषणा

    New Moharli gate tadoba : निसर्ग पर्यटन केंद्राला स्व. रतन टाटा यांचे नाव – मुनगंटीवार यांची घोषणा

    Moharli gate tadoba ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ही आपल्यासाठी परमेश्वराची देण आहे. जगभरातील लाखो पर्यटक ताडोबा व्याघ्र प्रकल्पामध्ये येतात. व्याघ्र दर्शनासाठी आलेला पर्यटक येथून चंद्रपूरचे नाव कायमचे सोबत घेऊन जातो. येथे आलेल्या पर्यटकांच्या दृष्टीने ताडोबा आणि चंद्रपूरचे नाव हे त्यांच्या आयुष्याचा ठेवा असावा. त्यासाठी पर्यटकांसोबत आपली वर्तणूक चांगलीच असली पाहिजे. कारण इथे येणारा प्रत्येक पर्यटक आपल्यासाठी देवासमान आहे, अशी भावना राज्याचे वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

    Moharli gate tadoba मोहर्ली येथे पर्यटन प्रवेशद्वार, संकूल, निसर्ग माहिती केंद्र व इतर सुविधांचे लोकार्पण ना. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा बनबल प्रमुख शोमिता विश्वास, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर, वन अकॅडमीचे संचालक एम.एस. रेड्डी, क्षेत्रसंचालक तथा मुख्य वनसंरक्षक डॉ. जितेंद्र रामगावकर, उपसंचालक (कोर) आनंद रेड्डी येल्लू, उपसंचालक (बफर) पियुषा जगताप, उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, प्रसिध्द डॉक्टर तथा निसर्गप्रेमी रमाकांत पांडा, महाराष्ट्र निसर्ग पर्यटन मंडळाचे सदस्य प्रकाश धारणे, अरुण तिखे, मोहर्लीच्या सरपंच सुनीता कातकर, पद्मापूरच्या सरपंच आम्रपाली अलोने आदी उपस्थित होते.

    राजकिय : घर तिथं युवासैनिक, युवा सेना चंद्रपुरात राबविणार अभियान

    ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘चंद्रपूर जिल्ह्यासाठी आज अतिशय आनंदाची बाब आहे. चंद्रपूर नेहमीच पुढे राहावा, असाच आपला प्रयत्न असतो. वाघ हा पर्यावरणाचा मित्र असून ताडोबा ही आपल्याला परमेश्वराची देण आहे, त्याचे रक्षण आपल्याला करायचे आहे. वाघाचे संरक्षण केले म्हणूनच जिल्ह्यात वाघ वाढले. चंद्रपूर पर्यटनाच्या माध्यमातून पुढे जावे, यासाठी सिंगापूरच्या धर्तीवर आपण चंद्रपुरात सफारी करीत आहोत. सफारीसाठी आलेले पर्यटक सैनिक शाळा, आर्मी म्युझियम, बॉटनिकल गार्डन, वन अकादमी, एसएनडीटी विद्यापीठ, आदींचा आनंद घेऊ शकणार आहेत. चंद्रपुरात वाघांची संख्या सर्वाधिक आहे.’
    चंद्रपूरच्या विकासासाठी पूर्ण शक्तीने काम करणार आहे. मोहर्ली, ताडोबा, बफर झोन, ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी आपण पूर्ण शक्तीने काम करीत आहोत. तसेच प्रत्येक गावाला स्वयंपूर्ण करण्याचा आपला मानस आहे. आपण सर्वजण मिळून ताडोबाचा विकास आंतरराष्ट्रीय स्तरावर करुया. यासाठी सर्व वनमजूर, वन अधिकारी, वनरक्षक, वनसेवक, रोजंदारी करणारे कर्मचारी आदींचे मोठे योगदान आहे, असेही पालकमंत्री म्हणाले. (Moharli gate tadoba)

    जिप्सी असोसिएशनला 25 लक्ष देणार : वन विभागात आपण अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. एफडीसीएमच्या माध्यमातून वन कर्मचाऱ्यांना राहिलेला फरक देण्यात आला आहे. प्रत्येक वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना वाहन देण्यासाठी आपण आग्रही भूमिका मांडली. तसेच ताडोबा फाउंडेशन मधून जिप्सी असोसिएशनला 25 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिप्सी असोसिएशनची वागणूक चांगली असली तरच पर्यटकांचे समाधान होईल व जिल्ह्याचे नाव उंचावेल.

    चंद्रपुरात दिक्षाभूमिसाठी एल्गार मोर्चा

    निसर्ग पर्यटन केंद्राला स्व. रतन टाटा यांचे नाव : प्रसिद्ध उद्योगपती स्व. रतन टाटा यांचे चंद्रपूरशी व्यावसायिक नाते नाही. तरीही त्यांचे चंद्रपूरसोबत वेगळेच ऋणानुबंध होते. रतन टाटा यांनी राज्यपालांच्या राजभवनात मोर संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून दिला. (ratan tata) तसेच त्यांनी प्राण्यांच्या रेस्क्यू सेंटरसाठी 25 कोटी दिले. सरकार आणि टाटा ट्रस्टच्या माध्यमातून चंद्रपूर येथे कॅन्सर केअर हॉस्पिटल उभे राहत आहे. त्यासाठी टाटांनी 100 कोटीची देणगी दिली आहे. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या आर्किटेकसाठी टाटा यांनी 3 कोटी दिले. कृषी व्यवस्थेला चालना देण्यासाठी त्यांनी येथील 90 गावे दत्तक घेतली. स्व. रतन टाटा यांचे स्मारक चंद्रपुरात करण्यात येणार आहे, अशी माहिती ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिली. त्याचवेळी निसर्ग माहिती केंद्राला स्व. रतन टाटा यांचे नाव देण्याची घोषणाही त्यांनी केली. (Ratan tata)

    ग्राम परिस्थितीकी विकास समिती यांना धनादेश वाटप : यावेळी ग्राम परिस्थितीकी विकास समित्यांना प्रत्येकी 3 लक्ष 50 हजारांचा धनादेश ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यात खुंटवडा, भोसरी, काटवल, वडाळा, कोकेवाडा, बिलोडा, किन्हाळा, सोनेगाव, आष्टा, निंबाळा, चेकबोर्ड, मामला, हळदी, अर्जुनी, वायगाव, झरी, घंटाचौकी, दुधाळा, मोहर्ली, घोडेगाव, मुधोली, आगरझरी, सितारामपेठ, भांबेरी आदी गावांचा समावेश होता. (Ratan tata)

    गुराख्यांना स्मार्ट स्टिकचे वाटप : यावेळी गुराख्यांना वनमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते स्मार्ट स्टिकचे वाटप करण्यात आले. यात मारुती जांभुळे, गणेश श्रीरामे, बुद्रुक कुलसंगे, अंकुश केदार, नरेंद्र डडमल, प्रकाश कन्नाके, लक्ष्मण तोफे, जयंत गडमल, विश्वनाथ मरसकोल्हे, मारुती आत्राम, राहुल आत्राम, वासुदेव सिडाम, परशुराम मडावी आदींचा समावेश होता. तत्पूर्वी, वनमंत्र्यांच्या हस्ते अनंत सोनवणे लिखित ‘एक होती माया’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्रीय संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी तर संचालन ऐश्वर्या भालेराव यांनी केले.

  • Elgar morcha : दिक्षाभूमीच्या या मागणीसाठी चंद्रपुरात एल्गार मोर्चा

    Elgar morcha : दिक्षाभूमीच्या या मागणीसाठी चंद्रपुरात एल्गार मोर्चा

    Elgar morcha 11 ऑक्टो. ला समस्त आंबेडकरी समाजाचा महामोर्चा काढण्यात आला, ह्या मोर्चात हजारो आंबेडकर अनुयायी सहभागी झाले होते, चंद्रपुरातील दिक्षाभूमीची जागा धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाला अपुरी पडत असून प्रशासनाने चांदा क्लब मैदान व शासकीय विश्रामगृह हे त्यादिवशी खुले करीत विश्रामगृह येथे बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक निर्माण करावे अशी मागणी घेऊन आंबेडकर अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

    अवश्य वाचा : 15 व 16 ऑक्टोबर रोजी चंद्रपुरात वाहतूक व्यवस्थेत बदल

    Elgar morcha 14 ऑक्टो. 1956 ला नागपूर येथे तर 16 ऑक्टो. 1956 ला चंद्रपूर येथे लाखों लोकांच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दिक्षा दिली. सध्या स्थितीत दिक्षाभूमीची जागा 15 व 16 ऑक्टो. च्या धम्मचक्र अनुवर्तन कार्यक्रमासाठी जागा अपुरी पडत असल्याने जागेची कमतरता दूर करण्यासाठी चांदा क्लब ची जागा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी शासकीय विश्राम गृहाची जागा देण्याची मागणी आंबेडकरी समाजाने महामोर्चा द्वारे केली आहे.


    चांदा क्लब येथील मद्य परवाना व जुगार परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी आजच्या महामोर्चा मध्ये करण्यात आली.


    गांधी चौकातून सुरू झालेला हा मोर्चा शहराचे भ्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला, आयोजित मोर्च्यात सहभागी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रवीण खोब्रागडे म्हणाले की दिक्षाभूमीजवळ बनविलेला पूल तोडण्यात यावा, बाबासाहेब आंबेडकर याचं भव्य स्मारकाची निर्मिती करण्यात यावी अन्यथा याहून मोठे आंदोलन आम्ही उभारू असा इशारा दिला.


    यावेळी भूमिपुत्र ब्रिगेडच्या अभिलाषा गावतुरे, बसपा जिल्हाध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार, प्रवीण खोब्रागडे, बंडू नगराळे, डॉ राकेश गावतुरे यांची उपस्थिती होती.

  • Dhamma chakra sohala : चंद्रपुरात 15 ते 16 ऑक्टोबर रोजी वाहतूक व्यवस्थेत बदल

    Dhamma chakra sohala : चंद्रपुरात 15 ते 16 ऑक्टोबर रोजी वाहतूक व्यवस्थेत बदल

    Dhamma chakra sohala चंद्रपूर शहरामधील दीक्षाभूमी मैदान येथे 15 व 16 ऑक्टोबर रोजी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून या कार्यक्रमाला जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील अनुयायी मोठया संख्येने येत असतात.

    Dhamma chakra sohala यादरम्यान वाहतुक व रहदारीचा प्रश्न निर्माण होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. तसे आदेश जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पारीत केले असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

    अवश्य वाचा : हजारो नागरिकांच्या उपस्थितीत निघाली महाकाली मातेच्या पालखीची शोभायात्रा

    चंद्रपूर शहरातून दीक्षाभूमी परिसराकडे जाणाऱ्या रहदारीचा मार्ग 15 ऑक्टोबर 2024 चे सकाळी 8 वाजता पासून 17 ऑक्टोबर च्या सकाळी 8 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना बंद करण्याचा तसेच सर्व प्रकारच्या वाहनाची रहदारी वळवण्याचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. Dhamma chakra sohala

    अवजड वाहनाकरीता रहदारीचा मार्ग : नागपूरकडून चंद्रपूरकडे येणारी सर्व प्रकारची जड वाहने ही हॉटेल कुंदन प्लाझा येथून सीटीपीएस  मार्गे नेहरू नगर वरून मुल रोडला जातील. मुलकडून नागपूरकडे जाणारी जड वाहने ही बंगाली कॅम्प – सावरकर चौक – वरोरा नाका उड्डाणपुल या मार्गाने जातील किंवा नेहरु  नगर वरून सीटीपीएस मार्गे नागपूरकडे जातील. तसेच गरजेनुसार एम.ई. एल. नाका चौक येथे सदर वाहने थांबवण्यात येतील. बल्लारशाकडून नागपूरकडे जाणारी जड वाहने बंगाली कॅम्प – नेहरुनगर वरून सीटीपीएस मार्गे नागपूरकडे जातील किंवा पलीकडे बंगाली कॅम्प डी.आर. सी. बंकर, बायपास रोड येथे दीक्षाभूमी मार्गावरील गर्दी पाहून थांबवण्यात येतील. Dhamma chakra sohala

    शहरातील दुचाकी व चारचाकी (हलकी) वाहनाकरीता रहदारी व्यवस्था : जुना वरोरा नाका चौक ते आंबेडकर महाविद्यालय, मित्रनगर चौक – टि.बी दवाखाना पर्यंतचा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाकरीता (सायकल सहीत)  बंद करण्यात येत आहे.पाण्याची टाकी –विश्रामगृह- जुना वरोरा नाका हा मार्ग सर्व प्रकारचे वाहनाकरीता (सायकल सहित) दोन्ही बाजुने बंद करण्यात येत आहे. करीता नागपूरकडून शहराकडे जाणारी वाहने (जड वाहने वगळून)  वरोरा नाका- उड्डान पुल –सिध्दार्थ  हॉटेल- बस स्टॅड- प्रियदर्शनी चौक मार्गे शहराकडे जातील. Diksha bhumi

    रामनगर, मित्रनगर,आकाशवाणी, स्नेहनगर, वडगाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पाण्याची टाकी-दवा बाजार –संत केवलराम चौक- दाताळा रोड मार्गे पर्यायी रस्त्याने आपली वाहने (जड वाहने वगळून) घेवून जावीत. त्याचप्रमाणे जटपूरा गेटकडून रामनगर मार्गे जुना वरोरा नाकाकडे जाणाऱ्या वाहन चालकांनी आपली वाहने पाण्याची टाकी –प्रियदर्शनी चौक- बस स्टॅड-  सिघ्दार्थ हॉटेल- उड्डान पुल मार्गे नागपूरकडे जातील.

    दीक्षाभूमी येथे जाणाऱ्या बौध्द बांधवाची गर्दी पाहता पाण्याची टाकी चौक- जुना वरोरा नाका ते आय.टी.आय. कॉलेज तसेच वरोरा नाका चौक – मित्रनगर चौक ते संत केवलराम चौक व मित्रनगर चौक ते जिल्हा स्टेडीयमपर्यंत या सर्व परीसरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी राहील. तसेच सदरचा सर्व परीसर “नो पार्कींग व नो हॉकर्स झोन” म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यामुळे निर्देशित काळात सदर परिसरात कोणतेही वाहने, हॉकर्स लावण्यात येवू नये. Diksha bhumi

    दीक्षाभूमी, संत केवलराम चौक तसेच  दीक्षाभूमी ते जिल्हा स्टेडियम,  या दरम्यान राहण्याऱ्या रहिवाशांनी आपली वाहने रस्त्याच्या बाजुला उभी न करता घोषित करण्यात आलेल्या पार्किंगमध्ये ठेवावीत.

    आयटीआय कॉलेज ते जिल्हा स्टेडियमपर्यंत तसेच वरोरा नाका दर्ग्याच्या उजव्या बाजुने जाणरा रस्ता –पुठ्ठेवार हॉस्पीटल- बुक्कावार हॉस्पीटल- वरोरा नाका ते पिंक प्लॅनेट पर्यंत नो- पार्किंग झोन व नो- हॉकर्स झोन म्हणुन घोषित करण्यात येत आहे. 

    दीक्षाभूमी सोहळयास येणाऱ्या नागरिकांकरीता वाहन पार्किंग स्थळ : 1.नागपूर रोडने दीक्षाभूमीकडे येणारे वाहनाकरीता शकुंतला लॉन, जनता कॉलेज पटांगण, जनता कॉलेज समोरील ईदगाह मैदान येथे वाहन पार्किंग स्थळ निश्चित करण्यात आले आहे. 2. शहराकडून दिक्षाभूमी कडे येणारे वाहनाकरीता सेंट मायकल स्कुल मैदान, सिंधी पंचायत भवन, न्यु इंग्लिश ग्राऊंड, 3. वडगांव, आकाशवाणी व लगतच्या परिसरातून दीक्षाभूमीकडे येणारे वाहनाकरीता लोकमान्य टिळक हायस्कूल (जिल्हा स्टेडियमच्या मागे) जिवन साफल्य गृह निर्माण        सहकारी संस्था (मनोमय दवाखानच्या पाठीमागे) आणि 4. मुलरोड, बंगाली कॅम्प ,तुकूम या परिसरातून येणारे वाहनांकरीता कृषी भवन जवळील मैदान/ ट्रॅव्हल्स स्टॅन्ड येथे वाहन पार्किंग स्थळ ठरवून देण्यात आले आहे.

    तरी धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन सोहळयामध्ये सहभागी सर्व बौध्द बांधव /अनुयायी व जनतेने वरील वाहतूक  व्यवस्थेचा वापर करावा. तसेच ठरवून दिलेल्या पार्कींग व्यवस्थेमध्येच आपली वाहने ठेवून वाहतुक व्यवस्थेचे पालन करावे. शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यास पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.