condolence message : आम्ही जोरगेवार कुटुंबियांच्या दुःखात सहभागी – उपमुख्यमंत्री अजित पवार

condolence message
condolence message अम्मांच्या निधनाची बातमी समजताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून, “ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही” या शब्दांत दु:ख व्यक्त केले आहे. अम्मांचे आज सकाळी निधन झाले असून, उद्या सकाळी 9 वाजता बिनबा गेट येथील शांतीधाम येथे अंत्यविधी पार पडणार आहे.

मजुराच्या अंगावर पडलं 200 किलो स्टील स्क्रॅप, झाला मृत्यू

condolence message आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई उर्फ अम्मा यांचे दीर्घ आजाराने आज रविवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता पसरताच नागरिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी राजमाता निवासस्थानी मोठी गर्दी केली. अनेकांनी शोकसंदेशातून आपल्या भावना व्यक्त करत अम्मांना आदरांजली अर्पण केली. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही पत्राद्वारे शोकसंवेदना व्यक्त करत अम्मांना आदरांजली अर्पण केली आहे.

“अम्मांच्या निधनाची वार्ता ऐकून अतिशय वाईट वाटले, परंतु ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो. आम्ही आपल्या दु:खात सहभागी आहोत,” असे अजित पवार यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *