Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • चंद्रपूरमध्ये स्थानिक विरुद्ध राष्ट्रीय पक्ष! कोण होणार नगराध्यक्ष?

    Chandrapur political battle for municipal councils : चंद्रपूर २६ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील १० नगरपरिषद व १ नगरपंचायती करीत सुरु असलेल्या निवडणूक रिंगणात नगराध्यक्ष पदाकरिता चांगलीच चुरस निर्माण झाली असून राष्ट्रीय पक्षाला काही ठिकाणी नवखा उमेदवार आव्हान निर्माण करीत असल्याचे चित्र आहे. नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ७१ उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत. विशेष बाब म्हणजे ज्या महिला नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीत उभ्या आहे त्यामध्ये काही उमेदवार यांचं राजकीय इतिहास आहे तर काहींचं वय झाल्यावर त्यांना सेवेची गरज असताना सुद्धा त्यांना नागरिकांची सेवा करायची आहे.

    हे हि वाचा : आमदाराला हवी भागीदारी नाहीतर दाखवणार दादागिरी

    बल्लारपूर नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदाचे ८ उमेदवार व पक्ष

    • अय्यर मंजुषा श्रीराम (आम आदमी पार्टी)
    • रहिकवार पूजा अमर (बहुजन समाज पार्टी)
    • वाढई अलका अनिल (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
    • दुधे रेणुका सुधाकर (भारतीय जनता पार्टी)
    • वाळके ज्योत्सना दीपक (वंचित बहुजन आघाडी)
    • तामगाडगे वंदना पंचशील (रिपब्लिकन ऑफ इंडिया)
    • मुलचंदानी चैताली दीपक (शिवसेना ठाकरे गट)
    • रोजिदा ताजुद्दीन शेख (नॅशलिस्ट कांग्रेस पार्टी)

    भद्रावती नगरपरिषद नगराध्यक्ष पद निवडणुकीत ६ उमेदवार रिंगणात

    • अनिल नारायण धानोरकर (भारतीय जनता पार्टी)
    • उमेश नानाजी काकडे (बहुजन समाज पार्टी)
    • सुनील विनायक नामोजवार (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
    • विशाल नीलकंठ शिंदे (आम आदमी पार्टी)
    • नरेंद्र महादेव पढाल (शिवसेना ठाकरे)
    • प्रफुल रामदास चटकी (शिवसेना शिंदे)

    वरोरा नगरपरिषद निवडणुकीत ५ नगराध्यक्षपदाचे उमेदवार

    • राजूरकर माया रमेश (भारतीय जनता पार्टी)
    • ठाकरे अर्चना आशिष (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
    • नाशिककर सोनम पंकज (शिवसेना ठाकरे)
    • पारशिवे रंजना मनोहर (नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी)
    • मत्ते ज्योती नितीन (शिवसेना शिंदे)

    ब्रह्मपुरी नगरपरिषद ४ उमेदवार

    • निहाल अंबर ढोरे (बहुजन समाज पार्टी)
    • सुयोगकुमार वामनराव बाळबुधे (भारतीय जनता पार्टी)
    • मिलिंद नानाजी भनारे (शिवसेना ठाकरे)
    • मिसार योगेश बालाजी (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)

    मूल नगरपरिषद ५ उमेदवार

    • गीतांजली शोन तांगडे (अपक्ष)
    • चैताली मल्हारी मद्रीवार (बहुजन समाज पार्टी)
    • किरण किशोर कापगते (भारतीय जनता पार्टी)
    • एकता प्रशांत समर्थ (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
    • भारती सुनील राखुंडे (शिवसेना)

    राजुरा ५ उमेदवार

    • अडाणीया राधेश्याम लक्ष्मीनारायण (भारतीय जनता पार्टी)
    • डोहे राजेंद्र विठ्ठल (शिवसेना)
    • धोटे अरुण रामचंद्रराव (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
    • भाके आदित्य विजय (नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी)
    • मस्के गजानन गोविंदराव (वंचित बहुजन आघाडी)

    घुग्गुस नगरपरिषद ६ उमेदवार

    • पाटील आरती स्नेहदीप (बहुजन समाज पार्टी)
    • सोनटक्के दीप्ती सुजित (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
    • देशकर रिता फकरु (अपक्ष)
    • ढोके नैना धिरज (शिवसेना ठाकरे)
    • आगदारी रंजिता पवनकुमार (अपक्ष)
    • दुर्गम शारदा मोहन (भारतीय जनता पार्टी)

    गडचांदूर नगरपरिषद ८ उमेदवार

    • उमरे राहुल नारायण (अपक्ष)
    • छाजेड धनंजय सोहनलाल (शिवसेना)
    • जोगी शरद सुरेश (नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी)
    • डोहे अरविंद तुकाराम (भारतीय जनता पार्टी)
    • ताजने निलेश शंकरराव (अपक्ष)
    • निमजे अरुण केशवराव (राष्ट्रवादी शरद पवार)
    • भोयर सचिन पांडुरंग (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
    • वाघमारे अरविंद ज्ञानोबा (प्रहार०

    नागभीड नगरपरिषद १० उमेदवार

    • कटोरे रोमी बाळकृष्ण (अपक्ष)
    • केशव सीताराम रामटेके (अपक्ष)
    • खापर्डे स्मिता प्रफुल (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
    • खोब्रागडे आत्माराम अंतराम (राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी)
    • दुधे लोमेश वामनराव (भारतीय जनता पार्टी)
    • मनोज चरणदास नागदेवते (बहुजन समाज पार्टी)
    • वृषभ सिद्धार्थ खापर्डे (अपक्ष)
    • शेंडे अनमोल तुळशीराम (अपक्ष)
    • श्रीकांत सुधाकर खापर्डे (शिवसेना)
    • सुनील देविदास मेश्राम (अपक्ष)

    चिमूर नगरपरिषद ८ उमेदवार

    • अंबादे सुरक्षा हरिदास (वंचित बहुजन आघाडी)
    • कटारे वैशाली राजू (अपक्ष)
    • गजभिये विशाखा हरिचंद्र (अपक्ष)
    • गेडाम बबिता रमेश (अपक्ष)
    • नंदेश्वर सारिका मनीष (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
    • रंगारी वनिता जगन (नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी)
    • लिंगायत गीता बाबा (भारतीय जनता पार्टी)
    • शेंडे आयेशा छगनलाल (शिवसेना)

    भिसी नगरपंचायत ६ उमेदवार

    • कटारे विक्की अशोक (अपक्ष)
    • गायकवाड पंकज नरहरी (अपक्ष)
    • चहांदे सिद्धार्थ पंचम (वंचित बहुजन आघाडी)
    • पाटील आकाश विनोद (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
    • पारवे अतुल वासुदेव (भारतीय जनता पार्टी)
    • मुन विक्की मनोहर (अपक्ष)

    नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी वेगवेगळी लढत आहे, मात्र निवडणुकीनंतर सर्व नगरसेवक आपला आघाडी धर्म पाळतील. Chandrapur political battle for municipal councils

  • tadoba chital relocation project । Tadoba–Navegaon–Nagzira चितळ स्थानांतरण यशस्वी; 63 चितळ सुरक्षितपणे हलवले

    tadoba chital relocation project

    tadoba chital relocation project : चंद्रपूर २५ नोव्हेम्बर (News३४) – ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प (टीएटीआर) येथून नवेंगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्प (एनएनटीआर) येथे चितळ स्थानांतराची दुसरी फेरी आज यशस्वीरीत्या पूर्ण झाली. कोणतीही जिवितहानी न होता एकूण 63 चितळ सुरक्षितपणे जामनी गवताळ परिसरातून एनएनटीआरमधील सॉफ्ट-रिलीज एनक्लोजरमध्ये हलविण्यात आले.

    हे सुद्धा वाचा – ५ वर्षे पोलिसांना चकवणारा चोर चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

    या प्रक्रियेत सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकही मृत्यू न होणे. चितळ हा अतिशय संवेदनशील प्राणी असून पकडण्याच्या प्रक्रियेदरम्यान किंवा मानवी जवळीक, हाताळणी, वाहतूक यावेळी तीव्र ताणामुळे त्यांना मानसिक धक्का बसू शकतो. या ताणामुळे हृदयाचे विकार निर्माण होऊन अचानक मृत्यू होण्याची शक्यता असते, ज्याला ‘कॅप्चर मायोपथी’ असे म्हटले जाते. मात्र आजच्या स्थानांतरणात एकाही प्राण्याचा मृत्यू झालेला नाही, ही अत्यंत समाधानकारक बाब आहे.

    जामनी गवताळ परिसरात तयार करण्यात आलेल्या बोमा पद्धतीचा वापर करून चितळांना सुरक्षितरीत्या पकडण्यात आले. या परिसरातील योग्य अधिवास आणि चितळांची उपलब्धता या प्रक्रियेस पूरक ठरल्या. बोमामधून प्राण्यांना विशेष तयार केलेल्या ट्रान्सलोकेशन वाहनांतून हलविण्यात आले. या वाहनांची रचना प्राण्यांचा ताण कमी करण्याच्या आणि प्रवास सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने करण्यात आलेली आहे.

    ही मोहीम पुढील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली: श्री सचिन शिंदे, विभागीय वनअधिकारी, टीएटीआर; श्री अतुल देवकर, विभागीय वनअधिकारी, एनएनटीआर; श्री बापू येळे, विभागीय वनअधिकारी, सामाजिक वनीकरण, चंद्रपूर; श्री विवेक नातू, सहाय्यक वनसंरक्षक, टीएटीआर; श्री विशाल वैद्य, वनपरिक्षेत्र अधिकारी, कोलारा, टीएटीआर; तसेच कोलारा वनपरिक्षेत्रातील कर्मचारी.

    ताडोबा आणि नवेगाव–नागझिरा या दोन्ही व्याघ्र प्रकल्पांदरम्यानच्या उत्कृष्ट समन्वयामुळे ही स्थानांतर प्रक्रिया सुरळीत, सुरक्षित आणि यशस्वीरीत्या पूर्ण झाली. या संपूर्ण मोहिमेला डॉ. प्रभू नाथ शुक्ला, क्षेत्र संचालक, टीएटीआर आणि श्री आनंद रेड्डी, उपसंचालक (कोअर), टीएटीआर यांचे मार्गदर्शन लाभले.

  • खड्डेमुक्त महामार्ग! खासदार धानोरकर यांच्या हस्तक्षेपानंतर दुरुस्तीला सुरूवात

    Nagpur Chandrapur highway repair latest update : चंद्रपूर २५ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर-नागपूर महामार्गावरील खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी दिलासा मिळाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळ आणि महामार्ग प्राधिकरणाला खडसावल्यानंतर, अखेर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असून, महामार्गाच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. 

    Read Also : जनता कॅरिअर लॉन्चर विद्यार्थी आत्महत्या, संस्थाचालकावर गुन्हा दाखल करा – युवासेना

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सार्वजनिक बांधकाम मंडळ, चंद्रपूर येथीलअधीक्षक अभियंता यांना पत्र लिहून चंद्रपूर-नागपूर महामार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. या पत्रात त्यांनी स्पष्ट केले होते की, महामार्गावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यामुळे ही समस्या अधिकच गंभीर झाली होती. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो, तसेच यामुळे भविष्यात मोठे अपघात होऊन जीवतहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने अखेर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी तातडीने पाऊले उचलली आहेत. दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने वाहनचालकांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून या कामाचा सातत्याने पाठपुरावा सुरू राहणार असून, जोपर्यंत रस्त्याची गुणवत्ता सुधारत नाही आणि महामार्ग पूर्णपणे सुस्थितीत येत नाही, तोपर्यंत प्रशासनावर दबाव कायम ठेवला जाईल, अशी माहिती खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या वतीने देण्यात आली आहे. जनतेच्या हितासाठी खासदार प्रतिभा धानोरकर कटिबद्ध असून, लवकरच हा महामार्ग अपघातमुक्त आणि सुस्थितीत दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

  • grassland restoration in Tadoba Andhari reserve । ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात जैवविविधता टिकवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल

    grassland restoration in Tadoba Andhari reserve

    grassland restoration in Tadoba Andhari reserve : चंद्रपूर २३ नोव्हेम्बर (News 34) – विदर्भातील विविध विकास कामांबरोबरच तेथील जंगल संपदा राखण्यासाठी व त्याच्या वाढीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नेहमीच आग्रही आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प परिसरातील ८०० एकर जागेचा पर्यावरणीय पुनरुज्जीवन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.या प्रकल्पाला झिरोधा कंपनी व रेन मॅटर फाऊंडेशन सामाजिक उत्तरदायित्वातून सहकार्य करणार आहेत.

    Read Also : ताडोबातील १० चितळ्यांचे स्थानांतरण

    रिवाईल्डिंग म्हणजे जंगल,गवताळ प्रदेश किंवा जलक्षेत्रात मानवी हस्तक्षेप कमीत कमी ठेवून तेथील नैसर्गिक भूभाग,वन्यजीव आणि जैवविविधतेचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन करणे होय.या संकल्पनेनुसार ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील ८०० एकर क्षेत्राचे पर्यावरणीय पुनरुज्जीवन करण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

    महाराष्ट्रातील हा पहिलाच प्रकल्प ताडोबामध्ये राबविण्यात येणार असून यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागाबरोबरच फार्मर्स फॉर फॉरेस्ट यांच्या सहकार्याने झिरोधा व रेनमॅटर फाऊंडेशन ही संस्था काम करणार आहे.यासाठी सुमारे १०० कोटी रुपयांच्या झिरोधा रिवाइल्डिंग फंड हा विशेष निधी तयार करण्यात आला आहे.या प्रकल्पासंदर्भातील औपचारिक घोषणा लवकरच होणार आहे. grassland restoration in Tadoba Andhari reserve

    झिरोधा आणि ‘रेनमॅटर फाउंडेशन’ या संस्थांच्या माध्यमातून पर्यावरणीय व सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत.रेनमॅटर फाउंडेशनमार्फत हवामान बदल व पर्यावरणीय ऱ्हास या समस्यांवर कामे करण्यात येतात. यासाठी झिरोधा ही कंपनी आपल्या नफ्यातील १० टक्के निधी सामाजिक उत्तरदायित्व व पर्यावरणीय कामांसाठी राखीव ठेवते.या राखीव निधीतून झिरोझाने संस्थेच्या १५ व्या वर्धापन दिनानिमित्त १०० कोटी रुपये गुंतवणुकीचा ‘झिरोधा रीवाइल्डिंग फंड’ जाहीर केला आहे.

    या उपक्रमांतर्गत देशातील पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या परिसरातील निसर्गाचे पुनरुज्जीवन करण्यात येणार आहे.त्यामध्ये देशात विविध ठिकाणी मोनोकल्चर वृक्षलागवडी ऐवजी जैवविविधता टिकवणाऱ्या पद्धतीने निसर्गाचा समतोल राखण्याचे उद्दिष्ट आहे.यामध्ये विदर्भातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरातील ८०० एकरच्या प्रकल्पाचा समावेश आहे.

  • Matoshri Gram samruddhi rural road scheme । शेतकऱ्यांना दिलासा! 100+ पाणंद रस्त्यांना मोठी मंजुरी; जोरगेवार यांच्या पाठपुराव्याला यश

    Matoshri Gram samruddhi rural road scheme

    Matoshri Gram samruddhi rural road scheme : चंद्रपूर २२ नोव्हेम्बर (News 34) – आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील 100 पेक्षा अधिक पाणंद रस्त्यांना मंजुरी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठीची सोय मोठ्या प्रमाणात सुधारेल तसेच शेतीमाल वाहतूक आणि बाजारपेठेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे.

    Read Also : चारचाकी वाहनात दागिने ठेवणे पडले महागात, चोराने डाव साधला

    आतापर्यंत ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांना पावसाळ्यात चिखल, पाणथळ आणि वाहतुकीच्या अडचणींमुळे शेतात जाणे कठीण व्हायचे. त्यामुळे शेती उत्पादन खर्च वाढत होता आणि वेळेवर शेतीकामे करण्यास अडथळे येत होते. मंजूर झालेल्या पाणंद रस्त्यांमुळे आता शेतकरी बांधवांचा श्रम व वेळ दोन्ही वाचणार असून पीक उत्पादन बाजारात नेण्याचे मार्गही सुकर होणार आहेत. या मंजुरीने ग्रामीण जनतेत मोठा आनंद व्यक्त करण्यात येत आहे. Matoshri Gram samruddhi rural road scheme

    या निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांचे आमदार किशोर जोरगेवार यांनी आभार व्यक्त केले आहेत. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील गावोगाव रस्ताविकासाचा प्रश्न जलद गतीने मार्गी लागत असून ग्रामीण भागात सर्वांगीण प्रगतीचा नवा अध्याय सुरू झाला आहे.

    या मंजूर पाणंद रस्त्यांच्या कामाला लवकरच सुरुवात होणार असून प्रत्येक गावापर्यंत विकास पोहोचवण्याचा दृढ संकल्प यामधून दिसून येतो. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दिलासा देणारा, विकासाचे नवे दालन उघडणारा हा निर्णय कृषी आणि ग्रामविकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

    शेतकरी हा आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यांच्या दैनंदिन श्रमांना मदत होणे आणि त्यांच्या उत्पादनाला योग्य बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यासाठी सुविधा मिळणे ही सरकारची जबाबदारी आहे. या पाणंद रस्त्यांच्या मंजुरीमुळे ग्रामीण भागातील विकासाला मोठी चालना मिळणार असून शेतकऱ्यांना वास्तविक दिलासा मिळेल. Matoshri Gram samruddhi rural road scheme

    माझ्या मतदारसंघातील प्रत्येक गावापर्यंत विकास पोहोचवण्याचा दृढ संकल्प आम्ही केला आहे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील. ही मंजुरी ही फक्त सुरुवात आहे. पुढील काळातही ग्रामीण भागातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रात अधिकाधिक विकासकामे होत राहतील,” अशी प्रतिक्रिया आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली.

  • boma enclosures for deer relocation । ताडोबातून 10 चितळांचे यशस्वी स्थानांतर! नवेगाव–नागझिरा प्रकल्पात सुरक्षित पोहोच

    boma enclosures for deer relocation

    boma enclosures for deer relocation : चंद्रपूर २२ नोव्हेम्बर (News 34) – दि. 21 नोव्हेंबर 2025 रोजी ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प येथून चितळांचे स्थानांतर करण्याच्या उपक्रमाची यशस्वी सुरुवात झाली. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी 10 चितळांचे नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सुरक्षितपणे स्थानांतर करण्यात आले.

    ताडोबामध्ये चितळांना पकडून आफ्रिकन पद्धतीच्या ‘बोमा’ संरचनेत ठेवण्यात आले. ही बोमा संरचना कोलारा वनपरिक्षेत्रातील जामणीच्या विस्तीर्ण माळरानात उभारण्यात आली आहे. जामणी परिसरातील समृद्ध चितळसंख्या आणि अनुकूल भौगोलिक परिस्थितीमुळे तो बोमा उभारण्यासाठी सर्वात योग्य परिसर ठरला. या उपक्रमाची तयारी मागील चार महिन्यांपासून सुरू होती. boma enclosures for deer relocation

    Read Also : जनता कॅरिअर लॉन्चर वसतिगृह आत्महत्या प्रकरणात एकाला अटक

    बोमातून चितळांना विशेष तयार केलेल्या स्थानांतर वाहनांद्वारे हलविण्यात आले. या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, फॉगर, तसेच जखम टाळण्यासाठी आवश्यक कुशनिंगची सोय आहे. तसेच नर–मादी चितळांना वेगळे ठेवता येईल, अशी यात रचना करण्यात आहे. या उपक्रमासाठी अशी दोन वाहने विशेष खरेदी करून सुधारित करण्यात आली. चितळांना नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील सॉफ्ट-रिलीज एनक्लोजर्समध्ये सुरक्षित पोहोचविण्यात आले.

    श्री आनंद रेड्डी, उपसंचालक (कोर), यांच्या नेतृत्वाखालील संघाच्या काटेकोर नियोजनामुळे हे काम शक्य झाले. त्यांना श्री विवेक नातू, एसीएफ यांचे मोलाचे सहकार्य लाभलं. श्री अनिरुद्ध धागे, एसीएफ, श्री भाविक चिवंडे, आरएफओ आणि श्री विशाल वैद्य, आरएफओ यांनीही यात महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडली. या स्थानांतर प्रक्रियेसाठी मध्य प्रदेशातील तज्ज्ञ पथकातील आरएफओ डॉ. बलवंत केशवाल, डेप्युटी आरओ श्री चौधरी, डेप्युटी आरओ श्री उईके आणि डेप्युटी आरओ श्री भायस यांना विशेष आमंत्रित करण्यात आले. तसेच नवेगाव–नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे आरएफओ श्री तेजस सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने वाहतूक आणि पायलटिंगदरम्यान आवश्यक सहकार्य केले. boma enclosures for deer relocation

    boma enclosures

    “या संपूर्ण प्रक्रियेत एकाही चितळाचा मृत्यू न होणे हे सर्वात मोठे यश आहे”, असे श्री आनंद रेड्डी यांनी सांगितले. हा उपक्रम ताडोबा-अंधारी आणि नवेगाव–नागझिरा या दोन्हा व्याघ्र प्रकल्पाच्या प्रभावी समन्वयातून यशस्वीरीत्या राबविण्यात आला.

    “या स्थानांतर उपक्रमामुळे ताडोबाचा शाकाहारी प्राण्यांच्या स्थानांतराचा अनुभव अधिक समृद्ध झाला आहे. यापूर्वी वाघांचे नवेगाव–नागझिरा, सिमलीपाल आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांमध्ये स्थानांतर करण्यात आले आहे. आता चितळांचे यशस्वी स्थानांतर हा ताडोबाच्या संवर्धन कार्यातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे.” – श्री प्रभू नाथ शुक्ला, भावसे, क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

    “संवर्धनातील विद्मान आव्हाने आणि मानव–वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अशा सक्रिय व्यवस्थापन उपाययोजना अत्यावश्यक आहेत. महाराष्ट्र वन विभाग भविष्यातही अशा प्रगतिशील उपक्रमांची अंमलबजावणी करत राहील.” – श्री एम. एस. रेड्डी, भावसे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र

  • mental abuse of minors in educational hostels । विद्यार्थ्याच्या आत्महत्येचे गूढ कायम; एकास अटक, प्राचार्यासह तिघांचा शोध सुरू

    mental abuse of minors in educational hostels

    mental abuse of minors in educational hostels : चंद्रपूर २२ नोव्हेम्बर (News 34) – जिल्ह्यातील प्रतिष्ठित चांदा शिक्षण प्रसारक मंडळ या शैक्षणिक संस्थेतील जनता करिअर लाँचरच्या वसतिगृहात अल्पवयीन मुलाने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २० नोव्हेम्बरला घडली. वसतिगृहात होणाऱ्या त्रासामुळे या विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणी जनता महाविद्यालयाच्या प्राचार्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या एकाला अटक करण्यात आली असून अन्य तीन जण फरार आहेत, त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र या आत्महत्येचे नेमके कारण काय याचे गूढ अद्याप कायम आहे.

    Read Also : चंद्रपुरातील गाढ झोपेत असलेल्या लोकप्रतिनिधीसाठी महत्वाची बातमी

    चांदा शिक्षण प्रसारक मंडळ ही शैक्षणिक संस्था विदर्भातील सर्वात मोठया शैक्षणिक संस्थेत गणली जाते. या संस्थेचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे आहेत, या संस्थेच्या अधिनस्थ अनेक शाळा कॉलेजस चालविण्यात येतात, त्याचप्रमाणे या संस्थेने वर्ष २००९ मध्ये जनता करिअर लॉन्चर ची सुरुवात केली होती. mental abuse of minors in educational hostels

    जनता करिअर लॉन्चर मध्ये गुलाब सुदरी यांचा १७ वर्षीय मुलगा CET चे शिक्षण घेत होता, जनता करिअर लॉन्चर च्या वसतिगृहात अल्पवयीन मुलगा राहत होता, मात्र त्याला वॉर्डन लक्ष्मण रमाजी चौधरी, व्यवस्थापक प्रेमा झोटिंग, सल्लागार विष्णुदास शरद ठाकरे व प्राचार्य आशिष क्रिष्णाजी महातले हे मानसिक त्रास देत होते. होणाऱ्या त्रासाची माहिती मुलाने वडिलांना सुद्धा दिली मात्र वडिलांनी त्याची समज काढून त्याला परत पाठविले.

    त्या १७ वर्षीय मुलाला स्वतःवर होणारा त्रास सहन झाला नाही आणि त्याने वसतिगृहात गळफास लावून आत्महत्या केली, पोलिसांनी गुन्हा दाखल करीत वॉर्डन लक्ष्मण रमाजी चौधरी ला अटक केली असून उर्वरित ३ आरोपी पसार झाले आहे, पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहे.

    जनता करिअर लॉन्चर चे संचालक अशोक जीवतोडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते आत्महत्या प्रकरणावर म्हणाले कि आम्ही आमच्यापरीने चौकशी समिती गठीत केली असून याबाबत अधिक माहिती मिळवीत आहो, पोलीसांचा तपास सुरु असून लवकरच सत्य बाहेर येईल. mental abuse of minors in educational hostels

    यापूर्वी सुद्धा एका शैक्षणिक संस्थेत मुलाने वसतिगृहात आत्महत्या केली होती, त्याला सुद्धा मानसिक त्रास देण्यात आल्याची माहिती आहे. आता पुन्हा शैक्षणिक संस्थेत असा प्रकार घडल्याने वसतिगृहात कर्मचाऱ्यांद्वारे विद्यार्थ्यांवर होणाऱ्या मानसिक त्रासावर प्रशासनाने निर्णायक पाऊल उचलावे अशी मागणी होत आहे.

  • Chandrapur Mumbai Pune Daily Train Demand : चंद्रपूरकरांसाठी ‘मुंबई-पुणे डेली रेल कनेक्टिव्हिटी’ केवळ स्वप्नच!

    Chandrapur Mumbai Pune Daily Train Demand

    Chandrapur Mumbai Pune Daily Train Demand : चंद्रपूर – २२ नोव्हेम्बर (News 34) – चंद्रपूर आणि बल्लारशाह परिसरासाठी मुंबई-पुणेची दररोज (डेली) रेल्वे सेवा आजही एक अपूर्ण स्वप्न बनून राहिली आहे. जिल्ह्यातील तरुणांना रोजगार, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि चांगल्या संधींसाठी मुंबई, पुणे तसेच नागपूर या महानगरांकडे स्थलांतर करावे लागत आहे. परंतु, जेव्हा सण किंवा महत्त्वाच्या कामांसाठी घरी परतण्याची वेळ येते, तेव्हा प्रवासादरम्यान त्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. कमकुवत रेल्वे कनेक्टिव्हिटी हीच त्यांची सर्वात मोठी अडचण ठरते.

    Read Also : चंद्रपूर मनपासाठी भाजपकडे ४४० इच्छुक उमेदवारांचे अर्ज

    विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला आणि इतर मोठ्या शहरांमधून मुंबई-पुणेसाठी दररोज रेल्वे सेवा उपलब्ध आहेत, ज्यामुळे तेथील उद्योग आणि लॉजिस्टिक क्षेत्राला सतत चालना मिळत आहे. याउलट, चंद्रपूर परिसर या सुविधेपासून वंचित राहिला आहे. सध्याच्या गाड्यांना लागणाऱ्या प्रवासाच्या लांब वेळेमुळे ही परिस्थिती अधिकच आव्हानात्मक झाली आहे. Chandrapur Mumbai Pune Daily Train Demand

    उदाहरणार्थ, दररोज धावणारी नंदीग्राम एक्सप्रेस (११००२) मुंबईला पोहोचण्यासाठी सुमारे १९ तास ४२ मिनिटांचा वेळ घेते, तर खासगी ट्रॅव्हल्स यापेक्षा कमी वेळेत प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचवतात. याच कारणामुळे लोक नाइलाजाने जादा भाडे देऊन खासगी साधनांचा (प्रायव्हेट ट्रॅव्हल्स) आधार घेत आहेत.

    सध्याची स्थिती आणि मागणी:

    सध्या २२११० मुंबई एलटीटी बल्लारशाह सुफा एक्सप्रेस आठवड्यातून फक्त बुधवारी दुपारी १:४० वाजता बल्लारशाहहून सुटते आणि सुमारे १५ तास ५० मिनिटांत मुंबईला पोहोचते. दुसरीकडे, २२१५२ पुणे साप्ताहिक सुफा एक्सप्रेस रविवारी बल्लारशाहहून निघून सोमवारी सकाळी पुण्यात पोहोचते. प्रवाशांचे स्पष्ट मत आहे की, पुणे दिशेने वाढत असलेल्या शैक्षणिक आणि रोजगाराच्या गरजा लक्षात घेता, या ट्रेनचे दररोज (डेली) चालणे अत्यंत आवश्यक आहे.

    प्रस्ताव प्रलंबित:

    रेल्वे विभागाच्या माहितीनुसार, बल्लारशाह स्टेशनचे बांधकाम आणि आधुनिकीकरण कार्य अंतिम टप्प्यात आहे. त्याचबरोबर, बल्लारशाह-एलटीटी साप्ताहिक विशेष ट्रेन आणि काजीपेठ-पुणे सुफा एक्सप्रेसला दररोज (डेली) चालवण्याचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला आहे. यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असे मानले जात आहे.

    स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की, जर चंद्रपूर-मुंबई-पुणे दरम्यान दररोज रेल्वे कनेक्टिव्हिटी सुनिश्चित झाली, तर लॉजिस्टिक्स, उद्योग आणि व्यवसायाला गती मिळेल, तसेच तरुणांना आपल्या भागाशी जोडले राहण्याची संधी वाढेल. सध्या जिल्ह्याचे लक्ष रेल्वेच्या त्या निर्णयाकडे लागले आहे, जो वर्षांनुवर्षे चालत आलेल्या या समस्येवर कायमस्वरूपी उपाय देईल. Chandrapur Mumbai Pune Daily Train Demand

    बल्लारशाह जंक्शनवरून धावणाऱ्या प्रमुख गाड्या
    बल्लारशाह जंक्शनवरून पुणे आणि मुंबईसाठी तीन महत्त्वाच्या गाड्या धावतात:

    • २२११० मुंबई एलटीटी सुपरफास्ट एक्सप्रेस (८७० किमी): साप्ताहिक (बुधवारी) दुपारी १:४० वाजता निघून १५ तास ५० मिनिटांत दुसऱ्या दिवशी सकाळी ५:३० वाजता मुंबईला पोहोचते.
    – ११००२ नंदीग्राम एक्सप्रेस: दररोज सकाळी ९:१५ वाजता निघून १९ तास ४२ मिनिटांत दादर सेंट्रलला पोहोचते. ही ट्रेन छत्रपती संभाजीनगर, नांदेड आणि नाशिक रोडसारख्या प्रमुख ठिकाणांना जोडते.
    • २२१५२ पुणे साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस: ही गाडी सायंकाळी ५:१५ वाजता बल्लारशाहहून निघून दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी १०:५० वाजता पुणे स्टेशनला पोहोचते.
      याचप्रमाणे, दर शुक्रवारी रात्री १० वाजता पुण्याहून चंद्रपूर-बल्लारशाहसाठी काजीपेठ रेल आहे. ही रेल्वे सेवा विदर्भातील चंद्रपूर शहराला महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक शहरांशी जोडते. Chandrapur Mumbai–Pune Daily Train Demand


    ‘आम्ही तुमच्यासोबत आहोत! आंदोलनावर उतरा…’

    मुंबई-पुणे डेली रेल कनेक्टिव्हिटीच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधींनी पुढे येऊन आंदोलन करावे, असे आवाहन करणारे पोस्ट सोशल मीडियावर फिरत आहेत. दरम्यान, लोकप्रतिनिधी आणि रेल्वे विभागाच्या उदासीन दृष्टिकोनावर लोकांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
    डेली रेल कनेक्टिव्हिटीच्या मुद्द्यावर लोकांनी आता लोकप्रतिनिधींना धारेवर धरले आहे. ‘या मुद्द्यावर तुम्ही आंदोलनासाठी उतरा… संपूर्ण शहर तुमच्या पाठिंब्यासाठी तयार आहे,’ अशा आशयाचे पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. Chandrapur Mumbai Pune Daily Train Demand

    (या बातमी संदर्भात चंद्रपूरकरांचे काय मत आहे ते आम्हाला नक्की कळवा).

  • Municipal election candidate withdrawal updates । नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक अपडेट; चंद्रपूर जिल्ह्यात आता नगराध्यक्ष ७८, सदस्य १ हजार २७५ उमेदवार रिंगणात

    Municipal election candidate withdrawal updates

    Municipal election candidate withdrawal updates : चंद्रपूर २२ नोव्हेम्बर (News३४) – राज्यातील अनेक काळापासून प्रलंबित असलेल्या २४६ नगरपरिषद व ४२ नगरपंचायतीच्या निवडणुका २ डिसेम्बर रोजी होणार असून त्याचा निकाल दुसऱ्या दिवशी ३ डिसेम्बर रोजी जाहीर होणार आहे. उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले असून आज अनेकांनी आपले अर्ज मागे घेतले आहे.

    Read Also : ६६ जागेसाठी भाजपकडे ४४० इच्छुक उमेदवारांचे अर्ज

    चंद्रपूर जिल्ह्यातील १० नगरपरिषद व १ नगरपंचायत निवडणुकीची उमेदवारांनी तयारी सुरु केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या अनेकांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. १० नगरपरिषद व १ नगरपंचायत साठी नगराध्यक्ष पदाकरिता एकूण ९१ अर्ज दाखल झाले होते. ज्यामध्ये आज गडचांदूर मध्ये अपक्ष शेख रफिक निझामुद्दीन , नागभीड नगरपरिषद बाबा सेवकराम जांभुळे व उके दशरथ रामचंद्र. सदस्य अर्ज – ११. भिसी नगरपंचायत अपक्ष पाटील आकाश विनोद, अपक्ष गेडाम आशिष हनुमंत, अपक्ष घुटके देवेंद्र श्रीरंग, अपक्ष बन्सोड तुळशीराम मारोती व अपक्ष मनोज नारायण डोंगरे. सदस्य – ३.

    बल्लारपूर नगरपरिषद अपक्ष कुलदिवार मीनाक्षी सुनील, सदस्य अर्ज मागे – सिद्दीकी शमीमउद्दीन जलालउद्दीन, नक्कावार राजेश नारायण, श्रीवास्तव शेखर रामेश्वर, शेख शबाना प्रवीण रशीद, अलोणे कमल शाहिराज, मोरे राहुल टीकाराम, पाटील प्रीतम नामदेवराव. भद्रावती – अपक्ष अशोक दादाजी हजारे, सदस्य – केवळ मारोती ढोके, माधव नामदेवराव बांगडे. वरोरा – अपक्ष आगलावे विभा पुरुषोत्तम, अपक्ष वरघने वसुधा शंभूनाथ. सदस्य – शेख शब्बीर रमजान, कातोरे प्रमोद सुधाकर, घुमे आशिष मारोती, मधुकर मारोती तितरे, वीरूटकर कार्तिक मारोती, ब्राह्मणकर सुनीता मारोती, शेळके गजानन दशरथ, स्वामी गौरव मनोहर राजुरा अपक्ष देशमुख विनायक शंकरराव. सदस्य – ३.

    ब्रह्मपुरी – सदस्य अर्ज – शेंडे अनुकूल राजकुमार, बगमारे नोगेश वासुदेव, मेश्राम विवेक प्रेमलाल, खेत्रे सपना सुभाष, ममता शामू मालाधरे. घुग्गुस – सदस्य अर्ज मागे १४, मूल नगरपरिषद सदस्य – ३, चिमूर नगरपरिषद – सदस्य अर्ज १२ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. Municipal election candidate withdrawal updates

    चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी ९१ अर्ज दाखल झाले होते. आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७८ उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीत उरले आहे. तर सदस्यपदासाठी एकूण १ हजार ३४६ अर्ज दाखल केले होते. अर्ज परत घेतल्यावर आता एकूण १ हजार २७५ उमेदवार रिंगणात उरले आहे.

    चिन्ह वाटप केल्यावर २६ नोव्हेम्बर पासून उमेदवारांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु होणार आहे. २ डिसेम्बर रोजी मतदान तर ३ डिसेम्बरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

  • Minor student suicide due to hostel harassment । जनता करिअर लॉन्चर च्या वसतिगृहात विद्यार्थ्यांचा मानसिक छळ, विद्यार्थ्यांची आत्महत्या

    Minor student suicide due to hostel harassment

    Minor student suicide due to hostel harassment : चंद्रपूर – २० नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपुरातील जनता कॅरिअर लॉन्चर मधील वसतिगृहात २० नोव्हेम्बरला सकाळी ७.३० ते ९ वाजेदरम्यान १७ वर्षीय मुलाने वसतिगृहातील व्यवस्थापनाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केली. सकाळी घडलेल्या या घटनेची माहिती देण्यास रामनगर पोलिसांनी कमालीची दिरंगाई दाखवली हे विशेष.

    Read Also : भद्रावती नगरपरिषद निवडणूक; नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे एकमेकांवर गंभीर आरोप

    मृतक १७ वर्षीय मुलगा हा जनता कॉलेज परिसरातील जनता कॅरिअर लॉन्चर मध्ये CET चे शिक्षण घेत होता, रामनगर स्थित जनता कॅरिअर लॉन्चर या वसतिगृहातील वरच्या मजल्यावर मृतक मुलगा राहत होता. सोबत त्याचे २ मित्र राहत होते, सकाळी मृतक रूम मध्ये होता, त्याचे २ मित्र सकाळी रूम च्या बाहेर गेले होते त्यावेळी काही कारणास्तव मुलाने दोघांसोबत जाण्याचे टाळले अशी माहिती आहे. Minor student suicide due to hostel harassment

    मृतक मुलाच्या वडिलाने रामनगर पोलीस स्टेशनमध्ये आत्महत्येला जबाबदार जनता कॅरिअर लॉन्चर मधील कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केला आहे. गुलाब सुदरी यांच्या तक्रारीत त्यांच्या मुलाला वसतिगृहाचे वार्ड बॉय, व्यवस्थापनातील कर्मचारी त्याला मानसिक त्रास देत होते, घटनेच्या काही दिवसांपूर्वी मुलाने याबाबत वडिलांना माहिती दिली होती. मात्र वडिलांनी त्याला उलट समजवून परत वसतिगृहात पाठविले.

    वसतिगृहातील कर्मचाऱ्यांचा त्रास मुलगा मनावर घेणार अशी साधी कल्पनाही वडिलांना नव्हती. गुलाब सुदरी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी वसतिगृह वॉर्डन लक्ष्मण रमाजी चौधरी, व्यवस्थापक प्रेमा झोटिंग, सल्लागार विष्णुदास शरद ठाकरे व प्राचार्य आशिष क्रिष्णाजी महातळे यांच्यावर कलम १०७, ३(५) भारतीय न्याय दंड संहिता अन्व्ये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात रामनगर पोलिसांनी जनता कॅरिअर लॉन्चर मधील व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे, कारण मृतक मुलगा हा त्या शिक्षण संस्थेच्या जबाबदारीवर होता. वसतिगृहात काय सुरु आहे, कुणाची तक्रार आहे का? याबाबत त्यांनी माहिती घ्यायला हवी होती. Minor student suicide due to hostel harassment

    वसतिगृहातील कर्मचारी त्या अल्पवयीन मुलाच्या आत्महत्येला जबाबदार आहे तितकेच जनता कॅरिअर लॉन्चर चे व्यवस्थापन हि जबाबदार आहे.

    सदर घटना हि सकाळी घडली होती, पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळाली आणि घटनास्थळाचा पंचनामा केला मात्र रात्रीचे ८३० वाजल्यानंतर सुद्धा पोलिसांनी या सर्व घटनाक्रमाची माहिती पत्रकारांना देण्याचे टाळले. गुन्हा दाखल होत आहे, फिर्याद अजून मिळाली नाही, चर्चा सुरु आहे. बस इतकीच माहिती पोलीस देत होते. आत्महत्येच्या या घटनेची माहिती द्यायला पोलिसांनी १२ तासाचा वेळ लावला. विशेष बाब म्हणजे जनता कॅरिअर लॉन्चर चे संचालक भाजप नेते अशोक जीवतोडे आहे.