Sunil Namojwar vs Anil Dhanorkar
Sunil Namojwar vs Anil Dhanorkar : चंद्रपूर/भद्रावती – २० नोव्हेम्बर (News३४) – भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील नामोजवार विरुद्ध अनिल धानोरकर यांच्यात गंभीर आरोपांचा सामना रंगला आहे. भद्रावती नगरपरिषदेचे दोन माजी नगराध्यक्ष एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उभे असून दोघांनी एकमेकांवर आयात उमेदवार असल्याचा आरोप यावेळी लावला.
भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील नामोजवार आणि भाजपचे उमेदवार अनिल धानोरकर यांच्यात गंभीर आरोपांचा सामना रंगला आहे. News34 शी बोलताना त्यांनी एकमेकांविरोधात गंभीर आरोप केले आहेत.
मी भाजपची 8 वर्षे सेवा केली आणि मिळाले काय? : सुनील नामोजवार
मागील ८ वर्षांपासून मी भाजपात प्रामाणिकपणे काम केले, भद्रावती शहरात भाजपचे अस्तित्व नसताना पक्षवाढ आणि संघटना मजबूत करण्यासाठी रात्रंदिवस एक केले नगर परिषद निवडणूक जवळ आल्यावर पक्षाने मला काम करा उमेदवारी तुम्हाला मिळणार असे आश्वासन दिले होते. मात्र दोन महिन्यापूर्वी भाजपात सामील झालेले अनिल धानोरकर यांना पक्षाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. पक्षाने माझ्यावर अन्याय केला, त्या अन्यायाला कंटाळून मी कांग्रेस पक्षात प्रवेश केला. अनिल धानोरकर यांची प्रतिमा जनमानसात चांगली नाही, ते निष्क्रिय आहेत. भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याने ते हरणारचं आहेत. अनेक वर्षांपासून नगराध्यक्ष असलेले धानोरकर यांनी काय काम केले ते सांगावे. माझ्या अडीच वर्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात अनेक विकासकामे झाली आहे त्यामुळे जनता माझ्या पाठीशी आहे.
Read Also : ब्रह्मपुरीत इथेनॉल कंपनीत स्फोट
मी दिवसरात्र एक करीत पक्षाचे काम करीत राहिलो आणि २ महिन्यापूर्वी भाजपात सामील झालेले अनिल धानोरकर यांना पक्षाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. पक्षाने माझ्यावर अन्याय केला, त्या अन्यायाला कंटाळून मी कांग्रेस पक्षात प्रवेश केला. अनिल धानोरकर यांची प्रतिमा जनमानसात चांगली नाही, भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याने ते हरणारचं आहे. अनेक वर्षांपासून नगराध्यक्ष असलेले धानोरकर यांनी काय काम केले ते सांगावे. माझ्या अडीच वर्षाच्या भद्रावती नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात अनेक विकासकामे झाली आहे त्यामुळे जनता माझ्या पाठीशी आहे. Sunil Namojwar vs Anil Dhanorkar
माझ्या घरच्या लोकांनी मला साथ दिली नाही : अनिल धानोरकर
मला भाजप पक्षाने उमेदवारी दिली, तर ती माझ्या क्षमतेनुसार मिळाली आहे, राहिला निष्ठावंतांवर अन्याय वर्ष २०१८ मध्ये नामोजवार यांनी शिवसेना सोडून भाजपात प्रवेश केला आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक माझ्याविरोधात लढले, त्यावेळी त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या निष्ठावंतांवर अन्याय झाला नव्हता काय? त्यांनी हे आधी सांगावं. भद्रावती मध्ये मी आणि माझे भाऊ दिवंगत खासदार बाळू धानोरकर मिळून शिवसेना पक्ष मोठा केला, भद्रावती नगरपरिषदेची सत्ता अनेक वर्षे आमच्या हातात होती. राज्यात सत्तांतर झाले पक्ष विखुरले. विधानसभा निवडणुकीत मी कांग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली मात्र खासदार प्रतिभा धानोरकर यांनी माझ्यावर अन्याय करीत विधानसभेचे तिकीट आपल्या भावाला दिले. Sunil Namojwar vs Anil Dhanorkar
लोकसभा निवडणुकीत मी खासदार प्रतिभा धानोरकरांचा खूप प्रचार केला होता, प्रामाणिक कार्य करण्याचे फळ मला अन्याय स्वरूपात मिळाले. नामोजवार यांनी जो आरोप लावला आहे, त्यावर मी इतकंच बोलणार ज्यावेळी. मी भाजपात प्रवेश केला होता तेव्हा नगरपरिषदेचे आरक्षण व निवडणूक घोषित झाली नव्हती. मला उमेदवारी मिळाली ती पक्षाने केलेल्या सर्व्हेत मी आघाडीवर असल्याने मिळाली. माझ्या कार्यकाळात मी नगरपरिषदेला स्वच्छ भद्रावती मध्ये केंद्रात स्थान मिळवून दिले. असे अनेक काम मी माझ्या कार्यकाळात केली आहे, त्या कामावर जनता माझ्या सोबत आहे. असे ते news34 शी बोलताना म्हणाले.
Leave a Reply