Tag: Bhadrawati Nagar Parishad election 2025

  • भद्रावती प्रचारात खळबळ! महिलांचा संताप, भाजप उमेदवार झाले व्हायरल

    BJP candidate Anil Dhanorkar viral video : चंद्रपूर २८ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात १० नगरपालिका व १ नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे, या रणधुमाळीत सर्वच राजकीय पक्ष प्रचारावर जोर देत आहे मात्र काही उमेदवारांना मतदारांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. जिल्ह्यातील भद्रावती नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे भाजप उमेदवार अनिल धानोरकर यांना महिलांच्या रोषाचा सामना करावा लागला, याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

    निवडणूक – वरोरा शहरात भाजप उमेदवाराला मारहाण, तिघांना अटक

    भद्रावती नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारकार्यात व्यस्त असलेले भाजपचे उमेदवार अनिल धानोरकर यांना गवराळा गावात महिलांच्या तीव्र रोषाचा सामना करावा लागला. धानोरकर हे दारू व्यावसायिक असून शहरासह परिसरात त्यांची अनेक दारू दुकाने असल्याची स्थानिकांची माहिती आहे. रात्री गवराळा गावात गेल्यावर दारू दुकानावरून महिला धानोरकर यांच्यावर महिला चांगल्या संतापल्या.

    प्रचारासाठी वॉर्डात प्रवेश करताच महिलांनी धानोरकर यांना वॉर्डातील दारू दुकानांमुळे तरुण मुलं व्यसनाधीन होत असल्याची तक्रार केली. “दारू दुकानामुळे आमच्या घरातील आणि समाजातील तरुण बिघडत आहेत, तुम्हीच मालक असताना आम्ही कोणाकडे तक्रार करायची?” अशा शब्दांत महिलांनी जाब विचारला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे धानोरकरांची चांगलीच नाचक्की झाली, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे समजताच धानोरकर यांनी माघार घेतली.

    भद्रावती नगरपरिषदेत अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता होती, पक्ष विखुरले आणि परिस्थिती बदलली, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभे असलेले उमेदवार हे ३ ते ४ पक्षाचा प्रवास करून आपण निष्ठावंत असल्याचे दाखवीत आहे, मात्र अनेक वर्षे सत्ता उपभोगल्यावर उमेदवारांना रोषाचा सामना करावा लागत आहे.

  • Sunil Namojwar vs Anil Dhanorkar । भद्रावती पालिकेच्या निवडणुकीवरून धानोरकर-नामोजवार आमनेसामने; एकमेकांविरुद्ध केले हे आरोप

    Sunil Namojwar vs Anil Dhanorkar

    Sunil Namojwar vs Anil Dhanorkar : चंद्रपूर/भद्रावती – २० नोव्हेम्बर (News३४) – भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील नामोजवार विरुद्ध अनिल धानोरकर यांच्यात गंभीर आरोपांचा सामना रंगला आहे. भद्रावती नगरपरिषदेचे दोन माजी नगराध्यक्ष एकमेकांविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उभे असून दोघांनी एकमेकांवर आयात उमेदवार असल्याचा आरोप यावेळी लावला.

    भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील नामोजवार आणि भाजपचे उमेदवार अनिल धानोरकर यांच्यात गंभीर आरोपांचा सामना रंगला आहे. News34 शी बोलताना त्यांनी एकमेकांविरोधात गंभीर आरोप केले आहेत.

    मी भाजपची 8 वर्षे सेवा केली आणि मिळाले काय? : सुनील नामोजवार

    मागील ८ वर्षांपासून मी भाजपात प्रामाणिकपणे काम केले, भद्रावती शहरात भाजपचे अस्तित्व नसताना पक्षवाढ आणि संघटना मजबूत करण्यासाठी रात्रंदिवस एक केले नगर परिषद निवडणूक जवळ आल्यावर पक्षाने मला काम करा उमेदवारी तुम्हाला मिळणार असे आश्वासन दिले होते. मात्र दोन महिन्यापूर्वी भाजपात सामील झालेले अनिल धानोरकर यांना पक्षाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. पक्षाने माझ्यावर अन्याय केला, त्या अन्यायाला कंटाळून मी कांग्रेस पक्षात प्रवेश केला. अनिल धानोरकर यांची प्रतिमा जनमानसात चांगली नाही, ते निष्क्रिय आहेत. भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याने ते हरणारचं आहेत. अनेक वर्षांपासून नगराध्यक्ष असलेले धानोरकर यांनी काय काम केले ते सांगावे. माझ्या अडीच वर्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात अनेक विकासकामे झाली आहे त्यामुळे जनता माझ्या पाठीशी आहे.

    Read Also : ब्रह्मपुरीत इथेनॉल कंपनीत स्फोट

    मी दिवसरात्र एक करीत पक्षाचे काम करीत राहिलो आणि २ महिन्यापूर्वी भाजपात सामील झालेले अनिल धानोरकर यांना पक्षाने नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली. पक्षाने माझ्यावर अन्याय केला, त्या अन्यायाला कंटाळून मी कांग्रेस पक्षात प्रवेश केला. अनिल धानोरकर यांची प्रतिमा जनमानसात चांगली नाही, भाजपने त्यांना उमेदवारी दिल्याने ते हरणारचं आहे. अनेक वर्षांपासून नगराध्यक्ष असलेले धानोरकर यांनी काय काम केले ते सांगावे. माझ्या अडीच वर्षाच्या भद्रावती नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात अनेक विकासकामे झाली आहे त्यामुळे जनता माझ्या पाठीशी आहे. Sunil Namojwar vs Anil Dhanorkar

    माझ्या घरच्या लोकांनी मला साथ दिली नाही : अनिल धानोरकर

    मला भाजप पक्षाने उमेदवारी दिली, तर ती माझ्या क्षमतेनुसार मिळाली आहे, राहिला निष्ठावंतांवर अन्याय वर्ष २०१८ मध्ये नामोजवार यांनी शिवसेना सोडून भाजपात प्रवेश केला आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक माझ्याविरोधात लढले, त्यावेळी त्यांच्या उमेदवारीमुळे भाजपच्या निष्ठावंतांवर अन्याय झाला नव्हता काय? त्यांनी हे आधी सांगावं. भद्रावती मध्ये मी आणि माझे भाऊ दिवंगत खासदार बाळू धानोरकर मिळून शिवसेना पक्ष मोठा केला, भद्रावती नगरपरिषदेची सत्ता अनेक वर्षे आमच्या हातात होती. राज्यात सत्तांतर झाले पक्ष विखुरले. विधानसभा निवडणुकीत मी कांग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागितली मात्र खासदार प्रतिभा धानोरकर यांनी माझ्यावर अन्याय करीत विधानसभेचे तिकीट आपल्या भावाला दिले. Sunil Namojwar vs Anil Dhanorkar

    लोकसभा निवडणुकीत मी खासदार प्रतिभा धानोरकरांचा खूप प्रचार केला होता, प्रामाणिक कार्य करण्याचे फळ मला अन्याय स्वरूपात मिळाले. नामोजवार यांनी जो आरोप लावला आहे, त्यावर मी इतकंच बोलणार ज्यावेळी. मी भाजपात प्रवेश केला होता तेव्हा नगरपरिषदेचे आरक्षण व निवडणूक घोषित झाली नव्हती. मला उमेदवारी मिळाली ती पक्षाने केलेल्या सर्व्हेत मी आघाडीवर असल्याने मिळाली. माझ्या कार्यकाळात मी नगरपरिषदेला स्वच्छ भद्रावती मध्ये केंद्रात स्थान मिळवून दिले. असे अनेक काम मी माझ्या कार्यकाळात केली आहे, त्या कामावर जनता माझ्या सोबत आहे. असे ते news34 शी बोलताना म्हणाले.