Chandrapur political battle for municipal councils : चंद्रपूर २६ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील १० नगरपरिषद व १ नगरपंचायती करीत सुरु असलेल्या निवडणूक रिंगणात नगराध्यक्ष पदाकरिता चांगलीच चुरस निर्माण झाली असून राष्ट्रीय पक्षाला काही ठिकाणी नवखा उमेदवार आव्हान निर्माण करीत असल्याचे चित्र आहे. नगरपंचायत व नगरपरिषद निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यात एकूण ७१ उमेदवार नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत. विशेष बाब म्हणजे ज्या महिला नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीत उभ्या आहे त्यामध्ये काही उमेदवार यांचं राजकीय इतिहास आहे तर काहींचं वय झाल्यावर त्यांना सेवेची गरज असताना सुद्धा त्यांना नागरिकांची सेवा करायची आहे.
हे हि वाचा : आमदाराला हवी भागीदारी नाहीतर दाखवणार दादागिरी
बल्लारपूर नगरपरिषदेत नगराध्यक्ष पदाचे ८ उमेदवार व पक्ष
- अय्यर मंजुषा श्रीराम (आम आदमी पार्टी)
- रहिकवार पूजा अमर (बहुजन समाज पार्टी)
- वाढई अलका अनिल (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
- दुधे रेणुका सुधाकर (भारतीय जनता पार्टी)
- वाळके ज्योत्सना दीपक (वंचित बहुजन आघाडी)
- तामगाडगे वंदना पंचशील (रिपब्लिकन ऑफ इंडिया)
- मुलचंदानी चैताली दीपक (शिवसेना ठाकरे गट)
- रोजिदा ताजुद्दीन शेख (नॅशलिस्ट कांग्रेस पार्टी)
भद्रावती नगरपरिषद नगराध्यक्ष पद निवडणुकीत ६ उमेदवार रिंगणात
- अनिल नारायण धानोरकर (भारतीय जनता पार्टी)
- उमेश नानाजी काकडे (बहुजन समाज पार्टी)
- सुनील विनायक नामोजवार (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
- विशाल नीलकंठ शिंदे (आम आदमी पार्टी)
- नरेंद्र महादेव पढाल (शिवसेना ठाकरे)
- प्रफुल रामदास चटकी (शिवसेना शिंदे)
वरोरा नगरपरिषद निवडणुकीत ५ नगराध्यक्षपदाचे उमेदवार
- राजूरकर माया रमेश (भारतीय जनता पार्टी)
- ठाकरे अर्चना आशिष (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
- नाशिककर सोनम पंकज (शिवसेना ठाकरे)
- पारशिवे रंजना मनोहर (नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी)
- मत्ते ज्योती नितीन (शिवसेना शिंदे)
ब्रह्मपुरी नगरपरिषद ४ उमेदवार
- निहाल अंबर ढोरे (बहुजन समाज पार्टी)
- सुयोगकुमार वामनराव बाळबुधे (भारतीय जनता पार्टी)
- मिलिंद नानाजी भनारे (शिवसेना ठाकरे)
- मिसार योगेश बालाजी (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
मूल नगरपरिषद ५ उमेदवार
- गीतांजली शोन तांगडे (अपक्ष)
- चैताली मल्हारी मद्रीवार (बहुजन समाज पार्टी)
- किरण किशोर कापगते (भारतीय जनता पार्टी)
- एकता प्रशांत समर्थ (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
- भारती सुनील राखुंडे (शिवसेना)
राजुरा ५ उमेदवार
- अडाणीया राधेश्याम लक्ष्मीनारायण (भारतीय जनता पार्टी)
- डोहे राजेंद्र विठ्ठल (शिवसेना)
- धोटे अरुण रामचंद्रराव (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
- भाके आदित्य विजय (नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी)
- मस्के गजानन गोविंदराव (वंचित बहुजन आघाडी)
घुग्गुस नगरपरिषद ६ उमेदवार
- पाटील आरती स्नेहदीप (बहुजन समाज पार्टी)
- सोनटक्के दीप्ती सुजित (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
- देशकर रिता फकरु (अपक्ष)
- ढोके नैना धिरज (शिवसेना ठाकरे)
- आगदारी रंजिता पवनकुमार (अपक्ष)
- दुर्गम शारदा मोहन (भारतीय जनता पार्टी)
गडचांदूर नगरपरिषद ८ उमेदवार
- उमरे राहुल नारायण (अपक्ष)
- छाजेड धनंजय सोहनलाल (शिवसेना)
- जोगी शरद सुरेश (नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी)
- डोहे अरविंद तुकाराम (भारतीय जनता पार्टी)
- ताजने निलेश शंकरराव (अपक्ष)
- निमजे अरुण केशवराव (राष्ट्रवादी शरद पवार)
- भोयर सचिन पांडुरंग (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
- वाघमारे अरविंद ज्ञानोबा (प्रहार०
नागभीड नगरपरिषद १० उमेदवार
- कटोरे रोमी बाळकृष्ण (अपक्ष)
- केशव सीताराम रामटेके (अपक्ष)
- खापर्डे स्मिता प्रफुल (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
- खोब्रागडे आत्माराम अंतराम (राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी)
- दुधे लोमेश वामनराव (भारतीय जनता पार्टी)
- मनोज चरणदास नागदेवते (बहुजन समाज पार्टी)
- वृषभ सिद्धार्थ खापर्डे (अपक्ष)
- शेंडे अनमोल तुळशीराम (अपक्ष)
- श्रीकांत सुधाकर खापर्डे (शिवसेना)
- सुनील देविदास मेश्राम (अपक्ष)
चिमूर नगरपरिषद ८ उमेदवार
- अंबादे सुरक्षा हरिदास (वंचित बहुजन आघाडी)
- कटारे वैशाली राजू (अपक्ष)
- गजभिये विशाखा हरिचंद्र (अपक्ष)
- गेडाम बबिता रमेश (अपक्ष)
- नंदेश्वर सारिका मनीष (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
- रंगारी वनिता जगन (नॅशनलिस्ट कांग्रेस पार्टी)
- लिंगायत गीता बाबा (भारतीय जनता पार्टी)
- शेंडे आयेशा छगनलाल (शिवसेना)
भिसी नगरपंचायत ६ उमेदवार
- कटारे विक्की अशोक (अपक्ष)
- गायकवाड पंकज नरहरी (अपक्ष)
- चहांदे सिद्धार्थ पंचम (वंचित बहुजन आघाडी)
- पाटील आकाश विनोद (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)
- पारवे अतुल वासुदेव (भारतीय जनता पार्टी)
- मुन विक्की मनोहर (अपक्ष)
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी वेगवेगळी लढत आहे, मात्र निवडणुकीनंतर सर्व नगरसेवक आपला आघाडी धर्म पाळतील. Chandrapur political battle for municipal councils