Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • nodal officer duties in municipal elections । जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे निर्देश: निवडणूक कामात निष्काळजीपणा मुळीच नको

    nodal officer duties in municipal elections

    nodal officer duties in municipal elections : चंद्रपूर, दि. 15 (News३४) : चंद्रपूर जिल्ह्यातील 10 नगर परिषद आणि एका नगर पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर 2025 रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून विविध कामांसाठी नोडल अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व यंत्रणांनी निवडणुकीची कामे जबाबदारीने पार पाडावीत, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिल्या.

          जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित नोडल अधिका-यांच्या बैठकीत ते बोलत होते. पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, निवडणूक यंत्रणेशी संबंधित सर्व अधिकारी कर्मचा-यांनी योग्य रितीने आपले कर्तव्य बजावावे. यासाठी सुक्ष्म नियोजन करा. निवडणुकीच्या कामांमध्ये कोणताही निष्काळजीपणा होऊ देऊ नका. त्यासाठी पुर्वतयारी करून ठेवा, अशा सुचना त्यांनी दिल्या. nodal officer duties in municipal elections

    Read Also : चंद्रपूर वन अकादमीला ३ स्टार नामांकन

          यावेळी मतदान कर्मचारी / मनुष्यबळ व्यवस्थापन कक्ष, साहित्य मागणी व वितरण, मतपत्रिका, मतदार यादी, वाहन व्यवस्थापन, संगणक सुरक्षा आयटी ॲप्लीकेशन, मतदार जनजागृती, कायदा-सुव्यवस्था व सुरक्षा नियोजन, ईव्हीएम मशीन व्यवस्थापन, आचारसंहिता / ऑनलाईन तक्रार निवारण, खर्च नियंत्रण, टपाली मतपत्रिका छपाई, माध्यम व सनियंत्रण, समन्वय जिल्हा निवडणूक संपर्क कक्ष, तक्रार निवारण व मतदार मदत कक्ष व नियंत्रण कक्ष, निवडणूक निरीक्षक, दिव्यांग मतदार मदत व सनियंत्रण कक्ष आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.

          बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकाडे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, प्रभारी मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) शुभम दांडेकर, उपजिल्हाधिकारी संजय पवार, कार्यकारी अभियंता अक्षय पगारे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, मिना साळूंके,  प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल गायकवाड आदी उपस्थित होते. nodal officer duties in municipal elections

    या नगर परिषद / पंचायतमध्ये होणार निवडणूक

          चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, भद्रावती, वरोरा, ब्रम्हपुरी, घुग्घुस, राजुरा, गडचांदूर, चिमूर, मूल, नागभीड येथील नगर परिषद तर भिसी येथील नगर पंचायतीसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी निवडणूक होणार आहे. वरील नगर परिषद आणि नगर पंचायतीमध्ये एकूण  प्रभागांची संख्या 133 असून निवडून द्यावयाच्या सदस्यांची संख्या 253 आहे. या निवडणुकीसाठी एकूण मतदार लोकसंख्या 3 लक्ष 71 हजार 537 असून यात पुरुष मतदार 1 लक्ष 87 हजार 139 तर स्त्री मतदार 1 लक्ष 84 हजार 387 आहे. अन्य मतदारांची संख्या 11 आहे.

  • Chandrapur Forest Academy GRIHA 3-star rating । चंद्रपूर वन अकादमीला GRIHA-3 स्टार मानांकन

    Chandrapur Forest Academy GRIHA 3-star rating

    Chandrapur Forest Academy GRIHA 3-star rating : चंद्रपूर, दि. १५ (News३४) : पर्यावरणपूरक उपक्रम आणि ऊर्जा बचतीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल चंद्रपूर वन अकादमीला  GRIHA  कौन्सिल, टेरी  (TERI), नवी दिल्ली यांच्याकडून थ्री स्टार मानांकन प्रदान करण्यात आले आहे. अकादमीने गेल्या काही वर्षापासून राबविलेल्या पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासावर आधारित उपाययोजनांमुळे पुढीलप्रमाणे बचत साध्य झाली आहे. यात वीज बचत 4597 मेगावॅट प्रति तास प्रति वर्ष,  हरितगृह वायू उत्सर्जन घट 3769 मेट्रिक टन, कार्बन डॉयऑक्साईड समतुल्य प्रति वर्ष, पाणी बचत 199110 किलोलीटर प्रति वर्ष.

    read Also : रामाला तलाव संवर्धनाला गती द्या, इको प्रो

    देशातील एकमेव वन प्रशिक्षण संस्था तसेच महाराष्ट्रातील एकमेव शासकीय प्रशिक्षण संस्था म्हणून या सन्मानाने चंद्रपूर वन अकादमीने इतिहास रचला आहे. हा सन्मान महाराष्ट्र वन विभागाच्या मुकुटातील आणखी एक मानाचा तुरा ठरला असून राज्यातील पर्यावरणपूरक विकासाच्या दिशेने हे एक प्रेरणादायी पाऊल मानले जात आहे.

    या यशाचे श्रेय वन अकादमीचे संचालक श्रीनिवास रेड्डी, अपर संचालक (प्रशिक्षण) उमेश वर्मा व इतर अधिकारी कर्मचारी यांना दिले जाते. संचालक रेड्डी त्यांच्या दूरदृष्टी, पर्यावरणाबद्दलची संवेदनशील दृष्टी व अथक प्रयत्न आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळेच ही अभूतपूर्व कामगिरी साध्य झाल्याचे अपर संचालक उमेश वर्मा यांनी कळविले आहे.

  • Bihar Assembly NDA victory celebration । बिहार विधानसभेत NDA चा विजय: चंद्रपूरमध्ये BJP कार्यकर्त्यांचा जल्लोष

    Bihar Assembly NDA victory celebration

    Bihar Assembly NDA victory celebration : चंद्रपूर १४ नोव्हेम्बर (News३४) – बिहार विधानसभेतील एन.डी.ए. गटबंधनच्या भव्य विजयानिमित्त भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर तर्फे शहरातील गांधी चौक येथे जल्लोष साजरा करण्यात आला. विजयाच्या आनंदात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात लाडू वाटप करत संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमून सोडला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी ढोल-ताश्याच्या गजरात लाडू वाटप करत विजयाचा जल्लोष साजरा केला. यावेळी घुग्घूस आणि पडोली येथे ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.  

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, वंदना हातगावकर, महामंत्री रवींद्र गुरुनुले, मनोज पाल, श्याम कनकम, सविता दंढारे, युवा मोर्चा अध्यक्ष मयुर हेपट, मंडळ अध्यक्ष रवि जोगी, प्रदीप किरमे, स्वप्निल डुकरे, सुभाष अदमाने, अॅड. सारिका संदुरकर, युवा मोर्चा महिला महामंत्री सायली येरणे, पुष्पा उराडे, प्रज्ञा बोरगमवार, वंदना तिखे, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष राशिद हुसेन, कौसर खान, आदिवासी आघाडी अध्यक्ष जितेश कुळमेथे, अमोल शेंडे, माजी नगरसेवक संदीप आवारी, अरुण तिखे, देवानंद वाढई, विठ्ठल डुकरे, शितल आश्रम, राजेंद्र अडपेवार, भाग्यश्री हांडे, मुग्धा खांडे, राकेश बोमनवार, सुदामा यादव, उग्रसेन पांडे, रंजन ठाकुर, शेखर शेट्टी, जयश्री आश्रम यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते. Bihar Assembly NDA victory celebration

    Read Also : भाजपला उमेदवार मिळेना

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, बिहारच्या जनतेने विकास, स्थैर्य आणि पारदर्शक प्रशासन यांना प्राधान्य देत एन.डी.ए. आघाडीला मोठा जनादेश दिला आहे. आम्ही बिहारच्या जनतेचे मनापासून अभिनंदन करतो. हा विजय बिहारच्या विकासयात्रेत नवा अध्याय ठरेल, असा पूर्ण विश्वास आहे. बिहारमध्ये मिळालेला हा ऐतिहासिक विजय म्हणजे केवळ एखाद्या राजकीय पक्षाचा विजय नाही, तर तो देशातील सर्वसामान्य जनतेच्या आशा-आकांक्षांचा, विकासाच्या दिशेने जात असलेल्या राष्ट्राच्या सामूहिक इच्छाशक्तीचा विजय आहे.

    chandrapur celebration

    भारतामध्ये विकास, सुशासन आणि पारदर्शक नेतृत्वालाच जनतेचा आशीर्वाद मिळतो, हे बिहारच्या जनतेने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. आज चंद्रपूरमध्ये आपण जल्लोष करत असलो तरी हा जल्लोष आपल्या विचारांचा, आपल्या राष्ट्रनिष्ठेचा आणि भाजपा कार्यकर्त्यांच्या समर्पित परिश्रमांचा सुद्धा आहे. बिहारमधील विजय हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वावर असलेल्या जनतेच्या अपार विश्वासाचा पुरावा आहे. Bihar Assembly NDA victory celebration

    मोदीजींनी देशाला विकासाच्या नवीन वाटा दाखवल्या, गरीब कल्याणाच्या योजना घराघरात पोहोचवल्या आणि देशात नवी ऊर्जा निर्माण केली. त्या ऊर्जेचे प्रतिबिंब बिहारमध्ये स्पष्टपणे दिसून आले.ना. अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासकार्यातील दृढनिश्चयी नेतृत्वाचे हे प्रतीक असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी घुग्घूस आणि पडोली येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने फटाके फोडून, ढोल-ताश्याच्या गजरात मिठाई वाटप करत जल्लोष साजरा करण्यात आला.

  • Ramala Lake conservation project Chandrapur । रामाळा तलाव संवर्धनाला गती द्या; इको-प्रोची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी!

    Ramala Lake conservation project Chandrapur

    Ramala Lake conservation project Chandrapur : चंद्रपूर: शहराचा प्राचीन वारसा आणि पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला रामाळा तलाव संवर्धनाच्या दृष्टीने शासनाने सुरू केलेल्या कामाला त्वरित गती देण्याची मागणी इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. या संदर्भात रामाळा तलाव संवर्धनाच्या मागणी करिता संस्थेने अन्नत्याग सत्याग्रह आंदोलन केले होते, ज्यानंतर प्रशासनातर्फे तलाव संवर्धनाच्या कामास सुरुवात झाली होती.

    Read Also : भद्रावती नगरपरिषद निवडणुकीत भाजपला उमेदवार मिळेना

    रामाळा तलाव संवर्धनाचा पहिला टप्पा: कामाचा दर्जा आणि गती राखणे आवश्यक
    इको-प्रो संस्थेने निवेदनात नमूद केले आहे की, जनआंदोलनाची दखल घेत रामाळा तलावाच्या संवर्धनाच्या पहिल्या टप्प्यातील कामे मंजूर होऊन सुरूवात झाली आहेत. यामध्ये एसटीपी (सांडपाणी प्रक्रिया केंद्र) आणि रिटेनिंग वॉल (संरक्षक भिंत) बांधकामाचा समावेश आहे. पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या या कामांना आता पावसाळ्यानंतर तातडीने गती देणे आणि कामाचा दर्जा राखणे अत्यंत आवश्यक आहे. या कामाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागांना योग्य निर्देश देण्याची मागणी संस्थेने केली आहे. Ramala Lake conservation project Chandrapur

    रामाळा तलाव संवर्धन दुसरा टप्पा – रामाळा उद्यानाचे पुनरुज्जीवन अत्यावश्यक

    पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर रामाळा उद्यानाचे पुनरुज्जीवन आणि सौंदर्यीकरणाचा दुसरा टप्पाचे नियोजन करणे त्वरित सुरू करण्याची आवश्यकता इको-प्रोने व्यक्त केली आहे. सध्या शहराच्या मध्यवर्ती भागातील हे उद्यान अत्यंत दुर्लक्षित अवस्थेत असून, येथील सुविधांची संरचना खंडहर स्वरूपात असल्याने नागरिकांसाठी ते निरुपयोगी ठरत आहे.
    यासाठी इको-प्रोने खालीलप्रमाणे प्रमुख मागण्या केल्या आहेत.

    रामाळा उद्यान सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव आणि आराखडा

    रामाळा उद्यान सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याच्या प्रशासनाच्या नियोजनाला गती देण्यासाठी आणि सुधारित आराखडा त्वरित तयार करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश द्यावेत.

    फुट ब्रिज बांधकाम

    रामाळा तलावाच्या दक्षिणेकडील बाजूस उद्यानात जाण्यासाठी मंजूर असलेल्या फुट ब्रिजचे बांधकाम पुरातत्व विभागाशी समन्वय साधून आणि आवश्यक सुधारणा करून तातडीने सुरू करावे. Ramala Lake conservation project Chandrapur

    अतिक्रमण नियंत्रण आणि पर्यावरणीय उपाययोजना

    तलावाचे दीर्घकाळ संवर्धन करण्यासाठी संस्थेने काही महत्त्वाच्या पर्यावरणीय आणि अतिक्रमण नियंत्रण उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे:

    मियावाकी वन – वृक्षारोपण

    तलावाच्या उत्तरेकडील, पूर्वी तलावाचाच भाग असलेल्या मोकळ्या जागेचा वापर ‘मियावाकी’ पद्धतीने वृक्षारोपण करून ही जागा अतिक्रमणापासून वाचवावी. यावर मागील अनेक बैठकांमध्ये चर्चा झालेली होती, त्याचा पुढील नियोजनात समावेश करावा.

    अतिक्रमण रोखण्यासाठी रिटेनिंग वॉल
    तलावाच्या पूर्व दिशेस असलेल्या वस्तीकडून होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी रिटेनिंग वॉलचे बांधकाम करावे.

    मच्छी नाल्याचे बांधकाम
    रामाळा तलावात येणारा मच्छी नाला झरपट नदीकडे वळविण्यासाठी नाला बांधकामाचा प्रस्ताव तयार करावा. या उपायामुळे तलावाचे संवर्धन होईल आणि पावसाळ्यात जलनगर परिसरात होणारी पाणी तुंबण्याची समस्या दूर होईल.

    ऐतिहासिक वारसा जतन
    तलावाला लागून असलेली किल्ला भिंत आणि तलावाची पार म्हणून असलेली भिंत याची दुरुस्ती अत्यावश्यक असून, पुरातत्व विभागाकडून पाऊले उचलली गेली नसल्याने याबाबत पाठपुरावा करावा. Ramala Lake conservation project Chandrapur

    रेल्वे स्टेशनवरील प्रदूषणावर नियंत्रण
    रेल्वे स्टेशनवर उतरवल्या जाणाऱ्या रासायनिक खतांमुळे लोडिंग-अनलोडिंग दरम्यान जमिनीवर पडणारे आणि पावसाळ्यात तलावात वाहून येणारे प्रदूषण थांबवण्यासाठी रेल्वेच्या साईडिंग बांधकामासोबतच त्यांच्याकडून योग्य उपाययोजना करण्यात यावी यासाठी योग्य निर्देश देण्यात यावे.

    इको-प्रो संस्थेच्या या मागण्यांमुळे चंद्रपूर शहरातील या ऐतिहासिक जलस्रोताचे संवर्धन होऊन शहराच्या सौंदर्यात भर पडेल, तसेच शहराच्या मधोमध नागरिकांना एक सुंदर आणि सुरक्षित वारसास्थळ उपलब्ध होईल.

  • constitutional discussion event Lord Buddha TV । Nagpur ते Mumbai पर्यंत १० जिल्ह्यांमध्ये सन्मान बाबासाहेबांचा आणि संविधानाचा उपक्रम!

    constitutional discussion event Lord Buddha TV

    constitutional discussion event Lord Buddha TV : चंद्रपूर १३ नोव्हेम्बर (News३४) : भारतातील एकमेव आंबेडकराईट बुद्धिस्ट टेलिव्हिजन चैनल लॉर्ड बुद्धा टिवी या वर्षी आपल्या गौरवशाली प्रवासाची १५ वर्षे पूर्ण करत आहे. विशेष म्हणजे, भारतीय संविधानालाही या वर्षी ७५ वर्षे पूर्ण होत असून, या दुहेरी सोहळ्याचे औचित्य साधत लॉर्ड बुद्धा टिवी आणि राजकुमार बड़ोले फाउंडेशन एक भव्य प्रबोधनात्मक उपक्रम हाती घेतला आहे.

    १५ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत सन्मान बाबासाहेबांचा, जागर संविधानाचा हा वैचारिक महोत्सव महाराष्ट्रातील १० जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात आला आहे. दररोज सायंकाळी 7 ते 10 वाजेपर्यंत होणाऱ्या या चंद्रपूर येथील महाचर्चेत प्रख्यात बहुजन विचारवंत मराठा सेवा संघाचे आयु प्रा.दिलीप चौधरी,ॲड. वैशाली टोंगे ओबीसी अभ्यासक, ॲड.राजस प्रवीण खोब्रागडे चंद्रपूर, ॲड. सत्यपाल कातकर पत्रकार,संविधान तज्ञ ॲड.पुनम वाघमारे /उमरे अधिवक्ता हे भारतीय संविधान- समतेचा पाया आणी डाॅ.बाबासाहेबांचा दृष्टिकोण या विषयावर सहभाग घेत असून सामाजिक कार्यकर्ते ,संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानावर प्रकाश टाकणार आहेत. constitutional discussion event Lord Buddha TV

    Read Also : गोंडपिपरी तालुक्यातील विकासकामांची जिल्हाधिकारी गौडा यांनी केली पाहणी

    या वैचारिक प्रवासाचा शुभारंभ १५ नोव्हेंबर रोजी नागपूर येथे होणार असून त्यानंतर हा कार्यक्रम चंद्रपूर,येथे दि.16 नोव्हेंबर 2025 रोज रविवार ला सिद्धार्थ बुद्ध विहार तुकूम चंद्रपूर येथे सायं 6 ते 9 वा. विषय – भारतीय संविधान – समतेचा पाया आणि डॉ. बाबासाहेबांचा दृष्टिकोण या विषयावर महाचर्चा आयोजित करण्यात आली आहे असून
    अमरावती, अकोला, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, पुणे, कोल्हापूर अशा प्रमुख जिल्ह्यांत पार पडणार आहे. समारोपाचा भव्य कार्यक्रम २६ नोव्हेंबर संविधान दिनी छाया-आकांक्षा (लाइव इन कॉन्सर्ट) भीम गीतांचा सुपरहीट कार्यक्रम मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान (मंत्रालयाजवळ) आयोजित करण्यात आला आहे. constitutional discussion event Lord Buddha TV

    लॉर्ड बुद्धा टिवीचे प्रक्षेपण सध्या भारतातील २२ राज्यांमध्ये विविध केबल नेटवर्कच्या माध्यमातून २४ तास सुरू आहे. तसेच हा चैनल ओटीटी वर, मोबाइल अॅप वर, स्मार्ट टीव्ही आणि यूट्यूबवर देखील जगभरात उपलब्ध आहे.
    लॉर्ड बुद्धा टिवीची सुरुवात २६ नोव्हेंबर २०१० रोजी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरून झाली होती — आणि तेव्हापासूनच हे चैनल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, बौद्ध धम्म आणि सामाजिक परिवर्तनाचे कार्य सातत्याने जनतेपर्यंत पोहोचवत आहे.

    “भारतीय संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महान योगदानाचा जागर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविणे हेच या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे, असे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन नेटवर्कचे मुख्य संचालक सचिन मून यांनी सांगितले. constitutional discussion event Lord Buddha TV

    चंद्रपूरातील सर्व नागरिकांनी या लाईव्ह महाचर्चेत प्रबोधनात्मक प्रवासात सहभागी होऊन लॉर्ड बुद्धा टिवीच्या माध्यमातून संविधानाच्या मूल्यांचा जागर अनुभवावा, असे आवाहन मनोज मोडक,चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधि लाॅर्ड बुद्धा टि.व्ही.चॅनल व सिद्धार्थ बुद्ध विहार समितीचे सचिव मारोतराव रायपुरे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.या पत्रकार परिषदेत मनोज मोडक, मारोतराव रायपुरे,बाळकृष्ण जिवणे,सतिश रामटेके,सुनिल साव,जनार्दन वाघमारे सह कपिला मेश्राम, जयंती वनकर, वंदना जिवणे, छाया गडलिंग उपस्थित होते.

  • district infrastructure review meeting । पालकसचिव वेणुगोपाल रेड्डी यांनी घेतला जिल्हा स्तरीय यंत्रणेचा आढावा

    district infrastructure review meeting

    district infrastructure review meeting state secretary : चंद्रपूर, दि. 13 (News३४) : जिल्ह्यातील पायाभुत कामे आणि प्रमुख प्रकल्पांची सद्यस्थिती तसेच शासनाकडे प्रलंबित असलेल्या उपक्रमांची सोडवणूक करण्यासाठी अपर मुख्य सचिव तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकसचिव बी. वेणुगोपाल रेड्डी यांनी जिल्हास्तरीय यंत्रणेचा आढावा घेऊन सुचना दिल्या.

    नियोजन भवन येथे झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक रामानुजम, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे तसेच विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

    Read Also : आता २५ वर्षे वीज मोफत

    जिल्हा स्तरावरील प्रलंबित मुद्दे शासनाकडे मांडणे व त्याची सोडवणूक करण्यासाठी सदर बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे सांगून पालकसचिव श्री. रेड्डी म्हणाले, सेवा हमी कायद्याअंतर्गत नागरिकांना ठराविक वेळेत उत्कृष्ट सेवा देणे बंधनकारक आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत जिल्हा प्रशासनाने नियमित आढावा घ्यावा. चंद्रपूर जिल्ह्यात आयुष्यमान भारत कार्ड वाटपासाठी प्रत्येक गाव स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करावे. ॲग्रीस्टॅक नोंदणी व ई -पीक पाहणी करिता विद्यार्थ्यांची मदत घेता येते का, याची पडताळणी करावी. झुडपी जंगलाबाबत आढावा घेऊन  शासन स्तरावरून काय मदत पाहिजे, त्याची माहिती द्यावी. शेतकऱ्यांच्या उत्पादकतेसाठी महत्त्वपूर्ण असलेली जमिनीची आरोग्यपत्रिका जास्तीत जास्त शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावी. गावकऱ्यांना विश्वासात घेऊन जमिनीची आरोग्यपत्रिका तयार करावी. district infrastructure review meeting

    चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची उपलब्धता असल्यामुळे येथे मत्स्यव्यवसायाला चालना द्यावी. चंद्रपूरचे कॅन्सर हॉस्पीटल नागरिकांच्या सेवेत रुजू होणार आहे. त्यामुळे टाटा कॅन्सर हॉस्पिटल सारखी यंत्रणा या हॉस्पिटलमध्ये विकसित करून रुग्णांना उत्कृष्ट सेवा द्यावी. बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या नागरिकांना हक्काचा रोजगार उपलब्ध होईल,  याबाबत नियोजन करावे.  त्यासाठी उद्योगांची कार्यशाळा आयोजित कराव्यात. मानव वन्यजीव संघर्ष कमी  करण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष प्रभावीपणे उपयोगात आणावा. वन्य प्राण्यांचे लोकेशन ट्रेस करण्यासाठी ऑनलाईन सिस्टीमचा वापर करावा. विविध विभागांनी शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या विषयांचा अभ्यास करून सुटसुटीत टिपणी सादर करावी, अशा सूचना पालकसचिव श्री. रेड्डी दिल्या. district infrastructure review meeting

    या विषयांचे झाले सादरीकरण :

    जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सादरीकरणात 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम, 150 दिवसांच्या कृती आराखड्याबाबत ई गव्हर्नन्स सुधारणा, फ्लॅगशीप उपक्रमांतर्गत्‍ जलजीवन मिशन, नळ जोडणीची सद्यस्थिती, आयुष्मान भारत कार्ड, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री किसान सन्माननिधी, ॲग्रीस्टॅक नोंदणी, स्वामित्व योजना, भारत नेट प्रकल्प, जमिनीची आरोग्य पत्रिका,  किसान क्रेडिट कार्ड, पीक कर्ज वाटपाची सद्यस्थिती, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी व ग्रामीण), प्रस्तावित समृद्धी महामार्ग, 10 कोटी वृक्ष लागवड मोहीम, अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वाटप आदींची माहिती दिली.

    जिल्ह्यातील पायाभूत कामे आणि प्रमुख प्रकल्प : 

    चंद्रपूर जिल्ह्यात बांधकाम सुरू असलेले जिल्हा क्रीडा संकुल, जिल्हाधिकारी कार्यालयाची नवीन इमारत, नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत, चंद्रपूर कॅन्सर हॉस्पिटल, बाबुराव शेडमाके स्टेडियम, पोलीस स्टेशनचे बांधकाम,  नवीन चंद्रपूर विकास आराखडा, बॉटनिकल गार्डन प्रकल्प, बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र, मानव वन्यजीव संघर्षासाठी उपाययोजना, आदर्श शाळा, महिला बचत गट भवन निर्माण करणे, वाचनालय, जिल्ह्यातील स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र, मोबाईल कॅन्सर व्हॅन, 20 ग्रामीण प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सौर उर्जेवर रूपांतरित करणे,  मॉडेल अंगणवाडी बांधकाम आदी बाबींचे जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी सादरीकरण केले. district infrastructure review meeting

  • chandrapur municipal corporation apman patra । हा तर जाहीर धुत्कार; चंद्रपूर मनपाला मिळाले अपमान-पत्र

    chandrapur municipal corporation apman patra

    chandrapur municipal corporation apman patra : चंद्रपूर, दि. 12 नोव्हेंबर (News३४) — बागला चौक ते राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय या रस्ता दुभाजकाच्या कामातील प्रचंड गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ आज जनविकास सेनेने चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना “अप-मानपत्र” देऊन मनपातील महाभ्रष्ट अधिकाऱ्यांचा “जाहीर धुत्कार” केला.

    जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष व माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने दुपारी 4 वाजता आयुक्त विद्या गायकवाड यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन त्यांना ‘अप-मानपत्र’ दिले. मनपातील महाभ्रष्ट अधिकाऱ्यांचा जाहीर धुत्कार करत असल्याचे यावेळी त्यांनी आयुक्तांसमोर नमूद केले. देशमुख यांनी मनपाचे सहायक अभियंता आशिष भारती यांच्यासोबत केलेल्या संयुक्त पाहणीचा अहवाल आयुक्त गायकवाड यांना दिला. आयुक्तांना अपमानपत्र देत, दुभाजकाच्या कामात त्वरित चौकशी करून संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. यावेळी अक्षय येरगुडे, मनीषा बोबडे देवरा हटवार इत्यादी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. chandrapur municipal corporation apman patra

    Read Also : वीजबिलातील नावात बदल करणे झाले सोप्पे

    माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी काल, दिनांक 12 नोव्हेंबर रोजी मनपाचे सहाय्यक अभियंता आशिष भारती यांच्या उपस्थितीत बागला चौकातील दुभाजकाच्या कामाचे प्रत्यक्ष मोजमाप केले. तांत्रिक उपकरण, वजन काटा,टेप इत्यादी साहित्य घेऊन कामाच्या अंदाजपत्रकांनुसार स्पॉट पंचनामा केला. यावेळी साहित्याच्या प्रमाणात मोठ्या तफावती आढळल्या. अंदाजपत्रकात दाखवलेले स्टील, सिमेंट, व वृक्षलागवडीचे प्रमाण वास्तवापेक्षा तीनपट वाढवून दाखवले असल्याचे स्पष्ट झाले. तसेच दुभाजकाची लांबी आणि खर्च कृत्रिमरीत्या वाढवून 3.56 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे पुरावे सादर करण्यात आले. या सर्व घोटाळ्याचा सारांश ‘अप-मानपत्रा’मध्ये दिला आहे. chandrapur municipal corporation apman patra

    Read Also : चंद्रपूर मनपाचे प्रभाग आरक्षण ठरली डोकेदुखी

    देशमुख यांनी या गैरव्यवहाराचे पुरावे मनपाच्या अधिकाऱ्यांसमोर सादर करून देखील कारवाई न झाल्याचा आरोप केला. उलट मनपा प्रशासन तकलादू कारणे देऊन भ्रष्ट अधिकारी व कंत्राटदाराचे संरक्षण करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे संतप्त झालेल्या जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांचा ‘अपमानपत्र देऊन जाहीर धुत्कार’ करत निषेध नोंदवला.

    या आंदोलनामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील वाढत्या भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले असून शहरभर या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.

    असे कसे अंदाजपत्रक ?

    बागला चौक व सावरकर चौक व सावरकर चौकातील दुभाजक तोडून एकूण 1800 मीटरचे अंदाजपत्रक मनपाचे अधिकाऱ्यांनी नवीन दुभाजकासाठी तयार केले. त्यामध्ये बागला चौकातील दुभाजकाची लांबी 1000 मीटर दाखवण्यात आली. मनपा अभियंत्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष मोजल्यानंतर नंतर ही लांबी 510 मीटर निघाली. अंदाजपत्रकामध्ये काही प्रमाणात अधिकची क्वांटिटी घेतल्या जाते. त्यामुळे 600 मीटर पेक्षा जास्त ही लांबी असायला नको. अंदाजपत्रक बनवताना 400 मीटरची तफावत दिसते.

    या ठिकाणी वापरलेल्या लोखंडी सळाखींचे देशमुख यांनी वजन काटा व टेप घेऊन मोजमाप केले. सर्व हिशेब काढल्यानंतर संपूर्ण दुभाजकासाठी 100 ते 125 क्विंटल पेक्षा जास्त स्टील लागायला नको. अंदाजपत्रकामध्ये 390 क्विंटल स्टीलची देण्यात आली. सावरकर चौकातील दुभाजकाची लांबी विचारात घेतल्यास एकूण कामाची 1300-1400 मीटर लांबी होते. या दुभाजकावर दोन फूटच्या रुंदीचे(बॅग साईज) चे 660 पामच्या झाडांचा तसेच एक फूट बॅग साइज असलेल्या 7500 चाफ्याच्या झाडाचा समावेश आहे. दोन्ही मिळून या साईजचे 2000 पेक्षा जास्त झाडे लावणे शक्य नाही.असे अव्वाच्या सव्वा प्रमाण वाढवून अंदाजपत्रका तयार करण्यात आले. chandrapur municipal corporation apman patra

    दुभाजकाच्या देखभालीसाठी 57 लक्ष रुपये वार्षिक खर्च

    या दुभाजकाच्या देखभालीसाठी वर्षाला 57 लक्ष रूपये खर्च अंदाजपत्रकामध्ये नमूद आहे. एकीकडे शहरातील 88 बगीचे,8 डिवाइडर व 13 सौंदर्यकरणाचे स्थळ यांची देखभाल करण्यासाठी मनपा एका कंत्राटदाराला वर्षाला केवळ एक कोटी म्हणजे महिन्याला आठ लाख रुपये देते. तर बागला चौकातील एका दुभाजकाच्या देखभालीसाठी मनपा वर्षाला 57 लाख रुपये म्हणजे महिन्याला जवळपास पाच लाख रुपये मे. सूर्यवंशी एंटरप्राइजेस या कंत्राटदाराला देणार आहे.

  • district collector vinay gauda inspection । नगर परिषद निवडणुकीपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांचा बल्लारपूर दौरा – स्ट्राँग रुम आणि मतदान केंद्रांची पाहणी

    district collector vinay gauda inspection

    district collector vinay gauda inspection : चंद्रपूर, दि. 12 (News३४) : नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 12) बल्लारपूर नगर परिषद क्षेत्रातील मतदान केंद्र आणि  स्ट्राँग रुमची पाहणी करून सूचना दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी अजय चरडे, तहसीलदार रेणूका कोकाटे, न.प. मुख्याधिकारी विशाल वाघ आदी उपस्थित होते.

    Read Also : चंद्रपूर मनपा प्रभाग आरक्षण, अनेकांना फटका

    नगर परिषद बल्लारपूर निवडणूक संबंधाने जिल्हाधिका-यांनी मतदान केंद्र क्रमांक 1 ते 5/5 ची पाहणी केली.  पाहणी दरम्यान सर्व मतदान केंद्रावर लाईटची व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या. यावेळी त्यांनी स्ट्राँग रुम, मतमोजणी कक्ष तसेच बल्लारपूर तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक संबंधाने मतदान केंद्राचीचीसुध्दा पाहणी केली.

    विसापूर येथील पीएचसीला भेट

    जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी विसापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, तालुका वैद्यकीय अधिकारी आदी उपस्थित होते. स्मार्ट पीएचसी अंतर्गत हे काम त्वरीत पूर्ण करावे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प. कार्यकारी अभियंता, उपअभियंता आणि संबंधित कंत्राटदार यांची बैठक आयोजित करण्याच्या सुचना दिल्या.

  • mahanagarpalika reservation reshuffle effects । चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरक्षण बदलामुळे नेत्यांमध्ये नाराजी, काहींना लॉटरी!

    mahanagarpalika reservation reshuffle effects

    mahanagarpalika reservation reshuffle effects : चंद्रपूर १२ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाची सोडत ११ नोव्हेम्बर रोजी काढण्यात आली. शहरातील १७ प्रभागातून ६६ नगरसेवक नागरिकांना निवडून द्यायचे आहे. चंद्रपूर मनपाची शेवटची निवडणूक हि वर्ष २०१७ मध्ये झाली होती. कार्यकाळ संपल्यावर मनपामध्ये प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. mahanagarpalika reservation reshuffle effects

    कार्यकाळ संपल्यावर ३ वर्षांनी मनपाची निवडणूक लागत असली तर घोषित झालेल्या आरक्षणामुळे अनेक दिग्गजांना फटका बसलेला आहे, चंद्रपूर मनपा निवडणूक लढण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून तयारी करणाऱ्या भावी नेत्यांची संधी आरक्षणामुळे हुकली. पण काहींना आरक्षणामुळे लॉटरी लागल्याचे चित्र आहे.

    Also Read : चंद्रपूर महानगरपालिका प्रभाग आरक्षण घोषित

    मागील निवडणुकीतील भाजपचे ३६ उमेदवार निवडून आल्याने एकहाती सत्ता भाजपने उपभोगली मात्र त्यांच्या कार्यकाळात अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे पुढे आली होती, यंदा भाजपने चंद्रपूर मनपा निवडणुकीची जबाबदारी आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे सोपविली आहे. जोरगेवार यांच्या नेतृत्वातील मनपाची हि पहिली निवडणूक आहे. मात्र त्यांच्या पूर्वीची संघटना यंग चांदा ब्रिगेड चे कार्यकर्ते किंवा भाजपचे कार्यकर्ते आणि विशेष म्हणजे मुनगंटीवार समर्थकांना तिकीट वाटप करताना नाकीनऊ येणार हे निश्चित. mahanagarpalika reservation reshuffle effects

    • प्रभाग क्रमांक १ दे.गो. तुकूम (ST – महिला, OBC- पुरुष, सर्वसाधारण – महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक २ शास्त्रीनगर (SC – पुरुष, OBC – महिला, सर्वसाधारण – महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ३ एम.ई.एल (SC – पुरुष, ST – पुरुष, OBC – महिला, सर्वसाधारण महिला)
    • प्रभाग क्रमांक ४ बंगाली कॅम्प (SC महिला, OBC पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ५ विवेक नगर (SC पुरुष, OBC महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ६ इंड्रस्टीयल इस्टेट (SC महिला, Obc महिला, सर्वसाधारण, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ७ जटपुरा गेट (SC महिला, OBC पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ८ वडगाव (OBC महिला, OBC पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ९ नगिनाबाग (SC महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १० एकोरी (SC पुरुष, Obc महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ११ भानापेठ (ST महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १२ महाकाली (SC महिला, Obc महिला, सर्वसाधारण, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १३ बाबुपेठ (SC पुरुष, Obc महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १४ पठाणपुरा (भिवापूर) (SC महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १५ विठ्ठल मंदिर (Obc महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १६ हिंदुस्थान लालपेठ कॉलरी (Sc महिला, ST महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १७ डॉ . बाबासाहेब आंबेडकर (Sc पुरुष, St पुरुष, सर्वसाधारण महिला)

    आरक्षण सोडत काढताना काही प्रभागाचे आरक्षण तसेच ठेवण्यात आले असून उर्वरित प्रभाग आरक्षणात बदल करण्यात आला आहे. मात्र या बदलाचा अनेकांना फटका बसला आहे. प्रभाग क्रमांक १७ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मधून मागील ५ वर्षांपासून तयारी करीत असलेले आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांना आरक्षणामुळे मोठा फटका बसला आहे.

    कुठे आनंद तर कुठे दुःख

    प्रभाग क्रमांक ३ एमईएल चे माजी नगरसेवक सचिन भोयर यांना आरक्षणामुळे फटका बसला असून ते आता निवडणूक दुसऱ्या प्रभागातून लढणार कि नाही? यावर सध्यातरी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रभाग क्रमांक २ शास्त्रीनगर सर्वसाधारण गटातून यावेळी पुरुष उमेदवारांमध्ये चांगलीच स्पर्धा रंगणार आहे. chandrapur mahanagarpalika leaders reaction to reservation

    प्रभाग क्रमांक ४ बंगाली कॅम्प मधून महिला उमेदवारांसाठी संधी चालून आली आहे मात्र मागच्या आरक्षण प्रवर्गातून निवडून आलेले नगरसेवक यंदा दुसऱ्या सर्वसाधारण गटातून लढणार काय? कारण मागील आरक्षण ओबीसी महिला मात्र यंदा त्याठिकाणी ओबीसी पुरुष आल्याने ओबीसी प्रवर्गातील महिला उमेदवारांमध्ये आरक्षणामुळे नाराजी पसरली आहे. mahanagarpalika reservation reshuffle effects

    प्रभाग क्रमांक ५ विवेकनगर मधून आरक्षणात बदल झाल्याने सर्वसाधारण गटातून चांगलीच चुरस बघायला मिळणार आहे, मागील आरक्षणात विवेकनगर ओबीसी प्रवर्गातून दिग्गज नेते संदीप आवारी हे ओबीसी पुरुष प्रवर्गातून निवडून आले होते मात्र यंदा ओबीसी महिला आरक्षण निघाले यासह सर्वसाधारण प्रवर्गात चुरस होत असली तरी आवारी यांना फटका बसेल असे म्हणता येणार नाही कारण संदीप आवारी हे सातत्याने प्रभागातील नागरिकांच्या संपर्कात असल्याने हि निवडणूक त्यांना जड जाणार नाही तसेच प्रभाग क्रमांक ६ मधून मागील निवडणुकीत ४ जागेवर बहुजन समाज पक्षाने निवडणुकीत विजय मिळविला होता, यंदा आरक्षण मुळे या प्रभागात नवीन चेहरे पुढे येणार असल्याची माहिती आहे. बसपा पुन्हा या प्रभागात परत येईलच असे चित्र सध्या नाही. मात्र उमेदवार चांगले असतील तर चमत्कार घडू शकतो. mahanagarpalika reservation reshuffle effects

    प्रभाग क्रमांक ११ मध्ये मागील निवडणुकीत पराभवाची चव चाखलेले हर्षद कानमपल्लीवार यंदा भाजपतर्फे निवडणूक लढणार असून मागच्या निवडणुकीत शिवसेना पक्षातून निवडणूक लढले आणि थेट तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले कानमपल्लीवार आता भाजप पक्षातून पहिल्या क्रमांकावर येण्याची तयारी करीत आहे. याच प्रभागातून युवा नेते सूरज पेद्दुलवार भाजप पक्षातर्फे इच्छुक आहे मात्र आरक्षणात सर्वसाधारण प्रवर्ग निघाल्याने संजय कंचर्लावार भाजपतर्फे निवडणूक लढणार हे निश्चित झाले आहे. mahanagarpalika reservation reshuffle effects

    चंद्रपूर महानगरपालिका प्रभाग आरक्षणात अनेक भावी उमेद्वारांना फटका बसला आहे, अनेकांनी ५ वर्षे तयारी केली मात्र ऐनवेळी त्यांच्या हाती निराशा आली आहे.