Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • MSEDCL online name change process । ⚡ महावितरण वीज बिलावर नाव बदल आता फक्त ३–७ दिवसांत, हि आहे प्रक्रिया

    MSEDCL online name change process

    MSEDCL online name change process : चंद्रपूर ११ नोव्हेंबर (News34) :- घर, मालमत्ता खरेदी किंवा वारसा हक्कामुळे वीजबिलाच्या ग्राहक नावातील बदल आता अवघ्या तीन ते सात दिवसात होणार आहे. दर्जेदार व तत्पर ग्राहक सेवेसाठी महावितरणाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून वीजबिलावरील ग्राहक नाव बदलाच्या ऑनलाईन अर्जांना आता स्वयंचलित मंजुरी देण्यास सुरुवात केली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून डिजिटल ग्राहक सेवेत महावितरणाने मोठे आघाडी घेतली आहे.

    Also Read : चंद्रपुरात बालकामगार, तात्काळ तक्रार करा

    अर्जाला स्वयंचलित मंजुरी:- मुख्यमंत्री व ऊर्जा मंत्राच्या निर्देशानुसार महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला. नवीन विकसित व कार्यान्वित करण्यात आलेल्या ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्जांना स्वयंचलित मंजुरी मिळत आहे. यात कोणतीही मानवी प्रक्रिया नसेल ज्यामुळे वेळ वाचेल आणि काम जलद होईल. how to change electricity bill name online MSEDCL

    ऑनलाईन करा नावात बदल

    बिलाच्या नावात ऑनलाईन बदल करता येणार:- महावितरणने ग्राहकांना घरबसल्या सेवा देण्यासाठी डिजिटल सेवेत हा ग्राहकाभिमुख बदल केला आहे. वीज बिलावरील ग्राहक नावात बदल करण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया आता ऑनलाइन उपलब्ध आहे. यामुळे घरगुती ग्राहकांसह इतर ग्राहकांना जलद सेवेचा लाभ होणार आहे.

    कसा व कुठे करायचा ऑनलाईन अर्ज?:- महावितरणचे मोबाईल ॲप किंवा www.mahadiscom.in या संकेतस्थळावर अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. ग्राहकांना ‘लॉग-इन’ द्वारे ऑनलाइन अर्ज सादर करावा लागेल. आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आणि प्रक्रिया शुल्क (processing Fee) भरण्याची सुविधाही ऑनलाईन उपलब्ध आहे.

    महिनाभर नव्हे आठवड्याच्या आत काम:- पूर्वी ग्राहक नावात बदलण्याच्या प्रक्रियेस कृती मानकानुसार एक महिन्याचा कालावधी लागत होता. आता अर्ज छाननी आणि मंजुरीची प्रक्रिया स्वयंचलित झाल्यामुळे ही कार्यवाही केवळ तीन ते सात दिवसांमध्ये पूर्ण होईल.
    वीज ग्राहकांना तत्पर आणि पारदर्शक सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. ग्राहक नावातील बदलांना स्वयंचलित मंजुरी देण्याचा निर्णय याच दिशेने टाकलेले एक मोठे पाऊल आहे. यामुळे ग्राहकांना अनावश्यक प्रतीक्षा करावी लागणार नाही आणि त्यांची कामे वेळेत पूर्ण होतील.

  • Shashwat Sheti Samruddha Shetkari tagline । 💡 ३८ वर्षांनंतर कृषी विभागाचा नवा चेहरा, शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’! राज्य कृषी विभागाचे नवे बोधचिन्ह

    Shashwat Sheti Samruddha Shetkari tagline

    Shashwat Sheti Samruddha Shetkari tagline : चंद्रपूर, दि. 11 (News३४) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्य कृषी विभागाच्या नवीन बोधचिन्हाचे तसेच ‘शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी’ या नवीन घोषवाक्याचे अनावरण केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, कृषी मंत्री  दत्तात्रय भरणे, मंत्री सर्वश्री चंद्रशेखर बावनकुळे, माणिकराव कोकाटे, हसन मुश्रीफ, गिरीश महाजन, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, मुख्य सचिव राजेश कुमार, कृषि आयुक्त सुरज मांढरे, उपसचिव प्रफुल्ल ठाकूर, संचालक रफिक नाईकवाडी, कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. बोधचिन्ह स्पर्धेतील विजेता आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

    लोगोमधून शेतकऱ्यांची शक्ती, तंत्रज्ञान, आणि पर्यावरणपूरक विकासाचा संदेश : कृषी मंत्री

    महाराष्ट्राची शेती ही परंपरेशी जोडलेली असूनही सतत नव्या दिशेने वाटचाल करणारी आहे. कृषी विभागाचे हे नवे बोधचिन्ह म्हणजे केवळ प्रतीक नाही, तर महाराष्ट्राच्या शेतीचा आधुनिक चेहरा आहे. या लोगोमधून शेतकऱ्यांची शक्ती, तंत्रज्ञान, आणि पर्यावरणपूरक विकासाचा संदेश दिला आहे. हे बोधचिन्ह आणि घोषवाक्य राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या प्रगतीचे प्रतीक बनेल. हा बदल म्हणजे नव्या युगातील नव्या कृषी विचारांचा आरंभ आहे. अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. Maharashtra agriculture department new logo and slogan

    Also Read : चंद्रपूर महानगरपालिका प्रभाग आरक्षण सोडत जाहीर

    कृषी विभागाचे विद्यमान बोधचिन्ह सुमारे 38 वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते. या कालावधीत शेतीत तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, नैसर्गिक शेती, हवामानबदल आणि उत्पादनाच्या नव्या दिशा अशा अनेक मूलभूत परिवर्तनांच्या पार्श्वभूमीवर विभागाची दृश्य आणि संवादात्मक ओळख अद्ययावत करण्याची गरज निर्माण झाली होती. या उद्देशाने कृषी विभागाने खुली स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत जास्तीत जास्त प्रस्ताव प्राप्त व्हावे यासाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर सार्वजनिक आवाहन (Call for Proposal) समावेशित करण्यात आले. कला महाविद्यालयातील आणि कृषी विद्यापीठातील विद्यार्थी,  प्राध्यापक, संशोधक, अभ्यासक, कलाकार, डिझायनर्स, लेखक,  अधिकारी, कर्मचारी आणि अन्य इच्छुक व्यक्तींना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या स्पर्धेला अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ज्यात एकूण 761 बोधचिन्ह प्रस्ताव आणि 949 घोषवाक्य प्रस्ताव प्राप्त झाले. Shashwat Sheti Samruddha Shetkari Marathi

    श्री. भरणे पुढे म्हणाले, प्राप्त प्रस्तावांचे परीक्षण करण्यासाठी कृषी आयुक्तांच्या मान्यतेने समिती गठित करण्यात आली. या समितीने प्रत्येक प्रस्तावाचा तपशीलवार अभ्यास करून उत्कृष्ट कल्पनांची निवड केली. अंतिम निवड समितीने शासनास प्रत्येकी तीन बोधचिन्ह आणि तीन घोषवाक्यांची शिफारस केली, ज्यांपैकी एकाची अंतिम निवड शासनाने केली. 7 नोव्हेंबर 2025 ला या नव्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याला कृषी विभागाकडून मान्यता देण्यात आली आणि आज याचं अनावरण करण्यात आलं. बोधचिन्ह स्पर्धेतील विजेते विरेंद्र भाईदास पाटील (क्रेझी क्रिएशन्स, भुसावळ) आणि घोषवाक्य स्पर्धेतील विजेत्या सिद्धी भारतराव देसाई (परभणी) हे ठरले. Shashwat Sheti Samruddha Shetkari tagline

    भविष्यातील वापर आणि अधिकार :

    या नव्या उपक्रमामुळे कृषी विभागाची दृश्य ओळख अधिक सशक्त होणार असून, यापुढे कृषी विभागाच्या सर्व अधिकृत उपक्रमांमध्ये हे नवे बोधचिन्ह आणि घोषवाक्य वापरले जाणार आहे. हे चिन्ह आणि घोषवाक्य हे कृषी विभागाची मालमत्ता असून, त्याचा अनधिकृत वापर केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

  • Chandrapur municipal ward reservation list । 🏛️ चंद्रपूर महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीची घोषणा — जाणून घ्या कोणत्या प्रभागात कोणासाठी राखीव जागा!

    Chandrapur municipal ward reservation list

    Chandrapur municipal ward reservation list : चंद्रपूर ११ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रभागांची आरक्षण सोडत आज प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृहात घोषित करण्यात आली. १७ प्रभागातील ६६ जागेपैकी ३३ जागा महिलासाठी राखीव आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी १३ जागा, अनुसूचित जनजातीसाठी ५ जागा, ओबीसी साठी १७ जागा तर सर्वसाधारण गटातून ३१ जागा राखीव असून यामध्ये महिलांना १४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहे.

    Also Readतिघांचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर वाघाला वनविभागाने केले जेरबंद

    प्रभागनिहाय आरक्षणाची माहिती

    • प्रभाग क्रमांक १ दे.गो. तुकूम (ST – महिला, OBC- पुरुष, सर्वसाधारण -महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक २ शास्त्रीनगर (SC – पुरुष, OBC – महिला, सर्वसाधारण – महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ३ एम.ई.एल (SC – पुरुष, ST – पुरुष, OBC – महिला, सर्वसाधारण महिला)
    • प्रभाग क्रमांक ४ बंगाली कॅम्प (SC महिला, OBC पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ५ विवेक नगर (SC पुरुष, OBC महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ६ इंड्रस्टीयल इस्टेट (SC महिला, Obc महिला, सर्वसाधारण, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ७ जटपुरा गेट (SC महिला, OBC पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ८ वडगाव (OBC महिला, OBC पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ९ नगिनाबाग (SC महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १० एकोरी (SC पुरुष, Obc महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक ११ भानापेठ (ST महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १२ महाकाली (SC महिला, Obc महिला, सर्वसाधारण, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १३ बाबुपेठ (SC पुरुष, Obc महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १४ पठाणपुरा (भिवापूर) (SC महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १५ विठ्ठल मंदिर (Obc महिला, Obc पुरुष, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १६ हिंदुस्थान लालपेठ कॉलरी (Sc महिला, ST महिला, सर्वसाधारण)
    • प्रभाग क्रमांक १७ डॉ . बाबासाहेब आंबेडकर (Sc पुरुष, St पुरुष, सर्वसाधारण महिला)

    निवडणुकीपूर्वी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात अनेक भावी नगरसेवकांनी मीच जनतेचा सेवक असा सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता मात्र आज घोषित झालेल्या आरक्षणामुळे नगरसेवक होण्याचे त्यांचे स्वप्न भंगले आहे. Chandrapur local body election ward reservation

  • forest department captures man-eating tiger । चिमूरमध्ये तिघांचा बळी घेणारा हल्लेखोर वाघ अखेर जेरबंद

    forest department captures man-eating tiger

    forest department captures man-eating tiger : चंद्रपूर ११ नोव्हेम्बर (News३४) – चिमूर तालुक्यात धुमाकूळ माजवीत तिघांची शिकार करणाऱ्या वाघाला जेरबंद करण्यास वनविभागाला १० नोव्हेम्बर रोजी यश प्राप्त झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मानव वन्यजीव संघर्ष शिगेला पोहचला असून यामध्ये आतापर्यंत तब्बल ३९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

    Also Read : ब्रह्मपुरी तालुक्यात शेतकऱ्यावर वाघाचा हल्ला

    चिमूर तालुक्यात या हल्लेखोर वाघाने तिघांची शिकार केली होती ज्यामध्ये १८ सप्टेंबर रोजी भिसी उपवनक्षेत्रात गडपिपरी क्षेत्रात घडली, शेतात निंदनाचे काम करीत असलेल्या ४२ वर्षीय विद्या कैलास मेश्राम वर हल्ला चढवीत वाघाने ठार केले होते. तर दुसऱ्या घटनेत चिमूर वनपरिक्षेत्रातील डोमा बीटातील शिवरा मध्ये २६ ऑक्टोबरला ६० वर्षीय शेतकरी नीलकंठ भुरे हे शेतातील पिकाची पाहणी करीत असताना वाघाने त्यांच्यावर हल्ला चढवीत ठार केले होते.

    ग्रामस्थांनी केले होते रस्ता रोको आंदोलन

    ६ नोव्हेम्बर रोजी शेतात कापूस वेचणी करीत असलेल्या ४५ वर्षीय शेतकरी ईश्वर भरडे यांच्यावर हल्ला करीत वाघाने ठार केले होते. चिमूर तालुक्यात तीन नागरिकांचा बळी घेणाऱ्या वाघाचा तात्काळ बंदोबस्त करा या मागणीसाठी चिमूर तालुक्यातील ८ गावातील ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केले होते. वाघाचे हल्ले होत राहिल्यास आम्ही शेतावर जायचे कसे असा प्रश्न शेतकरी बांधवांसमोर उभा राहिला होता.

    वाघाचा बंदोबस्त व त्याचा शोध घेण्यासाठी वनविभागाच्या वतीने एक लाईव्ह कॅमेरा, १६ ट्रॅप कॅमेरे व ३५ वनकर्मचारी तैनात केले होते. अखेर १० नोव्हेम्बर रोजी शंकरपूर वनपरिक्षेत्रात हल्लेखोर वाघाला डार्ट मारत जेरबंद करण्यात वनविभागाला यश मिळाले.

    सदरची यशस्वी कारवाई पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, पोलीस कर्मचारी व ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे शुटर अजय मराठे, दीपेश टेम्भूर्णे, योगेश लाकडे, गुरुनानक ढोरे, वसीम शेख, विकास ताजने, प्रफुल वाटगुरे, कोरपे व दांडेकर यांनी केली.

  • AU Small Finance Bank Chandrapur । 🚨 चंद्रपूरमध्ये एयू स्मॉल फायनान्स बँकेचा मनमानी कारभार!

    AU Small Finance Bank Chandrapur

    AU Small Finance Bank Chandrapur : चंद्रपूर ११ नोव्हेम्बर (News३४) चंद्रपूर शहरातून एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे, ज्यामुळे बँकिंग व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

    हे प्रकरण आहे एयू स्मॉल फायनान्स बँक (AU Small Finance Bank) चे — जिथे एका ग्राहकाने बँकेत आपले सोने गहाण ठेवून कर्जाची प्रक्रिया पूर्ण केली, तरीही त्याला पैसे मिळाले नाहीत.

    Also Read : घराच्या अंगणात तरुणाने केली गांजाची लागवड

    🔹 ४ तासांच्या औपचारिकता, तरीही ‘पैसे मिळाले नाहीत’

    मिळालेल्या माहितीनुसार, शकील पठाण नावाचे व्यक्ती आज सकाळी एयू स्मॉल फायनान्स बँक, चंद्रपूर शाखेत पोहोचले.

    त्यांनी बँक कर्मचाऱ्यांना सांगितले की, त्यांना त्यांच्या सोन्याच्या बदल्यात १ लाख रुपयांचे गोल्ड लोन हवे आहे. बँक कर्मचाऱ्यांनी त्यांना थोडा वेळ थांबण्यास सांगितले.

    सुमारे एका तासाच्या प्रतीक्षेनंतर शकील पठाण यांना बोलावण्यात आले आणि त्यांच्या नावावर एयू बँकेत नवीन खाते उघडण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेत ३ ते ४ तास वेळ गेला. यानंतर बँकेने त्यांना सांगितले की, “थोडा वेळ अजून थांबा, सोन्याची तपासणी आणि मूल्यांकन करण्यासाठी मूल्यमापक (Valuer) येणार आहे.”

    🔹 मूल्यमापन पूर्ण, पण पैसे मिळेनात!

    सुमारे दीड तासानंतर मूल्यमापक (Valuer) पोहोचले, सोन्याची तपासणी केली आणि संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली. आता फक्त बँकेला १ लाख रुपये त्यांच्या खात्यात हस्तांतरित करायचे होते. AU Bank customer harassment case

    पण बँकेकडून उत्तर मिळाले — “तुम्ही जा, तुमच्या खात्यात पैसे जमा होतील.”

    मात्र, संध्याकाळचे ७ वाजेपर्यंतही पैसे खात्यात जमा झाले नाहीत. शकील पठाण यांनी पुन्हा बँक कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांना धक्कादायक उत्तर मिळाले —

    “पैसे आले नाहीत, त्यामुळे तुम्ही तुमचे दागिने परत घेऊन जा.”

    🔹 “मी वणी येथील चारगाव चौकीत आहे, येऊ शकत नाही”

    शकील पठाण यांनी बँकेला सांगितले की, ते सध्या वणी येथील चारगाव चौकी परिसरात आहेत आणि लगेच बँकेत येऊ शकत नाहीत. यावरही बँकेकडून कोणतेही ठोस समाधान देण्यात आले नाही.

    बँकेच्या या गैर-जबाबदार आणि मनमानी कारभारामुळे ग्राहकाचा केवळ वेळच वाया गेला नाही, तर त्यांना मानसिक तणाव आणि आर्थिक गैरसोयीचाही सामना करावा लागला. Gold loan customer complaint

    🔹 ग्राहकाचा आरोप — “आरबीआय नियमांचे उल्लंघन”

    शकील पठाण यांचे म्हणणे आहे की, बँकेने भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) द्वारे निर्धारित गोल्ड लोनच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांनी सांगितले —

    “बँकेने माझ्या सोन्याचे मूल्यांकन करूनही पैसे हस्तांतरित केले नाहीत. उलट, मला दागिने परत घेऊन जाण्यास सांगितले. हे थेट आरबीआयचे मानक आणि बँकिंग नैतिकतेचे उल्लंघन आहे.”

    ते म्हणाले की, ते या प्रकरणाची औपचारिक तक्रार पोलीस ठाण्यात आणि आरबीआयच्या प्रादेशिक कार्यालयात करणार आहेत.

    बँकिंग प्रणालीवर प्रश्नचिन्ह

    ग्रामीण आणि अर्ध-शहरी भागांमध्ये कार्यरत असलेल्या काही खासगी बँका कशा प्रकारे ग्राहकांना अनावश्यक विलंब, तांत्रिक कारणे आणि कागदपत्रांच्या औपचारिकतेत गुंतवून ठेवतात, याचे हे प्रकरण स्पष्ट उदाहरण आहे. सोने गहाण ठेवून कर्ज घेणे ही एक पारदर्शक प्रक्रिया मानली जाते, परंतु अशा घटनांमुळे ग्राहकांचा विश्वास आणि बँकिंग व्यवस्थेच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसतो. Gold loan disbursement delay

    एयू स्मॉल फायनान्स बँकेने खरोखरच आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केले आहे का? पैसे न देता, ग्राहकाचे सोने ताब्यात ठेवणे कायदेशीररित्या गुन्हा ठरतो का? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासन आणि बँक नियामक संस्था आरबीआयला द्यावी लागतील.

    शकील पठाण लवकरच या प्रकरणाची तक्रार घेऊन चंद्रपूर पोलीस ठाणे आणि आरबीआय या दोन्ही ठिकाणी पोहोचणार आहेत. दरम्यान, नागरिकांमध्ये आणि ग्राहकांमध्ये ही चर्चा सुरू झाली आहे की, जर एका प्रतिष्ठित खासगी बँकेत असे होऊ शकते, तर सामान्य लोकांच्या बँकिंग सुरक्षेवर काय विश्वास ठेवायचा?

    एयू स्मॉल बँकेची ही घटना केवळ एका ग्राहकाच्या त्रासाची कहाणी नाही, तर संपूर्ण बँकिंग क्षेत्रासाठी धोक्याचा इशारा आहे. जिथे नियमांकडे दुर्लक्ष करणे आणि ग्राहकांची गैरसोय “सिस्टमची चूक” म्हणून टाळणे सामान्य होत चालले आहे. AU Small Finance Bank Chandrapur

    वेळेत अशा घटनांवर कारवाई न झाल्यास, “गोल्ड लोन” च्या नावाखाली सुरू असलेले बँकिंग शोषण आणखी खोलवर मूळ धरू शकते.

  • tiger safari project Chandrapur progress । 🌳 चंद्रपूरच्या वाघनगरीत आता जागतिक पर्यटकांचे आकर्षण

    tiger safari project Chandrapur progress

    आमदार किशोर जोरगेवार यांच्या दिल्लीतील बैठकीनंतर टायगर सफारीच्या प्रकल्पाला गती.

    tiger safari project Chandrapur progress : चंद्रपूर १० नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूरच्या दीर्घ प्रतीक्षेत असलेल्या टायगर सफारी प्रकल्पाला अखेर गती मिळत आहे. नुकत्याच आमदार किशोर जोरगेवार यांच्या दिल्ली येथे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणासोबत झालेल्या सकारात्मक बैठकीनंतर, आज एफ.डी.सी.एम. चे व्यवस्थापकीय संचालक नरेश झुरमुरे यांनी चंद्रपूर येथे विशेष भेट देऊन प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह त्यांनी वन अकादमी लगतच्या टायगर सफारीच्या जागेची पाहणी केली.

    Also Read : वाघाच्या भूमीत लक्झरी स्टे

    यावेळी मुख्य वनसंरक्षक आर.एम. रामानुजम, प्रादेशिक व्यवस्थापक दिव्यभारती एम., विभागीय वन अधिकारी राजन तलमले, विभागीय व्यवस्थापक गणेश मोटकर, सहाय्यक व्यवस्थापक व्यंगटरमन जंगीलवाड यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्ष छबू वैरागडे, भाजप नेते प्रकाश देवतळे, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकुर, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, प्रदेश निमंत्रित सदस्य तुषार सोम, अजय जैस्वाल, बलराम डोडाणी, श्याम धोपटे, महामंत्री मनोज पाल, रविंद्र गुरुनुले, सविता दंढारे, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, सुभाष अदमाने, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष राशिद हुसेन, महिला अध्यक्ष कौसर खान, सायली येरणे, देवानंद वाढई, श्याम धोपटे, अरुण तिखे, संजय बुरघाटे, संजीव सिंग, कार्तिक बोरेवार, दिनकर सोमलकर, प्रलय सरकार आदींची उपस्थिती होती. tiger safari project Chandrapur progress

    ६०० कोटी रुपयांचा प्रकल्प

    यावेळी वन विभागाच्या विश्रामगृहात झालेल्या बैठकीत टायगर सफारी प्रकल्पाच्या विविध टप्प्यांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर झुरमुरे यांनी अधिकार्‍यांसह ५१५ हेक्टर क्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या या महत्त्वाकांक्षी टायगर सफारीच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. (tiger safari project 600 crore investment) सुमारे ६०० कोटी रुपयांच्या निधीतून उभारला जाणारा हा प्रकल्प चंद्रपूरच्या आर्थिक, पर्यटन आणि पर्यावरणीय विकासाला नवी दिशा देणारा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात नवीन रोजगारनिर्मिती, पर्यटन वाढ आणि स्थानिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

    tiger safari chandrapur

    प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जगभरातील पर्यटक चंद्रपूरकडे आकर्षित होतील आणि वाघनगरी चंद्रपूरचे जागतिक पर्यटन नकाशावर स्थान अधिक बळकट होईल, असा विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला. हा टायगर सफारी प्रकल्प राज्य शासनाच्या विशेष प्राधान्यक्रमावर असून, लवकरच त्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहितीही आमदार किशोर जोरगेवार यांनी दिली. सदर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील काम लवकरच सुरू करू, असे यावेळी एफ.डी.सी.एम. चे व्यवस्थापकीय संचालक नरेश झुरमुरे यांनी सांगितले. Chandrapur wildlife tourism tiger safari

    चंद्रपूर जिल्हा हा वन, वाघ आणि पर्यावरण यांचा संगम असलेला जिल्हा आहे. येथे उभारण्यात येणारा हा टायगर सफारी प्रकल्प फक्त पर्यटन वाढविणारा उपक्रम नसून, तो चंद्रपूरच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा पाया ठरणार आहे. तसेच या प्रकल्पामुळे चंद्रपूर शहरातील व्यापारी, हॉटेल उद्योग आणि स्थानिक उत्पादन क्षेत्रांना मोठी चालना मिळेल. त्यामुळे हा प्रकल्प सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी आणि जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केंद्रबिंदू ठरेल, असा विश्वास यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.

  • Chanda Fort Railway station express halt demand । चंद्रपूरहून दिल्ली-मुंबई प्रवास सोपा होणार? खासदार धानोरकरांचं रेल्वे मंत्रालयासोबत पत्रयुद्ध!

    Chanda Fort Railway station express halt demand

    Chanda Fort Railway station express halt demand : चंद्रपूर १० नोव्हेम्बर (News३४):  विदर्भातील लाखो प्रवाशांची सोय, औद्योगिक केंद्रांची राष्ट्रीय राजधानीशी जोडणी आणि पर्यावरणाचे रक्षण या त्रिसूत्रीवर भर देत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रेल्वे मंत्रालयाकडे तीन अत्यंत महत्त्वपूर्ण मागण्यांचा पाठपुरावा सुरू केला आहे. त्यांनी २२६९१/२२६९२ बेंगळूरू-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसच्या दोन्ही फेऱ्यांना चंद्रपूर येथे थांबामुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेसला वर्धा स्थानकावर थांबा आणि चांदा फोर्ट स्टेशनवर तीन प्रमुख एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव केली आहे.

    Also Read : वाघाने केलेली शिकार पुन्हा परत आणली

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी सर्वप्रथम जिल्ह्याच्या प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे एक अत्यंत महत्त्वपूर्ण मागणी केली आहे. चंद्रपूर हे जिल्ह्याचे मुख्यालय आणि मोठे औद्योगिक केंद्र असल्याने, २२६९१/२२६९२ बेंगळूरू-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस या दोन्ही फेऱ्यांना (अप व डाऊन) चंद्रपूर स्टेशनवर तातडीने थांबा देण्यात यावा, अशी त्यांची लोकहितकारी मागणी केली आहे. देशाच्या राजधानीला जोडणाऱ्या या एक्स्प्रेस गाडीला जिल्ह्याच्या ठिकाणी थांबा न मिळणे ही येथील नागरिकांची मोठी गैरसोय आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. “railway ministry appeal by MP Pratibha Dhanorkar

    राजधानीच्या दोन्ही एक्सप्रेसना थांबा द्या

    चंद्रपूर हे कोळसा आणि सिमेंट उद्योगांचे प्रमुख केंद्र असून, या थांब्यामुळे येथील व्यापारी, उद्योजक, अधिकारी वर्ग तसेच सामान्य प्रवाशांचा दिल्ली आणि दक्षिणेकडील बेंगळूरू शहरांशी थेट व जलद संपर्क साधला जाईल. “जिल्ह्याच्या ठिकाणी राजधानी एक्स्प्रेसच्या दोन्ही फेऱ्यांना थांबा मिळणे हा इथल्या नागरिकांचा हक्क आहे. हा थांबा केवळ प्रवाशांची सोय करणार नाही, तर रेल्वेच्या महसुलातही निश्चित वाढ करेल,” अशी आग्रही भूमिका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी घेतली आहे.

    यासोबतच खासदार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar) यांनी मुंबई-नागपूर दुरंतो एक्स्प्रेसला वर्धा रेल्वे स्थानकावर केवळ दोन मिनिटांचा थांबा देण्याची तातडीची आवश्यकता स्पष्ट केली आहे. हा एक निर्णय वर्धा,  चंद्रपूर, यवतमाळ आणि गडचिरोली या चार जिल्ह्यांतील प्रवाशांना थेट आणि जलद मुंबई कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून देईल. सध्या या प्रवाशांना दुरंतो पकडण्यासाठी नागपूर गाठावे लागते, ज्यामुळे प्रवाशांना नागपूरपर्यंत सोडण्यासाठी दररोज १०० हून अधिक खासगी वाहने धावतात. वर्ध्यात थांबा मिळाल्यास, या वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या कमी होऊन नागपूर शहराचे कार्बन उत्सर्जन आणि वायू प्रदूषण प्रभावीपणे नियंत्रणात येईल, तसेच नागरिकांच्या वेळेची आणि पैशाची बचत होईल. Chanda Fort Railway station express halt demand

    यासोबतच महत्त्वाची मागणी बल्लारशाह – गोंदिया रेल्वे मार्गावरील चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर तीन प्रमुख लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांना त्वरित थांबा देण्याची आहे. ज्या एक्स्प्रेस गाड्यांना थांबा देण्याची मागणी त्यांनी केली आहे, त्या गाड्यांमध्ये १७३२१/ वास्को-द-गामा – जसीडीह साप्ताहिक एक्स्प्रेस१२८५२/ एम. जी. आर. चेन्नई सेंट्रल – बिलासपूर साप्ताहिक एसएफ एक्स्प्रेस आणि १६३६७/ काशी तामिळ संगमम एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. चांदा फोर्ट स्टेशन हे चंद्रपूर शहरानजीक असल्याने येथून प्रवासाला सुरुवात करणे बल्लारशाहपेक्षा अधिक सोयीचे ठरेल. बल्लारशाह स्टेशनवर होणारी अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी तसेच स्थानिक प्रवाशांचा प्रवासाचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी हे थांबे अत्यंत महत्त्वाचे आहेत. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी रेल्वे मंत्रालयाने या जनहितार्थ मागण्यांचा गांभीर्याने आणि सकारात्मक विचार करून त्वरित अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

  • Sayaji Hotels Chandrapur । 🐯 ‘वाघांच्या भूमीत’ आता लक्झरी स्टे! चंद्रपूरमध्ये ‘एनराईज बाय सयाजी’चे भव्य पदार्पण”

    Sayaji Hotels Chandrapur

    Sayaji Hotels Chandrapur : चंद्रपूर, महाराष्ट्र, १० नोव्हेंबर २०२५ (News३४) : भारतातील एक प्रमुख हॉस्पिटॅलिटी ब्रँड असलेल्या सयाजी हॉटेल्स ने (Sayaji Hotels) चंद्रपूरमध्ये आपल्या ‘एनराईज बाय सयाजी’ (Enrise by Sayaji) या नवीन मालमत्तेच्या लाँचिंगची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. या लाँचिंगमुळे महाराष्ट्रात सयाजी समूहाची उपस्थिती आणखी मजबूत झाली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पासाठी ओळखल्या जाणाऱ्या या ऐतिहासिक शहरात, सयाजीने आराम आणि समकालीन आदरातिथ्याचा एक नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे.

    Also Read : ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात पक्षी सप्ताहाची धूम

    आधुनिक प्रवाशांसाठी डिझाइन केलेले हे हॉटेल, सयाजीचा खास उबदारपणा आणि उत्कृष्ट सेवा चंद्रपूरच्या समृद्ध वारसा, संस्कृती आणि नैसर्गिक सौंदर्याशी जोडते.

    रणनीतिक स्थान आणि उत्कृष्ट कनेक्टिव्हिटी

    एनराईज बाय सयाजी चंद्रपूरमधील तुळशीनगर, राष्ट्रवाडी नगर येथे सोयीस्करपणे स्थित आहे.

    • हे हॉटेल चंद्रपूर रेल्वे स्टेशनपासून केवळ ५ किमी अंतरावर आहे.
    • नागपूर विमानतळापासून १४५ किमी अंतरावर असल्यामुळे व्यवसाय आणि आरामदायी दोन्ही प्रवासासाठी ते सहज उपलब्ध आहे. Enrise by Sayaji launch

    आरामदायी निवास आणि खास सुविधा

    या हॉटेलमध्ये ४० सुंदरपणे सजवलेल्या खोल्या आहेत, ज्यात ग्रँड रूम्स (Grand Rooms), एक्झिक्युटिव्ह सूट्स (Executive Suites) आणि रॉयल सूट्स (Royal Suites) यांचा समावेश आहे. प्रत्येक खोलीत समकालीन सजावट, प्रीमियम सुविधा आणि अविस्मरणीय मुक्काम सुनिश्चित करण्यासाठी विचारपूर्वक स्पर्श दिलेला आहे.

    • पाककृतीचा आनंद: पाहुणे हॉटेलच्या दिवसभर चालणाऱ्या डायनिंग रेस्टॉरंट ‘मोमेंट’ (Moment) मध्ये स्वादिष्ट पाककृतींचा आस्वाद घेऊ शकतात. येथे प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पाककृतींचा संग्रह एका उत्साही वातावरणात उपलब्ध आहे.
    • इव्हेंटसाठी भव्य हॉल: सामाजिक मेळावे, कॉर्पोरेट बैठका आणि उत्सवांसाठी हॉटेलमध्ये ‘क्रिस्टल’ (Crystal) नावाचा एक प्रशस्त बँक्वेट हॉल आहे, जो ३,२०० चौरस फूट जागेत ३०० पाहुण्यांना सामावून घेऊ शकतो.

    सयाजी हॉटेल्सचे मोठे व्हिजन

    या लाँचबद्दल बोलताना, सयाजी हॉटेल्स लिमिटेडच्या कॉर्पोरेट प्रमुख – व्यवसाय विकास, सुश्री सुमेरा धनानी म्हणाल्या: “आदरातिथ्य (Hospitality) हे आतापर्यंत मेट्रो शहरांभोवती केंद्रित होते, पण टियर २ आणि ३ शहरांमध्ये प्रचंड क्षमता आहे. मजबूत कनेक्टिव्हिटी आणि वाढत्या अर्थव्यवस्थेमुळे हे चित्र बदलत आहे. चंद्रपूरमधील एनराईज बाय सयाजीचे लाँचिंग (Enrise by Sayaji Chandrapur launch) हे धोरणात्मक पाऊल आहे, कारण आम्ही देशभरात उच्च-गुणवत्तेच्या, प्रवेशयोग्य आदरातिथ्याची पुनर्परिभाषा करत आहोत.” Chandrapur best hotels

    ऑपरेशन्स संचालक, श्री राजेंद्र जोशी यांनी नमूद केले की, “या हॉटेलमध्ये आराम, भव्यता आणि वैयक्तिकृत सेवेचे एक अखंड मिश्रण आहे. आम्ही पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांना अपवादात्मक सयाजी अनुभव देण्यासाठी उत्सुक आहोत.” Sayaji Hotels Chandrapur

    एनराईज बाय सयाजी चंद्रपूरचे मालक श्री राणा पाल सिंग यांनी या हॉटेलचे शहरासाठी असलेले महत्त्व अधोरेखित केले.

    पर्यटकांसाठी आदर्श प्रवेशद्वार

    एनराईज बाय सयाजी हे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प (Tadoba Andhari Tiger Reserve), चंद्रपूर किल्ला, महाकाली मंदिर, भद्रावती जैन मंदिर आणि जुनोना तलाव यांसारख्या प्रमुख आकर्षणांजवळ उत्तम प्रकारे स्थित आहे. यामुळे पर्यटकांना चंद्रपूरच्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचा अनुभव घेण्यासाठी हे हॉटेल एक आदर्श प्रवेशद्वार ठरते.

    सयाजी हॉटेल्स लिमिटेडने या नवीन लाँचसह, चंद्रपूरमधील व्यवसाय आणि आरामदायी प्रवासाच्या गरजा पूर्ण करत, ‘योर्स ट्रूली’ सेवेची परंपरा कायम ठेवली आहे.

    सयाजी हॉटेल्स लिमिटेड बद्दल थोडक्यात:

    सयाजी हॉटेल्स (Sayaji Hotels) हा भारतातील एक अत्यंत विश्वासार्ह हॉस्पिटॅलिटी ब्रँड आहे, जो ‘योर्स ट्रूली’ (Yours Truly) सेवेसाठी प्रसिद्ध आहे. ४० वर्षांहून अधिक वारसा असलेल्या या समूहाचा पोर्टफोलिओ आता देशभरातील प्रमुख स्थळांवर ३९ मालमत्ता आणि २,५३७ हून अधिक कीज पर्यंत विस्तारला आहे.

  • Tadoba Andhari bird watching event । 🦜 ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पक्षी सप्ताहाची धूम; ४६ पक्ष्यांच्या प्रजातींचे निरीक्षण

    Tadoba Andhari bird watching event

    Tadoba Andhari bird watching event : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प: (११ नोव्हेंबर, सोमवार) News34 – ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात (TATR) सुरू असलेल्या ‘पक्षी सप्ताहा’च्या पाचव्या दिवशी ताडोबा वनविभाग आणि वन्यजीव विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रकल्पातील विविध भागांमध्ये सामूहिक पक्षी निरीक्षणाचे आयोजन केले. या उपक्रमातून केवळ वन्यजीवनाचे निरीक्षणच नव्हे, तर स्थानिक पक्ष्यांच्या प्रजातींची महत्त्वपूर्ण नोंद करण्यात आली.

    Also Read : वाघाने शिकार केली आणि परत हि आला

    मुख्य नोंदी आणि निरीक्षण स्थळे

    आजच्या पक्षी निरीक्षण मोहिमेत एकूण ४६ हून अधिक विविध पक्ष्यांच्या प्रजातींची नोंद झाली.

    • मोहर्ली परिक्षेत्रात ४६ प्रजाती: वन्यजीव (वन्यजीव) मोहर्ली परिक्षेत्रात पळसगाव नियतक्षेत्रातील गवती कुरण आणि पळसगाव तलाव परिसरात विशेष पक्षी निरीक्षण आयोजित करण्यात आले होते. या एकाच परिसरात तब्बल ४६ पक्ष्यांच्या प्रजाती नोंदविण्यात आल्या, जी या दिवसातील सर्वात मोठी नोंद ठरली. तलावाच्या आणि कुरणाच्या परिसंस्थेमुळे येथे स्थलांतरित आणि स्थानिक पक्ष्यांची मोठी विविधता दिसून आली.
    • भानूसखिंडी उपक्षेत्रात सामूहिक गस्त: वनपरिक्षेत्र ताडोबा अंतर्गत येणाऱ्या भानूसखिंडी उपक्षेत्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामूहिक गस्तीदरम्यान नैसर्गिक अधिवासात पक्षी निरीक्षण केले. Tadoba Andhari Tiger Reserve bird week
    • पांगडी संकुलातील विद्यार्थी सहभाग: पांगडी संकुलातील विद्यार्थ्यांसाठी खास शैक्षणिक उपक्रम म्हणून पक्षी निरीक्षण आयोजित करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थ्यांसोबत झालेल्या निरीक्षणातून २६ पक्ष्यांच्या प्रजाती नोंदविण्यात आल्या. यामुळे भावी पिढ्यांमध्ये निसर्ग संवर्धनाविषयी जागरूकता वाढण्यास मदत होणार आहे.
    • कोळसा परिक्षेत्र: कोळसा परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या झरी गावाशेजारील शेतशिवार परिसरातही आज पक्षी निरीक्षण मोहीम राबविण्यात आली, ज्यामुळे शेती परिसंस्थेतील पक्ष्यांची माहिती गोळा करता आली.

    उपक्रमात सक्रिय सहभाग

    या महत्त्वपूर्ण पक्षी निरीक्षण उपक्रमात संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल, वनरक्षक, मदनीस, तसेच निसर्ग मार्गदर्शक सक्रियपणे सहभागी झाले होते. या सामूहिक प्रयत्नांमुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या विविध अधिवासांमध्ये पक्ष्यांची नेमकी उपस्थिती आणि प्रजातींची विविधता तपासणे शक्य झाले.

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प केवळ वाघांसाठीच नाही, तर विविध प्रकारच्या पक्ष्यांसाठीही एक महत्त्वाचे निवासस्थान आहे. ‘पक्षी सप्ताहा’सारखे उपक्रम या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाच्या अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण ठरतात.

  • BJP youth women wing activities । युवतींच्या आत्मनिर्भरतेतूनच घडणार सक्षम समाज – आ. किशोर जोरगेवार

    BJP youth women wing activities

    BJP youth women wing activities : चंद्रपूर ९ नोव्हेम्बर (News३४) – आजच्या काळात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली छाप उमटवली आहे. शिक्षण, विज्ञान, राजकारण, उद्योजकता या सर्व क्षेत्रांत स्त्रिया सक्षमपणे काम करत आहेत. मात्र, अजूनही काही ठिकाणी संधी कमी आणि अडथळे जास्त आहेत. हे अडथळे दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. आजची भारतीय स्त्री कुठेच मागे नाही. परंतु केवळ यश मिळवणे पुरेसे नाही; ते टिकवण्यासाठी आत्मविश्वास, शिक्षण आणि स्वावलंबन आवश्यक आहे. युवतींच्या आत्मनिर्भरतेतूनच सक्षम समाज घडणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    Also Read : वाघाने शिकार केली आणि परत सुखरूप सोडले, पुन्हा व्हिडीओ व्हायरल

    भारतीय जनता पार्टी युवती आघाडीच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात युवती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, युवती प्रमुख प्रियंका चिताडे, महामंत्री मनोज पाल, सविता दंढारे, रवि गुरुनुळे, ग्रामीण तालुका अध्यक्ष विनोद खेवले, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, आशिष देवतळे, राकेश पिंपळकर, सुमित बेले, सुभाष पिंपळकर, सायली येरणे आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. Kishor Jorgewar women empowerment speech

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, युवतींच्या आत्मनिर्भरतेतूनच एक सक्षम समाज उभा राहतो. जेव्हा युवती आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या सबळ होते, तेव्हा तिचं कुटुंब, तिचं गाव आणि अखेर संपूर्ण देश सक्षम बनतो. हा मेळावा केवळ कार्यक्रम नाही, तर स्त्रीशक्तीचा उत्सव आहे. युवतींच्या जिद्दीत जग बदलविण्याची ताकद आहे. ‘मी करू शकते’, ‘मी बदल घडवू शकते’ हा आत्मविश्वास प्रत्येक युवतीच्या मनात जागा व्हावा, असे ते म्हणाले.

    Also Read : चंद्रपुरात जंगलराज? पत्रकार व त्याच्या कुटुंबाला पोलिसांसमोर मारहाण

    ते पुढे म्हणाले की, ‘लाडकी बहिण योजना’, ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’, ‘मुद्रा योजना’, ‘महिला उद्योजकता विकास’ अशा योजनांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक सन्मान मिळत आहे. तुम्ही या योजनांचा लाभ घ्या, स्वतःचा व्यवसाय सुरू करा आणि समाजात नवे आदर्श निर्माण करा, असे आवाहन त्यांनी युवतींना केले. women empowerment programs in Maharashtra

    चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक युवती आत्मनिर्भर व्हावी, यासाठी कौशल्य विकास केंद्रे, प्रशिक्षण शिबिरे आणि स्वयंरोजगार योजना हाती घेण्यात येणार आहेत. आपण यापूर्वी ब्युटी पार्लर, फॅशन डिझायनिंग, शिवण क्लास यांसारख्या महागड्या प्रशिक्षणांची मोफत सोय करून दिली आहे. चंद्रपूर मतदारसंघात झालेल्या ७० हून अधिक प्रशिक्षण शिबिरांमधून तीन हजारांहून अधिक महिला आणि युवतींना आपण प्रशिक्षित केले असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाचे संचालन भाग्यश्री हांडे यांनी केले. मेळाव्याला युवतींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.