Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • Nagar Parishad election candidature scrutiny । चंद्रपूर जिल्हा नगरपरिषद निवडणूक : तब्बल २०० अर्ज अवैध; कोण राहणार रिंगणात?

    Nagar Parishad election candidature scrutiny

    Nagar Parishad election candidature scrutiny : चंद्रपूर १९ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषद व एक नगरपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शन करीत आपली ताकद दाखवली. १८ नोव्हेम्बर रोजी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी झाली यामध्ये तब्बल २०० जणांचे अर्ज अवैध ठरले आहे.

    Read Also : चंद्रपुरात राजशिष्टाचाराची खिल्ली, खासदार धानोरकरांनी विचारला जाब

    अर्ज परत घेण्याची तारीख 21 नोव्हेंबर तर अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 25 नोव्हेंबर त्यानंतर 26 नोव्हेंबर रोजी निवडणूक चिन्ह वाटपसह, उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार. जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकीत अनेक बंड झाले, काही ठिकाणी राष्ट्रीय पक्षाला उमेदवार मिळेनासे झाल्याने चांगलीच नामुष्की ओढवली होती.

    सदस्यपदासाठी १० नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीत एकूण १ हजार ५४७ अर्ज तर अध्यक्षपदासाठी एकूण १२१ अर्ज दाखल झाले होते. अध्यक्षपदासाठी आलेल्या अर्जाची छानणी झाल्यावर ९१ अर्ज वैद्य ठरले तर ३० अर्ज हे अवैध ठरले. सदस्यपदासाठी १ हजार ३४७ अर्ज वैद्य ठरले तर २०० अर्ज अवैध ठरले आहे. २१ ते २५ नोव्हेम्बर पर्यंत अर्ज मागे घेण्याचा कालावधी आहे, त्यानंतर निवडणुकीच्या रिंगणात किती उमेदवार आहे ते ठरेल. Nagar Parishad election candidature scrutiny

    कुठे किती अर्ज बाद?

    बल्लारपूर नगरपरिषद अध्यक्षपदासाठी एकूण ११ अर्ज दाखल, वैद्य अर्ज ११, सदस्य अर्ज २१० , वैद्य अर्ज १९९ तर अवैध अर्ज ११, भद्रावती नगरपरिषद – नगराध्यक्ष एकूण अर्ज १०, वैद्य ७, अवैध अर्ज ३, सदस्य अर्ज १८१ वैद्य अर्ज १४८ तर अवैध अर्ज ३३, वरोरा नगरपरिषद – नगराध्यक्ष पदासाठी एकूण अर्ज ९, वैद्य अर्ज ७, अवैध अर्ज ३, सदस्यपदासाठी एकूण अर्ज १७१, वैद्य अर्ज १५८, अवैध अर्ज १३, ब्रह्मपुरी नगरपरिषद – अध्यक्षपदासाठी एकूण अर्ज ५, वैद्य अर्ज ४, अवैध अर्ज १, सदस्यपदासाठी एकूण अर्ज १०५ तर वैद्य अर्ज १००, ५ अर्ज बाद, मूल नगरपरिषद अध्यक्षपदासाठी दाखल एकूण अर्ज ९, अर्ज वैद्य ६ , बाद झालेल्या अर्जाची संख्या ३, सदस्यपदासाठी दाखल झालेले अर्ज ११२, वैद्य अर्ज ९५, बाद झालेले एकूण १७ अर्ज.

    राजुरा नगरपरिषद नगराध्यक्ष अर्ज – ९, वैद्य अर्ज ९, सदस्यपदासाठी एकूण अर्ज ८८, १ अर्ज बाद, घुग्गुस नगरपरिषद एकूण नगराध्यक्ष अर्ज दाखल १३, वैद्य अर्ज ६, बाद झालेले अर्ज ७, सदस्यपदासाठी दाखल अर्ज १५९, वैद्य अर्ज १३६, २३ अर्ज बाद. गडचांदूर नगरपरिषद नगराध्यक्ष अर्ज दाखल – ११, वैद्य अर्ज १० बाद झालेला अर्ज १, सदस्यपदासाठी दाखल अर्जाची संख्या १३७, वैद्य अर्ज १२६, एकूण बाद अर्ज ११.

    नागभीड नगरपरिषद अध्यक्ष अर्ज १६, वैद्य अर्ज १२, बाद अर्ज ४, सदस्यपदासाठी अर्ज १२३, वैद्य अर्ज ९५, बाद अर्ज २८, चिमूर नगरपरिषद अध्यक्ष अर्ज – १३, वैद्य अर्ज ८, बाद अर्ज ५, सदस्यपदासाठी अर्ज – २००, वैद्य अर्ज १४८, बाद अर्ज ५२, भिसी नगरपंचायत अध्यक्ष अर्ज – १५, वैद्य अर्ज ११, बाद अर्ज ४, सदस्यपदासाठी दाखल एकूण अर्ज – ६१, वैद्य अर्ज ५५, बाद अर्ज ६. Nagar Parishad election candidature scrutiny


    नगरपरिषद व नगरपंचायत मध्ये एकूण 133 प्रभाग असून निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या 253 आहे. एकूण मतदार 3 लक्ष 71 हजार 537 असून पुरुष मतदार 1 लक्ष 87 हजार 139 व स्त्री मतदार 1 लक्ष 84 हजार 387 सह अन्य मतदारांची संख्या 11 आहे.

  • Youth For Jobs Training Impact । ₹1.80 लाखांचे पॅकेज! दृष्टी गमावलेल्या चंद्रपूरच्या राजश्रीची संघर्षगाथा

    Youth For Jobs Training Impact

    Youth For Jobs Training Impact : चंद्रपूर, दि. १९ (News३४) : ‘युथ फॉर जॉब’ ही संस्था दिव्यांग व्यक्तिचे सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनासाठी काम करणारी दक्षिण आशियातील सर्वात मोठी संस्था आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिव्यांग युवक – युवतीच्या जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ‘युथ फॉर जॉब’ या संस्थेच्या माध्यमातून एक नवीन मॉडेल उभारण्याची संकल्पना मांडली आहे. या संस्थेच्या माध्यमातून दिव्यांगांना रोजगारक्षम करणे, युडीआयडी (स्वावलंबन कार्ड) करीता दिव्यांगांची 100 टक्के नोंदणी, लक्षित कौशल्य विकास आणि दिव्यांग व्यक्तिंसाठी शाश्वत उपजिविका निर्माण करणे, हा मुख्य उद्देश असून त्याचा फायदा दिव्यांग नागरिकांना होत आहे. अशाच प्रशिक्षणामुळे सावंगा विठोबा (ता. चंद्रपूर) येथील राजश्री पुरुषोत्तम खोडके (वय 30) या दिव्यांग तरुणीचा प्रवास अंधारातून प्रकाशाकडे झाला असून ती आज आर्थिक स्वावलंबी झाली आहे. Youth For Jobs Training Impact

    Read Also : स्थानिक बेरोजगारांना चंद्रपूर मेडिकल कॉलेज मध्ये रोजगार द्या – विक्रांत सहारे

    राजश्री ही 40 टक्के अंशत: अंध (दिव्यांग) असून तीने वस्त्र विज्ञान (बॅचरल ऑफ टेक्साईल सायन्स) मध्ये शिक्षण घेतले आहे.  राजश्रीच्या कुटुंबात आई –वडील, एक धाकटा भाऊ आणि तिला तीन मोठ्या बहिणी आहेत. वडील पुरुषोत्तम खोडके पूर्वी बल्लारपूर येथील पेपर मिलमध्ये काम करत होते आणि आता निवृत झाले आहेत, तर आई गृहिणी आहेत. राजश्रीचा जन्म अमरावती येथे झाला, परंतु वडिलाच्या नोकरीमुळे कुटुंब बल्लारपूर येथे स्थलांतरित झाले.              

               लहाणपणीच राजश्रीला त्वचाविकारामुळे दृष्टिदोष  झाला. ज्यामुळे तिची दृष्टी मोठ्या प्रमाणात कमी झाली.  या परिस्थितीमुळे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण काळात तिला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. शैक्षणिक मर्यादांसह सामाजिक परिणामाला सुध्दा तिला सामोरे जावे लागले. मात्र अतिशय आत्मविश्वासाने तिने वस्त्र विज्ञान शाखेची पदवी पूर्ण केल्यांनतर रोजगाराच्या संधी शोधायला सुरवात केली. परंतु योग्य मार्गदर्शन आणि आवश्यक कौशल्यांच्या अभावामुळे नोकरी मिळवणे कठीण गेले. Youth For Jobs Training Impact

    जेव्हा तिला ‘युथ फॉर जॉब’ बद्दल मित्र महेश मेश्राम यांनी माहिती दिली, तेव्हापासून तिच्या आयुष्यात निर्णायक क्षण आला. राजश्रीने आत्मविश्वासाने एक महिन्याच्या कौशल विकास प्रशिक्षण कार्यक्रमात प्रवेश घेतला आणि स्वत:ला सक्षम आणि स्वावलंबी बनवण्याच्या दृढ निश्चय केला. प्रशिक्षणादरम्यान राजश्रीने सर्व उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. तसेच आपल्या सहकाऱ्यांना प्रोत्साहन दिले, मदत केली आणि नेतृत्वाचे गुण दाखवले. प्रशिक्षणादरम्यान संवादकौशल्य, वेळेचे व्यवस्थापन, समस्या सोडवण्याचे तंत्र, कार्यस्थळी  शिष्टाचार आणि मुलाखत तयारी यासारखी महत्वाची कौशल्ये तिने आत्मसात केली. या कौशल्यांनी तिचा आत्मविश्वास आणि रोजगारक्षमता वाढण्यास मदत झाली.

                प्रशिक्षणानंतर राजश्रीने भूपेंद्र गौड टीएम पोषणतज्ज्ञ यांच्याकडे मुलाखत दिली आणि ग्राहक सहाय्यक (कस्टमर सपोर्ट एक्झिक्युटीव्ह) या पदासाठी  तिची निवड  झाली. आता ती वार्षिक 1 लक्ष 80 हजार रुपये   इतके  स्थिर उत्पन्न कमवत आहे, ज्यामुळे तिचे आणि तिच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारले आहे. आज राजश्री आत्मविश्वासाने आपली  जबाबदारी पार पाडत असून सहकाऱ्यांशी मोकळेपणाने संवाद साधते. एकेकाळी ज्या कमी दृष्टिक्षमतेमुळे ती आत्मविश्वास गमावून बसली होती, त्या बाबींवर यशस्वीरित्या मात करत ‘युथ फॉर जॉब’ च्या प्रशिक्षणामुळे ती आज पुन्हा आत्मविश्वासाने उभी आहे. Youth For Jobs Training Impact

  • Pending Leave Encashment for Tribal School Staff । SUCCESS! आमदार अडबाले यांचा यशस्वी पाठपुरावा: सेवानिवृत्त आदिवासी कर्मचाऱ्यांना ‘रजा रोखीकरण’ लाभ अनुज्ञेय!

    Pending Leave Encashment for Tribal School Staff

    Pending Leave Encashment for Tribal School Staff : चंद्रपूर १८ नोव्हेम्बर (News३४) : आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त असलेल्या शासकीय आश्रमशाळांवरील दीर्घ सुटी विभागातील कर्मचाऱ्यांना अर्जित रजा रोखीकरण लाभ अनुज्ञेय करण्याबाबतचा आदिवासी विभागाचा शासन परिपत्रक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी निर्गमित झाल्‍याने सेवानिवृत्त झालेल्‍या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यासाठी आमदार सुधाकर अडबाले यांनी सचिवांपासून मंत्र्यांपर्यंत सतत पाठपुरावा करून लाभ मिळवून दिल्‍याने कर्मचाऱ्यांनी आमदार अडबाले यांचे आभार मानले आहे. Pending Leave Encashment for Tribal School Staff

    Read Also : राजशिष्टाचाराची खिल्ली, खासदार धानोरकरांनी विचारला जाब

    दिनांक २५ मार्च २०२५ रोजी आदिवासी विकासाच्या समस्या सोडविण्यासाठी आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने सदर निवेदनाच्या अनुषंगाने मा. आदिवासी विकास मंत्री डॉ अशोकजी उईके यांच्यासोबत मुंबई येथे झालेल्‍या बैठकीत दीर्घकालीन सुट्ट्या असलेल्या कर्मचाऱ्यांना रजा रोखीकरण अनुज्ञय आहे, याबाबत चर्चा करण्यात आली होती.

    पी. के.भोंगाडे व इतर समस्याग्रस्त कर्मचाऱ्यांच्या दिनांक 11.9.25 च्या पत्राच्या अनुषंगाने नागपूर अप्पर आयुक्त मा. आयुषी सिंग मॅडम व उपआयुक्त श्री दिगंबर चव्हाण यांच्या उपस्थितीत दिनांक १६ सप्‍टेंबर २०२५ रोजी या विषयावर चर्चा करून शासनाला पत्र पाठवावे, मार्गदर्शन मागविण्यात यावे व तात्‍काळ कार्यवाही करण्यात यावी, असे आमदार अडबाले यांनी सुचवले व हा मुद्दा प्रकर्षाने लावून धरला. वरील सभेच्या अनुषंगाने अप्पर आयुक्त आदिवासी विभाग यांनी ३० ऑक्‍टोंबर २०२५ रोजी मा. सचिव, आदिवासी विकास विभाग मंत्रालय मुंबई यांना शासनाकडून मार्गदर्शन तथा उचित आदेश होण्यास विनंती केली व त्याची प्रतिलिपी आमदार सुधाकर अडबले सर यांना पाठविली. Pending Leave Encashment for Tribal School Staff

    वरील सर्व निवेदन सभा व चर्चेच्या अनुषंगाने आमदार सुधाकर अडबले यांनी मा. सचिव, आदिवासी विकास विभाग व मा. आयुक्त आदिवासी विभाग नाशिक यांना रजा रोखीकरण बाबत निवेदन दिलीत आणि तात्काळ अहवाल मागितला. वरील सर्व प्रयत्नांती मा. अजय साखरे कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन यांनी ३१ ऑगस्ट २०२३ अखेर सेवानिवृत्त झालेल्या आदिवासी विकास विभाग अधिनस्त शासकीय आश्रम शाळेतील दीर्घ सुटी विभागातील संपूर्ण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना संचित अर्जित रजा रोखीकरण अनुज्ञेय करण्यात यावे, असे शासन परिपत्रक काढले.

    त्यामुळे २०१३ पासून प्रलंबित असलेली मागणी मार्गी लागली आणि सदर कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला. याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांचेकडे हा विषय विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष रमेश काकडे, सीटू संघटनेचे विभागीय अध्यक्ष आर. टी. खवशी, सेवानिवृत्त सहाय्यक प्रकल्प अधिकारी पी. के. भोंगाडे व सेवानिवृत्त मुख्याध्यापक के. एन. वालदे यांनी प्रयत्न केलेत. शासकीय आदिवासी विभाग आश्रम शाळा कर्मचाऱ्यांनी आमदार सुधाकर अडबाले यांचे आभार व्यक्त केले.

  • राजशिष्टाचाराची खिल्ली उडविणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांना MP धानोरकरांनी दिला इशारा

    Chandrapur municipal funding discrimination

    Chandrapur municipal funding discrimination : चंद्रपूर १८ नोव्हेम्बर (News३४) : चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराला आणि जनप्रतिनिधींचा राजशिष्टाचार  पाळण्यात होत असलेल्या दुर्लक्षाला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज थेट महानगरपालिका गाठून जाब विचारला. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी आपल्या समर्थकांसह महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात धडक देत त्यांना घेराव घातला आणि प्रोटोकॉल भंगासह निधी वाटपातील भेदभावावर जाब विचारला.

    Read Also : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थानिकांना रोजगार द्या – विक्रांत सहारे

    “प्रशासनाने तात्काळ राजशिष्टाचार पाळावा, लोकप्रतिनिधींना सन्मान द्यावा आणि निधी वाटप करताना कोणताही भेदभाव करू नये, अन्यथा याचे गंभीर परिणाम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भोगण्यास तयार राहावे,” असा थेट इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी आयुक्तांना दिला.

    गेल्या काही दिवसांपासून मनपा प्रशासनातील अधिकारी लोकप्रतिनिधींशी योग्य समन्वय साधत नाहीत. शासकीय भूमिपूजन सोहळ्यात लोकप्रतिनिधींना डावलले जात होते. तसेच, शहराच्या काही भागांमध्ये निधी वाटप करताना हेतुपुरस्सर भेदभाव केला जात असून, आवश्यक कामे बाजूला ठेवली जात असल्याचा गंभीर आरोपही खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला.

    या गंभीर प्रकाराने संतप्त झालेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज चंद्रपूर शहर महानगर पालिका गाठले आणि आयुक्तांच्या दालनात पोहोचताच प्रशासनाच्या या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला.

    राजशिष्टचाराचा भंग करणे म्हणजे लोकशाही व्यवस्थेचा आणि जनतेच्या मताचा अपमान आहे. प्रशासकीय अधिकारी जाणूनबुजून लोकप्रतिनिधींना डावलत आहेत आणि त्यामुळे शहराच्या विकासाची कामे, रस्ते आणि पाणीपुरवठ्यासारख्या तातडीच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे, असे त्या म्हणाल्या.

    यावेळी महानगर पालिका आयुक्त विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपयुक्त चिदलवार,शहर काँग्रेस अध्यक्ष संतोष लहामगे, शहर काँग्रेस माजी अध्यक्ष रामू तिवारी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव, युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश अडूर, इंटक युवा नेते प्रशांत भारती, भालचंद्र दानव, माजी नगरसेवक पिंटू शिरवार, काँग्रेस युवा नेते राहुल चौधरी, नौशाद शेख, गुंजन येरमे, सौरभ ठोंभरे यांची उपस्थिती होती.

  • Sunday market shutdown due to mahatet exam । MAHATET 2025 मुळे चंद्रपुरातील संडे मार्केटला ‘ब्रेक’; हजारो विद्यार्थ्यांची गर्दी अपेक्षित

    Sunday market shutdown due to mahatet exam

    Sunday market shutdown due to mahatet exam : चंद्रपूर १८ नोव्हेंबर (News३४) – येत्या २३ नोव्हेंबर रोजी संडे मार्केट भरणाऱ्या परिसरातील विविध शाळांमध्ये महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ होणार असल्याने दर रविवारला भरणारे संडे मार्केट या दिवशी बंद ठेवण्यात येणार असुन सदर निर्देशाची सर्व व्यावसायिकांनी नोंद घेण्याचे आवाहन चंद्रपूर मनपा प्रशासनाने केले आहे.  

    Read Also : चंद्रपुरातील रयतवारी मध्ये आमदार जोरगेवार व माजी नगरसेवक अडूर यांची शाब्दिक चकमक

    मनपा हद्दीतील जयंत टॉकीज चौक ते खिश्चन कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत दर रविवार ला संडे मार्केट या नांवाने बाजार भरत असून, त्यांत विविध तात्पुरत्या स्वरुपाची दुकाने, हातठेले, फेरीवाल्यांची दुकाने लावण्यांत येत असतात. येत्या रविवारी दिनांक २३ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ (MAHATET) होणार आहे.

      सदर परीक्षेची केंद्रे या परिसरातील न्यु इंग्लीश हायस्कुल, ज्युबली हायस्कुल व मराठी सिटी/हिंदी सिटी हायस्कुल येथे देण्यात आली असल्याने येथे मोठया प्रमाणात विद्यार्थी येणार आहे. तसेच सदरील परिसरात नागरिकांची प्रचंड गर्दी असण्याची शक्यता असतांना संडे मार्केट मधील गर्दीमुळे काही दुर्घटना होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही. त्यामुळे सदर ठिकाणी दर रविवारला भरणारे संडे मार्केट बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. 

  • Nagpur graduate constituency voter list update । नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ; मतदार यादीचा सुधारीत पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर

    Nagpur graduate constituency voter list update

    Nagpur graduate constituency voter list update : चंद्रपूर,  दि. १८ (News३४) : भारत निवडणूक आयोगाने 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याकरीता सुधारीत कार्यक्रम घोषित केला आहे. सदर पुनरिक्षण कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

    Read Also : लाडकी बहीण योजना, केवायसी साठी मुदतवाढ द्या – आमदार मुनगंटीवार

    1) मतदार नोंदणी अधिनियम, 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सुचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 30 सप्टेंबर 2025, 2) कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसीची प्रथम पुर्ण प्रसिध्दी 15 ऑक्टोबर 2025 रोजी, 3) वर्तमानपत्रातील नोटीसीची द्वितीय पुर्नप्रसिध्दी 25 ऑक्टोबर 2025 रोजी, 4) प्रकरणपरत्वे नमुना 18 द्वारे दावे व हरकती स्वीकारण्याचा दिनांक 6 नोव्हेंबर 2025, 5) हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई 28 नोव्हेंबर,

    6) प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी 3 ‍डिसेंबर रोजी, 7) दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी (मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 12 अंतर्गत) 3 ते 18 डिसेंबर 2025 पर्यंत, 8) दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे 5 जानेवारी 2026 रोजी आणि 9) मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी 12 जानेवारी 2026 रोजी करण्यात येईल. Nagpur graduate constituency voter list update

    नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करण्याबाबत दावे व हरकती 3 ते 12 डिसेंबर 2025 या कालावधीत स्वीकरण्यात येणार आहे. आपले नाव पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत समाविष्ट करण्याकरीता पात्र असलेल्या पदवीधर मतदारांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करण्याचे आवाहन सहायक मतदार नोंदणी अधिकारी, नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघ तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

  • Mazi Ladki Bahin Yojana eKYC latest update । ‘माझी लाडकी बहिण’ योजनेच्या eKYC ला ३० दिवसांची मुदतवाढ द्या – आमदार मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

    Mazi Ladki Bahin Yojana eKYC latest update

    Mazi Ladki Bahin Yojana eKYC latest update : चंद्रपूर १७ नोव्हेम्बर (News३४) : महाराष्ट्रातील कोट्यवधी बहिणींना आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षिततेचा आधार ठरलेली ‘माझी लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी आवश्यक असलेली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत १८ नोव्हेंबर २०२५ आहे. मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे मोठ्या प्रमाणावर लाभार्थींना ही प्रक्रिया वेळेत पूर्ण करता येत नसल्याने ई-केवायसीसाठी किमान ३० दिवसांची मुदतवाढ देणे अत्यावश्यक असल्याची मागणी राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.

    Read Also : घुग्गुस नगर परिषद निवडणूक, शारदा दुर्गम यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी

    या संदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असून, या चर्चेला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तसेच महिला व बालकल्याण मंत्री आदितीताई तटकरे यांना पत्राद्वारे तातडीने निर्णय घेण्याची विनंती करण्यात आली आहे. Mazi Ladki Bahin Yojana eKYC latest update

    राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर लाभार्थी बहिणी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करत असताना मोबाईलवर आधार ओटीपी येण्यात सातत्याने होणारा विलंब, ग्रामीण भागातील इंटरनेट समस्या, सेवा केंद्रांवरील वाढती गर्दी आणि तांत्रिक अडचणींमुळे नोंदणी वारंवार अयशस्वी होत असल्यामुळे हजारो महिलांची ई-केवायसी प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे.ई-केवायसी वेळेत पूर्ण न झाल्यास ‘माझी लाडकी बहिण’ योजनेचा लाभ थांबेल का, या भीतीने लाभार्थी महिलांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीची माहिती मिळताच आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

    आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नमूद केले की,माझी लाडकी बहिण’ ही योजना म्हणजे राज्यातील कोट्यवधी बहिणींसाठी केवळ आर्थिक मदत नसून त्यांच्या जीवनातील स्थैर्य, आत्मविश्वास आणि सुरक्षेची हमी आहे. तांत्रिक कारणांमुळे एकही पात्र महिला लाभापासून वंचित राहू नये. यासाठी ई-केवायसी प्रक्रियेस किमान ३० दिवसांची मुदतवाढ देणे अत्यंत आवश्यक आहे.लाखो महिलांचे हक्काचे आर्थिक सहाय्य थांबू नये, हा मुख्य उद्देश असून ई-केवायसीसाठीची अंतिम मुदत ३० दिवसांनी वाढविण्याचा निर्णय तातडीने घेण्यात यावा,अशी आग्रही मागणी आमदार मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री , महिला व बालकल्याण मंत्री आणि महिला व बालविकास विभागाचे सचिव यांच्याकडे केली आहे. Mazi Ladki Bahin Yojana eKYC latest update

    आ. सुधीर मुनगंटीवार हे नेहमी जनतेच्या समस्या समजून घेत त्यावर तात्काळ उपाययोजना करणारे संवेदनशील नेते म्हणून ओळखले जातात. कोणत्याही योजनेचा उद्देश पूर्ण व्हावा आणि पात्र लाभार्थ्यांना वेळेत मदत मिळावी, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. ‘माझी लाडकी बहिण’ योजनेतील महिलांना तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत असल्याची माहिती मिळताच त्यांनी कोणताही विलंब न करता थेट मुख्यमंत्री, मंत्री आणि विभागाचे सचिव यांच्याशी पत्र लिहून दूरध्वनीद्वारे संवाद साधला आणि लाखो महिलांना लाभाचा प्रवाह खंडित होऊ नये म्हणून ई-केवायसी प्रक्रियेस मुदतवाढ देण्याची ठाम भूमिका मांडली. जनतेच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने प्रतिसाद देऊन प्रभावीपणे पाठपुरावा करणे ही त्यांची कार्यशैली असून, हिच बाब यानिमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे, हे विशेष.

  • miyawaki plantation method for chandrapur । काय आहे मियावाकी वृक्षारोपण पद्धत?

    miyawaki plantation method for chandrapur

    miyawaki plantation method for chandrapur : चंद्रपूर 17 नोव्हेम्बर (News३४) – शहराचा प्राचीन वारसा आणि पर्यावरणीय दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेला रामाळा तलाव संवर्धनाच्या दृष्टीने शासनाने सुरू केलेल्या कामाला त्वरित गती देण्याची मागणी इको-प्रोचे बंडू धोतरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या मागणीसह धोतरे यांनी तलावाच्या मोकळ्या जागेवर मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण करीत सदर जागा अतिक्रमणापासून वाचावी याबाबत अनेकदा चर्चा झाली आहे.

    Read Also : रामाला तलाव संवर्धनाला गती द्या, इको प्रो ची मागणी

    तलावाच्या मोकळ्या जागेवर वृक्षारोपण हि बाब अतिशय चांगली आहे मात्र हे मियावाकी वृक्षारोपण नेमकं आहे तरी काय? हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण झाला असेल? याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.

    मियावाकी पद्धतीने वृक्षारोपण

    मियावाकी पद्धत (Miyawaki Method) हे जपानचे सुप्रसिद्ध वनस्पतिशास्त्रज्ञ आणि पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. अकिरा मियावाकी यांनी विकसित केलेले एक तंत्रज्ञान आहे. या पद्धतीत अत्यंत कमी जागेत, खूप कमी कालावधीत दाट, नैसर्गिक आणि बहु-प्रजातींचे जंगल निर्माण केले जाते. miyawaki plantation method for chandrapur

    या तंत्रानुसार लावलेली झाडे पारंपरिक पद्धतीने लावलेल्या झाडांपेक्षा १० पट वेगाने वाढतात आणि जंगल ३० पट अधिक दाट बनते. हे जंगल केवळ २ ते ३ वर्षांत स्वतःच्या गरजा पूर्ण करणारे (Self-Sufficient) होते.

    • जलद वाढ (Rapid Growth): झाडांची वाढ खूप वेगाने होते, ज्यामुळे कमी वेळेत हिरवळ तयार होते.
    • अत्यंत दाट लागवड (Ultra-Dense Planting): प्रत्येक चौरस मीटरमध्ये ३ ते ५ रोपे लावली जातात. रोपांमध्ये स्पर्धा निर्माण होऊन त्यांची वाढ वेगाने होते.
    • स्थानिक प्रजातींची निवड (Selection of Native Species): केवळ त्या भागातील नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या आणि तेथील वातावरणास अनुकूल असलेल्या देशी (indigenous) प्रजातींच्या रोपांची निवड केली जाते.
    • उच्च जैवविविधता (High Biodiversity): विविध प्रजातींची (साधारणपणे ५० ते १०० प्रकार) निवड केली जाते, ज्यामुळे तयार झालेले जंगल जैवविविधतेने समृद्ध होते.
  • new civil court building in Ballarpur । बल्लारपूरमध्ये नूतन दिवाणी न्यायालयाचे भूमिपूजन; शेवटच्या घटकासाठी जलद न्यायाची हमी

    new civil court building in Ballarpur

    new civil court building in Ballarpur : चंद्रपूर, दि. 16 (News३४) : संविधानाने आपल्याला मुलभूत अधिकार दिले आहेत. हे अधिकार शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी न्यायिक अधिका-यांची आहे. नवीन होणारी इमारत सोयीसुविधा युक्त आणि सुसज्ज असली तरी  शेवटच्या घटकाचा विचार करून न्यायदान करणे, हेच आपले कर्तव्य आहे, असे विचार मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी व्यक्त केले.

    बल्लारपूर येथे दिवाणी न्यायालय (कनिष्ठ स्तर) नूतन इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन आणि कोनशिला समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अनिल पानसरे, न्यायमूर्ती महेंद्र नेर्लीकर, चंद्रपूरच्या प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश समृध्दि भिष्म, बल्लारपूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲङ ईनायत सय्यद, बल्लारपूरच्या दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) सोनिया सावळेश्वरकर उपस्थित होते. new civil court building in Ballarpur

    Read Also : जुगार व अवैध दारूवर चिमूर पोलिसांची कारवाई

    बल्लारपूर येथील ऐतिहासिक कार्यक्रमाला उपस्थित असणे, हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे, असे सांगून न्यायमूर्ती किलोर म्हणाले, पैसा नाही म्हणून गरिबाची केस नाकारू नका. अशा लोकांना न्याय मिळवून देणे, ही आपली जबाबदारी आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानून न्यायदान करा. ‘तारीख पे तारीख’ मागणारे वकील आज खुप आहेत. मात्र लवकरात लवकर न्याय देण्यासाठी चांगले वकील आणि न्यायाधीशांची व्यवस्थेला गरज आहे. सर्वसामान्य लोकांचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, म्हणूनच आपल्याला मान सन्मान मिळतो. हा विश्वास कायम टिकविण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावे.

    judge anil kilor

    पुढे न्यायमूर्ती किलोर म्हणाले, न्यायालयाची अतिशय चांगली इमारत बल्लारपूर येथे उभी राहणार आहे. महाराष्ट्रात तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या न्यायालयाच्या इमारतीमध्ये बल्लारपूर हे सर्वोत्कृष्ट राहील. चित्रफिती मध्ये दाखवल्याप्रमाणेच इमारत व्हायला पाहिजे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागावर जास्त जबाबदारी आहे. न्यायालयाच्या इमारतीकरिता शासनाने जमीन आणि पैसा उपलब्ध करून दिला. भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांनी राज्यातील न्यायालयीन इमारतींना सोयीसुविधा युक्त आणि सुसज्ज करण्याचा चंग बांधला. त्याचीच ही फलश्रुती आहे. न्यायमूर्ती गवई यांच्या प्रयत्नातून अतिशय चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध होत आहे, असेही न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी सांगितले. new civil court building in Ballarpur

    प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती भिष्म म्हणाल्या, न्यायालयाची ऐतिहासिक वास्तू बल्लारपूर मध्ये उभी राहत आहे. बल्लारपूरला सांस्कृतिक आणि सामाजिक वारसा आहे. न्यायालयाच्या इमारतीची कमतरता होती ती आज पूर्ण होत आहे. प्रास्ताविकात ॲङ ईनायत सय्यद म्हणाले, आजचा हा दिवस सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा, असा आहे. हे केवळ भूमिपूजन नाही तर न्यायाच्या मंदिराची पायाभरणी आहे.

    कार्यक्रमाचे संचालन दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) नेहा गोरले आणि रमा कपील यांनी तर आभार दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) सोनिया सावळेश्वरकर यांनी मानले.

    वेळेत आणि गुणवत्तापुर्वक काम करा : न्यायमूर्ती अनिल पानसरे

    बल्लारपूर येथे सन 2008 मध्ये फौजदारी आणि दिवाणी न्यायालयाची स्थापना झाली. तेव्हा भाड्याच्या इमारतीमध्ये हे न्यायालय होते. सन 2010 पासून न्यायालयासाठी जागेचा शोध सुरू झाला, आज ती पूर्णत्वास येत आहे. या इमारतीचे बांधकाम 2027 मध्ये पूर्ण होईल, असे नियोजन आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळेत आणि गुणवत्तापूर्वक काम करावे, अशा सुचना न्यायमूर्ती अनिल पानसरे यांनी दिल्या. new civil court building in Ballarpur

    जलद गतीने न्याय मिळण्यास मदत होईल : न्यायमूर्ती महेंद्र नेर्लीकर

    ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेनुसार प्रत्येक तालुक्यात आणि दुर्गम भागात न्यायालयीन इमारती उभ्या राहत आहे. बल्लारपूरमध्येही उत्तम दर्जाची इमारत उभी होईल. शेवटच्या घटकाला न्याय देऊ, तेव्हाच खरे न्यायदान होईल. या इमारतीमधून वकील आणि न्यायाधीशांच्या सहभागाने जलद गतीने न्याय देण्यास मदत होईल, अशी अपेक्षा न्यायमूर्ती महेंद्र नेर्लीकर यांनी व्यक्त केली. 

    अशी राहील न्यायालयाची इमारत : 36 कोटी 73 लक्ष रुपये खर्च करून बांधण्यात येणारी ही इमारत तळमजला अधिक तीन मजले अशी साकारण्यात येणार आहे. तळमजल्यावर साक्षदार केंद्र, समुपदेशन कक्ष, लोक अदालत कक्ष, चौकीदार कक्ष. पहिल्या माळ्यावर 2 कोर्ट हॉल, 2 न्यायाधीश कक्ष, प्रशासकीय कामाकरीता कार्यालयीन कक्ष. दुस-या माळ्यावर दोन कोर्ट हॉल, दोन न्यायाधीश कक्ष, दोन अधिवक्ता कक्ष, ग्रंथालय, मध्यस्थी कक्ष, सहायक सरकारी अभियोक्ता कक्ष आणि तिस-या माळ्यावर व्ही.सी. रूम, सभा कक्ष, न्यायाधीश ग्रंथालय, अभिलेखागार कक्ष राहणार आहे. new civil court building in Ballarpur

  • cotton farmers facing loss in Chandrapur चंद्रपूरतील कापूस शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार, थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

    cotton farmers facing loss in Chandrapur

    cotton farmers facing loss in Chandrapur : चंद्रपूर १५ नोव्हेम्बर (News३४) – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सीसीआयने (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) जाहीर केलेली कापूस खरेदीची मर्यादा चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक असून ही मर्यादा मागच्या वर्षीप्रमाणे कायम ठेवावी, अशी आग्रही मागणी आ. श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात त्यांनी सीसीआयच्या संचालकांसोबतही दूरध्वनीवर चर्चा केली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

    Read Also : निवडणूक कामात निष्काळजीपणा नको – जिल्हाधिकारी गौडा

    मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात आ. श्री. मुनगंटीवार म्हणतात, ‘महाराष्ट्र कृषी विभागाने चालु हंगाम सन 2025-26 मध्ये कापसाची उत्पादकता ही प्रती हेक्टरी 12.80 क्विंटल ग्राह्य धरून पणन मंत्रालयामार्फत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाला पाठवली आहे. त्यानुसार सीसीआयने चालु हंगामातील प्रती हेक्टरी 13.57 क्विंटल ग्राह्य धरून कापुस खरेदीची मर्यादा जाहीर केली. परंतु, प्रत्यक्षात चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी हा प्रती हेक्टरी सरासरी 25 ते 40 क्विंटल कापसाचे उत्पन्न घेत असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे सीसीआयमार्फत कापूस विक्री करीता मोठी अडचण निर्माण झाली आहे.’ cotton farmers facing loss in Chandrapur

    सन 2024-25 या वर्षात या दोन्ही जिल्ह्यांसाठी सीसीआयने प्रती हेक्टरी 30 क्विंटल ही मर्यादा जाहीर केली होती. त्याप्रमाणे शेतकरी बांधवांनी कापूस विक्रीची प्रक्रिया देखील पूर्ण केली होती. चालू हंगामातील प्रती हेक्टरी क्विंटल मर्यादा फारच कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चालू वर्षात देखील प्रती हेक्टरी 30 ते 40 क्विंटल ग्राह्य धरून कापूस खरेदीची मर्यादा जाहीर करावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

    सन 2025-26 या चालू हंगामात ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक उत्पादन घेणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उर्वरीत कापूस एमएसपी पेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ येणार नाही. याकरीता सीसीआयमार्फत कापूस खरेदीची मर्यादा मागील वर्षीची कायम ठेवून चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही यादृष्टीने प्रशासनाला आदेश द्यावे, असे आ. श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. cotton farmers facing loss in Chandrapur

    त्याचवेळी सीसीआयचे संचालक श्री. ललितकुमार गुप्ता यांच्याशीदेखील आ. श्री. मुनगंटीवार यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यावर श्री. गुप्ता यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शेतकऱ्यांच्या कल्यासाठी सदैव तत्पर असलेले आ. श्री. मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा एका महत्त्वाच्या विषयावर पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात मारेगांव जि. यवतमाळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. रमन शाम डोये यांच्याकडून आ. श्री. मुनगंटीवार यांना निवेदन प्राप्त झाले होते.