Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • AI wildlife deepfake video Maharashtra । चंद्रपूर जिल्ह्यात AI चा धुमाकूळ! हा वाघ तर प्रामाणिक निघाला

    AI wildlife deepfake video Maharashtra

    AI wildlife deepfake video Maharashtra : चंद्रपूर ९ नोव्हेम्बर (News34) – चंद्रपूर जिल्ह्यात वन्यप्राण्यांनी अक्षरक्षा धुमाकूळ घातला असून ग्रामीण भागात आता शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरत आहे, शेतात गेलं कि वाघ त्यांची कधी शिकार करणार याचा काही नेम नाही. चंद्रपूर जिल्ह्यात वर्षभरात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ३८ नागरिकांचा बळी गेला आहे. अश्यातच एक वाघाच्या हल्ल्याचा बनावट व्हिडीओ पुढे आला असून त्यानंतर वाघाने ज्या इसमाची शिकार केली त्याला सुखरुपपणे वाघ परत घेऊन येत आहे.

    Also Read : चंद्रपुरात जंगलराज?, पत्रकार व कुटुंबाला पोलिसांसमोर मारहाण

    विशेष म्हणजे हे दोन्ही व्हिडीओ AI द्वारे तयार करण्यात आले आहे, वनविभागाने त्या बनावट व्हिडिओची दखल घेत सायबर पोलिसात तक्रार केली आहे. जिल्ह्यात याप्रकारे बनावट व्हिडीओ तयार करीत संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याची बाब वनविभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटली आहे.

    सध्या देशात AI कुत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच Artificial Intelligence ने धुमाकूळ घातला आहे, AI मुळे व्हिडीओ, ऑडिओ व बातमी हे अगदी सेकंदात तयार होते, या तंत्रज्ञानाचा उपयोग अगदी चांगल्या प्रकारे होत आहे, मात्र त्याचा गैरवापर करण्यात नागरिक मागे नाही. Chandrapur fake tiger attack video AI

    चंद्रपूर जिल्ह्यात व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ब्रह्मपुरी मधील वनविभागाच्या विश्रामगृहासमोर बसलेल्या व्यक्तीवर वाघ हल्ला करून घेऊन जात आहे असे दाखविले तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये हल्ला केलेल्या इसमाला वाघ हा परत आणून सोडत आहे. एखाद्याने मस्करी करीत सदर व्हिडीओ तयार केला मात्र आता त्याच्यावर कारवाईची टांगती तलवार लटकली आहे.

  • Chandrapur Journalist Family Assaulted । चंद्रपुरात जंगलराज?; पत्रकार कुटुंबावर पोलिसांसमोर हल्ला

    Chandrapur Journalist Family Assaulted

    Chandrapur Journalist Family Assaulted : चंद्रपूर ९ नोव्हेम्बर (News34) – चंद्रपूर शहरात पहिल्यांदा महानगरपालिकेने इतिहास घडविला आहे, ४ फुटाच्या गल्ली मधील अतिक्रमण काढण्यासाठी थेट बुलडोझर चालविण्यात आला, या कारवाईचा विरोध करणाऱ्या परिवाराला पोलिसांसमोर मारहाण करण्यात आली. असे प्रसंग बिहार किंवा उत्तरप्रदेश राज्यात सतत घडत असतात मात्र आता हे जंगलराज महाराष्ट्रातील चंद्रपुरात बघायला मिळाले आहे. एका दलित कुटुंबाला पोलिसांसमोर १० ते १२ जणांच्या घोळक्याडून मारहाण करण्यात आली.

    Also Read : वनविभागाने हल्लेखोर वाघाला केले जेरबंद

    चंद्रपुरातील पत्रकार विनोद दुर्गे व त्यांच्या कुटुंबाला चक्क पोलिसांसमोर मारहाण करण्यात आली असून या संदर्भातील मारहाणीचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. बाबुपेठ प्रभागातील हिंग्लज भवानी वार्डात विनोद दुर्गे हे मागील १५ वर्षांपासून राहत आहे. त्याकाळी अतिक्रमण काढा असा कसलाही वाद झाला नाही, दुर्गे यांना घरकुल आवास मंजूर झालं आणि अतिक्रमणाच्या वादाला तोंड फुटले.

    नेमकं काय घडलं?

    पत्रकार विनोद दुर्गे हे मागील १५ वर्षांपासून हिंग्लज भवानी वार्डात राहतात, या भागात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागतो, मात्र दुर्गे यांनी आपल्या शेजाऱ्यांसोबत बोलून बोरवेल चे काम केले होते, विशेष म्हणजे शेजाऱ्यांनी या बोरवेल साठी सामूहिक रक्कम जमा केली होती, आपलं घर अजून सुंदर व्हावं यासाठी शासनाच्या घरकुल आवास योजनेत अर्ज केला, दुर्गे यांना घरकुल मंजूर झाला, जानेवारी २०२५ मध्ये त्यांनी घराचे काम सुरु केले. Political Pressure Behind Chandrapur Bulldozer Action

    encroachment chandrapur

    दुर्गे यांचं घराचं काम चौधरी नामक शेजारी यांना खुपलं व त्यांनी दुर्गे यांच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण केले. घर निर्माण कार्यात वाद होऊ नये यासाठी दुर्गे गप्प राहिले मात्र शेजारी यांनी त्रास देणे सुरूच ठेवले, अखेर काही दिवसांनी सामूहिक निर्माण करण्यात आलेल्या बोरवेल चे पाणी दुर्गे यांना देणे बंद केले. शेजाऱ्यांनी केलेले अतिक्रमण बाबत चंद्रपूर मनपा मध्ये तक्रार देण्यात आली. मात्र काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी घेत दुर्गे यांना धमकविण्याचा प्रयत्न शेजाऱ्यांनी सुरु केला. रामनगर पोलिसात तक्रार करण्यात आली. मात्र काही राजकीय गुंडांच्या वरदहस्ताने उलट पोलीस दुर्गे यांना धाकदपट करू लागले. दुर्गे यांची बाजू कुणीही ऐकायला तयार नव्हते.

    त्यानंतर शेजाऱ्यांनी दुर्गे यांनी आमचा येण्याजाण्याचा रस्ता अडविला आहे, आम्हाला जायला रस्ता नाही अशी तक्रार काही शेजारी नागरिकांनी चंद्रपूर मनपामध्ये केली. विशेष बाब म्हणजे राजकीय शक्तीचा वापर करीत आमदारांना दुर्गे विरोधात पत्रही द्यायला लावले. political pressure municipal action

    ६ ऑक्टोबर २०२५ रोजी चंद्रपूर मनपाचे कर्मचारी व रामनगर पोलीस दुर्गे यांच्या घरी दाखल झाले, विशेष म्हणजे ४ फुटाच्या गल्ली मधील दुर्गे यांच्या घराच्या बांधकामाचे सामान काढण्यासाठी मनपाने थेट बुलडोझर आणला, विनोद दुर्गे व त्याच्या कुटुंबाने या कारवाईचा विरोध केला असता काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी विनोद दुर्गे, त्यांची पत्नी दिक्षा व मुलाला थेट पोलिसांसमोर अमानुषपणे मारहाण करण्यात आली. हा सर्व प्रकार व्हिडीओ मध्ये कैद झाला आहे.

    encroachment complaint

    मारहाणीबाबत दुर्गे यांनी रामनगर पोलिसात तक्रार दिली असता पोलिसांनी शोभा चौधरी, अमोल चौधरी, दयाराम अंबादे व प्रीतम गेडाम यांच्यावर विविध कलमानव्ये गुन्हा दाखल केला. याबाबत पुरोगामी संघटनेने दुर्गे कुटुंबाला मारहाण प्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली असून शेजाऱ्यांनी गुंड प्रवृत्तीच्या लोकांना हाताशी घेत मारहाण केल्याचा प्रकार निंदनीय आहे व यामध्ये चंद्रपूर मनपाच्या शुभम वरघट सह शेजाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी पत्रकार परिषदेमार्फत केली आहे. social injustice Maharashtra

    अतिक्रमणाच्या नावावर १५ वर्षांपासून शेजारी गप्प का?

    चंद्रपूर शहर हा अतिक्रमणाने वेढला आहे, याठिकाणी राजकीय दृढ संबंध व श्रीमंत नागरिकांनी मोठे अतिक्रमण केले आहे मात्र ते अतिक्रमण काढावे, त्याच्यावर कारवाई व्हावी याबाबत मनपा डोळेझाक करीत आहे. दुर्गे हे १५ वर्षांपासून हिंग्लज भवानी वॉर्डात राहत आहे, इतक्या काळात शेजाऱ्यांना अतिक्रमण का दिसले नाही? दुर्गे यांच्या घराचे बांधकाम सुरु असताना शेजाऱ्यांना जायला रस्ता नव्हता का? हे सर्व कट कारस्थान शेजाऱ्यांनी केले हे स्पष्ट आहे, मात्र राजकीय दबावाने दुर्गे यांच्यावर कारवाई झाली हे यातून स्पष्टपणे दिसत आहे. Chandrapur Journalist Family Assaulted

  • Soybean cotton procurement government centers । कापूस आणि सोयाबीन हमीभावाने खरेदीसाठी शासकीय केंद्र तात्काळ सुरू करा – आ. किशोर जोरगेवार

    Soybean cotton procurement government centers

    Soybean cotton procurement government centers : चंद्रपूर ८ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी दूर करून त्यांना दिलासा देण्यासाठी हमीभावाने कापूस आणि सोयाबीन खरेदी सुरू करण्यात यावी, अशी ठाम मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे केली आहे. मुंबई येथे आमदार जोरगेवार यांनी मंत्री रावल यांची भेट घेऊन या संदर्भात सविस्तर चर्चा केली आणि निवेदनही सादर केले आहे.

    Also Read : चंद्रपूर कांग्रेसमध्ये फेरबदल

    अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर सोयाबीन आणि कापूस पिकांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले असून, बाजारात कापूस आणि सोयाबीनला अत्यल्प दर मिळत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चही भरून निघत नाहीत, अशा परिस्थितीत शासनाने तातडीने शासकीय खरेदी केंद्रे सुरू करून शेतकऱ्यांना आधार देणे आवश्यक असल्याचे आमदार जोरगेवार यांनी म्हटले.

    त्यांनी पणन मंत्री जयकुमार रावल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख ठिकाणी सीसीआयमार्फत कापूस खरेदी केंद्रे त्वरित सुरू करण्यात यावीत. तसेच सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्यासाठी स्वतंत्र शासकीय केंद्रे स्थापन करून खरेदी प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करावी. या केंद्रांवर शेतकऱ्यांना आवश्यक सर्व सुविधा  वजन काटे, गोदाम व्यवस्था, ट्रॉली थांबे, पेमेंटची सुलभ पद्धत इत्यादी व्यवस्था उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली. Government procurement cotton soybean Chandrapur

    आमदार जोरगेवार म्हणाले, सध्या बाजारात सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा खूप कमी आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असून त्यांना आर्थिकदृष्ट्या मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शासनाने या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने हस्तक्षेप करावा.

    या भेटीदरम्यान आमदार जोरगेवार आणि पणन मंत्री जयकुमार रावल यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. मंत्री रावल यांनी जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेत तातडीने संबंधित विभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन आमदार जोरगेवार यांना दिले आहे. Farmer economic relief cotton procurement 

    चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षी हजारो शेतकरी कापूस आणि सोयाबीन उत्पादनावर अवलंबून असतात. परंतु यंदा पावसाच्या अनियमिततेमुळे उत्पादन घटले असून बाजारभाव कोसळले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने हमीभावाने खरेदी सुरू करणे अत्यावश्यक असल्याचे आमदार जोरगेवार यांनी म्हटले आहे.

  • T-91 SAM-1 tiger capture Chandrapur । हल्लेखोर वाघ जेरबंद; वनविभागाची कारवाई

    T-91 SAM-1 tiger capture Chandrapur

    T-91 SAM-1 tiger capture Chandrapur : चंद्रपूर ८ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या ३०० पार झाल्याने ग्रामीण व शहरी भागात सहजरित्या वाघाचे दर्शन होत आहे, विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात चालू वर्षात ३८ नागरिकांचा वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे.अश्याच एका हल्लेखोर वाघाला वनविभागाने जेरबंद केले आहे.

    Also Read : वाघाने हल्ला केला, हल्ल्याचा व्हिडीओ पुढे आला पण..

    ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत मोहर्ली वनपरिक्षेत्र (बफर) येथे मानवी वस्तीच्या परिसरात वारंवार वावर करून मानवी जीवितास धोका निर्माण करणारा नर बछडा वाघ T-91 SAM-1 यास दिनांक 07 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी अंदाजे 5 वाजता वन विभागाच्या पथकाने यशस्वीरीत्या जेरबंद केले आहे.सदर जेरबंद केलेल्या वाघास सध्या ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC), चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.

    यापूर्वी, दिनांक 24 सप्टेंबर 2025 रोजी मोहर्ली (बफर) परिक्षेत्रातील नियतक्षेत्रानजीक शेतकाम करत असताना श्री. अमोल बबन नन्नवारे वय -37 वर्षे रा. भामडेळी यांचा सदर वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला होता.

    राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (NTCA) च्या मानक कार्यपद्धतीनुसार गठित तांत्रिक समितीच्या शिफारशीच्या आधारे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) तथा मुख्य वन्यजीव रक्षक, महाराष्ट्र राज्य यांनी दिनांक 20 ऑक्टोबर 2025 रोजी आदेश जारी करून, मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आणि आणखी मनुष्यहानी होऊ नये म्हणून सदर वाघास जेरबंद करून ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर (TTC), चंद्रपूर येथे हलविण्याचे निर्देश दिले होते.

  • Maharashtra government housing loans for police | सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे ५ हजारांहून अधिक पोलिसांना मिळणार हक्काचे घर

    Maharashtra government housing loans for police

    Maharashtra government housing loans for police : चंद्रपूर ७ नोव्हेम्बर (News३४) – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्यातील ५ हजार ४५९ पोलीस अंमलदारांच्या हक्काच्या घराचा प्रश्न सुटला आहे. त्यासाठी राज्यभरातील पोलिसांनी आ. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. तसेच राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी पोलिसांच्या हक्काच्या घराचा प्रश्न संवेदनशीलतेने सोडविल्याबद्दल आ. श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

    Also Read : सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार; मेडिकल कॉलेजचे जानेवारी महिन्यात लोकार्पण

    शासनाकडून मिळणाऱ्या डीजी लोन (पोलीस गृहबांधणी अग्रीम) योजनेपासून राज्यातील ५ हजार ४५९ पोलीस अंमलदार दोन वर्षापासून वंचित होते. यासंदर्भातील माहिती मिळताच आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शासनाने डीजीलोन करीता १७६८.०८ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी दिली. याबाबतचे आदेश गृहविभागाचे उपसचिवांनी काढले.

    महाराष्ट्र पोलिस दलासाठी डीजी गृह कर्ज योजना अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे अंमलदार यांना घर बांधण्यासाठी थेट पोलिस गृहविभागाकडून मूळ वेतनाच्या १२५ टक्के कर्ज मिळते. ज्या अधिकारी व अंमलदारांकडे स्वतःचे निवासस्थान नाही. अशा कर्मचाऱ्यांना त्यांचे स्वतःचे हक्काचे घर मिळावे या करीता ही योजना राबविली जाते. ऑगस्ट २०२३ पासून आजपर्यंत राज्यातील जवळपास पाच हजार ४५९ अंमलदारांनी डीजी लोन करीता अर्ज दाखल केले होते.

    परंतु दोन वर्षात शासनाकडून योजनेतील एकाही अंमदाराचा अर्ज मंजूर करण्यात आलेला नव्हता. डीजी लोन करीता शासनाकडे राज्यभरातून सुमारे ४ हजार ७११ आणि मुंबईतून ७४८ इतके अर्ज दाखल केले आहे. हे संपूर्ण अर्ज ऑनलाईन पद्धतीने शासनाकडे सादर कले आहेत. यामध्ये ४ हजार ७११ अर्जाकरीता १२५५ कोटी ८७ लाख रुपयांची तर बृहन्मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयातंर्गत ७४८ प्रलंबित अजौरणठी २१२ कोटी २० लाख रुपयांची आवश्यकता होती. Mungantiwar role in police housing loan

    संवेदनशील, तत्पर अन् पाठपुरावा

    गृहकर्जासाठी (डिजी लोन) गेल्या दोन वर्षांपासून पोलीस अंमलदार शासनदरबारी पाठपुरावा करीत होते. पोलीस स्वतःच्या हक्काच्या घरापासून वंचित असल्याचा मुद्दा आ. श्री. मुनगंटीवार यांनी गांभीर्याने घेतला. पाठपुरावा करीत विधानसभेत हा मुद्दा मांडून शासनाचे लक्ष वेधून घेतले. अखेर शासनाने डीजीलोन करीता १७६७,०८ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली. आ. श्री. मुनगंटीवार यांची संवेदनशीलता, तत्परता आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा याचेच हे यश असल्याची भावना व्यक्त होत आहे.

  • Chandrapur mass singing Vande Mataram । चंद्रपूरमध्ये ३ हजार विद्यार्थ्यांनी गायले वंदे मातरम

    Chandrapur mass singing Vande Mataram

    Chandrapur mass singing Vande Mataram : चंद्रपूर, दि. 07  : भारतीय स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा आणि उर्जा देणारे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखीत ‘वंदे मातरम‘ या गिताच्या रचनेला 150 वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अंतर्गत येणारे चंद्रपूर येथील ऋषी अगस्त्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि राणी दुर्गावती शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामूहिक गायन कार्यक्रमात 3 हजार शालेय विद्यार्थ्यांनी ‘वंदे मातरम’ चा सूर लावून भारत भुमिचा गौरव केला.

    Also Read : चंद्रपुरात वाघाचा हल्ला कॅमेऱ्यात कैद पण..

    जिल्हा क्रीडा संकूल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, प्रमुख वक्त्या प्राचार्य अश्विनी बुजोने, ऋषी अगस्त्य औद्यो. प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य गजानन राजूरकर, राणी दुर्गावती औद्यो. प्रशि. संस्थेच्या प्राचार्य कल्पना खोब्रागडे, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, सहायक आयुक्त (कौशल्य विकास) अनिसा तडवी, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणे, मनिष महाराज आदी उपस्थित होते.

    स्वातंत्र्यलढ्याला एक नवी दिशा

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, वंदे मातरम’ या गिताच्या रचनेला आज 150 वर्षे पूर्ण  झाली आहेत.  त्या निमित्ताने या सामूहिक गायन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘वंदे मातरम’ या गितामुळे भारतीय स्वातंत्रलढ्याचा आवाज बुलंद झाला आणि स्वातंत्र्यलढ्याला एक नवी दिशा मिळाली. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपले बलिदान दिले त्यांना अभिवादन करून सर्वांनी स्वातंत्र्याच्या मुल्यांचे स्मरण करणे आवश्यक आहे. आपले गाव, शहर, जिल्हा, राज्य आणि देश समृध्द करण्यासाठी आपण सर्व मिळून काम करू या, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले. Vande Mataram 150 years celebration Chandrapur

    मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह म्हणाले, सन 1875 मध्ये बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘वंदे मातरम’ या गिताची रचना केली. या गितामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक नवीन प्रेरणा मिळाली. ती प्रेरणा घेऊन आत्मनिर्भरता, एकात्मता आणि अखंडता जोपासण्यासाठी सर्व जण एकत्रित प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले.

    तत्पुर्वी प्राचार्य योगिनी देगमवार यांच्या मार्गदर्शनात उपस्थितांनी एकत्रित ‘वंदे मातरम’ या गिताचे सामूहिक गायन केले. कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख वक्त्या प्राचार्य अश्विनी बुजोने यांनी ‘वंदे मातरम’ या गिताचा इतिहास व महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. Chandrapur mass singing Vande Mataram

    कार्यक्रमाचे संचालन पियुष केने यांनी तर आभार बंडोपंत बोढेकर यांनी मानले. कार्यक्रमाला रोशन पाटील, नामदेव राऊत, प्रज्वल गर्गेलवार यांच्यासह मोठ्या संख्येने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील तसेच विविध शाळांचे विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिक उपस्थित होते.

  • Chandrapur tiger attack AI generated video । चंद्रपुरात वाघाचा हल्ला कॅमेऱ्यात कैद पण…

    Chandrapur tiger attack AI generated video

    Chandrapur tiger attack AI generated video : चंद्रपूर, दि. ०७ (News34) : चंद्रपूर जिल्ह्यात चालू वर्ष २०२५ मध्ये वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात आतापर्यंत ३८ नागरिकांचा बळी गेला आहे, कधी शेतात, कधी रस्त्यावर तर कधी थेट गावात वन्यप्राणी धुमाकूळ घालत हल्ले करीत आहे. ३१ ऑक्टोबर रोजी ब्रह्मपुरी मध्ये वाघाने एका इसमावर हल्ला करीत त्याला उचलून नेले, या हल्ल्याचा व्हिडीओ सुद्धा समाजमाध्यमवर व्हायरल झाला आहे मात्र सदर व्हिडीओ हा बनावट असल्याचे स्पष्टीकरण वनविभागाने दिले असून सदर व्हिडीओ बनविणाऱ्यावर कारवाईचा इशारा सुद्धा वनविभागाने दिला आहे.

    ब्रम्हपुरी वनविभागातील वनविश्रामगृह येथे वाघाच्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याचा कथित व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत आहे. या व्हिडीओबाबत चंद्रपूर वनविभागाने स्पष्ट केले आहे की, ब्रम्हपुरी वनविभागात अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नाही.

    Also Read : चंद्रपूर मेडिकल कॉलेजचे कॉलेजचे जानेवारी महिन्यात लोकार्पण

    वनविभागाच्या माहितीनुसार, संबंधित व्हिडीओ पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (Artificial Intelligence – AI) साहाय्याने तयार केलेला बनावट व्हिडीओ आहे. या व्हिडीओद्वारे समाजकंटकांकडून जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा आणि सत्यविरहित अफवा पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे.

    वनविभागाचे स्पष्टीकरण

    अलीकडील काळात ब्रम्हपुरी परिसरात मानव-वन्यजीव संघर्षाच्या काही घटना घडल्या असल्या तरी, या बनावट व्हिडीओचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.मुख्य वनसंरक्षक (प्रा.) आर. एम. रामानुजम यांनी सांगितले की, “या व्हिडीओची निर्मिती व प्रसारण करणाऱ्यांविरुद्ध विभागाने गंभीर दखल घेतली असून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.” AI deepfake dangerous tiger videos

    अशा प्रकारच्या खोट्या व दिशाभूल करणाऱ्या व्हिडीओंवर विश्वास ठेवू नये. अशा माहितीची नोंद आढळल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या वनविभाग किंवा पोलिस विभागास माहिती देऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • Jijau Brigade Chandrapur convention | चंद्रपुरात जिजाऊ ब्रिगेडचे तीन दिवसीय महाअधिवेशन

    Jijau Brigade Chandrapur convention

    Jijau Brigade Chandrapur convention : चंद्रपूर : महिलांचे सामाजिक, सांस्कृतिक व्यासपीठ असलेल्या जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने तीन दिवसीय महाअधिवेशनाचे आयोजन चंद्रपुरात आयोजित करण्यात आले आहे. 21 ते 23 नोव्हेंबरदरम्यान होणारे हे अधिवेशन प्रियदर्शिनी सभागृहात आयोजित आहे.

    Also Read : चंद्रपुरात गुन्हेगारांची पत्रकारिता, 4 पत्रकारांना अटक


    या महाअधिवेशनाचे उद्घाटन 21 नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता होणार असून, या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके राहणार आहेत. उद्घाटन प्रसिद्ध उद्योजिका मीनाताई वासाडे यांच्या हस्ते पार पडणार आहे. स्वागताध्यक्ष म्हणून खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. उद्घाटन सत्राला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार किशोर जोरगेवार, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजयकुमार घोगरे, जिजाऊ सृष्टीचे अध्यक्ष मधुकर मेहकरे, चंद्रशेखर शिखरे, सीमाताई अडबाले, शुभांगीताई धोटे, किरण देरकर, अर्चना भोंगळे, वेदांती देवतळे, नलुताई चाफले, स्नेहल गायकवाड, डॉ. दीपशिखा राजुरकर, दीपक खामणकर यांची उपस्थिती राहणार आहे.


    उद्घाटन सत्रानंतर रात्री नऊ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन असणार आहे. या अधिवेशनात 22 आणि 23 नोव्हेंबर या दोन दिवसात एकूण सात सत्र घेतले जाणार असून, या सातही सत्रात विविध विषयांवर परिसंवाद आयोजित केले आहेत. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता पहिल्या सत्राला प्रारंभ होणार असून, यात जिजाऊ ते सावित्रीमाई : स्त्रीशक्तीचा वैचारिक वारसा या विषयावर परिसंवाद होणार आहे. यात ॲड. वैशाली डोळस प्रमुख वक्त्या आहेत. Jijau Brigade three day meet Chandrapur news

    विविध विषयांवर होणार परिसंवाद

    दुपारी बारा वाजता होणाऱ्या ओळख नव्या युगाची या परिसंवादात स्नेहाताई टोम्पे, डॉ. भारती मधवई मार्गदर्शन करतील. दुपारी दीड वाजता ग्रामीण व शहरी महिला आणि डिजिटल माध्यम साक्षरता या विषयावर परिसंवाद असून यात प्रा. डॉ. प्राजक्ता धोटे आणि दिव्य भोसले मार्गदर्शन करतील. दुपारी चार वाजता कुटुंब व्यवस्था : बदलते विवाह समारंभ आणि स्त्रियांची भूमिका या परिसंवादात प्रा. डॉ. शिल्पा आठवले आणि डॉ. अलका ठाकरे यांचे मार्गदर्शन राहणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार आयोजित आहे. सत्कार सोहळ्यानंतर जिजाऊ ब्रिगेडने आम्हाला काय दिले, यावर अनुभव कथन होणार आहे.


    23 नोव्हेंबरला सकाळी साडेदहा वाजता सहाव्या सत्रातील पहिल्या परिसंवादाला प्रारंभ होईल. महिलांचे भावविश्व व विचारविश्व : आकलन, आव्हाने व अपेक्षित बदल या विषयावर जेएनयूचे प्रा. डॉ. शरद बावीस्कर मार्गदर्शन करतील. महिलांचा राजकीय सहभाग : मताधिकार, आरक्षण ते नेतृत्व या महत्त्वाच्या परिसंवादात राजदच्या राष्ट्रीय प्रवक्त्या प्रियंका भारती, खासदार प्रतिभाताई धानोरकर आणि प्रा. डॉ. मृणालिनी अहेर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. Jijau Brigade Mahadhiveshan Chandrapur guest


    या महाअधिवेशनाचा समारोपीय सोहळा दुपारी तीन वाजता पार पडेल. या सोहळ्याला अध्यक्ष म्हणून मराठा सेवा संघाचे संस्थापक ॲड. पुरुषोत्तम खेडेकर, स्वागताध्यक्ष खासदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार सुधाकर अडबाले यांची उपस्थिती राहणार आहे.
    या कार्यक्रमाला नागरिकांनी आणि विशेषतः महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिजाऊ ब्रिगेड, चंद्रपूर तर्फे करण्यात आले आहे.

  • Chandrapur medical college hospital inauguration । चंद्रपूर मेडिकल कॉलेजच्या नव्या इमारतीचे या महिन्यात होणार लोकार्पण

    Chandrapur medical college hospital inauguration

    Chandrapur medical college hospital inauguration : चंद्रपूर ६ नोव्हेम्बर (News३४) – मंत्रीपदाच्या कार्यकाळात चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला वेगळा  आयाम देत शिक्षण, रोजगार, कृषी, आरोग्य आणि पायभूत सुविधा या क्षेत्रात दमदार कामगिरी करत विकासाची पंचसूत्री जनतेसमोर ठेवणारे  आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतुन पूर्णत्वास आलेल्या चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण जानेवारी 2026 मध्ये होणार असून वैद्यकीय शिक्षण व आरोग्य सेवेचे हे प्रशस्त दालन आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने नववर्षात खुले होणार आहे. या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याची विनंती आ. मुनगंटीवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमीतजी शहा यांना केली आहे. या विनंतीला केंद्रीय गृह मंत्री अमितजी शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लवकरच ते तारीख कळवणार आहे. Chandrapur medical college hospital inauguration

    Also Read : खंडणीखोरांच्या टोळीला चंद्रपुरात अटक

    चंद्रपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच संलग्न 500 खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयाचे भव्य बांधकाम कार्य पूर्ण झाले आहे.  या प्रकल्पासाठी आ. मुनगंटीवार यांनी सातत्याने प्रयत्न केले असून  सुमारे रु. 616.46 कोटी इतकी निधी मंजूर करण्यात आला असून एच.एस.सी.सी. (इंडिया) लिमिटेड या संस्थेमार्फत मेसर्स शापूरजी पालनजी कंपनी लिमिटेड यांनी उच्च दर्जामध्ये हे कार्य पूर्ण केले आहे. अर्थमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर आ. मुनगंटीवार यांनी या प्रकल्पाला गती दिली. निधी वितरणासह शासन स्तरावर तसेच स्थानिक स्तरावर बैठकी घेवून, नियमित आढावा घेवून त्यांनी याकडे विशेष लक्ष दिले. बांधकामाचा दर्जा उच्चतम असावा यासाठी ते कायम आग्रही राहिले. Chandrapur government medical college inauguration 2026

    या योजनेसाठी माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे सन 2018-19 मध्ये रु. 61.47 कोटी, सन 2019-20 मध्ये रु. 115.00 कोटी, सन 2020-21 मध्ये रु. 75.00 कोटी, सन 2021-22 मध्ये रु. 135.00 कोटी, सन 2022-23 मध्ये रु. 76.00 कोटी, सन 2023-24 मध्ये रु. 124.00 कोटी आणि सन 2024-25 मध्ये रु. 30.00 कोटी असा एकूण रु. 616.46 कोटी निधी वितरित करण्यात आला आहे.हा परिसर 100 एम.बी.बी.एस. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी तसेच विदर्भ प्रदेशातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी विकसित करण्यात आला आहे. वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि उपचार यांच्या दृष्टीने हे संस्थान महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रात एक नवे पर्व ठरेल असा विश्वास आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यात आरोग्य सेवेवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करणाऱ्या आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून चंद्रपूरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालया पाठोपाठ कॅन्सर रुग्णालया सारखा महत्वाचा आरोग्य प्रकल्प साकारत आहे. त्यांच्या पालकमंत्री पदाच्या कार्यकाळात जिल्ह्यात 14 प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत बांधकामांना मंजूरी देण्यात आली असून बल्लारपूर, पोंभुर्णा येथे ग्रामीण रुग्णालय, मुल येथील उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन, उमरी पोतदार, कळमना येथे स्मार्ट प्रा. आ. केंद्र तसेच आरोग्य संकुले पूर्णत्वास आली आहेत. Sudhir Mungantiwar healthcare initiatives Maharashtra

    त्याच प्रमाणे वैद्यकीय शिक्षणा सोबतच शिक्षण क्षेत्रात देखील सैनिकी शिक्षण देणारी चंद्रपूर जिल्‍हयातील अत्‍याधुनिक सैनिकी शाळा, बल्‍लारपूर येथील एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाचे उपकेंद्र, स्‍व. सुषमा स्‍वराज महिला सक्षमीकरण केंद्र बल्‍लारपूर, कृषी शिक्षण व प्रशिक्षण देण्‍यासाठी मुल येथे शासकीय कृषी महाविद्यालय, शासकीय अभियांत्रीकी महाविद्यालय चंद्रपूरसाठी टाटा समूहातर्फे ९ ट्रेनिंग सेंटरसाठी २६७ कोटी रू. निधी, ग्रंथालय व मुलींचे वसतीगृह यासाठी १२ कोटी रू. निधी, बल्‍लारपूर येथे डिजीटल शाळा, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे उपकेंद्र स्‍थापन करण्‍यासाठी प्रयत्‍न, बल्‍लारपूर, पोंभुर्णा, मुल येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्‍था अधिक सक्षम करण्‍यासाठी प्रयत्‍न आ. मुनगंटीवार यांनी केले आहे. मुल येथे शासकीय तंत्रनिकेतन सुरू करण्‍यासाठी राज्‍य शासनाने नुकतीच  मान्‍यता दिली आहे. त्यांचा शैक्षणिक विकासाचा दृष्टीकोन जिल्ह्याच्या विकासाला वेगळी उंची बहाल करणारा ठरला आहे.

  • Congress party sit-in protest Chandrapur । चंद्रपुरात कांग्रेसच्या माजी नगरसेवकांचे ठिय्या सत्याग्रह आंदोलन

    Congress party sit-in protest Chandrapur

    Congress party sit-in protest Chandrapur : चंद्रपूर ६ नोव्हेम्बर (News३४) – आज दि ६ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता महानगरपालिके समोर गांधी चौक चंद्रपुर येथे महाकाली प्रभाग 12 व भिवापुर प्रभाग 14 चे काँग्रेसच्या माजी नगरसेवक नंदू नागरकर व वसंत देशमुख, प्रवीण पडवेकर काँग्रेस विधानसभा उमेदवार, सुनीता लोढीया, माजी नगराध्यक्ष, यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून ठिय्या सत्याग्रह आंदोलन ला सुरवात केली. 

    आंदोलनाचे मुख्य पार्श्वभूमी अशी की महाकाली प्रभाग 12 व भिवापुर प्रभाग 14 या दोन्ही प्रभागाला व शहराला जोडनारा महत्वाचा पुल अतिवृष्टीमुळे 3 महिन्या आधी वाहून गेला, चंद्रपूर च्या आराध्य दैवत माता महाकाली च्या यात्रे करिता दर वर्षी अनेक भाविक मार्च व एप्रिल महिन्या मध्ये लाखोच्या संख्येत दर्शनास येतात त्या वेळी बागला चौक ते अंचलेश्वर गेट हा मुख्य मार्ग बंद असतो त्या वेळी शहरातील नागरिक या पुलावरून मोठ्या संखेत प्रवास करतात. Congress party sit-in protest Chandrapur

    Also Read : चंद्रपुरात खंडणीखोर पत्रकारांच्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

    चंद्रपुर बेनार रेल्वे स्टेशन साठी जाणारे प्रवासी नागरिक मुख्यता या पुला चा वापर करतात, दैनंदिन या मार्गाने जाणारे महाकाली प्रभाग १२ व भिवापूर प्रभाग 14 नागरिक नदीतुन जाने येणे करीत आहे धोधो पावसाने नदीच्या वाढलेल्या  प्रवाहात एखादा व्यक्ति वाहुन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाहीं तसेच शासकीय रुग्णालय, शासकीय इंजिनीरिंग कॉलेज, राजीव गांधी इंजिनीरिंग कॉलेज, बाबुपेठ, भिवापूर, WCL लालपेठ व बल्लारपूर करीत हा जोड रास्ता असून विद्याथी, व्यापारी व  कामगार या रस्त्याचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. (congress protest)

    दोनवेळा वाहून गेला पुलाचा भाग

                तात्पूरता  बनविन्यात येत असलेला रस्ता हा 2 दा वहुन गेला आहे त्याला रिपेअर करून मजबूत काम होणे शक्य नाहीं कारण त्याची निव (BASE) कमजोर झालेली आहे. तरी भविष्याचा विचार करत इथे मोठ्या  व मजबूत पुलाची निर्मिति करणे आवश्यक आहे. हनुमान खिडकी महाकाली प्रभाग क्र. १२ व भिवापूर प्रभाग क्र. १४ मधील झरपट नदीवरील पुलिया बांधकामा करीता खनिज निधीतुन ४ कोटी ५० लक्ष रुपये जिल्हा खनिज निधितुन उपलब्ध करुण देण्या करीता मा. जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना राजुरा विधानसभेचे माजी आमदार व ग्रामीण काँग्रेस कमिटी चे जिल्हाध्यक्ष सुभाषभाऊ धोटे, प्रवीण पडवेकर, नंदु नागरकर , सुनीता लोढ़िया व वसंत देशमुख  यानि 3 महिन्या अगोदर भेट घेतली असता त्यांनी सूचना केली की महानगर्पालिकेने इस्टिमेट चा प्रस्ताव मंजूर करूण पाठवावे.

    Also Read : बल्लारपुरातील संयुक्त गुन्हेगारीवर लगाम, पोलिसांनी लावला मकोका

    आम्ही तत्कालीन आयुक्त विपिन पालीवाल साहेब याना भेटून विनंती केली त्यनि इस्टिमेट बनवून प्रस्ताव तयार केला परंतु मा. आयुक्त साहेब लांब रजेवर गेले व त्यांची बदली झाल्या मुळे हा प्रस्ताव मॅडम विद्या गायकवाड आयुक्त मनपा चंद्रपुर  यानि दि 29/09/2025 ला जिल्हाधिकारी कार्यालय कड़े प्रस्ताव प्रशासकीय मान्यता करीता पठविला तरी हा प्रस्ताव मंजूर करुण ४ कोटी ५० लक्ष रुपये जिल्हा खनिज निधितुन उपलब्ध करुण द्यावा ही विनती केली तसेच शहर व जिल्हा प्रशासनाने योग्य दखल न घेतल्यास काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ता व सामान्य नागरिकांसोबत मिळून तीव्र आंदोलन करण्याचे संकेत देत चंदन पाटिल अतिरिक्त आयुक्त मनपा चंद्रपुर व संदीप चिद्दरवार उपायुक्त मनपा चंद्रपुर यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन निवेदन स्वीकारले. mahakali bridge collapse

    आंदोलकांनी हा विषय मा आमदार किशोर जोर्गेवर चंद्रपुर विधानसभा क्षेत्र यांनी जातीने लक्ष न घातल्यास महाकाली प्रभाग 12 व भिवापुर प्रभाग 14 चे नागरिक निषेध करतील. या प्रसंगी आंदोलनात  विनायक बांगडे, माजी अध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमेटी,  डॉ सुरेश महाकुलकर विरोधी पक्ष नेते मनपा चंद्रपुर, प्रशांत दानव, अजय वैरागडे, ज्ञानेश्वर जुनघरे, संगीत भोयर, अमजद आली इराणी, सकीना अन्सारी, विना खनके,  निलेश खोब्रागडे, केशव रामटेके, फारुख सिद्धीकी, शालिनी भगत, रमीज शेख, सतीश मालेकर, राजू बनकर, परब गिरडकर, विनोद संकत, कुणाल रामटेके, मंगला मडावी, प्रकाश चंदनखेडे, रेहमत शेख, local congress leaders protest bridge issue

    सर्जील भाई, राजा काझी, राजू दास, निखिल देव, प्रमोद विश्वकर्मा, कुमार स्वामी पोत्तलवार, अशोक उईके, जावेद भाई, बंडू जांगडे, राजू गर्गेलवार, डॉ जेणेकर मेहबूब भाई, शकीला दीदी, दीपक काटकोजवार, राजेश रंगारी, बंडोपंथ तातावार,  सचिन गावंडे, राकेश चहारे, सचिन क्षीरसागर, सचिन चहारे, जफर बेग  विजय ठोंबरे, मोहन डोंगरे, सचिन गोरे सुरेश आत्राम, विजय पराते, निखिल पाटिल, हरी गावंडे, भाणेश जंगम, सुरेश आत्राम, पांडुरंग गावतुरे, मोरेश्वर शेंडे, घनशाम वासेकर, श्याम राजूरकर, प्रकाश अधिकारी, सौ शोभा ज्ञानेश्वर जुनघरे, अनिल तपासे, जय झाडे, प्रकाश चहारे, गुडू बेग आदि प्रभागचे नागरिक मोठ्या संखेत उपस्थित होते.  Congress party sit-in protest Chandrapur