Category: ताज्या बातम्या

महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.

  • railway land acquisition problems । 🛤️ रेल्वेच्या भूखंड संपादनात गोंधळ; शेतकऱ्यांनो ८ दिवसात आक्षेप नोंदवा – हंसराज अहिर

    railway land acquisition problems

    railway land acquisition problems : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील चार गावांमधील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा विषय तातडीने मार्गी लावावा आणि संबंधित शेतकऱ्यांनी आठ दिवसाच्या आत लवादाकडे आक्षेप नोंदवावे तसेच पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शेतीचे नुकसान होणार नाही याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यावी, अशा सूचना राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी आज येथे दिल्या.

    विभागीय आयुक्त कार्यालयात आज श्री. अहीर यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा तालुक्यातील माजरी एरिया अमलगमेटेड एकोणा 1 व 2 येथे रेल्वे सायडीयसह लोडींग सिस्टीम ट्रॅक बांधकामाच्या भूसंपादनाबाबत बैठक घेण्यात आली. विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा, विभागीय आयुक्तालयातील अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी, चंद्रपूरचे अपर जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. Hansraj Ahir land acquisition intervention

    hansraj ahir land acquisition intervention

    शेतजमिनीच्या वादातून मुलाने केला वडिलांचा खून

    माजरी एरिया अमलगमेटेड एकोणा 1 व 2 येथे रेल्वे सायडीयसह लोडींग सिस्टीम ट्रॅक बांधकामासाठी दहेगाव, नायगाव, चरूरखटी आणि निमसडा येथील शेतकऱ्यांची 27.24065 हेक्टर आर जमीन भूसंपादित करण्यात आली. मात्र, शेतकऱ्यांना भूसंपादनापोटी योग्य मुल्यांकन मिळाले नसल्याची तक्रार आहे. याप्रकारणाबाबत श्री.अहीर यांनी शासन आणि शेतकऱ्यांचे मत समजून घेतले व आवश्यक माहिती यावेळी जाणून घेतली.


    याप्रकरणात शासनाने नेमलेल्या लवादाने सखोल बाबींचा विचार करून निर्णय द्यावा, तसेच शेतकऱ्यांनी संबंधित यंत्रणेकडे हरकती व नोंदी सादर कराव्या, अशा सूचना श्री. अहीर यांनी दिल्या. तसेच याभागात भूसंपादन होवून सुरू असलेले रेल्वे सायडीयसह लोडींग सिस्टीम ट्रॅकचे बांधकाम सद्या शेतीची पेरणी लक्षात घेता शेतकऱ्यांना अडचणी निर्माण होणार नाहीत याची काळजी घेवून पार पाडावी,असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

  • sand tipper escapes during tehsildar raid । 🚨 थेट तहसीलदारांसमोर रेती टिप्पर पळवला! वाचा काय घडलं त्या रात्री!

    sand tipper escapes during tehsildar raid

    sand tipper escapes during tehsildar raid : चंद्रपूर – तहसीलदार यांच्यासमोर वाळू तस्करांनी वाळूने भरलेला टिप्पर पळविल्याची घटना २१ जून ला रात्री घडली, या घटनेमुळे वाळू तस्कर महसूल विभागाला जुमानत नसल्याचे दिसून आले. याबाबत चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. tehsildar stops illegal sand transport

    चंद्रपूर पोलीस दलात मोठे फेरबदल

    २१ जून रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास तहसीलदार विजय पवार हे शासकीय वाहनाने वाहन चालक विनोद द्विवेदी सोबत गस्तीवर होते, त्यावेळी पोंभुर्णा मार्गे वाळूने भरलेला टिप्पर जुनोना गावामार्गे चंद्रपूरच्या दिशेने येत होता, तहसीलदार पवार यांनी सदर वाहन थांबविले, टिप्पर चालकाची चौकशी करीत वाहनात काय आहे असे विचारले तर त्याने वाळू असल्याचे सांगितले. वाळूचा परवाना आहे का असे विचारले असता त्याने परवाना नसल्याचे सांगितले.

    तहसीलदार पवार यांनी वाळूने भरलेला टिप्पर क्रमांक MH ३४ BG १९२९ चा रीतसर जप्तीनाम्याला सुरुवात केली, यावेळी वाहन चालक रहेमान आतिफर खान याने सांगितले कि सदर सदर वाहन हे सोनू सिंग व अंकुश वर्मा यांचे असून हि रेती थेरगाव घाटातून आणली असल्याचे सांगितले. illegal sand mining in chandrapur

    आधी वाहन अडविले आणि नंतर पळविले

    वाळू परवाना नसल्याने वाहन चालकाला पुढील कारवाईसाठी तहसील कार्यालयाकडे नेण्यास सांगितले, अष्टभुजा वार्ड नाना नाणी पार्कजवळ टिप्पर पोहचताच पांढऱ्या रंगाच्या चारचाकी वाहन क्रमांक MH ३४ BR ६५०५ ने तहसीलदार पवार यांच्या वाहनासमोर वाहन आडवे लावले. चारचाकी वाहन धारकाने टिप्पर चालकाला इशारा करताच सदर टिप्पर वेगात समोर गेला. सोबतच ते चारचाकी वाहन सुद्धा भरधाव वेगाने निघून गेले काही क्षणात दोन्ही वाहन दिसेनासे झाले.

    तहसीलदार पवार समोरच वाळू माफियाने मुजोरी करीत वाहन पळविले. याबाबत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याबाबत तहसीलदार पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

    विशेष बाब म्हणजे मागील काही वर्षांपासून वाळू घाटाचे लिलाव झाले नव्हते या काळात कोट्यवधी रुपयांच्या वाळूची तस्करी जिल्हाभरात सुरु होती, तशीच परिस्थिती चंद्रपूर शहरात पण होती मात्र आजपर्यंत महसूल प्रशासनाने अशी कारवाई करताना कुठे दिसले नाही. या काळात राजकीय पुढाऱ्यांनी वाळूची मोठ्या प्रमाणात चोरी केली मात्र राजकीय दबावापोटी कारवाई झाली नाही.

  • first day of school activities । 🥳 शाळेचा पहिला दिवस झाला खास – लेझीम, शिवगर्जना आणि स्वागत समारंभात रंगत!

    first day of school activities

    first day of school activities : चंद्रपूर, दि. 23 : ‘महाराज, राजनीती धुरंधर, प्रौढप्रताप पुरंदर, सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज, राजा शिवछत्रपती महाराजांचा, विजय असो…विजय असो…विजय असो…’ अशा पहाडी आवाजात 7 वी ची विद्यार्थीनी कार्तिकी मुंगले हिने शिवगर्जनेचा जयघोष केला आणि विद्यार्थ्यांचे शाळेत पहिले पाऊल पडले.

    दाताळा येथील पी.एम.श्री. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या प्रमुख उपस्थितीत जल्लोषपूर्ण वातावरणात विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव पार पडला. यावेळी शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणे, दाताळाच्या सरपंचा सुनिता देशकर, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुमन दोनाडकर, शिक्षण विस्तार अधिकारी मनोज गौरकार, शाळेचे मुख्याध्यापक लटोरी मोहितकर, शिक्षिका सुनिता पावडे, वंदना वनकर, अर्चना चिंतावार, शिक्षक राजू लांजेकर, केशर चकोले यांच्यासह पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. pm shri schools facilities

    चंद्रपूर पोलीस दलातील बदल्या, महिला पोलीस निरीक्षकांना साईड पोस्टिंग

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा म्हणाले, आजपासून शैक्षणिक सत्र 2025-26 ला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांसाठी आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. पहिल्यांदा शाळेत पाऊल टाकण्याचा क्षण अविस्मरणीय असतो. त्याचे महत्व जीवनभर असते. शिक्षणामुळेच स्वत:चा, कुटुंबाचा तसेच सामाजिक, आर्थिक व सर्वांगीन विकास होण्यास मदत होते. सर्वांना चांगले शिक्षण देणे ही आपली प्राथमिकता आहे. कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, असा शासनाचा मानस आहे.

    pm shri schools facilities

    जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्यावे, जेणेकरून स्पर्धेच्या या युगात आपलाही विद्यार्थी पुढे राहील. आजचा विद्यार्थी हे उद्याचे भविष्य आहे. विद्यार्थी घडला तरच देश घडेल. शाळांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासन निधीची कमतरता पडू देणार नाही. विद्यार्थ्यांनो, चांगला अभ्यास करा, तरच मोठ्या पदावर पोहचाल, असे म्हणत जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच पालकांनीसुध्दा मुलांना चांगले शिक्षण द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी शाळेकरीता मिळालेल्या स्मार्ट टीव्हीचे लोकार्पण जिल्हाधिका-यांच्या हस्ते करण्यात आले. district collector school visit news

    कार्यक्रमाचे संचालन वंदना वनकर यांनी तर आभार राजू लांजेकर यांनी मानले. यावेळी पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    महत्वाची क्षणचित्रे :

    1. नवीन प्रवेशित बालकांचे सजावट केलेल्या इनोव्हातून आगमन 2. जिल्हाधिकारी विनय गौडा यांची विद्यार्थ्यांसोबत हितगुज 3. लेझीम आणि बॅन्डच्या ठेक्यावर विद्यार्थ्यांचे वाजत-गाजत स्वागत 4. जिल्हाधिका-यांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण 5. फित कापून तसेच दीप प्रज्वलनाने शैक्षणिक सत्राचा प्रारंभ 6. शिवगर्जनेत विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव. 7. नवीन बालकांच्या प्रवेशाच्या पाऊलखुणा 8. विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत. 9. जिल्हाधिका-यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बॅग, पुस्तके आणि गणवेश वाटप.

    शाळेविषयी माहिती :

    दाताळा येथील पी.एम.श्री. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत वर्ग 1 ली ते 8 वी पर्यंत एकूण 225 विद्यार्थी प्रवेशित आहेत. नवीन शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये 25 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. शाळेमध्ये मुलामुलींकरीता स्वतंत्र आणि स्वच्छ शौचालय, पिण्याच्या पाण्यासाठी दोन आर.ओ. मशीन, 7 वर्गखोल्यांमध्ये स्मार्ट टिव्ही, विज्ञान प्रयोगशाळा, स्टेम लॅब, गार्डन आदी सोयीसुविधा आहेत.

  • internal police transfer chandrapur 2025 । 💥 चंद्रपूर पोलिस बदल्या २०२५, महिला पोलीस निरीक्षकांना साइड पोस्टिंग का?

    internal police transfer chandrapur 2025

    internal police transfer chandrapur 2025 : चंद्रपूर – २१ जून रोजी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अंतर्गत मोठे फेरबदल करण्यात आले. या बदलात ११ पोलीस निरीक्षक, १८ सहायक पोलीस निरीक्षक व २५ पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी संपुष्टात यावी याकरिता कदाचित पोलीस अधीक्षकांनी बदल्या केल्या असाव्या. कारण जिल्ह्यात रोज किरकोळ गुन्ह्या सहित गंभीर गुन्हे घडत आहे. त्यावर अजूनही पोलीस दलाला नियंत्रण मिळविण्यात अद्यापही यश मिळालेले नाही. मात्र पोलीस दलातील झालेल्या अंतर्गत बदल्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित झाले आहे. impact of police reshuffle on crime control

    सिगारेटच्या पैश्यासाठी का हटकलं? म्हणून थेट हत्या

    ११ पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या कुठे?

    सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांची जिवती पोलीस स्टेशनमध्ये बदली, कोरपना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत यांची मानव संसाधन विभाग चंद्रपूर मध्ये, पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांची नियंत्रण कक्ष मधून पोलीस स्टेशन कोरपना मध्ये, पोलीस निरीक्षक कांचन पांडे जिवती वरून थेट सिंदेवाही पोलीस स्टेशन, महिला पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांची भद्रावती वरून थेट सायबर पोलीस स्टेशन,

    नव्याने आलेले पोलीस निरीक्षक दिनेश लबडे नियंत्रण कक्ष चंद्रपूर वरून थेट जिल्हा विशेष शाखा, योगेश पारधी जिल्हा विशेष शाखा वरून थेट भद्रावती पोलीस स्टेशन, महिला पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन वरून थेट अर्ज शाखा, भरोसा सेल, पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके सायबर पोलीस स्टेशन वरून चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे बल्लारपूर वरून थेट नियंत्रण कक्ष तर पोलीस निरीक्षक विपीन इंगळे हे मानव संसाधन विभाग वरून थेट पोलीस स्टेशन बल्लारपूर मध्ये बदली करण्यात आली. honest police officer transferred chandrapur

    सहायक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या

    सचिन राखुंडे दोषसिद्धी कक्ष ते पोलीस स्टेशन रामनगर, जितेंद्र चांदे भिसी पोलीस स्टेशन ते पोलीस स्टेशन चिमूर, राजेश गवाले उप पोलीस स्टेशन धाबा वरून पोलीस स्टेशन रामनगर, युवराज सहारे उप पोलीस स्टेशन लाठी ते चंद्रपूर पोलीस शहर, संगीता हेलोंडे प्रभारी पोलीस स्टेशन तळोधी ते पोलीस स्टेशन वरोरा, निशा भुते पोलीस स्टेशन राजुरा ते उप पोलीस स्टेशन लाठी, पंकज बैसाणे चंद्रपूर शहर ते आर्थिक गुन्हे शाखा,

    नितेश डोर्लीकर ब्रह्मपुरी ते पोलीस स्टेशन पाथरी, धर्मेंद्र मडावी नक्षल सेल ते उप पोलीस स्टेशन धाबा, प्रफुल डाहुले नियंत्रण कक्ष ते पोलीस स्टेशन घुग्गुस, लक्ष्मण लोखरे नियंत्रण कक्ष ते राजुरा, प्रमोद रासकर पाथरी ते नियंत्रण कक्ष, मंगेश भोंगाडे चंद्रपूर शहर ते भिसी, राहुल गुहे उप पोलीस स्टेशन उमरी पोतदार ते तळोधी, गणेश झाम्बरे दुर्गापूर ते वरोरा, राहुल टेंगने चंद्रपूर ते उप पोलीस स्टेशन उमरी पोतदार, रमेश नन्नावरे राजुरा ते चंद्रपूर, योगेश पाटील घुग्गुस ते नक्षल सेल मध्ये बदली करण्यात आली आहे.

    ज्यांच्यामागे वाद ते आबाद?

    ११ पोलीस निरीक्षक व्यतिरिक्त चंद्रपूर जिल्ह्यातील असे काही पोलीस निरीक्षक आहे कि त्यांच्या कार्यकाळात काही चुका झाल्यावर सुद्धा त्यांची बदली चांगल्या ठिकाणी करण्यात आली. यामध्ये गुन्हे शाखा, तत्कालीन पोलीस निरीक्षक बल्लारपूर, तत्कालीन नियंत्रण कक्ष सह दुर्गापूर पोलीस निरीक्षक यांचा समावेश आहे. internal police transfer chandrapur 2025

    ज्यांचं काम त्यांचं नुकसान?

    सध्या या पोलीस दलातील बदल्यात महिला पोलीस निरीक्षकांच्या कार्य प्रणालीवर पोलीस अधीक्षकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले कि काय? असे चित्र निर्माण झाले आहे. कारण कार्यकाळ पूर्ण होण्याआधी त्यांना साईड ब्रांच मध्ये बदली केल्या गेली. यामध्ये कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक लता वाडीवे व प्रभावती एकुरके यांचा समावेश आहे. दोघांनी आपल्या अल्पशा कार्यकाळात चांगले काम केल्यावर सुद्धा त्यांची बदली करण्यात आली आहे. यामागे काय दडलंय हे तर न समजण्यासारखी गोष्ट आहे. why good police officers get transferred

    सध्या पोलीस दलात चुकीला माफी असावी असे चित्र या बदल्यातून स्पष्ट झालेले आहे. मात्र प्रामाणिक आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस निरीक्षकांना चांगल्या कामाचे वाईट फळ मिळाले कि काय असे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दुर्गापूर ते भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस निरीक्षक वाडीवे व शहर पोलीस स्टेशनच्या एकुरके यांनी आपल्या कार्यकाळात मोठे गुन्हे घडण्यापूर्वी त्यावर नियंत्रण मिळविले होते, महिला पोलीस निरीक्षक म्हणून दोघांनी आपल्या कामाची छाप पोलीस दलात सोडली.

  • Chandrapur International Yoga Day 2025 event । 🧘 चंद्रपूरमध्ये योगाचा महासंगम! आंतरराष्ट्रीय योग दिनाला उस्फूर्त प्रतिसाद

    Chandrapur International Yoga Day 2025 event

    Chandrapur International Yoga Day 2025 event – चंद्रपूर दि. 21 जून : धावपळीच्या आणि तणावग्रस्त जीवनशैलीमुळे आज अनेकांना विविध व्याधींनी ग्रासले आहे. यावर मात करून निरोगी आणि उत्तम जीवन जगायचे असेल तर दैनंदिन जीवनात योगा करणे आवश्यक आहे. हा एक केवळ व्यायामच नाही तर योगामुळे मानवाचा शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक संगम साधण्यास मदत होते, असे विचार राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी व्यक्त केले. District level yoga day programme Chandrapur 2025

    १९ वर्षाच्या युवकाला गांजा सहित अटक


    जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, मेरा युवा भारत आणि शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकूल येथे आयोजित मुख्य शासकीय योग दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, शिक्षणाधिकारी राजेश पाताळे, अश्विनी सोनवणे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, सुभाष कासनगोट्टूवार आदी उपस्थित होते.

    District level yoga day programme Chandrapur 2025


    देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संयुक्त राष्ट्र संघटनेने योगाचे महत्व ओळखले आणि 21 जूनला आंतराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याचा ठराव पारीत केला. गत 11 वर्षांपासून जगातील 177 देशांमध्ये योग दिन साजरा केला जात आहे. ‘एक पृथ्वी, एक आरोग्य’ ही 2025 च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे. जिल्हा प्रशासनाने पतंजली योग समिती आणि विविध संघटनांच्या माध्यमातून चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

    पुढील वर्षापासून सर्वांनी एकत्रित येऊन शासकीय योग दिन साजरा करावा. चंद्रपूरात योग संगम दिसणे आवश्यक आहे. पुढील आंतरराष्ट्रीय योग दिन यापेक्षा मोठ्या स्वरूपात व खुल्या मैदानात आयोजित करावा, अशा सुचनाही पालकमंत्री डॉ. उईके यांनी दिल्या. Chandrapur International Yoga Day 2025 event


    कार्यक्रमाच्या सुरूवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुजन करण्यात आले. यावेळी योगशिक्षिका वैजंती गौरकार आणि कविता मंघानी यांनी उपस्थितांना योगाचे प्रात्याक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाचे संचालन मंगला घोगी आसुटकर यांनी केले. कार्यक्रमाला क्रीडा अधिकारी मनोज पंधराम, मोरेश्वर गायकवाड, नंदू आवारे, तालुका क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे, जयश्री देवकर, संदीप उईके, विजय ढोबाळे यांच्यासह पतंजली योग समितीचे इतर सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    चांगले व निरोगी आयुष्य योगामुळे शक्य : आमदार किशोर जोरगेवार

    आज 11 वा आंतराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करीत आहोत. देशाच्या पंतप्रधानांनी योगाचे महत्व जगाला पटवून दिले, त्यामुळेच याला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. अनादी कालापासून भारतात योग सुरू असून याला अनन्यसाधारण महत्व आहे. चांगले आयुष्य केवळ योगामुळेच मिळू शकते. कोणत्याही आजारावर नियंत्रण मिळवायचे असेल किंवा मनाच्या शांतीसाठी योगा करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Kishor Jorgewar yoga importance healthy life speech


    उपस्थितांनी केली ही आसने : कपालभारती प्राणायाम, अनुलोमविलोम, ब्राभरी प्राणायाम, वज्रासन, स्कंदसंचालन, स्कंदस्थलांतरण, स्कंदचक्र, घुटनासंचालन, ताडासन, वृक्षासन, पादअष्टासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन, अर्धवज्रासन, उत्तंगासन, वक्रासन, भुजंगासन, अर्धहलासन, पवनउत्तासन, शवासन आदी आसने करण्यात आली.



  • AAP exposes corruption । 💣 M-20 म्हणलं, M-13 निघालं! आम आदमी पक्षाने उघड केली रस्ते घोटाळ्याची पोलखोल!

    AAP exposes corruption

    AAP exposes corruption : चंद्रपूर – शहरात सध्या निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात विकासकामांचा धडाका सुरु आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च करत विविध प्रभागांत सीसी रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. मात्र, या कामांच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आम आदमी पक्षाने महापालिकेवर आणि ठेकेदारांवर गंभीर गैरव्यवहार, निकृष्ट दर्जा व भ्रष्टाचार केल्याचा थेट आरोप केला आहे. Chandrapur Road Work Scam

    चंद्रपुरात या कारणामुळे झाला वाघिणीचा मृत्यू

    🕵️‍♂️ आम आदमी पक्षाची थेट पाहणी – M-20 ऐवजी M-13 गुणवत्ता

    जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वडगाव प्रभागातील रस्त्यांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. यावेळी रस्त्यांची स्ट्रेंथ तपासली असता, महापालिकेने M-20 दर्जा असल्याचा दावा केला होता, परंतु प्रत्यक्ष मापनात केवळ M-13 स्तराचीच नोंद झाली.

    हेच चित्र तुकुम प्रभागातही पाहायला मिळाले. फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून नागरिकांसमोर हे सारे सत्य मांडण्यात आले.

    💬 “आमदारांच्या छत्रछायेखाली ठेकेदारांना संरक्षण”

    आम आदमी पक्षाच्या मते, हे सर्व काम एका विशिष्ट ठेकेदारामार्फत केले जात आहे, जो स्थानिक आमदारांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता तपासली जात नाही, अधिकारी मौन बाळगतात आणि ठेकेदाराला पूर्ण मोकळीक मिळते.

    📉 “रस्ते पूर्ण झाले” दाखवून निधी वसूल; करदात्यांची फसवणूक

    हे संपूर्ण प्रकरण निवडणुकीपूर्वी निधीच्या लुटीचा ठोस नमुना असल्याचे आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे. रस्त्यांचा दर्जा अत्यंत खराब असूनही कामे पूर्ण झाल्याचे दाखवले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या कररूपी पैशांची सरळसरळ फसवणूक होत आहे, असा ठपका त्यांनी ठेवला.

    💡 मागील प्रकरणांतही महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप

    यापूर्वीही चंद्रपूर महापालिकेवर:

    • बनावट फाउंटन खर्च,
    • अपूर्ण ड्रेनेज लाईनसाठी पेमेंट,
    • अमृत कलश योजनेंतर्गत अनियमित पाणीपुरवठा,

    या प्रकरणांत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते.

    📹 फेसबुक लाईव्हद्वारे जनजागृती

    आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वडगाव व तुकुम प्रभागातील कामांचे फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रसारण केले. लवकरच शहरातील इतर प्रभागांतील रस्त्यांचीही पाहणी करून सच्चाई जनतेसमोर मांडण्यात येईल, अशी माहिती आप ने दिली.

    यावेळी आपचे मयूर राईकवार – जिल्हाध्यक्ष, योगेश गोखरे – शहराध्यक्ष, राजकुमार नगराडे – जिल्हा सचिव, संतोष बोपचे – संघटन मंत्री, विशाल विरंमवार, क्रिश कपूर, आदित्य नंदनवार, अ‍ॅड. तबस्सुम शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
  • acute cardio respiratory failure in tigers । 🐯 ताडोबातील वाघिणीचा नैसर्गिक मृत्यू! हृदय-श्वसन निकामी होणे म्हणजे नक्की काय?

    acute cardio respiratory failure in tigers

    acute cardio respiratory failure in tigers : चंद्रपूर: ताडोबा बफर विभागांतर्गत मूल वनपरिक्षेत्रातील जानाला येथील डोणी बीटमधील कक्ष क्रमांक ३६० मध्ये आज (शुक्रवार, २१ जून २०२५) सकाळी टी-१७७ या सात वर्षीय वाघिणीचा मृतदेह आढळून आला. वनविभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.

    चंद्रपूर मनपा निवडणुकीची तयारी

    वनविभागाला वाघिणीचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळ सुरक्षित केले आणि आवश्यक त्या प्रक्रिया सुरू केल्या. वाघिणीचा मृतदेह चंद्रपूर येथील (TTC) केंद्रात नेण्यात आला, जिथे तिचे सविस्तर शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनानंतर वाघिणीचा मृत्यू तीव्र हृदय-श्वसन निकामी झाल्यामुळे (Acute cardio-respiratory failure) झाल्याचे निष्पन्न झाले.

    शिकार नाही, नैसर्गिक मृत्यू

    तपासणीदरम्यान, वाघिणीचे सुळे, नखं आणि मिशा यासह सर्व महत्त्वाचे अवयव शाबूत आढळले. त्यामुळे, शिकारीची किंवा इतर कोणत्याही घातपाताची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावण्यात आली आहे.

    राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यात आल्या. यावेळी एनटीसीए प्रतिनिधी श्री. बंधु धोत्रे, मानद वन्यजीव संरक्षक श्री. मुकेश भांडारकर, ताडोबा बफर विभागाचे सहायक वनसंरक्षक श्री. एस.एस. दुबे, आणि पशुवैद्यकीय तज्ञ उपस्थित होते.

    यात डॉ. रविकांत एस. खोब्रागडे (पशुवैद्यकीय अधिकारी – वन्यजीव आणि प्रमुख, रॅपिड रेस्क्यू टीम, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प), डॉ. कुंदन पोदचलवार (पशुवैद्यकीय अधिकारी, टीटीसी, चंद्रपूर), आणि डॉ. कडुलकर (निवृत्त सहायक पशुधन विकास अधिकारी) यांचा समावेश होता. मूल वनपरिक्षेत्रातील आणि ताडोबा बफर विभागातील क्षेत्र कर्मचाऱ्यांनीही या प्रक्रियेत सहकार्य केले.

    हृदय-श्वसन निकामी होणे म्हणजे नक्की काय?

    हृदय-श्वसन निकामी होणे (Cardio-respiratory failure) म्हणजे शरीरातील हृदय (Cardio) आणि श्वसन प्रणाली (Respiratory) दोन्ही योग्यरित्या काम करणे थांबवतात किंवा त्यांची कार्यक्षमता खूप कमी होते. सोप्या भाषेत सांगायचे तर, याचा अर्थ हृदय शरीराच्या अवयवांना पुरेसे रक्त पंप करू शकत नाही आणि फुफ्फुसे रक्ताला पुरेसा ऑक्सिजन पुरवू शकत नाहीत किंवा कार्बन डायऑक्साइड प्रभावीपणे बाहेर काढू शकत नाहीत.

    यामुळे शरीरातील अवयवांना आवश्यक ऑक्सिजन मिळत नाही आणि कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण वाढते, जे शरीरासाठी हानिकारक असते. हे एक गंभीर वैद्यकीय स्थिती आहे, ज्यात तातडीने वैद्यकीय मदतीची आवश्यकता असते.

    वाघिणीच्या बाबतीत, “अक्यूट कार्डिओ-रेस्पिरेटरी फेल्युअर” म्हणजे तिला अचानक हृदय आणि श्वसनसंस्थेशी संबंधित गंभीर समस्या आली, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. हे सहसा नैसर्गिक कारणांमुळे होते, जसे की वृद्धत्व, एखादा गंभीर आजार किंवा शरीरातील अचानक झालेला कोणताही बदल जो हृदय आणि फुफ्फुसांच्या कार्यावर परिणाम करतो.

  • Seva Saptah health initiative Chandrapur । मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहांतर्गत भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन

    Seva Saptah health initiative Chandrapur

    Seva Saptah health initiative Chandrapur : चंद्रपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जुलै महिन्यात आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने सेवा सप्ताह राबविण्यात येत आहे. या उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून रामबाग मैदानात भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यासंदर्भात आज आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकारी आणि डॉक्टरांच्या संघांसोबत नियोजन बैठक घेतली. free health camp in Chandrapur 2025

    या बैठकीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, चंद्रपूर महानगरपालिकेचे आयुक्त विपिन पालीवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेवराव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कराटे, वनविभागाचे सहायक वनसंरक्षक विवेक नाटू, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. दीक्षित, आचार्य विनोबा भावे रुग्णालयाचे शिंगणे, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ. स्वप्निल वावडीकर, नॅशनल कॅन्सर हॉस्पिटलचे डॉ. पवन अगराडे यांच्यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

    शासकीय निवासी शाळांमध्ये शिक्षक भरती, आजच करा अर्ज

    यावेळी भाजपचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य तुषार सोम, माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, प्रकाश देवतळे, अजय जयस्वाल, बलराम डोडानी, मनोज पाल, नामदेव डाहुले, संजय बुरघाटे, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, संदीप आवारी, देवानंद वाढई, रवि गुरनूले, वंदना हातगावकर, सविता दंढारे, सायली येरणे, राजेंद्र अडपेवार, अमोल शेंडे, राशिद हुसेन, नकुल वासमवार, जितेश कुळमेथे, करणसिंह बैस, मंगेश अहिरकर आदींची उपस्थिती होती.

    आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्व विभागांनी समन्वय साधत काम करावे आणि शिबिरात रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळेल याची खात्री करावी, असे निर्देश दिले. शिबिराचे स्थळ, सुविधा, आवश्यक वैद्यकीय उपकरणे, औषधे आणि पथकांची रचना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. गरजू रुग्णांपर्यंत अधिकाधिक आरोग्य सेवा पोहोचवणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. MLA Kishor Jorgewar health camp 2025

    आरोग्य शिबिराची तारीख निश्चित होणार

    या शिबिरासाठी महापालिका आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, ज्युपिटर हॉस्पिटल, सावंगी मेघे, कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम, श्री सनवरलाल जोधपूर हॉस्पिटल, इंडियन मेडिकल असोसिएशन, नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल यांचे सहकार्य लाभणार आहे.शिबिराआधी रुग्णांची नोंदणी व प्राथमिक तपासणी केली जाणार आहे. गंभीर आजार आढळल्यास शिबिराच्या दिवशी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सल्ला आणि पुढील उपचार दिले जाणार आहेत. याबबत लवकर आरोग्य शिबिराची तारिख निश्चित करण्यात येईल असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे. 

  • sarpanch election obc reservation demand । OBC आरक्षणाला सुप्रीम कोर्टची मंजुरी, पण चंद्रपूरात एकही सरपंच जागा नाही? पुन्हा सोडत काढण्याची मागणी!

    sarpanch election obc reservation demand

    sarpanch election obc reservation demand : चंद्रपूर – ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी नव्याने सोडत काढून 27 टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी आज दिनांक 20 जून 2025 ला मुख्यमंत्री , ग्रामविकास मंत्री आणि मुख्य निवडणुक अधिकारी यांचे कडे आज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत निवडणूक अधिकारी चौधरी साहेब यांचे कडे निवेदन देऊन केली आहे. OBC reservation in gram panchayat elections

    जेसीआय चे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रपूरच्या दौऱ्यावर

    4 एप्रिल 2025 अन्वे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 मधील कलम 30 व मुंबई ग्रामपंचायत सरपंच निवडणूक नियम 1964 मधील नियम पोट नियम (3), (4 ),(5 ),व (6 )मधील तरतूद नुसार अनुसूचित जाती /जमाती, नागरिकाचा मागास प्रवर्ग व स्त्री प्रवर्गातील सरपंच पदे तसेच सर्वसाधारण जागा व स्त्री यासाठी आरक्षित करायची पदाची कारवाई ग्रामविकास विभागाने मार्च 2025 ला सरपंच पदाची आरक्षणाची सोडत काढण्यात आली होती.

    एकही सरपंच पद ओबीसी करीता राखीव नाही

    चंद्रपुर जिल्ह्यात दिनांक 23 एप्रिल 2025 ला चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 92 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या सोडत काढल्या होत्या, त्यात चिमूर तालुक्यात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकही सरपंच पद राखीव ठेवण्यात आले नाही. दिनांक 6 मे 2025 ला माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील आरक्षण 27 टक्के मान्य केले असल्याने ,महाराष्ट्रातील आणि चंद्रपूर जिल्ह्यातील दिनांक 23 एप्रिल 2025 ला काढलेली सरपंच पदाची आरक्षण सोडत रद्द करून नव्याने आरक्षण करण्यात यावे.

    या साठी निवेदन देण्यात आले या वेळी महाराष्ट्र सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदूकिशोर वाढई, ॲड देवा पाचभाई, सरपंच्या इंदुबाई पोले ,स्नेहा साव संध्याताई पाटील ,नर्मदा बोरेकर निर्मला दडमड , सोनाबाई हनवते मंगला कलेवाड इत्यादी सरपंच आणि दीपक पिंपळशेंडे, वैभव क्षीरसागर सुरज देवाडकर ,संतोष झाडे,उपस्थित होते.

  • Ankur Jhunjhunwala JCI India visit । जेसीआय इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेसी अंकुर झुनझुनवाला यांचा चंद्रपूर रीजन दौरा

    Ankur Jhunjhunwala JCI India visit

    Ankur Jhunjhunwala JCI India visit : चंद्रपूर, महाराष्ट्र: जेसीआय इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेसी अंकुर झुनझुनवाला येत्या २३ जून २०२५ रोजी चंद्रपूर रीजनला भेट देणार आहेत. नेतृत्व विकास, संघटनात्मक वाढ आणि युवा प्रेरणा यावर लक्ष केंद्रित करणारा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

    चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी

    जेसीआय (ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल) ही एक आंतरराष्ट्रीय पातळीवरील नेतृत्व विकास संघटना आहे, जी युवकांना सकारात्मक बदल घडवण्यासाठी प्रोत्साहित करते. १०० हून अधिक देशांमध्ये कार्यरत असलेली ही संघटना भारतात जेसीआय इंडिया म्हणून ओळखली जाते. १८ ते ४० वयोगटातील तरुणांना नेतृत्व, व्यवसाय, सामाजिक जबाबदारी आणि वैयक्तिक विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे, हे जेसीआय इंडियाचे मुख्य उद्दिष्ट आहे. JCI India national president visit 2025

    दौऱ्याचे मुख्य आकर्षण आणि उद्दिष्टे

    जोन-१३ च्या चंद्रपूर रीजनमधील हा बहुप्रतीक्षित दौरा नेतृत्व, संघटनात्मक विकास आणि युवा प्रेरणा यांचे प्रतीक आहे. चंद्रपूर क्षेत्रातील सर्व स्थानिक संस्था या ऐतिहासिक प्रसंगासाठी अत्यंत उत्सुक असून, त्यांनी कार्यक्रमाच्या भव्य तयारीला सुरुवात केली आहे. JCI India regional leadership program

    कार्यक्रमाचे मुख्य टप्पे:

    • जेसी अंकुर झुनझुनवाला यांचे भव्य स्वागत: स्थानिक संस्थांकडून राष्ट्रीय अध्यक्षांचे उत्साहात स्वागत केले जाईल.
    • स्थानिक संस्थांकडून सामाजिक प्रकल्पांचे सादरीकरण: चंद्रपूर रीजनमधील जेसीआयच्या स्थानिक शाखांनी हाती घेतलेल्या विविध सामाजिक उपक्रमांचे या वेळी सादरीकरण केले जाईल.
    • JCI व्हिजन २०२५ वर अध्यक्षीय मार्गदर्शन: जेसी अंकुर झुनझुनवाला हे JCI व्हिजन २०२५ संदर्भात महत्त्वाचे मार्गदर्शन करतील, ज्यामुळे संघटनेची भविष्यातील दिशा स्पष्ट होईल.
    • नेतृत्व विकासावर संवाद सत्र: युवा नेतृत्वाला बळकटी देण्यासाठी विशेष संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
    • जेसी सदस्यांचा सन्मान समारंभ: जेसीआयच्या सक्रिय सदस्यांच्या योगदानाला आदराने गौरवण्यासाठी सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. JCI India 2025 Vision explained

    या दौऱ्याचा मुख्य उद्देश चंद्रपूर क्षेत्रातील स्थानिक संस्था आणि युवकांना प्रेरित करणे तसेच या प्रदेशात सकारात्मक परिवर्तन आणि विकासाला चालना देणे हा आहे.

    उपस्थित प्रमुख पदाधिकारी

    या दौऱ्याला झोन आणि स्थानिक स्तरावरील अनेक महत्त्वपूर्ण व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.

    झोन नेतृत्व आणि पदाधिकारी:

    • झोन अध्यक्ष: जेसी कुशल झंवर
    • दौरा समन्वयक: जेसी शालिनी राजपूत आणि जेसी सौरभ गट्टानी

    झोन गव्हर्निंग बोर्ड (ZGB) सदस्य:

    • जेसी रुपेश राठी
    • जेसी यश श्रीवास्तव
    • जेसी विनोद एडलावर
    • जेसी ऋतिक गोयल
    • जेसी स्मृती व्यवहारे
    • जेसी महेंद्र जोशी
    • जेसी गौरी लोढा
    • जेसी आशीष गोयल
    • जेसी भावेश चव्हाण

    स्थानिक संस्था अध्यक्ष (LO Presidents):

    • जेसी ज्ञानेश कंचर्लावार – जेसीआय चंद्रपूर एलिट
    • जेसी सुशांत भांडारकर – जेसीआय चंद्रपूर पॉवर सिटी
    • जेसी चेतन रामटेके – जेसीआय चंद्रपूर
    • जेसी विक्रम अरोरा – जेसीआय चंद्रपूर ऑर्बिट
    • जेसी स्वाती पुगलिया – जेसीआय चंद्रपूर गरिमा
    • जेसी आशीष उधवानी – जेसीआय मूल
    • जेसी अभिषेक चौधरी – जेसीआय वणी
    • जेसी प्रणय विमलकर – जेसीआय राजुरा ब्लॅक डायमंड सिटी
    • जेसी प्रणीता कंपल्ली – जेसीआय बल्लारपूर वुड सिटी
    • जेसी डॉ. आशीष ढांबरे – जेसीआय वर्धा
    • जेसी अक्षय मल्पाणी – जेसीआय गडचांदूर

    माजी झोन अध्यक्ष आणि वरिष्ठ पदाधिकारी:

    • जेसी डॉ. सुशील जी मुंदडा
    • जेसी नितीन पुगलिया
    • जेसी मेघनाथ जानी
    • जेसी भरत बजाज
    • जेसी अनुप गांधी
    • जेसी सौरभ बर्डिया
    • जेसी प्रतीक सरडा

    या दौऱ्यामुळे चंद्रपूर आणि आसपासच्या क्षेत्रातील युवा नेतृत्वाला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा आहे.