internal police transfer chandrapur 2025
internal police transfer chandrapur 2025 : चंद्रपूर – २१ जून रोजी चंद्रपूर जिल्हा पोलीस दल अंतर्गत मोठे फेरबदल करण्यात आले. या बदलात ११ पोलीस निरीक्षक, १८ सहायक पोलीस निरीक्षक व २५ पोलीस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील गुन्हेगारी संपुष्टात यावी याकरिता कदाचित पोलीस अधीक्षकांनी बदल्या केल्या असाव्या. कारण जिल्ह्यात रोज किरकोळ गुन्ह्या सहित गंभीर गुन्हे घडत आहे. त्यावर अजूनही पोलीस दलाला नियंत्रण मिळविण्यात अद्यापही यश मिळालेले नाही. मात्र पोलीस दलातील झालेल्या अंतर्गत बदल्यामुळे अनेक प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित झाले आहे. impact of police reshuffle on crime control
सिगारेटच्या पैश्यासाठी का हटकलं? म्हणून थेट हत्या
११ पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या कुठे?
सिंदेवाही पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांची जिवती पोलीस स्टेशनमध्ये बदली, कोरपना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत यांची मानव संसाधन विभाग चंद्रपूर मध्ये, पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांची नियंत्रण कक्ष मधून पोलीस स्टेशन कोरपना मध्ये, पोलीस निरीक्षक कांचन पांडे जिवती वरून थेट सिंदेवाही पोलीस स्टेशन, महिला पोलीस निरीक्षक लता वाडीवे यांची भद्रावती वरून थेट सायबर पोलीस स्टेशन,
नव्याने आलेले पोलीस निरीक्षक दिनेश लबडे नियंत्रण कक्ष चंद्रपूर वरून थेट जिल्हा विशेष शाखा, योगेश पारधी जिल्हा विशेष शाखा वरून थेट भद्रावती पोलीस स्टेशन, महिला पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन वरून थेट अर्ज शाखा, भरोसा सेल, पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके सायबर पोलीस स्टेशन वरून चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे बल्लारपूर वरून थेट नियंत्रण कक्ष तर पोलीस निरीक्षक विपीन इंगळे हे मानव संसाधन विभाग वरून थेट पोलीस स्टेशन बल्लारपूर मध्ये बदली करण्यात आली. honest police officer transferred chandrapur
सहायक पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या
सचिन राखुंडे दोषसिद्धी कक्ष ते पोलीस स्टेशन रामनगर, जितेंद्र चांदे भिसी पोलीस स्टेशन ते पोलीस स्टेशन चिमूर, राजेश गवाले उप पोलीस स्टेशन धाबा वरून पोलीस स्टेशन रामनगर, युवराज सहारे उप पोलीस स्टेशन लाठी ते चंद्रपूर पोलीस शहर, संगीता हेलोंडे प्रभारी पोलीस स्टेशन तळोधी ते पोलीस स्टेशन वरोरा, निशा भुते पोलीस स्टेशन राजुरा ते उप पोलीस स्टेशन लाठी, पंकज बैसाणे चंद्रपूर शहर ते आर्थिक गुन्हे शाखा,
नितेश डोर्लीकर ब्रह्मपुरी ते पोलीस स्टेशन पाथरी, धर्मेंद्र मडावी नक्षल सेल ते उप पोलीस स्टेशन धाबा, प्रफुल डाहुले नियंत्रण कक्ष ते पोलीस स्टेशन घुग्गुस, लक्ष्मण लोखरे नियंत्रण कक्ष ते राजुरा, प्रमोद रासकर पाथरी ते नियंत्रण कक्ष, मंगेश भोंगाडे चंद्रपूर शहर ते भिसी, राहुल गुहे उप पोलीस स्टेशन उमरी पोतदार ते तळोधी, गणेश झाम्बरे दुर्गापूर ते वरोरा, राहुल टेंगने चंद्रपूर ते उप पोलीस स्टेशन उमरी पोतदार, रमेश नन्नावरे राजुरा ते चंद्रपूर, योगेश पाटील घुग्गुस ते नक्षल सेल मध्ये बदली करण्यात आली आहे.
ज्यांच्यामागे वाद ते आबाद?
११ पोलीस निरीक्षक व्यतिरिक्त चंद्रपूर जिल्ह्यातील असे काही पोलीस निरीक्षक आहे कि त्यांच्या कार्यकाळात काही चुका झाल्यावर सुद्धा त्यांची बदली चांगल्या ठिकाणी करण्यात आली. यामध्ये गुन्हे शाखा, तत्कालीन पोलीस निरीक्षक बल्लारपूर, तत्कालीन नियंत्रण कक्ष सह दुर्गापूर पोलीस निरीक्षक यांचा समावेश आहे. internal police transfer chandrapur 2025
ज्यांचं काम त्यांचं नुकसान?
सध्या या पोलीस दलातील बदल्यात महिला पोलीस निरीक्षकांच्या कार्य प्रणालीवर पोलीस अधीक्षकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले कि काय? असे चित्र निर्माण झाले आहे. कारण कार्यकाळ पूर्ण होण्याआधी त्यांना साईड ब्रांच मध्ये बदली केल्या गेली. यामध्ये कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक लता वाडीवे व प्रभावती एकुरके यांचा समावेश आहे. दोघांनी आपल्या अल्पशा कार्यकाळात चांगले काम केल्यावर सुद्धा त्यांची बदली करण्यात आली आहे. यामागे काय दडलंय हे तर न समजण्यासारखी गोष्ट आहे. why good police officers get transferred
सध्या पोलीस दलात चुकीला माफी असावी असे चित्र या बदल्यातून स्पष्ट झालेले आहे. मात्र प्रामाणिक आपले कर्तव्य बजावणाऱ्या महिला पोलीस निरीक्षकांना चांगल्या कामाचे वाईट फळ मिळाले कि काय असे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दुर्गापूर ते भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस निरीक्षक वाडीवे व शहर पोलीस स्टेशनच्या एकुरके यांनी आपल्या कार्यकाळात मोठे गुन्हे घडण्यापूर्वी त्यावर नियंत्रण मिळविले होते, महिला पोलीस निरीक्षक म्हणून दोघांनी आपल्या कामाची छाप पोलीस दलात सोडली.
Leave a Reply