महाराष्ट्र, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्व ताज्या बातम्या (Latest News) आणि ब्रेकिंग अपडेट्स वाचण्यासाठी रोज भेट द्या news34.in वर. राजकारण, समाजकारण, क्रीडा, गुन्हेगारी आणि आर्थिक घडामोडींचे त्वरित आणि विश्वसनीय कव्हरेज येथे उपलब्ध आहे. २४ तास सुरू असलेल्या घडामोडींची अचूक माहिती मिळवा, जेणेकरून कोणतीही मोठी बातमी तुमच्यापासून सुटणार नाही.
campus placement after iti course : चंद्रपूर (२७ जून) – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे गुरुवारी घेण्यात आलेल्या शिकाऊ उमेदवारी रोजगार भरती मेळाव्यात 70 विद्यार्थ्यांची निवड झाली असून 20 जणांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात आले.
कार्यक्रम व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी तसेच प्राचार्य वैभव बोंगीरवार यांच्या मार्गदर्शनात मूलभूत प्रशिक्षण तथा अनुषांगिक सूचना केंद्र, चंद्रपूर द्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकावू उमेदवारी रोजगार भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या भरती मेळाव्याकरिता व्हेरॉक इंजिनिअरिंग, धूत ट्रान्समिशन, पटले प्लेसमेंट सर्विसेस, स्पीक अँड स्पेन एज्युकेशन सोल्युशन्स लिमिटेड, ब्रह्मा इंजीनियरिंग अँड सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, वैभव एंटरप्राइजेस अँड प्लेसमेंट सर्विसेस इत्यादी आस्थापनांनी सहभाग नोंदविला. या रोजगार भरती मेळाव्यात एकूण 260 विद्यर्थ्यांनी सहभाग नोंदविला. iti apprenticeship benefits for students
विद्यार्थ्यांना दिल्या शुभेच्छा
यावेळी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या मुख्य अधिकारी तथा सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार प्रणाली दहाटे यांनी विद्यार्थ्यांना अप्रेंटिसशिप करण्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच मेळाव्याद्वारे मिळालेल्या संधीचा लाभ घेऊन यशस्वी होण्याचे आवाहन केले. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शिकाऊ उमेदवार रोजगार भरती मेळाव्याकरिता अप्रेंटिसशिप सेल तथा राईट वॉक फाउंडेशन चंद्रपूर व गडचिरोली विभागाचे समन्वयक कपिल बांबोडे यांनी अप्रेंटिसशिप, त्याचे फायदे, निवड प्रक्रिया आणि सॉफ्ट स्किल याची माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन योगेश धवणे यांनी केले. यावेळी कंपनी कोऑर्डीनेटर म्हणून विजय तांदळे, मनोज पाटील, श्री. खोब्रागडे तसेच इतर समन्वयक, बीटीआरआयच्या श्रीमती लोखंडे, श्री. महातो तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे गटनदेशक श्री. नंदेश्वर, निमसरकार, चांदेकर व इतर कर्मचारी उपस्थित होते.
social inclusion programs for transgender : चंद्रपूर – तृतीयपंथीय हे समाजाचा अविभाज्य घटक असून काही गैरसमजुती पोटी आपण त्यांना आपल्यापासून दूर केले आहे. याचा परिणाम म्हणून त्यांना संघर्षांला सामोरे जावे लागत आहे. मात्र यापूढे ते आपला समाज घटक आहेत, आपले बांधव आहेत, असे समजुन आपण सर्वांनी त्यांच्यासोबत चांगला व्यवहार करावा व शासनाच्या विविध योजना त्यांच्या पर्यंत पोहोचवून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणावे, असे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी नितिन व्यवहारे यांनी केले. government schemes for transgender people
सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, जिल्हा जात पडताळणी समिती, डॉ. बाबासाहेव आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी, समतादुत प्रकल्प व जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सामाजिक न्याय व तृतीयपंथीय कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गिरीश धायगुडे, जिल्हा क्रीडा अधिकारी नंदु आवारे, जिल्हा पुरवठा अधिकारी राहुल बहादुरकर, प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, सहायक आयुक्त विनोद मोहतुरे आदी उपस्थित होते.
तृतीयपंथीयांना साडी चोळी वाटप
यावेळी शासकीय निवासी शाळा व वसतीगृहात राहून 85 ते 100 टक्के गुण प्राप्त 12 विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच संबोधन ट्रस्टचे राज काचोळे व प्रशिक मेश्राम यांना व कार्यक्रमाला उपस्थित सर्व तृतीयपंथीय लाभार्थ्यांना साडीचोळी देवून सन्मानित करण्यात आले. transgender empowerment government programs
तृतीयपंथीय कार्यशाळेत हमसफर ट्रस्टचे आशु गोयल यांनी व निलोफर मॅडम यांनी तृतीयपंथीय कसा ओळखावा, त्यांची भावनिक, मानसिक गरजा काय आहे, त्या आळखून समाजातल्या सर्वसामान्य लोकांनी त्यांच्याशी कसा व्यवहार करावा, त्यांना काय अपेक्षित आहे. याबद्दल महत्व समजावून सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन बार्टीचे प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले यांनी तर आभार समाज कल्याण निरीक्षक पुनम आसेगावकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनात समाज कल्याण निरीक्षक मनोज माकोडे, स्मिता बहिरमवार, श्वेता लक्कावार, गणेश खोटे, संदिप वाढई. सूरज डांगे, संजय बन्सोड, सजल कांबळे, राबीया अली, चेतना खाडीलकर, अमोल गोहणे, राहुल आकुलवार, उर्मिला केरझरकर, संतोष सिडाम, ठाकरे मॅडम, बार्टी चे सर्व समतादूत सर्व क्रिस्टल कर्मचारी शासकीय निवासी शाळा व वसतीगृहाचे गृहपाल व शिक्षकवृंद यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला बहुसंख्येने तृतीयपंथीय लाभार्थी वृद्ध नागरिक, शाळा, महाविद्यालय व वसतिगृहाचे विद्यार्थी उपस्थित होते.
poor quality road construction : चंद्रपूर, २७ जून २०२५: चंद्रपूर महानगरपालिकेच्या तुकूम प्रभाग क्रमांक १ मधील सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामात निकृष्ट दर्जाचा वापर झाल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टी (आप) चंद्रपूर महानगरने केला आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (PWD) तयार करण्यात आलेल्या या रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची मागणी ‘आप’ने केली आहे. action against low quality public works
आम आदमी पार्टीचे महानगर अध्यक्ष श्री. योगेश देवराव गोखरे यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना याबाबत अधिकृत निवेदन सादर केले. महाडोळे यांच्या दुकानापासून श्रद्धा नगर बोर्डपर्यंतच्या या सिमेंट रस्त्यात M30 ऐवजी केवळ M15 ग्रेडचा सिमेंट वापरल्याचा दावा ‘आप’ने केला आहे. फेसबुक लाईव्हद्वारे रस्त्याची पाहणी करताना, ‘आप’ने स्वतःच्या स्तरावर केलेल्या प्राथमिक चाचणीत ही बाब समोर आल्याचे गोखरे यांनी सांगितले.
कायदेशीर कारवाई करा
या प्रकारावर तीव्र नाराजी व्यक्त करत गोखरे यांनी PWD च्या अधिकृत टेस्टिंग टीम, संबंधित कंत्राटदार आणि आम आदमी पार्टीचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत रस्त्याची पुन्हा एकदा चाचणी करण्याची मागणी केली आहे. या चाचणीत रस्त्याचा दर्जा निकृष्ट आढळल्यास संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली. public accountability in road development
या निवेदनाची दखल घेत PWD विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी यावर त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
यावेळी निवेदन सादर करताना मयूर राईकवार (जिल्हाध्यक्ष, आप, चंद्रपूर), राजू कुडे (युवा जिल्हाध्यक्ष), संतोष बोपचे (महानगर संघटन मंत्री), विशाल भाऊ, जितेंद्र भाटिया यांच्यासह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
“जनतेच्या पैशातून तयार होणाऱ्या विकासकामांमध्ये दर्जा महत्त्वाचा आहे. रस्त्याच्या गुणवत्तेवर कोणतीही तडजोड केली जाणार नाही. गरज पडल्यास या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,” असा इशारा योगेश गोखरे यांनी दिला. या आरोपामुळे चंद्रपूर शहरातील विकासकामांच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आता या प्रकरणाची पुढील चौकशी आणि कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
financial help for accident victim : चंद्रपूर: चंद्रपूर येथील रेल्वे क्रॉसिंगजवळ काही दिवसांपूर्वी झालेल्या एका भीषण अपघातात रामकला रामचंद्र सिडाम रा. मुधोली ता. भद्रावती ही महिला गंभीर जखमी झाली. या अपघातात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, मेंदूत रक्तस्राव झाल्याने तिची प्रकृती चिंताजनक बनली आहे. ही माहिती मिळताच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तात्काळ रामकलाला मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या माध्यमातून सुयोग भोयर यांनी तिच्या मुलगा धर्माला आर्थिक मदत दिली आहे.
अपघातग्रस्त रामकला यांचा मुलगा धर्मा याची कौटुंबिक आणि आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. तो सध्या चंद्रपूर येथे BSW च्या द्वितीय वर्षाचा विद्यार्थी आहे आणि शासकीय वसतिगृह क्रमांक २ मध्ये राहून शिक्षण घेत आहे. त्याच्या कुटुंबाकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही.
संघर्ष आणि अपघात
२०१७ मध्ये धर्माचे वडील वारले असून, रामकला स्वतः मजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. एकीकडे स्वतःचे शिक्षण आणि दुसरीकडे आपल्या आईच्या उपचाराची आणि कुटुंबाची जबाबदारी, अशा दुहेरी परिस्थितीत धर्मा संघर्ष करत असतानाच हा दुर्दैवी अपघात घडला आहे.
सध्या रामकलावर दीक्षित हॉस्पिटल, चंद्रपूर येथे उपचार सुरू आहेत. तिच्या उपचारासाठी मोठ्या आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तातडीने मदत करून माणुसकीचा आदर्श घालून दिला आहे.
private companies misusing government property : चंद्रपूर, [२७ जून]: चंद्रपूर शहरातील पठाणपुरा येथील मल्लनिसारण शुद्धीकरण केंद्राच्या शासकीय जागेवर विश्वराज एन्व्हायरमेंट प्रा. लि. या खासगी कंपनीने बेकायदेशीरपणे सोलर पॅनल लावून अतिक्रमण केल्याचा आरोप संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी केला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक उईके आणि चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या अखत्यारीतील मल्लनिसारण शुद्धीकरण केंद्राच्या जागेवर विश्वराज एन्व्हायरमेंट प्रा. लि. या खासगी कंपनीने अवैधरित्या आपली खासगी मालमत्ता, म्हणजेच सोलर पॅनल, स्थापित केले आहेत. या गंभीर आरोपांसोबतच, चंद्रपूर शहर महानगरपालिका आयुक्त श्री. विपिन पालीवाल यांच्यावरही आर्थिक गैरव्यवहाराचा आणि पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. पालीवाल यांनी संबंधित कंपनीकडून आर्थिक लाभ घेऊन शासकीय जागेवर बेकायदेशीरपणे सोलर पॅनल ठेवण्यास परवानगी दिल्याचा आरोप बेले यांनी केला आहे. solar panel installation on government land
चौकशीची मागणी
संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोषी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, शासकीय जागेवरील अवैध सोलर पॅनल त्वरित हटवून ती जागा पुन्हा चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या ताब्यात घ्यावी आणि भविष्यात अशी अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी राजेश वारलुजी बेले यांनी आपल्या तक्रारीत केली आहे. सार्वजनिक हिताचे रक्षण करण्याच्या उद्देशाने ही तक्रार सादर करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
या प्रकरणी शासनाकडून त्वरित लक्ष घालून कारवाई केली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. या आरोपामुळे चंद्रपूर महानगरपालिकेतील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आयुक्त विपिन पालीवाल यांच्या भूमिकेची चौकशी होण्याची शक्यता आहे.
need for bypass road in Chandrapur : चंद्रपूर : शहराची वाढती लोकसंख्या आणि बाहेरील वाहनांची वाढती वर्दळ यामुळे चंद्रपूरमध्ये वाहतुकीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. यावर उपाय म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी चंद्रपूर शहरातील पडोली फाटा ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय या दरम्यान बायपास मार्गाच्या तातडीने बांधकामाची मागणी केली आहे.
सध्या NH ९३० आणि NH ९३०D या राष्ट्रीय महामार्ग दरम्यानची वाहतूक थेट चंद्रपूर शहरातून जाते. गडचिरोली, तेलंगणा, यवतमाळ, वर्धा आणि नागपूर यांसारख्या विविध ठिकाणांहून येणारी आणि जाणारी वाहने चंद्रपूर शहरातून सातत्याने ये-जा करत असल्याने शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या वाढत्या वाहतुकीमुळे शहरात अपघातांचे प्रमाण चिंताजनक पातळीवर वाढले आहे, ज्यामुळे नागरिकांना मोठा त्रास आणि धोका सहन करावा लागतो. NH 930 city congestion
या गंभीर समस्येवर तातडीने उपाययोजना म्हणून, खासदार धानोरकर यांनी पडोली फाटा ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय दरम्यान बायपास मार्गाचे बांधकाम करण्याची मागणी केली आहे. हा बायपास मार्ग NH ९३० ते NH ९३०D दरम्यानच्या वाहतुकीला शहराबाहेरून वळवावे.
या त्रासातून चंद्रपूरला मुक्त करा
खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना विनंती केली आहे की, या अत्यंत महत्त्वाच्या मागणीवर सकारात्मक विचार करून त्वरित कार्यवाही करावी आणि चंद्रपूरकरांना वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या त्रासातून मुक्त करावे. चंद्रपूरच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा बायपास मार्ग अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
BJP political stunt water supply : चंद्रपूर | केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असून, चंद्रपूर महापालिकेत देखील त्याच पक्षाचे महापौर होते. त्यांच्या कार्यकाळात अमृत पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ करण्यात आला. मात्र या योजनेची अंमलबजावणी ढिसाळ झाली असून, पावसाळ्याचे कारण पुढे करून भाजपचे आमदार आणि महानगराध्यक्ष आता अमृत योजनेचे काम तात्पुरते थांबवण्यासाठी निवेदन देत आहेत, यासारखे दुर्दैव नाही, अशी टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे. BJP failure in urban development
चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत २०१७ मध्ये अमृत पाणीपुरवठा योजनेचा कार्यादेश देण्यात आला होता. २०१९ पर्यंत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आज 8 वर्षे लोटून देखील अनेक भागांमध्ये पाइपलाइनचे काम अपूर्ण आहे. घराघरांत पाणी पोहोचलेले नाही. जलमापकांची व्यवस्था कोलमडली आहे. दुसरीकडे, शहरातील अनेक रस्त्यांचे खोदकाम करून ते तस्सेच सोडल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.सत्ताधारी भाजपने कंत्राटदारांशी संगनमत करून अमृत योजनेचे काम उशिरा, हलगर्जीपणे आणि बेफिकिरीने केले. काम अपूर्ण असूनही योजनेची तारीफ केली जात आहे. मात्र, त्यांना जनतेच्या तहानेची जाणीव नाही,” असा हल्लाबोल रितेश तिवारी यांनी केला. AMRUT scheme implementation issues
आमदार अपक्ष असताना फक्त घोषणा आणि आता
चंद्रपूरचे आमदार अपक्ष असताना मोठमोठ्या घोषणा करीत होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता तेच काम लांबणीवर टाकण्यात रस दाखवत आहेत. भाजप मनपा प्रशासकांच्या माध्यमातून स्वतःची कामे करून घेत असून, नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार, भाजपच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांना निवेदन देऊन पावसाळ्यापूर्वी सुरू असलेले काम तात्पुरते थांबवण्याची मागणी केली आहे. भाजपने यासाठी रस्त्यांची खराब अवस्था आणि पावसामुळे होणाऱ्या अडचणीचे कारण दिले आहे. हे निव्वळ राजकीय स्टंट असून अपयश झाकण्यासाठी भाजप हे नाट्य रचत आहे. ज्यांच्या सत्ताकाळात ही योजना सुरू झाली आणि कामे रखडली, त्याच भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आता काम थांबवावे लागते, यासारखे दुर्दैव नाही.
प्रसिद्धीसाठी निवेदन
चंद्रपूर शहरात अमृत योजनेमुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. जलवाहिनी आणि मलनिस्सारणाच्या कामांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. तरीही भाजपचे नेते केवळ निवेदन देत आहेत, हे केवळ प्रसिद्धीसाठी नौटंकी करीत असल्याचा आरोप रितेश तिवारी यांनी केला आहे. यापुढे नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार झाला तर काँग्रेस आंदोलन करण्यास मागेपुढे बघणार नाही, असा इशाराही रितेश तिवारी यांनी दिला आहे.
free coaching for competitive exams : चंद्रपूर – मूल हुशार असते, त्यांच्या त्यांच्यात जिद्दी असते, ते अधिकारी होण्याचं स्वप्न डोळ्यांत घेऊन जगत असतात. मात्र परिस्थिती, गरिबी, योग्य मार्गदर्शनाचा अभाव आणि आवश्यक साधनांची कमतरता यामुळे त्या स्वप्नांचा भंग होतो. मात्र आता अम्मा कि पढ़ाई केंद्र अशा विद्यार्थ्यांच्या पंखांना स्वप्नांची उडाण देणार आहे. आईच्या नावाने सुरु करण्यात आलेला हा उपक्रम कित्येक आईंची स्वप्नं पूर्ण करणारा ठरणार आहे. उद्याचे अधिकारी अम्मा कि पढ़ाई केंद्रातून घडतील, असे दर्जेदार शिक्षण देण्याचा आमचा संकल्प असून, हा उपक्रम उद्याचे अधिकारी घडविणारे एक सक्षम केंद्र ठरेल, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Amma Ki Padhai initiative by MLA Kishor Jorgewar
आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला अम्मा कि पढ़ाई हा उपक्रम गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी एक आशेचा किरण आहे. या उपक्रमांतर्गत आर्थिक अडचणीमुळे स्पर्धा परीक्षेपासून दूर राहणाऱ्या विद्यार्थ्यांना निशुल्क, दर्जेदार व मार्गदर्शक शिक्षण देण्यात येणार आहे. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.या प्रसंगी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, जिल्हाधिकारी विनय गौडा, चिमूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार किर्तीकुमार भांगडिया,
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंग, महसूल विभागाचे संजय पवार, महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, प्रा. राजेश दहेगावकर, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, दशरथसिंह ठाकूर, नामदेव डाहुले, संजय बेले, अजय जयस्वाल, कुणाल घोटेकर, राजू वेलंकीवार, आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. scholarship and coaching for underprivileged students
माझ्या आयुष्यातील महत्वाचा क्षण
या वेळी बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, आज इथे ‘अम्मा कि पढ़ाई’ या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी उभं राहणं हे केवळ एका कार्यक्रमाचं उद्घाटन नाही, तर माझ्या आयुष्यातील खोल भावना व्यक्त करण्याचा क्षण आहे. आपल्या समाजातील गरीब, होतकरू, जिद्दी, मेहनती विद्यार्थ्यांचं स्वप्न अपूर्ण राहू नये, याच हेतूने हा उपक्रम सुरू केला आहे. हा उपक्रम मी माझ्या स्वतःच्या आईच्या नावाने आणि तिच्या प्रेरणेतून सुरू केला आहे.
आमच्या घरीसुद्धा परिस्थिती कठीण होती. अशीच स्थिती हजारो घरांमध्ये आहे. त्या सर्व अम्मांसाठी आणि त्यांच्या लेकरांसाठी अम्मा कि पढ़ाई आहे. यामध्ये ३ हजार विद्यार्थ्यांपैकी चाचणी परीक्षा घेऊन २८४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी आवश्यकतेनुसार मोफत प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यामध्ये मार्गदर्शन, चाचणी परीक्षा, नोट्स, आत्मविश्वास आणि शिस्तबद्ध अभ्यास यांचा समावेश आहे. Amma Ki Padhai free classes for UPSC and MPSC
हा केवळ उपक्रम नाही, तर घराघरात शिक्षणासाठी झगडणाऱ्या आईंच्या त्यागाला दिलेली एक सलामी आहे. या उपक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र दीक्षाभूमी इथे असलेल्या महाविद्यालयात होत आहे, हे आमच्यासाठी गौरवाचं आणि अभिमानाचं आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षण आणि समतेच्या संदेशावर चालणारा हा उपक्रम त्यांच्या विचारांनाच वाहिलेली आदरांजली आहे, असेही आमदार जोरगेवार म्हणाले. या वेळी बोलताना राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर म्हणाले की, आमदार किशोर जोरगेवार यांना त्यांच्या आईविषयी अपार श्रद्धा आहे. free coaching for competitive exams
त्यांनी यापूर्वीदेखील अनेक उपक्रम आईच्या नावाने सुरू केले असून अम्मा कि पढ़ाई उपक्रम हे त्याचं एक प्रेरणादायी उदाहरण आहे.जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले की, हा उपक्रम गरजू विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे समाजात परिवर्तन घडेल. आमदार किर्तीकुमार भांगडिया म्हणाले की, किशोर जोरगेवार यांनी आधी मतदारसंघात अभ्यासिका सुरू केल्या आणि आता अम्मा कि पढ़ाई सुरू करून अभ्यासिका ते अधिकारी बनण्याचा प्रवास शक्य केला आहे.या कार्यक्रमात इंडियन एअर फोर्समध्ये निवड झालेल्या प्रणल जनबंधू यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच अम्मा कि पढ़ाई केंद्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची उत्स्फूर्त आणि मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
government exhibition on emergency era : चंद्रपूर, दि. 25 : तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. या घटनेला आज 50 वर्षे पूर्ण होत आहे. त्याचे आौचित्य साधून केंद्र आणि राज्य सरकारच्या सुचनेनुसार आणीबाणी विरोधातील संघर्ष लढ्याचे नागरिकांना अवलोकन व्हावे, या उद्देशाने जिल्हा प्रशासन आणि जिल्हा माहिती कार्यालय, चंद्रपूरच्या वतीने चार दिवसांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
सदर प्रदर्शन प्रशासकीय इमारतीमध्ये दि. 25 ते 28 जूनपर्यंत कार्यालयीन वेळेत नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर आदी उपस्थित होते.
प्रदर्शनामध्ये समाविष्ट बाबी
पुरातन काळापासून भारतात सुरू असलेली लोकशाही व्यवस्था, लोकशाही परंपरेनुसार यात असलेला लोकांचा सहभाग व दृष्टीकोण, लोकशाहीचे तत्व, भारतीय परंपरा आणि सामुहिक भागीदारीने चालविण्यात आलेले शासन, ग्रामीण आणि शहरी भागातील जमीन स्तरावरील लोकशाही व्यवस्था, स्वतंत्र भारत आणि लोकशाही प्रणाली, आणीबाणीपूर्व व पश्चात भारतीय समाजव्यवस्था, आणीबाणी लावल्यानंतर प्रसिध्द झालेले राजपत्र, प्रसारमाध्यमांवरील निर्बंध, सरकारच्या विरोधात जनआंदोलन, आणीबाणी संपल्यानंतर लोकशाही मुल्यांच्या रक्षणासाठी उचलण्यात आलेली पाऊले, चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांचा आणीबाणी विरोधातील संघर्ष लढा, आदींचा यात समावेश करण्यात आला आहे.
आणीबाणीधारकांना प्रमाणपत्राचे वाटप
आणीबाणीत तुरंगवास भोगलेल्या नागरिकांना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. यात हेमंत वासुदेव डहाके, गिरीश वासुदेवराव अणे, अनिल मधुकर अंदनकर, सुधीर वसंतराव टिकेकर, नारायण कृष्णराव पिंपळापुरे, कृष्णा दत्तात्रय देशपांडे यांचा समावेश होता. certificates to emergency prisoners in Maharashtra
Chandrapur District Police Force : चंद्रपूर – चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा अंतर्गत बदल्यांमध्ये पारदर्शकता राखत जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी उल्लेखनीय निर्णय घेतले आहेत. बदल्यांची ही प्रक्रिया केवळ प्रशासकीय गरज म्हणून न करता, कार्यक्षमता आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तेच्या आधारावर पार पाडली गेली आहे.
याच पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक निशा भूते यांची लाठी पोलीस ठाण्याच्या ठाणेदारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लाठी हे संवेदनशील व आंतरराज्य सीमेला लागून असलेले क्षेत्र असल्याने या भागात अनुभवी व जबाबदार अधिकारी म्हणून भूते यांच्यावर विश्वास टाकण्यात आला आहे. SP initiatives for female police officers
निशा भुते यांच्याकडे नवी जबाबदारी
एपीआय निशा भूते या मागील वर्षभर राजुरा पोलीस ठाणे येथे कार्यरत होत्या. आपल्या कार्यशैलीमुळे आणि शिस्तप्रियतेमुळे त्यांनी स्थानिक नागरिकांमध्ये विश्वासार्हतेचं वातावरण निर्माण केलं होतं. त्यामुळेच त्यांच्या नव्या नियुक्तीचे सर्वत्र स्वागत होत आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी बदल्यांदरम्यान महिला अधिकाऱ्यांना सक्षम संधी देण्यावर विशेष भर दिला.या बदल्यांमुळे महिला पोलीस अधिकाऱ्यांमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण झाला असून, पोलीस दलात न्याय आणि समानतेची भावना अधिक बळकट होत असल्याचे मत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे.लाठी सारख्या संवेदनशील भागात महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती होणं हे पोलीस प्रशासनाच्या बदलत्या आणि सकारात्मक दृष्टिकोनाचे प्रतीक मानले जात आहे.