AAP exposes corruption । 💣 M-20 म्हणलं, M-13 निघालं! आम आदमी पक्षाने उघड केली रस्ते घोटाळ्याची पोलखोल!

AAP exposes corruption

AAP exposes corruption : चंद्रपूर – शहरात सध्या निवडणुकीपूर्वी मोठ्या प्रमाणात विकासकामांचा धडाका सुरु आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून तब्बल दीड कोटी रुपयांचा खर्च करत विविध प्रभागांत सीसी रस्त्यांची कामे सुरू झाली आहेत. मात्र, या कामांच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आम आदमी पक्षाने महापालिकेवर आणि ठेकेदारांवर गंभीर गैरव्यवहार, निकृष्ट दर्जा व भ्रष्टाचार केल्याचा थेट आरोप केला आहे. Chandrapur Road Work Scam

चंद्रपुरात या कारणामुळे झाला वाघिणीचा मृत्यू

🕵️‍♂️ आम आदमी पक्षाची थेट पाहणी – M-20 ऐवजी M-13 गुणवत्ता

जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह वडगाव प्रभागातील रस्त्यांचे प्रत्यक्ष निरीक्षण केले. यावेळी रस्त्यांची स्ट्रेंथ तपासली असता, महापालिकेने M-20 दर्जा असल्याचा दावा केला होता, परंतु प्रत्यक्ष मापनात केवळ M-13 स्तराचीच नोंद झाली.

हेच चित्र तुकुम प्रभागातही पाहायला मिळाले. फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून नागरिकांसमोर हे सारे सत्य मांडण्यात आले.

💬 “आमदारांच्या छत्रछायेखाली ठेकेदारांना संरक्षण”

आम आदमी पक्षाच्या मते, हे सर्व काम एका विशिष्ट ठेकेदारामार्फत केले जात आहे, जो स्थानिक आमदारांचा निकटवर्तीय आहे. त्यामुळे कामाची गुणवत्ता तपासली जात नाही, अधिकारी मौन बाळगतात आणि ठेकेदाराला पूर्ण मोकळीक मिळते.

📉 “रस्ते पूर्ण झाले” दाखवून निधी वसूल; करदात्यांची फसवणूक

हे संपूर्ण प्रकरण निवडणुकीपूर्वी निधीच्या लुटीचा ठोस नमुना असल्याचे आम आदमी पक्षाचे म्हणणे आहे. रस्त्यांचा दर्जा अत्यंत खराब असूनही कामे पूर्ण झाल्याचे दाखवले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या कररूपी पैशांची सरळसरळ फसवणूक होत आहे, असा ठपका त्यांनी ठेवला.

💡 मागील प्रकरणांतही महापालिकेवर भ्रष्टाचाराचे आरोप

यापूर्वीही चंद्रपूर महापालिकेवर:

  • बनावट फाउंटन खर्च,
  • अपूर्ण ड्रेनेज लाईनसाठी पेमेंट,
  • अमृत कलश योजनेंतर्गत अनियमित पाणीपुरवठा,

या प्रकरणांत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले होते.

📹 फेसबुक लाईव्हद्वारे जनजागृती

आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वडगाव व तुकुम प्रभागातील कामांचे फेसबुक लाईव्हद्वारे थेट प्रसारण केले. लवकरच शहरातील इतर प्रभागांतील रस्त्यांचीही पाहणी करून सच्चाई जनतेसमोर मांडण्यात येईल, अशी माहिती आप ने दिली.

यावेळी आपचे मयूर राईकवार – जिल्हाध्यक्ष, योगेश गोखरे – शहराध्यक्ष, राजकुमार नगराडे – जिल्हा सचिव, संतोष बोपचे – संघटन मंत्री, विशाल विरंमवार, क्रिश कपूर, आदित्य नंदनवार, अ‍ॅड. तबस्सुम शेख व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *