Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • modern badminton court Chandrapur । अत्याधुनिक बॅडमिंटन हॉलमुळे जिल्ह्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक प्राप्त करतील – आमदार मुनगंटीवार

    modern badminton court Chandrapur

    modern badminton court Chandrapur : चंद्रपूर १० सप्टेंबर २०२५ – चंद्रपूरमध्ये उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक बॅडमिंटन हॉलमुळे जिल्ह्यामध्ये दर्जेदार खेळाडू निर्माण होतील. मुंबई-पुण्यातील खेळाडूंप्रमाणेच भविष्यात चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडू देखील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये नावलौकीक प्राप्त करतील व चंद्रपूरचा मान वाढवतील, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    कसा आहे नवीन आयफोन १७? जाणून घ्या सोप्या भाषेत

    चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुल येथे, चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशन तर्फे डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार मेमोरियल महाराष्ट्र मिनी स्टेट सिलेक्शन बॅडमिंटन स्पर्धा-2025 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे सचिव सिद्धार्थ पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड,चंद्रपूर जिल्हा बॅडमिंटन डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश चांडक, अनिरुद्ध जोशी,सचिव जुवेलजी चांदेकर, तालुका क्रीडा अधिकारी नंदू आवारी, जवाहर पंजाबी, आदित्य गलांडे, विक्रांत पटवर्धन, जयश्री देवकर, रंजना सेवतकर, खेळाडू व पालकांची उपस्थिती होती.

    badminton sports

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीदेखील श्री. गिरीश चांडक यांनी बॅडमिंटन स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले. मागील वर्षी बॅडमिंटन हॉलच्या सोलार सुविधेसाठी 95 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. पुढील स्पर्धेपूर्वी हॉलसाठी जनसेट (जनरेटर) बसविण्यात येईल. जिल्ह्यातील खेळाडूंना सोयीसुविधांची उणीव भासू नये यादृष्टीनेच मोठ्या शहरांच्या ताकदीचा अत्याधुनिक बॅडमिंटन हॉल चंद्रपूरमध्ये उभारला गेला आहे. भविष्याचा वेध घेत देशगौरव,पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी 2036 च्या ऑलिंपिकमध्ये अमेरिका, रशिया आणि चीनच्या बरोबरीने भारतही पदक जिंकणारा देश असेल असा विश्वास व्यक्त केला आहे. या विश्वासाला सार्थ ठरविण्यात चंद्रपूर जिल्हा मागे राहणार नाही, हा संकल्प करण्यात आला आहे.’ Chandrapur sports infrastructure future champions

    चंद्रपूरमध्ये प्रगत क्रीडा सुविधा:

    चंद्रपूर क्रीडा संकुलात अत्याधुनिक वातानुकूलित बॅडमिंटन हॉल उभारण्यात आला आहे. बल्लारपूर स्टेडियम मध्येही लवकरच वातानुकूलित हॉल तयार होणार आहे. तसेच म्हाडाच्या 16 एकर जागेवर तब्बल 137 कोटी रुपये खर्चून क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांच्या नावाने 10 कोर्ट असलेला भव्य वातानुकूलित बॅडमिंटन हॉल तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनने चंद्रपूरमध्ये वेस्टर्न झोन स्पर्धा आयोजित करण्यास तयारी दर्शविली आहे, ही चंद्रपूरसाठी गौरवाची बाब ठरेल. क्रीडा क्षेत्रात जगाच्या बरोबरीने पुढे राहण्यासाठी ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे. कारण मैदानावर उतरणाऱ्यांचे मन, बुद्धी आणि शरीर सदैव निरोगी राहते आणि त्यातूनच समाजाला उत्तम आरोग्याचा लाभ होतो. modern badminton court Chandrapur

    चंद्रपूरमध्ये उत्तमोत्तम क्रीडा सुविधा तयार करण्यात आल्या याचा अभिमान आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच अंडर-19 स्पर्धेचे आयोजन मोठ्या शहराऐवजी बल्लारपूर तालुका स्टेडियमवर करण्यात आले. या स्पर्धेत देशातील 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेशांतील खेळाडूंनी सहभाग नोंदविला. स्पर्धेनंतर खेळाडूंनी मिळालेल्या उत्तम सुविधांचे कौतुक करत अभिमानाची भावना व्यक्त केली. याशिवाय विद्यापीठाची इंटर-युनिव्हर्सिटी स्पर्धाही यशस्वीपणे पार पडली. खेळाडूंना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी 57 कोटीं रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. म्हाडा येथे आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाबुराव शेडमाके यांच्या नावाने 137 कोटींचे भव्य स्टेडियम उभारले जात आहे.आर्चरीसाठी साडेआठ कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे.


    वन अकादमी येथे 15 कोटी रुपये खर्ची करून स्टेडियम याशिवाय पोलीस फुटबॉल ग्राउंडवरही 15 कोटींचे स्टेडियम उभारण्यात येत आहे, असे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले. air-conditioned badminton facility inaugural event

    जिल्ह्याच्या क्रीडा सुविधांवर अभिमान

    केंद्रीय मंत्री ना. रक्षा खडसे यांना सैनिकी शाळेतील स्पोर्ट्स अॅक्टिव्हिटी सेंटर दाखविण्यात आले. यावेळी त्या म्हणाल्या, पूर्वी जेव्हा एखाद्या राज्यातील सुविधा पाहायची, तेव्हा महाराष्ट्र मागे असल्याची भावना यायची. मात्र, आता अभिमानाने सांगू शकते की 28 राज्यांच्या बैठकीत बसताना माझ्या मनात ‘हम भी कुछ कम नाही’ असा आत्मविश्वास असेल.’ त्यांचे हे वक्तव्य प्रेरणा देणारे होते. असेही आमदार श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आवर्जून सांगितले. जिल्ह्यातील खेळाडूंनी बॅडमिंटनमध्ये देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपले वर्चस्व प्रस्थापित करावे. दिल्लीचे तख्त राखायचे असेल तर जिल्हा कोणत्याही क्षेत्रात मागे राहता कामा नये, असे आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले.


  • Shree Ganesha Arogyacha health camp । श्रीगणेशा आरोग्याचा शिबिरात 896 नागरिकांची मोफत तपासणी

    Shree Ganesha Arogyacha health camp

    Shree Ganesha Arogyacha health camp : चंद्रपूर 10 सप्टेंबर – गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राबविण्यात आलेल्या ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत 896 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागातर्फे करण्यात आली.  

    राजुरा बोगस मतदार नोंदणी प्रकरण, न्यायालयात दाद मागणार – माजी आमदार सुभाष धोटे

    896 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी

       28 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात आलेल्या या विशेष मोहिमेत मनपाच्या 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे 7 आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरांतून 307 पुरुष व 470 महिला तसेच 119 लहान बालके अश्या 896 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान कुठल्याही नागरिकाला आजार आढळला नाही.

       या शिबिरांत न्यू बाल गणेश मंडळ,हनुमान नगर गणेश मंडळ,याहू गणेश मंडळ,बाल बलवंत गणेश मंडळ,आदर्श विद्यार्थी गणेश मंडळ,एकता गणेश मंडळ,नूतन युवक गणेश मंडळ ही गणेश मंडळे सहभागी झाली होती. शिबिरांच्या यशस्वीतेसाठी  वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार,डॉ. अश्विनी भारत,डॉ.आरवा लाहिरी,डॉ.योगेश्वरी गाडगे,डॉ.शरयु गावंडे,डॉ.नेहा वैद्य,डॉ. जयश्री मालुसरे, डॉ अल्फीया खान यांचा सहभाग लाभला.

  • Nazul land ownership rights scheme । आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपुराव्याला यश, नझूल जमिनीवरील घरपट्टे मिळणार कायमस्वरूपी

    Nazul land ownership rights scheme

    Nazul land ownership rights scheme : चंद्रपूर ८ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर आणि घुग्घुस येथील नझूल धारकांना कायमस्वरूपी घरपट्टे देण्याची प्रक्रिया गतिमान होणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण मागणीला प्रतिसाद देत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच मंत्रालयात बैठक घेऊन या प्रक्रियेला गती देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात आमदार किशोर जोरगेवार यांनी आढावा बैठक घेत महत्वाच्या सूचना केल्या आहेत.

    राज्यातील ७५ हजार युवक -युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी

    या बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौडा, उपविभागीय अधिकारी संजय पवार, मनपा उपायुक्त संदीप चिद्रावार, तहसीलदार विजय पवार, घुग्घुस नगरपरिषद कार्यकारी अधिकारी रांजनकर, नगररचना विभागाचे प्रतीक जिवतोडे, राहुल भोयर यांच्यासह भाजप महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्षा छबू वैरागडे, भाजप नेते प्रकाश देवतळे, घुग्घुस शहराध्यक्ष संजय तिवारी, महामंत्री रवि गुरनुळे, श्याम कणकम, सविता दंढारे, मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, स्वप्निल डुकरे, विनोद खेवले, माजी नगरसेवक देवानंद वाढई, माजी नगरसेविका पुष्पा उराडे, शीतल गुरनुळे, कल्पना बबुलकर, राशिद हुसेन, विठ्ठल डुकरे, अरुण तिखे, प्रज्ञा बोरगमवार, हेमंत उरकुडे, संतोष नुने, राजकुमार गोडसेलवार, साजन गोहने, मुन्ना लोडे आदींची उपस्थिती होती. Nazul land lease allotment

    सर्वेक्षणाची प्रक्रिया त्वरित पूर्ण करा

    आ. किशोर जोरगेवार यांनी बैठकीत म्हटले की,  सर्वेक्षणाची प्रक्रिया आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्वरित पूर्ण करावी. ठरविण्यात येणाऱ्या नवीन नियुक्त एजन्सींनी ठरविलेल्या वेळेत काम पूर्ण करणे आवश्यक असून प्रशासनाने या कामावर सातत्याने देखरेख ठेवावी. प्रत्येक पात्र लाभार्थ्याला न्याय मिळावा यासाठी सर्वेक्षणाची प्रक्रिया पारदर्शक ठेवावी. नझूल जमिनीवरील घरांमध्ये वास्तव्यास असलेल्या मूळ रहिवाशांची हक्काची नोंद होणे आवश्यक आहे.

    कोणताही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी प्रशासनाने काटेकोर नियोजन करावे. सर्वेक्षण व पट्टावाटपाची प्रक्रिया वेळेत पूर्ण होऊन प्रत्येक कुटुंबाला दिलासा मिळावा, हे आपले ध्येय असावे. पारदर्शकता व विश्वास निर्माण होण्यासाठी स्थानिक जनतेला प्रक्रियेची माहिती सतत देत राहावी, अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत. Nazul land survey and housing rights distribution

    चंद्रपूर शहरातील एकूण ३९ झोपडपट्ट्या नझूल जमिनीवर असल्याची नोंद मनपाकडे आहे. त्यापैकी दोन झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून उर्वरित झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण लवकरच सुरू होणार आहे. यासाठी नवीन एजन्सी नियुक्त करण्याचा कंत्राट महानगरपालिकेतर्फे प्रसिद्ध करण्यात आले आहे. तर ५२३ नागरिकांनी पट्ट्यासाठी प्रस्ताव सादर केल्याची माहिती यावेळी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. सदर नागरिकांना लवकर पट्टे वाटप करण्याच्या सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्या आहेत.

  • Chandrapur property tax online payment । 💰 चंद्रपूरकरांसाठी सुवर्णसंधी! मालमत्ता कर ऑनलाईन भरा आणि मिळवा थेट 10% सूट

    Chandrapur property tax online payment

    Chandrapur property tax online payment : ८ सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 2025-26 चालु आर्थिक वर्षातील मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा करणाऱ्यांना सवलत दिली जात असुन 30 सप्टेंबर पूर्वी कराचा भरणा केल्यास 8 टक्के सूट देण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने कर भरल्यास अतिरिक्त 2 टक्के म्हणजेच 10 टक्के सूट मनपामार्फत देण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने कर भरणा करण्याकडे नागरिकांचा कल वाढला असुन मागील आर्थिक वर्षात 8914 तर यावर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत 5036 असे एकूण 13950 नागरिकांनी मालमत्ता कराचा भरणा करण्यास ऑनलाईन प्रणालीचा वापर केला आहे.  

    पतीसमोर वाघाने पत्नीला नेले फरफटत, चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

    मागील वर्षी म्हणजे सन 2024-25 या आर्थिक वर्षात 8914 मालमत्ता धारकांनी एकूण रु.7 कोटी 49 लक्ष 14 हजार 302 इतक्या रक्कमेचा ऑनलाईन भरणा केला होता तर सन 2025-26 या चालू आर्थिक वर्षात आत्तापर्यंत 5036 मालमत्ता धारकांनी एकूण रु.2 कोटी 97 लक्ष 51 हजार 350 इतक्या रक्कमेचा ऑनलाईन भरणा केला आहे.

    घरबसल्या कर भरण्याची संधी

    शहरातील मालमत्ताधारकांना करांचा भरणा सुलभरीत्या करता यावा म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ऑनलाइन युपीआय ॲप अर्थात फोन पे, गुगल पे,भीम ॲप ( भारत इंटरफेस फॉर मनी ) या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.आता मालमत्ता कर भरणे आता अधिक सोपे झाले असुन, नागरीक chandrapurmc.org या लिंकसोबतच युपीआय ॲपचा वापर करून मोबाईलद्वारे सुद्धा कर भरू शकतात. Chandrapur Municipal Corporation property tax

    शहरात 80 हजारांपेक्षा अधिक मालमत्ता आहेत. या मालमत्तांच्या कराची रक्कम रोखीने अथवा धनादेशाद्वारे अदा करण्याची पद्धत आहे. यात महापालिका कर्मचारी घरोघरी जाऊन वसुली करीत असतात किंवा संबंधित मालमत्ताधारक पालिकेच्या प्रभाग कार्यालयांमध्ये जाऊन रकमेचा भरणा करीत असतात. मात्र अनेकदा वेळेच्या अभावामुळे अथवा कार्यालयातील गर्दीमुळे प्रत्यक्ष रोखीने अथवा धनादेशाद्वारे कर भरण्यास अडचण निर्माण होते. अशा वेळी नागरिकांना करभरणा करताना सोयीचे व्हावे म्हणून युपीआय ॲपशी कर प्रणाली लिंक करण्याचे निर्देश आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी दिले होते. how to pay property tax online

    मालमत्ता करावरील ही सूट 30 सप्टेंबर 2025 पर्यंतच देण्यात येत असल्याने अधिकाधिक नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा करून या अतिरिक्त सूटचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.  

  • bogus workers wage fraud । CTPS मध्ये Bogus Workers Wage Fraud प्रकरण – मनसेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

    bogus workers wage fraud

    bogus workers wage fraud : चंद्रपूर ५ सप्टेंबर २०२५- सीटीपीएस च्या एस. व्ही. इंटरप्राईजेस या कंत्राटी कंपनीमध्ये बोगस कामगार दाखवून व हजेरी बुकावर बोगस सह्या मारून 15 कामगारांचे वेतन हडपले असल्याची गंभीर बाब समोर आली असून सीटीपीएस ला करोडोंचा चुना लावल्या जातं असल्याने याची सखोल चौकशी करण्याची मागणी मनसे कामगार सेना ने पत्रपरीषदेत केली आहे. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी प्रशासनाला दिला आहे.

    भाजपचा विजय, मात्र अध्यक्षांवर गुन्हा दाखल

    सीटीपीएस मध्ये एस.व्ही.इंटरप्राईजेस ही कंपनी 2 ते 3 वर्षांपासून युनिट क्रमांक 2 व 3 मध्ये बेल्ट कन्वर्शन, प्लॅटफॉर्म जाळ्या लावणे, शेडडाऊन, डांपिंग प्लेट रिप्लेसमेंट इत्यादी कामे करत आहे. दरम्यान या कंपनी मध्ये काम करणायां कामगारांची नावे हजेरी बुकावर नोंदविण्यात आली. त्यामध्ये मोठा घोळ असून मिळालेल्या दास्तावेज नुसार या कंपनी मध्ये एकूण 15 कामगार कर्मचारी काम करतात असे नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात या कंपनी मध्ये केवळ 5 कामगारचं काम करत असल्याची माहीती अंधेवार यांनी दिली. CTPS contractor SV Enterprises

    कंत्राटदार यांचेसह संबंधित सीएसटीपीएस अधिकायांवर कारवाई करावी

    कंपनीत प्रणतोष हरिपद इजारदार, नितेश दामोधर दानव, रमेश आंनदराव भोंगरे, रामेश्वर सदाशिव खोब्रागडे, राजकुमार जुनघरे इत्यादी आहेत. मात्र सीटीपीएस प्रशासनाकडे पाठविण्यात आलेल्या यादीत इतर 10 लोकं कोण आहेत, त्यांची नोंद ह्या रेकॉर्डवर का घेण्यात आले याची सखोल चौकशी करून त्या पाच कामगारांना कामावरून कमी केले त्यांना कामावर घ्यावे व कंत्राटदार यांचेसह संबंधित सीएसटीपीएस अधिकायांवर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी मुख्य अभियंता राजेंद्र राठोड यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. bogus attendance scam

    पुढे सांगीतले की, एस. व्ही. इंटरप्राईजेस या कंत्राटी कंपनीमध्ये बोगस कामगार दाखवून व हजेरी बुकावर बोगस सह्या मारून 15 कामगारांचे वेतन घेण्यात येत आहे ही अतिशय गंभीर बाब असून अशा किती कंत्राटी कंपन्या आहेत. ज्या कंत्राटी कंपनी मध्ये असे बोगस कामगारांना दाखवून कंपनीला कोट्यावधी रुपयांचा चुना लावल्या जातं आहे याची सखोल चौकशी करावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची मागणी असून सीएसटीपीएस कंपनीच्या संबंधित अधिकायांशिवाय हा घोळ होऊ शकत नाही त्यामुळे कमिशनखोरी करणाया अधिका_यांवर पण कारवाई करावी आणि कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेतून मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी प्रशासनाला दिला आहे.

    पत्रपरीषदेत मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष रमेश काळाबाधे, सुनील गुढे, पियुष धुपे उपस्थित होते.

  • Mega blood donation camp in Chandrapur । चंद्रपूरात भव्य रक्तदान शिबिर, यूथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्रचे आयोजन

    Mega blood donation camp in Chandrapur

    Mega blood donation camp in Chandrapur : चंद्रपूर, ३ सप्टेंबर २०२५ – यूथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र, चंद्रपूर युनिट तर्फे दरवर्षी प्रमाणे १२ रबी–उल–अव्वल या पवित्र दिनानिमित्त मेगा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबिर ५ सप्टेंबर २०२५, शुक्रवार रोजी सकाळी ९.०० ते दुपारी ३.०० वाजेपर्यंत जटपुरा गेट, चंद्रपूर येथे होणार आहे.

    भद्रावती कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपचा झेंडा

    या कार्यक्रमाचे औचित्य मानवतेचे मार्गदर्शक, अल्लाहचे शेवटचे संदेष्टा प्रेषित मोहम्मद सल्लम. ﷺ यांचा जयंती महोत्सव (ईद मिलादुन्नबी) यानिमित्त साधण्यात आले आहे. दिव्य कुरआनमध्ये मानवजातीला उद्देशुन स्पष्ट संदेश आहे की – “जो एक जीव वाचवतो, तो संपूर्ण मानवता वाचवतो. तसेच प्रेषित्यांच्या शिकवणीतून येते की “तुमच्यातील सर्वोत्तम तो आहे, जो लोकांच्या कामी येतो. लोकांची सेवा केल्याने अल्लाहची उपस्थिती लाभते.”

    मागील 17 वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन

    याच शिकवणींमधून प्रेरणा घेत, यूथ मूव्हमेंट ऑफ महाराष्ट्र मागील 17 वर्षांपासून रक्तदान शिबिराचे आयोजन महाराष्ट्रभर करीत आहे. रक्तदान ही केवळ सेवा नव्हे तर मानवी जीवन वाचवण्याचा आणि समाजात बंधुभाव वाढवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. Eid Milad un Nabi blood donation drive

    तज्ज्ञांच्या मते, महाराष्ट्र राज्यात दररोज सुमारे ८,००० ते १०,००० युनिट रक्ताची गरज भासते. अपघातग्रस्त, थॅलेसिमिया, कॅन्सर तसेच इतर गंभीर आजारांच्या रुग्णांसाठी हा साठा अत्यावश्यक असतो. त्यामुळे रक्तदान शिबिरांमुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात.

    या शिबिरात शहरातील युवक, विविध संघटनांचे कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. आयोजकांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की त्यांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे व मानवतेचा हा संदेश सर्वदूर पोहोचवावा.

  • Financial problems of retired teachers staff । सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अर्थिक समस्यांची आमदार सुधाकर अडबाले यांनी घेतली दखल

    Financial problems of retired teachers staff

    Financial problems of retired teachers staff : चंद्रपूर : दि. २ सप्टेंबर २०२५ ला आमदार सुधाकर अडबाले यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद मध्ये मा. सा. कन्नमवार सभागृहात महाराष्ट्र राज्य सेवानिवृत शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व अधिकारी संघटना यांची समस्या निवारण सभा घेण्यात आली.

    सदर सभेला मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी गायकवाड,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी सावंत मॅडम, प्राथमिक शिक्षणाधिकारी अश्विनी केळकर, उपशिक्षणाधिकारी विशाल देशमुख व अर्चना मासिरकर व 15 पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. सदर सभेमध्ये संघटनेने दिलेल्या 23 मागण्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. सदर मागण्यांमध्ये एकस्तर थकबाकी १४८३ शिक्षकांच्या खात्यावर सोमवारपर्यंत जमा करण्यात येईल. उर्वरित साठी जिल्हा परिषदकडे निधी शिल्लक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

    चंद्रपूर मनपातर्फे पूरग्रस्त नागरिकांसाठी आपत्कालीन क्रमांक जाहीर

    सन २०१६ पासून प्रलंबित असलेले गट विमा सर्व प्रकरणे शिबिर घेऊन ३० सप्टेंबरपर्यंत काढण्यात येतील. सहाव्या व सातव्या वेतन आयोगाचे थकीत असलेल्या हप्त्यासाठी गटशिक्षणाधिकारी यांनी आठ दिवसात मागणी करावी त्यानुसार वरिष्ठाकडे मागणी करून निधी उपलब्ध झाल्यानंतर हप्ते देण्यात येतील. सेवानिवृतांचे समस्यांसाठी दर महिन्याला पेन्शन अदालतची मागणी संघटनेकडून करण्यात आली. त्यानुसार दर दोन महिन्याला सभा घेण्यात येईल. पुढील सभा ४ नोव्हेंबर घेण्याचे निश्चित झाले. उपदानातून वसूल करण्यात आलेली एकस्तरची रक्कम संबंधितांना त्वरित देण्याचे मान्य करण्यात आले. संगणक वसुलीचे mscit संघटनेने सादर केलेले २४ शिक्षकांचे प्रस्ताव शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे पाठविण्यात आले. त्याकरिता आमदार अडबाले स्वतः प्रयत्न करणार आहेत. pension and gratuity resolution Chandrapur retired staff

    सेवानिवृत झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे मेडिकल बिल तात्काळ मंजूर करण्यात येणार

    सेवानिवृत्त विस्तार अधिकारी बाबुराव मडावी व तुकाराम कुचणकर इतर सर्वांचे रजा रोखीकरण की रक्कम निधी उपलब्ध झाल्याबरोबर त्यांचे खात्यात जमा करण्यात येईल. सेवानिवृत झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे मेडिकल बिल तात्काळ मंजूर करण्यात येईल. माध्यमिकमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांची वरिष्ठ श्रेणी तात्काळ मंजूर करण्यात यावी तसेच प्राथमिक शिक्षकांची वरिष्ठ श्रेणी मंजूर करावी. ३० ऑक्टोबर पर्यंत सदर दोन्ही प्रकारचे फाईल निकाली काढण्यात येईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. retired teacher service benefits Chandrapur

    मूळ सेवापुस्तक एक वर्षांपूर्वी अद्यावत करण्यात येणार

    संघटनेने दिलेल्या आंदोलनाच्या नोटीसमुळे पुढील दोन वर्ष पर्यंत निवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यांचे मूळ सेवापुस्तक एक वर्षांपूर्वी अद्यावत करण्यात येणार आणि पेन्शन केस निवृत्तीच्या सहा महिने पूर्वी जिल्हा परिषद ला पाठवण्यात येईल, असे सांगण्यात आले. जीपीएफ ठेव संलग्न विमा संबंधाने मयत झालेल्या शिक्षकांचे 60 हजार रुपये प्रमाणे 91 कर्मचाऱ्यांचे खात्यात सदर निधी जमा करण्यात आला असून उर्वरित 35 प्रकरण त्वरित मंजूर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा पुरस्काराची एक वेतनवाढ आठ शिक्षकांना त्वरित देण्यात यावी व ज्यांची रक्कम उपदानातून वसूल करण्यात आली. त्यांची परत करण्यात यावी, त्यास मान्यता देण्यात आली. 31 मार्च पर्यंत सर्व प्रकरणे निकाली काढण्यात येतील.Financial problems of retired teachers staff

    वेतन त्रुटी निवारण समिती 2024 खुल्लर समितीने दिलेल्या निर्देशानुसार सर्व पात्र शिक्षकांना एक महिन्यात लाभ देण्यात येतील तसेच दोन वर्षापासून प्रलंबित असलेले पेन्शन निवृत्ती प्रकरण नरेंद्र इटनकर, ज्ञानेश्वर सिडाम यांचे मंजूर झाले असून प्रमोद धानकुटे यांचे पुढील पंधरा दिवसात प्रकरण निकाली काढण्यात येईल. Financial problems of retired teachers

    याशिवाय उर्वरित समस्यांमध्ये अनेक वर्षापासून मरनोत्तर मिळणारे सानुग्रह अनुदान पंधरा हजार रुपये प्रमाणे अनेक तालुक्यात देण्यात येत नाही ते संबंधितांची कुटुंबीयांना देण्यात येईल.
     31 मार्चपर्यंत निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन संघटनेला देण्यात आले निवड श्रेणी बाबत प्रशासन व संघटना यांची विशेष सभा घेण्याचे आजच्या सभेत ठरविण्यात आले, पेन्शन ५ तारखेपूर्वी करावी. सभेच्या शेवटी संघटनेच्या वतीने मुख्य मार्गदर्शक विजय भोगेकर यांनी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, उपस्थित सर्व अधिकारी यांचे आभार मानून शिल्लक असलेल्या सगळ्या समस्या दोन महिन्याचे आत निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यामुळे संघटनेकडून होणारे 5 सप्टेंबर शिक्षक दिनीपासूनचे धरणे आंदोलन 4 नोव्हेंबर पर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे सभेत जाहीर केले.

  • MNS expansion in Chandrapur slum area । जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे एकमेव पर्याय, अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेशाचा धडाका

    MNS expansion in Chandrapur slum area

    MNS expansion in Chandrapur slum area : चंद्रपूर २ सप्टेंबर २०२५ :- जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटनात्मक बांधणी विखूरली असली तरी काही मनसे पदाधिकारी पक्षाच्या संघटन बांधणीला महत्व देऊन पक्षात विविध राजकीय सामाजिक कार्यकर्त्याचा मनसेत प्रवेश करून घेण्याचा सपाटा चालवीत आहे, दरम्यान चंद्रपूर शहरातील झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाकाली कॉलरी परिसरातील प्रकाश नगर येथे विकास कामे झाली नसल्याने दुर्लक्षित या परिसरात जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मनसे हा एकमेव राजकीय पक्ष कामं करू शकतो व मनसेचे पदाधिकारी हे आमचे सगळे कामं करतील हा विश्वास ठेऊन काही तरुणांनी मनसेत प्रवेश केला.

    नागरिकांनो सतर्क रहा, इरई धरणाचे ७ दरवाजे उघडले

    कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांचं नेतृत्व

    या वार्डातील कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्या नेतृत्वात शेकडो युवक व महिलांचा मनसेत पक्ष प्रवेश घेण्यात आला. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहित जिल्हाध्यक्ष रमेश काळाबांधे, सुनील गुढे, रोजगार स्वयंरोजगार जिल्हाध्यक्ष मनोज तांबेकर, महिला सेना अध्यक्षा वर्षा बोंभले व इतर मनसे पदाधिकारी उपस्थित होते. MNS Expansion Chandrapur

    येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मनसेचे उमेदवार मोठ्या प्रमाणात उभे करण्यासाठी शहरातील वार्डावार्डात मनसे पदाधिकारी पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम राबवित असून शहरातील मागास व कामगार वर्ग असलेल्या प्रकाश नगर येथे मनसेची शाखा धुमधडाक्यात उदघाटन करण्यात आली, यावेळी मनसे जिल्हा कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यासह सर्व पदाधिकारी यांनी उपस्थित वार्डवासी यांना दुपट्टे टाकून मनसेत प्रवेश घेतला,

    mns chandrapur

    यावेळी मनसे कार्यकारणी जाहीर करण्यात आली, यामध्ये शाखाध्यक्ष साहिल खान, शाखा संघटक ज्ञानेश्वर बांसोड़, सचिव सिद्धार्थ नायक, उपाध्यक्ष भीमराव वनकर, कोषाध्यक्ष सुरेश सिंहठाकुर, सदस्य अंकित मालाकार कन्हैया, आकाश मालाकार, छाया ठाकुर, राजश्री सिद्धार्थ नायक, तृप्ति भीमराव, सरोज यादव, देव कुमार, सोहेल शेख, आसिफ शेख, फैजान शेख, ईरफान शेख, अशफाक खान इत्यादीनी महाराष्ट्र सैनिक म्हणून पदभार स्वीकारला.

  • Additional Superintendent of Police Birthday । भव्य रक्तदान शिबिरातून साजरा झाला अप्पर पोलीस अधीक्षक कातकडे यांचा वाढदिवस

    Additional Superintendent of Police Birthday

    Additional Superintendent of Police Birthday : चंद्रपूर- जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक मा.श्री.ईश्वर कातकडे साहेब यांच्या जन्मदिवसानिमित्त पोलीस मुख्यालय मधील ड्रिल शेड मध्ये महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना च्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

    सायबर क्राईम बाबत छोटूभाई पटेल हायस्कुल मध्ये मार्गदर्शन

    या आयोजनाला चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी आरसीपी चे जवान महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाचे पदाधिकारी यांच्याकडून रक्तदान शिबिरांमध्ये रक्तदान श्रेष्ठदान या तत्त्वावर रक्तदान करण्यात आले. Maharashtra Police Boys Association

    पोलीस अधिकाऱ्यांनी केले रक्तदान

    महाराष्ट्र पोलीस दल चंद्रपूर जिल्हा मधील अप्पर पोलीस अधीक्षक मा.श्री.ईश्वर कातकडे साहेब यांनी सुद्धा आपले स्वतःचे रक्तदान केले.तसेच मा.श्री. महेश कोंडावार, होम साहेब, चंद्रपूर मा.श्री. नवघरे साहेब, पोलीस मुख्यालय, राखीव पोलीस निरीक्षक यांनी सुद्धा आपले अमूल्य रक्तदान केले. यादरम्यान महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनाचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.राहुल भैय्या अर्जुनराव दुबाले यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये संघटनेच्या विदर्भ अध्यक्ष मा.श्री.आरती ताई सुधीर जांगळे यांची प्रमुख उपस्थिती लागली होती तसेच विदर्भातून विविध जिल्ह्यातून पदाधिकारी यांचे सुद्धा अमूल्य रक्तदान व उपस्थिती लाभली. police blood donation camp Chandrapur

    maharashtra police boys association

    त्यामध्ये विदर्भाचे सल्लागार मा.श्री.संतोषजी पुंडकर भंडारा जिल्हा अध्यक्ष चेतनदादा शर्मा अकोला जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.गौरवदादा अशोकराव सपकाळ व संपूर्ण जिल्ह्यातील संघटनेचा परिवार उपस्थित होता. संपूर्ण शिबिराचे आयोजक चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष मा.श्री.परमेश्वर बळीराम चव्हाण ह्यांनी राहुल भैय्या अर्जुनराव दुबाले यांच्या प्रमुख नेतृत्वात कार्यक्रम पार पाडला.

    यावेळी महाराष्ट्र पोलीस दल चंद्रपूर चे अधिकारी अंमलदार व महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे महिला आघाडी अध्यक्ष शीला दिलीप जाधव युवक आघाडी अध्यक्ष विशाल राठोड मयूर घोटकर विद्यार्थी आघाडी अध्यक्ष रोहित दुरतकर विजय चव्हाण संघटक राहुल पोद्दार सोशल मीडिया प्रमुख मानव झाडे दिलीप जाधव प्रफुल मानकर कृष्णा मेश्राम भूपेंद्र जाधव महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

  • dengue household inspection results । मनपाची डेंग्यू तपासणी मोहीम, चंद्रपुरात किती घरे डेंग्यूने दूषित? जाणून घ्या

    dengue household inspection results

    dengue household inspection results : चंद्रपूर 29 ऑगस्ट २०२५ – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे डेंग्यू व इतर कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी राबविल्या जाणाऱ्या घरांच्या तपासणी मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात शहरातील 2 टक्के घरे दुषित आढळुन आली,पहिल्या टप्यात 5 टक्के दुषित घरे आढळल्यानंतर मनपातर्फे मोहीम तीव्र करण्यात आल्याने दूषित घरांची संख्या कमी झाली आहे.

     मनपा कार्यक्षेत्रातील सर्व खाजगी रुग्णालयांद्वारे डेंग्यू व इतर कीटकजन्य आजार रुग्णांचा दैनंदिन अहवाल मनपाकडे पाठविला जात असुन,त्यानुसार जुलै महिन्यापासुन शहरात आतापर्यंत टायफाईडचे 12,चिकनगुनियाचे 2 तर डेंग्यूचे 12 रुग्ण आढळले आहेत.मागील काही वर्षांच्या तुलनेत कीटकजन्य आजार रुग्णांच्या संख्येत यावर्षी लक्षणीय घट असुन हे सर्व रुग्ण आता रोगमुक्त आहेत.  

    गडचिरोली मधील लड्डू दत्तक संस्थेत काम करण्याची सुवर्णसंधी

     कीटकजन्य आजार प्रतिबंधासाठी मनपातर्फे डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम राबविली जात असुन 28 ब्रिडींग चेकर्स,32 एएनएम, 22 एमपीडब्लु,170 आशा वर्कर व स्वच्छता निरीक्षक पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. ब्रिडींग चेकर्सद्वारा अधिकाधिक घरांची दररोज तपासणी केली जात असुन प्रत्येक घरामध्ये सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला जात आहे. dengue cases drop after intensified inspection drive

     पावसात मोकळे भूखंड, बंद घराची छते, चालु बांधकामाची ठिकाणे, घरी वापर नसलेली ठिकाणे, कूलर,टायर, भंगारातील वस्तु,डबे इत्यादी ठिकाणी पाणी साचुन राहते व याच जागा डासांची उगमस्थाने बनतात. या उगमस्थानांचा शोध घेऊन ती नष्ट करणे व नागरीकांना सचेत करणे यासाठी डासोत्पत्ती स्थाने तपासणी मोहीम सुरु करण्यात आली असुन नागरीकांनी आपल्या घरी साचलेले पाणी राहु नये यांची काळजी घेण्याचे आवाहन मनपा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.  

    डेंग्युची लक्षणे –

    डासांमुळे पसरणाऱ्या आजारांमध्ये डेंग्यूताप व डेंग्यू रक्तस्रावी ताप हे मुख्य आजार आहेत. ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोळ्याच्या खोबणीमधे दुखणे, पाठदुखी, डोकेदुखी, स्नायूमध्ये वेदना, सांधेदुखी ही डेंग्यूची प्रमुख लक्षणे आहेत. वस्तुतः डेंग्यू हा सामान्य आजार आहे परंतु या रोगाबाबत माहिती नसल्याने किंवा अपुरी माहिती असल्याने काही वेळा तो जीवघेणा ठरू शकतो. म्हणून प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

    डेंग्यु टाळण्यास उपाययोजना –

    डेंग्यु डास हा स्वच्छ व साचलेल्या पाण्यात आढळतो त्यामुळे आपल्या घराची तपासणी करावी . पाणी साठवण्याची भांडी कोरडी करणे,डासअळी आढळल्यास अबेट द्रावण टाकणे, पाणी साठा मोठा असले तर त्यात गप्पी मासे टाकणे आवश्यक आहे. गप्पी मासे पाण्यातील डासांची अंडी संपवितात ज्याने डासांचा प्रादुर्भाव कमी होतो. आठवड्यातून एक दिवस हा कोरडा दिवस पाळावा.