Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • Chandrapur disability welfare scheme । चंद्रपूर मनपाचा उपक्रम: दिव्यांगांना व्यवसायासाठी 23.82 लाखांचे अनुदान!

    Chandrapur disability welfare scheme

    Chandrapur disability welfare scheme : चंद्रपूर 19 सप्टेंबर –  दिव्यांगांना स्वयंरोजगार मिळावा व त्यामाध्यमातुन त्यांचे कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे दिव्यांग कल्याण धोरणाची अंमलबजावणी केल्या जात असुन याअंतर्गत 34 दिव्यांग लाभार्थ्यांना स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यास एकुण 23.82  लक्ष रुपयांचे अनुदान आतापर्यंत देण्यात आले आहे.

    चंद्रपुरात द बर्निंग कार

    अनेक दिव्यांग व्यक्तींना स्वतः चा व्यवसाय किंवा लघुउदयोग सुरु करायचा असतो परंतु अपुऱ्या भांडवलामुळे व्यवसाय सुरु करु शकत नाही अश्या दिव्यांग व्यक्तीकरीता चंद्रपूर महानगरपालिकेतील दिव्यांग कल्याण धोरण या योजनेतुन 2 लक्ष रुपयांचे कर्ज विविध बँकेमार्फत उपलब्ध करून दिल्या जाते. मनपा दिव्यांग कल्याण धोरण अंतर्गत बँकेने मंजुर केलेल्या कर्जावर 50 टक्के अनुदान देण्यात येते.

    34 दिव्यांग लाभार्थ्यांना योजनेचा लाभ

    चंद्रपूर मनपाच्या माध्यमातुन आतापर्यंत 34 दिव्यांग लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला असुन त्यांना एकुण 23.82 लक्ष रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.  ज्यास्तीत ज्यास्त दिव्यांग व्यक्तींनी व्यवसायाला सुरवात करून आत्मनिर्भर व्हावे व आपल्या कुटुंबाला हातभार लावुन आर्थिक प्रगती व्हावी हा या मागचा उद्देश आहे. divyang self employment assistance Chandrapur

    ज्या दिव्यांग व्यक्तींना नविन व्यवसाय सुरु करावयाचा असेल अथवा सुरु असलेल्या व्यवसायात वाढ करावयाची असेल त्यांनी कर्ज घेण्याकरीता व अधिक माहितीकरीता मनपा दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान कार्यालय ( बीपीएल ऑफीस ),सरकारी दवाखान्यामागे,कस्तुरबा रोड ज्युबली शाळेसमोर या ठिकाणी कार्यालयीन वेळेत संपर्क साधण्याचे तसेच अधिकाधिक दिव्यांगांनी योजेनचा लाभ घेण्याचे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

  • college magazine launch event । “संविधानावर आधारित सृजनशीलता: सरदार पटेल महाविद्यालयाचा ‘शब्दगंधा’ प्रकाशन सोहळा”

    college magazine launch event

    college magazine launch event : चंद्रपूर १८ सप्टेंबर २०२५ : सरदार पटेल महाविद्यालयातर्फे प्रकाशित वार्षिकांक ‘शब्दगंधा’ (शैक्षणिक सत्र 2024-25) चा भव्य प्रकाशन समारंभ अत्यंत गौरवशाली वातावरणात संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंद पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्री. सुदर्शन निमकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, शब्दगंधा प्रमुख व संपादक डॉ. शैलेंद्रकुमार शुक्ल, सहसंपादिका डॉ. पद्मरेखा धनकर, डॉ. भारती दीक्षित व सहसंपादक मंडळ उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या संपादक मंडळाने सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

    वाघाच्या हल्ल्यात महिला ठार, जमावाने वनरक्षकाचे वाहन फोडले

    प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर यांनी आपल्या भाषणात म्हटले की, ‘शब्दगंधा’ महाविद्यालयातील प्रतिभावंत लेखणींना आपली क्षमता दाखविण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देते. विद्यार्थ्यांनी कविता, कथा, निबंध आणि लेखांच्या माध्यमातून आपली कल्पनाशक्ती व सामाजिक जाणीवा ज्या प्रकारे व्यक्त केल्या आहेत, त्या अनुकरणीय व प्रेरणादायी आहेत.
    वार्षिकांक ‘शब्दगंधा’ चे प्रकाशन संस्था अध्यक्ष श्री. अरविंद पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्री. सुदर्शन निमकर, प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, शब्दगंधा प्रमुख डॉ. शैलेंद्रकुमार शुक्ल, सहसंपादिका डॉ. पद्मरेखा धनकर व डॉ. भारती दीक्षित यांच्या हस्ते पार पडले. Shabdagandha magazine Chandrapur

    “‘शब्दगंधा’ ही फक्त पत्रिका नाही तर विचारांचे व्यासपीठ

    अध्यक्षीय मनोगतात अरविंद पोरेड्डीवार यांनी विद्यार्थ्यांच्या लेखनाचे कौतुक करताना म्हटले की,”‘शब्दगंधा’ ही फक्त पत्रिका नाही तर विचारांचे व्यासपीठ आहे. विशेष म्हणजे या वर्षीचे मुखपृष्ठ भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी कल्पकतेने साकारले आहे. हे त्यांची जागरूकता आणि सृजनशीलता दर्शविते. संविधान हे फक्त कायद्याचे पुस्तक नाही, तर भारताच्या लोकशाही जीवनाचा प्राण आहे, आणि विद्यार्थ्यांनी याचे रचनात्मक स्वरूपात केलेले सादरीकरण महत्त्वाचा संदेश देणारे आहे.”

    संस्थेचे उपाध्यक्ष श्री. सुदर्शन निमकर म्हणाले की, ‘शब्दगंधा’ सारख्या पत्रिका विद्यार्थ्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्व विकासात सहाय्यक ठरतात. ही पत्रिका साहित्यिक प्रतिभेबरोबरच सामाजिक जाणीवा आणि सांस्कृतिक मूल्ये जपते.
    शब्दगंधा चे संपादक डॉ. शैलेंद्रकुमार शुक्ल यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हटले –
    “साहित्य हे फक्त शब्दांचा खेळ नाही, ते विचारांचे आरसे आहे, भावनांची अभिव्यक्ती आहे आणि आत्म्याची हाक आहे. विद्यार्थी जेव्हा आपली लेखणी चालवतात, तेव्हा फक्त अक्षरे उतरतात असे नाही, तर भविष्यातील चित्र आकार घेत असते.” creative writing in colleges


    सूत्रसंचालन डॉ. भारती दीक्षित यांनी केले आणि आभारप्रदर्शन सहसंपादिका डॉ. पद्मरेखा धनकर यांनी केले.
    या प्रसंगी सर्वोदय शिक्षण मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, शिक्षक-बाह्य कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • one window scheme CMC Chandrapur । CMC Chandrapur कडून एक खिडकी योजना सुरू – नवरात्र 2025 साठी सोपी परवानगी प्रक्रिया

    one window scheme CMC Chandrapur

    one window scheme CMC Chandrapur : चंद्रपूर 16 सप्टेंबर – चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत नवरात्र उत्सवासाठी एक खिडकी योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी मंडळांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत. सादर केलेल्या अर्जांची छाननी करून संबंधित विभागाकडुन परवानगी मिळाल्यावर महानगरपालिकेतर्फे अंतिम परवानगी प्रदान करण्यात येणार आहे.

    चंद्रपूर मनपाची अंतिम प्रभाग प्रारूप रचना १३ ऑक्टोबर ला

    येत्या 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना असुन 1 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र उत्सव साजरा होणार आहे. सार्वजनिक मंडळांना महापालिका व इतर विभागाकडून रीतसर परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. शहर वाहतूक शाखा, अग्निशमन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र, तसेच सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडील नोंदणी प्रमाणपत्र व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे नियमावली बाबत हमीपत्र घेऊन परवानगी दिली जाणार आहे. ऐनवेळी परवानगीसाठी अर्ज न देता लवकरात लवकर परिपूर्ण अर्ज सादर करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.  Navratri pandal permission Chandrapur

       महापालिकेने दिलेली परवानगी मंडपाच्‍या दर्शनी भागावर मंडळांनी लावणे बंधनकारक राहील.  सार्वजनिक मंडळाकडून निर्माल्य गोळा करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

    एक खिडकी योजना –

     सार्वजनिक ठिकाणी मंडप, स्टेज उभारण्यासाठी मंडळांना ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चंद्रपूर महानगरपालिकेच्या cmcchandrapur.com या संकेतस्थळावर quick link सदरात pandal permission 2025 येथे ही लिंक उपलब्ध आहे. अथवा https://pandal.cmcchandrapur.com/ येथे भेट देऊन ऑनलाईन अर्ज करता येईल.  यामध्ये पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस स्टेशन,सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण केंद्र, महानगरपालिका इत्यादी विविध विभागांचे प्रतिनिधी संबंधित सादर केलेल्या अर्जांची छाननी करतील व महानगरपालिकेतर्फे अंतिम परवानगी प्रदान करण्यात येणार आहे.

  • Chandrapur Manpa prabhag rachana objections । चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक : अंतिम प्रभाग रचना 13 ऑक्टोबरपर्यंत निश्चित

    Chandrapur Manpa prabhag rachana objections

    Chandrapur Manpa prabhag rachana objections : चंद्रपूर 16 सप्टेंबर – चंद्रपूर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर निर्धारित वेळेत 8 हरकती अर्ज चंद्रपूर मनपा प्रशासनास  प्राप्त झाले आहेत.  

    नगरपंचायत मध्ये ८३ लाख रुपयांचा घनकचरा घोटाळा

    महापालिकेच्या प्रभाग रचनेचे प्रारूप 3 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आले होते. त्यावर हरकती.सूचना मागविण्यास सोमवार 15 सप्टेंबर दुपारी 3.00 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला होता. या कालावधीत 12 सप्टेंबर पर्यंत 6 तर अखेरच्या दिवशी 2 असे एकुण 8 अर्ज मनपा प्रशासनास प्राप्त झाले.

    १८ सप्टेंबर रोजी सुनावणी

    18 सप्टेंबर रोजी मा.जिल्हाधिकारी यांच्या समक्ष जिल्हाधिकारी कार्यालयात या सर्व हरकतींवर सुनावणी प्रक्रिया घेतली जाणार आहे. सुनावणीदरम्यान अर्जदारांना आपले म्हणणे मांडण्याची संधी मिळणार असुन त्यानंतरच अंतिम प्रभाग रचना निश्चित होणार आहे.

    आक्षेपांवर सुनावणी होणे, त्यानंतर प्रभागरचना अंतिम करून शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठविणे, नगरविकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाच्या मंजुरीसाठी पाठविणे, निवडणूक आयोगाच्या अंतिम मंजुरीनंतर अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करणे, अशी संपूर्ण प्रक्रिया 13 ऑक्टोबरपर्यंत नियोजित आहे. 


       

  • Bagless school program Maharashtra | 🎨 चित्रकला, कोडी आणि मजेदार खेळांनी उजळल्या चंद्रपूर मनपा शाळा – दप्तरविना दिवसाची धमाल

    Bagless school program Maharashtra

    Bagless school program Maharashtra : चंद्रपूर 15 सप्टेंबर – चंद्रपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे “दप्तरविना शाळा” हा उपक्रम शहरातील शाळांमध्ये उत्साहात राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांचा यामध्ये उत्स्फूर्त सहभाग दिसून येत आहे. चंद्रपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे दप्तरा विना शनिवार हा उपक्रम आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी घेण्यात येऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना दप्तराच्या ओझ्यापासून थोडी विश्रांती देऊन आनंदाने व खेळकर पद्धतीने शिक्षण घडवणे हा आहे.

    चंद्रपुरात अज्ञातांनी फोडलं बँक ऑफ महाराष्ट्र चे ATM


       शनिवार 13 सप्टेंबर रोजी मनपाच्या विविध शाळांत शब्द शोध कोडे ,समान वस्तू शोधणे,समान चित्रांमधील फरक शोधणे,शब्दकोडे सोडवणे,चित्र रंगवणे इत्यादी विविध रोचक उपक्रम विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यात आले. याशिवाय विद्यार्थ्यांना अधिक उत्साहवर्धक व सृजनशील अनुभव देण्यासाठी काही अनोखे उपक्रम देखील घेण्यात आले. त्यामध्ये डोळे बंद करून डोक्यावरील बाटली न पडता चालण्याचा खेळ,कृतीयुक्त गीत सादरीकरण,टोपी बनवणे,”माझ्या जीवनातील मजेशीर प्रसंग” या विषयावर लेखन करणे असे उपक्रम विविध शाळांत घेण्यात आले.  Daptarvina Shala Chandrapur

    विद्यार्थ्यांचा उत्साहात सहभाग

     या सर्व उपक्रमांत विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. खेळता-खेळता त्यांनी विचारशक्ती, निरीक्षणशक्ती, सर्जनशीलता आणि आत्मविश्वास यांचा उत्तम वापर करून आनंद लुटला.


      या प्रसंगी शाळांच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, “दप्तरविना शाळेमुळे मुलांची शिकण्याची पद्धत बदलते. पुस्तकांच्या पलिकडे जाऊन विचार करणे, नवीन गोष्टी शोधणे आणि आनंदी वातावरणात शिकणे हेच आमचे ध्येय आहे.”


      “विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम महत्त्वाचे आहेत. मुलांना दप्तराच्या ओझ्यापासून मुक्त करून खेळता-खेळता शिकविणे हीच खरी नाविन्यपूर्ण शिक्षणपद्धती आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने व आनंदाने शिकतील, हे निश्चित.” – उपायुक्त श्री. मंगेश खवले 

  • Chandrapur municipal school relocation । पं. जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा नूतनीकरण सुरू, विद्यार्थ्यांसाठी बसची सोय

    Chandrapur municipal school relocation

    Chandrapur municipal school relocation : चंद्रपूर 14 सप्टेंबर २०२५ – चंद्रपूर महानगरपालिकेच्या पं. जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेचे बांधकाम जीर्ण झाल्यामुळे नवीन शाळा इमारत उभारण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे. या अनुषंगाने जुन्या इमारतीला पाडण्याचे काम सुरू असून नूतनीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

    नीलम गोऱ्हे यांच्या वाढदिवशी शिवसेना महिला आघाडीचे विविध उपक्रम

    दरम्यान, विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून ही शाळा तात्पुरती किरायाने घेतलेल्या इमारतीत सुरू करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव त्या ठिकाणी अध्यापनात अडथळा निर्माण झाल्याने शाळा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोमवार 15 सप्टेंबर पासून पं. जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेचे अध्यापन वर्ग रय्यतवारी तेलगु उच्च प्राथमिक शाळा, इंडस्ट्रियल वार्ड, बंगाली कॅम्प येथे नियमित सुरू होणार आहे.

    विद्यार्थ्यांसाठी बस व्यवस्था

    विद्यार्थ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महानगरपालिकेमार्फत बस व्यवस्था करण्यात आली आहे. जुन्या शाळेच्या ठिकाणी सकाळी 10 ते 11 या वेळेत विद्यार्थ्यांना बसने नव्या शाळेच्या ठिकाणी नेण्यात येईल व शाळा सुटल्यानंतर सायंकाळी 5.15 वाजता त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना सुरक्षितरीत्या सोडण्यात येईल. पालकांना याबाबत सूचना शाळास्तरावर दिल्या गेल्या आहेत. Jawaharlal Nehru primary school Chandrapur

    चंद्रपूर महानगरपालिकेच्या तत्परतेमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंडित राहणार असून नूतनीकरणानंतर आधुनिक सुविधांनी युक्त नवी शाळा विद्यार्थ्यांना उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत कोणताही खंड पडू नये हीच महानगरपालिकेची प्राथमिकता असल्याचे उपायुक्त मंगेश खवले यांनी सांगितले.

     

  • Babupeth bachat gat meeting । समाजपरिवर्तनासाठी महिला बचत गटांची गरज : बाबूपेठ आढावा बैठक

    Babupeth bachat gat meeting

    Babupeth bachat gat meeting : चंद्रपूर १४ सप्टेंबर २०२५ – आज आपण बघतो आहे समाजात महिलांवर होणारे अत्याचार पण त्यावर तात्काळ कठोर शिक्षा झाली अस कधीही झाल नाही म्हणूनच आजची स्त्री घराबाहेर पडायला घाबरत आहे ..शासनाने केवळ महिला सक्षमीकरण कायदा लागू केला मात्र अमलबजावणी शून्य आहे त्यामुळेच आज महिलांच सक्षमीकरण होंन गरजेच आहे तसेच महिलांनी या बचत गटाच्या माध्यमातून विविध लघू उद्योग उभारून कुटुंबाला हातभार लावता येईल ,आपल्या आरोग्याची काळजी आपणच. कश्या पद्धतीने घेतली पाहिजे यासाठी अश्या प्रकारच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना योग्य मार्गदर्शन करून महिलांनासक्षम करणे गरजेचे आहे.

    मातृशक्तीचा अपमान सहन करणार नाही – छबू वैरागडे

    आज मी याठिकाणी महिलांची जी भरगच्च उपस्थिती बघतो आहे इतक मोठ महिलाच संघटन करण सोप नसत परंतु हे कार्य चंदाताईनी करून दाखविल त्यामुळे समाज परिवर्तनासाठी चंदाताई सारख्या नेतृत्वाची समाजाला आवश्यकता आहे असे मत बालाजी मंदिर बाबूपेठ येथे बचत गटाच्या संस्थापक अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांनी आयोजित केलेल्या महिला बचत गटाच्या आढावा बैठकीत प्रमुख मार्गदर्शक इको प्रो चे अध्यक्ष बंडूभाऊ धोत्रे यांनी व्यक्त केले. women self help groups for micro industry setup

    babupeth bachat gat

    दरवर्षी बचत गटाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम

    प्रस्ताविकेतुन बचत गटाच्या संस्थापक अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांनी बचत गट केवळ पैशाच्या देवाण घेवाणीसाठी नसून सामाजात महिलांवर आज जे अन्याय अत्याचार होत आहे ,आत्महत्येच प्रमाण वाढलेल आहे हुंडाबळीचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहे ,आजची मुल व्यसनाधीन होत चालली आहे,हे कुठतरी थांबल पाहिजे यासाठी आम्ही दरवर्षी बचत गटाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेत असते.बचत गटातील महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आणि बचत गटात सदस्य संख्या मर्यादीत घ्यायचा नियम असल्यामुळे,आम्ही बचत गटाची महाराष्ट्रातून पहिली महिला रणरागिणी नागरी पतसंस्था सुरू केली. हे केवळ मला मिळालेली महिलांची साथ त्यांच माझ्यावर असलेला विश्वास आणि बचत गटाचा प्रामाणिक व्यवहार यामुळेच आम्ही हे करू शकले असे विचार व्यक्त केले.self employment for women through savings groups

    यावेळी मंचावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. तारा जोगी, विशेष अतिथी शैलेशभाऊ जुमडे जितूभाऊ इटनकर, तसेच सर्व बचत गटाच्या अध्यक्ष यांची उपस्थिती होती.सर्व मान्यवराच्या हस्ते बचतगटातील सदस्यां,शिक्षिका सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या सौ. उषाताई इटनकर यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला सर्व बचत गटातील महिलां मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.मेघा बजाईत तर आभार सौ. प्रिया अगडे यांनी मानले.

  • Blacklist the contractor । फक्त दोन वर्षांत पूल खचला, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाका – मनसेची मागणी

    Blacklist the contractor

    Blacklist the contractor : चंद्रपूर १२ सप्टेंबर २०२५ :- दोन वर्षांपूर्वी बनलेला लहान पूल यंदाच्या पावसाळ्यात अक्षरशः वाहून गेला, विशेष म्हणजे पुलाची होत असलेली दुर्दशा बाबत मनसे तर्फे पियुष धुपे यांनी मनपाला त्याबाबत निवेदन दिले होते, मात्र कारवाई झाली नाही आणि पूल पावसात वाहून गेला, पुलाचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदाराला काळया यादीत टाका अशी मागणी करण्यात आली आहे.

    अपघातग्रस्तांना आमदार मुनगंटीवार यांची तातडीची मदत

    शहरातील हनुमान खिडकी मार्गे भिवापूर कडे जाणाऱ्या झरपट नदीवर मागील दोन वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आला होता, मात्र अगदी दोन वर्षातच त्या पुलाला भेगा पडायला लागल्या व या पावसाळ्यात तर त्या भेगा आणखी वाढल्या, दरम्यान हा पूल धोकादायक झाला असल्याने मनपा आयुक्ताकडे मनसेच्या जनहीत कक्ष विभागाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन यावर त्वरित बंदोबस्त करा अन्यथा हा धोकादायक पूल खचून अपघात होण्याची शकता आहे असे नमूद केले होते. contractor negligence leads to bridge failure in monsoon

    अभियंत्यावर गुन्हे दाखल करा

    मात्र तरीही मनपा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले मात्र हा पूल मनसे च्या मागणी मंतर दहा दिवसातच कोसळला त्यामुळे हा पूल बांधणाऱ्या कंत्राटदार व त्यांचे बिल पास करणाऱ्या संबंधित अभियंत्यावर गुन्हे दाखल करा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे जनहीत कक्ष विभागाचे शहर अध्यक्ष पियुष धुपे यांनी निवेदनातून मनपा आयुक्त यांना दिला आहे, यावेळी मनसे जनहीत कक्ष विभागाचेजिल्हाध्यक्ष रमेश काळबांधे, सुनील गुढे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

    मनसे कडून दिनांक २८ ऑगस्ट ला मनपा आयुक्त यांना निवेदन देउन लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा मनपा प्रशासनाने त्याकडे लक्ष न दिल्याने हनुमान खिडकी जवळील झरपट नदी वरील पूल खचला तो बांधणाऱ्या कंत्राटदार व संबंधित अभियंत्यावर गुन्हे दाखल करून कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकां अशी मागणी सुद्धा निवेदनातून केली आहे.

  • how much is penalty for plastic bag use | चंद्रपूरमध्ये 150 किलो प्लास्टिक जप्त – दुकानदारावर ₹5000 दंड!

    how much is penalty for plastic bag use

    how much is penalty for plastic bag use : चंद्रपूर 11 सप्टेंबर  – बिनबा गेट परिसरातील राजनूर सेलिब्रेशन जवळील दुकानावर चंद्रपूर महानगरपालिका उपद्रव शोध पथकाने कारवाई करून 150 किलो प्लास्टीक जप्त केले आहे शिवाय प्लास्टीकचा साठा करणाऱ्या दुकानदाराकडुन 5 हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.सदर व्यावसायिकावर ही पहिल्यांदा कारवाई करण्यात आली आहे.

    पहाटे जटपूरा गेट परिसर हादरला

    पुन्हा सदर गुन्हा केल्यास 10 हजार रुपये दंड

      चंद्रपूर महानगरपालिका मनपा उपद्रव शोध पथकास मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली असुन सदर व्यावसायिकास सक्त ताकीद देण्यात आली आहे. पुन्हा सदर गुन्हा केल्यास 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.मनपा हद्दीत प्लास्टीक पिशव्यांच्या वापरावर प्रतिबंध घालण्यास सातत्याने कारवाई केली जात असुन प्लास्टीक पिशव्यांच्या साठयाबाबत गुप्त माहीती देणाऱ्यास 5 हजारांचे बक्षिस सुद्धा जाहीर करण्यात आले आहे.यास मोठा प्रतिसाद मिळुन मनपापर्यंत प्लास्टीक साठ्याची गुप्त माहीती पोचविण्यात येत आहे. first offence plastic violation

    एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंचे उत्पादन, आयात, साठवणूक, वाहतूक, वितरण, विक्री व वापरावर राज्यात 1 जुलै 2022 पासून पूर्णपणे बंदी घालण्यात आली असुन महाराष्ट्र प्लास्टिक आणि थर्माकोल अधिसूचना 2018 नुसार दंड आणि 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा आहे. सदर कारवाई आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त श्रीमती. शुभांगी सूर्यवंशी यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात डॉ. अमोल शेळके,भुपेश गोठे,शुभम खोटे, शुभम चिंचेकर,राहुल गगपल्लीवार, पूनम समुद्रे यांच्याद्वारे करण्यात आली. 

       

  • Part of a dilapidated building collapsed | 🏚️ चंद्रपूर हादरलं! जटपुरा गेटसमोरील जीर्ण इमारतीचा भाग कोसळला – महिला गंभीर जखमी

    Part of a dilapidated building collapsed

    Part of a dilapidated building collapsed : चंद्रपूर 11 सप्टेंबर 2025 – चंद्रपुरातील जटपुरा गेट समोरील इमारतीचा एक भाग कोसळला, या घटनेत दूध विक्रेता महिला गंभीर जखमी झाली. सदर घटना पहाटे 5 वाजता घडली.

    जन सुरक्षा विधेयकविरोधात महाविकास आघाडीचे निदर्शने

    ऐतिहासिक जटपूरा गेट समोरील विनोद मेहता यांच्या मालकीच्या इमारतीचा वरचा भाग जीर्ण अवस्थेत आला होता, आज झालेल्या घटनेत 50 वर्षीय मनीषा लोखंडे या महिला गंभीर जखमी झाली असून त्यांच्या हाता-पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती आहे. सदर इमारत ही 50 ते 60 वर्षे जुनी आहे.

    माजी नगरसेविकेचा पाठपुरावा


    याबाबत माजी नगरसेविका छबु वैरागडे यांनी सदर इमारतीच्या झालेल्या जीर्ण इमारतीची अवस्था बघता भविष्यात दुर्घटना होऊ नये यासाठी पालिकेद्वारे 4 नोटीस पाठविल्या होत्या मात्र मेहता यांनी त्यावर काहीच उत्तर दिलं नाही. घर मालकाच्या दुर्लक्षामुळे व पालिकेच्या उदासीनतेमुळे कामामुळे महिला जखमी झाली.

    सदर इमारतिच्या तळमजल्यावर छोटं हॉटेल सुद्धा आहे, या घटनेमुळे त्या हॉटेलला धोका निर्माण झाला असून पालिकेचे कर्मचारी व अधिकारी यांनी सदर इमारतीची पाहणी केली असून त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहरात अश्या अनेक जीर्ण इमारती असून भविष्यात त्यामुळे मोठी दुर्घटना घडणार ही शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे पालिकेने अश्या जीर्ण इमारती लवकरात लवकर जमीनदोस्त कराव्या अशी मागणी नागरिक करीत आहे.