Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • BJP Govardhan Puja celebration Chandrapur | भव्य गोवर्धन पूजा उत्साहात साजरी; आ. किशोर जोरगेवार यांनी दिला समाज ऐक्याचा संदेश

    BJP Govardhan Puja celebration Chandrapur

    BJP Govardhan Puja celebration Chandrapur : चंद्रपूर 22 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – भारतीय जनता पार्टी नेहमीच समाजाशी जोडलेली आहे. समाजातील प्रत्येक घटक आनंदी, समृद्ध आणि आत्मनिर्भर व्हावा, हा आमचा प्रयत्न आहे. गोवर्धन पूजा ही शेती, गोसंवर्धन आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याची जाणीव करून देते. या परंपरेत आपल्या संस्कृतीचे मूळ दडले आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Kishor Jorgewar Nehru Nagar Govardhan Puja

    Also Read : बल्लारपुरात शेतकऱ्यांनी साजरी केली काळी दिवाळी

    दीपावलीच्या शुभ पर्वानिमित्त भारतीय जनता पार्टी शास्त्रीनगर प्रभाग आणि कानिफनाथ बहुउद्देशीय संस्था, नेहरू नगर यांच्या संयुक्त विद्यमाने नेहरू नगर येथे भव्य गोवर्धन पूजा महोत्सव भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

    या कार्यक्रमाला राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, ओबीसी नेते अशोक जिवतोडे, महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला मोर्चा शहराध्यक्षा छबु वैरागडे, माजी महापौर अनिल फुलझेले, भाजप नेते प्रकाश देवतळे, नामदेव डाहुले, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट,  महामंत्री रवी गुरुनुळे, मंडळ अध्यक्ष स्वप्निल डुकरे, अॅड. सारिका संदुरकर, प्रदीप किरमे, रवी जोगी, सुभाष अदमाने, ओबीसी मोर्चा अध्यक्ष विनोद शेडकी, माजी नगरसेविका वनिता डुकरे, पुष्पा उराडे, शीतल गुरुनुले, माजी नगरसेवक विठ्ठलराव डुकरे, कानिफनाथ बहुउद्देशीय संस्थेचे उमेश साळुंखे, जनार्धन भुजाडे, राजू सांळुखे, राजकुमार भगाडे, सागर वाजेकर, श्रावण गदई आदी मान्यवर उपस्थित होते. unity and faith message by Kishor Jorgewar

    पारंपरिक सणांमुळे आपल्यात प्रेम, सद्भावना आणि भक्तीचा भाव निर्माण होतो

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, गोवर्धन पूजा म्हणजे श्रद्धा, एकोपा आणि निसर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपला समाज एकत्र राहिला तर कोणतीही अडचण मोठी ठरत नाही. आज आपल्या देशात आणि राज्यात विकासाच्या अनेक योजना राबवल्या जात आहेत. पण त्याचबरोबर सामाजिक एकोपा, धार्मिक सौहार्द आणि सांस्कृतिक जपणूकही तितकीच आवश्यक आहे. अशा पारंपरिक सणांमुळे आपल्यात प्रेम, सद्भावना आणि भक्तीचा भाव निर्माण होतो.

    आज या पूजेत इतक्या मोठ्या संख्येने नागरिक, कार्यकर्ते, महिला व युवा सहभागी झाले, हे पाहून आनंद होत आहे. या आयोजनाने समाजात ऐक्य, भक्ती आणि सेवा भाव निर्माण केला आहे. आपण सर्वांनी दीपावलीच्या या शुभ पर्वावर मनातील अंधार दूर करून ज्ञान, प्रेम आणि एकतेचा प्रकाश पसरवून समाजातील प्रत्येक माणूस आनंदी राहावा, यासाठी आपण एकत्रित प्रयत्न केले पाहिजे असे ते यावेळी बोलताना म्हणाले.

    या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गोवर्धन पूजन करण्यात आले.

  • MIDC Tadali coal depot pollution | चंद्रपुरातील अवैध कोल डेपो बंद करा – दिनेश चोखारे

    MIDC Tadali coal depot pollution

    MIDC Tadali coal depot pollution : चंद्रपूर | २० ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) : एमआयडीसी ताडाळी परिसरातील अवैध कोल डेपोमुळे वाढत चाललेल्या प्रदूषणाविरोधात नागरिकांत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दिनेश दादापाटील चोखारे यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांना निवेदन सादर करून अवैध कोल डेपोवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

    Also Read : अवघ्या 6 तासात घरफोडीचा गुन्हा उघडकीस, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

    निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या अवैध डेपोमधून मोठ्या प्रमाणावर भेसळयुक्त कोळसा साठवला जात असून त्यामुळे परिसरात धूळ व वायूप्रदूषणाचे गंभीर स्वरूप निर्माण झाले आहे. या प्रदूषणाचा थेट परिणाम शेतीवर व आरोग्यावर होत असून, शेतकऱ्यांचे नुकसान वाढत आहे.

    कोलडेपो बंद करा

    नागरिकांच्या वारंवार तक्रारी असूनही स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या रक्षणासाठी तातडीने उपाययोजना करून अवैध कोल डेपो बंद करण्याची आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

    या निवेदनाची प्रत उप प्रादेशिक अधिकारी तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, चंद्रपूर यांनाही देण्यात आली आहे.

  • Baba Shri Shyamji Temple Khutala Chandrapur | खुटाळा गाव होणार भक्तांचं नवं तीर्थक्षेत्र — बाबा श्री श्यामजी मंदिराचं 1 नोव्हेंबरला भूमिपूजन

    Baba Shri Shyamji Temple Khutala Chandrapur :

    Baba Shri Shyamji Temple Khutala Chandrapur : चंद्रपूर 20 ऑक्टोबर (News 34 वृत्तसेवा) – चंद्रपूर शहराजवळील खुटाळा गावात बाबा श्री श्यामजी यांच्या भव्य मंदिर निर्माण कार्याच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजता होणार आहे.
    विशेष म्हणजे या पवित्र धार्मिक मंदिराच्या निर्माण कार्यासाठी यशश्री सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा दीपा ललित कासट यांनी आपली स्वतःची जमीन दान दिली आहे.

    Also Read : भयावह, 70 वर्षीय शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

    बाबा श्री श्यामजी यांचं मंदिर पडोली एमआयडीसी मार्ग, खुटाळा मध्ये निसर्गाच्या सानिध्यात तयार होणार आहे, यामुळे त्याठिकाणी नागरिकांना धार्मिक वातावरण अनुभवायला मिळणार.

    नागरिकांनी उपस्थित रहावे

    आयोजित मंदिर निर्माण भूमिपूजन कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आमंत्रण जय श्री श्याम सेवा समिती चंद्रपूरचे अध्यक्ष ललित कासट व सचिव कुंजबिहारी परमार यांनी केले आहे.

  • Diwali bonus sanitation workers | आंदोलनाचा तिढा सुटला; आमदार किशोर जोरगेवारांच्या मध्यस्थीने सफाई कामगारांच्या मागण्या मान्य

    Diwali bonus sanitation workers

    Diwali bonus sanitation workers : चंद्रपूर 17 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – चंद्रपूर महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत नाली सफाई कामगारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महानगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यात आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्थीने कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून, कामगारांनी आंदोलन मागे घेतले आहे.

    Also Read : घुग्गुस वेकोली मधून चक्क ओव्हरबर्डन ची चोरी

    वेतनवाढ, प्रलंबित वेतन तातडीने देणे, कायमस्वरूपी नियुक्तीची प्रक्रिया सुरू करणे, दिवाळी बोनस तसेच कामाच्या अटी सुधाराव्यात या प्रमुख मागण्या घेऊन कामगारांनी कष्टकरी जनसंघ संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे दोन दिवस नाले सफाईचे काम बंद पडले होते. municipal workers protest resolution

    आमदार जोरगेवार मुळे सुटला तिढा

    सदर प्रकरणात आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतः हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्या सफाई कामगारांच्या प्रतिनिधींशी आणि महानगरपालिका प्रशासनाशी चर्चा केली. चर्चेदरम्यान सर्व मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात आला. आमदार जोरगेवार यांनी प्रशासनाला तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले. आजच कामगारांना दिवाळी बोनस देण्याचे मनपा प्रशासनाने मान्य केले आहे.

    या चर्चेनंतर कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून, आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनस्थळी जाऊन सफाई कामगारांशी संवाद साधला. त्यांच्या आश्वासनानंतर कामगारांनी आनंदाने आंदोलन मागे घेतले.

    या प्रसंगी मनपा अधिकारी, भारतीय कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी, कामगार नेते आणि कामगार उपस्थित होते. यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले, “सफाई कामगार हे शहराच्या स्वच्छतेचे खरे रक्षक आहेत. त्यांच्या न्याय्य मागण्यांना न्याय मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे.” प्रशासनाने त्यांच्या सर्व मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, असे आदेशही आमदार जोरगेवार यांनी दिले.

  • Vidarbha Minerals Energy job assurance | डॉ. सुधीर मुनगंटीवार यांचा हस्तक्षेप — प्रकल्पग्रस्तांना मिळणार स्थायी रोजगार; आमरण उपोषण मागे; प्रशासनाने दिले रोजगाराचे लेखी आश्वासन

    Vidarbha Minerals Energy job assurance

    Vidarbha Minerals Energy job assurance : चंद्रपूर 17 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या नोकरी संदर्भातील महत्वपूर्ण बैठक माननीय आमदार डॉक्टर सुधीर मुनगंटीवार  यांची जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या सोबत जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडली. स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी विकत घेऊन उद्योग उभारणाऱ्या कंपनीने त्या शेतकऱ्यांनाच रोजगारापासून वंचित ठेवणे अन्यायकारक आणि अमान्य असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले.

    Also Read : 168 कुटुंबाचे लाखो रुपये हडपले, घुग्गुस पोलिसात तक्रार

    या बैठकीत विदर्भ मिनरल्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने १०३ प्रकल्पग्रस्त कामगारांना तात्काळ स्थायी नोकरी देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. बैठकीस जिल्हाधिकारी श्री. विनय गौडा, उपवनसंरक्षक श्री. योगेश वाघाये यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

    103 प्रकल्पग्रस्तांना तात्काळ नोकरी देण्याचे निर्देश

    कंपनीविरोधात प्रकल्पग्रस्त बांधवांनी चंद्रपूर येथे सुरू केलेले आमरण उपोषण आज मागे घेतले आहे. या संदर्भात काल डॉ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांच्यासोबत सविस्तर चर्चा करून कंपनीने १०३ प्रकल्पग्रस्तांना तात्काळ नोकरी देण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार प्रशासनाने कंपनीकडे अधिकृत पत्रव्यवहार करून निर्देश जारी केले आहेत. government action on job rights for displaced farmers

    डॉ. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, “या प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळेपर्यंत मी त्यांच्या पाठीशी पूर्ण शक्तीने आणि ठामपणे उभा राहणार आहे.”

    आज आमरण उपोषण करणारे रंजीत पिंपळशेंडे, प्रभाकर काळे, राजू पिंपळशेंडे, कवडू नैताम यांनी डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या हस्ते लिंबू सरबत पिऊन उपोषण मागे घेतले.

    या प्रसंगी आमदार डॉक्टर सुधीर मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात मनोज सिंघवी, साजिद शेख, सोहम बुटले, धनराज कोवे, प्रलय सरकार, ढवळे, अमित निरंजने, उमेश आष्टणकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

    प्रशासन आणि कंपनी यांच्यातील या चर्चेनंतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना योग्य तो प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

  • Chlorine Gas Leak | रहमत नगरमध्ये क्लोरीन वायू गळती: महिन्यानंतरही प्रशासन झोपेत!

    Chlorine Gas Leak

    Chlorine Gas Leak : चंद्रपूर 16 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा): येथील रहमत नगर परिसरातील रहिवाशांसाठी एक मोठी आणि गंभीर समस्या समोर आली आहे. CSTPS च्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून (Sewage Treatment Plant – STP) झालेल्या क्लोरीन वायू गळतीमुळे अनेक नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. घटनेला महिना उलटूनही दोषींवर कारवाई झाली नसल्याने, स्थानिकांनी आणि AIMIM पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. Rahmat Nagar Accident

    Also Read : चंद्रपूर जिल्ह्यात कलम 36 लागू

    काय आहे नेमके प्रकरण?

    • गंभीर घटना: दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी रहमत नगर परिसरात एसटीपीमधून क्लोरीन वायूची गळती सुरू झाली.
    • परिणाम: या विषारी वायूमुळे एका लहान मुलासह अनेक रहिवासी गंभीररित्या आजारी पडले. आजही काही लोकांची प्रकृती चिंताजनक आहे.
    • आश्वासन फोल: घटनेनंतर १८ सप्टेंबर २०२५ रोजी AIMIM चे जिल्हाध्यक्ष अमान अहमद यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. यावेळी अधिकाऱ्यांनी १५ दिवसांत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.

    प्रशासन ‘गाढ झोपेत’ असल्याचा आरोप

    आश्वासन देऊनही महिना उलटून गेला तरी कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे १५ ऑक्टोबर २०२५ रोजी AIMIM पक्षाचे पदाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले. Government Negligence

    • जिल्हाधिकाऱ्यांनी भेट नाकारल्यामुळे त्यांना निवासी उप-जिल्हाधिकारी (RDC) यांच्याकडे पाठवण्यात आले.
    • RDC यांनीही या संवेदनशील विषयावर चर्चा करणे टाळले आणि “आम्ही पाहू” असे मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेली, असा आरोप AIMIM ने केला आहे.

    AIMIM चा इशारा:

    या संपूर्ण प्रकरणावरून ‘रहमत नगरच्या रहिवाशांवर कुणी दयामाया दाखवत नाही’ आणि ‘शासन-प्रशासन गाढ झोपेत आहे’ असे स्पष्टपणे दिसून येते.

    AIMIM चे जिल्हाध्यक्ष अमान अहमद यांनी तीव्र संताप व्यक्त करत म्हटले की, “ज्या पद्धतीने आमच्या लोकांच्या जीवाशी खेळ केला गेला आहे आणि अधिकाऱ्यांनी जो मजाक उडवला आहे, तो आम्ही सहन करणार नाही. दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा मिळेपर्यंत आमचा लढा सुरू राहील. तसेच, हा एसटीपी प्रकल्प रहमत नगरमधून कायमस्वरूपी हटवला जावा, यासाठी आम्ही मोठे आंदोलन उभारू.”

    या घटनेमुळे रहमत नगरमधील नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण असून, ते न्याय आणि सुरक्षिततेच्या प्रतीक्षेत आहेत.

  • Chandrapur narcotics control 2025 । जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली नशामुक्त चंद्रपूर मोहिमेला गती

    Chandrapur narcotics control 2025

    Chandrapur narcotics control 2025 : चंद्रपूर, दि. 14 (News३४ वृत्तसेवा) : जिल्ह्यात अंमली प्रदार्थाची वाहतूक, साठवण, विक्री व सेवन करण्यास पुर्णपणे प्रतिबंध आहे. गत काही दिवसांत अंमली पदार्थाचा साठा जप्त करून संबंधितांविरुध्द कडक कारवाई करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्हा नशामुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन तत्पर आहे, असे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी सांगितले.

    Also Read : १६ ऑक्टोबर रोजी चंद्रपुरात सार्वजनिक सुट्टी

    जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय नार्को – कोऑर्डिनेशन समितीचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी पोलिस निरीक्षक अमोल काचोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक आदी उपस्थित होते. Chandrapur drug enforcement action

    अंमली पदार्थविरोधात जिल्हा प्रशासन तत्पर

    जिल्ह्यात अंमली पदार्थाच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच नशामुक्त चंद्रपूर जिल्हा करण्यासाठी ठोस पाऊले उचलली जात आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, अंमली पदार्था मुळे मानवी आरोग्यावर होणा-या दुष्परिणामांची मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने जनजागृतीपर मॅरेथॉन, रॅली, निबंध स्पर्धा, पथनाट्यातून तरुण पिढी तसेच महाविद्यालयीन युवकांना अवगत करावे. अन्न व औषध प्रशासन विभागाने जिल्ह्यातील रासायनिक कारखान्यांमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थाचे उत्पादन होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच बंद असलेल्या कारखान्यांची पोलिसांच्या मदतीने तपासणी करावी. जिल्ह्यातील मेडीकल स्टोअर्स मधून अशा प्रकारची ड्रग्ज विक्री होत तर नाही, याबाबत खात्री करावी.

    जिल्ह्यात तसेच आंतरराज्यीय सीमेवर शेतीमध्ये खसखस किंवा गांजा पिकाची लागवड होणार नाही, याबाबत कृषी विभागाने सजग असावे. बाहेरून येणा-या पार्सलवर टपाल विभागाने लक्ष ठेवावे. तसेच खाजगी कुरीअरची पोलिस विभागाने तपासणी करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी दिल्या.

  • tiger death railway crossing । सिंदेवाहीतील दुर्दैवी घटना: रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू

    tiger death railway crossing

    tiger death railway crossing : सिंदेवाही, ऑक्टोबर १३: गोंदिया-बल्लारशाह रेल्वे मार्गावरील सिंदेवाही-आलेवाही रेल्वे क्रॉसिंगजवळ रविवारी (आज) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या रेल्वेच्या धडकेत एका वाघाचा (Tiger Death) मृत्यू झाला आहे. ‘टी-४०’ (T-40) या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या वाघाचा जागीच मृत्यू झाल्याने वन्यजीवप्रेमींमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.

    Also Read : चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या ५६ जागांवरील सोडत

    नेमके काय घडले?

    मिळालेल्या माहितीनुसार, गोंदिया–बल्लारशाह पॅसेंजर ट्रेन या परिसरातून जात असताना हा अपघात झाला. वाघ रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना त्याला वेगात आलेल्या रेल्वेची जोरदार धडक बसली. सिंदेवाही रेल्वे स्टेशनचे स्टेशन मास्तर सोनू कुमार यांनी तत्काळ सिंदेवाहीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) अंजली सायंकार यांना घटनेची माहिती दिली.

    वनविभाग अधिकाऱ्यांनी माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

    वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल

    या दुर्घटनेनंतर वन विभागाने घटनास्थळी पंचनामा सुरू केला आहे. वाघाच्या मृत्यूची नेमकी कारणे आणि अपघात कोणत्या परिस्थितीत घडला, याची सखोल चौकशी (Detailed Investigation) वन विभागाकडून केली जात आहे.

    यावेळी सहायक वनसंरक्षक (ACF) गायकवाड, उपवनसंरक्षक (DCF) कुमारस्वामी, वनपरिक्षेत्र अधिकारी (RFO) अंजली सायंकार, नितीन गडपायले आणि वनविभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.Gondia Ballarpur tiger railway accident

    सिंदेवाही-आलेवाही पट्ट्यात वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे या मार्गावर रेल्वे प्रशासनाने गाड्यांचा वेग (Train Speed) कमी ठेवण्याबाबत वारंवार सूचना देऊनही अशा घटना घडत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या अपघातामुळे चंद्रपूर वन विभागात वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

  • BJP Chandrapur appointments 2025 । चंद्रपूर महानगरात BJP पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या – संघटनेला बळ

    BJP Chandrapur appointments 2025

    BJP Chandrapur appointments 2025 : चंद्रपूर १२ ऑक्टोबर (News३४ वृत्तसेवा) –  भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरात  विविध आघाड्यांवरील पदाधिकार्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी आणि समाजघटकांमध्ये अधिक प्रभावी संपर्कासाठी या नियुक्त्या महत्त्वपूर्ण ठरत आहेत. आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात सर्व नवनियुक्त पदाधिका-यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

    Also Read – राजुरा शहरातील मतदार यादीतील घोळ कायम

      यावेळी महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टुवार, महामंत्री रवि गुरुनुले, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, वंदना हातगावकर मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, सुमित बेले यांच्यासह भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-यांची उपस्थिती होती.

    विविध आघाडी प्रमुखाच्या नियुक्त्या

     या वेळी मुक्ता खांडे यांची अध्यक्षा, ओबीसी महिला आघाडी, चंद्रपूर महानगर,  प्रियंका चितोडे यांची युवती प्रमुख, चंद्रपूर महानगर,  ओमेशजी आयलू यांची अध्यक्ष तेलगू आघाडी, चंद्रपूर जिल्हा महानगर, कौसर खान यांची अध्यक्ष अल्पसंख्यांक महिला आघाडी, चंद्रपूर जिल्हा महानगर, सुजाता कापसे यांची अध्यक्षा तेलगू आघाडी, आणि रामकुमार आकापल्लीवार यांची अध्यक्ष झोपडपट्टी आघाडी म्हणून नियुक्ती करण्यात आली.

    या नव्या नियुक्त्यांमुळे भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बळकटीत आणखी वाढ होणार असून, समाजाच्या विविध घटकांमध्ये पक्षाचा विस्तार अधिक वेगाने होईल, असा विश्वास आमदार जोरगेवार यांनी व्यक्त केला. नव नियुक्त पदाधिकार्यांना त्यांनी संघटन अधिक मजबूत करण्याचे, समाजहिताचे कार्य जोमाने पुढे नेण्याचे मार्गदर्शन केले. तसेच सर्वांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देत, समाजसेवा आणि जनसंपर्काच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा जनमानसात पोहोचविण्याचे आवाहनही आमदार जोरगेवार यांनी केले.

  • Chandrapur road widening project । २० कोटींच्या निधीतून चंद्रपूरच्या मुख्य मार्गांचा कायापालट! रस्ता रुंदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

    Chandrapur road widening project

    Chandrapur road widening project : चंद्रपूर – शहरातील वाढता वाहतूक भार, ट्रॅफिकची समस्या, पाणीपुरवठ्याची गळती आणि रस्त्याच्या कडेला उभे असलेले वीज खांब यामुळे नागरिकांना होत असलेल्या अडचणींचा विचार करून, रस्ता रुंदीकरणाच्या कामांना गती देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे विविध विभागांची एकत्रित बैठक घेतली. त्यानंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकार्यांसह शहरातील मुख्य मार्गाची पाहणी केली.

    Also Read : ग्रामीण भागात पत्रकाराने केली महिलांची फसवणूक

    या बैठकीस महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग , वेकोली आणि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी या विभागांचा समावेश होता. यावेळी मनपा आयुक्त विद्या गायकवाड, महावितरणचे अधीक्षक अभियंता चिवंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अक्षय पगारे, मनपा शहर अभियंता रविंद्र हजारे, तसेच भाजप महानगर अध्यक्ष  सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्ष  छबू वैरागडे, संघटन महामंत्री नामदेव डाहुले,  माजी महापौर राखी कंचार्लावार, विधानसभा अध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, माजी नगर सेवक संजय कंचार्लावार, करणसिंह बैस आदी उपस्थित होते.

    road expansion

    बैठकीनंतर आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांसह शहरातील कस्तुरबा आणि महात्मा गांधी या दोन मुख्य मार्गांची पाहणी केली. त्यांनी सांगितले की, २० कोटी रुपयांतून या दोन्ही मार्गांचे काम सुरू असून आता अंतिम टप्प्यात शेवटच्या आवरणाचे काम सुरू होणार आहे. मात्र, हे काम होत असताना रस्त्यावर असलेले अतिरिक्त विद्युत खांब काढून रस्ते रुंद करण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले आहेत. road widening project in Chandrapur city challenges

    रस्ते प्रशस्त करा

    यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले की, रस्त्याकडेला उभे असलेले वीज खांब व गटारे यामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. यामुळे नागरिकांना आणि वाहनचालकांना सतत धोका निर्माण होतो. म्हणूनच हे खांब तातडीने हलवून रस्ते प्रशस्त करावेत. अनेक ठिकाणी पाणी गळतीमुळे रस्त्यांचे नुकसान होत आहे आणि नागरिकांच्या घरासमोर चिखल व घाण साचते. संबंधित विभागांनी त्वरित तपासणी करून यांची दुरुस्ती करावी. municipal authority road expansion plans

    केवळ रस्ते बनवणे हे आपले उद्दिष्ट नाही, तर नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि सुखदायी प्रवासाचा अनुभव देणे हे आपले ध्येय आहे. त्यामुळे सर्व विभागांनी समन्वयाने काम करून गुणवत्तापूर्ण आणि वेळेत काम पूर्ण करावे, असेही आमदार जोरगेवार यांनी सांगितले.वेकोली अंतर्गत येणाऱ्या मार्गांचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे आणि महावितरणने रस्त्यावर केलेले खोदकाम दुरुस्त करून उर्वरित काम तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.