Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • चंद्रपूर शहरात पास्टर्स असोसिएशनचा निषेध मोर्चा

    News34

    चंद्रपूर – मे महिन्यापासून देशातील मणिपूर येथे सुरू झालेला हिंसाचार आजही सुरूच आहे.
    या हिंसाचार दरम्यान मणिपूर येथे भयावह घटना घडली, 2 महिलांची नग्न धिंड काढत त्यांच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला.

     

    ही घटना देशाला लाजविणारी होती, या घटनेचे पडसाद देशात मोठ्या प्रमाणात पडले, अनेक ठिकाणी या घटनेचा नागरिकांनी निषेध दर्शविला.

    7 ऑगस्ट ला चंद्रपूर शहरात डिस्ट्रिक्ट पास्टर्स असोसिएशनच्या वतीने मणिपूर हिंसेविरोधात भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातील गांधी चौकातून शहरातील मुख्य मार्गावरून जिल्हाधिकारी कार्यालय पोहचला.

    आयोजित निषेध मोर्च्यात पास्टर्स प्रभाकर कंडे, मोहित सक्सेना यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी विविध मागण्यांचे यांना निवेदन देण्यात आले.

    डिस्ट्रिक्ट पास्टर्स असोसिएशनच्या मागण्यांबाबत माहिती देताना सांगितले की देशात सध्या विविध धर्मात तेढ लावण्याचे काम सुरू आहे, अल्पसंख्याक समाजाला यामध्ये टार्गेट करण्यात येत आहे, मणिपूर मध्ये जी घटना घडली ती अख्ख्या जगाला लाजवून सोडणारी आहे या घटनेचा आम्ही पास्टर्स असोसिएशन निषेध करतो.

  • OBC समाजाला भाजपने न्याय देण्याचं काम केलं – हंसराज अहिर

    News34

     

    चंद्रपूर- ओबीसींच्या हिताचे कुणी कितीही दावे, प्रतिदावे केले तरी ओबीसींना खऱ्या अर्थाने सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व विविध क्षेत्रातील उन्नतीला भाजपानेच न्याय दिला आहे. जेव्हा मंडल शिफारसी स्विकारल्या गेल्या तेव्हा व्हीपींच्या सरकारसोबत भाजप होती.

    देशात ओबीसी आयोगाची स्थापना झाली तेव्हापासून या आयोगाला अधिकारच नव्हते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ओबीसींच्या हितासाठी या आयोगाला संविधानिक अधिकार बहाल केले तेव्हापासून या घटकांची प्रगती वेगाने होवू लागली आहे. त्यामुळे भाजप हाच ओबीसींचा रक्षणकर्ता व विश्वास व्यक्त करता येईल असा एकमेव राजकीय पक्ष असल्याने ओबीसी वर्गातील तमाम बांधवांनी बांधीलकीतून आपल्या न्याय हक्काकरीता भाजपासोबत यावे असे आवाहन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष, पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी भाजपा ओबीसी मोर्चाच्या कार्यकर्ता मेळाव्यास संबोधित करतांना केले.

    भाजपा ओबीसी मोर्चा चंद्रपूर महानगरच्या वतीने स्थानिक जैन भवन येथे दि. 5 ऑगस्ट रोजी आयोजित या कार्यक्रमास भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष तथा सत्कारमुर्ती संजय गाते, प्रदेश ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी डी.डी. सोनटक्के, तामेश्वर गहाणे, प्रदेश सदस्य विजय राउत भाजपा नेते प्रमोद कडू, भाजपा जिल्हामहामंत्री ब्रिजभूषण पाझारे, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष राहूल पावडे, माजी महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, महानगर जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर, प्रकाश बगमारे, अनिल फुलझेले, रवि गुरनूले, रघूवीर अहीर, ओबीसी मोर्चा महानगराध्यक्ष विनोद शेरकी, राजू घरोटे, जुम्मन रिजवी, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, विशाल निंबाळकर, अरुण तिखे, वंदना संतोषवार, रत्नमाला भोयर, आदी पदाधिकारी, व्यासपीठावर उपस्थित होते.

    आपल्या भाषणात अहीर म्हणाले की, ओबीसी आयोगाच्या माध्यमातून संविधानिक अधिकारामुळे ओबीसींना न्याय मिळत आहे. नोकरी, शिक्षण व अन्य क्षेत्रातील अन्यायाची दखल आयोगाद्वारे घेतली जात आहे. आदेशाद्वारे न्याय मिळवून देण्यात येत आहे. मोदीजींनी ओबीसींना सन्मान दिल्यानेच हे शक्य झाले आहे. आज जे ओबीसीबद्दल कळवळा दाखवित आहेत त्यांना काही करता आले नाही त्यासाठी मोदीजींचे सरकार यावे लागले. म. फुले, शाहू महाराज आरक्षणाचे पुरस्कर्ते होते. आज मुस्लिम समाजातील ओबीसी मध्ये असलेल्यांना आरक्षणाचा लाभ मिळत आहे. देशात समानतेचे वारे वाहू लागले आहेत.

    त्यांनी पुढे सांगितले की नरेंद्र मोदीजींनी ओबीसींच्या सन्मानात भर घातली आहे. केंद्रात 35 टक्के ओबीसी मंत्री आहेत. जर 2007 पासून वैद्यकीय शिक्षणात ओबीसी आरक्षण लागू असते तर अखिल भारतीय कोट्यामध्ये ओबीसी प्रवर्गातील डॉक्टरांची संख्या वाढली असती केले, आज वैद्यकीय शिक्षणातच नव्हे तर अन्यत्र सुध्दा ओबीसींचा टक्का वाढला आहे. केंद्र सरकारने सबका साथ सबका विकास या न्यायाने राज्यकारभार चालविल्यामुळे समाजातील प्रत्येक लोकांना त्यांचे डावलले गेलेले हक्क मिळू लागले आहेत.

    अनेक योजनांचा लाभ जात, धर्म, पंथाच्या पलिकडे जाऊन सर्वांना मिळत आहे हे मोदींजींच्या सर्व समावेशक धोरणांची उपलब्धी असल्याचे अहीर यांनी स्पष्ट केले यावेळी त्यांनी अनेक विषयांना स्पर्श करीत ओबीसींच्या उत्थानाकरिता सरकार करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती उपस्थितांना दिली.

    ओबीसींच्या सामाजिक हक्क व उन्नतीकरीता समर्पितपणे कार्य करु- संजय गाते
    ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले ओबीसींचा उत्कर्ष केवळ भाजपाच करु शकतो त्यामुळे अनेक जाती-पोटजातीमध्ये विखुरलेल्या ओबीसी बांधवांनी संघठीत होवून आपल्या न्यायाच्या लढ्यासाठी पुढे आले पाहिजे. मा. मोदीजींनी ओबीसींचा स्वाभीमान जागृत केला त्यांच्या न्याय हक्कासाठी अनेक महत्वाकांक्षी निर्णय घेतले. भाजपा महायुती सरकारने ओबीसींना अनेक बाबतीत न्याय देणारे धोरणात्मक निर्णय घेतले आहेत त्यामुळे भाजपा नेतृत्वात केंद्र व राज्यात सत्ता पुनर्स्थापित करण्यासाठी ओबीसी घटकांनी भाजपासोबत भक्कमपणे उभे राहावे असे आवाहन केले. हंसराज अहीर संवैधानिक दर्जा लाभलेल्या ओबीसी आयोगाचे अध्यक्ष असल्याने त्यांच्या कारकिर्दीत ओबीसी बांधवांना न्याय मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. भाजप श्रेष्ठींनी सोपविलेल्या जबाबदारीला न्याय देण्यासाठी आपण ओबीसीचे संघठन मजबूत करु समाजातील प्रत्येक घटकांना न्याय देण्याकरिता पदाचा वापर करण्याची ग्वाहीसुध्दा संजय गाते यांनी उपस्थित ओबीसी बांधवांना दिली.
    प्रारंभी ओबीसी मोर्चाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांचा हंसराज अहीर व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नवनियुक्त भाजप पदाधिकारी मान्यवर अतिथी व ओबीसी प्रवर्गातील अनेक समाज बांधवांचा उपस्थितांनी सन्मान केला.
    या प्रसंगी अन्य मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शशिकांत मस्के यांनी तर पाहूण्यांचे आभार विनोद शेरकी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप किरमे, शैलेश इंगोल, सुभाष आदमने, पराग मलोडे, मुग्धा खांडे, सचिन संदूरकर, सुभाष ढवस, सुधाकर बोंडे, दिपक झोरे, मधुकर राऊत, राम हरणे, शाम बोबडे, शालू कनोजवार, संगिता सुर्यवंशी, मोनीका महातव, मयुर भोकरे, अरुणा चौधरी यांचे सह अनेकांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास चंद्रपूरसह जिल्हातील बहूसंख्य ओबीसी बंधू भगिनी व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
  • चंद्रपुर जिल्ह्यातील नागरिकांनी तब्बल 333 कोटी रुपयांचा केला भरणा

    News34

     

    चंद्रपूर : महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलामध्ये ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यासाठी चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या वर्षभरामध्ये १६ लाख ७६ हजार ९३८ वीजग्राहकांनी तब्बल ४२४ कोटी ६६ लाख ४० हजार रुपयांचा रांगेत उभे न राहता व सुरक्षितपणे ‘ऑनलाइन’ भरणा केला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील १२ लाख ३१ हजार ग्राहकांनी ३३३ कोटी रुपयांचा तर गडचिरोली जिल्ह्यातील ४ लाख ४५ हजार ८७० ग्राहकांनी ६६ कोटी १८ लाख रुपयांचा घरबसल्या ‘ऑनलाइन’ वीजबिल भरणा केला आहे.

     

    गेल्या जुलै २०२२ ते जुलै २०२३ च्या आकडेवारीनुसार सद्यस्थितीत चंद्रपूर परिमंडलामध्ये वीजबिलांपोटी दरमहा १ लाख ३९ हजार वीजग्राहक ३५ कोटी ५५ लाख रुपयांचा ‘ऑनलाइन’ भरणा करीत आहे. चंद्रपूर परिमंडलामध्ये ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यात ग्राहकांची पसंती वाढत आहे. ‘ऑनलाइन’ भरणा केलेली पावती मोबाईल किंवा संगणकात जतन करून ठेवता येते व कधीही प्रिंट काढता येते. त्यामुळे जास्तीत जास्त वीजग्राहकांनी ‘गो-ग्रीन’ योजनेला व ‘ऑनलाइन’ वीजबिल भरण्यास प्रतिसाद द्यावा असे आवाहन मुख्य अभियंता श्री. सुनील देशपांडे यांनी केले आहे.

     

    महावितरणकडून बिल भरणा केंद्राच्या रांगेत उभे राहण्याऐवजी किंवा कार्यालयीन वेळेतच वीजबिल भरण्याऐवजी ‘ऑनलाइन’द्वारे घरबसल्या व २४ तास वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध झाली आहे. यासाठी घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक व इतर लघुदाब ग्राहकांना www.mahadiscom.in ही वेबसाईट व मोबाईल अॅप उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच नोंदणीकृत खात्यातून स्वतःच्या एकापेक्षा अधिक कुठल्याही वीजजोडण्यांचे बिल ‘ऑनलाइन’ भरणे तसेच सर्व वीजजोडण्यांच्या वर्षभरातील मासिक बिलांचा तपशील व रक्कम भरल्याची पावती संगणकात किंवा मोबाईलमध्ये जतन करण्याची सोय उपलब्ध आहे. ‘ऑनलाइन’ वीजबिल भरणा केल्यानंतर संबंधीत ग्राहकांना लगेचच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे पोच देण्यात येत आहे.

     

    लघुदाब घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर वीजग्राहकांनी क्रेडिट/डेबीट कार्ड, यूपीआय, भीम, इंटरनेट बँकींग, मोबाईल वॉलेटदवारे ‘ऑनलाइन’ वीजबिल भरल्यास दरमहा ५०० रुपयांच्या मर्यादेत प्रत्येक महिन्याच्या वीजबिलामध्ये ०.२५ टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच वीजबिलांचे प्रॉम्ट पेमेन्ट केल्यास एक टक्का असे एकूण १.२५ टक्के सूट वीजग्राहकांना देण्यात येत आहे. सोबतच लघुदाब ग्राहकांचे वीजबिल ५ हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास ते आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे भरण्याची सोय आहे. तसेच मा. विद्युत नियामक आयोगाच्या आदेशानुसार दि. १ ऑगस्टपासून महावितरणचे वीजबिल रोखीन भरण्यासाठी ५ हजार रुपयांची कमाल मर्यादा लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यापेक्षा अधिक रकमेचे वीजबिल सुरक्षित व घरबसल्या भरण्यासाठी महावितरणची ‘ऑनलाइन’ सुविधा उपलब्ध आहे.

    महावितरणचे महापॉवर वालेट
    आता किराणा दुकान, मेडिकल मध्येही वीजबिल भरता येईल

    याव्यतिरिक्त वीजबिलाचा भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने स्वतःचे पेमेंट वॉलेट सुरू केले असून आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या पतसंस्था तसेच किराणा, मेडीकल व जनरल स्टोअर्स चालकांना वॉलेटधारक होता येईल. यातून वीज ग्राहकांना विशेषतः ग्रामीण भागात वीजबिलाचा भरणा करणे सुलभ होण्यासह प्रतीबिल पावतीमागे ५ रुपये उत्पन्न मिळविण्याची संधी वॉलेटधारकास मिळणार आहे.

     

    वॉलेटधारक होण्यास इच्छुक असणाऱ्या पतसंस्थांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, जीएसटी क्रमांक, गुमास्ता प्रमाणपत्र (शॉप ॲक्ट), पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट फोटो व रद्द केलेला धनादेश आदी आवश्यक कागदपत्रांच्या प्रती महावितरणच्या विभागीय कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. वॉलेटधारक महावितरणच्या ॲपमध्ये नोंदणी करून महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिलाचा भरणा करून घेऊ शकतील. वॉलेटमध्ये बिलाचा भरणा झाल्यानंतर संबंधित ग्राहकाच्या नोंदणीकृत मोबाईलवर बिल भरणा झाल्याचा एसएमएस पाठविण्यात येईल. एकाच वॉलेटचा बॅलन्स वापरून विविध लॉग-ईनद्वारे वेगवेगळ्या व्यक्तींकडून वीजबिलाचा भरणा करून घेण्याची सुविधा आहे. त्याचा लेखाजोखा व कमिशन महिनाअखेर मुख्य वॉलेटमध्ये जमा केले जाईल.

  • प्रशासकीय इमारतीला लागलेली आग घातपात तर नाही ना? शोध घ्या – पालकमंत्री मुनगंटीवार

    News34

     

    चंद्रपूर – रविवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर लागलेल्या आगीच्या चौकशीचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहेत.

     

    चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या प्रशासकीय इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर रविवारी पहाटे सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन यांचे कार्यालयाला आग लागली. आगीत कार्यालयातील फाईल्स, फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले. ही आग कशामुळे लागली त्याचे नेमके कारण शोधावे तसेच यामागे कोणत्या घातपातीचा तर हात नाही, याचाही शोध यंत्रणेने घ्यावा, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

     

    पहाटेच्या दरम्यान अन्न व औषध प्रशासन कार्यालयातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच तातडीने फायर ब्रिगेडला प्रचारण करण्यात आले. यात फायर ब्रिगेडच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. त्यामुळे आगीचे लोन इमारतीतील इतर कार्यालयांत पसरले नाही. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. यात कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाले नसल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

     

  • चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनला मिळाला 80 कोटी रुपयांचा निधी

    News34

    चंद्रपूर- देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असतांना प्रधानमंत्री मान. नरेंद्र मोदी जी यांच्या कार्यकाळात अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत देशभरातील 1309 रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास करण्याचे ऐतिहासिक कार्य होत असून पहिल्या टप्प्यात 508 रेल्वे स्थानकांचा अत्याधुनिक सोयीसुविधांसह विकास होत असून गोंडकालीन वैभव प्राप्त चंद्रपूरातील चंद्रपूर रेल्वे स्टेशन, चांदा फोर्ट व बल्हारशाह या स्थानकांचा विकास 80 कोटी निधीतून होत आहे. त्याबद्दल मा. मोदीजींचे मनःपूर्वक आभार मानतोे.

    हे कार्य चंद्रपूर जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांकरीता अनमोल भेट असून केंद्र शासनाचा हा महत्वाकांक्षी उपक्रम एकप्रकारे महोत्सव असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी प्रधानमंत्री मोदीजींच्या शुभहस्ते होऊ घातलेल्या व्हीडीओ काॅन्फ्रेन्सिंग द्वारे भूमीपूजन सोहळ्यापूर्वी आयोजित कार्यक्रमास संबोधित करतांना केले.

    अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत चंद्रपूर रेल्वेस्थानकाचा पूनर्विकास या दिमाखदार भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी चंद्रपूर रेल्वे स्टेशनच्या वतीने दि 06 ऑगस्ट 2023 रोजी आयोजित विविध कार्यक्रमास उपस्थित नागरीकांना हंसराज अहीर संबोधित होते. याप्रसंगी चंद्रपूर चे आ. किशोर जोरगेवार, एमईएल कार्यकारी संचालक के. रामकृष्ण, चंद्रपूर महापालिकेचे आयुक्त विपीन पालिवाल,चंद्रपूर महाऔष्णीक केंद्राचे मुख्य अभियंता गिरीष कुमारवार, रेल्वेचे सिपीएम विनोद बंगाले, स्टेशन मास्टर एस.आर.देवगडे, विजय राऊत, रमणिकभाई चव्हाण, राखीताई कंचर्लावार, डाॅ मंगेश गुलवाडे, रघुवीर अहीर, पूनम तिवारी आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

    याप्रसंगी बोलतांना हंसराज अहीर म्हणाले की, प्रधानमंत्र्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून लोकांच्या मनात असलेल्या मागणीची या योजनेच्या माध्यमातून परिपूर्ती होणार आहे. या पूनर्विकास योजनेअंतर्गत चंद्रपूर स्टेशनकरीता 27.66 कोटी, चांदा फोर्ट करीता 16.00 कोटी व बल्हारशाह करीता 34 कोटी निधी मंजूर झाला असून या योजनेअंतर्गत प्रवाशांच्या सोयीकरीता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहे. सरकारच्या गतिमान धोरणांस अभिप्रेत असलेले हे काम गुणवत्तापूर्ण व निर्धारीत वेळेतच पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    चंद्रपूर जिल्ह्यातील प्रवाशांकरीता रेल्वेच्या अनेक सोयी-सुविधा देता आल्या मात्र कोरोना काळात दुर्भाग्याने अनेक महत्वाच्या गाड्या बंद पडल्या त्या पूर्ववत करण्याचा कसोशिने प्रयत्न करु,. तिसऱ्या लाईनचे काम पूर्ण होत आहे, पिटलाईन पूर्णत्वास आली असल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना सोयीच्या ठरणाऱ्या अनेक गाड्या बल्हारशाह येथून सुटणार आहेत. आपल्या ऋणांची परतफेड करणे हे कर्तव्य असून त्याकरीता सदैव कटिबध्द राहील. चंद्रपूर, बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकांचा पूनर्विकास पहिल्या टप्प्यात होत आहे हा सौभाग्याचा क्षण आहे.

    यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन त्यांच्या व मान्यवर अतिथिंच्या शुभहस्ते विद्याथ्र्यांना भेटवस्तू देण्यात आली.
    या प्रसंगी आ. किशोर जोरगेवार यांनी केंद्र सरकारच्या या योजनेचे स्वागत करुन हंसराज अहीर यांच्या विशेष प्रयत्नातून अमृत भारत योजनेत तेही पहिल्या टप्प्यात चंद्रपूर, चंादा फोर्ट व बल्लारपूर रेल्वे स्टेशन अत्याधुनिक सोयींनी स्वयंपूर्ण होणार असल्याचे सांगीतले.

    या कार्यक्रमास राजू घरोटे, राजेंद्र अडपेवार, संजय कंचर्लावार, विनोद शेरकी, सुभाष कासनगोट्टुवार, संदीप आवारी, रवि आसवानी, विठ्ठल डुकरे, दिनकर सोमलकर, रवि लोणकर, वंदना संतोषवार, गौतम यादव, सुदामा यादव यांचेसह रेल सुविधा संघर्ष समितीचे रमेश बोथरा, नरेंद्र सोनी, डाॅ गोपाल मुंधडा, डाॅ भूपेश भलमें व शहरातील विविध क्षेत्रातील गनमान्य नागरीक उपस्थित होते.

  • अमृत भारत योजने अंतर्गत होत असलेला रेल्वे स्थानकांचा विकास औद्यागीक जिल्ह्यासाठी वरदान ठरेल – आमदार किशोर जोरगेवार

    News34

    चंद्रपूर – चंद्रपूर हा ऐतिहासीक जिल्हा आहे. सोबतच औद्योगिक जिल्हा म्हणूनही या जिल्ह्याची ओळख आहे. राज्य भरातून येथे कामगार वर्ग स्थायी झाला आहे. रेल्वे हे त्यांच्या प्रवासाचे मुख्य साधन आहे. औद्योगिक करणालाही गतीशील करण्यात रेल्वेचे विशेष योगदान राहिले आहे. त्यामुळे अमृत भारत योजने अंतर्गत 508 रेल्वे स्थानकांचा होणार असलेला विकास चंद्रपूर जिल्ह्यासह सर्व औद्योगीक जिल्ह्यांसाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    अमृत भारत योजने अंतर्गत 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर मुख्य रेल्वे स्टेशन येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मागासवर्गीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, मनपा आयुक्त विपिन पालीवाल, रेल्वे स्टेशन प्रबंधक एस. आर देवगडे, रेल्वे अधिकारी सुभाष यादव, जिल्ह सिएसटीपीएसचे मुख्य अभियंता कुमरवार, रमनिक चैव्हाण, रेल्वे विभागाचे चिफ कमर्शिअर इन्स्पेक्टर क्रिष्णा कुमार सेन, माजी महापौर राखी कंचर्लावार, विजय राऊत, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटीका वंदना हातगावकर आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

    या कार्यक्रमात पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूर जिल्ह्याचे ऐतिहासिक धार्मिक, सामाजिक, औद्योगीक असे महत्व आहे. देशात असलेल्या दोन दिक्षाभुमी पैकी एक दिक्षाभूमी चंद्रपूरात आहे. येथे सिमेंट, कोळसा, लोहखनीज असे मोठे उद्योग आहे. येथे 500 हजार मेगावॅट विद्युत निर्मीतीचे केंद्र आहे. जगप्रसिद्ध ताडोबा अभयारण्य येथे आहे. त्यामुळे देश विदेशातील पर्यटक चंद्रपूरात येत असतात रेल्वे हेच त्यांच्या प्रवासाचे मुख्य साधन आहे. त्यामुळे या स्थानकांवर उतरताच त्यांना चंद्रपूरच्या संस्कृतीचे सुंदर चित्र दिसायला हवे असे ते यावेळी म्हणाले.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील चंद्रपूर आणि बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकांचा विकास होत आहे. या विकासामुळे चंद्रपूरच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे. प्रवाशांना आता येथे अधिक सुविधा मिळतील. येणा-या पर्यटकाला पून्हा चंद्रपूरात याव अस वारंवार वाटेल असे संदर रेल्वे स्थानक येथे उभे राहिल असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलून दाखविला. येथील रेल्वे स्थानकांवर विविध रेल्वे गड्यांचा थांबा असला पाहिजे असे ही यावेळी बोलताना ते म्हणाले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • चंद्रपूर शहर बनले समस्यांचे माहेरघर

    News 34

    चंद्रपूर शहर सध्या समस्यांचे माहेरघर झाल्याचे दिसून येत आहे,शहरात ठीक ठिकाणी मोठं मोठे खड्डे पडले असून नागरिकांना पायदळ किंवा वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते.

    रस्त्यावरील खड्ड्या मुळे दररोज अपघात सुद्धा होत आहेत, त्याचप्रमाणे आता पावसाळा सुरू आहे आणि थोडा जरी पाऊस आला तर शहरात नदीचे रूप बघायला मिळते त्यामुळे शहरात सर्वत्र दुर्गंधीचे वातावरण पसरते.

    Pub-G च्या नादात मुलाने केली आई-वडिलांची हत्या

    नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत, बाबूपेठ प्रभाग तर समस्यांचे माहेरघर आहेत,बाबूपेठ गेट ते फुले चौकापर्यंत खडेच खड्डे आहेत, नालीवर झाकण नसल्यामुळे सर्वत्र घाण रस्त्यावर येतात,अमृत योजनेतून रस्ता फोडल्यामुळे नागरिकांना ये जा करण्यास अडथळे निर्माण झाले आहेत.

    या सर्व समस्याला वाचा फोडण्यासाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी,चंद्रपूर शहर जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्ष सौ चंदाताई वैरागडे यांचे नेतृत्वात तसेच उपस्थितीत उपायुक्त महानगर पालिका चंद्रपूर यांना निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.

    यावेळी उपायुक्त यांनी आयुक्त साहेब नसल्यामुळे मी आपण निवेदनात दिलेल्या सर्व समस्या आयुक्तांच्या निदर्शनास आणून देतो आणि नक्कीच मार्गी लावतो असे शिस्टमंडळाला सांगितले. यावेळी शिष्ट मंडळाणी उपायुक्त याना जर या समस्या वेळेत सुटल्या नाही तर काँग्रेस पक्षातर्फे महानगर पालिका प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन केल्या जाईल असा इशारा दिला.

    यावेळी महिला काँग्रेस च्या प्रदेश पदाधिकारी अश्विनीताई खोब्रागडे,ओबीसी विभाग प्रदेश सरचिटणीस प्राचार्य नरेंद्र बोबडे, काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग जिल्हाध्यक्ष राहुल चौधरी माजी नगरसेविका विनाताई खनके,सकिनाताई अन्सारी,वंदनाताई भागवत ,अनुसूचित जाती विभागाच्या जिल्हा अध्यक्ष निशाताई ढोंगळे अल्पसंख्याक विभागाच्या महिला पदाधिकारी मुन्नीताई शेख ,महिला काँग्रेस च्या जयश्री जाधव ,सुवर्णा भारस्कर,अंजु वैरागडे ,लीला बुटले,तेजस्विनी पोडे, शीतल लेडांगे,यांचे सह महिला काँग्रेस कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • वनमंत्री मुनगंटीवार यांची विधानपरिषदेत मोठी घोषणा

    News34

    चंद्रपूर – वन्यप्राण्यांच्या, हल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू झाल्यास, कायम अपंगत्व आल्यास, गंभीर आणि किरकोळ जखमी झाल्यास शासनाकडून देण्यात येणाऱ्या अर्थसाह्यात भरीव वाढ करण्यात आली असून यापुढे अश्या दुर्घटनेत व्यक्ती मृत  पावल्यास त्याच्या वारसांना 25 लक्ष रुपये अर्थसहाय्य देण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेत केली.

    यासंदर्भात शुक्रवारी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सभागृहात निवेदन करताना स्पष्ट केले की, राज्यात वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झालेली असून मानव वन्य जीव संघर्षामध्येही वाढ होत आहे . हा संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येत असून डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन-विकास योजने अंतर्गत स्थानिक जनतेचे वनावरील अवलंबन कमी करण्याचा प्रयत्न वनविभागाकडून सुरू आहे.

    मनुष्यहानीच्या वाढत्या घटनांमुळे कुटुंबातील व्यक्तीच्या मृत्यूमुळे, व्यक्तीला गंभीर अपंगत्व आल्यामुळे त्या कुटुंबाचे मोठे नुकसान होते; याची दखल शासनाने संवेदनशीलपणे घेतली आहे.

    यांसंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्यानुसार व्यक्तीला कायम अपंगत्व आल्यास 7 लाख 50 हजार रुपये, व्यक्ती गंभीररित्या जखमी झाल्यास 5 लाख रुपये आणि किरकोळ जखमी झाल्यास त्याला औषधोपचारासाठी येणार खर्च देण्यात येणार आहे.  03 ऑगस्ट, 2023 रोजी हा निर्णय निर्गमित केला असून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यासंदर्भात घोषणा केली.

    ना. मुनगंटीवार आपल्या निवेदनात म्हणाले की, सध्याच्या आर्थिक तरतूदीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू, कायमस्वरुपी अपंगत्व, गंभीर जखमी व किरकोळ जखमी व्यक्तीला द्यावयाची आर्थिक मदत त्या मानाने कमी असल्याबाबत व त्यामध्ये वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. लोकप्रतिनिधींकडून आर्थिक सहाय्यामध्ये वाढ करण्याबाबत मागणीही  होती. त्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला.

    वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे  व्यक्ती मृत्यू पावल्यास त्याच्या वारसांना 25 लक्ष रुपये आर्थिक सहकार्य करण्याच्या निर्णयामुळे अनेक कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. किरकोळ जखमी झाल्यास त्याला औषधोपचारासाठी येणार खर्च देण्यात येणार आहे. मात्र, खाजगी रुग्णालयात औषधोपचार करणे अगत्याचे असल्यास त्याची मर्यादा रुपये 50 हजार प्रति व्यक्ती अशी राहील. शक्यतो औषधोपचार शासकीय किंवा जिल्हा रुग्णालयात करावे, असे नमूद शासन निर्णयात करण्यात आले आहे.

    वाघ,  बिबट्या, अस्वल, गवा (बायसन), रानडुक्कर, लांडगा, तरस, कोल्हा, मगर, हत्ती, रानकुत्रे (ढोल), रोही (निलगाय) व माकड / वानर यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी झाल्यास मृत्यू, कायम अपंगत्व, गंभीर जखमी, किरकोळ जखमी या वर्गवारीनुसार अर्थसहाय्य संबंधितांना अदा करण्यात येते. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात अनेक वेळा मनुष्य मृत्यू होत नाही, परंतु गंभीर किंवा किरकोळ जखमी होतात. जखमी व्यक्तीला योग्य व तातडीचे उपचार मिळावेत व ते प्राथमिकतेने शासकीय रुग्णालयात मिळावेत याबाबत प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतात व मानवी जीव वाचविण्यात येतो. काही वेळा उपयुक्त संसाधन युक्त शासकीय रुग्णालय जवळ उपलब्ध नसते व अशा प्रसंगी जखमी व्यक्तीला खाजगी रुग्णालयात जाऊन तातडीचा उपचार करावा लागतो.

    असे मिळेल अर्थसहाय्य

    वन्यप्राणी हल्ल्यामुळे मृत व्यक्तीच्या वारसांना देण्यात येणा-या रक्कमेपैकी रुपये 10 लाख देय असलेल्या व्यक्तीला तात्काळ धनादेशाद्वारे व उर्वरित रक्कम रुपये 10 लाख पाच वर्षांकरिता फिक्स डिपॉझीटमध्ये ठेवावे आणि उर्वरित पाच लाख रुपये 10 वर्षाकरिता फिक्स डिपॉझीटमध्ये ठेवावे. दहा वर्षांनंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळेल, असे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.