Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • स्वातंत्र्य दिनाला फिरण्याची हौस जीवावर बेतली

    News34

    गडचांदूर/कोरपना – 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिन आज सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात आला, यादिवशी अनेक नागरिक फिरायला बाहेर पडतात मात्र फिरण्याची ही हौस एका युवकाच्या जीवावर बेतली.

    जिल्ह्यातील अनेक भागात पाण्याचे धबधबे पाहण्यास आज असंख्य नागरिकांनी गर्दी केली होती, अश्यातच गडचांदूर येथील अमलनाला डॅम येथे वेस्ट वेअर जवळ नागरिकांनी गर्दी केली.

    चंद्रपुर शहराजवळील दाताला येथील काही युवक अमलनाला धरणाजवळ फिरण्यासाठी आले होते, दुपारी 2 वाजताच्या सुमारास 32 वर्षीय शुभम शंकर चिंचोळकर या युवकाने डॅम च्या वेस्ट वेअर पाण्यात उडी मारली मात्र शुभम ला खोलाचा अंदाज आला नसल्याने तो पाण्यात बुडाला.

    शुभम बाहेर न आल्याने मित्रांनी मदतीची हाक मारली, पोलिसांना सूचना देण्यात आली असता तात्काळ गडचांदूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

    काही वेळात पोलिसांनी शुभम चा मृतदेह बाहेर काढला, स्वातंत्र्य दिनी ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आहे.

    पावसाळ्यात अमलनाला धरण पाण्याने भरल्यानंतर त्या ठिकाणातून वेस्ट वेअर परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणात येत असतात, मागील वर्षी याच ठीकाणी दोन तरुणांचा बुडून मृत्यू झाला होता. एपीआई प्रमोद शिंदे यांच्या पथकाने मृतदेह बाहेर काढला असून पुढील तपास गडचांदूर पोलीस करीत आहे.

  • News34 सुरू करण्याची ही होती संकल्पना

    News34

    चंद्रपूर – 15 ऑगस्ट 2018 ला चंद्रपूर शहरातून सुरू झालेलं News34 पोर्टल आज 5 वर्षाचं झालं, अनेक अडचणींचा सामना करीत News34 ने अविरत वाचकांना रोजच्या घडणाऱ्या घडामोडीबद्दल अचूक माहिती पोहचवली.

    हे news पोर्टल सुरू झालं कस यामागील काय कहाणी आहे हे आज आम्ही आपल्याला सविस्तर सांगणार आहोत.

    चंद्रपूर शहर असो की ग्रामीण भाग आज असंख्य पत्रकार विविध वृत्तपत्रात कार्य करीत आहे, पण आयुष्यात अशी वेळ येते की आपली महत्वाची बातमी वगळण्याचं काम वरिष्ठ करीत असतात.

    आपण न्याय देण्याचा उद्देशाने बातम्या लिहतो पण जेव्हा ती बातमी प्रकाशीत होत नाही त्यावेळी कुठेतरी आपलं मन दुखतं.

    ही गोष्ट आहे चंद्रपुरातील 5 मित्रांची प्रकाश, अमित, राजेश, अभिषेक व राकेश यांची, हे पाचही मित्र वेगवेगळ्या माध्यमात काम करतात.

    या 5 मित्रांनी मिळून आपण एक बातम्यांची वेबसाईट सुरू करूया अशी संकल्पना आपसात मांडली, मग याला खर्च किती येणार? नाव काय असणार? दररोज अपडेट कसे व कोण करणार याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

    वर्ष 2018 तो काळ, सर्वांनी जुळवाजुळव करीत पैसे जमविले, मग नाव ठरलं, नाव ठरविण्यासाठी तब्बल 1 महिना लागला हे विशेष.

    News34 नावाची वेबसाईट तयार झाली, आधी अमरावती येथील डेव्हलपर ने या कामात मदत केली, 15 ऑगस्ट 2018 ला पत्रकार संघाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाची पहिली बातमी या वेबसाईटवर प्रकाशित झाली.

    हळूहळू वाचक संख्या वाढत गेली, चंद्रपूर शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक अपडेट माहिती वेबसाईटवर प्रकाशित व्हायला लागली, मात्र काही प्रस्थापती पत्रकार News34 ची थट्टा करू लागले होते, काय हे व्हाट्सअप ग्रुप वर लिंक टाकता? असे म्हणत ते हिनवू लागले. मात्र आहे तेच पत्रकार लिंक शेअर करताना दिसत आहे.

    मात्र त्या टीकेला अपडेट बातमी सहित प्रकाशित करण्याचं काम थांबलं नाही, वर्ष 2019 चा काळ आला, वेबसाईट ची होस्टिंग रिन्यू करण्याची वेळ आली, पैश्याची कमतरता मग काय करायचं? 5 पैकी 4 मित्र आपल्या कामात गुंतले.

    कसतरी जुळवाजुळव करून news34 सुरू झालचं, मात्र कालांतराने सदर जबाबदारी 5 पैकी एकावर आली, 2 वर्षे अविरत बातमी प्रकाशित करण्याचं काम सुरूच राहिले, मात्र कालांतराने अमरावती मधील डेव्हलपर कडून वेबसाईट काढण्यात आली, दुसऱ्याकडे वेबसाईट शिफ्ट करण्याची वेळ आली मात्र त्या काळात पैश्याची समस्या निर्माण झाली.

    पण एका जवळच्या मित्राने आपली आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना सुद्धा पैश्याची मदत केली.

    News34 ची लोकप्रियता वाढली, हजारो वाचक दररोज news34 वेबसाईटला भेट देऊ लागले.

    आधी हजारो, लाखो आणि नंतर कोट्यवधी वाचक संख्येचा आकडा गाठला, News34 ची लोकप्रियता वाढत असताना काही प्रस्थापित पत्रकारांनी News34 वर खंडणी चे आरोप केले, मात्र आरोप करणारे तोंडघशी पडले. त्या पत्रकाराने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी News34 ची बदनामी केली हे निष्पन्न झाले होते.

    News34 ने अनेक जनसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत समस्या निराकरण करण्याचे काम केले, इतकेच नव्हे तर विधानसभा अधिवेशनात News34 च्या बातमीची चर्चा सुद्धा झाली होती, त्यानंतर त्या समस्येचे तात्काळ निराकरणही करण्यात आले.

    वर्ष 2022 ते 2023 ला चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचा डिजिटल माध्यमातील प्रथम पुरस्कार News34 ला मिळाला, 6 जानेवारी 2023 पत्रकार दिनाला मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते News34 चा सन्मान झाला.

    आज 5 पैकी एकचं News34 ची सर्व सूत्रे सांभाळत आहे, मात्र महत्वाच्या बातम्या प्रादेशिक व राष्ट्रीय पातळीवर प्रकाशित होत नसल्याने News34 चा सूर्योदय झाला होता.

    आज वाचकांचे आवडते लोकप्रिय News पोर्टल म्हणजे 34 आपल्या 6व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
    5 मित्रांची संकल्पना आज कोट्यवधी वाचक वर्गापर्यंत पोहचली हे मात्र खरे.

  • चंद्रपुरातील चौथ्या वर्गात शिकणाऱ्या इशिका ची उंच भरारी

    News34

    चंद्रपूर – चंद्रपूरची इशिका प्रमोद सहारे हिने महाराष्ट्र राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. दि. 4 ते 6 ऑगस्ट दरम्यान वसई मुंबई येथे सम्पन्न झालेल्या स्पर्धेत इशिका उपविजेती ठरली. आ. हितेंद्र ठाकूर यांच्या शुभहस्ते तिने पारितोषिक स्वीकारले.

    दि. 23 जुलै रोजी झालेल्या चंद्रपूर जिल्हा स्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत इशिका सहारे हिने तृतीय क्रमांक पटकावत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली. राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांकावर मोहोर उमटवत इशिकाने चंद्रपूर जिल्ह्याची मान अभिमानाने उंच केली आहे.

    स्थानिक माउंट कारमेल कॉन्व्हेंट मध्ये 4 थ्या वर्गात शिकणाऱ्या इशिताने तिच्या यशाचे श्रेय आईवडील व शिक्षकांना दिले आहे. इशिकाचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

  • कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठाच्या व्यवस्थापन पदावर आमदार अडबाले

    News34

    नागपूर : विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांची राज्यातील एकमेव रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापतींनी ही नियुक्ती केली असून, राज्याचे अवर सचिव पुष्पा दळवी यांनी याबाबतचे पत्र जारी केले आहे.

    रामटेक येथील कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यापीठ हे राज्यातील तिसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर विधानपरिषदेच्या सदस्यांची उपसभापतींकडून नियुक्ती केली जाते. त्यानुसार नागपूर शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांची विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर नियुक्ती करण्यात आली आहे. ७ फेब्रुवारी २०२९ पर्यंत ही निवड राहणार आहे.

    या निवडी बद्दल आमदार सुधाकर अडबाले यांचे माजी आमदार व्‍ही.यु. डायगव्‍हाणे, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष श्रावण बरडे, प्रांतीय पदाधिकारी, जिल्‍हाध्यक्ष, जिल्‍हा कार्यवाह, जिल्‍हा पदाधिकारी, सदस्य व संस्कृत विद्यापीठ संलग्नित महाविद्यालय व्यवस्थापन संघाचे अध्यक्ष ॲड. मोहन वाहने, महासचिव प्रा डॉ दिलीप चौधरी, छात्रविर राजे संभाजी प्रशासकीय सेवा महाविद्यालय मोरवा चंद्रपूरचे अध्यक्ष सुभाष ठोंबरे, प्राचार्य डॉ विलास ढोणे, तसेच महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयाचे अध्यक्ष रविकांत रागीट रामटेक, नेताजी गोरे उस्मानाबाद, शंकरराव कदम वसमत, विवेक शिंदे भद्रावती, सुधाकर खरवडे वरोरा, कैलाश काळे परभणी, केशव राठोड औरंगाबाद यांनी अभिनंदन केले आहे.

  • पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी कधी? – महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचा सवाल

    News34

    चंद्रपुर : पाचोरा जिल्हा जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांना मारहाणप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ जिल्हा चंद्रपुरच्या वतीने नुकतेच जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन पाठविण्यात आले.
    दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाने पत्रकार संरक्षणार्थ संरक्षण कायदा अंमलात आणला व देशातील लोकशाहीतील चौथा स्तंभ म्हणून माध्यमांना महत्त्वाचे स्थान दिल्या गेले आहे. परंतु पत्रकार संरक्षण कायद्याचे पालन होताना दिसत नाही. याचे ज्वलंत  उदाहरण नुकतेच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील एका स्थानिक आमदार किशोर पाटील यांनी साथीदारांना पाठवून संदीप महाजन यांना शहीद महाजन चौकात बेदम मारहाण करण्यात आली, यापूर्वी
    सुद्धा देशात व महाराष्ट्रात पत्रकारांवर जीवघेणे हल्ले झालेले आहे.
     सदर घटनेचा निषेध कण्यासाठी तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी नुकतेच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.  निवेदन देताना प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेश सोलापन, उपाध्यक्ष अनिल देठे, महासचिव पुरुषोत्तम चौधरी,सचिव विनोद पन्नासे, कोषाध्यक्ष प्रकाश हांडे, मार्गदर्शक धर्मेश निकोसे, सहसचिव प्रभाकर आवारी व प्रसिद्धी प्रमुख धनराज कोवे यांची उपस्थिती होती.
  • चंद्रपुरात दुचाकीची चावी न दिल्याने 16 वर्षीय विद्यार्थ्यांने उचलले धक्कादायक पाऊल

    News34 Breaking

    चंद्रपूर – शहरातील चांदा पब्लिक स्कुल मध्ये इयत्ता 10 वित शिक्षण घेणाऱ्या व भिवापूर वार्ड येथे राहणाऱ्या एका 16 वर्षीय विद्यार्थ्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आदित्य मैकुलवार असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. ही घटना रविवारी 4 वाजताच्या सुमारास घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार,आदित्यचा घरी दुचाकीसाठी वाद झाला. गाडीची चावी कुटुंबीयांनी दिली नव्हती त्या गोष्टींचा आदित्य ला राग आला अश्यातच आईने मध्यस्थी करून आदित्यची समजूत काढली पण त्याचा राग अनावर झाला.रागाच्या भरात आदित्यने शेजारी असलेल्या बकरीच्या गोठ्यात गळफास घेऊन जीवन संपविले.

    या घटनेमुळे मैकुलवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • हर घर तिरंगा उपक्रम उत्सव म्हणुन साजरा करा – आमदार किशोर जोरगेवार

    News34

    चंद्रपूर – अन्न, वस्त्र आणि निवारा यासह स्वांतत्र ही सुध्द मानवाची मूलभूत गरज आहे. शुरवीर क्रांतीकारकांच्या त्यागातून आपल्याला मिळालेले हे स्वातंत्र अबादीत ठेवत देशाला बलशाली बनविण्याचे काम स्वातंत्र देशातील नागरिक म्हणून आपल्या कडून झाले पाहिजे. हर घर तिरंगा उपक्रम देशात राबविल्या जात आहे.

    हा उपक्रम चंद्रपुरात उत्सव म्हणून प्रत्येक घरी साजरा झाला पाहिजे असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
    स्थानिक आमदार निधीतून आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर येथील पोलिस मुख्यालय येथे 100 फुट उंचीचा तर घूग्घूस येथील बस स्थानक येथे 75 फुट उंचिचा तिरंगा झेंडा उभारला आहे. आज याचे लोकार्पण आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

    यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलिस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, मनपा आयुक्त विपीन पालिवाल, एडीशनल पोलिस अधिक्षक विना जनबंधू, तहसिलदार विजय पवार, मनपा उपायुक्त अशोक गराटे, वन विभागाचे जितेंद्र रामगावकर, मंगेश खवले, यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, एस. टी महामंडळच्या जिल्हा नियंत्रक स्मिता सुतावणे, घुग्घूसचे पोलिस निरीक्षक आसिफ शेख, मधूकर मालेकर, काॅंग्रेस घुग्घूस शहर अध्यक्ष राजू रेड्डू, यंग चांदा ब्रिगेडचे इमरान शेख, उषा अगदारी, स्वप्नील वाढई, मुन्ना लोढे, नविन मोरे आदींची उपस्थिती होती.

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले कि, तिरंगा हा देशाची शान आहे. ऊर्जेचा स्त्रोत आहे. संपुर्ण देश वासियांना तिरंगा प्रती आदर आहे. त्यामुळे केद्र सरकारने हर घर तिरंगा हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाला चंद्रपूरातही उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमा अंतर्गत महानगर पालिकेच्या वतीने तिरंगा वितरीत केल्या जाणार आहे. नागरिकांनी तो आपल्या घरी लावाला असे आवाहण यावेळी त्यांनी केले.

    राज्यातील प्रत्येक तालुक्यात 75 ते 100 फुट उंचीचा राष्ट्रध्वज फडकविण्यात यावा अशी भुमिका राज्य सरकारची होती. आपणही यासाठी आपल्या विधानसभा क्षेत्रात येणा-या घुग्घुस आणि चंद्रपूर येथे सदर उंचीचा राष्ट्रध्वज कायमस्वरूपी लहरत राहावा याकरिता निधी उपलब्ध करून दिला होता. याचे काम पुर्ण झाले आहे. आज याचे लोकार्पण पार पडले. आज पासुन येथे स्वातंत्र्याचा प्रतिक असलेला तिरंगा उभा राहणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

    जगातील सर्वात चांगली लोकशाही व्यवस्था आपल्याला मिळाली आहे. याचे जतन आणि पालन करणे आपल्या सर्वांचे कत्यव्य आहे. आज येथे 100 फुट उंचिचा तिरंगा ध्वजाचे लोकापर्ण झाले आहे. आता हे पवित्र स्थान झाले आहे. याचे पावित्र कायम राहिले पाहिजे. येथे असलेल्या भिंतीपण बोलक्या करण्यासाठी आपण निधी उपलब्ध करुन देणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रा. श्याम हेडाऊ यांनी केले.

  • चंद्रपूर शहरात निघाली भव्य तिरंगा रॅली

    News34

    चंद्रपूर –  माझी माती माझा देश व हर घर तिरंगा अभियानातंर्गत चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शनिवार १२ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता गांधी चौक आझाद बगीचा दरम्यान भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी विनय गौडा,जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन व आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन रॅलीस प्रारंभ करण्यात आला.

    सर्व शालेय मुलांनी हातात राष्ट्रध्वज उंचावुन मनपा कार्यालय गांधी चौक येथुन आझाद बगीचापर्यंत मार्गक्रमण केले. याप्रसंगी विविध घोषणांद्वारे विद्यार्थ्यांनी परिसर दणाणुन सोडला. गांधी चौक ते आझाद बगीचापर्यंत रॅलीचा मार्ग होता,आझाद बगीचा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला व पंचप्रण शपथ घेण्यात आली.

    या रॅलीत शहरातील छोटुभाई पटेल शाळा,एफईएस गर्ल्स ,सिटी कन्या,हिंदी सिटी, सिटी माध्यमिक लोकमान्य टिळक विद्यालय,लोकमान्य शाळा,न्यू इंग्लीश,किदवई तसेच नूतन माध्यमिक अश्या १० शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच मनपा अधिकारी – कर्मचारी व शाळांतील हजार विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग होता.

    भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त मनपातर्फे विविध कार्यक्रम घेतल्या जात आहेत. तिरंगा रॅलीद्वारे नागरिकांच्या मनात देशभक्ती जागृत करणे हा अभियानाचा उद्देश आहे. या वर्षी सुद्धा स्वातंत्र्य दिन घरोघरी तिरंगा फडकवून मोठया उत्साहात अणि आनंदात साजरा करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

  • चंद्रपुरात 100 फूट तर घुग्गुस येथे 75 फुटाच्या तिरंगा झेंड्याचे लोकार्पण

    News34

    चंद्रपूर – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या चंद्रपूर येथील 100 फुट उंचीचा आणि घूग्घूस येथील 75 फुट उंचिचा तिरंगा झेंड्याचे उ्दया रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.

    चंद्रपूर येथील पोलिस मुख्यालय येथे 100 फुट आणि घूग्घूस येथील बस स्थानक येथे 75 फुट उंचीचा तिरंगा झेंड्यासाठी स्थानिक आमदार निधीतून आमदार किशोर जोरगेवार यांनी निधी उपलब्ध करुन दिला होता. या निधीतून सदर काम पूर्ण झाले आहे. उदया सकाळी आठ वाजता याचे लोकार्पण आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते केल्या जाणार आहे.

    तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

  • आत्मनिर्भर भारत नेईल देशाला प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर – मंत्री सुधीर मुनगंटीवार

    News34

     

    चंद्रपूर, : विदर्भातील तरुणांमध्ये प्रचंड उत्साह आणि ऊर्जा आहे. बुद्धिमत्तेच्या जोरावर इथल्या तरुणांनी आपली वैचारिक क्षमता सिद्ध केली आहे. अशाच तरुणांच्या जोरावर आत्मनिर्भर भारताच्या माध्यमातून देश प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचणार आहे, असा विश्वास राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. २०४७ साली १५ ऑगस्टचा तिरंगा भारताच्या आकाशात उंच फडकेल, तेव्हा संपूर्ण जग तिरंग्याला सलाम करेल, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.

    प्रियदर्शनी सभागृहात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आत्मनिर्भर भारत विदर्भस्तरीय वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल, कार्यक्रमाचे आयोजक भाजपाचे नेते रामपाल सिंग, भाजपा आत्मनिर्भर भारत आघाडीच्या जिल्हाध्यक्ष किरणताई बुटले, भाजपा चंद्रपूर महानगरचे अध्यक्ष राहुल पावडे, भाजपाचे नेते नामदेव डाहुले, स्पर्धेचे परीक्षक भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, बिपीन गुप्ता, प्रशांत ठाकरे, एसएनडीटीचे संचालक डॉ. इंगोले, आत्मनिर्भर भारतचे महामंत्री राकेश बोमनवार, रणजित डवरे, उपाध्यक्ष हिना खान, सदस्य रंजना जेगटे, लीलावती रविदास, प्रभाताई गुडदे, विठ्ठलराव डुकरे, चांदभाई, सचिन कोतपल्लीवार, राकेश गौरकार, आयोजनात विशेष परिश्रम घेणारे सोहम बुटले आदींची उपस्थिती होती.

    विद्यार्थ्यांची कल्पकता व त्यांच्या विचारांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती देऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘परिसंवादांच्या माध्यमातून विचार मांडण्याची ‌व विचार व्यक्त करण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त झाली आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील विश्वास दृढ होण्यास निश्चितच मदत होईल.

    फिल्मसिटीसारखे व्यासपीठ या ठिकाणी तयार करण्यात आले आहे हे कौतुकास्पद आहे.’ पालकमंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, ‘स्पर्धेमध्ये समान नागरी कायद्यावर विचार मांडण्यात आले आणि चर्चाही करण्यात आली.देशामध्ये धर्म, जात, रंग, वंश, वय व शिक्षण यामध्ये विविधता आहे. मात्र, नागरिकांच्या हृदयामध्ये संविधानाचा भाव आणि भावना असणे आवश्यक आहे. त्यासोबतच भारत हा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सर्वात मोठा भाग व्हावा असा निर्धार देशगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सी ही समाजामध्ये सहजता, सरलता व सुलभता निर्माण करेल. त्यामुळे ‘हम साथ साथ है’ या भावनेने समाज निश्चितच पुढे जाईल.’ या स्पर्धेत विदर्भाच्या विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.

    ज्ञानातून साधावे समाजहित
    ‘दिल्लीचेही तक्त राखतो महाराष्ट्र माझा’ याप्रमाणे महाराष्ट्राच्या विदर्भातील नागरीकांचे योगदान सोनेरी अक्षरात लिहिले जाईल. विद्यार्थ्यांनी विविध विषयावर विचार मांडले. विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता व वैचारिक क्षमतेचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. त्यामुळे आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःसाठी न करता इतरांसाठी व समाजासाठी करावा. या ज्ञानातून समाज हितासाठी योगदान देण्याची भावना ठेवावी, असे आवाहनही ना. मुनगंटीवार यांनी विद्यार्थ्यांना केले.