Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • how to report child labor in Chandrapur । चंद्रपुरात बालकामगार आढळल्यास संपर्क करण्याचे कामगार विभागाचे आवाहन

    how to report child labor in Chandrapur

    how to report child labor in Chandrapur : चंद्रपूर, दि. 11 (News34) :  भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण आणि आरोग्य बालकांचे मुलभूत अधिकार आहेत. बालकाचे हे अधिकार अबाधित ठेवण्यासाठी बालमजुरी प्रथा कायमस्वरुपी नष्ट होणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने 14 वर्षाखालील मुलांना बालमजुरी करण्यास प्रवृत्त करणाऱ्याविरुध्द जबर शिक्षेची तरतुद केली आहे. 

    Also Read : तिघांचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद

    बालमजुरी ही एक अनिष्ठ प्रथा असून ती सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक समस्यांशी निगडीत असल्यामुळे या प्रथेविरुध्द विस्तृत प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. दरवर्षी 14 नोव्हेंबर हा दिवस बाल दिन म्हणून देशभर पाळला जातो. करिता चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व दुकाने / हॉटेल/ गॅरेज/ आस्थापना धारकांना / उद्योजकांना/बांधकाम नियोक्ते / विटभट्टी व इतर आस्थापना मालकांनी बाल/किशोरवयीन कामगारांना कामावर ठेवू नये.  बाल कामगार आढळून आल्यास कामगार विभाग, प्रशासकीय इमारत या कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त यांनी केले आहे.

  • school children radio performance । आकाशवाणीवर झळकले विद्यार्थ्यांचे सादरीकरण आणि मूल्यवर्धक संदेश

    school children radio performance

    school children radio performance : चंद्रपूर ०६ नोव्हेंबर (News३४) – चंद्रपूर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या पी. एम. श्री सावित्रीबाई फुले उच्च प्राथमिक व माध्यमिक विद्यालय (मनपा शाळा) येथील नर्सरी ते चौथीपर्यंतच्या लहानग्या विद्यार्थ्यांनी ‘आकाशवाणी’वर झेप घेत, आपली कला आणि सर्जनशीलता संपूर्ण जिल्ह्यासमोर सादर केली आहे.

    Also Read : चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

      प्रत्येक रविवारी आकाशवाणीवर प्रसारित होणाऱ्या ‘बालसभा’ या लोकप्रिय कार्यक्रमात या विद्यार्थ्यांनी गाणी, गोष्टी, बोधकथा, नाटिका तसेच स्वच्छतेचा संदेश यांचे मनमोहक सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे एकूण चार भागांमध्ये रेकॉर्डिंग करण्यात आले असून, पहिला भाग आधीच प्रसारित झाला आहे. तर दुसरा भाग रविवार, दिनांक ९ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८.४० वाजता प्रसारित होणार आहे. उर्वरित दोन भाग १६ नोव्हेंबर आणि २३ नोव्हेंबर रोजी ऐकता येणार आहेत.

    सादरीकरणाचे कौतुक

      आकाशवाणीच्या अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे मनःपूर्वक कौतुक केले असून, पालकवर्ग आणि नागरिकांकडूनही शाळेच्या या उपक्रमाचे भरभरून स्वागत होत आहे. या उपक्रमासाठी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त संदीप चीद्रवार,मुख्याध्यापक शिवलाल इरपाते, उमा सुधीर कुकडपवार, अस्मिता खोब्रागडे, स्नेहा गुरपुडे, दर्शना येरणे व संपूर्ण शिक्षकवृंद यांनी मनापासून परिश्रम घेतले.

    महानगरपालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक करत म्हटले की,
    “विद्यार्थ्यांच्या मनातील सर्जनशीलता आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी आकाशवाणीसारखे व्यासपीठ अत्यंत उपयुक्त ठरते. या माध्यमातून मनपा शाळांचे विद्यार्थी नव्या उंचीवर झेप घेत आहेत.”

    डॉ. गायकवाड यांनी शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील काळातही अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना प्रोत्साहन दिले जाईल, असे सांगितले. हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणारा नसून, मनपा शिक्षणाच्या दर्जेदारतेचे आणि नवकल्पनांच्या दिशेने घेतलेल्या पावलांचे प्रतिक आहे.

  • Mahapalika corruption against public funds । चंद्रपूर मनपातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची फाईल तयार; देशमुखांची तक्रार

    Mahapalika corruption against public funds

    Mahapalika corruption against public funds : चंद्रपूर ४ नोव्हेम्बर (News३४) : मनपा आयुक्त विद्या गायकवाड व सर्व संबंधित अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे पुरावे व लेखी पत्र देऊनही वादग्रस्त रस्ता दुभाजकाचे काम मनपा प्रशासनाने बंद केले नाही. घामाच्या पैशातून कर देणाऱ्या नागरिकांना विकास कामाच्या नावाखाली खुलेआम लुटल्या जात आहे.परंतु मनपातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या या मुजोरीला सडेतोड उत्तर देण्यात येईल. या मुजोर अधिकाऱ्यांना योग्य वेळी हिशेब द्यावा लागेल.प्रत्येक भ्रष्ट अधिकाऱ्याची फाईल आपल्याकडे तयार आहे. कोणीही सुटणार नाही असा इशारा जनविकास सेनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी दिला.

    Also Read : कॅन्सर हॉस्पिटलला रतन टाटा यांचे नाव द्या – खासदार धानोरकर


    मुख्यमंत्री, नगर विकास मंत्री, प्रधान सचिव यांना पुराव्यासह तक्रार देऊनही भ्रष्ट अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई होत नाही. शासन-प्रशासनाचे भ्रष्ट अधिकाऱ्यांना संरक्षण मिळत आहे. सत्ताधारी पक्षाचे स्थानिक आमदार किशोर जोरगेवार मनपातील भ्रष्टाचाराविरुद्ध एक शब्दही काढत नाही. त्यांचे या सर्व भ्रष्टाचाराला अप्रत्यक्ष समर्थन मिळत असल्याचा आरोप देशमुख यांनी केला. Demand for action on municipal corruption Chandrapur

    निविदा प्रक्रियेत १ कोटीचे नुकसान

    दरम्यान वादग्रस्त रस्ता दुभाजकातील भ्रष्टाचाराच्या विरोधात देशमुख यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे लेखी तक्रार केली. कारण नसतांना जुने मजबूत रस्ता दुभाजक तोडण्यात आले. निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार मनपाचे एक कोटी रुपयांचे नुकसान केले.

    तोडण्याच्या खर्चासह जुन्या दुभाजकाच्या कामाचा तसेच नविन दुभाजक तयार करण्याचा खर्च या प्रकरणातील संबंधित अधिकारी तत्कालीन आयुक्त विपिन पालीवाल व तत्कालीन शहर अभियंता विजय बोरीकर, भ्रष्टाचाराच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रभारी आयुक्त विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,विद्यमान शहर अभियंता रवी हजारे,उपअभियंता आशिष भारती, सहाय्यक अभियंता प्रतीक्षा जनबंधू व कंत्राटदार मे. सूर्यवंशी एंटरप्राईजेस यांच्याकडून वसूल करण्यात यावा व त्यांचे विरुद्ध चौकशी करून शासकीय निधीचा अपव्यय केल्याप्रकरणी कारवाई करण्यात यावी अशी मागणी देशमुख यांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे केलेल्या लेखी तक्रारीद्वारे केली आहे.

  • Chandrapur Walk for Unity rally । राष्ट्रीय एकतेसाठी चंद्रपुरात ‘वॉक फॉर युनिटी’

    Chandrapur Walk for Unity rally

    Chandrapur Walk for Unity rally : चंद्रपूर, दि. 31 : लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘वॉक फॉर युनिटी’ या पायदळ रॅलीमध्ये चंद्रपूर पोलिस दलासह विविध विभागाचे अधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी, खेळाडू आदींनी उत्स्फुर्त सहभाग नोंदविला. शौर्य, सेवा आणि एकतेचा संदेश देणारी ही  रॅली श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते गांधी चौक मार्गे पोलिस मुख्यालयापर्यंत आयोजित करण्यात आली होती.

    Also Read : चंद्रपुरातील वाहतूक व्यवस्थेवरून खासदार धानोरकर संतापल्या

    यावेळी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात आणि अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या नेतृत्वात सदर रैलीत विविध पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांच्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, चंद्रपूर शहरातील वरिष्ठ नागरिक, विविध क्षेत्रातील व्यवसायिक, विविध शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी, विशेषतः एनएसएस व एससीसी कॅटेड आणि विविध समाजसेवी संघटना, योग, नृत्य क्लब आदी मोठया प्रमाणात उपस्थित होते. Sardar Vallabhbhai Patel birth anniversary events

    आपला देश एकसंघ ठेवण्याचा संकल्प करावा

    पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन म्हणाले, चंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो. लोहपुरुष सरदार वल्लभभाई यांनी देशाची राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडता टिकवून ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले. तोच वारसा पुढे नेऊन आजच्या विद्यार्थी आणि नागरिकांनी आपला देश एकसंघ ठेवण्याचा संकल्प करावा.

    यावेळी उपस्थित शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना एकतेचा, सामूहिक जबाबदारीचा आणि देशहिताचा संदेश देण्यात आला. तसेच सरदार पटेलांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन पोलिस दल आणि समाज यांच्यातील बांधिलकी अधिक दृढ करण्यायाठी मार्गदर्शन करण्यात आले.

    सोबतच सायबर गुन्हे व उपाययोजना, मुली व महिलांची सुरक्षितता, अंमली पदार्थाचे दुष्परिणाम, वाहतुक नियमांबाबत जनजागृती करण्यात आली. शेवटी राष्ट्रीय एकतेची शपथ घेऊन पोलिस मुख्यालय परिसरात वृक्षारोपन करण्यात आले आहे. तत्पुर्वी पोलिस मुख्यालय चंद्रपूर येथे रक्तदान शिबिराचेसुध्दा आयोजन करण्यात आले होते.

  • Women Commission initiatives at your doorstep । महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत चंद्रपूरमध्ये महिलांच्या तक्रारीचे निवारण

    Women Commission initiatives at your doorstep

    Women Commission initiatives at your doorstep : चंद्रपूर, दि. 29 : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत चंद्रपुर जिल्हयात मंगळवार 4 नोव्हेंबर 2025 रोजी जनसुनावणी होणार असून आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर तक्रारींची सुनावणी घेणार आहेत. नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपुर येथे सकाळी 11 वाजता होणा-या जनसुनावणीस महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केले आहे.

    Also Read : नागपूरला जाण्यापूर्वी हि माहिती वाचा

    ४ नोव्हेम्बर रोजी रुपाली चाकणकर जिल्ह्यात

    महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा, यासाठी आयोगाकडून ‘महिला आयोग आपल्या दारी’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर 4 नोव्हेंबर, 2025 रोजी चंद्रपुर जिल्हयात येणार आहेत. यावेळी जिल्हास्तरावरील जनसुनावणी घेत महिलांच्या तक्रारीचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे. जनसुनावणी नंतर जिल्ह्यातील महिला व बालकांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने प्रशासन, पोलिस, कामगार, परिवहन, आरोग्य, शिक्षण आदी विभागांची आढावा बैठक घेण्यात येईल.

    advirtisment

    या उपक्रमाबाबत आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती चाकणकर म्हणाल्या, ‘महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत कार्यरत आहे. राज्याच्या कानाकोप-यातील महिलांना मुंबई कार्यालयात येऊन तक्रार करणे, सुनावणीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहणे, आर्थिकदृष्ट्या तसेच इतर कारणांमुळे शक्य होत नाही. त्यामुळे आयोग जिल्हास्तरावर जात आहे. ‘महिला आयोग आपल्या दारी’ अंतर्गत जनसुनावणीला पोलिस, प्रशासन, विधी सल्लागार, समुपदेशक, जिल्हा समन्वयक आदी उपस्थित असल्याने तक्रारीवर त्याच ठिकाणी कार्यवाही करण्यात येते. यातून आपली कैफियत मांडणा-या महिलांना त्वरित दिलासा देण्याचे काम आयोग करत आहे.

  • Diwali Pahat festival Ganesh Nagar Chandrapur | दिवाळी पहाटने रंगली चंद्रपुरातील सकाळ; दिवाळी पहाट’ने भरली आनंद, स्नेहाची मैफल

    Diwali Pahat festival Ganesh Nagar Chandrapur

    Diwali Pahat festival Ganesh Nagar Chandrapur : चंद्रपूर 26 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – दिवाळी म्हणजे केवळ प्रकाशाचा नव्हे, तर आनंद, एकात्मता आणि स्नेहाचा उत्सव आहे. या उत्सवात जेव्हा संगीताचा सहवास मिळतो, तेव्हा ती सकाळ अधिक मंगलमय बनते. स्वरांच्या माधुर्याने मन प्रफुल्लित होते, विचारांना नवीन दिशा मिळते आणि समाजात सकारात्मकतेचा संदेश पोहोचतो. आजच्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाने हाच सुंदर अनुभव दिला आहे. कलाकारांच्या सुरेल सादरीकरणामुळे संपूर्ण परिसर आनंदाच्या लहरींनी भारला आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

    Also Read : त्या हल्लेखोर वाघाचा शोध सुरू

    श्री गणेश नगर सार्वजनिक कल्याणकारी समिती तर्फे श्री गणेश नगर सार्वजनिक कल्याण मंदिराच्या प्रांगणात ‘दिवाळी पहाट’ या सुगम संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी आमदार किशोर जोरगेवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे शहर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, माजी नगरसेवक रमेश देशमुख, सुरेश धानोरकर, वझलवार, झाडे, अशा बेले, येगींलवार, सुमीत बेले यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळच्या मंद वाऱ्यासह सुरेल गीतांच्या लहरींनी वातावरण भारले होते. स्थानिक कलाकारांनी सादर केलेल्या गाण्यांनी श्रोत्यांच्या मनात दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. BJP leader at Diwali Pahat Chandrapur news

    या कार्यक्रमात पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, संगीत ही आत्म्याची भाषा आहे. ती माणसाला माणसाशी जोडते, विचारांना उंची देते आणि मनाला प्रसन्न करते. आपल्या समाजात अशा सांस्कृतिक उपक्रमांची परंपरा टिकवून ठेवणे ही काळाची गरज आहे.

    सर्वांगीण विकास करणार – आमदार जोरगेवार

                ते पुढे म्हणाले की, श्री गणेश नगर सार्वजनिक कल्याणकारी समितीने असा सुंदर उपक्रम राबवून समाजात आनंद, स्नेह आणि संस्कृतीचा संदेश दिला आहे. येथील हणुमान मंदिर परिसरासाठी सुरक्षाभिंत उभारण्याची मागणी करण्यात आली होती, ती आपण पूर्ण केली आहे. आज संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक आणि सुशोभित झाला आहे. येत्या काळातही या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले प्रयत्न असणार आहे.

    आमदार जोरगेवार यांनी समितीतील कार्यकर्त्यांचे कौतुक करत सांगितले की, येथील नागरिक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांत नेहमीच सक्रियपणे सहभागी होतात. दिवाळी पहाट सारखे कार्यक्रम समाजातील एकोपा वाढवतात, विचारांची देवाणघेवाण घडवतात आणि नव्या उर्जेचा संचार करतात. कार्यक्रमाच्या शेवटी कलाकारांना व आयोजकांना आमदार जोरगेवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

  • Diwali Celebration for Slum Kids | झोपडपट्टीमधल्या मुलांनी अनुभवला प्रकाशाचा दिवाळी सण; सुधीर मुनगंटीवार यांचा पुढाकार

    Diwali Celebration for Slum Kids

    Diwali Celebration for Slum Kids : चंद्रपूर 25 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – सर्वसामान्य जनतेला आपले कुटुंब मानणारे राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी आणखी एका कृतीतून समाजापुढे उत्तम आदर्श निर्माण केला आहे. आपल्या कुटुंबासोबत चौकटीच्या आत साजरी होणारी दिवाळी आ. श्री. मुनगंटीवार यांनी झोपडपट्टीतील मुलांमध्ये जाऊन साजरी केली. या मुलांसोबत दीपोत्सव साजरा करताना आ. श्री. मुनगंटीवार यांनी झोपडपट्टीतील नागरिकांना अंधारातून उजेडाच्या प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या. Diwali celebration Chandrapur

    Also Read : चंद्रपुरात गुन्हेगारी वाढतेय, पोलीस गस्तीचे काय?

    दुर्गापूर येथील वॉर्ड क्रमांक ३ मधील झोपडपट्टीमध्ये आ. श्री. मुनगंटीवार यांच्या येण्याने आनंदाचे वातावरण होते. लहान मुला-मुलींसह येथील नागरिकांनी त्यांचे उत्साहाने स्वागत केले. यावेळी रुद्र नारायण तिवारी,श्रीनिवास जंगमवार, नरेंद्र सिंग दारी, केमा रायपुरे, हनुमान काकडे, अनिता भोयर, राकेश गौरकार,विलास टेंभुर्णे, देवानंद थोरात,अर्चनाताई रायपुरे, सुनील भरेकर, रंजना किन्नाके,भोजराज शिंदे,अरविंद बोरकर,सुरेखा थोरात, रवि रामटेके आदींची उपस्थिती होती.

    sudhir mungantiwar diwali charity event

    साध्या पण मनाला स्पर्शून जाणाऱ्या या उपक्रमात मुलांच्या निरागस चेहऱ्यावरील हास्य, त्यांच्या डोळ्यांतील आनंद आणि ओसंडून वाहणाऱ्या उत्साहाने वातावरण भारावले होते. मिठाई, शालेय साहित्य तसेच गृहोपयोगी वस्तू देखील यावेळी आ. श्री. मुनगंटीवार यांनी वितरित केल्या. ‘निरागस हास्यामध्ये दिवाळीचा खरा आनंद दडला आहे,’ अशी भावना आ. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.

    भारताच्या प्रगतीला हातभार लावण्याचे काम तुमच्या हातून घडेल

    ते म्हणाले, “२०४७ मध्ये भारतीय स्वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील. त्यावेळी याच चिमुकल्यांच्या हातात देशाचे भविष्य असणार आहे. आज आपण त्यांच्या शिक्षणाची काळजी घेतली, त्यांना उत्तम संस्कार दिले आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण केला, तर उद्या भारताला प्रगतीच्या नवनव्या शिखरांवर नेण्याचे काम ही मुले करतील.”

    त्यांनी मुलांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्यासाठी परिश्रम करण्याचा सल्ला दिला. “प्रत्येक मुलामध्ये एक तेजस्वी किरण दडलेला आहे; तो उजळवण्याची जबाबदारी समाजाची आहे,” असेही ते म्हणाले. या भावनिक आणि आनंददायी सोहळ्यात स्थानिक नागरिक, पालक आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी मिळून चिमुकल्यांसोबत आनंद, मिठाई आणि आत्मीयतेचा दिवाळी सण साजरा केला.

  • Sai Deepotsav Chandrapur 2025 | ३१ हजार दीपांचा दीपोत्सव! चंद्रपुरात साई सेवा संकल्प प्रतिष्ठानचा अद्भुत प्रकाश उत्सव

    Sai Deepotsav Chandrapur 2025

    Sai Deepotsav Chandrapur 2025 : चंद्रपूर 23 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) – वर्षभर सातत्याने सामाजिक उपक्रमात अग्रेसर असणारी श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान चंद्रपूर वर्षभरात एकदाच अध्यात्मिक कार्यक्रम दीपोत्सव दिवाळी च्या पावन-पर्वावर सादर करीत असते यावर्षीचा दीपोत्सव हा रविवार दिनांक 19 ऑक्टोबरला सायंकाळी 7 वाजता सरदार पटेल महाविद्यालय,गंजवार्ड, चंद्रपूर येथे पार पडला.

    Also Read : मनपा निवडणुकीसाठी चंद्रपुरातील इच्छुक उमेदवारांकडून कांग्रेसने मागविले अर्ज

    31 हजार दिव्यांचा दीपोत्सव

    हा ख्याती प्राप्त दीपोत्सव महाराष्ट्रामध्ये दुसऱ्या क्रमांकावर असतो यावर्षी प्रतिष्ठान तर्फे 31000 दिव्यांची आरास श्री साईबाबा चरणी अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाला यावर्षी प्रतिष्ठान तर्फे साईबाबांचा जिवंत पालखी देखावा, श्री साईबाबांच्या दुर्मिळ छायाचित्रांची प्रदर्शनी, चंद्रपूरच्या दिग्गज कलाक्षेत्रातील श्री सुहास दुधलकर यांनी साकारलेली जिवंत रांगोळी सर्वांना मोहून गेली तर संपूर्ण दिव्यांची आरास चंद्रपूरची दिग्गज कलाशिक्षक श्री संजय अंडरस्कर यांनी रेखाटली तर त्यांच्या सोबतीला प्रसिद्ध कला चित्रकार श्री सुदर्शन बारापात्रे व श्री किरण पराते यांनी सहकार्य दिले. Sai Seva Sankalp Pratishthan Diwali event

    संपूर्ण परिसर साईमय वातावरणात 31 हजार दिव्यांनी लखलखत होता,सोबतीला सुमधुर साई भक्ती संगीत संध्येने कार्यक्रमांला वेगळेच रूप प्राप्त झाले. पटाख्याची आतीषबाजी प्रमुख आकर्षण होते.संपूर्ण कार्यक्रमाला शहराच्या बाहेरून सुद्धा लोकांनी उपस्थिती दर्शवून दीपोत्सवाचा आनंद घेतला.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुकुंज आश्रम मोझरी चे सर्वाधिकारी श्री लक्ष्मणराव गमे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री मारोतराव मत्ते उपाध्यक्ष डॉक्टर भानुदासजी दाबेरे,समाजसेवक श्री संजय बुरघाटे, श्री दिनेश जी चोखारे, श्री लोटी भाई पटेल, दाताळा साई मंदिराचे अध्यक्ष राजू नागरकर, श्री अनिल तहिल्यांनीं, श्री अरुण तिखे यांची यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात श्री साईबाबांच्या चरणी मान्यवरांच्या हस्ते द्रिप प्रज्वलन व 31 दिव्यांनी आरती करून झाली. lamp lighting ceremony Sai Baba Chandrapur

    कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री सचिन गाटकीने यांनी केले त्यानंतर अध्यक्ष भाषण श्री लक्ष्मणराव गमे यांनी केले यानंतर उपस्थित सर्व साई भक्तांनी 31 हजार दीप प्रज्वलित करण्याचे आव्हान करण्यात आले, कार्यक्रमाचे संचालन सौ प्रज्ञा जीवनकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री विनोद गोवारदिपे यांनी केले.

    कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता प्रतिष्ठानचे प्रमोद वरभे, रुपेश महाडोळे,नेमराज पोडे, पंकज निमजे सचिन बरबटकर, कृणाल खणके,रोशन निनावे,तुषार राहुड,पवन कामतकर,जयवंत खंडाळकर,आशा यादव, भास्कर खट्टी सुरेश सातपुते, अनिल कोरेकर,लक्ष्मण बोनगीरवार,प्रकाश नांढा,नंदकिशोर मैंदरळकर,देवेंद्र लांजे सुनील मांडवकर, नितीन गेडाम, राम नागपुरे,चंदू रणदिवे,सक्षम रणदिवे, दत्तात्रय झुलखंतीवार, प्रदीप रणदिवे,आशिष वासेकर, संजीवनी चहारे,पुनम नवले,इंद्रायणी गाटकीने, मंजुषा पोडे,प्रीतम रागीट, भारती शिंदे,पूजा लांजे, अनिरुद्ध यादव,आराध्या गटकीने मुरलीधर शिरभय्ये इत्यादींनी परिश्रम घेतले.

  • Congress candidate process Chandrapur elections | चंद्रपूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी; इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

    Congress candidate process Chandrapur elections

    Congress candidate process Chandrapur elections : चंद्रपूर 22 ऑक्टोबर (News34 वृत्तसेवा) : आगामी होऊ घातलेल्या चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या (स्थानिक स्वराज्य संस्था) पार्श्वभूमीवर, काँग्रेस पक्षाने तयारीला सुरुवात केली आहे. पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी मुलाखत प्रक्रिया लवकरच सुरू केली जाणार असून, 1 ते 10 नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केले आहे.

    Also Read : कर्जमाफीचे आश्वासन फोल, चंद्रपुरात शेतकऱ्यांची काळी दिवाळी


    काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांची लवकरच मुलाखत प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. २४ ऑक्टोबरपासून शहर (जिल्हा) काँग्रेस कार्यालय, तिवारी भवन कस्तुरबा चौक चंद्रपूर येथे अर्ज उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे अर्ज करणाऱ्या इच्छुकांनी अर्जासोबत आपली संपूर्ण आणि अचूक माहिती देणे अनिवार्य आहे. या माहितीमध्ये खालील बाबींचा समावेश असावा.  local election preparations Chandrapur

    उमेदवारांची संपूर्ण माहिती

    उमेदवाराचे संपूर्ण नाव, प्रभागाचा पत्ता, मागील निवडणूक अनुभव,  यापूर्वी कोणती निवडणूक लढवली आहे? यापूर्वी महानगरपालिका किंवा पूर्वीच्या नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम केलेले आहे काय? आरक्षण प्रवर्ग अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास प्रवर्ग) याची माहिती द्यावी. सद्यस्थिती आणि सामाजिक कार्य कोणते,  आतापर्यंत केलेली सामाजिक कामे तसेच प्रभागातील प्रमुख स्थानिक मुद्द्यांची माहिती देणे आवश्यक आहे.

    काँग्रेस विचारधारेच्या आणि परिवर्तन घडवू इच्छिणाऱ्या नवतरुण-तरुणींनी या निवडणुकीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे विशेष आवाहन चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी केले आहे. पक्षनिष्ठ, सामाजिकदृष्ट्या सक्रिय आणि प्रतिष्ठित नागरिकांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज 1 ते 10 नोव्हेंबरपर्यंत चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी कार्यालय, कस्तुरबा (गिरनार) चौक येथे सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.