Category: चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.

  • बेघरांच्या मदतीसाठी मनपा पुढे सरसावली; 17 बेघरांना सुरक्षित निवार्‍यात आश्रय

    Chandrapur homeless shelter update: चंद्रपूर 24 नोव्हेंबर (News३४) – उघड्यावर राहणाऱ्या बेघर बांधवांची गैरसोय होऊ नये यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या माध्यमातून दीनदयाल अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानअंतर्गत रात्रीच्या सुमारास 17 महिला पुरुष बेघर बांधवांना मनपाच्या बेघर निवारा गृहात आणण्यात येऊन त्यांची व्यवस्था करण्यात आली.

    Read Also : चंद्रपुरात पुन्हा वाघाचा हल्ला, ४० वा मृत्यू

    अनेकदा परिस्थितीने गांजलेल्या व्यक्तीला कुणाचाही आधार न मिळाल्याने भटकत, उघड्यावर जगावं लागते. उड्डाण पूलाखाली, रस्त्याकडेला, मोकळया जागेवर बेघर आपणास दृष्टीस पडतात. त्यांचे जीवन सुसह्य करण्याच्या दृष्टीने चंद्रपूर महानगरपालिकेने निराधार-बेघरांना मदतीचा हात दिला आहे. मनपाच्या निवारा चमूने शुक्रवारी रविवार 23 नोव्हेंबरच्या रात्री विशेष मोहीम राबवित 17 बेघरांना जवळच्या निवारा केंद्रात आश्रय दिला आहे.

    Read Also : जिजाऊ ब्रिगेडच्या महाअधिवेशनाची सांगता

     चंद्रपूर शहरातील फुटपाथ, रस्त्याच्या शेजारी पूलाखाली व अन्य ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या बेघरांसाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. विद्या गायकवाड यांच्या मार्गदर्शनात चंद्रपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागाद्वारे दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत शहरात विविध ठिकाणी बेघर निवारा केंद्र सुरू केलेले आहेत. त्यामुळे उघड्यावर झोपणाऱ्या बेघर व निराधारांना बेघर निवारा केंद्राचा मोठा आधार मिळाला आहे. त्यांना निवारागृहात मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. Chandrapur homeless shelter update

       वाढत्या थंडीच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या बेघर निवारा चमूद्वारे विशेष शोध मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत शहरातील विविध भागातून रस्त्यावर राहणाऱ्या आणि फुटपाथवर झोपणाऱ्या बेघरांना शोधून त्यांना मनपाच्या बेघर निवारा केंद्रांमध्ये नेण्यात येत आहे. त्यानुसार एकूण 17 व्यक्तींना मनपाच्या वाहन व्यवस्थेच्या मदतीने निवारा केंद्रात नेवून आश्रय दिला. अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील व उपायुक्त संदीप चिद्रवार यांच्या नेतृत्वात  NULM विभाग प्रमुख रफिक शेख,शहर अभियान व्यवस्थापक रोशनी तपासे, चिंतेश्वर मेश्राम, समुदाय संघटक सुषमा करमनकर ,खडसे, मून, लोणारे, पाटील व समाज कल्याण विभागाचे कर्मचारी काम करीत आहे.

  • जिजाऊ ब्रिगेड अधिवेशनाचा समारोप; महिलांनी निर्भीडपणे राजकारणात सहभागी व्हावे – खासदार प्रतिभा धानोरकर

    Jijau Brigade annual convention updates : चंद्रपूर २४ नोव्हेम्बर (News३४) – जिजाऊ ब्रिगेड हा एक अत्यंत सकारात्मक विचार असून येणाऱ्या काळामध्ये देशात सामाजिक परिवर्तन करण्याची ताकद जिजाऊ ब्रिगेडच्या विचारांमध्येच आहे असे प्रतिपादन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले. महिलांनी राजकारणात सकारात्मक वृत्ती ठेवून सामील होण्याचा कालखंड आहे त्यामुळे निर्भीडपणे राजकारणात देखील जिजाऊ ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी यावे असे आवाहनही त्यांनी केले.

    Read Also : ब्रह्मपुरी शहरात माजी नगरसेवकाने सुरु केला देहव्यापाराचा धंदा, पोलिसांची धाड

    जिजाऊ ब्रिगेडच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय महाधिवेशनाचा समारोप स्थानिक प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहामध्ये झाला. या समारोपीय सत्राच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर हे होते, तर यावेळी स्वागताध्यक्ष खासदार प्रतिभा धानोरकर प्रमुख अतिथी आमदार सुधाकर अडवाले, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, प्रदेश कार्याध्यक्ष नवनाथ गाडगे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज दादा आखरे, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव सौरभ खेडेकर, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सीमा बोके, महासचिव डॉ. स्नेहा खेडेकर, कानबाई बिर्जे, पत्रकार परिषदेचे प्रदेश राष्ट्रीय अध्यक्ष विलास पाटील, मराठा सेवा संघाचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक जेऊरकर, मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव सुरेश माळवे, सत्यभामा पाटील हे प्रामुख्याने उपस्थित होते. Jijau Brigade annual convention updates

    जिजाऊ ब्रिगेडने आता जागतिक पातळीवर आपली ओळख निर्माण करण्यासाठी येथून पुढे वाटचाल करावी, महिलांनी परग्रहावर देखील पाऊल ठेवलेले आहे, याचाआदर्श घेत जिजाऊ ब्रिगेडनी परग्रहावर राज्य निर्माण करणारी स्त्री निर्माण करावी अशी अपेक्षा मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी व्यक्त केली.

    आमदार सुधाकर अडवाले यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या या अधिवेशनामध्ये झालेल्या वैचारिक मंतनाचे कौतुक करत देशांमध्ये जाणीवपूर्वक महिलांना विकृत विचारांच्या आहारी नेण्याचे काम काही संघटना व लोक करीत आहेत अशा चुकीच्या मार्गाने लागलेल्या महिलांचं वैचारिक प्रबोधन करण्याचे काम जिजाऊ ब्रिगेडने करण्याची गरज आहे असे मत व्यक्त केले.

    जिजाऊ ब्रिगेड ने स्वीकारलेला सामाजिक परिवर्तनाचा वैचारिक लढा अधिक विस्तारत येणाऱ्या काळात महिलांच्या आर्थिक राजकीय व धार्मिक क्षेत्रातील विविध प्रश्नांना घेऊन लढा अधिक तीव्र केल्या जाईल जिजाऊ ब्रिगेडला आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्यासाठी अधिवेशनात जिजाऊ ब्रिगेडच्या वेबसाईटचे लॉन्चिंग करण्यात आले गतवर्षीचा आंतरराष्ट्रीय अधिवेशन दुबई येथे झालेले असून जगभर जिजाऊ ब्रिगेड पोचवण्याचं काम केले जाईल असे मत व्यक्त केले. Jijau Brigade annual convention updates

    जिजाऊ ब्रिगेडचे पुढील वर्षाचे अधिवेशन राजधानी मुंबई येथे होणार.-

    जिजाऊ ब्रिगेडचे दहावे राज्यस्तरीय अधिवेशन २०२६ मध्ये मुंबई येथे आयोजित करण्याबद्दलचा ठराव एक मताने पास करण्यात आला.

  • राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने सशक्त नेतृत्वाचा महामार्ग – आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

    Jijau Brigade women leadership event Chandrapur : चंद्रपूर : जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र आयोजित महाअधिवेशनाला उपस्थित राहून राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार आ. सुधीर मुनगंटीवार यांनी राजमाता जिजाऊंच्या लेकींना आत्मविश्वास, पराक्रम आणि नेतृत्वाची दिशा देणारे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने या महाअधिवेशनातील उपस्थित प्रत्येक भगिनींचे नेतृत्व, स्वाभिमान आणि कर्तृत्वाची नवी व्याख्या लिहिणार आहे,असा ठाम विश्वास यावेळी आ.मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

    Read Also : चंद्रपूर विधानसभेत २० कोटी रुपयांच्या निधीतून १०० पाणंद रस्ते, आमदार जोरगेवार यांचा पाठपुरावा

    चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी सभागृहात पार पडलेल्या या महाअधिवेशनाला मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार, जिजाऊ ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष सीमाताई बोके, तसेच घोडकेजी, वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंग चंदेल,अरविंद गावंडे, दीपक जेऊरकर, सौरभ खेडेकर, डॉ. मंगेश गुलवाडे, प्रज्वलंत कडू, आनंद जवंजाळे, संगीताताई टोंगे, सारिकाताई कुंभारे, आशाताई ठाकरे, रजनीताई जेऊरकर, लताताई होरे आणि वनिताताई आसुटकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. Jijau Brigade women leadership event Chandrapur

    jijau brigade program

    या महाअधिवेशनात महिला नेतृत्व, सामाजिक परिवर्तन, संघटन उभारणी, जनआंदोलन आणि राष्ट्राभिमान याविषयांवर मंथन पार पडले. यावेळी आ.सुधीर मुनगंटीवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले,जसा ‘सी फॉर चंद्रपूर’ या भावनेने आपण आज येथे एकत्र आलो आहोत, तसाच या अधिवेशनानंतर प्रत्येक भगिनी ‘सी फॉर चॅम्पियन’ बनून प्रत्येक क्षेत्रात विजय मिळवेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

    आ.मुनगंटीवार यांनी आपल्या कार्यकाळातील ऐतिहासिक विकासकार्याचा उल्लेख केला. सांस्कृतिक कार्यमंत्री असताना राजमाता जिजाऊंच्या जन्मभूमी सिंदखेडराजा विकासासाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अर्थमंत्री असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या तपश्चर्यास्थळ श्रीशैलम येथे ध्यानमंदिर उभारणीसाठी ३ कोटी २५ लाख रुपये निधी दिल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला.या ध्यानमंदिराला नुकतीच देशगौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी भेट दिल्याचा उल्लेख करताना त्यांच्या आवाजात समाधान आणि प्रबळ राष्ट्रभक्तीची भावना होती. Jijau Brigade women leadership event Chandrapur

    आ. मुनगंटीवार म्हणाले, चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली आणि राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने आजची स्त्री निर्भय, आत्मविश्वासू आणि सक्षम झाली पाहिजे. समाजपरिवर्तनाची दिशा तुमच्या नेतृत्वातूनच घडेल.स्त्रीशक्तीच्या या उभारणीचा प्रवास अधिक सामर्थ्यवान, परिणामकारक आणि परिवर्तन घडविणारा ठरो, अशा शुभेच्छा यावेळी त्यांनी दिल्या.

  • Chandrapur photo video expo 2025 event । चंद्रपूर फोटो-व्हिडिओ एक्स्पो 2025 : क्रिएटिव्हिटी आणि टेक्नॉलॉजीचा भव्य मेळावा

    Chandrapur photo video expo 2025 event

    Chandrapur photo video expo 2025 event : चंद्रपूर २० नोव्हेम्बर (News३४) : टी.डी.यु.सी. फोटोग्राफर असोसिएशन, चंद्रपूर आणि कॅवोक सर्विस, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूरात पहिल्यांदाच ‘भव्य ‘फोटो-व्हिडिओ एक्स्पो २०२५’ चा भव्य सोहळा मंगळवार १८ डिसेंबर रोजी पोलीस वेल्फेअर कन्वेंशन हॉल, तुकूम, येथे आयोजित करण्यात आला असून मुंबई, दिल्ली व पुणे यासारख्या महानगरातील भव्य एक्स्पोचा अनुभव आता चंद्रपूरकरांनाही अनुभवता येणार आहे.अशी माहिती संघटनेच्या वतीने पत्रपरिषदेत देण्यात आली.

    Read Also : इथेनॉल कंपनीमध्ये स्फोट, २ किलोमीटर पर्यंत हादरे

    हा कार्यक्रम केवळ प्रदर्शन नाही. तर फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी आणि फिल्म क्षेत्रातील एका नव्या क्रांतीचा प्रारंभ आहे. एक्स्पोची वैशिष्ट्ये तंत्रज्ञान, कला आणि सिनेमॅटिकतेचा संगम या भव्य एवस्पोमध्ये उघडले जाणार आहेत.या एक्स्पोमध्ये अत्याधुनिक कॅमेरे, लेन्सेस, ड्रोन आणि गॅझेट्सचे थेट प्रात्यक्षिके, लाईटिंग इक्विपमेंट्स, स्टुडिओ सेटअप आणि एडिटिंग सॉफ्टवेअर्सवरील वर्कशॉप्स, राष्ट्रीय आणि सिने-इंडस्ट्रीतील तज्ञांकडून मार्गदर्शन, फिल्म, ड्रामा आणि डिजिटल कंटेंटवरील चर्चासत्रे, नेटवर्किंग आणि अनुभव शेअरिंगची सुवर्णसंधी, क्रिएटिव्ह आणि टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशनचे व्यासपीठ, फिल्म आणि सिने इंडस्ट्रीसाठी सुवर्णसंधीफिल्ममेकर, शॉर्ट फिल्म डायरेक्टर, थिएटर आर्टिस्ट, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि ड्रामा क्षेत्रातील नवोदित कलाकारांसाठी हा एक्स्पो प्रेरणादायी ठरणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. Chandrapur photo video expo 2025 event


    तसेच सिनेमॅटिक शूटिंग तंत्रांचे मार्गदर्शनफिल्म एडिटिंग व साउंड डिझाईनवरील वर्कशॉप्स, प्रॉडक्शन हाउसेस व कॅमेरा ब्रँड्सशी थेट संवाद, ओटीटी व डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी कंटेंट क्रिएशनच्या नव्या दिशा, एक्स्पोचा मुख्य उद्देश फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, पत्रकार, पोर्टल न्यूज प्रतिनिधी, कलाकार आणि फिल्म इंडस्ट्रीशी जोडलेल्या प्रत्येक व्यावसायिकाला ज्ञान, तंत्रज्ञान आणि सर्जनशीलतेचा एकत्र संगम उपलब्ध करून देणे हाच या एक्स्पोचा खरा ठेतू आहे.आज फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफी हे फक्त छंद नाहीत, तर त्या प्रोफेशनल आणि सिनेमॅटिक इंडस्ट्रीज बनल्या आहेत. Chandrapur photo video expo 2025 event

    या एक्स्पोमधून आधुनिक उपकरणांचा अनुभव मिळणार असून तज्ज्ञांचे व्यावसायिक मार्गदर्शन, उद्योगातील नव्या संपर्काची संधी, नवीन पिढीच्या क्रिएटिव्ह जमात आपले स्थान निर्माण करण्याची प्रेरणा मिळणार आहे. त्यामुळे या ‘भव्य ‘फोटो-व्हिडिओ एक्स्पो २०२५’ ला चंद्रपूरकरांना मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवावी अशी विनंती टी.डी.यु.सी. फोटोग्राफर असोसिएशन, चंद्रपूरतर्फे करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे संस्थेचे संस्थापक प्रितम खोब्रागडे, विनोद झोडे, अध्यक्ष गणेश साळवे, राकेश मस्के, उपाध्यक्ष रमेश तांडी, राजेश नाकाडे, देवा बुरडकर, आकाश सिंग, अमूल कोत्रिवार, सूर्यकांत मोरे व नितेश कुमणे यांची उपस्थिती होती.

  • vikrant sahare demand for local employment । शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थानिकांना रोजगार द्या – युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे

    vikrant sahare demand for local employment

    vikrant sahare demand for local employment : चंद्रपूर १८ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर शहरात जानेवारी २०२६ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे लोकार्पण होणार आहे, तत्पूर्वी डिसेम्बर महिन्यात भव्य अश्या कॅन्सर हॉस्पिटलचे सुद्धा लोकार्पण होणार असून या नव्या आरोग्यदायी विभागात अनेक बेरोजगार तरुण-तरुणींना रोजगार मिळणार आहे. चंद्रपुरातील सुशिक्षित बेरोजगारांना या शासनाच्या प्रकल्पात रोजगार मिळावा यासाठी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांची भेट घेऊन निवेदन सादर केले आहे.

    Read Also : चंद्रपुरात रस्त्यावर सुरु झाला राजकीय तमाशा

    चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची गरज आहे, त्यासाठी कंत्राटी पद्धतीने जागा भरण्यास सुरुवात झाली असून चंद्रपूर शहरातील बेरोजगार तरुण तरुणींना स्थानिकांना ८० टक्के रोजगार या नियमाच्या अधीन राहून बेरोजगारांना रोजगार द्यावा अशी मागणी युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी अधिष्ठाता यांच्याकडे केली आहे.

    १५ नोव्हेम्बर रोजी सहारे यांनी अधिष्ठाता यांची भेट घेत आपल्या मागण्यांचे निवेदन दिले, यावर त्यांनी सकारात्मता दर्शवित स्थानिकांना या रोजगार प्रक्रियेत सामील करणार असे आश्वासन दिले असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात स्थानिकांना रोजगार मिळेल अशी आशा बेरोजगारांच्या मनात निर्माण झाली आहे. या मागणीवर बेरोजगारांनी विक्रांत सहारे यांचे आभार मानले आहे.

  • MLA vs ex corporator argument video । MLA विरुद्ध माजी नगरसेवक! रस्त्याच्या कामावरून रयतवारीत तुफान वाद

    MLA vs ex corporator argument video

    MLA vs ex corporator argument video : चंद्रपूर १८ नोव्हेम्बर (News३४) – चंद्रपूर शहरातील रयतवारी भागात रस्त्याच्या कामावरून आमदार जोरगेवार व कांग्रेसचे माजी नगरसेवक राजेश अडूर हे दोघे भिडल्याचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमात सर्वत्र व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये राजेश अडूर यांनी २०० युनिट बाबत विचारले असता आमदार जोरगेवार यांचा चांगलाच पारा चढला.

    Read Also : प्रेम प्रकरण चिघळले, प्रियकराने केली प्रेयसीच्या पतीची हत्या, चंद्रपूर हादरले

    महाविकास आघाडी सरकारच्या काळात रयतवारी भागातील रस्ता मंजूर करण्यात आला होता, मात्र कामात विलंब झाला, काही महिन्यांनी सरकार कोसळले, शिंदे सरकार सत्तेवर आली आणि महाविकास आघाडी सरकारमधील कामे थांबविण्यात आली, त्याबाबत अडूर यांनी पाठपुरावा करीत रस्त्याचे काम सुरु केले, मात्र रस्त्याचे काम पूर्णत्वास येत असताना आमदार जोरगेवार कार्यकर्त्यांसह त्याच रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कामासाठी पोहचले.

    भूमिपूजन कार्यक्रम स्थळी जोरगेवार दाखल झाले असता अडूर आपल्या समर्थकांसह पोहोचले आणि भूमिपूजन होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली, आधी जोरगेवार यांनी शांतपणे म्हणणे ऐकून घेतले. शासनाचे काम असल्याने व माझ्या विधानसभेतील विकासकाम असल्याने मी भूमिपूजन करण्यासाठी याठिकाणी आलो असे सांगितले. मात्र अडूर यांनी तटस्थ भूमिका घेत कार्यक्रम होऊ देणार नाही यावर ठाम राहिले. MLA vs ex corporator argument video

    वाद वाढत गेला आणि अडूर यांनी आमदार जोरगेवार यांच्या २०० युनिट बाबत प्रश्न उपस्थित करीत आधी ते आश्वासन पूर्ण करा असे म्हटले असता जोरगेवार यांचा पारा चढला, शाब्दिक चकमक वाढत गेली, २०० युनिट पाहिजे असेल तर न्यायालयात जाऊन केस कर मी माझे उत्तर देतो असे जोरगेवार म्हणाले. मी जाणार न्यायालयात आणि जाब विचारणार असे उत्तर अडूर यांनी दिले.

    वाद व शाब्दिक चकमकीत भूमिपूजन पार पडले मात्र रयतवारी मधील नागरिकांना रस्त्याच्या कामासाठी आमदार जोरगेवार व माजी नगरसेवक अडूर रस्त्यावर भिडल्याचे दृश्य मनोरंजक दृश्य म्हणून आनंद घेऊ लागले, शाब्दिक चकमकीचा हा व्हिडीओ समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

    ही राजकीय स्टंटबाजी – आमदार जोरगेवार

    सदर कार्यक्रम हा शासकीय प्रोटोकॉल प्रमाणे होता, जेव्हा शासन काही कार्यक्रमाचे आयोजन करते त्यावेळी सर्व जनप्रतिनिधींना नियमाप्रमाणे आमंत्रण दिले जाते, माझ्या विधानसभा क्षेत्रातील कार्यक्रम असल्याने मला जावे लागले, मनपा निवडणूक असल्याने अडुर यांनी राजकीय स्टंटबाजी केली.

  • New President Rajesh Bele । जटपुरा पंचतेली समाजाच्या आमसभेत ऐतिहासिक एकमत; अध्यक्ष म्हणून राजेश बेले

    New President Rajesh Bele

    New President Rajesh Bele : चंद्रपूर १६ नोव्हेम्बर (News३४) : श्री. हनुमान देवस्थान व्यवस्थापक जटपूरा पंचतेली समाज कमिटीच्या वतीने नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या आमसभा निवडणुकीमध्ये, श्री. राजेश वारलुजी बेले यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. समाजाच्या एकजुटीचे आणि विश्वासाचे प्रतीक म्हणून त्यांची ही निवड अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे.

    Read Also : चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक, भाजपच्या तिकिटासाठी तुफान गर्दी

    जटपूरा पंचतेली समाज भवनात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये, समाजाच्या प्रगतीसाठी आणि देवस्थानच्या व्यवस्थापनासाठी पुढील दोन वर्षांची कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदासाठी राजेश बेले यांच्या नावाला एकमताने पसंती मिळाल्याने, बिनविरोध निवडीची परंपरा कायम राहिली.

    बहुमताने निवडलेली नवीन कार्यकारिणी:

    अध्यक्षपदाच्या बिनविरोध निवडनंतर, उर्वरित पदांसाठी उत्साही आणि सक्षम नेतृत्वाचा विचार करून बहुमताने निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये खालील सदस्यांची निवड करण्यात आली: Jatpura Temple Committee Election

    • उपाध्यक्ष: श्री. दिनेश जुमडे
    • सचिव: श्री. शैलेश जुमडे
    • सहसचिव: श्री. रवी लोणकर
    • कोषाध्यक्ष: श्री. रवींद्र जुमडे

    कार्यकारिणी सदस्य आणि सल्लागार कमिटी

    देवस्थानचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आणि समाजाच्या विविध स्तरांवरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी अनुभवी सदस्यांची निवड करण्यात आली आहे: New President Rajesh Bele

    कार्यकारिणी सदस्य:

    • श्री. किशोर शेंडे
    • श्री. देवेंद्र बेले
    • श्री. प्रमोद हजारे
    • श्री. बाळकृष्ण वैरागडे
    • श्री. विजय इटणकर
    • श्री. राजेंद्र रघाटाटे

    सल्लागार कमिटी:

    नवीन कार्यकारिणीला योग्य मार्गदर्शन करण्यासाठी समाजातील ज्येष्ठ आणि अनुभवी व्यक्तींचा सल्लागार कमिटीत समावेश करण्यात आला आहे:

    • श्री. रतन हजारे
    • श्री. प्रभाकर जुमडे
    • श्री. अरुण वैरागडे
    • श्री. नानाजी बानकर
    • श्री. संजय बेले

    नवनिर्वाचित अध्यक्ष राजेश बेले यांनी आपल्या निवडीबद्दल समाजाचे आभार मानले आणि देवस्थानच्या विकासासाठी, तसेच समाजोपयोगी उपक्रमांना गती देण्यासाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन काम करण्याची ग्वाही दिली.

    ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांत आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. नवीन कार्यकारिणी समाजाला एक नवी दिशा देईल आणि देवस्थानचे व्यवस्थापन अधिक सुव्यवस्थित करेल, असा विश्वास यावेळी उपस्थित असलेल्या सर्व पंचतेली समाज बांधवांनी व्यक्त केला.

  • financial fraud of retired teacher by sister । आजारपणाचा गैरफायदा घेऊन बहिणीने केली आर्थिक फसवणूक

    financial fraud of retired teacher by sister

    financial fraud of retired teacher by sister : चंद्रपूर १६ नोव्हेम्बर (News३४) : मला किडनी व तत्सम आजार असून माझी प्रकृती गंभीर असते. माझ्या आजारपणात घरचे कुणी असावे म्हणून लहान बहिणीला मी जवळ केले. परंतू तीने माझी देखभाल करण्याऐवजी माझ्या आजारपणाचा फायदा घेत घर विक्री केले. तसेच मला मिळणार्‍या पेंशनमधील रक्कमही परस्पर काढून माझ्या असाहयतेचा फायदा घेतला. आता माझ्याकडे उपचार करण्यासाठीही पैसे उरले नसून माझे पैसे मला परत मिळवून देण्यात यावे अशी विनंती पिडीत बहिण शालिनी इंदूरकर यांनी पत्रपरिषदेत केली.

    Read Also : राजुरा नगरपरिषद निवडणूक, अध्यक्ष पदासह सदस्यांसाठी कांग्रेसचे नामांकन

    शालिनी इंदूरकर ह्या व्याहाड येथील नवभारत विद्यालयातून मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या. त्या अविवाहित आहेत. तुकूम येथे त्यांनी दुमजली घर बांधले. त्यानंतर त्यांना किडनीसारख्या दुर्धर आजाराने ग्रासले. त्यासाठी त्यांना वारंवार येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लागते. त्यामुळे घर विकून काही पैसे आपल्या उपचारासाठी खर्च करावे व काही रक्कमेत फ्लॅट घ्यावा असा विचार केला. त्यासाठी पेपरमध्ये घर विकण्याबाबत जाहिरात दिली. परंतू जुलै महिन्यात आजारपणामुळे रुग्णालयात आयसीयुमध्ये दाखल व्हावे लागल्याने घरासंबंधी व्यवहार करण्यास असमर्थ होते. त्याचवेळी माझ्यासोबत असलेली लहान बहिण निरुपमा विक्रम पाटील जी त्याच रुग्णालयात काम करीत होती. financial fraud of retired teacher by sister

    तिने मला घराचे व्यवहार स्वतः करुन रक्कम तुझ्या स्वाधिन करीन असे आश्वासन दिले. त्याच दरम्यान सारा शहर बानो नामक महिलेने घर घेण्याचे कबूल केल्यानंतर लहान बहिणीने तिच्याशी परस्पर व्यवहार केला. ६५ लाख रुपये किंमत असलेल्या घराची टोकन रक्कम म्हणून ३५ लाख देण्याचे नक्की करण्यात आले. त्यासाठी त्यांनी जबरदस्तीने कागदपत्रावर माझी स्वाक्षरी घेतली. तसेच ३५ लाखांपैकी २९ लाख ७५ हजारांचा चेक सारा बानो यांनी मला दिला. ती रक्कम काही दिवसांनी माझ्या खात्यात जमा देखील करण्यात आली. परंतू घराच्या रजिस्ट्रीचे कागद मात्र शेवटपर्यंत मला दाखविण्यात आले नाही. financial fraud of retired teacher by sister

    माझ्या दवाखाण्याचा खर्च भागविण्यासाठी काही धनादेशवर मी स्वाक्षरी करुन ठेवली. त्याच संधीचा फायदा घेत माझ्या बहिणेने सदर २९.७५ लाखांची रक्कम स्वतःच्या खात्यात वळती केली. ही बाब मला माहिती झाल्यानंतर विचारणा केली असता तीने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच या धनादेशाच्या माध्यमातून तीने माझी पेंशनची रक्कमही परस्पर काढली. उपचार करुन घरी आल्यानंतर मी आर्थिक व्यवहार तपासले असता तीने २९ लाखांच्या रकमतेतून तीने फ्लॅट घेतल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे ना माझ्याकडे आता घर उरले ना पैसा, आता उपचार कसा करावा असा यक्ष प्रश्न माझ्यासमोर राहिला असून सध्या भाड्याच्या घरात राहण्याची पाळी माझ्या बहिणीमुळे माझ्यावर आली आहे. त्यामुळे उपचारासाठी मला माझी हडपलेली रक्कम मला परत मिळवून द्या हो अशी कैफियत शालिनी इंदूरकर यांनी पत्रपरिषदेच्या मांडली आहे.

  • Heavy rainfall crop damage assistance । चंद्रपूरचे 1265 शेतकरी मदतीपासून वंचित! अतिवृष्टी नुकसानभरपाई तात्काळ द्या

    Heavy rainfall crop damage assistance

    Heavy rainfall crop damage assistance : चंद्रपूर १४ नोव्हेम्बर (News३४) : अवकाळी पाऊस व अतिवृष्टीने चंद्रपूर जिल्हात शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई मिळण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांच्या नेतृत्वात निवासी जिल्हाधिकारी कुंभार साहेब यांचे कडे निवेदन सादर केले आहे. चंद्रपुर तालुक्यातील १२६५ नुसकानग्रस्त शेतकऱ्यांचे अतीवृष्टीची मदत निधी प्रलंबित आहे. त्यामुळे रब्बी हंगामाची पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सावकाराकडून कर्ज काढण्याची वेळ आली आहे.

    Read Also : भाजपला उमेदवार मिळेना

    चंद्रपूर जिल्हात अतिवृष्टी मुळे मोठे नुकसान झाले आहे. चंद्रपुर तालुक्यातील नुकसान झालेल्या १२६५ शेतकऱ्यांना अजुन पर्यंत शेतकऱ्याला अतीवृष्टी ची रक्कम खात्यात आली नाही आहे. महसुल व वन विभागा अतंर्गत दि. १० ऑक्टोंबर २०२५ च्या महाराष्ट्र शासन निर्णयात ज्या शेतकऱ्याची अग्रीस्टॅक मध्ये नोदणीं नाही, अशाना सुद्धा नुकसान भरपाई देणे गरजेचे आहे, असे शासन निणर्यात नमुद आहे. मात्र त्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही.

    शेतकऱ्यांना त्वरीत अतिवृष्टीची रक्कम देण्यात यावी ही मागणी गणेश आवारी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर, गिरीश मुसळे,देविदास येरगुडे,योगेश्वर पिपंळकर, बंडू बेरड विनोद पिंपळकर, नामदेव पिंपळकर, रंगराव पवार, रामकिसन पाचभाई, देविदास येरगुडे, गणेश येरगुडे, आशिष मुसळे, विठ्ठल पिपळकर रामराव देवतळे यांचेसह नुसकानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

  • mangesh khawale farewell chandrapur । चंद्रपूर मनपाचे उपायुक्त मंगेश खवले यांना सहकाऱ्यांचा सन्मान

    mangesh khawale farewell chandrapur

    mangesh khawale farewell chandrapur : चंद्रपूर १२ नोव्हेंबर (News३४) – चंद्रपूर महानगरपालिकेतील उपायुक्त मंगेश खवले यांची बदली होऊन ते नागपूर महानगरपालिका उपायुक्तपदी रुजू झाले आहेत. त्यांच्या बदलीनिमित्त चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे दिनांक ११ नोव्हेंबर २०२५ रोजी भावपूर्ण निरोप समारंभ आयोजित करण्यात आला.

    मंगेश खवले यांनी जुलै २०२३ मध्ये चंद्रपूर महानगरपालिकेत उपायुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यांच्या कार्यकाळात त्यांना देण्यात आलेल्या एकूण १४ विभागांची जबाबदारी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली. प्रशासकीय कामकाजात कार्यकुशलता, वेळेचे भान आणि निर्णयक्षमता यामुळे त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये विश्वास व प्रेरणा निर्माण केली. त्यांच्या कार्यकाळात स्वच्छता अभियान, नागरी सुविधा, कर वसुली, पायाभूत सुविधा सुधारणा, तसेच जनसंपर्क विभागातील सुधारणा अशा विविध उपक्रमांना गती मिळाली.

    Read Also : चंद्रपूर मनपा आरक्षणाची भावी नगरसेवकांना डोकेदुखी

    निरोप समारंभात आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त संदीप चिद्रवार, मुख्य लेखा परीक्षक मनोज गोस्वामी, शहर अभियंता रवींद्र हजारे, सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी, नगर सचिव नरेंद्र बोबाटे, सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,  सहायक आयुक्त अनिलकुमार घुले यांच्यासह मनपाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
      अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या मनोगतातून खवले यांच्या नेतृत्वशैलीचे आणि सौजन्यपूर्ण वर्तनाचे विशेष कौतुक केले. सर्वांना सोबत घेऊन काम करणारे आणि नेहमी प्रामाणिकपणे काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख कायम राहील, असे मनोगत अनेकांनी व्यक्त केले. mangesh khawale farewell chandrapur

    उपायुक्त मंगेश खवले यांनी आपल्या भाषणात चंद्रपूर महानगरपालिकेत काम करताना आले अनुभव हा उत्तम होता व येथे मिळालेलं सहकार्य, टीमवर्क आणि नागरिकाभिमुख दृष्टिकोन नागपूर मनपातही घेऊन जाणार असल्याचे सांगितले तसेच सर्व सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि आयुक्तांचे आभार मानले.