चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.
Meri Degree Mera Abhiman : चंद्रपूर : (२९ ऑगस्ट २०२५) – शिक्षण आणि डिग्री ही व्यक्तीच्या ओळखीची शान आहे, हे अधोरेखित करण्यासाठी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने गिरणार चौक येथे ‘मेरी डिग्री, मेरा अभिमान’ या अनोख्या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या डिग्री हातात घेऊन घोषणाबाजी करत शिक्षणाचा सन्मान करण्याचा संदेश दिला.
जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी सांगितले की, आज देशात स्वतःची डिग्री लपविण्याची प्रवृत्ती वाढत आहे, जी सुशिक्षितांमध्ये नैराश्य निर्माण करणारी आहे. या पार्श्वभूमीवर, आपल्या शिक्षणाबद्दल अभिमान बाळगावा आणि उच्चशिक्षितांना राजकारणात व समाजात योग्य सन्मान मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या आंदोलनात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे, प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव शिवा राव, वरिष्ठ नेते के. के. सिंग, युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष राजेश अडूर, अनिरुद्ध वनकर, रामकृष्ण कोंड्रा, शिरीष गोगुलवार, अख्तर सिद्धिकी, नौशाद शेख, रमिश शेख आणि इतर सुशिक्षित कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
where to immerse Ganesh idols in Chandrapur : चंद्रपूर 22 ऑगस्ट – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शहरात मूर्ती विसर्जनाच्या सोयीच्या दृष्टीने 25 कृत्रिम तलाव व 25 निर्माल्य कलशांची उभारणी करण्यात आली असुन सर्व घरगुती व लहान मूर्तींचे विसर्जन कृत्रिम कुंडातच करण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
शहरात मुख्यतः दीड दिवस,5 दिवस तसेच 10 दिवसाच्या गणपतीची स्थापना करण्यात येते. दीड दिवसाच्या गणपतीचीही स्थापना करण्यात येत असल्याने स्थापनेच्या दुसऱ्याच दिवशी विसर्जनाच्या व्यवस्थेची गरज भासते. त्यामुळे घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच अथवा जवळच्या कृत्रिम तलावातच व्हावे यासाठी मनपातर्फे व्यवस्था करण्यात आली आहे.
नागरिकांनी घरगुती श्रीगणेशाच्या मूर्ती या कमी उंचीच्या ठेवण्यासंबंधी काळजी घेण्याचे आवाहन मनपामार्फत आधीच करण्यात आले होते. मागील वर्षी पीओपीच्या मुर्तींचा वापर न करून नागरिकांनी प्रशासनास सहकार्य केले होते यंदाही श्रीगणेशोत्सवाच्या सुनियोजित आयोजनासाठी चंद्रपूर मनपा दक्ष असून भाविकांनीही पर्यावरणपुरक श्रीगणेशोत्सव संपन्न व्हावा याकरीता सहकार्य करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे. Chandrapur municipality artificial immersion tanks locations
3 फिरते विसर्जन कुंड –
गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी झोननिहाय 3 ‘फिरत्या विसर्जन कुंडांची’ व्यवस्था करण्यात आली आहे. या फिरत्या विसर्जन कुंडांचे झोननिहाय मार्गक्रमण वेळापत्रक आणि संपर्क क्रमांक देखील महापालिकेद्वारे देण्यात आलेले आहेत.
एक खिडकी योजना – मनपाद्वारे गणेशोत्सव विविध परवानगीसाठी एक खिडकी प्रणाली सुद्धा सुरु करण्यात आली होती. पोलीस स्टेशन, ट्राफिक पोलीस स्टेशन,सार्वजनिक बांधकाम, अग्निशमन, महावितरण केंद्र, महानगरपालिका इत्यादी विभागाद्वारे संयुक्तरीत्या सार्वजनिक मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. eco-friendly Ganesh visarjan in Chandrapur
कृत्रिम तलाव स्थळ – एकूण – २५
१) झोन क्र. १ (कार्यालय) संजय गांधी मार्केट – २ २) साईबाबा मंदीर वडगाव – १ ३)वडगाव पोलीस चौकी – १ ४) दाताळा रोड,इरई नदी – २ ५) तुकुम प्रा.शाळा(मनपा,चंद्रपूर) – २ ६) तुकुम एस टी वर्कशॉप – २ ७) रामाळा तलाव – ४ ८) छत्रपती शिवाजी चौक – २ ९) गांधी चौक – १ १०) लोकमान्य टिळक प्रा.शाळा पठाणपुरा रोड – १ ११) विठोबा खिडकी विठ्ठल मंदीर वॉर्ड – १ १२) महाकाली प्रा.शाळा – १ १३) सावित्रीबाई फुले प्रा. शाळा बाबुपेठ – २ १४) झोन क्र. ३ (कार्यालय) – २ १५) लालपेठ ( हनुमान मंदिर ) जुनी बस्ती
Kishor Jorgewar Charitable initiative : चंद्रपूर – आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहात घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात ३५ रुग्णांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. आज या सर्व रुग्णांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात नि:शुल्क चष्म्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी आमदार जोरगेवार यांनी सर्व रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची व तेथील व्यवस्थेबाबत विचारपूस केली. Devabhau Janakalyan Seva Saptah free eye checkup camp
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहच्या माध्यमातून विविध सेवाभावी उपक्रम राबविण्यात आले. समाजातील सर्वसामान्य घटकांना मदतीचा हात देण्यासाठी हाती घेतलेल्या या उपक्रमांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
३५ रुग्णांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया
या सेवा सप्ताहात आरोग्य हा महत्त्वाचा घटक मानून भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरादरम्यान मोठ्या संख्येने नागरिकांनी तपासणी करून घेतली. विशेषतः डोळ्यांच्या तपासणीत अनेक ज्येष्ठ नागरिकांना मोतीबिंदूची समस्या असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार या रुग्णांच्या मोफत शस्त्रक्रियेसाठी सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात तातडीने व्यवस्था करण्यात आली. या अंतर्गत ३५ रुग्णांवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. Free spectacles distribution Devabhau Janakalyan Seva Saptah
बुधवारी या सर्व रुग्णांना आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात चष्म्यांचे मोफत वितरण करण्यात आले. यावेळी आमदार जोरगेवार यांनी स्वतः रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
मोतीबिंदूच्या आजारामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात अडचणींना सामोरे जावे लागते. योग्य वेळी उपचार न झाल्यास दृष्टी गमावण्याची वेळ येते. मात्र, अशा शिबिरांमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना नवी दृष्टी मिळते. सेवाभावी कार्यातून समाजातील दुर्बल घटकांना आधार मिळवून देणे हेच खरे जनसेवेचे आणि मानवसेवेचे ध्येय असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे नेते प्रकाश देवतळे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, मंडळ अध्यक्ष सुभाष आदमाने, देवा कुंटा यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
poor quality drain chamber collapsed : चंद्रपूर:चंद्रपुरात भ्रष्ट कारभाराची पोलखोल करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील जनता कॉलेज चौकातील सेव्हन स्टार बेकरीसमोर नुकतेच नालीवर बांधलेले चेंबर निकृष्ट दर्जाच्या कामामुळे कोसळले. या दुर्घटनेत एका नागरिकाला गंभीर दुखापत झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या भागात काही दिवसांपूर्वीच नालीवर चेंबरचे बांधकाम केले होते. मात्र, हे काम इतक्या निकृष्ट दर्जाचे होते की, मंगळवारी एका ग्राहकाला थेट खड्ड्यात पडून दुखापत झाली.
नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या चेंबरच्या बांधकामात वापरले गेलेले साहित्य अत्यंत हलक्या दर्जाचे होते. त्यामुळे, एका व्यक्तीच्या वजनानेही ते चेंबर कोसळले. सामान्य नागरिकांच्या कराच्या पैशातून असे ‘कागदी बांधकाम’ करून त्यांच्या सुरक्षेशी खेळ केला जात आहे. municipal chamber collapse
या घटनेमुळे चंद्रपूर शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट पसरली आहे. ‘या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना अजून कोणत्या पुराव्याची गरज आहे?’ असा सवाल नागरिक विचारत आहेत. या प्रकारच्या घटनांमुळे शहराच्या विकासाची दिशा आणि प्रशासनाची नैतिकता यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
चंद्रपूर मनपाचे स्पष्टीकरण काय?
जनता कॉलेज चौकातील सेव्हन स्टार बेकरीसमोर बांधण्यात आलेले चेंबर अचानक कोसळल्याने एका पादचाऱ्याला अपघात झाला. या दुर्दैवी घटनेनंतर सोशल मीडियावर तसेच काही स्थानिक माध्यमांमध्ये “सदर चेंबर हे चंद्रपूर महानगरपालिकेच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचे उदाहरण” म्हणून सादर करण्यात आले आहे.
मात्र, चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे स्पष्ट करण्यात येते की, ही माहिती पूर्णपणे अपुरी व दिशाभूल करणारी आहे. सदर रास्ता हा राष्ट्रीय महामार्ग असुन रस्त्याची देखभाल,दुरुस्ती ही त्यांच्या मार्फतच करण्यात येते. सदरील चेंबरचे बांधकाम हे मनपाने केलेले नसुन कुणामार्फत करण्यात आले आहे याची मनपाकडे नोंद नाही. त्यामुळे या घटनेचा महापालिकेशी कोणताही थेट संबंध नाही.
त्यामुळे घटनेची पूर्ण माहिती न घेता महानगरपालिकेला लक्ष्य करणे हा प्रकार चुकीचा असून नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच नागरिकांनी सोशल मीडियावरील अपुरी व दिशाभूल करणारी माहिती तपासून न पाहता प्रसारित करू नये, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात येत आहे.
105 year old building demolition : चंद्रपूर 19 ऑगस्ट – महापालिका क्षेत्रातील शिकस्त इमारतींपासून परिसरातील रहिवाशांच्या जीविताला निर्माण होऊ शकणारा धोका पाहता चंद्रपूर महानगरपालिकेद्वारे कारवाई करण्यात येत असुन बाजार वॉर्ड,जैन मंदिर जवळील 105 वर्षे जुनी जीर्ण इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे.
भरत अल्लेवार यांच्या मालकीची ही इमारत असुन त्यांना सदर इमारत पाडण्याची नोटीस मनपातर्फे देण्यात आली होती. मात्र त्यांनी स्वतः काही हालचाल न केल्याने मनपाने कारवाई करून त्यांच्या इमारतीचा जीर्ण झालेला भाग निष्कासित केला आहे. पावसाळ्यात दरवर्षी महापालिका क्षेत्रातील जीर्ण व शिकस्त इमारती खाली करण्याची सूचना प्रशासनाकडून नोटीसद्वारे दिली जाते.
जीर्ण इमारती तातडीने जमीनदोस्त करण्याचे निर्देश
मात्र मालमत्ताधारक जिवाची पर्वा न करता त्याच इमारतीत तळ ठोकून राहतात. यामुळे परिसरातील रहिवाशांच्या जिवालासुद्धा धोका निर्माण होतो. जीर्ण इमारतींचे पुन्हा एकदा वस्तुनिष्ठ सर्वेक्षण करून जीर्ण इमारती तातडीने जमीनदोस्त करण्याचे निर्देश आयुक्त विपीन पालीवाल यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. demolition of dangerous old building
सर्व्हे पूर्ण झालेल्या सर्व जीर्ण इमारतींना नोटीस देण्यात आली असुन नोटीस प्राप्त होऊनही जे धारक अश्या जीर्ण घरात राहत आहे त्यांच्यावर मनपाद्वारे कारवाई केली जात आहे. उपायुक्त संदीप चिद्रावार यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त अनिलकुमार घुले,नगर रचनाकार प्रतीक देवतळे,अतिक्रमण निर्मूलन पथक व नगर रचना विभागाने ही कारवाई पार पाडली.
Chandrapur medical college charity event : चंद्रपूर, दि. 18 : कर्मवीर मा. सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात “सोहळा दातृत्वाचा… एक हात मदतीचा” हा अभिनव उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात सामाजिक दायित्वाची जाणीव अधोरेखित करण्यात आली.
या प्रसंगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी एक लाख रुपये किमतीचे स्ट्रेचर व व्हिल चेअर रुग्णालयासाठी दान केले. तर विकृतीशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक व रक्तपेढी प्रमुख डॉ. अमित प्रेमचंद यांनी 17 हजार रुपये किमतीचे डोनर चेअर रक्तपेढीला प्रदान करून सामाजिक जाणिवेचे उदाहरण घालून दिले. Chandrapur medical college
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. कांबळे होते. विशेष अतिथी म्हणून माधुरी कांबळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. निवृत्ती जिवने, उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. अमित प्रेमचंद, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख प्राध्यापक, प्रशासकीय अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
वाढदिवसानिमित्त फुल न देता एखादी वस्तू दान
या प्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. कांबळे म्हणाले, “प्रत्येकाने समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखून काहीतरी दान केले पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने ‘Pay Back to Society’ ही भावना जोपासावी. वाढदिवसानिमित्त फुल न देता एखादी वस्तू दान करून गरजूंना मदत करणे हेच खरे पुण्य आहे.” Pay Back to Society medical college program
कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनारकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. जिवने, जन औषध विभागाचे प्रा. डॉ. अरुण हुमणे तसेच दिव्यांग कौशल्य विकास मल्टीपर्पज सोसायटीचे अध्यक्ष निलेश पाझारे यांनीही दानधर्माचे महत्त्व अधोरेखित केले.
दान स्वरूपात मिळालेल्या साहित्याचे हस्तांतरण अधिष्ठाता डॉ. कांबळे यांच्या हस्ते संबंधित विभागप्रमुख व कर्मचारी यांच्याकडे करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर झळके यांनी केले. संचालन समाजसेवा अधीक्षक राकेश शेंडे यांनी तर आभार उमेश आडे यांनी मानले.
या उपक्रमासाठी समाजसेवा अधीक्षक हेमंत भोयर, भूषण बारापात्रे, प्राजक्ता पेठे, योगिता माळी, नवीन उराडे तसेच नर्सिंग व तांत्रिक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
Chandrapur environmental Rakshabandhan : चंद्रपूर: इको-प्रो तर्फे लोहारा-मामला जंगलातील वृक्षांना राखी बांधुन, युवकांनी वन-वन्यजीव तसेच पर्यावरणाच्या संरक्षणसाठी सदैव तत्पर राहावे, पर्यावरण संरक्षणाकरिता कटिबध्द राहावे असा संदेश कार्यक्रमातुन मान्यवरांनी दिला. आज लोहारा-मामला वनक्षेत्रातील ‘अदानी गो बॅक’ आंदोलनाचे प्रतिक असलेल्या वृक्षांना राखी बांधुन वृक्षरक्षाबंधन कार्यक्रम दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध महाविद्यालय एकत्रीत येत आयोजन करण्यात आले. यामध्ये एफईएस गर्ल्स महाविदयालय, सरदार पटेल महाविद्यालय, सुशीलाबाई मामीडवार महाविद्यालय सहभागी झाले होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सचिन शिंदे, विभागीय वन अधिकारी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प,कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त विभागीय वनाधिकारी अभय बडकेलवार, इको-प्रोचे अध्यक्ष बंडु धोतरे यांनी उपस्थित विद्यार्थाना मार्गदर्शन केले. यावेळी समाजकार्य महाविद्यालय चे प्रा डॉ किरणकुमार मनुरे, शारीरिक शिक्षण संचालिका डॉ. पुष्पांजली कांबळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर. गोंड, डॉ. उषा खंडाळे, डॉ. पुरुषोत्तम माहोरे, प्रा. अशोक बनसोड एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रज्ञ जुनघरे प्रा. योगेश निमगडे तसेच वनपाल उत्तम गाठले, वनरक्षक धनराज गेडाम, राजु मोहुर्ले, सुलभा उरकुडे, हिरकन्या सावसाकडे उपस्थित होते. Eco-Pro Rakhi to environment event Chandrapur colleges
चंद्रपूरकर नागरीकांनो सदैव तत्पर रहा
चंद्रपूर जिल्हा जंगलाचा जिल्हा असुन ‘वाघांचा जिल्हा’ ही नवी ओळख निर्माण झालेली आहे. या जिल्हयात वन-वन्यजिव या नैसर्गिक संपदेसह मोठया प्रमाणात खनिज संपत्ती सुध्दा आहे. जंगलाखाली असलेल्या कोळसामुळे येथील वन्यजीव समृध्द जंगलावर कोळसा खान प्रकल्पाचे संकट नेहमीच उभे राहते. आणी प्रश्न उभा राहतो तो येथील पर्यावरणाचा, प्रदूषणाचा, वाघासह अन्य वन्यप्राण्यांचा अधिवासाचा, त्यांच्या भ्रमणमार्गाचा, अपुऱ्या अधिवासामुळे मानव-वन्यप्राणी संघर्ष वाढीचा म्हणुन येथील वन-वन्यजिवांच्या संरक्षण व संवर्धनासाठी चंद्रपूरकर नागरीकांना सदैव तत्पर राहीले पाहीजे.
इको-प्रो सह अनेक पर्यावरणवादी संस्था-संघटनाच्या तसेच चंद्रपूरकरांच्या जनआंदोलनामुळे प्रस्तावीत अदानी कोळसा खानीचा प्रस्ताव नाकारला गेला होता. या आंदोलनाच्या स्मृती जपत, आपला नैसर्गीक वारसा पुढील पिढीला सुस्थितीत हस्तांतरण करता यावे, याची जाणीवजागृती सर्व घटकामध्ये यावी याकरिता दरवर्षी ‘इतिहासात डोकावुन, भविष्यातील पर्यावरणाची सुरक्षीतता करीता लढण्यास बळ मिळावे’ हा उद्देश लक्षात घेउन इको-प्रो संस्थेच्या वतीने मागील 17 वर्ष पासुन लोहारा-मामला जंगलातील ‘अदाणी गो बॅक’ आंदोलनाचे प्रतिक असलेल्या वृक्षास राखी बांधुन चंद्रपूर शहरात वन-वन्यजीव व पर्यावरण रक्षणासाठी 2008-2009 साली प्रस्तावीत अदाणी कोळसा खाणीच्या विरोधात झालेल्या जन-आंदोलनाच्या स्मृतीना उजाळा दिला जातो. Chandrapur college students tie Rakhi to forest trees
या कार्यक्रमा दरम्यान लोहारा-मामला रोडवरील वनक्षेत्रातील ‘अदाणी गो बॅक’ आदोलनाचे प्रतीक असलेल्या वृक्षास राखी बांधण्यात आली. निसर्गाचे रक्षण करण्यास वनविभागासोबतच सामान्य नागरीक व गावकरी यांचे सुध्दा सहकार्य अपेक्षीत असुन आपल्या अवतीभवतीचे पर्यावरण व जैवविवीधतेच्या संरक्षणासाठी सदैव तत्पर असले पाहीजे याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करीत स्मृतीना उजाळा दिला. विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता इको-प्रो चे अब्दुल जावेद, कुणाल देवगिरीकर, बंडू दुधे, सुमित कोहळे, राजू काहिलकर, सनी दुर्गे, सचिन धोतरे, रुद्राक्ष धोतरे आदीनी सहकार्य केले. Chandrapur environmental Rakshabandhan
Chandrapur Bhauchi Dahi Handi : चंद्रपूर : द मराठा चॅरीटेबल ट्रस्ट आणि बाळूभाऊ मित्र परिवार यांच्या वतीने १७ ऑगस्ट २०२५ रोजी ‘भाऊची दहीहंडी २०२५’ आणि ‘भव्य वेशभूषा स्पर्धा’ न्यू इंग्लिश हायस्कूल मैदान, वरोरा नाका चौक येथे अभूतपूर्व उत्साहात पार पडला. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा प्रथमच चंद्रपूर शहरात आयोजित करण्यात आली होती. केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता, युवा पिढीला साहसी खेळाची संधी देणे, त्यांचे कौशल्य विकसित करणे आणि सामाजिक एकतेला चालना देणे हा या आयोजनाचा मुख्य उद्देश असल्याचे खासदार प्रतिभा धानोरकर यांनी मार्गदर्शना दरम्यान सांगितले.
यावेळी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, जेष्ठ काँग्रेस नेते विनोद दत्तात्रय, काँग्रेस महिला ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुनंदा धोबे, शहर काँग्रेस महिला जिल्हाध्यक्ष चंदा वैरागडे, माजी महापौर संगीता अमृतकर, चंद्रपूर मध्यवर्ती बँकेचे संचालक दिनेश चोखारे, इंटक नेते प्रशांत भारती, काँग्रेस नेते प्रवीण पडवेकर, माजी नगरसेवक नंदू नागरकर, पंचायत समिती राजुरा माजी सभापती ऍड. कुंदा जेणेकर, श्यामकांत थेरे,ए. आय. पी. सी जिल्हाध्यक्ष रामकृष्ण कोंड्रा, रतन शिलावार, कुणाल चहारे यांची उपस्थिती होती.
जय शीतला माता मंडळ ठरली विजेता
या दहीहंडी स्पर्धेत चंद्रपूरसह जिल्ह्यातील विविध युवक आणि युवतींच्या पथकांनी उत्साहाने सहभाग घेतला. अत्यंत चुरशीच्या लढतीत, जय शितला माता मंडळ, बाबूपेठ वार्ड, चंद्रपूर येथील गोविंदांनी ६ थरांची भव्य मानवी साखळी तयार करून हंडी फोडली आणि रु. १,५१,००० चे प्रथम पारितोषिक पटकावले. महिला गोविंदा पथकांची दमदार उपस्थिती देखील वाखाण्याजोगी होती. गोपिका गर्ल्स, बल्लारपूर या महिला पथकाने ४ थरांची सलामी देत सर्वांची मने जिंकली आणि त्यांना प्रोत्साहनपर परितोषिकाने गौरवण्यात आले. Balu Bhau Mitra Pariwar charity dahi handi event
दहीहंडी उत्सवाच्या जोडीलाच ‘भव्य वेशभूषा स्पर्धे’मध्ये चिमुकल्यांनी ‘भारतीय संस्कृती’ आणि ‘भारतीय इतिहासातील महापुरुष’ या विषयांवर मनमोहक सादरीकरण केले. या स्पर्धेत ६५ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पृहा वाटेकर हिने रु. ५,००० चे प्रथम बक्षीस पटकावले, तर सान्वी लालसरे हिला रु. ३,००० चे द्वितीय बक्षीस आणि सानिधी इटनकर हिला रु. २,००० चे तृतीय बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्यासोबतच १० स्पर्धकांना प्रोत्सानपर पारितोषिक देण्यात आले. चंद्रपूरकरांच्या प्रचंड उपस्थितीने, तरुणाईच्या उत्स्फूर्त सहभागाने आणि “गोविंदा आला रे आला!” या घोषणांनी दहीहंडी सोहळ्याला वेगळेच आकर्षण लाभले.
quality education initiative 10 crore fund : चंद्रपूर, दि. 16 : शहरातील बाबुपेठ येथे चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे चालविण्यात येणा-या पी.एम. श्री. सावित्रीबाई फुले उच्च माध्य. व प्राथ. शाळेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळत असल्याने येथे शाळा प्रवेशाचा ओढा दिवसेंदिवस वाढतच आहे. सजग पालक आपल्या पाल्यांना या शाळेत प्रवेशित करीत असून शाळेच्या पायाभूत सुविधा आणि गुणवत्तापूर्वक शिक्षणामध्ये वाढ होण्यासाठी 10 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिली.
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत बाबुपेठ येथील पीएम श्री शाळेत आयोजित तिरंगा रॅलीमध्ये ते बोलत होते. यावेळी मंचावर आमदार किशोर जोरगेवार, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त संदीप चिद्यावार, शाळेचे मुख्याध्यापक श्री. नीत आदी उपस्थित होते. Babupeth PM Smt Savitribai Phule school fund
खनिज विकास निधीतून १० कोटी रुपये देणार
पालकांनी विश्वास दर्शवून आपल्या पाल्यांना या शाळेत प्रवेश दिला आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, विद्यार्थ्यांना आणखी गुणवत्तापूर्वक शिक्षण आणि सुसंस्कृत नागरिक घडविण्याची जबाबदारी येथील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचा-यांवर आहे. आपला विद्यार्थी कसा पुढे जााईल, त्याच्यातील सुप्त कलागुणांना कसे विकसीत करता येईल, हेच शिक्षकांचे ध्येय असायला पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांच्या चेह-यावर नेहमी हास्य राहिले पाहिजे. या शाळेचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून येथे वर्गखोल्या, फर्निचर, आधुनिक लॅब, डीजीटलायझेशन, क्रीडांगण आदींसाठी खनीज विकास निधीतून 10 कोटी रुपये त्वरीत देऊ. त्यासाठी या महिन्याअखेर कृती आराखडा सादर करावा. पुढील महिन्यात प्रस्ताव मंजूर करून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही पालकमंत्री डॉ. उईके यांनी आश्वस्त केले.
आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, बाबुपेठ परिसरात सामान्य कष्टकरी वर्गाचे वास्तव्य आहे. महानगर पालिकेच्या वतीने अतिशय सुंदर आणि गुणवत्तापूर्वक शाळा चालविली जात आहे. 1100 विद्यार्थी असलेल्या या शाळेसाठी 36 वर्गखोल्यांची आवश्यकता आहे. मात्र सद्यस्थितीत 20 वर्गखोल्या असून शाळेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा, तसेच मनपाच्या वतीने चालविण्यात येणा-या दोन शाळांचासुध्दा याच धर्तीवर विकास करावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. राज्य शासनाच्या सुचनेनुसार ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत तिरंगा रॅलीचा अतिशय चांगला उपक्रम शाळेने आयोजित केला, त्यामुळे चंद्रपूर महानगरपालिका, सर्व अधिकारी आणि शिक्षक अभिनंदनास पात्र आहे, असेही त्यांनी सांगितले. new classrooms and labs funded by 10 crore
प्रास्ताविकात आयुक्त विपीन पालिवाल म्हणाले, आपल्याला स्वातंत्र किसे मिळाले, आपल्या पुर्वजांनी ब्रिटीशांविरुध्द कसा लढा दिला, सोबतच हुतात्म्यांचे बलिदान आदी बाबींची माहिती जनतेला मिळावी, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘हर घर तिरंगा’ हे अभियान सुरू केले आहे. या अंतर्गत शाळेमध्ये रांगोळी, चित्रकला, पत्रलेखन, राखी स्पर्धा घेण्यात आल्या. यावर्षी चंद्रपूर महापालिकेच्या वतीने 10 हजार झेंड्यांचे वितरण करण्यात आले आहे. 2012 मध्ये शाळेत केवळ 70 विद्यार्थी होते आज ही संख्या 1100 वर पोहचली आहे. शाळेत केवळ संख्यात्मक वाढ नाही तर गुणात्मक शिक्षणावर भर देण्यात येतो, असेही त्यांनी सांगितले. education infrastructure
यावेळी मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून तिरंगा रॅलीला रवाना करण्यात आले. ‘भारत माता की जय, वंदे मातरम्’ अशा घोषणा देत विद्यार्थ्यांची तिरंगा रॅली बाबुपेठ परिसरातून काढण्यात आली.
Controversial Amma Chowk monument removed : चंद्रपूर : शहरातील ऐतिहासिक गांधी चौक परिसरातील वादग्रस्त अम्मा चौक स्मारक अखेर हटविण्यात आले आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडे चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने दाखल केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली.
गांधी चौक ते महानगर पालिकेच्या नेताजी भवनच्या मागील भागात महादेव मंदिर आहे. ते भारत सरकारद्वारे ११ एप्रिल १९२५ रोजी केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. प्राचीन स्मारके व पुरातत्त्व स्थळे अधिनियम १९५८ नुसार या परिसरातील १०० मीटरच्या आत कोणतेही नवीन बांधकाम किंवा अतिक्रमण करण्यास सक्त मनाई आहे. तरीदेखील चंद्रपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून परवानगी न घेता पोलिस ठाणे आणि नेताजी भवनच्या मधोमध अम्मा चौक स्मारकाचे बांधकाम सुरू करण्यात आले होते.
या प्रकरणी काँग्रेसचे शहराध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी पुरातत्त्व विभागाकडे लेखी निवेदन देत संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी व कारवाईची मागणी केली होती. त्यांच्या मागणीनंतर पुरातत्त्व विभागाने महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली होती. नोटीसमध्ये सात दिवसांच्या आत अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. तसे न झाल्यास पोलीस प्रशासनाच्या मदतीने कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला होता. अखेर महानगरपालिका प्रशासनाने अतिक्रमण हटवून परिसर मुक्त केला. Amma Chowk controversy Chandrapur heritage violation
या निर्णयाचे स्वागत करत काँग्रेस कमिटीने सांगितले की, गांधी चौक परिसराची ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख जपण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती. नियम मोडून उभारलेले स्मारक हा कायद्याचा अवमान होता. भविष्यात असा प्रकार घडू नये, अशी मागणी काँग्रेसने पुन्हा एकदा केली आहे.