चंद्रपूर शहर (Chandrapur City) आणि आसपासच्या परिसरातील प्रत्येक लहान-मोठी बातमी वाचा news34.in वर. महानगरपालिका, स्थानिक राजकारण, गुन्हेगारी, शैक्षणिक आणि सांस्कृतिक घडामोडींचे त्वरित आणि अचूक कव्हरेज येथे उपलब्ध आहे. तुमच्या चंद्रपूर शहर परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या विषयावर सविस्तर माहिती आणि सत्य घटनांचे अपडेट्स मिळवा. स्थानिक नागरिकांसाठी हे सर्वात विश्वसनीय स्रोत आहे.
Chandrapur Dahi Handi utsav : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांना एक मोठा आणि उत्साहपूर्ण उत्सव अनुभवता यावा यासाठी ‘द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘बाळूभाऊ धानोरकर मित्र परिवार’ यांच्या वतीने यावर्षी ‘भाऊंची दहीहंडी उत्सव’ आणि लहान मुलांसाठी ‘भव्य वेशभूषा स्पर्धा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या १७ ऑगस्ट २०२५ रोजी न्यू इंग्लिश हायस्कूल मैदान, वरोरा नाका चौक, चंद्रपूर येथे संपन्न होणार आहे. हा उत्सव केवळ दहीहंडीपुरता मर्यादित नसून, यात लहान मुलांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या स्पर्धेची भर घालण्यात आली आहे.
१,५१,००० रोख रक्कम आणि एक चषक
दहीहंडीचा मुख्य कार्यक्रम सायंकाळी ४:०० वाजता सुरू होईल. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोविंदा पथकांसाठी प्रथम पारितोषिक म्हणून १,५१,००० रोख रक्कम आणि एक चषक ठेवण्यात आले आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुक संघांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे. Chandrapur costume contest for kids
या कार्यक्रमासोबतच, ५ ते १० वर्षे वयोगटातील मुलांसाठी एक विशेष ‘भव्य वेशभूषा स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे विषय भारतीय संस्कृती आणि भारतीय इतिहासातील महापुरुष असे ठेवण्यात आले आहेत. लहान मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्याकरिता ही एक उत्तम संधी आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिके दिली जातील, ज्यात प्रथम बक्षीस ५,०००, द्वितीय ३,०००, तृतीय २,००० आणि १० उत्तेजनार्थ बक्षिसे देण्यात येतील.
दोन्ही कार्यक्रमांच्या अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी कृपया ७९७२३६९०४५ या क्रमांकावर संपर्क साधावा. सदर कार्यक्रम खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहेत. आम्ही चंद्रपुर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना, विशेषतः गोविंदा पथक व बालकांना या उत्साहात सहभागी होण्याचे आणि कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करते.
Amma Chowk memorial violation : चंद्रपूर : चंद्रपूर येथील महादेव मंदिर (मुळशीगोदाम) हे भारत सरकारद्वारे 11 एप्रिल 1925 रोजीच्या अधिसूचनेनुसार केंद्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) नुसार, या मंदिराच्या परिसरात महानगरपालिकेच्या माध्यमातून अम्मा चौक स्मारकासाठी अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमण झाल्याची तक्रार चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून करण्यात आली होती. या अनुषंगाने, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने यासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे.
नोटीसनुसार, प्राचीन स्मारके आणि पुरातत्व स्थळे व अवशेष अधिनियम 1958 नुसार (Act 24 of 1958) या संरक्षित स्मारकाच्या 100 मीटरच्या परिसरात अनधिकृत बांधकाम, उत्खनन किंवा इतर कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम (निर्माण) किंवा नूतनीकरण करण्यास सक्त मनाई आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस दोन वर्षांपर्यंतचा कारावास आणि/किंवा 1,00,000/- (एक लाख) रुपयांपर्यंतचा दंड होऊ शकतो.
7 दिवसाच्या आत अतिक्रमण हटवा
या प्रकरणी, भारत सरकारने, पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी, चंद्रपूर यांना, अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींना, बांधकामाची प्रक्रिया थांबवून ७ दिवसांच्या आत अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार, जर ७ दिवसांच्या आत अतिक्रमण हटवले नाही, तर स्थानिक पोलीस प्रशासनाच्या मदतीने ते हटवण्यात येईल आणि संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल. Amma Chowk controversy
या नोटीसमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, जर संरक्षित स्मारकाच्या परिसरात कोणत्याही बांधकामाची दुरुस्ती (Repairs) करायची असेल, तर त्यासाठी सक्षम प्राधिकारी (Competent Authority) यांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
या नोटीसमुळे, स्थानिक प्रशासनाने महादेव मंदिराच्या संरक्षित परिसरात सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांवर आणि अतिक्रमणांवर लक्ष केंद्रित केले आहे. मंदिर परिसरातील अनधिकृत बांधकामे आणि अतिक्रमणांविरोधात लवकरच मोठी कारवाई होण्याची शक्यता आहे.
ramala lake floating cleaning machine : चंद्रपूर – रामाळा तलाव सौदर्यीकण आणि संरक्षण यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर निधीतून घेण्यात आलेल्या तरंगत्या यंत्राच्या माध्यमातून रामाळा तलाव स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. सदर कामाची आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी करत अधिका-यांना सुचना केल्या आहे. सदर मशीनरी रामाळा तलाव स्वच्छतेत उपयुक्त ठरणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.
यावेळी उपायुक्त चिद्रावार, यांत्रिकी सहायक अभियंता चोरे, पाण्यापूरवठा कनिष्ठ अभियंता चोरे, महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, विधानसभा प्रमुख दशरथ ठाकूर, महामंत्री रवी गुरुनूले, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, मंडळ अध्यक्ष सुभाष अदमाने, संजीव सिंग, राकेश बोमनवार, तेजा सिंग, सुबोध चिकटे, नितेश गवळी, आदींची उपस्थिती होती.
आ. किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनंतर शहराच्या मध्यवर्ती भागातील ऐतिहासिक व निसर्गरम्य रामाळा तलावाची स्वच्छता आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेने मोठा उपक्रम हाती घेतला आहे. अनेक वर्षांपासून तलावाच्या पृष्ठभागावर पसरलेल्या इकोर्निया या जलवनस्पतींमुळे तलावातील पाण्याचा प्रवाह, जलजीवन व सौंदर्य या तिन्ही गोष्टींवर प्रतिकूल परिणाम होत होता. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून आता विशेष यांत्रिक साधनांची मदत घेतली जात आहे. automatic lake cleaning machine
स्वच्छतेचे प्रमाण व गती दोन्ही वाढणार
आमदार किशोर जोरगेवार यांनी मंजूर केलेल्या निधीतून महानगरपालिकेच्या वतीने आणण्यात आलेल्या या अत्याधुनिक यांत्राद्र्वारे ईकोर्निया वनस्पतींचे मोठ्या प्रमाणावर उच्चाटन सुरू आहे. मशीन पाण्यात तरंगत राहून थेट पृष्ठभागावरील व मुळांसकट वनस्पती गोळा करून बाहेर काढते. यामुळे स्वच्छतेचे प्रमाण व गती दोन्ही वाढले असून, अल्पावधीतच तलाव वनस्पतीमुक्त होण्याच्या मार्गावर आहे.
आज आमदार किशोर जोरगेवार यांनी रामाळा तलावावर भेट देऊन सुरू असलेल्या कामाची सखोल पाहणी केली. मशीनरीची कार्यपद्धती, कामाचा वेग आणि स्वच्छतेचा परिणाम याची माहिती त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेतली.
यावेळी ते म्हणाले, रामाळा तलाव हे फक्त जलस्रोत नसून चंद्रपूर शहराची ओळख आहे. या तलावाचे संरक्षण, संवर्धन आणि सौंदर्यवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. स्वच्छतेनंतरही सातत्याने देखभाल केली तरच हे कार्य दीर्घकाळ टिकेल असे ते म्हणाले. आ. जोरगेवार यांनी काम अधिक वेगाने आणि कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी तसेच साफ केलेल्या वनस्पतींचे योग्य व्यवस्थापन करण्याबाबतही अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या मोहिमेमुळे तलावातील पाणी प्रवाह सुधारेल, ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल, पाण्यातील जैवविविधतेला चालना मिळेल आणि तलाव परिसर पुन्हा एकदा नागरिकांसाठी स्वच्छ, निसर्गरम्य ठिकाण म्हणून उजळून निघेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. Ramala Lake beauty conservation project
mla kishor jorgewar study room initiative : चंद्रपूर – श्री श्री रामकृष्ण सेवा समितीने हाती घेतलेले हे स्वप्नवत कार्य आज पहिल्या टप्प्यात प्रवेश करत आहे. आपल्या परिसरात अभ्यासिका उभारण्याचा शुभारंभ होत आहे. ही केवळ चार भिंतींची इमारत नसून, आपल्या मुलांच्या आणि समाजाच्या भविष्यास आकार देणारे ज्ञानमंदिर ठरणार असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. modern digital study center
आमदार किशोर जोरगेवार यांनी कृष्णा नगर येथील श्री श्री रामकृष्ण सेवा समिती येथे अभ्यासिकेच्या बांधकामासाठी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. सदर कामाचे भुमिपूजन आज त्यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महामंत्री मनोज पॉल, सविता दंढारे, राष्ट्रीय परिषद सदस्य तुषार सोम, बलराम डोडाणी, मंडळ अध्यक्ष अॅड. सारिका संदुरकर, सचिव विश्वजीत शाहा, रॉबिन बिश्वास, तपोष डे, प्रलय सरकार, आनंद रणशूर, सुधाकर राखडे, जितेश कूळमेथे, कृष्णा मंडळ, बलाई चक्रवर्ती, मदन शहा, संतोष चक्रवर्ती, सुशांत भद्रा, सुनील रॉय आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात तब्बल २० अभ्यासिका
पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्याचा संकल्प आपण केला आहे. ११ अभ्यासिकांचा आपला संकल्प होता; मात्र आता जवळपास २० अभ्यासिका आपण मतदारसंघात तयार करत आहोत. यातील काही अभ्यासिकांचे काम पूर्ण झाले असून, विद्यार्थी येथे अभ्यास करून स्वप्नांना पंख देत आहेत, असे ते म्हणाले. bjp mla kishor jorgewar development works
ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी केवळ पुस्तक वाचण्याची किंवा अभ्यास करण्याची जागा नसेल, तर त्यांच्या विचारशक्तीचा, सर्जनशीलतेचा आणि स्वप्नांचा विस्तार करणारे केंद्र ठरेल. येथे होणाऱ्या वाचन-संवादातून, मार्गदर्शन सत्रांतून आणि विविध शैक्षणिक उपक्रमांतून अनेक तरुणाई आपले उद्दिष्ट पूर्ण करतील. केवळ शैक्षणिक प्रगतीच नव्हे, तर आपल्या संस्कृतीची आणि परंपरेची जपणूक हेही या अभ्यासिकेचे ध्येय असेल. आजच्या डिजिटल युगात वाचनाची आणि प्रत्यक्ष संवादाची गरज अधिक वाढली आहे. अशा वेळी, अशी सुविधा निर्माण होणे म्हणजे पुढच्या पिढ्यांसाठी अमूल्य ठेवा ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Ramchandra Hindi primary school : चंद्रपूर – चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील जटपूरा गेट परिसरात स्थित रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळेला मॉडेल स्कूल म्हणून विकसित करण्यासाठी ५ कोटींच्या निधीची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी शालेय शिक्षण मंत्री ना. दादाजी भुसे यांच्याकडे केली आहे. ना. दादाजी भुसे चंद्रपूर दौऱ्यावर असताना, विश्रामगृह येथे आमदार जोरगेवार यांनी त्यांची भेट घेऊन या संदर्भातील निवेदन सादर केले. Model school funding 5 crore
यावेळी भारतीय जनता पक्षाचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, महिला आघाडी अध्यक्षा छबू वैरागडे, भाजप नेते अशोक जिवतोडे, विधानसभा महिला प्रमुख वंदना हातगावकर, प्रकाश देवतळे, युवा मोर्चा अध्यक्ष मयूर हेपट, नामदेव डाहुले, महामंत्री मनोज पाल, रवि गुरुनुरे, सविता दंढारे, मंडळ अध्यक्ष प्रदीप किरमे, स्वप्नील डुकरे, सुभाष अदमाने, रवि जोगी, ॲड. सारिका संदुरकर, देवनंद वाढई, वंदना तिखे, सायली येरणे, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार यांची उपस्थिती होती.
शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत
रामचंद्र हिंदी प्राथमिक शाळा प्रभाग क्र. ७ मध्ये असून, ही शाळा गेल्या अनेक वर्षांपासून अल्पसाधनांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे. शाळेतील बहुतांश विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. सध्या शाळेची इमारत अत्यंत जीर्ण अवस्थेत असून पायाभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. वर्गखोल्या अपुऱ्या आहेत, शौचालयांची संख्या कमी आहे, तसेच डिजिटल शिक्षणासाठी कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. Chandrapur Jatpura Gate model school funding
या पार्श्वभूमीवर, सदर शाळेला मॉडेल स्कूलचा दर्जा देत नव्याने सुसज्ज इमारत, स्मार्ट क्लासरूम, संगणक कक्ष, प्रयोगशाळा, वाचनालय, शौचालय, शुद्ध पिण्याचे पाणी आणि खेळाचे मैदान उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. यासाठी अंदाजे ५ कोटी निधीची आवश्यकता असुन हा निधी मंजूर करण्यात यावा अशी मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांना केली आहे.
angdaan jeevan sanjeevani abhiyan : चंद्रपुर 5 ऑगस्ट – चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे “अंगदान – जीवन संजीवनी अभियान पंधरवडा” दिनांक 3 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2025 दरम्यान राबविला जात आहे.. या अभियानाचा उद्देश नागरिकांमध्ये अंगदानाविषयी जागृती निर्माण करणे, गैरसमज दूर करणे आणि अधिकाधिक लोकांना अंगदानासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. organ donation awareness campaign Chandrapur
समाजाभिमुख उपक्रम राबवण्याच्या दृष्टीने मनपा आरोग्य विभागामार्फत अवयवदानबाबत मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येत आहे 5 ऑगस्ट रोजी मनपा सभागृहात यासंबंधी मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. डॉ. नयना उत्तरवार यांनी या संदर्भात सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. याप्रसंगी सर्व उपस्थितांनी अवयवदानाची शपथ घेतली.अवयवदान हे “मरणोत्तर दान” म्हणून याला सर्वोच्च मानले जाते. एका व्यक्तीच्या अंगदानामुळे 8 लोकांचे प्राण वाचू शकतात,अंगदान सुरक्षित, वैद्यकीय दृष्ट्या नियंत्रित आणि कायदेशीर प्रक्रिया आहे.अंगदानामुळे दात्याच्या शरीराचा अपमान होत नाही; सन्मानपूर्वक सर्व प्रक्रिया पार पाडली जाते. अंगदानाच्या एका निर्णयामुळे अनेक कुटुंबांना आशा, आनंद आणि नवे भविष्य मिळू शकते. organ donation drive Chandrapur municipal corporation
डोळे, हृदय, मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुसे, स्वादुपिंड इ. अवयवांचे प्रत्यारोपण करून रुग्णांना नवे जीवन मिळते. काही अवयव (जसे की किडनी) प्रत्यारोपणामुळे रुग्णाला वर्षानुवर्षे चालणाऱ्या डायलिसिसपासून मुक्ती मिळते. कॉर्निया प्रत्यारोपणामुळे अंध व्यक्तीला पुन्हा दृष्टी मिळू शकते. एका अर्थाने मृत्यूनंतरही आपण समाजासाठी कार्य करू शकतो.
सदर कार्यक्रमाच्या मार्गदर्शन व जनजागृती प्रसंगी उपायुक्त मंगेश खवले, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नयना उत्तरवार,नगरसचिव नरेंद्र बोबाटे,सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,डॉ. अमोल शेळके,उपअभियंता रवींद्र कळंबे,उपअभियंता प्रगती भुरे,सोनू थुल,अमित फुलझेले,सागर सिडाम,डॉ. नरेंद्र जनबंधू तसेच अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अवयवदानासाठी कुठे संपर्क साधावा –
अवयवदान संकल्प अणि ऑनलाईन प्रतिज्ञा संदर्भात अधिक माहीतीसाठी नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन (NOTTO) च्या www.notto.abdm.gov.in या संकेतस्थळावरील वेब पोर्टलच्या माध्यमातुन ऑनलाईन प्रतिज्ञेद्वारे नोंदणी करावी. अधिक माहीतीसाठी NOTTO च्या कॉल सेंटरशी टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1800-11-4770 यावर किंवा चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभाग येथे संपर्क साधावा.
maha arogya shibir Chandrapur : चंद्रपूर – आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहाच्या निमित्ताने शंकुतला लॉन येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा ५ हजार २६ नागरिकांनी लाभ घेतला. विविध तपासण्यांमध्ये काही रुग्णांमध्ये गंभीर आजारांचे निदान झाले असून त्यांच्यावर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या तपासणीत बालकांचाही समावेश आहे.
या कार्यक्रमाला राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजप प्रवक्त्या व चिखलीच्या आमदार श्वेता महाले, भाजप महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, कल्याणी किशोर जोरगेवार, अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंह, माजी उपमहापौर अनिल फुलझले, प्रकाश देवतळे, तुषार सोम, नामदेव डाहुले, संजय कंचर्लावार, दशरथसिंह ठाकूर, भारती दुधाणी, मंडळ अध्यक्ष रवि जागी, प्रदीप किरमे, स्वप्नील डुकरे,
अॅड. सारिका संदुरकर, सुभाष आदमाने, विनोद खेवले, माजी नगरसेविका छबू वैरागडे, घुग्घुस शहर अध्यक्ष संजय तिवारी, मनोज पाल, माजी नगरसेवक देवानंद वाढई, प्रशांत चौधरी, वंदना तिखे, पुष्पा उराडे, वनिता डुकरे, शीतल आत्राम, वंदना हातगावकर, सविता दंढारे तसेच ज्युपिटर हॉस्पिटल मुंबईचे डॉ. रचना केशवानी, डॉ. सुषांत श्रीवास्तव, एनसीआय हॉस्पिटल कामटीचे डॉ. पवन अरगडे, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. वसंत वाघ, कस्तुरबा गांधी हॉस्पिटलचे डॉ. अजहर शेख, आयएमएचे अध्यक्ष डॉ. दिक्षीत आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रपूरात सुरू असलेल्या देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताह अंतर्गत विविध सामाजिक, धार्मिक व आरोग्यवर्धक उपक्रम राबवले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आयोजित महाआरोग्य शिबिरात मुंबईच्या ज्युपिटर हॉस्पिटल, नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट, आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.
या शिबिरात कर्करोग, बालरोग, अस्थिरोग, नेत्ररोग, हृदयविकार, सामान्य आरोग्य, कान-नाक-घसा, श्वसन रोग, न्यूरोलॉजी, स्त्रीरोग, त्वचारोग आणि दंतरोग अशा विविध तपासण्या करण्यात आल्या. तपासणीदरम्यान गंभीर आजाराचे निदान झालेल्या रुग्णांवर विनामूल्य शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. free health camp
आरोग्य शिबिरे गरजेची – हंसराज अहिर
वाढते आजार पाहता त्यांचे वेळीच निदान होणे अत्यंत आवश्यक आहे. अशा शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या शरीरातील आजारांची माहिती मिळते. त्यामुळे अशा आरोग्य शिबिरांची आवश्यकता आहे, असे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी सांगितले. त्यांनी देवाभाऊ जनकल्याण सेवा सप्ताहातील विविध सेवाभावी उपक्रमांचेही कौतुक केले.
मुख्यमंत्री यांचा संकल्प आमदार जोरगेवार यांनी साकारला – आ. श्वेता महाले
वाढदिवसाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनहिताचे उपक्रम राबवण्याचे आवाहन केले होते. अनेक आमदारांनी एक दिवसाचे उपक्रम राबवले, पण आमदार किशोर जोरगेवार यांनी १० दिवसांचा साप्ताह राबवीत तब्बल ३५५ हून अधिक उपक्रम राबवून हा संकल्प खऱ्या अर्थाने साकारला आहे, असे आमदार श्रेता महाले म्हणाल्या. त्यांनी आमदार जोरगेवार यांच्या कार्याची प्रशंसा करताना त्यांचे अपक्ष असताना केलेले काम आणि आज भाजपचे आमदार असतानाही मतदारसंघासाठीची तळमळ अधिवेशनात पाहायला मिळते, असे नमूद केले.
पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण केंद्रस्थानी – आ. किशोर जोरगेवार
मतदारसंघात काम करताना पर्यटन, आरोग्य आणि शिक्षण या तीनही क्षेत्रांना केंद्रस्थानी ठेवून आम्ही नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करत आहोत. यापूर्वीही आम्ही आरोग्य शिबिरांद्वारे ४७ बालकांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. आता या महाआरोग्य शिबिरातही गंभीर रुग्णांवर उपचाराचा सर्व खर्च आम्ही उचलणार आहोत, असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.
या शिबिरात डॉक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या मदतीमुळेच हे शिबिर यशस्वी झाले आहे. अनेक रुग्णांमध्ये गंभीर आजारांचे निदान झाले असून त्यांच्या उपचाराचा खर्च मोठा आहे. मात्र, रुग्णांनी चिंता करू नये. या सर्व शस्त्रक्रिया पूर्णपणे विनामूल्य करण्यात येणार असल्याचे आमदार जोरगेवार यांनी सांगितले.
illegal police entry without warrant : चंद्रपूर – पिडीत युवक आनंद गेडाम ची आई अनिता गेडाम यांनी पत्रकार परिषदेत घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करणाया आणि तिच्या मुलाला जबरदस्तीने घेऊन जाणाया आणि अमानुष अत्याचार करणाया पोलिस अधिकारी आणि त्यांच्या पथकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तिने सांगितले की, ती मित्रनगर येथील डॉ. आंबेडकर कॉलेजच्या मागे राहते.
24 तारखेच्या रात्री १ वाजता पोलिस अधिकारी देवराव नरोटे आणि त्यांच्या पथक समेत चार महिला पोलिस होते. त्यांनी कोणतीही सूचना आणि वॉरंटशिवाय घराचे गेट तोडले आणि दगडफेक करून बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केला. यादरम्यान त्यांनी घरातील लोकांना शिवीगाळ केली आणि धमकी दिली. आनंदचा फोटो घ्यायचा आहे असे सांगून मनमानी पध्दतीने वागण्यास सुरुवात केली.chandrapur police brutality case
पोलिस कर्मचायांचे असे वर्तन पाहून तिचा मुलगा आनंद गेडाम घरातून पळून गेला. लवकरच पोलिस अधिकारी आणि त्यांच्या पथकाने त्याला पकडले, रागंबर आणि ठाकूरच्या घरी नेले आणि तेथे अमानुष मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. बेशुद्ध अवस्थेत त्याला गल्लीत फेकून देण्यात आले. पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावून त्याला सरकारी रुग्णालयात पाठवले आणि पोलिस तेथून निघून गेले असा आरोप पिडीत युवकाची आई अनिता गेडाम यांनी पत्रकार परिषदेत पोलिसांवर केला. victim rights in police brutality cases
राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल
तिने पुढे सांगितले की, दुस_या दिवशी फोन येताच कुटुंब त्याला सरकारी रुग्णालयात भेटण्यासाठी गेले. पिडीत आनंदची प्रकृती खूपच गंभीर होती. सीटी स्कॅन आणि इतर चाचण्यांनंतर डॉक्टरांनी त्याला तात्काळ नागपूर मेडिकलमध्ये रेफर केले. सध्या आनंद खाजगी पोद्दार रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल आहे आणि त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले. आनंद गेडाम यांना न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती अनिता गेडाम यांनी दिली.
पीडित अनिता गेडाम यांनी पोलीस अधिकारी देवराव नरोटे आणि त्यांच्या टीमवर तात्काळ कारवाई करावी आणि त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करावा, संपूर्ण घटनेची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषींवर मानवाधिकार उल्लंघनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पत्रपरिषदेच्या माध्यमातुन केली आहे.
याबाबत सहायक पोलीस निरीक्षक देवराव नरोटे यांच्याशी अधिक माहिती करीता व त्यांची बाजू जाणून घेण्याकरिता संपर्क साधला असता त्यांनी कसलाही प्रतिसाद दिला नाही.
या उपरांत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आनंद गेडाम यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावर MPDA कायद्यांतर्गत कारवाई करायची असल्याने पोलीस पथक त्याला ताब्यात घेत जिल्हाधिकारी यांच्यासमोर हजर करणार होते, मात्र त्या कालावधीत आनंद च्या आईने पोलिसांचा रस्ता अडविला तब्बल २ तास पोलिसांसोबत बाचाबाची झाली आणि आनंद हा घरातील कवेलु काढत पळून गेला, पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता तो ३ मजली इमारतीवर लपला मात्र पोलीस येण्याची चाहूल लागताच त्याने दुसऱ्या मजल्यावर टिनाच्या शेड वर उडी मारली आणि पडला, यामध्ये तो जखमी झाला. पण पोलिसांनी आनंद ला सोबत घेत याआधी रुग्णालयात दाखल केले. युवकाच्या आईने केलेले सर्व आरोप पोलिसांनी फेटाळून लावले आहे.
why roads are so bad in Chandrapur : चंद्रपूर – खनिज संपत्ती ने नटलेला चंद्रपूर, राज्यात औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूरची ओळख आहे, विशेष बाब म्हणजे या जिल्ह्याने राज्याला मुख्यमंत्री, सह अनेक मंत्री दिले मात्र आजही हा जिल्हा उपेक्षित आहे. विकासाच्या नावावर नुसत्या बोंबा जिल्ह्यात कालांतरापासून सुरु आहे. शहर व ग्रामीण भागात अनेक अभियांत्रिकी कॉलेज आहे, मात्र त्या कॉलेजकडे जाणारा रस्ता हा पांदण रस्त्यापेक्षा हि खराब आहे.
शेतात जाण्यासाठी बनलेला पांदण रस्ता तरी चांगला असतो मात्र शहरात पायदळ किंवा वाहनाने आपल्याला जायचे असल्यास रस्त्याच्या मधोमध असलेले खड्डे आपल्याला चुकवीत जावे लागते. हि आपल्यासाठी व आपण निवडून दिलेले जनप्रतिनिधी साठी एक लाजिरवाणी बाब आहे. pothole problems in Chandrapur city
हे मार्ग पांदण रस्त्यापेक्षाही खराब….
बागला चौक आताचा शहीद हेमंत करकरे चौक ते लालपेठ कडे जाणारा मार्ग, बंगाली कॅम्प ते बस स्थानक, बंगाली कॅम्प ते जुनोना चौक, जटपुरा गेट ते गिरनार चौक या मार्गावरील काही ठिकाणी रस्ता खोल गेला आहे, ज्यावरून वाहन चालविताना नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागते. शहराकडे येणारे मार्ग अत्यंत बिकट परिस्थितीचे आहे.
शहरात अमृत योजनेच्या कामामुळे अनेक मार्ग बेजार झाले, अनेक मार्गावर मोठे खड्डे पडले, काही सामाजिक संघटनांनी यावर आंदोलन केले, त्यांनतर प्रशासनाने अखेर रस्ते बनवायला सुरुवात केली, रस्ते बनवून महिना उलटल्यावर पाऊस पडला आणि नवनिर्मित रस्त्यावरील विकास हा खड्ड्याच्या स्वरूपात बाहेर पडला. why newly constructed roads break in rain
यावर विशेष बाब म्हणजे इंजिनिअर यांना काम वाटपात दुजाभाव केल्या जातो यावरून सार्वजनिक बांधकाम विभागात हाणामारी चा प्रकार सुद्धा घडला होता, याबाबत पोलीस स्टेशनमध्ये तक्रारीही देण्यात आल्या होत्या. म्हणजे इंजिनिअर हे कामासाठी भांडतात, त्यांना काम मिळण्यात दुजाभाव होतो, आणि काम मिळाल्यावर निकृष्ट दर्जाचे काम पूर्ण करीत ते बाजूला होतात.
जनतेमध्ये हिंमत कधी येणार?
चंद्रपुरातील जनता रस्त्यावरील खड्ड्यापायी वैतागून गेली आहे, मात्र आवाज उचलण्याची त्यांच्यात हिंमत नाही, अशी अवस्था जर इतर जिल्ह्यात जसे पश्चिम महाराष्ट्र भागात झाली असती तर सामान्य नागरिक जनप्रतिनिधी यांना जाब विचारून कामे पूर्णत्वास आणतो, मात्र चंद्रपुरातील सुजाण नागरिकांमध्ये अशी हिंमत कधी येणार देव जाणे. कारण जनता हि राजकीय पक्षासोबत जुडलेली असतात, कुणाला काय म्हणावं काय करावं हे कळत नसेल कदाचित.
म्हणून म्हणतात ना ५०० में बिक जाओगे तो ऐसी सडक पाओगे…अशी अवस्था आपली झालेली आहे. दरवर्षी या खड्ड्यामुळे अनेक नागरिक अपघाताला बळी पडते, मात्र गेंड्याची कातडी असलेले जनप्रतिनिधी यांना याचा काही एक फरक पडत नाही.
Vasundhara campaign tree planting : चंद्रपूर २३ जुलै – चंद्रपूर महानगरपालिके मार्फत पठाणपुरा गेट बाहेरील जमनजट्टी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम 22 जुलै रोजी सकाळी 9 वाजता आयुक्त विपीन पालीवाल यांच्या उपस्थितीत राबविण्यात आला. याप्रसंगी रोपट्यांची लागवड करण्यात आली.
शासनातर्फे “एक पेड माँ के नाम 2.0” तसेच “माझी वसुंधरा” अभियान राबविले जात आहे. या उपक्रमाचे उद्दिष्ट पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे रक्षण आणि हरित आवरणात वाढ करून भावी पिढ्यांसाठी सुदृढ पर्यावरणाची जपणूक करणे आहे.उपरोक्त उपक्रमाअंतर्गत महापालिका प्रशासन, अधिकारी, नागरिक, स्वयंसेवी संस्था व विद्यार्थी यांच्या सक्रिय सहभागाने वृक्षारोपण केले जाणार आहे. राष्ट्रीय मोहिमांच्या अनुषंगाने मनपातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम राबविला जात असून जनजागृतीसह प्रत्यक्ष कृतीवर भर देण्यात येत आहे.
एक विद्यार्थी एक वृक्ष अभियान
याप्रसंगी आयुक्त विपीन पालीवाल यांनी उपस्थितांना झाडे जगवण्याची जबाबदार ही परिसरातील नागरिकांची असल्याचे सांगितले.यापूर्वी बल्लारपूर रोडवर लावलेली झाडे नागरिकांच्या सहकार्याने जगली आहेत. शहराला जवळपास २ लक्ष वृक्षांची आवश्यकता आहे,यातील ५० हजार वृक्ष लावण्याचे मनपाचे उद्दिष्ट आहे. एक विद्यार्थी एक वृक्ष हा उपक्रम शालेय विद्यार्थ्यांकरिता मनपा राबवित असुन या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या परिसरात अधिकाधिक वृक्ष लागवड करून पर्यावरण रक्षणासाठी पुढे यावे. Ek Ped Maa Ke Naam 2.0 plantation drive
कार्यक्रमात सहायक आयुक्त शुभांगी सूर्यवंशी,उपअभियंता रवींद्र कळंबे,चैतन्य चोरे,हुज्जाज ए इकरा मल्टिपर्पज सोसायटी,इको प्रो संस्था तसेच मनपा अधिकारी कर्मचारी व इतर सामाजिक संस्थेची प्रतिनिधी उपस्थीत होते.