bogus workers wage fraud । CTPS मध्ये Bogus Workers Wage Fraud प्रकरण – मनसेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी

bogus workers wage fraud

bogus workers wage fraud : चंद्रपूर ५ सप्टेंबर २०२५- सीटीपीएस च्या एस. व्ही. इंटरप्राईजेस या कंत्राटी कंपनीमध्ये बोगस कामगार दाखवून व हजेरी बुकावर बोगस सह्या मारून 15 कामगारांचे वेतन हडपले असल्याची गंभीर बाब समोर आली असून सीटीपीएस ला करोडोंचा चुना लावल्या जातं असल्याने याची सखोल चौकशी करण्याची मागणी मनसे कामगार सेना ने पत्रपरीषदेत केली आहे. अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा इशारा मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी प्रशासनाला दिला आहे.

भाजपचा विजय, मात्र अध्यक्षांवर गुन्हा दाखल

सीटीपीएस मध्ये एस.व्ही.इंटरप्राईजेस ही कंपनी 2 ते 3 वर्षांपासून युनिट क्रमांक 2 व 3 मध्ये बेल्ट कन्वर्शन, प्लॅटफॉर्म जाळ्या लावणे, शेडडाऊन, डांपिंग प्लेट रिप्लेसमेंट इत्यादी कामे करत आहे. दरम्यान या कंपनी मध्ये काम करणायां कामगारांची नावे हजेरी बुकावर नोंदविण्यात आली. त्यामध्ये मोठा घोळ असून मिळालेल्या दास्तावेज नुसार या कंपनी मध्ये एकूण 15 कामगार कर्मचारी काम करतात असे नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात या कंपनी मध्ये केवळ 5 कामगारचं काम करत असल्याची माहीती अंधेवार यांनी दिली. CTPS contractor SV Enterprises

कंत्राटदार यांचेसह संबंधित सीएसटीपीएस अधिकायांवर कारवाई करावी

कंपनीत प्रणतोष हरिपद इजारदार, नितेश दामोधर दानव, रमेश आंनदराव भोंगरे, रामेश्वर सदाशिव खोब्रागडे, राजकुमार जुनघरे इत्यादी आहेत. मात्र सीटीपीएस प्रशासनाकडे पाठविण्यात आलेल्या यादीत इतर 10 लोकं कोण आहेत, त्यांची नोंद ह्या रेकॉर्डवर का घेण्यात आले याची सखोल चौकशी करून त्या पाच कामगारांना कामावरून कमी केले त्यांना कामावर घ्यावे व कंत्राटदार यांचेसह संबंधित सीएसटीपीएस अधिकायांवर कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना मनसे स्टाईल आंदोलन करेल असा इशारा मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी मुख्य अभियंता राजेंद्र राठोड यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे. bogus attendance scam

पुढे सांगीतले की, एस. व्ही. इंटरप्राईजेस या कंत्राटी कंपनीमध्ये बोगस कामगार दाखवून व हजेरी बुकावर बोगस सह्या मारून 15 कामगारांचे वेतन घेण्यात येत आहे ही अतिशय गंभीर बाब असून अशा किती कंत्राटी कंपन्या आहेत. ज्या कंत्राटी कंपनी मध्ये असे बोगस कामगारांना दाखवून कंपनीला कोट्यावधी रुपयांचा चुना लावल्या जातं आहे याची सखोल चौकशी करावी अशी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेची मागणी असून सीएसटीपीएस कंपनीच्या संबंधित अधिकायांशिवाय हा घोळ होऊ शकत नाही त्यामुळे कमिशनखोरी करणाया अधिका_यांवर पण कारवाई करावी आणि कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून त्यांचे रजिस्ट्रेशन रद्द करावे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या माध्यमातून मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा पत्रकार परिषदेतून मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी प्रशासनाला दिला आहे.

पत्रपरीषदेत मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष महेश वासलवार, जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष रमेश काळाबाधे, सुनील गुढे, पियुष धुपे उपस्थित होते.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *