Tag: News34 chandrapur

  • SHE BOX portal for sexual harassment complaints । कंपन्यांनो सावधान! महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी नियम; SHE BOX वर नोंदणी बंधनकारक!

    SHE BOX portal for sexual harassment complaints

    SHE BOX portal for sexual harassment complaints : चंद्रपूर : जिल्ह्यातील प्रत्येक खाजगी आस्थापना जिथे 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी (महिला व पुरूष मिळून) कार्यरत आहे, अशा ठिकाणी, महिलांचे लैंगिक छळापासून सरंक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, 2013 अंतर्गत तक्रार समिती स्थापन करून याबाबतची माहिती SHE BOX PORTAL वर नोंदविणे बंधनकारक आहे. sexual harassment complaints at workplace

    १२ वी नंतर काय? चंद्रपूर मनपाने आणिली शिका व कमवा योजना, जाणून घ्या

    आजच नोंदणी करा

    प्रत्येक खाजगी आस्थापना, कंपनी, एम.आय.डी.सी. मॉल, शैक्षणिक संस्था, दुकाने, बँक, अशासकीय संस्था, ट्रस्ट, सोसायटी, उत्पादक, पुरवठा, वितरण व विक्री, करमणुक, क्रीडा संकुले, प्रेक्षागृहे, आरोग्य सेवा देणारे आदींनी त्यांच्या आस्थापनेवर तक्रार समितीची स्थापना करावी तसेच व त्याबाबतची माहिती पोर्टलवर नमुद करावी. सदर माहिती नोंदविण्याकरीता https://shebox.wcd.gov.in या संकेतस्थळावर जाऊन होम स्क्रीनवर दाखविल्याप्रमाणे Private Head Office Registration या Tab वर click करावे. आवश्यक सर्व माहितीचा तपशील भरून Submit या Tab वर click करून अंतर्गत तक्रार समितीची माहिती नोंदविता येईल.

    अन्यथा ५० हजारांचा दंड

    अधिनियमातील कलम 26 मध्ये जर एखाद्या मालकाने अ) अंतगर्त तक्रास समिती स्थापन केली नाही ब) अधिनियमातील कलम 13, 14 व 22 नुसार कार्यवाही केली नाही क) या अधिनियमातील व नियमातील विविध तरतुदीचे व जबाबदाऱ्याचे पालन न केल्यास मालकास 50 हजार रुपयेपर्यंत दंड होऊ शकतो. तसेच हा प्रकार पुन्हा घडल्यास आस्थापनेचा परवाना रद्द, दुप्पट दंड अशी तरतुद आहे.

    करीता सर्व, खाजगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार समिती स्थापना करून त्याबाबतीची माहिती SHE BOX PORTAL वर भरण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी केले आहे. याबाबत काही तांत्रिक अडचण असल्यास दूरध्वनी क्रमांक. 011-23388074  किंवा ई मेल – techsupport-shebox@gov.in येथे संपर्क करावा, असे महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

  • local body election OBC quota । स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा! ओबीसी आरक्षणावरील सस्पेन्स संपला!

    local body election OBC quota

    local body election OBC quota : स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीबाबत चार आठवड्या नोटिफिकेशन काढा आणि चार महिन्यांच्या आत निवडणूक घ्या आज सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सचिन राजुरकर यांनी स्वागत केले आहे.

    चंद्रपूर मनपात शिका व कमवा योजना, १२ वी नंतर काय? वाचा हि महत्वाची बातमी

    पूर्वीची स्थिती कायम राहणार

    सुप्रीम कोर्टाने आज दिलेल्या निकालात 1994 ते 2022 पर्यंत जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती, त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणू घ्या राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगने दिलेल्या कार्यकाळात कार्यवाही करावी ओबीसींच्या जागा कमी होत्या हा याचिकाकर्त्यांचा दावा होता, त्यावर कोर्टाने 2022 पूर्वीची स्थिती कायम राहील असे निर्देश दिले. Supreme Court verdict on OBC reservation in local self-government

    आयोगाचा तो रिपोर्ट आहे त्याच्यात याचिकाकर्त्यांचं म्हणणं होतं की, 2022 मध्ये जो रिपोर्ट आलाय त्याच्यात ओबीसी सीट हे कमी केले आहेत, त्यामुळे आधीच्या परिस्थितीनुसार 2022 ची आधीची परिस्थिती होती 1994 ते 2022, त्या परिस्थितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जातील. असे आदेश दिल्याने ओबीसी समाजाला न्याय देणारा आहे.

    या पूर्वी 4 मार्च 2021 विकास गवळी व्हर्सेस सुप्रिम कोर्टाच्या निकालात अनुसूचित जाती जमाती लोकसंख्येच्या प्रमाणात उरलेल्या जागा 50 %मर्यादेत ओबीसींना होत्या त्या मुळे बाटिया कमिशन च्या इम्पेरिकल डाटा सुप्रिम कोर्टात सादर केल्या नंतर स्थानिक स्वराज संस्थेतील 34000 जागा ओबीसींच्या कमी झाल्या होत्या आजच्या निकालाने 3 वर्षा पासून रकडलेल्या स्थानिक स्वराज संस्थेतील निवडणुका पूर्वी प्रमाणेच घ्याव्या लागणार आहेत.

  • WCL Job Clearance Chandrapur । प्रकल्पग्रस्तांना मोठा दिलासा! ८४ नोकरी प्रस्तावांतील अडथळे दूर

    WCL Job Clearance Chandrapur

    हंसराज अहिर यांच्या प्रयत्नांना यश; चंद्रपूरच्या ९ प्रकल्पग्रस्तांची अपील जिल्हाधिकाऱ्यांकडून मान्य

    WCL Job Clearance Chandrapur :  चंद्रपूर – दि.११ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांचेकडून बल्लारपूर क्षेत्र यु, जी टू ओ.सी.धोपटाळा प्रकल्पातील तुकडेबंदी कायदा १९४८, अवहेलना फेरफार प्रकरणात,9 प्रकल्पग्रस्तांची अपील मान्य करण्यात आली असून यानुसार या प्रकल्पातील स्थगित असलेल्या ८४ नोकरी प्रस्तावातील मंजुरीची अडचण दूर झाल्याचे, रवीभवन नागपूर येथिल बैठकीत  सी.एम.डी,नागपूर यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर,यांना सांगितले. Tukdebandi WCL Jobs Impact

    चंद्रपूर महानगरपालिकेत शिका व कमवा योजना


             यु जी टू ओसी धोपटाळा प्रकल्पातील नोकरी प्रस्ताव मंजुरी प्रक्रिया सुरु असताना, 9 सातबारा धारकांच्या विरोधात बल्लारपूर वेकोली प्रबंधनाने उच्च न्यायालय, नागपूर, येथे तुकडेबंदी अवहेलना प्रकरणात फेरफार रद्द करण्याबाबत दि. २० जुलै २०२२ रोजी याचिका दाखल केली होती.याबाबत ओबीसी व अन्य प्रकल्पग्रस्तांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.याची दखल घेत हंसराज अहिर, यांनी तात्काळ बैठक व सुनावणी घेवून प्रबंधानाला शेतकऱ्यांच्या  हक्काच्या  नोकऱ्यांना  विरोध न करण्याच्या सूचना दिल्या. 84 WCL Jobs Approved


            सदर प्रकरणे महसूल अधिकारी यांच्या आदेशाने निकाली काढण्यात यावीत असा आदेश उच्च न्यायालयात पारित झाल्यानंतर, उपविभागीय अधिकारी, राजुरा यांचेकडे प्रबंधानाकडून अपील दाखल करण्यात आली.
          हे प्रकरण उपविभागीय अधिकारी यांचेकडे विचाराधीन असताना,या विषयावरील वेकोली अंतर्गत सर्वच नोकरी प्रस्तावांची मंजुरी थांबून ठेवण्याच्या सूचना, वेकोली मुख्यालयाकडून    क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या.जिल्हधिकरि चंद्रपूर यांचकडे या विषयाबाबत मागासवर्ग आयोगाचे माध्यमातून दि. ११/०७/२०२४ व दि. २०/०२/२०२४ रोजी जनसुनावणी घेण्यात आली.या प्रकरणात जिल्हाधिकारी, चंद्रपुर देतील तो निर्णय मान्य करण्याचे वेकोली प्रबंधानाने सुनावणी दरम्यान आश्वस्त केले होते. Collector Clears WCL Jobs


          या प्रकरणात उपविभागीय अधिकारी राजुरा यांनी ८४ प्रकल्पग्रस्तांचे झालेले फेरफार नीयमितीकरण योग्य आहे असा आदेश प्रकल्प ग्रस्तांच्या बाजूने दि. २४/०९/२०२४ रोजी पारित केला.त्यानुसार बल्लारपूर क्षेत्राकडून नोकरी प्रस्ताव मुख्यालयाला मंजुरी हेतू पाठविण्यात आले परंतु वेकोली मुख्यालयाने, अन्यायकारक भूमिका घेत, याच प्रकल्पातील 9 सातबारा धारकांच्या बाबतीत जिल्हाधिकारी चंद्रपुर यांचेकडील दाखल अपीलचा निकाल लागेपर्यंत सदर ८४ व  या विषयावरील अन्य नोकरी प्रस्ताव थांबविण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या.

    Hansraj Ahir WCL Job Issue


          दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडून 9 प्रकल्पग्रस्तांच्या, सातबारा नियमितीकरणाबाबत पारीत झालेल्या उपरोक्त आदेशानुसार सर्व ८४ प्रकल्पग्रस्तांचे नोकरी प्रस्ताव मंजुरीकरिता सादर करण्याच्या,वेकोली मुख्यालयाच्या तसेच वेकोलीला बाध्य करणाऱ्या=जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्या निर्णयाप्रती आनंद व्यक्त करीत प्रकल्प्ग्रस्तानी हंसराज अहिर यांच्या निवासस्थानी जावून न्याय मिळवून दिल्याबद्दल आभार व कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी प्रकाल्प्ग्रस्तानी अहिर यांचा शाल श्रीफळ व पुष्प्गुच्ह देवून आनंद साजरा केला.
    यासोबतच नवीन तुकडेबंदी सुधारणा कायदा,२०२४ राज्य सरकार कडून पारित झाल्याने या कालावधीतील सर्व प्रकल्पग्रस्तांना सुद्धा न्याय मिळवून देण्याचा निर्धार अहिर यांनी या वेळी व्यक्त केला.

  • Chandrapur learn and earn scheme । बारावी पास? चंद्रपूर मनपात ‘शिका आणि कमवा’ संधी!

    Chandrapur learn and earn scheme

    नोकरीसह पदवी! चंद्रपूर मनपाची विद्यार्थ्यांसाठी खास योजना.

    Chandrapur learn and earn scheme : चंद्रपूर 06 मे (News३४) – चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे नुकतेच बारावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘शिका आणि कमवा’ योजना राबविण्यात येणार असुन या योजनेअंतर्गत  इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (IGNOU) यांच्या BBA (Service Management) या दूरस्थ पदवी अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेणाऱ्या,चंद्रपूर महानगरपालिकेच्या शहरी भागातील, निवडक गुणवंत आणि होतकरु विद्यार्थ्यांना सन 2025-26 या वर्षापासून महानगरपालिकेच्या विविध विभागामध्ये, तीन वर्षासाठी ‘डिजिटल आणि एआय सुलभक’ (Digital and AI Facilitator) म्हणून प्रशासकीय काम करण्याची संधी मिळणार आहे. CMC IGNOU BBA Service Management internship 2025

    सायकलच्या चाकात अडकला मृत्यू


        IGNOU च्या BBA (SM) या कार्यानुभवावर आधारित दूरस्थ पदवी अभ्यासक्रमामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना ३ वर्षे एखाद्या कार्यालयामध्ये पूर्णवेळ इंटर्नशिप करणे बंधनकारक असते. ही 3 वर्षाची इंटर्नशिप गरजू पात्र विद्यार्थ्यांना देऊन, त्यांना केलेल्या कामाच्या बदल्यात विद्यावेतन देणारी ‘शिका आणि कमवा’ ही नाविन्यपूर्ण योजना यंदाच्या वर्षापासून चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राबविली जाणार आहे. सदर योजनेअंतर्गत विद्यार्थ्याना त्यांनी केलेल्या कामापोटी पहिल्या वर्षी रु. 5 हजार दुसऱ्या वर्षी रु. 6 हजार आणि शेवटच्या वर्षासाठी रु. 7 हजार इतके विद्यावेतन प्रत्येक महिन्यासाठी अदा केले जाईल.  Chandrapur 12th pass job with study 2025


        सदर योजनेमध्ये सलग तीन वर्षे समाधानकारकरित्या केलेले काम आणि स्वयंअध्ययन यातून तिसऱ्या वर्षाच्या शेवटी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाची (IGNOU) बीबीए म्हणजेच Bachelor in Business Administration (Services Management) ही कामातून पदवी आणि तीन वर्षे काम केल्याचे महापालिकेच्या वतीने कार्यानुभवाचे प्रमाणपत्र असा विद्यार्थ्याचा दुहेरी फायदा होणार आहे. तसेच 12 वी नंतरचे पदवीचे, स्पर्धात्मक युगामध्ये पुढे जाऊन कामाला येऊ शकणारे कार्यावर आधारीत शिक्षण हे स्वत:च्या मेहनतीच्या कमाईवर करता येणार असल्याने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास उंचावण्यास यामुळे मदत होणार आहे.


        चंद्रपूर महानगपालिकेच्या कार्यक्षेत्रातील म्हणजेच चंद्रपूर च्या शहरी भागातील 18 ते 25 वयोगटातील नुकत्याच बारावी पास झालेल्या, संगणक आणि विशेषत: कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) टूल्स चा प्रभावी वापर करता येणाऱ्यागुणवंत व होतकरू  विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांनी केले आहे.
        सदर योजनेसाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना स्वारस्य अर्ज करण्याची अंतिम मुदत ही 2 जून 2025 अशी असून त्यासाठी https://tinyurl.com/cmcibba2025ही ऑनलाईन लिंक चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे यांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.तसेच मनपाच्या संगणक विभागात संपर्क साधता येणार आहे.

  • Janata Junior College HSC Result 2025 । चंद्रपूरच्या जनता महाविद्यालयाचा निकाल उज्ज्वल; टॉपर विद्यार्थ्यांची यादी जाहीर

    Janata Junior College HSC Result 2025

    Janata Junior College HSC Result 2025 : चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाद्वारे घेण्यात आलेल्या बारावीचा सत्र २०२४-२५ चा निकाल आज (दि. ५) ला जाहीर झाला. यानुसार याही वर्षी जनता कनिष्ठ महाविद्यालयाने यशाचा इतिहास अबाधित ठेवला आहे. HSC 2025 results

    सायकलस्वाराच्या चाकात अडकला मृत्यू


    जनता कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखेचा निकाल ९९% टक्के, कला शाखेचा निकाल ८८.७८% ; वाणिज्य शाखेचा निकाल ९३.०४% तर एम.सी.व्हि.सी. शाखेचा निकाल ५०% इतका लागलेला आहे.
    महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून कु. त्रिशा विजय होकम (९४.३३%), कु. मानवी सुधीर कापसे (९१.१७%), कु. नेन्सी जगन्नाथ प्रसाद (९१%), कु. प्राची प्रवीण आबोजवार (९०.३३%), अजीम अब्दुल वहाब फारुकी (८९.३३%), ओमकार अमर देवाळकर(८९.१७%) हे विद्यार्थी प्राविण्यप्राप्त आहेत.

    hsc 2025 results


    कला शाखेतून ज्ञानेश्वर गुरुदास थेरे (६५.८३%), कु. प्रीती राजा काळे (६४.५०%), सुप्रीत विकास टिपले (६३.८३%) वाणिज्य शाखेतून देवांगशी संजय धकाते (८५.००%), शुभांक नितीश दास (८४.६७%), मिस्बा फातिमा नौशाद सय्यद (८३.८३%), एम.सी.व्हि. सी. शाखेतून श्रीयुत अजय नक्षने (६४%) हे विद्यार्थी प्रावीण्यप्राप्त झालेले आहेत.


    प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांचे मंडळाच्या अध्यक्षा डॉ. सौ. प्रतिभाताई जिवतोडे, संस्थेचे सेक्रेटरी डॉ. अशोक जीवतोडे, महविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आशिष महातळे, उपप्राचार्य सौ. के.ए. रंगारी, प्रा. लीलाधर खंगार, प्रा. नितीन कुकडे, डॉ. के.सी.पाटिल, डॉ. दीपिका संतोषवार, डॉ. माया धमगाये, प्रा. विद्या शिंदे, प्रा. माया बिस्ट, प्रा. शरद कुत्तरमारे, प्रा. रविकांत वरारकर, डॉ. प्रविण चटप, प्रा. महेश यार्दी, प्रा. अरूण बर्डे तसेच सर्व शिक्षकेतर कर्मचा-यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

  • villagers protest for road construction । हक्काचा रस्ता द्या! पालगावकरांचे अल्ट्राटेक सिमेंट कंपनीसमोर ठिय्या आंदोलन

    villagers protest for road construction

    villagers protest for road construction : कोरपना तालुक्यातील पालगाव येथील नागरिकांनी तब्बल 40 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या मागणीसाठी एल्गार पुकारत अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या आवाळपूर येथील मुख्य कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

    सायकलच्या चाकात अडकला मृत्यू, चंद्रपुरात भयावह दुर्घटना

    अल्ट्राटेक सिमेंट कंपनीची खदान पालगाव परिसरात असूनही, गावात जाण्यासाठी वापरला जाणारा एकमेव मार्ग कंपनीच्या हद्दीतून जातो. या 3 किलो मिटर मार्गाची अवस्था अत्यंत खराब असून तो केवळ पायवाटीतच आहे. गावकऱ्यांनी वारंवार कंपनीकडे काँक्रीट रस्ता बनवून देण्याची मागणी केली; मात्र मागणीकडे दुर्लक्षच करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ultra tech cement road controversy

    गेल्या चार दशकांपासून हे दुर्लक्ष सहन करत अखेर गावकऱ्यांचा संयम सुटला असून, त्यांनी एकत्र येत सिमेंट कंपनीच्या मुख्य कार्यालयासमोर जोरदार आंदोलन सुरू केले आहे. “आमच्या हक्काचा रस्ता मिळाल्याशिवाय आम्ही माघार घेणार नाही,” असा ठाम पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.

    सध्या आंदोलन सुरूच असून, प्रशासन आणि कंपनी व्यवस्थापन काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • man dies due to electric wire । सायलवरून जाताना चाकात अडकला मृत्यू, चंद्रपुरात भयावह दुर्घटना

    man dies due to electric wire

    man dies due to electric wire : चंद्रपूर: आकाशवाणी पासून जगन्नाथ बाबा नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर काल रविवार दिनांक 4 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास विजेच्या जिवंत तारेला स्पर्श झाल्यामुळे रस्त्यावरून सायकलने जाणाऱ्या एका 60 वर्षीय इसमाचा जागीच मृत्यु झाला. प्रभाकर गणपत क्षीरसागर असे मृतकाचे नाव असुन ते दाताळा येथील रहिवासी होते.

    शॉर्ट सर्किट आणि मृत्यू


    सविस्तर असे की जगन्नाथ बाबा नगर येथील ए 65 क्रमांकाच्या खांबावरून उच्च दाबाची 11 केव्ही विजेची तार जाते. काल सायंकाळी 5.30 च्या सुमारास मोठे वादळ आले. परंतु त्याच्या 1 तास आधीच जवळपास सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्किट सारखा आवाज झाला व ही 11 केव्हीची तार तुटून रस्त्यावर पडली.

    ७ मे रोजी महावितरणचा लकी ड्रॉ

    काही स्थानिक नागरिकांनी विज वितरण कंपनीला याची तातडीने ऑनलाईन तक्रार केली.4 वाजून 59 मिनिटांनी तक्रार केल्याची नोंद आहे. सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी विज पुरवठा बंद केला नाही. पडलेली तार सुद्धा उचलली नाही. तक्रारकर्त्याच्या मोबाईलवर मात्र सायंकाळी 6 वाजता तक्रारीचा निपटारा झाल्याचा ऑनलाइन मेसेज महावितरणकडून पाठविण्यात आला. electricity department negligence case

    सायकलच्या चाकात विजेचा तार अडकला


    यादरम्यान जनता महाविद्यालयात कंत्राटी तत्वावर सुरक्षा रक्षक असलेले दाताळा येथील रहिवासी प्रभाकर गणपत क्षीरसागर सायकलने सायंकाळच्या ड्युटीवर चालले होते. रस्त्याने जात असताना सायकलच्या चाकात विजेचा तार अडकून ते पडले व तारेला स्पर्श झाला.11 केव्हीच्या तारेला स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
    वडगाव प्रभागाचे माजी नगरसेवक जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. live wire accident due to storm

    नागरिकांचे आंदोलन

    देशमुख यांनी रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफ राजा तसेच रामनगर विज वितरण कार्यालयाचे सहाय्यक अभियंता कुणाल पाटील यांना घटनास्थळी पाचारण केले. यावेळी मृतकांचे कुटुंबीय तसेच दाताळा व जगन्नाथबाबा नगर मधील रहिवाशांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. नुकसान भरपाईचे लेखी आश्वासन दिल्याशिवाय मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका उपस्थित नागरिक व मृतकाच्या कुटुंबीयांनी घेतली. अखेर सहाय्यक अभियंता पाटील यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह सामान्य रुग्णालयात हलविण्यात आला.

    महावितरणच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा – जनविकास सेनेची मागणी


    नागपूर व दाताळा मार्गाला जोडणाऱ्या या रस्त्याने हजारो नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थी ये-जा करतात. अशा वर्दळीच्या रस्त्यावर दीड तास 11 केवी विजेची जिवंत तार पडून राहणे अत्यंत धोकादायक आहे. यासाठी वीज वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी सर्वस्वी जबाबदार असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा तसेच मृतकाच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केली आहे.

  • chandrapur bjp mla news । गांधी चौकात जल्लोष! चंद्रपूर भाजपने जातीनिहाय जनगणना निर्णयाचे केले स्वागत!

    chandrapur bjp mla news

    chandrapur bjp mla news : चंद्रपूर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेला जातिनिहाय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय फक्त आकड्यांचा विषय नाही, तर समाजाच्या प्रत्येक घटकाला ओळख देणारा, त्यांच्या गरजांवर केंद्रित धोरणे आखणारा आणि सामाजिक समतेकडे नेणारे एक क्रांतिकारी पाऊल आहे. समाजातील वंचित, मागास घटकांना त्यांचे प्रतिनिधित्व, त्यांची संख्या आणि त्यांच्या अडचणी दिसून येण्यासाठी ही जनगणना आवश्यक होती, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. caste census laddu celebration

    महावितरणच्या नाट्यकुंभात रंग बावरी ने मारली बाजी

    गांधी चौकात जल्लोष

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेल्या जातिनिहाय जनगणनेच्या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने शहरातील गांधी चौकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लाडू वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला. या प्रसंगी आमदार जोरगेवार बोलत होते.

    या कार्यक्रमात राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, विजय राऊत, भाजप नेते अशोक जिवतोडे, अनिल फुलझेले, माजी शहराध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, प्रकाश देवतळे, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, नामदेव डाहुळे, मनोज पाल, राजू अडपेवार, माजी नगरसेविका छबू वैरागडे, वंदना तिखे, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, माजी नगरसेविका शीतल आश्राम, अरुण तिखे, बलराम डोडाणी, प्रवीण गिलबिले, अमोल शेंडे, वंदना हातगावकर, सविता दंढारे, सायली येरणे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

    आता समतोल विकास

    यावेळी पुढे बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, भाजप सरकारने हे ऐतिहासिक पाऊल उचलून ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास’ या घोषवाक्याला खरी दिशा दिली आहे. जातिनिहाय जनगणना ही केवळ न्यायाची सुरुवात नाही, तर ती समतेकडे नेणारी वाट आहे. या निर्णयामुळे केंद्र व राज्य सरकारांना समाजातील प्रत्येक घटकाला योजनांमध्ये योग्य स्थान देणे, निधीचे योग्य वाटप करणे आणि समतोल विकास साधणे शक्य होणार आहे. gandhi chowk chandrapur event

    gandhi chowk chandrapur event

    गांधी चौक येथे करण्यात आलेला लाडू वाटपाचा जल्लोष ही फक्त आनंदाची प्रतिक्रिया नाही, तर सामाजिक न्यायाच्या दिशेने असलेली बांधिलकीची प्रतिक्रिया आहे. आता आपली जबाबदारी वाढली आहे. हा निर्णय समाजात समता निर्माण करण्यासाठी, गरजूंपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने समाजहित साधण्यासाठी उपयोगी ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

    जनहिताचा निर्णय – हंसराज अहिर

    यावेळी बोलतांना राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर म्हणाले की, राष्ट्रीय ओबीसी आयोगाच्या माध्यमातून आम्ही शासनाला जातिनिहाय योग्य आकडेवारी सादर केली होती. त्याचा परिणाम म्हणून पश्चिम बंगालमधील अनेक बोगस जाती रद्द करण्यात आल्या आहेत. आता कर्नाटकमध्येही आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. केंद्र आणि राज्य सरकार जनहिताचे निर्णय घेत आहेत. कार्यक्रमाच्या समारोपात नागरिकांना लाडूचे वाटप करून केंद्र सरकारच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • mahadiscom drama competition winners । चंद्रपूरच्या ‘रंग बावरी’ने मारली बाजी; महावितरण नाट्यकुंभात सहा प्रथम पुरस्कार!

    mahadiscom drama competition winners

    mahadiscom drama competition winners : चंद्रपूर, दि. 5 मे 2025: महावितरणच्या नागपूर प्रादेशिक आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेत चंद्रपूर परिमंडलाच्या ‘रंग बावरी’ या नाटकाने उत्कृष्ट अभिनयासह सर्वोत्कृष्ट नाटकाचा मान पटकावला. दोन दिवस रंगलेल्या या नाट्यकुंभ-2025 मध्ये ‘रंग बावरी’ने विविध गटांमध्ये तब्बल सहा प्रथम पुरस्कारावर आपली मोहोर उमटवली. अकोला परिमंडलाच्या ‘सिकॅरिअस’ या नाटकाने उपविजेतेपद मिळवले. mahadiscom natya spardha 2025 results

    ७ मे रोजी महावितरणचा लकी ड्रा

    या स्पर्धेतील विजेत्या कलाकारांना महावितरणचे संचालक (संचलन) अरविंद भादिकर आणि संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत, मुख्य अभियंता सर्वश्री सुहास रंगारी, दिलीप दोडके, ज्ञानेश कुलकर्णी, राजेश नाईक आणि स्वागताध्यक्ष हरिश गजबे यांच्यासह नाट्य परिक्षक विनोद दुर्गेपुरोहित, जयदेव सोमनाथे, अँड. चैताली बोरकुटे यांसारखे मान्यवर उपस्थित होते. sicarius drama play review

    जय – पराजय हा स्पर्धेचा भाग

    या सोहळ्यात बोलताना संचालक अरविंद भादिकर यांनी नाट्य कलाकारांचे कौतुक केले आणि स्पर्धेनंतरही त्यांनी एकमेकांशी संवाद कायम ठेवण्याचे आवाहन केले. अपयश आले तरी निराश न होता प्रयत्न सुरू ठेवण्याचा संदेश त्यांनी दिला. संचालक प्रसाद रेशमे म्हणाले, “जय-पराजय हा स्पर्धेचा भाग असला तरी, कलाकारांनी आपली कला सादर करताना मिळवलेला आनंद आणि रसिकांना दिलेला आनंद हेच त्यांचे खरे पारितोषिक आहे.” स्पर्धेचे अध्यक्ष तथा प्रादेशिक संचालक परेश भागवत यांनी नाटकांच्या माध्यमातून केवळ आनंदच नव्हे, तर अनेक अनुभव मिळाल्याचे मत व्यक्त केले. chandrapur mahadiscom drama winner

    कर्मचाऱ्यांनी आपली कला जोपासली

    नाट्यकुंभ-2025 चे उद्घाटन महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांच्या शुभहस्ते झाले होते. यावेळी बोलतांना त्यांनी महावितरणमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामातील या अनमोल अनुभवांना नाट्यकृतींच्या माध्यमातून समाजासमोर आणावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. महावितरण एक मोठा परिवार आहे आणि या कुटुंबातील सदस्यांमध्ये अनेक उत्कृष्ट कलागुण दडलेले आहेत. दैनंदिन कामाचा व्याप सांभाळूनही कर्मचाऱ्यांनी आपली कला जोपासली आहे, हे कौतुकास्पद आहे. ‘नाट्यकुंभ’ सारख्या स्पर्धांमुळे या कलाकारांना त्यांची प्रतिभा सादर करण्याची संधी मिळते. यासोबतच, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये सुसंवाद वाढतो आणि सांघिक भावना अधिक दृढ होते, असे मत त्यांनी व्यक्त केले. आपल्या भाषणातून राजेंद्र पवार यांनी विदर्भातील नाट्य परंपरेचाही विशेष उल्लेख केला. mahadiscom natya spardha 2025 results

    chandrapur mahadiscom drama winner

    चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिश गजबे यांनी निर्मिती केलेल्या, श्रीपाद जोशी लिखित आणि संध्या चिवंडे दिग्दर्शित ‘रंग बावरी’ या नाटकाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला. तर, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक निर्मित, डॉ. चंद्रकांत शिंदे लिखित आणि नितीन नांदुरकर दिग्दर्शित ‘सिकॅरिअस’ या सस्पेन्स थ्रिलर नाटकाने प्रेक्षकांना खिळवून ठेवले. नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके निर्मित, प्रदीप फाटक लिखित आणि हेमराज ढोके दिग्दर्शित ‘ये रे घना’ आणि गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी निर्मित, अतुल साळवे लिखित व राजेंद्र गिरी दिग्दर्शित ‘दि ॲनॉनिमस’ या नाटकांनाही रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.

    या नाट्यस्पर्धेसाठी अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर आणि गोंदिया परिमंडलातील वरिष्ठ अधिकारी आणि नाट्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    नाट्यस्पर्धेचे विजेते

    स्पर्धेचा अंतिम निकाल:
    • सर्वोत्तम नाटक:
    o प्रथम: ‘रंग बावरी’ (चंद्रपूर परिमंडल)
    o द्वितीय: ‘सिकॅरिअस’ (अकोला परिमंडल)
    • दिग्दर्शन:
    o प्रथम: संध्या चिवंडे (‘रंग बावरी’)
    o द्वितीय: नितीन नांदुरकर (‘सिकॅरिअस’)
    • अभिनय (पुरुष):
    o प्रथम: गणेश राणे (रघुपती – ‘सिकॅरिअस’)
    o द्वितीय: सुमित खोरगडे (सुभाष – ‘ये रे घना’)
    • अभिनय (स्त्री):


    o प्रथम: रोहिणी ठाकरे (नेहा – ‘रंग बावरी’)
    o द्वितीय: स्नेहांजली तुंबडे (स्मिता – ‘ये रे घना’)
    • नेपथ्य:
    o प्रथम: रमेश सानप (‘रंग बावरी’)
    o द्वितीय: गजानन जैवाल (‘दि ॲनॉनिमस’)
    • प्रकाश योजना:
    o प्रथम: प्रकाश खांडेकर (‘रंग बावरी’)
    o द्वितीय: विवेकानंद वाध (‘सिकॅरिअस’)
    • पार्श्वसंगीत:
    o प्रथम: राकेश बोरोवार (‘रंग बावरी’)
    o द्वितीय: योगेश सोनुने (‘सिकॅरिअस’)
    • रंगभूषा-वेशभूषा:
    o प्रथम: पौर्णिमा कदम (‘सिकॅरिअस’)
    o द्वितीय: आनंद जैं (‘दि ॲनॉनिमस’)
    • उत्तेजनार्थ पारितोषिक:
    o सामली सायंकाळ (मेधना – ‘रंग बावरी’)
    o अमित पेढेकर (डॉ. विध्वंस – ‘ये रे घना’)
    o नावेद शेख (जरासंघ – ‘दि ॲनॉनिमस’)
    o संतोष पाटील (इन्स्पेक्टर कश्यप – ‘सिकॅरिअस’)

  • Sudhir Mungantiwar meeting on sand for housing । चंद्रपुरात घरकुलांना रेती मिळेना, मुनगंटीवार ऍक्शन मोडमध्ये!

    Sudhir Mungantiwar meeting on sand for housing

    Sudhir Mungantiwar meeting on sand for housing : चंद्रपूर, दि. 4: घरकुल योजनेंतर्गत मंजूर लाभार्थ्यांना आवश्यक त्या प्रमाणात आणि वेळेत रेती उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन भवन सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेत महत्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले.जिल्ह्यातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना आवश्यक रेती उपलब्ध करून देणे हा महाराष्ट्राचा यक्षप्रश्न असून, त्याच्या सोडवणुकीसाठी प्रभावी नियोजनाची अंमलबजावणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे आ. श्री. मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. sand availability for gharkul scheme Chandrapur

    चंद्रपुरात बालकामगार प्रकरणाचा पर्दाफाश; व्यवस्थापक आणि HR अडचणीत

    मंजूर घरकुल लाभार्थ्यांना रेती उपलब्ध करून देण्याबाबत नियोजन भवन सभागृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, उपविभागीय अधिकारी संजय पवार (चंद्रपूर), रवींद्र माने(राजुरा), अजय चरडे(मुल), जिल्हा खनिकर्म अधिकारी, चंद्रपूरचे तहसीलदार विजय पवार, तहसीलदार(मुल) मृदुला मोरे, तहसीलदार( बल्लारपूर) रेणुका कोकाटे, तहसीलदार (पोम्भुर्णा) रेखा वाणी, मनपा अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, मुलचे मुख्याधिकारी संदीप दोडे, बल्लारपूरचे मुख्याधिकारी विशाल वाघ, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप बाराहाते तसेच मतदारसंघातील सर्व तालुका कृषी अधिकारी तसेच गट विकास अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

    sand availability for gharkul scheme Chandrapur
    रेती उपलब्धतेच्या बैठकीत मार्गदर्शन करताना आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार.

    रेती न मिळाल्याने घरकुल धारकात असंतोष

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ‘घरकुलधारकांना वेळेत रेती न मिळाल्याने प्रचंड असंतोष पसरला असून, येत्या आठ दिवसांत रेतीसंबंधी निर्णय घेणे आवश्यक आहे. विशेषतः मुल तालुक्यातील पाच महसूल मंडळांतील रेती घाटांमध्ये सध्या 8 हजार ब्रास रेतीसाठा उपलब्ध आहे, तर एकूण 25 हजार ब्रास रेतीची आवश्यकता आहे. पोंभुर्णा तालुक्यात एकूण 19,600 ब्रास रेतीसाठा असून, बल्लारपूरमध्ये मात्र 18,465 ब्रास मागणी असताना केवळ 260 ब्रास रेती उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्व रेती घाट 10 जूननंतर बंद होणार असल्याने उर्वरित एक महिन्याच्या कालावधीत योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.’ Mungantiwar directives on sand for housing scheme

    रेतीची मागणी तहसीलदार यांच्याकडे नोंदवा

    गट विकास अधिकारी यांनी प्रत्येक मंजूर घरकुलासाठी आवश्यक रेतीची मागणी तहसिलदार यांचे कडे नोंदवावी. तसेच नदी, नाले व घाटांची पाहणी करून शक्य तेवढी रेती तहसिलदार यांनी उपलब्ध करून द्यावी. कोणत्याही गरीब घरकुल लाभार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिले. sand solution for gharkul Yojana Chandrapur

    पुढील टप्प्यात महसूल मंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या समवेत झूम बैठकीचे आयोजन करण्यात येईल. घरकुल लाभार्थ्यांना वेळेत व नियमानुसार रेती मिळावी यासाठी प्रशासनाने समन्वय साधून काम करावे, अशी अपेक्षा यावेळी आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.