Tag: News34 chandrapur

  • district monsoon preparedness plan । 🚨 जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश: सर्व यंत्रणा अलर्टवर!

    district monsoon preparedness plan

    district monsoon preparedness plan : चंद्रपूर – आगामी काही दिवसांत मान्सुनला सुरवात होणार आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या तयारीसाठी सध्या आपल्याजवळ 15 ते 20 दिवसांचा कालावधी आहे. या कालावधीत सर्व यंत्रणांनी मान्सुनपूर्व तयारी अतिशय गांभिर्याने करून घ्यावी. तसेच आपापल्या कार्यक्षेत्रात सर्वांनी अलर्ट राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष विनय गौडा जी.सी. यांनी दिले. pre monsoon disaster management plan

    रविवारी चंद्रपुरात महापंचायत

    नियोजन भवन येथे गुरुवारी मान्सुनपूर्व बाबींचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सलीम शेख यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नगरपरिषद / नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व इतर यंत्रणेचे विभागप्रमुख उपस्थित होते.

    दूरध्वनी चे क्रमांक अपडेट ठेवा

    मान्सुनपूर्व तयारीचा भाग म्हणून सर्व तहसीलदारांनी तालुका यंत्रणेच्या अधिका-यांसोबत पूरप्रवण भागाचे योग्य नियोजन करावे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, आपल्या परिसरात कोणतीही अनुचित घटना घडली तर आपत्ती व्यवस्थापनासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ तसेच सर्व यंत्रणेचे दूरध्वनी क्रमांक अपडेट ठेवावे. पूर परिस्थिती हाताळण्यासाठी आपापल्या तालुक्यात असलेल्या साधनसामुग्रीची आताच दुरुस्ती करून घ्यावी.  monsoon emergency response plan

    तालुका यंत्रणेने जिल्हा नियंत्रण कक्षासोबत नियमित संपर्क ठेवावा. पूरप्रवण गावात आत्तापासूनच आश्रयस्थाने शोधून ठेवावी व त्याची दुरुस्ती करून सर्व मूलभूत सुविधा राहील याची काळजी घ्यावी. तहसीलदार, गटविकास अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी पूर पिडीतांना ठेवण्यात येणा-या आश्रय ठिकाणांची आताच पाहणी करून तेथे पिण्याचे स्वच्छ पाणी, लाईट, पंखे, शौचालय आदी व्यवस्था चांगल्या ठेवाव्यात. district disaster management authority guidelines

    साथ रोग पसरणार नाही याची काळजी घ्या

    पूर परिस्थितीमध्ये साथ रोग पसरणार नाही, याची काळजी आरोग्य विभागाने घ्यावी. त्यासाठी औषधीसाठा तसेच सर्पदंशाच्या औषधी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपलब्ध ठेवावा. पुराच्या वेळी किंवा सतर्कतेचा इशारा दिल्यानंतर नागरिकांना पर्यटन स्थळ जाण्यासाठी बंदी घालावी. त्याबाबतचे फलक दर्शनी भागात लावावे. कोणतीही अनुचित घटना घडणार नाही याची, काळजी घ्यावी. पुढील एक महिन्यात सर्व अपदा मित्रांचे प्रशिक्षण घ्यावे.

    पूरामुळे किंवा आपत्तीमुळे स्थानिक स्तरावर कोणतेही नुकसान झाले तर कृषी, महसूल व संबंधित विभागाने त्याची त्वरित रिपोर्टिंग जिल्हा मुख्यालय करणे आवश्यक आहे. नुकसानग्रस्त भागांचे त्वरित पंचनामे करावे. तालुका स्तरावरील नियंत्रण कक्ष अद्ययावत ठेवावा. तसेच सर्व नगरपालिका /नगरपंचायतींनी अग्निशमन सेवा चोख ठेवावी. तालुकास्तरावरील सर्व यंत्रणांची तहसीलदार यांनी बैठक घ्यावी. पूर परिस्थितीमध्ये पुराची दैनंदिन माहिती, धरणाची पातळी, पाणीसाठा व इतर गोष्टी अतिशय काटेकोरपणे जिल्हा मुख्यालय कळवणे आवश्यक आहे. त्यासाठी एक जबाबदार नोडल अधिकारी नियुक्त करावा, अशाही सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

    यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी सादरीकरण केले. बैठकीला विविध विभागांचे प्रमुख व इतर अधिकारी उपस्थित होते.

  • Chandrapur Ram Bagh ground news । रामबाग मैदानासाठी चंद्रपुरात होणार ‘महापंचायत”

    Chandrapur Ram Bagh ground news

    Chandrapur Ram Bagh ground news : चंद्रपूर: रामबाग मैदान वाचवण्यासाठी रविवार दिनांक 11 मे रोजी सकाळी 7 वाजता रामबाग मैदानावर महापंचायतचे आयोजन करण्यात आले आहे. स्थानिक भागातील तसेच शहरातील सर्वसामान्य नागरिक, खेळाडू, सैन्य व पोलीस भरती करिता सराव करणारे युवक,योगा ग्रुप्स तसेच शहरातील विविध संस्था-संघटना यांनी मोठ्या संख्येने या महापंचायत मध्ये सामील होण्याचे आवाहन रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीने आज शुक्रवार दिनांक 9 मे रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून केले. chandrapur mahapanchayat

    आपले सरकार सेतू केंद्रातील दरवाढ मागे घ्या – खासदार धानोरकर

    यावेळी रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे सदस्य पप्पू देशमुख, राजेश अडूर, मंतोष देबनाथ, उमेश वासलवार, दिपक कामतवार, रविंद्र माडावर, गणेश झाडे, प्रशांत वाघमारे, अतुल बेजगमवार, प्रवीण वडलुरी, कोमिल मडावी, मनप्रीत सिंग, अमोल घोडमारे, सोहेल शेख, प्रफुल बैरम, अक्षय येरगुडे, रजनी पाॅल इत्यादी उपस्थित होते.

    press conference deshmukh


    महापंचायतीच्या सुरुवातीला या मैदानावर प्रतीकात्मक स्वरूपात खेळाडू विविध खेळांचे, योगा ग्रुप योगासनाचे तसेच सराव करणारे युवक-युवती सरावाचे प्रदर्शन करतील. त्यानंतर मैदानावरच महापंचायत घेऊन चर्चा आयोजित केली जाणार आहे. या चर्चेअंती महापंचायतीमध्ये ठराव घेण्यात येतील. सर्व लोकप्रतिनिधींना पत्र देऊन महापंचायतीमध्ये उपस्थित राहण्याची विनंती करण्यात येईल.अशी माहिती (ram bagh ground) रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीने पत्रकार परिषदेतू दिली. Save Ram Bagh ground
    जिल्हा परिषदेला रामबाग मैदानावरील नवीन जागेत 3399 चौरस मीटर म्हणजेच 36 हजार 587 चौरस फुटामध्ये चार मजली नवीन इमारतीचे बांधकाम करावयाचे आहे.

    akhiv patrika

    जिल्हा परिषद प्रशासनाकडे जुन्या इमारतीच्या परिसरात जटपुरा गट नंबर 1 च्या शिट नंबर 21 मध्ये 8430.90 चौरस मीटर म्हणजेच जवळपास 90 हजार 750 चौरस फूट जागा उपलब्ध आहे. ही 900 फूट बाय 900 फूट अशी चौरस जागा आहे. दोन एकरच्या वर जागा जुन्या इमारतीच्या ठिकाणी उपलब्ध असतांना प्रदूषित शहरातील एकमेव निसर्गरम्य मैदान असलेल्या रामबाग मैदानावरच नवीन इमारतीचा आग्रह कशासाठी ? असा आंदोलनकर्त्यांचा सवाल आहे. रामबाग बचाव संघर्ष समितीने पत्रकार परिषदेत जागेची आखीव पत्रिका व नकाशा सादर केला.

  • Aaple Sarkar service center charges increase । सेवा केंद्रांचे दर गगनाला भिडले; सरकारने तात्काळ निर्णय मागे घ्यावा – खासदार धानोरकर

    Aaple Sarkar service center charges increase

    Aaple Sarkar service center charges increase : चंद्रपूर :  ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत पुरवल्या जाणाऱ्या अत्यावश्यक शासकीय सेवांच्या शुल्कात नुकत्याच झालेल्या मोठ्या दरवाढीवर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या दरवाढीवर तातडीने पुनर्विचार करून ती मागे घेण्याची मागणी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठवून केली आहे. Aaple Sarkar center fee hike impact

    पशुसंवर्धन योजनेसाठी असा करा ऑनलाईन अर्ज

    खासदार धानोरकर यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, राज्य शासनाने ‘आपले सरकार सेवा केंद्रां’वरील जवळपास सर्वच सेवांच्या शुल्कात ६०% ते १००% पर्यंत वाढ केली आहे. ही दरवाढ अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा सर्वसामान्य नागरिक महागाईने त्रस्त आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी, विद्यार्थी, महिला, मजूर आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही दरवाढ आर्थिकदृष्ट्या अत्यंत अन्यायकारक आणि त्रासदायक आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. Aaple Sarkar service fee hike

    सध्या विविध शैक्षणिक परीक्षांचे निकाल जाहीर झाले असून विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी सेतू केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे. तसेच, शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनाही विविध कागदपत्रांची गरज भासत आहे. अशा परिस्थितीत या अत्यावश्यक सेवांसाठी वाढलेले शुल्क त्यांच्यासाठी मोठा आर्थिक भार ठरत आहे, असे खासदार धानोरकर यांनी निदर्शनास आणले.

    खासदार धानोरकर यांनी शासनाच्या ‘ई-गव्हर्नन्स’ आणि ‘सुलभ प्रशासन’ या धोरणांचा उल्लेख करत ही दरवाढ या धोरणांच्या विरोधात असल्याचे सांगितले. त्यांनी मागणी केली आहे की, राज्य सरकारने तातडीने वाढवलेले सेवा शुल्क मागे घ्यावे. तसेच, भविष्यात सेवा शुल्क निश्चित करण्यापूर्वी जनतेच्या प्रतिनिधींशी विचारविनिमय करावा. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सेवा शुल्कात सवलतीची तरतूद करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

    या गंभीर विषयावर तातडीने कार्यवाही करण्याची अपेक्षा खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी व्यक्त केली आहे.

  • Pashusamvardhan Yojana Maharashtra 2025 । पशुसंवर्धन योजना 2025 साठी ऑनलाइन अर्ज कसा करावा?

    Pashusamvardhan Yojana Maharashtra 2025

    Pashusamvardhan Yojana Maharashtra 2025 : चंद्रपूर ८ मे (News३४) : ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन देण्यासाठी तसेच त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देण्याकरिता पशुसंवर्धन विभागामार्फत वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. या योजनांतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याकरिता जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे.

    राज्यातील आयटीआय मध्ये ६ नव्या अभ्यासक्रमांचा समावेश

    यामध्ये एखादया योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतिक्षा यादी पूढील 5 वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय शासनाने केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून त्यांना प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल, हे कळू शकते तसेच लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबींकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे. Pashusamvardhan waiting list benefits

    त्याकरिता सन 2025-26 या चालू वर्षात वैयक्तिक योजनांचा लाभ घेण्याकरिता 3 मे 2025 पासून  ऑनलाईन पध्दतीने अर्ज करावयाचा आहे.

    ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ : http://ah.mahabms.com अँड्राईड मोबाईल अॅप्लिकेशनचे नाव AH-MAHABMS(Google play Store वरिल मोवाईल अॅपवर उपलब्ध). टोल फ्री क्रमांक 1962 किंवा 18002330418.

    अशा आहेत योजना : पशुसंवर्धन विभागाअंतर्गत सन 2025-26 या वर्षात विविध वैयक्तिक लाभाच्या योजना जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत 100 कुक्कुट पिल्लांचे गट वाटप, विशेष घटक योजनांतर्गत 75 टक्के अनुदानावर 2 दुधाळ जनावरांचा गट पुरवठा तसेच 75 टक्के अनुदानावर (10 शेळया व 1 बोकड) शेळी गट पुरवठा, आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरिल आदिवासी योजना (TSP & OTSP) अंतर्गत 75 टक्के अनुदानावर 2 दुधाळ जनावरांचा गट पुरवठा तसेच 75  टक्के अनुदानावर (10 शेळया व 1 बोकड) शेळी गट पुरवठा यासाठी ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रकिया राबविली जाणार आहे.  Maharashtra animal husbandry schemes 2025

    अर्ज भरतांना अर्जदाराने नोंदविलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठविण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेअंतर्गत कार्यवाही सुरु असतांना आपला मोबाईल क्रमांक बदलू नये.

    योजनेबाबत अधिक माहितीसाठी वरील तक्त्यात दर्शविलेलया टोल फ्री क्रमांकावर किंवा पंचायत समिती स्तरावर तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी (वि.) किंवा कार्यक्षेत्रातील पशुवैद्यकिय दवाखान्यातील अधिकारी किंवा कर्मचारी तसेच जिल्हास्तरावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांच्याशी संपर्क साधावा. तसेच जास्तीत जास्त प्रमाणात पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणा-या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुडकर यांनी केले आहे.

  • Disaster Management Training for ITI Students । राज्यातील ITI मध्ये ‘आपत्ती व्यवस्थापन’, ६ नव्या अभ्यासक्रमांचा समावेश

    Disaster Management Training for ITI Students

    Disaster Management Training for ITI Students : चंद्रपूर – जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाम इथे दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान सीमेवर सध्या तणावाचे वातावरण आहे. पार्श्वभूमीवर कौशल्य विभाग आणि अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देण्यात येत आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ठाणे येथील राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज  या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. राज्यातल्या सर्व औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात ऑनलाईन द्वारे आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा होणार आहेत.  Disaster management training for ITI students in Maharashtra

    गर्भलिंग निदान करणाऱ्याची आता खैर नाही, चंद्रपुरात आढावा बैठक

    ६ नवे अभ्यासक्रम

              या कार्यक्रमात कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, आपत्ती व्यवस्थापन ही काळाची गरज आहे. आपत्ती मानव निर्मित असो किंवा नैसर्गिक असो, याचे व्यवस्थापन आणि बचाव कसा करावा, याचे प्रशिक्षण प्रत्येक नागरिकांनी घेतले पाहिजे. मानवाने प्रगती केली असली तरी, आपत्तीचे स्वरूप ही त्यानुसार बदलले असून बचावाचे प्रशिक्षण नव्या पिढीला देण्याचा आमचा उद्देश असल्याचे श्री. लोढा म्हणाले. त्याचबरोबर या कार्यक्रमात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी आयटीआयमध्ये  सहा नव्या अभ्यासक्रमाची यावेळी घोषणा केली. यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ई व्ही इलेक्ट्रिक वाहन व्यवस्थापन, इंडस्ट्रिअल रोबोटिक्स आणि थ्री डी प्रिंटिंग, ड्रोन तंत्रज्ञान,  सोलर टेक्निशियन या अभ्यासक्रमांचा यात समावेश असून येत्या शैक्षणिक वर्षापासूनच याची सुरुवात होणार आहे.

    Disaster management training for ITI students in Maharashtra

            दोन दिवसीय शिबिरात अनिरुद्धाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सुनील मंत्री यांचे विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन लाभले. तर राज्याचे माजी पोलीस महासंचालक श्री. प्रवीण दीक्षित यांनी राज्यातील आयटीआय विद्यार्थ्यांची नागरी संरक्षण या विषयावर ऑनलाईन कार्यशाळा घेतली.

    बचाव आणि मदत कार्याचे प्रशिक्षण

              राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतल्या शिबिराच्या सुरुवातीला डॉ. लीना गडकरी यांनी आपत्ती व्यवस्थापन संकल्पना नेमकी काय हे विद्यार्थ्यांना सांगितले. या दोन दिवसीय शिबिरात बचाव आणि मदतकार्य याचे प्रशिक्षण ही देण्यात येणार आहे. मानव निर्मित आपत्ती यात युद्धाचा समावेश असून त्या काळात घ्यायची काळजी, उपचार आणि बचाव यावरही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. तसेच मंत्री श्री. मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत बचावाची प्रात्यक्षिके विद्यार्थिनींनी सादर केली. राजमाता जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य श्रीमती. एस. एस. माने यांनी यावेळी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. Rajmata Jijau ITI disaster management training

  • PCPNDT Act enforcement strategies । गर्भलिंग तपास करणाऱ्यांना आता सुटका नाही, माहिती देणाऱ्याला मिळणार १ लाखाचं बक्षीस

    PCPNDT Act enforcement strategies

    PCPNDT Act enforcement strategies : गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानतंत्राचा वापर करून बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान करणे, गर्भपात करणे हा कायद्याने गुन्हा आहे. जिल्ह्यात असे अवैध गर्भलिंग निदान केंद्र असतील तर ते शोधून काढावे तसेच त्यांच्यावर कडक कारवाई करावी. तसेच गर्भधारणापूर्व व प्रसुतीपूर्व निदान तंत्र कायद्याची (पीसीपीएनडीटी) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्टींग ऑपरेशनची संख्या वाढविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले. Sting operations for sex determination clinics

    रामबाग मैदानासाठी चंद्रपुरात माती सत्याग्रह

    जिल्हाधिकारी कार्यालयात पीसीपीएनडीटी संदर्भात आढावा वैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविष्कार खंडारे आदी उपस्थित होते.

    ३ महिन्यांनी सोनोग्राफी केंद्राची तपासणी

    दर तीन महिन्यांनी नियमितपणे सर्व सोनोग्राफी केंद्राची तपासणी करावी, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले, शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार सर्व कागदपत्रे, अहवाल, दैनंदिन नोंदवही अतिशय गांभीर्याने तपासावेत. यात कुठेही निष्काळजीपणा होऊ देऊ नका. तसेच अवैध रित्या चालणारे केंद्र शोधून काढण्यासाठी स्टींग ऑपरेशनची संख्या वाढविणे आवश्यक आहे. यासाठी पोलिस विभाग किंवा इतर शासकीय कर्मचा-यांचे सहकार्य घ्यावे. 12 आठवड्यांच्या वर गर्भपात होत असलेल्या केंद्राला आवर्जुन भेट देऊन तपासणी करावी, अशा सुचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. PCPNDT Act penalties and punishments

    खब-यांसाठी तसेच स्टींग ऑपरेशन करीता बक्षीस योजना : गर्भलिंग निदान चाचणी करणा-या व्यक्तिची माहिती देणा-याचे नाव गुप्त ठेवण्यात येते. तसेच त्याने दिलेल्या माहितीच्या अनुषंगाने खातरजमा करून संबंधित व्यक्ती / सोनोग्राफी केंद्रावर खटला दाखल झाल्यावर माहिती देणा-या व्यक्तिस राज्य शासनातर्फे 1 लक्ष रुपये व चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे 25 हजार असे एकूण 1 लक्ष 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. तसेच स्टींग ऑपरेशनसाठी सहभागी होणा-या गर्भवती महिलेस न्यायालयात खटला दाखल झाल्यानंतर शासनातर्फे 1 लक्ष रुपये आणि चंद्रपूर महानगर पालिकेतर्फे 25 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.

    नागरिकांना आवाहन : जन्मापुर्वी मुलगा किंवा मुलगी आहे, हे जाणून घेणे कायद्याने गुन्हा आहे. असा गुन्हा करणा-या सोनोग्राफी केंद्राची माहिती टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 18002334475 वर, टोल फ्री क्रमांक 104, www.amchimulgimaha.in या संकेतस्थळावर, मनपा टोल फ्री क्रमांक 18002574010, व्हॉट्सॲप क्रमांक 8530006063 किंवा https://grievance.cmcchandrapur.com/complaint_registration/add या तक्रार निवारण ॲपवरही करता येऊ शकते.

  • Save Ram Bagh Ground campaign । रामबाग मैदानावर ‘मातीचा सत्याग्रह’!, झेडपीच्या इमारतीसाठी मैदानाचा बळी?

    Save Ram Bagh Ground campaign

    मैदानात खड्डा, नागरिकांत खदखद! चंद्रपूरमध्ये उभारला मातीचा सत्याग्रह

    Save Ram Bagh Ground campaign : रामबाग मैदान बचाव संघर्ष समिती च्या आवाहनानंतर आज गुरुवार दिनांक 8 मे रोजी सकाळी 7 वाजता शेकडो नागरिक,खेळाडू तसेच पोलीस व सैन्य भरतीसाठी सराव करणारे युवक यांनी एकत्रित येऊन कंत्राटदराने मैदानावर खोदलेल्या खड्ड्यात माती टाकली व ‘मातीचा सत्याग्रह’ केला. कोणत्याही परिस्थितीत रामबाग मैदानावरील नैसर्गिक सौंदर्य नष्ट करू देणार नाही, या मैदानावर सिमेंट काँक्रीटचे जंगल होऊ देणार नाही, झेडपी इमारतीचे बांधकाम होऊ देणार नाही, ‘नाही म्हणजे नाही’, असा संकल्प यावेळी आंदोलनात सहभागी नागरिकांनी केला. Mati Satyagraha at Ram Bagh ground

    नागरिकांनी रामबाग वर सुरु असलेले काम बंद पाडले

    मैदानाचे अस्तित्व धोक्यात

    झेडपीच्या नविन इमारतीमुळे भविष्यात या मैदानाचे अस्तित्व धोक्यात येईल अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली. गेल्या चार-पाच दशकापासून नागरिक या मैदानाचा सकाळ-सायंकाळ फिरण्यासाठी किंवा खेळण्यासाठी वापर करीत आहेत. सिंधी व ताडाच्या वृक्षांनी या मैदानाच्या सौंदर्यात विशेष भर टाकली. मैदानाशी अनेक नागरिकांच्या भावना जुळलेल्या असल्याने कोणत्याही परिस्थितीत या मैदानावर इमारतीचे बांधकाम करू नये अशी स्थानिक नागरिक व खेळाडूंची जनभावना आहे. Citizens oppose ZP office construction


    बांधकाम करण्यासाठी कंत्राटदाराने मैदानावर खड्डा खोदल्यानंतर नागरिक संतप्त झाले व त्यांनी आंदोलनाचा पवित्र घेतला. जोपर्यंत झेडपीची इमारत इतरत्र स्थलांतरित होत नाही तोपर्यंत आमचा विरोध सुरू राहील अशी भूमिका रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीने घेतली आहे.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 चे कार्यकारी अभियंता मुकेश टांगळे यांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता एक बैठक संपन्न झाली. या बैठकीला पप्पू देशमुख,भरत गुप्ता व रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे इतर अनेक सदस्य उपस्थित होते. मात्र बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही.

    Mati Satyagraha at Ram Bagh ground

    जिप प्रशासन नागरिकांची दिशाभूल करीत आहे

    नविन इमारत बांधण्याकरिता इतर ठिकाणी पुरेशी जागा उपलब्ध असतांना प्रदूषित शहरातील सौंदर्याने नटलेल्या एका निसर्गरम्य क्रीडांगणावर जिल्हा परिषदेची इमारत बांधण्याचे नियोजन करणे योग्य नाही. या प्रकरणात जिल्हा परिषद प्रशासन जनतेची दिशाभूल करीत आहे. उद्या दिनांक 9 मे रोजी पुराव्यानिशी जिल्हा परिषद प्रशासनाचा पर्दाफाश करणार अशी माहिती रामबाग मैदान बचाव संघर्ष समितीचे पप्पू देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

  • Hansraj Ahir Operation Sindoor । ऑपरेशन सिंदूर: चंद्रपूरमधून हंसराज अहीर यांचे भारताच्या विजयाचे कौतुक! 🚨

    Hansraj Ahir Operation Sindoor

    Hansraj Ahir Operation Sindoor : चंद्रपूर: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा ‘‘ऑपरेशन  सिंदुर’’ सर्जिकल स्ट्राईक करुन  भारताने बदला घेत पाकिस्तान व दहशतवादी संघटनांना सडेतोेड उत्तर दिल्याबद्दल पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा राष्ट्रीय  मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांनी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार व तिन्ही सैन्यदलांचे अभिंनदन करुन याविशेष कामगीरीवर गर्व व्यक्त केला आहे. Hansraj Ahir on surgical strike

    चंद्रपूर जिल्ह्यात पोलिसांना न घाबरणारे सट्टेबाज, वाचा बातमी

    हिशोब चुकता


    कोटली, मुज्जफराबाद व बहावलपुर सह 9 आतंकी तळांना लक्ष्य करीत एअर स्ट्राईक द्वारे शेकडो आतंकवाद्यांचा खातमा करुन भारताने आपल्या भगिनींच्या पुसल्या गेलेल्या कुंकवाचा हिशेब चुकता केला. दहशतवादी संघटनांनी पुन्हा पुन्हा भारताच्या सीमांकडे करड्या नजरेने बघण्याचे धाडस करु नये अन्यथा जगाच्या नकाशावरुनच पुसुन टाकू हा पाकिस्तानला दि. 07 मे रोजी पहाटे केलेल्या सर्जिकल स्ट्राईक मधुन दिलेला थेट इशाराच आहे.


    ‘‘देश प्रथम’’ ही मा. नरेंद्र मोदीजींची निती व स्पष्ट  भुमिका आहे. देशाविरुद्ध रचल्या जाणारे कोणतेही कट कारस्थान सहन केले जाणार नाही, त्याची किंमत वसुल करण्याची धमक मोदी सरकारची आहे. आमचे सैन्यदल यासाठी सक्षम आहेत. हेच या सर्जिकल स्ट्राईक ने पुन्हा एकदा दाखवून दिले. अत्यंत नियोजनबध्द व मानवीय दृश्टीकोनाचा परिचय देत पाकिस्तानी नागरीक व तेथील सैन्यदलास इजा न पोहचविता भारताने दहशतवादाविरुध्द केलेला सर्जिकल स्ट्राईक हा भारताचा ऐतिहासिक विजय असल्याचे पुर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांनी म्हटले आहे.

  • Save Ram Bagh Ground Chandrapur । रामबाग ग्राऊंड वाचवा! चंद्रपूरच्या नागरिकांनी बांधकाम बंद पाडले! 🏟️

    Save Ram Bagh Ground Chandrapur

    Save Ram Bagh Ground Chandrapur : चंद्रपूर: शहरातील निसर्गरम्य अशा रामबाग ग्राऊंडवर अचानक जिल्हा परिषदेच्या इमारतीचे बांधकाम सुरू झाल्याने स्थानिक जनता तसेच शहरातील खेळाडू व युवकांमध्ये संतापाची लाट उसळली. या मैदानावर काम सुरू झाल्यानंतर स्थानिक नागरिक व खेळाडूंनी प्रशासनाला हे काम बंद करण्याची विनंती केली. परंतु प्रशासनाने याची दखल घेतली नाही. अखेर या मैदानावर कंत्राटदाराने भला मोठा खड्डा खोदल्यानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी आज बुधवार दिनांक 7 मे रोजी सकाळी 9 वाजता जिल्हा परिषदेच्या नविन इमारतीचे बांधकाम बंद पाडले. Chandrapur citizens protest

    मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी गौडा यांचा सत्कार

    chandrapur citizens protest


    यावेळी मनपाचे माजी नगरसेवक पप्पू देशमुख व राजेश अडुर यांचेसह श्रीकांत भोयर,रविंद्र माडावार,दौलत साटोणे, नवनाथ देरकर, प्रवीण कुमार वडलोरी,माधव डोडाणी,तपन दास,कोमील मडावी,राहुल ठाकरे,प्रफुल बैरम,अक्षय येरगुडे,अमुल रामटेके,अमोल घोडमारे इत्यादी नागरिक व खेळाडू उपस्थित होते.

    उद्या रामबाग मैदानावर निर्णायक बैठक

    रामबाग ग्राऊंड 50 वर्षांपासून सर्वसामान्यांच्या हक्काचे ग्राउंड आहे, येथिल नैसर्गिक सौंदर्य नष्ट करू देणार नाही, इथे सिमेंट काँक्रीटचे जंगल होऊ देणार नाही, इथे कोणत्याही इमारतीचे बांधकाम होऊ देणार नाही,नाही म्हणजे नाही असा दृढ संकल्प नागरिक व खेळाडूंनी केला आहे. याबाबत पुढील भूमिका ठरविण्यासाठी उद्या दिनांक 8 मे रोजी सकाळी 7 वाजता रामबाग मैदानावर निर्णय बैठक घेण्यात येणार आहे.

    सेव्ह रामबाग ग्राउंड

    ‘सेव्ह रामबाग ग्राऊंड, रामबाग मैदान बचाव संघर्ष समिती’ च्या बॅनरखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या भागातील तसेच शहरातील सर्वसामान्य नागरिक, युवक-युवती व खेळाडूंनी या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केले आहे.

  • Vinay Gowda best district collector Maharashtra । विनय गौडा यांची कमाल: चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट!

    Vinay Gowda best district collector Maharashtra

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान: चंद्रपूरचे विनय गौडा राज्यात प्रथम!

    Vinay Gowda best district collector Maharashtra : चंद्रपूर, दि. 7 मे : राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी संपूर्ण राज्यातून प्रथम क्रमांक पटकाविला. त्या अनुषंगाने आज (दि.7) मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी विनय गौडा यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. Chandrapur district collector Vinay Gowda 2025

    पोलीस प्रशासनाला न घाबरणारे गडचांदूरातील सट्टेबाज

     मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन महाराष्ट्र दिनी जाहीर करण्यात आले. यात उत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालय श्रेणीत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने बाजी मारली. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात 84.29 गुण मिळवत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला.

    कार्यालयीन सुधारणा मोहिमेत अद्ययावत संकेतस्थळ, केंद्र शासनासोबत सुसंवाद, कार्यालयीन स्वच्छता, जनतेच्या तक्रारींचे निवारण, कार्यालयीन सोयीसुविधा, कामकाजातील सुधारणा, अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण, सेवाविषयक बाबी, सुकर जीवनमान, कृत्रिम बुध्दिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर, आर्थिक व औद्योगिक गुंतवणुकीस प्रोत्साहन आणि जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात आलेले नाविण्यपूर्ण उपक्रमाबाबत भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India)  मार्फत मूल्यमापन करण्यात आले होते. या सर्व निकषांवर परिपूर्ण उतरून चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात सर्वोत्कृष्ठ ठरले.