Tag: News34 chandrapur

  • rambagh ground chandrapur । रामबाग मैदानाची आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडून पाहणी

    rambagh ground chandrapur

    rambagh ground chandrapur : रामबाग मैदानावर जिल्हा परिषदेची इमारत उभारण्याच्या प्रस्तावावर काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर आज आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रत्यक्ष रामबाग मैदानावर जाऊन पाहणी केली. त्यांनी मैदानात खोदलेल्या भागाची तपासणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना मैदान तातडीने पूर्ववत करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर मैदान पूर्ववत करण्याच्या हालचालींना गती मिळाली आहे. mla kishor jorgewar rambagh site visit

    चंद्रपूर जिल्ह्यात ५ महिन्यात १७ नागरिकांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

    पाहणीदरम्यान आमदार जोरगेवार म्हणाले, कालच्या बैठकीत प्रशासनाने जनतेच्या भावना लक्षात घेऊन सकारात्मक भूमिका घेतली. रामबाग मैदान अबाधित ठेवण्याचा निर्णय हा जनतेच्या एकजुटीचा आणि लोकशाहीच्या मूल्यांचा विजय आहे. आता इथे झालेली हानी तातडीने दुरुस्त करणे आवश्यक आहे.

    तात्काळ खड्डा बुजवा

    रामबाग मैदानात खोदलेला खड्डा युद्धपातळीवर बुजवण्याचे काम त्वरित पूर्ण करा. मैदानाची जुनी रचना कायम राखण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेण्यात यावी, असेही आमदार जोरगेवार यांनी स्पष्ट केले.

    आमदार जोरगेवार यांच्या पाहणीमुळे आणि कामाला मिळालेल्या गतीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. स्थानिक रहिवासी, खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिकांनी आमदारांचे आभार मानले. आमचा आवाज ऐकला गेला, हे खूप महत्त्वाचे आहे. आता मैदान पुन्हा आपल्या मुलांसाठी आणि खेळाडूंना उपलब्ध होईल, ही आनंदाची गोष्ट आहे,” असे नागरिकांनी सांगितले. mla kishor jorgewar latest news chandrapur

    mla kishor jorgewar rambagh site visit

    रामबाग मैदान हे चंद्रपूर शहराचे फुफ्फुस आहे. ते अबाधित राहावे, यासाठी सुरू असलेला संघर्ष आता यशाच्या दिशेने जात आहे. आमदार किशोर जोरगेवार यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे व नागरिकांच्या एकजुटीमुळे हे शक्य झाले आहे. मैदानाच्या दुरुस्तीची कामे लवकर पूर्ण होऊन ते पूर्ववत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या पाहणीवेळी दशरथसिंह ठाकूर, मनोज पॉल, सुभाष कासनगोट्टूवार, तुषार सोम, माजी नगरसेवक प्रदीप किरमे यांच्यासह खेळाडू आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Sudhir Mungantiwar on sports ground decision । खेळाडूंना दिलासा; क्रीडांगण कायम राहणार – मुनगंटीवार

    Sudhir Mungantiwar on sports ground decision

    Sudhir Mungantiwar on sports ground decision : चंद्रपूर जिल्हा परिषदेची नवीन इमारत बांधण्यासाठी सरकारकडून मंजुरी मिळाली असून, सध्याची इमारत कामाच्या विस्तारामुळे अपुरी ठरत आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने जमिनीसाठी क्रीडांगणाच्या काही भागाचा उपयोग करण्याचा प्रस्ताव मांडला होता. Chandrapur sports ground controversy

    मानव वन्यजीव संघर्षात चंद्रपूर जिल्ह्यात १७ नागरिकांचा मृत्यू, दोन दिवसात ४ महिलांचा बळी

    मात्र या निर्णयाला खेळाडूंनी विरोध दर्शविल्याने, जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या बैठकीत क्रीडांगण जसेच्या तसे कायम राखून ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे खेळाडूंच्या क्रीडांगणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

    chandrapur sports ground controversy

    बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, भाजपा महानगराचे जिल्हाध्यक्ष राहुल पावडे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार, भरत गुप्ता, प्रतिमा ठाकूर आदींची उपस्थिती होती.

    या पार्श्वभूमीवर आठ दिवसांपूर्वी क्रिकेट व फुटबॉल खेळणारे विद्यार्थी आणि खेळाडूंनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली होती. त्यावेळी 10 अथवा 11 मे रोजी बैठक घेऊन क्रीडांगणाचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन आमदार मुनगंटीवार यांनी होते. त्याअनुषंगाने, झालेल्या आजच्या बैठकीत, जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे बांधकाम दुसऱ्या इमारतीसाठी राखीव जागेवर हलवण्यात येणार असून, खेळाडू वापरत असलेले क्रीडांगण कायम ठेवले जाणार आहे. Chandrapur public protest sports ground

    भविष्यामध्ये अशा अडचणी टाळण्यासाठी सदर जागा राज्य सरकारच्यावतीने ‘ग्राउंड’ म्हणून अधिकृतपणे घोषित करण्यात येणार असल्याचा निर्णय देखील घेण्यात आला.

    याशिवाय पोलीस ग्राउंडसुद्धा म्हाडा परिसरातील 50 एकर जागेत स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चांदा क्लब ग्राउंडवर होणारे कृषी प्रदर्शन, महोत्सव आणि इतर उपक्रमांसाठी तारखा निश्चित करून उर्वरित दिवशी क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याबाबत नियोजन करावे अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

  • irai river widening and deepening update । चंद्रपूरसाठी दिलासादायक पाऊल – इरई नदी खोलीकरणाची कामे जोमात

    irai river widening and deepening update

    irai river widening and deepening update : चंद्रपूर – चंद्रपूर शहराची जीवनवाहिनी असलेल्या इरई नदीच्या खोलीकरणाचे काम सर्वांच्या सहकार्याने हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या प्रगतीची पाहणी करण्याकरिता राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी प्रत्यक्ष खोलीकरण होत असलेल्या ठिकाणी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., महानगरपालिका आयुक्त विपिन पालीवाल,  उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार तसेच संबंधित यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते. Chandrapur river cleaning and development

    चंद्रप्रकाशात होणार ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पात प्राणिगणना

    400 ब्रास गाळ मोफत वाटप

    चंद्रपूर शहराला 9 कि.मी. समांतर वाहणा-या इरई नदीच्या खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ 25 एप्रिल 2025 रोजी करण्यात आला, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, जिल्हा प्रशासनाने इरई नदीच्या खोलीकरण कामाचे योग्य नियोजन केले असले तरी कामाची गती वाढविणे आवश्यक आहे. चालू महिन्याअखेर पर्यंत सर्व नियोजित काम पूर्ण करावे. तसेच नदीतील गाळ शेतकऱ्यांना विनामूल्य देण्यात येत आहे. आतापर्यंत 400 ब्रास गाळ मोफत वाटप करण्यात आला असून अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना गाळ प्राधान्याने द्यावा, अशा सूचना त्यांनी केल्या. River deepening projects in Chandrapur

    7500 ब्रास गाळ काढण्यात आला

    पहिल्या टप्प्यात राम सेतु ते चौरळा पूल दरम्यान अमुजमेंट पार्क जवळ व महर्षी शाळेमागे  सध्या काम सुरू आहे. आतापर्यंत अमुजमेंट पार्क जवळ 350 मीटर व महर्षी शाळेमागे 120 मीटर एकूण असे एकूण 470 मीटर अंतरावरचे खोलीकरण करण्यात आले आहे. सद्यस्थितीत कामावर 8 पोकलेन मशीन, 13 हायवा/ टिप्पर, 20 ट्रॅक्टर, 1 जे.सी.बी कार्यरत असून नदी पात्रातून आतापर्यंत 7500 ब्रास गाळ काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांना 400 ब्रास गाळ  वाटप करण्यात आले आहे.

    chandrapur river cleaning and development

    चंद्रपूर शहर ते इरई – वर्धा नदी संगमापर्यंतच्या 17 कि.मी. लांबीत इरई नदी पात्रातील वाढलेली झाडेझुडपे, गाळ काढून नदी पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी पात्राची पूर वहन क्षमता वाढण्यास मदत होईल व शहराला दरवर्षी पडणारा पुराचा वेढा कमी होईल.  तीन टप्प्यात खोलीकरण करण्यात येणार असून पहिला टप्पा रामसेतू ते चौराळा पुल, दुसरा टप्पा माना टेकडी (लालपेठ कॉलरी) आणि तिसरा टप्पा इरई ते वर्धा नदी संगमापर्यंतचा आहे.

  • Vijay Wadettiwar on tiger attack victims । त्या नरभक्षक वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा – विजय वडेट्टीवार

    Vijay Wadettiwar on tiger attack victims

    Vijay Wadettiwar on tiger attack victims : सिंदेवाही – तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेलेल्या तीन महिलेवर वाघीणीने प्राण घातक हल्ला चढविला व यात तीनही महिलांचा दुर्दैवी अंत झाला. सदर घटना काल दुपारी १२.३०  वाजताच्या सुमारास सिंदेवाही  वनपरिक्षेत्रा अंतर्गत उपवनक्षेत्र डोंगरगाव मधील चारगाव कक्ष क्रमांक 252 येथे घडली. मृतकांमध्ये कांता बुधाजी चौधरी (65) शुभांगी मनोज चौधरी (28 ) रेखा शालिक शेंडे (50) यांचा समावेश असून तीनही मृतक महिला या सिंदेवाही तालुक्यातील मेंढामाल येथील रहिवासी आहेत. अकस्मात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण मेंढा माल गावात शोककळा पसरली. tiger kills 3 women in forest

    रामबाग वाचलं, आमदार जोरगेवार यांची आक्रमक भूमिका

    सदर घटनेची माहिती मिळतात क्षेत्र दौरावर असलेले विधिमंडळ पक्षनेते तथा लोक लखा समिती अध्यक्ष व ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्र आमदार विजय वडेट्टीवार यांनी आज वाघल्यात मृत पावलेल्या तीनही महिलांच्या अंत्यसंस्कारात सहभागी होऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वन केले. tragic tiger attack on tendu workers

    tiger kills 3 woman in forest

    अंत्यसंस्कार आटोकताच उपस्थित वनविभागाची उपवनसंरक्षक राकेश सेपट, वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर, पोलीस निरीक्षक राठोड तसेच उपस्थित गावकरी व वन विभाग कर्मचारी तसेच पोलीस अधिकारी यांच्याशी तात्काळ चर्चा करून हल्लेखोर वाघिणीचा तात्काळ बंदोबस्त करा तसेच घडलेल्या घटनेचा गांभीर्याने विचार करून वृत्तकांच्या कुटुंबीयातील व्यक्तीला वनविभागाच्या सेवेत रुजू करून घ्या. व मृताच्या कुटुंबीयांना विभागाकडून देय असलेला मोबदला तात्काळ देण्याची निर्देश यावेळी विधिमंडळ पक्ष नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी  दिले.

    सोबतच अशा दुर्दैवी घटना यापुढे घडू नये याकरिता विशेष उपाययोजना करण्याचेही त्यांनी यावेळी उपस्थित वनअधिकाऱ्यांना सांगितले. याप्रसंगी प्रामुख्याने सिंदेवाही काँग्रेस शहराध्यक्ष सुनील उट्टलवार , सिंदेवाही नगराध्यक्ष भास्कर नन्नावार, मेंडामाल कांग्रेस कमिटी शाखाध्यक्ष वामनराव कोकोडे, गुरुदासजी बोरकर, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष अभिजीत मुप्पीडवार, नथूजी सोनुले प्रामुख्याने उपस्थित होते.

  • ram bagh ground protest news । रामबाग वाचलं!, आमदार जोरगेवार यांच्या आक्रमक भूमिकेपुढे प्रशासन नरमले

    ram bagh ground protest news

    ram bagh ground protest news : रामबाग मैदानावर जिल्हा परिषदेची इमारत उभारण्याच्या प्रस्तावाला नागरिकांनी दिलेला तीव्र विरोध अखेर यशस्वी ठरला आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत आमदार किशोर जोरगेवार यांनी आक्रमक भूमिका घेत रामबाग मैदानाला जराही धक्का लावू नका असे जिल्हाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यानंतर जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सदर इमारतीसाठी पर्यायी जागेचा विचार केला जाईल असे मान्य केले आहे. save public ground movement

    चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी ६ जणांचा मृत्यू

    या बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, पोलिस विभागाचे उपविभागीय अधिकारी सुधाकर यादव, आंदोलनकर्ते तथा जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख, दशरथसिंह ठाकूर, तुषार सोम, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, मनोज पाल, माजी नगरसेवक राजेश अड्डूर, प्रदीप किरमे, वंदना हातगावकर, सविता दंढारे, रजनी पॉल, राशिद हुसेन, अमोल शेंडे, करणसिंह बैस, मंजुश्री कासनगोट्टूवार यांच्यासह नागरिक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    जनतेच्या भावना केंद्रस्थानी असायला हव्या

    या बैठकीत आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, आमचा विकासकामांना कधीच विरोध नाही. मात्र विकासाच्या नावाखाली नागरिकांच्या भावनांवर आघात होत असेल, तर आम्ही कधीही गप्प बसणार नाही. रामबाग मैदान ही केवळ मोकळी जागा नाही, ती नागरिकांच्या आरोग्याशी, जीवनशैलीशी आणि भविष्यातील पिढ्यांशी जोडलेली आहे. हे मैदान खेळाडू, मुले आणि वृद्ध नागरिक यांचा श्वास आहे. हा केवळ मैदानाचा नव्हे, तर नागरिकांच्या हक्कांचा आणि लोकशाहीच्या मूल्यांचा प्रश्न आहे. लोकशाहीत जनतेच्या भावना केंद्रस्थानी असल्या पाहिजेत. त्या पायदळी तुडवून कोणताही विकास होऊ शकत नाही असे ते यावेळी म्हणाले. MLA Kishor Jorgewar protest news

    पर्यायी जागा शोधणार

    या बैठकीत आमदार जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीसाठी शहरात इतर पर्यायी जागा आहेत. त्या तपासून नागरिकांच्या भावना न दुखावता विकास साधावा अश्या सूचना केल्यात. त्यांच्या या स्पष्ट आणि आक्रमक भूमिकेमुळे प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत मैदानाला धक्का न लावता पर्यायी जागा शोधण्याचा निर्णय घेतला आहे. दुसरी जागा निश्चित करतानाही नागरिकांची सहमती घ्यावी, अशी सूचना आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केली. तसेच, इमारतीसाठी खोदण्यात आलेले रामबाग मैदान तातडीने पूर्ववत दुरुस्त करण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. public voice saves playground

    आजचा दिवस हा जागरूक नागरिकांचा विजय आहे. तुम्ही आवाज उठवला, आपण त्या आवाजाला बळ दिले. शेवटी लोकशाहीत जनतेचा आवाज महत्त्वाचा असतो आणि तो ऐकला गेला, याचे समाधान आहे, असे आमदार किशोर जोरगेवार यांनी स्पष्टपणे सांगितले. बैठकीस संबंधित सर्व अधिकारी, आंदोलक, नागरी प्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • chandrapur lok adalat case disposal update । लोक अदालतीत जलद न्याय! चंद्रपूरमध्ये ६२६ प्रकरणे निकाली

    chandrapur lok adalat case disposal update

    chandrapur lok adalat case disposal update : चंद्रपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा समृद्धी भीष्म यांच्या मार्गदर्शनाखाली 10 मे 2025 रोजी चंद्रपूर जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयांमध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. national lok adalat case settlement report 2025

    देशात आता शिवरायांचा इतिहास शिकविणार, खासदार धानोरकर यांची मागणी पूर्ण

    ६२६ प्रकरणे निकाली

    सदर लोक अदालतीमध्ये एकूण 8,466 प्रलंबित न्यायालयीन प्रकरणे आणि 9,989 दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांपैकी 495 प्रकरणे, तर दाखलपूर्व प्रकरणांपैकी 131 प्रकरणे, असे एकूण 626 प्रकरणे यशस्वीपणे निकाली काढण्यात आली.

    या अदालतीदरम्यान भूसंपादनाचे 1 प्रकरण निकाली काढण्यात आले असून, त्यामध्ये 4 लाख 95 हजार रुपये  नुकसानभरपाई मंजूर करण्यात आली आहे. धनादेश (चेक) प्रकरणांपैकी 73 प्रकरणे, तसेच कामगार व औद्योगिक न्यायालयातील एकूण 22 प्रकरणे देखील निकाली काढण्यात आली.

    या राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन यशस्वी होण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व न्यायाधीश, वकील, न्यायालयीन कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांचे सहकार्य लाभले, अशी माहिती  सुमित  जोशी, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर यांनी दिली आहे.

  • shivaji maharaj history in new education policy । शिवाजी महाराजांचा इतिहास NEP मध्ये; खासदार प्रतिभा धानोरकर यांची मागणी पूर्णत्वास

    shivaji maharaj history in new education policy

    shivaji maharaj history in new education policy : चंद्रपूर : महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत करण्यासाठी, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात (NEP) छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास समाविष्ट करण्याची मागणी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केली होती. या मागणीला केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिल्ली येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सकारात्मक प्रतिसाद देत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. national education policy 2025 latest updates

    चंद्रपुरात ब्लॅकआउट?

    छत्रपती शिवाजी महाराज देशातील युवांसाठी प्रेरणास्रोत

    खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी आपल्या पत्र क्र. १७३२/२०२५, दिनांक १४ एप्रिल, २०२५ द्वारे मागणी केली होती की, छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि कार्य केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशातील युवा पिढीसाठी प्रेरणास्रोत आहे. त्यांची शौर्यगाथा, कुशल प्रशासन आणि प्रजाहितदक्ष धोरणे विद्यार्थ्यांना राष्ट्रनिर्माण आणि नैतिक मूल्यांची शिकवण देतील. त्यामुळे, त्यांचा इतिहास राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. educational reforms in india 2025

    केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या मागणीची दखल घेत, छत्रपती शिवाजी महाराजांचे योगदान देशाला नेहमीच प्रेरणा देत राहील आणि त्यांच्या कार्याचा समावेश अभ्यासक्रमात केल्यास विद्यार्थ्यांमध्ये योग्य दृष्टिकोन निर्माण होईल, असे स्पष्ट केले होते.

    या महत्त्वपूर्ण प्रयत्नांमुळे, आता लवकरच राष्ट्रीय शैक्षणिक अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा समावेश होणार आहे, ज्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कार्याची माहिती मिळू शकेल. हा निर्णय युवा पिढीला राष्ट्रभक्ती आणि नैतिक मूल्यांची शिकवण देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल, असे खासदार धानोरकर यांनी म्हटले आहे.

  • Sanitation workers welfare schemes । कोरोनाकाळातील योगदानाची दखल – सफाई कर्मचाऱ्यांना मिळणार शासनाचा आधार

    Sanitation workers welfare schemes

    Sanitation workers welfare schemes : चंद्रपूर – सफाई कर्मचारी हा अतिशय गरीब वर्ग आहे. शहर स्वच्छतेत त्याची मोलाची भुमिका असते. तो आपले काम अतिशय प्रामाणिकपणे करतो. या कामाच्या भरोश्यावरच स्थानिक स्वराज्य संस्थांना स्वच्छतेचे पुरस्कार मिळतात. त्यामुळे सफाई कर्मचा-यांच्या कामाची जाणीव ठेवून अधिका-यांनी त्यांच्या अडीअडचणी सकारत्मकतेने आणि संवेदनशीलपणे सोडवाव्यात, अशा सुचना राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) शेरसिंग डागोर यांनी केल्या. Welfare benefits for sanitation workers

    आपले सरकार सेवा केंद्राची दरवाढ मागे घ्या

    सफाई कर्मचा-यांच्या विविध प्रश्नांबाबत नियोजन सभागृह येथे आज (दि.9) घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, पालिका प्रशासन अधिकारी डॉ. विद्या गायकवाड, आदी उपस्थित होते.

    सफाई कर्मचाऱ्यांना घरकुल द्या

    कोरोना काळात जीवावर उदार होऊन सफाई कर्मचा-यांनी अहोरात्र काम केले, असे सांगून श्री. डागोर म्हणाले, विविध आस्थापनांमध्ये वारसान तत्वावर सफाई कर्मचा-यांच्या नोकरी संदर्भात तात्काळ निर्णय घेऊन त्यांना रुजू करून घ्यावे. शासन निर्णयानुसार नियुक्तीची जी मुदत आहे, त्या कालावधीत सफाई कर्मचा-यांना नियुक्ती देणे बंधनकारक आहे. श्रमसाफल्य योजनेंतर्गत सफाई कर्मचा-यांच्या घरकुलासाठी प्रस्ताव घेऊन त्यांना घरे उपलब्ध करून द्यावीत. तसेच जमिनीचे पट्टेसुध्दा देण्यात यावे. Shersingh Dagor

    Welfare benefits for sanitation workers

    पुढे ते म्हणाले, सफाई कर्मचा-यांची नियमितपणे आरोग्य तपासणी करावी. त्यासाठी महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायतीने आरोग्य शिबिरांचे आयोजन करावे. आयुष्मान भारत योजनेचा लाभ देऊन त्यांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. शासनाच्या इतरही योजनांचा लाभ सफाई कर्मचा-यांना द्यावा. एखाद कर्मचारी निवृत्त झाला तर त्याचे सर्व लाभ वेळेवर मिळाले पाहिजे, उगाच यात अडचणी निर्माण करू नये. सफाई कामगारांच्या अडीअडचणी समजून घेण्यासाठी जिल्हास्तरावर एक समितीचे गठन करावे. तसेच यात अशासकीय सदस्यांचा समावेश असावा, अशा सुचना अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी केल्या.

    बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मिना साळूंके, नुतन सावंत यांच्यासह सर्व नगर पालिका नगर पंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

  • Free silt distribution for farmers | इरई नदी खोलीकरण मोहिमेत शेतक-यांना मोफत गाळ वाटप सुरु

    Free silt distribution for farmers

    Free silt distribution for farmers : चंद्रपूर –  इरई नदी ही चंद्रपूर शहराची जीवनवाहिनी आहे. शहराला 9 कि.मी. समांतर वाहणा-या या नदीच्या खोलीकरणाचे काम जिल्हा प्रशासनाच्यावतीने हाती घेण्यात आले आहे. निरंतर 45 दिवस सुरू राहणा-या या अभियानसाठी जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले असून नदीच्या खोलीकरणातून निघणारा गाळ शेतक-यांना मोफत देण्यात येत आहे. Silt distribution for farmers in Chandrapur

    चंद्रपुरात ब्लॅक आऊट?

    ज्या शेतक-यांनी गाळासाठी नोंदणी केली आहे, त्यांना मोफत गाळ वाटपाचे काम शुक्रवारपासून सुरू करण्यात आले. ऑनलाईन पध्दतीने 24 शेतक-यांची नोंदणी झाली आज शेतक-यांना 70 ब्रास गाळ मोफत उपलब्ध करून देण्यात आला. सदर गाळ नेण्याकरीता वाहनाची व्यवस्था शेतक-यांना स्वत: करायची आहे.  सद्यस्थितीत अम्युझमेंट पार्क जवळ आणि महर्षी विद्या मंदीर शाळेमागे खोलीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी विविध विभाग आणि खाजगी असे एकूण 21 ट्रॅक्टर, 17 हायवा / टिप्पर, 7 पोकलेन मशीन आणि 1 जेसीबी कार्यरत आहेत. ही यंत्रसामुग्री वाढविण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे. Government river dredging project

    चंद्रपूर शहर ते इरई – वर्धा नदी संगमापर्यंतच्या 17 कि.मी. लांबीत इरई नदी पात्रातील वाढलेली झाडेझुडपे, गाळ काढून नदी पात्राचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे नदी पात्राची पूर वहन क्षमता वाढण्यास मदत होईल व शहराला दरवर्षी पडणारा पुराचा वेढा कमी होईल, या उद्देशाने 25 एप्रिल 2025 रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते इरई नदी खोलीकरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. तीन टप्प्यात खोलीकरण करण्यात येणार असून पहिला टप्पा रामसेतू ते चौराळा पुल, दुसरा टप्पा माना टेकडी (लालपेठ कॉलरी) आणि तिसरा टप्पा इरई ते वर्धा नदी संगमापर्यंतचा आहे.

    इरई नदी खोलीकरण मोहिमेत शासनाच्या जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन,वन विभाग,चंद्रपूर महानगरपालिका,कृषी विभाग,पाटबंधारे विभाग,भूमि अभिलेख कार्यालय, जिल्हा खनिकर्म, प्रादेशिक परिवहन विभाग,पाटबंधारे विभाग,महाराष्ट्र प्रदुषण महामंडळ ही सर्व शासकीय कार्यालये, सीटीपीएस व डब्ल्युसीएल या खाजगी आस्थापना भारतीय जैन संघटना, नाम फाऊंडेशन व टाटा ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थांचा सहभाग आहे.

  • Official information on war blackout rumors । चंद्रपुरात ब्लॅक आऊट? जिल्हाधिकारी गौडा यांनी दिली माहिती

    Official information on war blackout rumors

    Official information on war blackout rumors : चंद्रपूर – सद्यस्थितीत भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये तणावाचे वातावरण बघता विविध माध्यमातून ब्लॅकआऊट किंवा युध्दासंदर्भात येणा-या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना केले आहे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व यंत्रणा अलर्टवर

    शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार या संदर्भातील अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी नागरिकांना आश्वस्त केले.

    युध्दजन्य परिस्थिती, मॉक ड्रील, ब्लॅकआऊट संदर्भात वृत्तांकन करणारे विविध प्रसारमाध्यमे किंवा सोशल मिडीयातून विविध प्रकारचे फोटो किंवा व्हिडीओ प्रसारीत करण्यात येतात. सदर बाबी अधिकृतच असेल याची खात्री देता येत नाही, किंबहुना ते पूर्वीचेसुध्दा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

    त्यामुळे युध्द किंवा ब्लॅकआऊट संदर्भातील प्रशासनाकडून आलेली माहितीच अधिकृत समजावी. तसेच या संवेदनशील काळात सोशल मिडीया हाताळतांना जबाबदारीचेसुध्दा भान ठेवावे. आपल्याकडून अफवा पसरणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे प्रशासनाने म्हटले आहे.