Tag: News34 chandrapur

  • police caught man with desi katta । चंद्रपुरातील सहारा पार्क परिसरात सापळा – देशी कट्ट्यासह युवक अडकला

    police caught man with desi katta

    police caught man with desi katta : १७ मे रोजी शहर पोलीस हद्दीत २४ वर्षीय युवकाला देशी कट्टा व जिवंत काडतूस सहित पोलिसांनी अटक केली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छीरे यांना गोपनीय माहिती मिळाली होती कि एक इसम राजनगर, सहारा पार्क आरवट रोड चंद्रपूर येथे देशी कट्टा घेऊन येणार आहे.

    चंद्रपुरात पेटली देशभक्तीची ज्वाला, ५ किलोमीटर लांब तिरंगा यात्राने वेधले लक्ष

    माहिती मिळताच शहर पोलिसांचे गुन्हे शोध पथक राजनगर येथील सहारा पार्क जवळ पोहचले, संशयास्पद स्थितीमध्ये वावरत असलेल्या एका इसमाला सापळा रचून शहर पोलिसांनी अटक केली, २४ वर्षीय रोहित उर्फ मोनू राजकपूर कातकर राहणार विचोडा रयतवारी पडोली मध्ये राहणारा आहे.

    आरोपीवर रेकॉर्डवरील नाही पण देशी कट्टा का?

    पोलिसांनी आरोपी रोहित जवळून एक देशी कट्टा व २ जिवंत काडतुसे जप्त करीत त्याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष बाब म्हणजे आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नाही, मात्र त्याने देशी कट्टा का घेतला व कुणापासून घेतला याबाबत शहर पोलीस तपास करीत आहे. illegal arms in Chandrapur area

    Powered by myUpchar

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधीक्षक सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात गुन्हे शोष पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छीरे, पोलीस कर्मचारी सचिन बोरकर, भावना रामटेके, संजय धोटे, संतोष कनकम, कपूरचंद खरवार, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, इम्रान खान, दिलीप कुसराम, इर्शाद खान, सारिका गौरकार व दीपिका झिंगरे यांनी केली.

  • Chandrapur Gadchiroli Highway accident । चंद्रपूर-गडचिरोली महामार्गावर भीषण अपघात, ४ जखमी; एकाचा मृत्यू

    Chandrapur Gadchiroli Highway accident

    Chandrapur Gadchiroli Highway accident : सावली (चंद्रपूर): चंद्रपूर–गडचिरोली महामार्गावरील व्याहाड बुज येथील नंदिनी बॉर जवळ आज (१७ मे) सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. गडचिरोलीवरून सावलीकडे येणाऱ्या एमएच ३३ एसी ३९३५ क्रमांकाच्या चारचाकी वाहनाचा मागील चाक अचानक फुटल्यामुळे गाडी अनियंत्रित झाली आणि समोर असलेल्या सायकलस्वारास जोरदार धडक दिली. त्यानंतर वाहन दोन वेळा उलटून शेवटी सरळ उभी राहिली. Chandrapur road accident news today

    चंद्रपुरात ५ किलोमीटर लांब तिरंगा यात्रा

    या अपघातात चारचाकीतील वैभव सोमनाकार (वय २७, नवेगाव) आणि चालक अनिरुद्ध कोवे हे गंभीर जखमी झाले. तसेच सायकलस्वार युवराज रोहनकार (वय ५५) आणि त्यांची पत्नी वनिता रोहनकार (वय ५०) हेही गंभीर जखमी झाले.

    Powered by myUpchar

    घटनेनंतर तातडीने सर्व जखमींना खाजगी वाहनाद्वारे गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान चालक अनिरुद्ध कोवे याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. उर्वरित तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    या दुर्घटनेची नोंद सावली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

  • Chandrapur flood । चंद्रपूरमध्ये पुराचा इशारा! तातडीने नियोजन करा – राहुल पावडे यांची मागणी

    Chandrapur flood

    Chandrapur flood : चंद्रपूर :- पावसाळा अगदी तोंडावर आला असताना पुर परिस्थितीचा सामना करण्याकरीता आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) ला लागणारे साहित्य व मनुष्य बळाची वाढ व उत्तम नियोजन करावे, अशी मागणी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल पावडे यांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

    तो शासन निर्णय रद्द करा – आमदार सुधाकर अडबाले


     समोर पावसाळयाचे दिवसात चंद्रपूर जिल्हयाची परिस्थिती बघता शहरातील ईरई नदी, झरपट नदी व वर्धा नदी या नदयांच्या पाण्यामुळे या वर्षी देखील पुर परीस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अतिवृष्टी झाल्यास चंद्रपुरातील नदीकाठा लगतची वसाहती व सखल भागात पाणी साचून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते त्यामुळे शहरातील नाले आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जागा या मनपा प्रशासन व जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून योग्यरीत्या पावसाळ्यापूर्वीच स्वच्छ करून त्या पद्धतीने नियोजन करावे अशी चर्चाही यावेळी राहुल पावडे यांनी निवासी जिल्हाधिकारी यांच्याशी केली. disaster management planning before monsoon

    बोट आधीच उपलब्ध करा

    तशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात असा आग्रह केला. या वर्षीसुध्दा पाऊस जास्त येण्याचे अनुमान आहे. त्यामुळे पावसाळ्‌या आधी सर्व सोयीयुक्त साहीत्य आपत्ती व्यवस्थापन पथकाकडे उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे स्वयं सेवकाची यादी बनवुन त्याची मदत पुर पिडीत अपातकालीन परिस्थितीमध्ये सुध्दा घेण्यात येऊ शकते. करीता पावसाळा पुर्व नियोजन म्हणुन शहरातील नागरीकांच्या मदती करीता सर्व सोयीयुक्त साहित्य (बोट/नाव) सुसज्ज करून आवश्यक त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात यावे, करीता भाजपा तर्फे निवेदन राहुल बा. पावडे जिल्हाध्यक्ष भाजपा महनगर, चंद्रपूर यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आले.

    Powered by myUpchar


    यावेळी भाजप महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्यासह भाजपा नेते रामपाल सिंग, प्रज्वल कडू, सुरज पेदुलवार, सविता कांबळे, संदिप आगलावे, पुरुषोत्तम सहारे, दिनकर सोमलकर, चांद सय्यद, शिला चव्हाण, मायाताई उईके,अजय सरकार, चंद्रकला सोयाय,अशा आबोजवार, जयश्री जुमडे, शितल आत्राम, प्रलय सरकार, रणजीत डवरे, सुनिल डोंगरे प्रमोद शिरसागर, महेश जिटे, मनीषा महातव, संजय निखारे,अमोल मते, यांची प्रामुख्याने उपस्थित होते.
    दरम्यान निवासी उपजिल्हाधिकारी यांनी भाजप शिष्टमंडळाला या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्यात येईल असे आश्वासन दिले.

  • teacher approval issue in Maharashtra । शाळांना मंजूर ‘शून्य शिक्षक’! अंधाधुंद निर्णयांनी शिक्षण व्यवस्था कोलमडली

    teacher approval issue in Maharashtra

    teacher approval issue in Maharashtra : चंद्रपूर : शैक्षणिक सत्र २०२४-२५ ची शिक्षक संचमान्यता राज्यातील बहुतांश शाळांना नुकतीच वितरीत करण्यात आलेली आहे. यात प्रामुख्याने संचमान्यतेत राज्यातील अनेक शाळांना शुन्य शिक्षक मंजूर झाल्यामूळे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्‍यामुळे दि. १५ मार्च २०२४ रोजीचा संचमान्यतेबाबतचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करण्याबाबत आमदार सुधाकर अडबाले यांच्या नेतृत्‍वात विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या कार्यालयासमोर नुकतेच एक दिवसीय विदर्भस्तरीय धरणे / निदर्शने आंदोलन करण्यात आले. zero teacher sanction schools in Maharashtra

    Powered by myUpchar

    चंद्रपुरात पेव्हर्स ची चोरी, आप ने केली तक्रार

    या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विमाशि संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांनी मंत्रालयात शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकजजी भोयर, प्रधान सचिव श्री. रणजीत देओल, उपसचिव श्री. तुषार महाजन यांची भेट घेऊन विषयाची गंभीरता लक्षात आणून दिली.

    zero teacher sanction schools in maharashtra

    दि. २८ ऑगस्ट २०१५ च्या शासन निर्णयानुसार यापूर्वीचे संच निर्धारण होत होते. त्याप्रमाणेच शैक्षणिक सत्र २०२४-२५ चे संच निर्धारण करण्यात यावे व दि. १५ मार्च २०२४ रोजीचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा अन्यायकारक शासन निर्णय रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने झालेल्या धरणे/ निदर्शने आंदोलनाचे निवेदन आमदार सुधाकर अडबाले यांनी शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकजजी भोयर, प्रधान सचिव श्री. रणजीत देओल यांना दिले व शिक्षकांवर अन्‍याय करणारा सदर शासन निर्णय रद्द करावा, अशी मागणी लावून धरली. 

  • FTK Water testing awareness in villages । 1400 गावांत शुद्ध पाण्यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

    FTK Water testing awareness in villages

    FTK Water testing awareness in villages : चंद्रपुर – राज्य शासनाच्या निर्देशानुसार ग्रामिण भागातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची रासायनिक व जैविक पाणी गुणवत्ता तपासणी करण्यासाठी दिनांक १२ मे ते ७ जून २०२५ या कालावधीत “क्षेत्रीय तपासणी संच (FTK)” संचा द्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. नागरिकांना सुरक्षित व स्वच्छ पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जिल्ह्यातील 1400 गावांमध्ये ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंग यांनी केले आहे. Jal Jeevan Mission water quality monitoring

    चंद्रपुरात भव्य तिरंगा रॅली

                           एफ.टी.के. संचाद्वारे पाणी गुणवत्ता तपासणी जनजागृती मोहीम ही ग्रामपंचायत विभाग, महिला व बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग व पाणी पुरवठा विभागाच्या सहभागातून यशस्वी केली जाणार आहे. या मोहीमेच्या जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंग यांचे हस्ते शुभारंभ करण्यात आला. यावेळी  जल जीवन मिशनचे प्रकल्प प्रमुख नुतन सावंत ,जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक कटारे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा गीरीश धायगुडे , वरीष्ट भुवैज्ञानीक लीना बाराहाते, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय धोटे, पाणी गुणवत्ता तज्ञ अंजली डाहुले तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता विभागातील सल्लागार व कर्मचारी  जिल्हास्तरीय शुभारंभाला उपस्थीत होते.

    पाण्याचे नमुने तपासणी होणार

    जैविक क्षेत्रीय तपासणी (एफ.टी.के.) संचाद्वारे गावांमध्ये जनजागृती अभियान राबविण्यासाठी सुरु झालेल्या मोहिमेतंतर्गत गावात पाणी तपासणी करण्यासाठी निवड केलेल्या व संकेतस्थळावर नोंदविलेल्या पाच महिलांची पडताळणी करणे, महिलांच्या पाणी गुणवता विषयक एफ.टी.के. किट  प्रशिक्षणाच्या नोंदी घेणे घरगुती नळ, अंगणवाडी, शाळा यांची पाणी नमुणे तपासणी केली जाणार आहे. या मुळे पाणी  तपासणीत महिलांची भूमिका महत्वाची व निर्णयक ठरणार असुन ही मोहीम गट विकास अधिकारी, आरोग्य विभागातील कर्मचारी, ग्रामसेवक यांनी   गावा गावात चांगली राबवावी असे  प्रतीपादन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंग यांनी केले. Field Test Kit training for women in Maharashtra

    गावात आठवी ते दहावीमधील विद्यार्थ्यांना एफ. टी. के. किटव्दारे पाणी तपासणीचे प्रात्यक्षिक देणे, वर्ग ८ ते १० मधील विद्यार्थ्यांमार्फत शाळा, अंगणवाड्या, घरगुती नळ जोडण्यामधील पाणी नमुने तपासणी करणे, डब्यूक्यूएमआयएस (WQMIS) पोर्टलवर नोंदी घेणे, नळ पाणी पुरवठा योजना स्त्रोत, घरगुती नळ जोडण्या, शाळा, अंगणवाड्यांची पाणी गुणवता तपासणी करण्यासाठी रासायनिक व जैविक एफ.टी.के.किट  वाटप करणे, तसेच स्थानिकांना पाणी गुणवत्ता तपासणी व त्यापासून होणारे फायदे सांगितले जाणार असल्याचे प्रकल्प संचालक नुतन सावंत यांनी सांगीतले. Jal Jeevan Mission water quality monitoring

                          दिनांक १९ ते २३ मे २०२५ या कालावधीत जनजागृती मोहिमेचा तालुकास्तरीय शुभारंभ गट विकास अधिकारी यांचे हस्ते करण्यात येणार आहे तर दि. २ जून ते ७ जून २०२५ कालावधीत मोहिमेची ग्रामपंचायत स्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल. या मोहिमेदरम्यान जिल्हयात क्षेत्रीय तपासणी संच (एफ.टी.के.) द्वारे पाणी पाणी गुणवत्ता तपासणी आणि व्यापक जनजागृती करण्यात येणार असल्याचे  जल जीवन मिशन चे प्रकल्प संचालक नुतन सावंत  यानी सांगीतले .

  • land acquisition issues in Maharashtra । स्थानिक शेतकऱ्यांचे रक्षण हेच प्राधान्य – खासदार प्रतिभा धानोरकर

    land acquisition issues in Maharashtra

    शेतकऱ्यांच्या भूमीसाठी लढा! खासदार धानोरकरांची नागपूर बैठक ठरली निर्णायक

    land acquisition issues in Maharashtra : चंद्रपूर – वणी क्षेत्रातील गाडेगाव, खैरगाव, टाकळी, चिखली आणि सोनुर्ली या गावांमधील शेतकऱ्यांची जमीन पैनगंगा प्रकल्पाच्या अनुषंगाने अधिग्रहित करण्यात आली आहे. मात्र, काही शेतकऱ्यांच्या जमिनी अद्याप अधिग्रहण प्रक्रियेत समाविष्ट झालेल्या नाहीत.

    यामुळे भविष्यात त्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, तसेच त्यांना आर्थिक व सामाजिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

    या पार्श्वभूमीवर, चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार मा. प्रतिभाताई धानोरकर यांनी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे (वेकोली) व्यवस्थापकीय संचालक जयप्रकाश द्विवेदी यांच्याशी नागपूर येथे बैठक घेऊन चर्चा केली. Western Coalfields land acquisition news

    नरभक्षक वाघिणीचा बछडा जेरबंद

    या बैठकीस काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे, निदेशक (कार्मिक) हेमंत पांडे, जी.एम. (आयआर), जी.एम. (भुराजस्व) तसेच संबंधित भूधारक शेतकरी उपस्थित होते.

    शेतकऱ्यांच्या शिल्लक जमिनीचे अधिग्रहण करा

    बैठकीदरम्यान खासदार धानोरकर यांनी लेखी मागणी सादर करत स्पष्ट केले की, वणी क्षेत्रातील उकणी खंड क्र. 1 ची जमीन नीलजई डीप विस्तार प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यासंदर्भात चर्चा झाली असून, पैनगंगा प्रकल्पाच्या अनुषंगाने वरील गावांतील शेतकऱ्यांच्या शिल्लक जमिनीही तातडीने अधिग्रहित करण्यास परवानगी देण्यात यावी.

    खासदार धानोरकर म्हणाल्या, “स्थानिक शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणे हे माझे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे या संदर्भात तात्काळ निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या दूर कराव्यात.”

    Powered by myUpchar

    या बैठकीत वेकोली कामगारांच्या पदस्थापना, रोजगार आणि शैक्षणिक पात्रतेनुसार नेमणूक या मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा झाली. वेकोलीच्या व्यवस्थापनाने या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक कारवाई केली जाईल, असे आश्वासन यावेळी दिले.

  • amrut scheme water supply problems । अमृत योजनेचा फटका; पाणी नाही, जनता आहे त्रस्त!, आपने दिला आंदोलनांचा इशारा

    amrut scheme water supply problems

    amrut scheme water supply problems : चंद्रपूर – बाबुपेठ परिसरातील आंबेडकर नगर प्रभागात पाण्याच्या तीव्र टंचाईने नागरिक त्रस्त झाले असून, अमृत योजनेअंतर्गत पाणी मिळावे यासाठी त्यांनी प्रशासनाला जोरदार हाक दिली आहे. अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा न झाल्याने जनतेचे हाल सुरू असून, मूलभूत सुविधेसाठी त्यांना रस्त्यावर उतरण्याची वेळ येत आहे.

    पडोली मध्ये १ कोटी रुपयांची आधुनिक अभ्यासिका

    या गंभीर परिस्थितीबाबत आम आदमी पक्षाचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे यांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधींवर टीकेची झोड उठवली आहे. “स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्र्याकडून बाबुपेठ वर वीज पाण्याची सर्जिकल स्ट्राईक सुरु आहे, प्रशासकीय अधिकारीही या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत,” असा आरोप राजू कुडे यांनी केला आहे. aam aadmi party water protest

    तर तीव्र आंदोलन करणार

    राजू कुडे पुढे म्हणाले, “अमृत योजनेसाठी कोट्यवधींचा खर्च झाल्याचे सांगितले जाते, मात्र प्रत्यक्षात नागरिकांना एक थेंब पाणी मिळत नाही. ही दुर्दैवी आणि लज्जास्पद गोष्ट आहे.” त्यांनी प्रशासनाला इशारा दिला की, जर लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास आम आदमी पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.

    विशेष म्हणजे, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच महाराष्ट्र विधानसभेत चंद्रपूर महानगरपालिकेतील ९० टक्के अमृत योजनेचे काम पूर्ण झाल्याचे स्पष्ट वक्तव्य केले होते. परंतु या वक्तव्यानंतरही प्रत्यक्षात आंबेडकर नगरसारख्या भागात नागरिकांना एका थेंब पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, ही बाब खेदजनक आणि खोट्या विकासाच्या दाव्यांचा पर्दाफाश करणारी आहे.

    Powered by myUpchar

    स्थानिक नागरिकांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत पाण्याविना रोजचे जगणे कठीण झाल्याचे सांगितले. महिलांना, वृद्धांना आणि लहान मुलांना या टंचाईचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असून येणाऱ्या महानगरपालिकेचा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना धडा शिकवू असे ते म्हणाले.

    आतातरी या गंभीर समस्येकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी लक्ष देतील का, याकडे आता जनतेचे लक्ष्य लागले आहे.

  • ndps act chandrapur arrest । चंद्रपुरात ओसाड कॉलेजचं मैदान की ड्रग्सचा अड्डा? शहर पोलिसांची कारवाई!

    ndps act chandrapur arrest

    ndps act chandrapur arrest : चंद्रपूर शहरातील बाबुपेठ प्रभागामध्ये ओसाड पडलेले डीएड कॉलेजच्या मैदानात अंमली पदार्थाची विक्री काळोखात सुरु आहे, यावर चंद्रपूर शहर पोलिसांनी कारवाई सत्र राबवित २४ वर्षीय युवकाला एमडी ड्रग्स पावडर सहित अटक करीत तब्बल १ लाख १५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. 24 year old arrested with md drugs

    वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही

    चंद्रपूर जिल्हा दारूबंदी व दारूबंदी उठल्यानंतर च्या काळात जिल्ह्यात अंमली पदार्थाची तस्करी व सेवन करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले होते मात्र आजही अंमली पदार्थाची तस्करी पोलीस प्रशासन थांबवू शकलेले नाही.

    तत्कालीन पोलीस अधीक्षक रवींद्र परदेशी यांनी शहर व जिल्ह्यातील ओसाड पडलेल्या ठिकाणावर सर्च मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होती, त्यावेळी पोलिसांनी अनेक अवैध धंदे उघडकीस आणले. मात्र पोलीस अधीक्षकांची बदली झाल्यावर हि कारवाई थंडबस्त्यात गेली, त्यामुळे ओसाड पडलेल्या ठिकाणी पुन्हा अवैध धंद्याची वर्णी लागली.

    गुन्हेगारीचा अड्डा

    चंद्रपूर शहरातील सर्वात मोठा प्रभाग म्हणून बाबुपेठ च नाव आहे, या प्रभागात शासकीय अध्यापक विद्यालयाचे मैदान आहे, कालांतराने शिक्षण क्षेत्रात झालेल्या बदलणे शासकीय अध्यापक विद्यालयात विद्यार्थी संख्या कमी झाल्याने प्राध्यापक आपली वसाहत सोडून गेले, आणि हीच वसाहत पुढे चालून गुन्हेगारीचा अड्डा बनली.

    १५ मे रोजी चंद्रपूर शहर पोलिसांना या एमडी ड्रग्स विक्री बाबत गोपनीय माहिती मिळाली होती, माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली असता त्याठिकाणी संशयास्पद तरुणाला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याच्याजवळ एमडी पावडर आढळले.

    २४ वर्षीय तरुणाला झटपट पैसे कमविण्याचा चस्का

    आरोपी २४ वर्षीय महेश सुबोध बाला राहणार जुनोना चौक, बाबुपेठ याच्याजवळून ९.०४० ग्राम एमडी पावडर किंमत ४५ हजार व दुचाकी क्रमांक एमएच ३४ सीई ७१९५ असा एकूण १ लक्ष १५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी आरोपी बाला वर NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करीत अटक केली. md drugs in chandrapur

    Powered by myUpchar

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छीरे, पोलीस कर्मचारी भावना रामटेके, सचिन बोरकर, संतोष कणकम, संजय धोटे, कापूरचंद खरवार, इम्रान खान, इर्शाद खान, दिलीप कुसराम, राजेश चिताडे, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, सारिका गौरकार, दीपिका झिंगरे यांनी केली. प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक राहुल ठेंगणे करीत आहे.

  • PMGSY bridge projects 2025 । पूल झाला मंजूर, वाट बदलणार गावाची! PMGSY प्रकल्प 2025 ला गती

    PMGSY bridge projects 2025

    PMGSY bridge projects 2025 : चंद्रपूर : करंजी आणि खराळपेठ या दोन महत्वाच्या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाच्या बांधकामाला आज मूर्त स्वरूप प्राप्त झाले. खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या अथक प्रयत्नांमुळे साकार होणाऱ्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन आज संपन्न झाले. या कार्यक्रमामुळे परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे.

    वाहतूक नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही

    प्रधानमंत्री ग्राम सडक योजना – III अंतर्गत १८१.४७ लक्ष रुपये निधीतून साकारल्या जाणाऱ्या ३२.३०० मीटर लांबीच्या या पुलाचे भूमिपूजन खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते झाले. या महत्त्वपूर्ण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून तालुका काँग्रेस अध्यक्ष देविदास सातपुते, तालुका काँग्रेस माजी अध्यक्ष तुकाराम झाडे, तालुका महिला काँग्रेस अध्यक्षा सोनी दिवसे, देविदास भट्टे, विपीन पेद्दीलवार , सीन्नू कन्नमनूरीवार, गौतम झाडे, राजू झाडे, गेडेकर ताई, विनोद नागपुरे, बालाजी चंनकापुरे, साईनाथ कोडापे, विनोद जगताप यांच्यासह परिसरातील अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. Chandrapur development news

    chandrapur development news

    गैरसोय आता दूर होणार

    या भागातील नागरिकांसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरला, कारण अनेक वर्षांपासूनची त्यांची मागणी आज पूर्णत्वास आली आहे. करंजी आणि खराळपेठ या दोन महत्त्वाच्या गावांमधील वाहतूक या पुलामुळे अधिक सुलभ होणार असून, पावसाळ्यामध्ये होणारी गैरसोय आता दूर होणार आहे.

    Powered by myUpchar

    या प्रकल्पाबद्दल बोलताना खासदार प्रतिभाताई धानोरकर म्हणाल्या, “आज या पुलाचे भूमिपूजन होत आहे याचा मला विशेष आनंद आहे. करंजी आणि खराळपेठ परिसरातील नागरिकांना या पुलामुळे मोठी सोय होणार आहे. पावसाळ्यात अनेकदा या मार्गावरील वाहतूक थांबते, ज्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. हा पूल पूर्ण झाल्यावर त्यांची ही समस्या कायमची दूर होईल.” Bridge Construction Karanji-Kharalpeth Chandrapur

    या भूमिपूजन सोहळ्याला परिसरातील नागरिक, कार्यकर्ते आणि प्रशासकीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • district road safety committee meeting । 👮 विना हेल्मेट, चुकीचे स्पीड ब्रेकर, ब्लॅक स्पॉट्स – आता थेट कारवाई!

    district road safety committee meeting

    district road safety committee meeting : चंद्रपूर – रस्त्यांवरील अपघात कमी व्हावे, वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी  यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.15) आढावा घेतला.

    या दिवशी चंद्रपुरातील नागरिकांची सावली सोडणार साथ

    जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, अक्षय पाझारे, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, वाहतूक निरीक्षक प्रवीणकुमार पाटील, राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रण स्मिता सुतावणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे आदी उपस्थित हेाते. traffic rules awareness programs

    विना हेल्मेट वाहन चालविणाऱ्यावर कारवाई करा

    यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, महामार्गावर विना हेल्मेट वाहन चालविणा-यांविरुध्द कारवाई करावी. रस्त्यावरील गतिरोधक (स्पीड ब्रेकर) मानद नामांकनाप्रमाणेच लावावे, विना परवानगी कुठेही स्पीड ब्रेकर लावू नये. रस्त्याच्या बाजुला मुरुम किंवा माती टाकून साईड शोल्डर तयार करावेत. जेणेकरून वाहन खाली उतरुन अपघात होणार नाही. ज्या ठिकाणी अपघातांची संख्या जास्त आहेत,

    Powered by myUpchar

     तेथे असे साईड शोल्डर तातडीने तयार करावे. वाहतुकीच्या नियमांबाबत शाळा – महाविद्यालयांमध्ये पोलिस विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतुक विभागाने संयुक्त जनजागृतीपर कार्यक्रम घ्यावे. अपघात प्रवण स्थळावर (ब्लॅक स्पॉट) तातडीच्या तसेच दीर्घकालीन उपाययोजना कराव्यात. रस्त्याच्या बाजुला उभ्या असलेल्या वाहनांवर कडक कारवाई करावी, अशा सुचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केल्या.

    अधिक्षक अभियंता अरुण गाडेगोणे यांनी सादरीकरण केले. यात वाहतूक सिग्नल, अपघातांची संख्या, स्पीड ब्रेकर, रस्त्यावरील खड्डे, विविध ठिकाणी संयुक्त भेटी आदींचा आढावा घेण्यात आला.