police caught man with desi katta । चंद्रपुरातील सहारा पार्क परिसरात सापळा – देशी कट्ट्यासह युवक अडकला

police caught man with desi katta

police caught man with desi katta : १७ मे रोजी शहर पोलीस हद्दीत २४ वर्षीय युवकाला देशी कट्टा व जिवंत काडतूस सहित पोलिसांनी अटक केली. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छीरे यांना गोपनीय माहिती मिळाली होती कि एक इसम राजनगर, सहारा पार्क आरवट रोड चंद्रपूर येथे देशी कट्टा घेऊन येणार आहे.

चंद्रपुरात पेटली देशभक्तीची ज्वाला, ५ किलोमीटर लांब तिरंगा यात्राने वेधले लक्ष

माहिती मिळताच शहर पोलिसांचे गुन्हे शोध पथक राजनगर येथील सहारा पार्क जवळ पोहचले, संशयास्पद स्थितीमध्ये वावरत असलेल्या एका इसमाला सापळा रचून शहर पोलिसांनी अटक केली, २४ वर्षीय रोहित उर्फ मोनू राजकपूर कातकर राहणार विचोडा रयतवारी पडोली मध्ये राहणारा आहे.

आरोपीवर रेकॉर्डवरील नाही पण देशी कट्टा का?

पोलिसांनी आरोपी रोहित जवळून एक देशी कट्टा व २ जिवंत काडतुसे जप्त करीत त्याच्यावर भारतीय शस्त्र अधिनियम अन्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष बाब म्हणजे आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार नाही, मात्र त्याने देशी कट्टा का घेतला व कुणापासून घेतला याबाबत शहर पोलीस तपास करीत आहे. illegal arms in Chandrapur area

Powered by myUpchar

सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधीक्षक सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात गुन्हे शोष पथकातील पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छीरे, पोलीस कर्मचारी सचिन बोरकर, भावना रामटेके, संजय धोटे, संतोष कनकम, कपूरचंद खरवार, विक्रम मेश्राम, रुपेश पराते, इम्रान खान, दिलीप कुसराम, इर्शाद खान, सारिका गौरकार व दीपिका झिंगरे यांनी केली.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *