Tag: News34 chandrapur

  • News 34 impact । News 34 चा दणका! बातमीनंतर गडचांदूर पोलिसांची धडक कारवाई

    News 34 impact

    News 34 impact : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या सट्टा पट्टी जुगारावर गडचांदूर पोलिसांनी कारवाई केली. याबाबत News34 ने दोनदा सट्टापट्टी व जुगार खेळताना फोटो सहित बातमी प्रकाशित केली होती. Gadchandur satta patti gambling raid


    2 मे रोजी लक्ष्मी टॉकीज परिसरात जुगार व सट्टा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती गडचांदूर पोलिसांना मिळाली होती. लक्ष्मी टॉकीज जवळ काही इसम हे एकाला पैसे देत सट्टापट्टी जुगार खेळताना आढळली.
    पोलिसांनी सापळा रचून एकाला पकडले, पोलिसांनी चौकशी केली असता सदर इसमाने आपले नाव 35 वर्षीय सचिन रामकिशन चितकुंटलवार राहणार गडचांदूर कोरपना असे सांगितले.
    पोलिसांनी चितकुंटलवार ची अंगझडती घेतली असता 800 रुपये रोख व सट्टापट्टीचे आकडे लिहलेल्या चिठया आढळल्या. News34 report on Gadchandur gambling

    चंद्रपूर जिल्ह्यात वाघाने केली १३ नागरिकांची शिकार


    पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीवर महाराष्ट्र जुगार कायद्यांव्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी सूरज ढोले यांनी केली.


    बातम्या प्रकाशित
    गडचांदूर शहर हे औद्योगिक शहर असल्याने याठिकाणी बाहेरील कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी येतो, या मजूर वर्गाचे आर्थिक शोषण करीत बेकायदेशीर रित्या सट्टापट्टी चालविल्या जात असल्याची व त्यामागील सूत्रधार कोण अशी बातमी News34 ने प्रकाशित केली. उशिरा का होईना पण पोलिसांना अखेर जाग आली. येणाऱ्या काळात लक्ष्मी टॉकीज परिसरात किंवा इतर भागात असले धंदे सुरू झाले तर त्याबाबत सुद्धा बेधडकपणे बातमी प्रकाशित करण्यात येणार.

  • BJP supports caste based census । जातिनिहाय जनगणना लोकशाहीस बळकटी देणारी – राहुल पावडे

    BJP supports caste based census

    मोदी सरकारच्या जातिनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे चंद्रपूरमध्ये जल्लोषात स्वागत!

    BJP supports caste based census : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आता जातिनिहाय जनगणना करणार आहे. याबाबत कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात आला.या निर्णयामुळे लोकशाही मजबूत होईल.देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर पहिल्यांदाच जातीनिहाय जनगणना होणार आहे.या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो,असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष(श)राहुल।पावडे यांनी केले. Narendra Modi caste census decision 2025

    जातीय जनगणनेच्या निर्णयाचे आमदार जोरगेवार यांनी स्वागत करीत वाटले पेढे


     चंद्रपूर भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवारी (दि.2) सायंकाळी गांधी चौक येथे निर्णयाचे स्वागत करून जल्लोष करतांना ते बोलत होते.

    माजी पालकमंत्री व बल्लारपूर विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुधीर  मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष राहुल पावडे यांच्या नेतृत्वा हे आयोजन करण्यात आले. यावेळी फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.मोदी हैं तो मुमकींन हैं अशी घोषणाबाजी करण्यात आली.


     कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी महानगर अध्यक्ष राहुल पावडे, ओबीसी नेते अशोक जीवतोडे, सुरज पेदुलवार,भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष सविता कांबळे,शीला चव्हाण, नम्रता टेमसकर,पुरुषोत्तम सहारे, रवी लोणकर, दिनकर सोमलकर, सचिन कोतपल्लीवार,शिला चव्हाण, चाद सय्यद, रवी सहारे, मनीषा महातव, शाम कनकम, सारिका संदुरकर, मधुकर राऊत, प्रवीण गुरमवार, महेश जीटे, बी बी सिंग,बाळू कोलनकर, कैलास संगेवार, मुन्ना अलटम,दीपक प्रलय सरकार, महेंद्र जुमडे, आकाश मस्के, आकाश ठोसे,  कविता जाधव, राजेंद्र खांडेकर, प्रदीप किरमे, गणेश गेडाम, अनिल सुरपाम, प्रमोद शास्त्रकार, पराग मलोडे, उपस्थित होते.

  • Kishor Jorgewar supports caste census initiative । किशोर जोरगेवार: जातीय जनगणना समाजातील वंचित घटकांना न्याय देईल

    Kishor Jorgewar supports caste census initiative

    पडोली आणि घुग्घूस मध्ये लाडू वाटपाने जल्लोष; मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत

    Kishor Jorgewar supports caste census initiative : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने घेतलेला जातीय जनगणनेचा ऐतिहासिक निर्णय हा समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा, सर्वसमावेशक विकासाला चालना देणारा आणि सामाजिक समतोल प्रस्थापित करणारा आहे, असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पडोली आणि घुग्घूस येथे लाडू वाटप करून जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार बोलत होते. BJP celebrates caste census decision in Chandrapur

    रेल्वे अतिक्रमण धारकांना दिलासा मिळणार

    या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष दशरथ ठाकूर, नेते नामदेव डाहुळे, प्रकाश देवतळे, संजय तिवारी, नीता चौधरी, इमरान खान, राकेश पिंपळकर, दयानंद नागरकर, आशिष मासिरकर, आशिष वाढई, सुभाष पिंपळकर, विजय आगरे, अजय कार्लेकर, रमेश बुच्चे, रमाकांत बलकी, सुरेश पिदुरकर, डॉ. दशरथ झाडे, दुर्गा बावणे, मीना मानुसमारे, रजनी ढुंगणे, ममता मोरे, शितल कोटा, नकुल वासमवार, कोसारा गावचे माजी सरपंच गुड्डू सिंग, उषा आगदारी, सुचिता लुटे, अनिल बाम, श्याम आगदारी, महेश डोंगरे, निरीक्षण तांड्रा, संतोष नुने, जय मिश्रा आदींची प्रमुख उपस्थिती होती. Caste census celebration in Padoli and Ghugghus

    bjp leaders distribute sweets for caste census approval

    बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, जातीय जनगणनेच्या माध्यमातून समाजाच्या प्रत्येक घटकाला ओळख मिळणार असून त्यांच्या अडचणी व गरजा समजून घेऊन योजनांची आखणी करता येणार आहे. आजवर अनेक सरकारांनी जातीवर आधारित आकडेवारीची मागणी फक्त घोषणा आणि आश्वासनांपुरती मर्यादित ठेवली. मात्र केंद्रातील भाजप सरकारने प्रत्यक्षात हे पाऊल उचलून समाजातील वंचित, शोषित घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याची दिशा स्पष्ट केली असल्याचे ते यावेळी म्हणाले.यावेळी ‘मोदी सरकार जिंदाबाद’, ‘सामाजिक न्यायाचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.कार्यक्रमात नागरिकांना लाडू वाटप करून निर्णयाचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • Pratibha Dhanorkar on Irai River desilting । इरई नदी खरंच वाचणार? धानोरकरांच्या प्रश्नांनी प्रशासनाला घेरले

    Pratibha Dhanorkar on Irai River desilting

    Pratibha Dhanorkar on Irai River desilting : चंद्रपूर : इरई नदी ही चंद्रपूर शहराची जीवनदायिनी आहे. मात्र, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ही नदी सद्यस्थितीत मरणासन्न अवस्थेत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या नदीच्या खोलीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ही बाब निश्चितच अभिनंदनीय आहे. मात्र, आजपर्यंत पार पडलेले चार अभियान अपयशी ठरले आहेत. त्याप्रमाणे हे अभियानसुद्धा केवळ फार्स ठरू नये, अशी शंका खासदार प्रतिभा धानोरकर यांनी व्यक्त केली आहे. Irai River Chandrapur desilting project

    मुनगंटीवार यांनी पूर्ण केला शब्द


    इरई नदी ही चंद्रपूर शहराला ९ किलोमीटर समांतर वाहते. त्यानंतर पुढे ही नदी १७ किलोमीटर अंतरावर वर्धा नदीला जाऊन मिळते. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र, वेकोलिच्या खाणीतील ओव्हरबर्डनमुळे नदीचे पात्र उथळ झाले आहे. नदी पात्रात झाडे झुडपे वाढली आहेत. त्यामुळे या नदीच्या खोलीकरणाचे अभियान २०१५ मध्ये जिल्हा प्रशासनाच्यावतीने पहिल्यांदा राबविण्यात आले. त्यानंतर तीनवेळा हे अभियान राबविण्यात आले. कोट्यवधींचा निधी खर्च झाला. परंतु, नदीचे खोलीकरण, सौंदर्यीकरण झाले नाही.

    आता पुन्हा प्रशासनाने खोलीकरण अभियान सुरू केले आहे. लोकसहभागातून हे अभियान ४५ दिवस राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी जाहीर केले आहे. त्यानंतरही महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने या कामासाठी   यंत्रसामग्री साठी निविदा मागविल्या आहेत. त्यामुळे हे अभियान लोकसहभागातून आहे की जिल्हा प्रशासनाकडून हा सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे. जिल्हा प्रशासनाने हे अभियान केवळ प्रसिद्धीसाठी इव्हेंट करू नये. प्रत्यक्षात नदीचे खोलीकरण होऊन नदीचे पुनरूज्जीवन व्हावे, अशी प्रत्येक चंद्रपूरकरांची अपेक्षा असल्याचेही खासदार धानोरकर म्हणाल्या.
    —
    वाळू चोरट्यांचे काय…?

    जिल्हा प्रशासनाने इरई नदी खोलीकरणाचे अभियान धुमधडाक्यात सुरू केले आहे. तर, दुसरीकडे वाळूतस्करांनी नदीला अक्षरशः पोखरून काढले आहे. शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या नदीचा ओरबडले जात असताना अधिकाऱ्यांच्या निदर्शनास हा प्रकार येऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यातून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाशिवाय वाळू चोरट्यांची हिंमत वाढली नसावी, अशीही शंका या निमित्ताने येते. त्यामुळे प्रशासनाने खोलीकरणाच्या कामासोबत नदीला ओरबडणाऱ्या वाळूतस्करांवर कारवाई करावी, अशीही मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे. sand mining Irai River Chandrapur illegal

  • Pombhurna agriculture office inauguration । मुनगंटीवारांनी पूर्ण केला शब्द! पोंभुर्ण्यात सुसज्ज कृषी कार्यालयाचे उदघाटन

    Pombhurna agriculture office inauguration

    Pombhurna agriculture office inauguration : चंद्रपूर – पोंभुर्णा येथील नवीन कृषी कार्यालयाच्या माध्यमातून कृषी विभागाचे कार्य अधिक प्रभावीपणे पार पडेल आणि शेतकऱ्यांना अधिक सक्षम सेवा मिळतील, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राचा जयजयकार करण्यासाठी कृषी क्षेत्र हे सर्वात महत्त्वाचे माध्यम आहे. त्यामुळे शेती हा मजबुरीचा नव्हे तर मजबुतीचा व्यवसाय व्हावा, असे आवाहनही आ. श्री. मुनगंटीवार यांनी केले. आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते पोंभुर्णा येथील कृषी कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी ते बोलत होते. Sudhir Mungantiwar Pombhurna agriculture office

    sudhir mungantiwar pombhurna agriculture office

    नीट परीक्षेला जाताना काळजी घ्या

    पोंभुर्णा येथे तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची इमारत आधुनिक आणि देखणी व्हावी यासाठी स्थानिक शेतकरी आणि या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आपले म्हणणे मांडले होते. तालुका ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णाच्या इ‌मारतीच्या लोकार्पण सोहळयाप्रसंगी ही तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची नवी इमारत व्हावी यासाठी निवेदन दिले. जनसमस्यांना तातडीने सोडवण्यासाठी तत्पर असलेले आ. सुधीर मुनगंटीवारांनी त्याच कार्यक्रमात सुंदर व सुसज्ज इ‌मारत बांधण्याची घोषणा केली होती. केवळ घोषणा करून ते थांबले नाहीत, तर या तालुका कृषी अधिकारी कार्यालय इ‌मारत बांधकामाला प्रशासकीय मान्यात देत त्यासाठी 249.95 लक्ष रूपयांचा निधीही मंजुर केला. आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते याच सुसज्ज इमारतीचे लोकार्पण झाले. त्यामुळे ‘दिला शब्द केला पूर्ण’ याची आ. श्री. मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा प्रचिती दिली. new agriculture office in Pombhurna benefits

    यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, प्रदेश महामंत्री अल्काताई आत्राम,अधीक्षक अभियंता (विद्युत) पुनम वर्मा,  सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, तहसीलदार रेखा वाणी, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड, गटविकास अधिकारी विवेक बेलालवार, नगराध्यक्ष सुलभाताई पिपरे, उपनगराध्यक्ष अजीत मंगळगिरीवार, राहुल संतोषवार, बंडू गोरकार, रवींद्र मरपल्लिवार आदींची उपस्थिती होती. Sudhir Mungantiwar Pombhurna agriculture office

    आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्यासाठी कृषी विभाग कार्य करीत आहे. यासाठी सर्वप्रथम चंद्रपूरचं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासाठी निधी उपलब्ध करून दिला. शेतकऱ्यांच्या प्रगती व उत्पन्न वाढीसाठी कृषी अधिकारी योग्य ते मार्गदर्शन करेल आणि या कार्यालयाच्या माध्यमातून कृषी अधिकारी शेतकरी बांधवांचे मनापासून सेवा करेल.’ agriculture department Pombhurna services

    बाजार समिती महाराष्ट्रात सर्वोत्तम करण्याचा मानस
    शेतकऱ्यांच्या प्रगीतीसाठी मी सदैव पुढाकार घेतला आहे. बल्लारपूर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती उभारणीसाठी मान्यता घेतली असून बल्लारपूरची कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रात सर्वात उत्तम करण्याचा मानस आहे, असेही आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

    new agriculture office in pombhurna benefits

    शेतकऱ्यांसाठी सदैव पाठीशी
    पोंभुर्णा तालुक्यामध्ये धडक सिंचन विहीर, मागेल त्याला विहिरी दिल्या. कृषी क्षेत्रातील तांत्रिक आणि सखोल ज्ञान मिळावे यासाठी मुलमध्ये नवे कृषी महाविद्यालय उभे राहत आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या माध्यमातून 15 ते 20 कोटी रुपये खर्च करून कृषी क्षेत्राशी संबंधित कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र चंद्रपुरात होत आहे. कृषी क्षेत्रात चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याला  प्राधान्य दिले आहे. बंधारे, माजी मालगुजारी तलाव, धडक सिंचन विहिरी, मागील त्याला सिचंन विहीर दिल्या, याचा उल्लेख करून राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिला. benefits of agriculture office for farmers

    202 कोटींच्या पीक विम्याचे वाटप
    मुंबईमध्ये मूल व पोंभुर्णा तालुक्यातील पिकवलेला तांदूळ मोठ्या प्रमाणात विकला जातो. कृषी क्षेत्रामध्ये सामूहिक शेती तसेच पोखराच्या माध्यमातून पुढे जाण्याची आवश्यकता आहे. पुढील महिन्यापर्यंत धानाचा 1800 कोटी बोनस प्राप्त होणार आहे. शिवाय पोंभुर्णा तालुका येत्या पाच ते दहा वर्षात पोंभुर्णा आणि गोंडपिपरीच्या  मध्ये 30 हजार एकरवर एमआयडीसी उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे, असेही आ. श्री. मुनगंटीवार यांनी सांगितले. आतापर्यंत 202 कोटींच्या पीक विम्याचे वाटप करण्यात आल्याचाही त्यांनी उल्लेख केला.

  • MSEDCL employee awards । चंद्रपूर व गडचिरोली विभागाचे ३६ कर्मचारी ठरले ‘गौरवशाली कामगार’

    MSEDCL employee awards

    MSEDCL employee awards : चंद्रपूर – महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळातील सर्व कार्यालयात १ मे रोजी गुरुवारला महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महावितरणच्या बाबुपेठ येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात मुख्य अभियंता हरिश गजबे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. तर जागतिक कामगार दिनानिमित्त वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी कारणाऱ्या ३६ उत्कृष्ट तांत्रिक कर्मचाऱ्यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. Chandrapur MSEDCL news

    जंगल जमीन हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय – शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?


    यावेळी चंद्रपुर मंडळाच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे, अधिक्षक अभियंता (पायाभुत आराखडा) रमेश सानप, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) (प्र.) सुशिल विखार, चंद्रपुर विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर दारव्हेकर, बल्लारशा विभागाचे सत्यदेव पेगल्लापट्टी चाचणी विभाग योगेंद्र निचत वरिष्ठ व्यवस्थापक (विवले) राकेश बोरीवार, यांच्यासह अधिकारी, आभियंते व कर्मचारी उपस्थित होते. Best MSEDCL workers in Chandrapur

    सत्कारमूर्ती कर्मचाऱ्यांमध्ये चंद्रपूर मंडळ कार्यालयाचे ३ यंत्रचालक व १५ तांत्रिक कर्मचारी तर गडचिरोली मंडळ कार्यालयातील ३ यंत्रचालक व १५ तांत्रिक कामगारांचा समावेश आहे. यामध्ये कपिल कावळे, संजय तपासे, सुरज पोहिनकर, संदिप नगराळे, विजयकुमार सोंडवले, आकाश देवगडे, मनोज गराडे, महादेव सलाम, रुक्सार अब्दुलरफिक शेख, आशा भगतकर, संजय येरणे, शहिद नौशद मोहम्मद सलिम शेख, निलेश लोदेल्लिवार, गणेश इंदुलवार, जितेंद्र बंसोड, सुधीर चौधरी, दिलीप येरमा, विलास धाकडे, पवन बोरकुटे, आकाश बांबोळे, मोहम्मद निसार शेख, सागर घोरपडे, नितेश श्रीराम, योगेश्वर कोवे, शंकर गेडाम, अमित परचाके, रितेश गाईन, विजय दिवठे, गणेश बुलबुले, विकास घरत, सचिन पेटकर, नितिन कांबळे, नितीन सोनकुसरे, दिनेश मेश्राम, जितेंद्र शहारे यांचा समावेश आहे.

  • Forest land removal from records Maharashtra | जंगल जमीन हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय – शेतकऱ्यांना दिलासा मिळणार?

    Forest land removal from records Maharashtra

    Forest land removal from records Maharashtra : चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील, जिवती तालुका वन क्षेत्रातून वगळण्याबाबत तसेच बरांज 1 ते 4, मानोराडिप -किलोनी कोळसा खाणीकरिता चिचोर्डी या गावातील संपादन न झालेल्या उर्वरित 185 हेक्टर जमिनीच्या संदर्भात राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी नुक्तीच मुंबई येथील सह्याद्री शासकीय विश्रामगृह येथे सुनावणी घेतली. या दोन्ही प्रकरणात तातडीने निर्णय घेऊन हे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना केल्या. Tribal land rights issue in Jivati taluka

    आपच्या सुराज्य मोहिमेचा चंद्रपूरातून शुभारंभ

    सदर सुनावणीस,डॉ. रविकिरण गोवेकर,मुख्य वनसंरक्षक,अवर सचिव,महाराष्ट्र राज्य हे   उपस्थित होते .यावेळी माजी आमदार एड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, माजी आमदार, अरुण म्हस्की, निलेश ताजने, विशाल दुधे यांची उपस्थिती होती. तालुक्यातील सर्व महसुली गावे व 44 हजार हेक्टर क्षेत्रात वन जमिनीची नोंद असल्याने या तालुक्यातील शेतकऱ्यांचे तसेच सर्वसामान्य नागरिकांचे जीवन बर्बादीच्या मार्गावर आले आहे त्यांना योग्य न्याय देऊन त्यांची सामाजिक स्थिती बदलण्याच्या आवश्यकतेवर भर देताना अहिर यांनी वन जमिनीची नोंद असलेली गावे व जमिनी या नोंदीतून मुक्त करण्याकरिता त्वरित निर्णय घेण्याचे  निर्देश दिले. सन 2015 मध्ये जारी करण्यात आलेले महसूल व वन विभागाचे पत्र परत घेऊन या ज्वलंत समस्येवर निर्णायक मार्ग काढण्याविषयी या सुनावणी मध्ये सविस्तर चर्चा पार पडली. Forest land dispute Maharashtra 2025

     वर्ष 2015 मधील सदर पत्र परत घेण्याबाबत वन विभागाचे कोणतेही आक्षेप नसल्याचे अधिकाऱ्यांनी बैठकी दरम्यान सांगितले. जिवती तालुक्यातील हजारोच्या संख्येतील अन्य मागासवर्गीय तसेच इतर नागरिकांचा हा अत्यंत ज्वलंत प्रलंबित प्रश्न असल्याने व त्यांना न्याय देण्याची शासनाची जबाबदारी असल्याने त्यांच्यावर वर्षानुवर्षे होणारा अन्याय दूर करण्यास तातडीने पाऊले उचलण्याच्या सूचना हंसराज अहिर यांनी सुनावणीस उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांना केल्या. Hansraj Ahir tribal land hearing

    बरांज 1 ते 4, मानोराडिप -किलोनी कोळसा खाणीकरिता अधिग्रहित एकूण 1379.50 हेक्टर जमिनी पैकी चिचोर्डी या गावातील एकूण 298.05 हेक्टर लिजप्राप्त जमीनी पैकी फक्त 112.87 हेक्टर जमिनीचे संपादन KPCL कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले. चिचोर्डी येथील उर्वरित 185 हेक्टर जमीन अधिग्रहणाविषयी या पूर्वी झालेला बैठकीतून दिलेल्या सूचनावर कार्यवाही बाबत माहिती देताना संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की प्रधान सचिव कर्नाटक व महाराष्ट्र शासन यांच्या दरम्यान झालेल्या पत्र व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर लवकरच उर्वरित जमिनीच्या अधिग्रहणाबाबत सीबी आक्ट 1957 अनुसार चीचोर्डी येथील 185 हेक्टर जमीन अधिग्रहण बाबत प्रक्रिया राबविण्या करिता आवश्यक ती कार्यवाही करण्याची ग्वाही उपस्थित अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. Jivati taluka farmers land problem

    सदर सुनावणी पश्चात अहिर यांनी माननिय मुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांची भेट घेवून या विषयावर सविस्तर चर्चा केली व प्रलंबित प्रश्नी गांभीर्याने दखल घेत उर्वरित जमिनीची अधिग्रहण प्रक्रिया राबविण्याचे निवेदन केले.

  • Warora city development । “वरोरा शहरातील समस्यांवर विशेष उपाययोजना, खासदार धानोरकरांच्या संघर्षाचे यश!”

    Warora city development

    Warora city development : चंदपूर : वरोरा शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी जिल्हा प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वरोरा शहरातील महत्त्वाच्या समस्या संदर्भात समिती गठीत करून समस्या मार्गी लावण्याचे निर्देश दिले. लवकरच या सरदर्भात अतिरिक्त जिल्हाधिकारी भेट देऊन समस्या मार्गी लावण्याकरिता कार्यवाही करणार आहे.

    गंभीर आजार आता चिंता नसावी, चंद्रपुरात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे उदघाटन

    गुरुवारी खासदार धानोरकर यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन वरोरा शहरातील नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांना चर्चा केली. या चर्चेत त्यांनी तात्काळ गांधी सागर तलावाचे खोलीकरण, कोराडी नाल्या अंतर्गत वरोरा शहरातील सांडपाण्याचा प्रश्न, कासमपंजा नाल्याच्या पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था आणि शहराच्या मध्यभागी असलेल्या गांधी तलावाचे नगर परिषदेला हस्तांतरण करून त्याचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी केली होती.  Gandhi Sagar lake beautification

    यावेळी वरोरा नगरपरिषद मुख्याधिकारी विशाखा शेळके, गांधीसागर तलाव खोलीकरण समितीचे अध्यक्ष प्रवीण धनवलकर, प्रवीण सुराणा, मनीष जेठाणी यांची उपस्थिती होती.    

    गांधी सागर तलावात मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने तलावाचे विद्रुपीकरण झाले आहे. तलावातील गाळ काढल्यास पाण्याच्या नवीन स्रोत निर्माण होऊन त्याचे   सौंदर्यीकरण करून नौका विहार सुरु केल्यास छोटे पर्यटन सुरु होईल. या संदर्भात खासदार धानोरकर यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांनी नाम फाऊंडेशन च्या माध्यमातून गांधी सागर तलावातील गाळ काढण्यासाठी तात्काळ परवानगी दिली. तसेच या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याच्या संदर्भात आराखडा तात्काळ सादर करण्याचे आदेश मुख्याधिकारी नगर परिषद वरोरा यांना दिले. Warora tourism potential

    त्यासोबतच वरोरा येथील सांड पाण्याच्या प्रश्न सोडविण्यासाठी पाहणी करून तात्काळ अहवाल देण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. सांडपाण्याच्या प्रश्न मिटल्यास अनेक शेतकऱ्यांना शेती करता येणार आहे. व पिकाचे नुकसान देखील टाळता येणार आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाने शेतकरी व नागरिकाने आनंद व्यक्त करीत खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आभार मानले आहे.  

  • SNDT Womens University Maharashtra Day 2025 । SNDT महिला विद्यापीठाचा महाराष्ट्र दिन कार्यक्रम ठरला ‘ज्ञान आणि संधींचा उत्सव’!

    SNDT Womens University Maharashtra Day 2025

    SNDT Womens University Maharashtra Day 2025 : बल्लारपूर – एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई, महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपुर येथे  १ मे २०२५ रोजी महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई चे आजीवन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर चव्हाण उपस्थित होते. Maharashtra Day 2025

    दूरदर्शी धानोरकर, दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांनी जातनिहाय जनगणनेची केली होती पहिली मागणी

    कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, व विद्यापीठ गीत यांनी झाली. यावेळी ध्वजारोहण करण्यात आले आणि उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला अभिवादन केले. एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ मुंबई, बल्लारपूर आवाराचे संचालक  डॉ. राजेश इंगोले यांनी मुख्य पाहुण्यांचा सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले.

    डॉ. प्रभाकर चव्हाण  यांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा देत आजच्या समाजात आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागाच्या नवकल्पना याविषयी सखोल माहिती दिली. त्यांनी समाजासाठी उपयुक्त नवीन अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत चर्चा केली, ज्यामध्ये वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी, बचत गटांशी एकत्रित काम करण्यावर भर देण्यात आला.

    woman empowerment

    कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. राजेश इंगोले यांनी विद्यापीठासाठी पुस्तके देणगी केल्याचा उल्लेख केला. या पुस्तकांनी मला केवळ शिकवलं नाही, तर घडवलंही. आज या पुस्तकांचं देणगी  करताना  माझी एकच आशा आहे – यातून विद्यार्थीही घडतील, प्रगल्भ होतील आणि समाजासाठी योगदान देतील तसेच, सहायक कुलसचिव डॉ.बाळू राठोड आणि  आवाराचे समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांनी देखील कार्यक्रमात मनोगत व्यक्त केले.

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्राध्यापिका अपेक्षा पिंपळे यांनी केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष योगदान दिले.

  • Monsoon drainage preparation । मान्सूनपूर्व तयारीला वेग! चंद्रपूरात युद्धपातळीवर नालेसफाई सुरू

    Monsoon drainage preparation

    Monsoon drainage preparation : चंद्रपूर – शहरातील तीनही झोन अंतर्गत येणाऱ्या 6 मोठे नालेसफाई स्वच्छतेचे कार्य युद्धपातळीवर हाती घेऊन 10 छोट्या नाल्यांच्या स्वच्छता मोहिमेला चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे सुरवात करण्यात आली असुन 2 मे पासुन नाल्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. Drainage cleaning campaign

    खासदार धानोरकर यांनी प्रकल्पग्रस्तांना मिळवून दिला न्याय

       
        नाल्यावर अतिक्रमण केल्याने पाण्याच्या प्रवाहाला अवरोध निर्माण होऊन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते,याशिवाय पावसाळ्यात नाला ओव्हरफ्लो झाल्यास परिसरात पाणी शिरून साधन संपत्ती व आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे ज्या नागरिक, दुकानदारांनी नाल्यावर अतिक्रमण करून बांधकाम केले आहे त्यांनी ते त्वरित काढण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. नाल्यावरील अतिक्रमण हे पाणी तुंबण्याचे कारण ठरू शकत असल्याचे लक्षात घेता मनपातर्फे नाल्यावरील अतिक्रमणाचा सर्व्हे करण्यात आला होता. यात गडर लाईन कव्हर करणे,पक्के बांधकाम करणे,व्हरांडा बांधण्यासारखे अतिक्रमण केलेले आढळुन आले होते. या सर्व अतिक्रमणधारकांवर कारवाई करण्याची विशेष मोहीम आता राबविण्यात येणार आहे. Chandrapur drainage maintenance


         शहरातील तीनही झोनअंतर्गत बहुतांश नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा जमा झाला आहे. यामुळे नाल्याच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण होतो. मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थितीही निर्माण होण्याची शक्यता असते. हे सर्व टाळण्यासाठी मान्सूनपूर्व नाले स्वच्छता करण्याच्या कामाला सुरवात करण्यात येत आहे.


          शहरातील महाविदर्भ वृत्तपत्र कार्यालय ते मच्छीनाला, सावरकर नगर, बगड़खिडकी रेल्वेपटरी, बिनबा मोरी ते सटवाई, रहमत नगर , सिस्टर कॉलोनी, चांबारकुंडी, आकाशवाणी, निंबाळकर वाडी, एस.पी कॉलेज ते नगराळे दवाखाना इत्यादी मोठ्या नाल्यांची साफसफाई सुरु असून मनुष्यबळ व जेसीबीच्या मदतीने तेथील गाळ आणि कचरा बाहेर काढण्यात येत आहे. नाल्याभोवती वाढलेली झाडेझुडपी व नाल्यातील माती दगड बाहेर काढून सांडपाण्याला वाट काढून दिली जाणार आहे. त्यामुळे सांडपाणी तुंबून न राहता पुढे वाहून जाईल, सांडपाण्याला वेग आल्याने नाल्याजवळील दुर्गंधी कमी व्हायला मदत होईल.


         नाले सफाईचे कार्य मशीनद्वारे आणि जेथे मशीनद्वारे शक्य नाही तेथे स्वच्छता कर्मचाऱ्यांतर्फे होणार आहे. सध्या स्वच्छतेच्या कामात नियमीत 315 सफाई कर्मचारी व अतिरिक्त 130 असे एकुण 445 कर्मचारी कार्यरत असणार आहेत. याशिवाय मोठ्या नाल्यांच्या सफाईकरीता 3 जेसीबी लावण्यात आल्या असून 2 पोकलेनद्वारे स्वच्छता सुरू करण्यात आली आहे. अन्य नाले जेथे पोकलेन जाऊ शकत नाही अशा उर्वरीत नाल्यांची स्वच्छता मनुष्यबळाद्वारे करण्यात येत आहे.

    chandrapur drainage maintenance


        विविध विभागांच्या समन्वयातून स्वच्छता विभाग हे उद्दिष्ट साध्य करणार आहे. नाले स्वच्छतेची संपूर्ण जबाबदारी झोनचे सहायक आयुक्त यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात, मुख्य स्वच्छता अधिकारी, झोनचे  स्वच्छता निरिक्षक, आपत्ती व्यवस्थापन पथक सांभाळणार असुन नाला स्वच्छतेदरम्यान निघणारा गाळ हा परिसरातील सखल भागात टाकण्यात येणार आहे.