Tag: News34 chandrapur

  • school enrollment process । डॉ. अशोक उईके यांचा पुढाकार: जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दर्जेदार शिक्षणाची ग्वाही

    school enrollment process

    school enrollment process : चंद्रपूर – विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे शिक्षकांचे कर्तव्य आहे. स्पर्धेच्या या युगात आपला विद्यार्थी कसा समोर जाईल, याचा गांभिर्याने विचार करून शिक्षकांनी अध्यापनाचे कार्य करावे. आजच्या युगात इंग्रजी शाळांचे प्रस्त वाढले असतांना, जिल्हा परिषदेच्या शाळेतसुध्दा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आणि उज्वल भविष्य मिळू शकते, असा विश्वास पालकांना देऊन विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढविण्यासाठी सर्व शिक्षकांनी संकल्प करावा, अशा सूचना राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिल्या.

    प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला न्याय, खासदार धानोरकर यांचा पाठपुरावा

    जिल्हाधिकारी कार्यालयात शिक्षण विभागाचा आढावा घेताना ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग, शिक्षणाधिकारी (प्राथ.) अश्विनी सोनवणे, राजेश पाताळे (माध्य.), अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे तसेच इतर अधिकारी उपस्थित होते. school enrollment process

    शाळेतील मूलभूत सुविधांसाठी शासन निधीची कमतरता पडू देणार नाही, असे सांगून पालकमंत्री डॉ. उईके म्हणाले, जि.प. शाळांतील विद्यार्थी पटसंख्या का कमी होत आहे, याची कारणमिमांसा होणे आवश्यक आहे. या कारणांचा शोध घेऊन शिक्षण विभागाने पाऊले टाकावीत. पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे. त्यांच्या पाल्यांची गुणवत्ता आणि उज्वल भविष्य आम्ही घडू शकतो, असा विश्वास पालकांना द्या. शैक्षणिक क्षेत्रात असलेल्या ‘असर’ आणि ‘नॅस’ या उपक्रमांचा आधार घेऊन शिक्षण विभागाने प्रयत्न करावे. importance of quality education

    शाळेमध्ये शिक्षकांची समिती तयार करून अध्यापनाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षकांची शिक्षकांकडूनच पडताळणी करा. नवनवीन संशोधन करा. आगामी शैक्षणिक क्षेत्रात शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे अतिशय चांगल्या पद्धतीने स्वागत होण्यासाठी आतापासून नियोजन करा. शैक्षणिक उपक्रमांतर्गत दर 15 दिवसांनी पालकांच्या उपस्थितीत दर्जेदार चावडी वाचन उपक्रम राबवा. ज्या शाळांमध्ये इंटरनेट कनेक्शन आणि विद्युत पुरवठा वारंवार खंडित होतो, त्यासाठी जिल्हा नियोजन समिती मधून निधी देण्यात येईल. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्याजाण्याचा त्रास होऊ नये, यासाठी मानव विकास अंतर्गत बसेसचे योग्य नियोजन करा. public school improvement strategies

    गाव स्तरावरील शाळांना भेटी द्या : शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनी गाव स्तरावरील शाळांमध्ये भेटी देऊन नियमितपणे आढावा घ्यावा. ज्या शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहे, ते खरंच सुरू आहेत का, शाळेतील तक्रार पेटींचा उपयोग होतो का, याची पडताळणी करावी. सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजनांची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवा, अशा सुचना पालकमंत्री डॉ. उईके यांनी दिल्या. parent-teacher engagement programs

    मानव विकास अंतर्गत 7445 विद्यार्थीनींना सायकलचे वाटप : चंद्रपूर जिल्ह्यात सर्व व्यवस्थापनाच्या एकूण 2461 शाळा असून यापैकी 1549 शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. जिल्ह्यात एकूण विद्यार्थी संख्या 3 लक्ष 61 हजार 687 आहे. सखी सावित्री समिती, विद्यार्थी सुरक्षा समिती आणि तक्रार पेटी उपलब्ध असलेल्या शाळांची संख्या 2461 आहे. 475 शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या 549 शाळांमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात अपार आयडीचे काम 87 टक्के पूर्ण झाले आहे. मानव विकास अंतर्गत ग्रामीण भागातील 7445 मुलींना सायकलचे वाटप करण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने बैठकीत दिली.

  • WCL job updates for project affected । प्रकल्पग्रस्तांचा विजय: खासदार धानोरकरांच्या पाठपुराव्याला यश

    WCL job updates for project affected

    WCL job updates for project affected : चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील गोवरी पौनी विस्तार योजनेतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित नोकरी व इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या प्रयत्नांना यश आले असून, जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी त्यांच्या मागण्या मान्य  केल्या आहेत. या निर्णयामुळे गोवरी पौनी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीचा प्रश्न मार्गी लागला आहे. project affected people news

    बैठकीत उपस्थिती

    यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी विनय गौंडा, भुसंपादन अधिकारी जथाडे, वेकोलि बल्लारपूर क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक इलियास हुसेन, राजुरा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस नेते अरुण धोटे, राजुरा काँग्रेस तालुका अध्यक्ष रंजन लांडे,माजी पंचायत समिती सभापती कुंदाताई जेणेकर यासह प्रकल्पग्रस्त व शेतकरी उपस्थित होते. 

    चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीचे साम्राज्य

    शेतकऱ्यांमध्ये होती तीव्र नाराजी

    या योजनेमुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांच्या नोकरी आणि पुनर्वसनासारख्या समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होत्या. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला, मात्र अद्याप त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नव्हत्या. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. district collector order on jobs

    खासदार धानोरकर यांचा पाठपुरावा

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. या निवेदनात त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या विस्तृतपणे मांडल्या होत्या. यात प्रामुख्याने नोकरी संबंधीची प्रलंबित फाईल त्वरित मंजूर करणे, सर्व पात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दोन महिन्यांच्या आत नोकरी देणे, अधिग्रहित जमिनीच्या क्षेत्राचा ठिकाणीच नोकरी उपलब्ध करणे आणि जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत जमीन संपादनाची प्रक्रिया थांबवणे या प्रमुख मागण्यांचा समावेश होता. pending farmer job files cleared

    पात्र शेतकऱ्यांना सामावून घेणार

    यावेळी, नोकरी वाटपात कोणताही भेदभाव न करता सर्व पात्र शेतकऱ्यांना एकाच वेळी सामावून घेणे, वेकोलि द्वारा नोकरी देताना स्थानिक ठिकाणी नोकरी देण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच वैद्यकीय कारण जाणून स्थानिक स्थरावर त्यांना रुजु संदर्भात चर्चा करण्यात आली. वेकोलिने नोकरी सरदर्भातील अन्य क्षेत्रात पोष्टीग करण्यासंदर्भात SOP करण्या करण्यात आली आहे, त्यामध्ये बदल करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. 

    तात्काळ निर्णय होणार

    त्यासोबतच कोरपना तालुक्यातील विरूर (गाडेगाव), खैरगाव, टाकळी, चिखली येथील सेक्शन ४ व ७ मध्ये नाव असून सुद्धा सेक्शन ९ च्या अधिग्रहण मध्ये सुटलेली आहे. अशा शेतकऱ्यांची शेती अधिग्रहित करण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. त्यावर वेकोलि वणी क्षेत्राचे महाप्रबंधक संचालन पिशा रोडी यांनी सांगितले कि, भूमी अधिग्रहण संदर्भाने पत्र वेकोलि मुख्यालय येथे महाप्रबंधक भूराजस्व यांच्याकडे पाठविले असून या संदर्भात तात्काळ निर्णय घेण्यात येईल.

    शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान  

    तसेच  यावेळी  मातीच्या ढिगाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करणे, तसेच सांगोळा येथील विशिष्ट सर्वे नंबर आणि वेकोलीच्या खाणकामामुळे होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणीही खासदार धानोरकर यांनी केली होती. या सर्व मागण्या मंजूर झाल्यामुळे आज आलेले प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. यावेळी सर्वानी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे आभार मानले. 

  • water supply problem in villages । उन्हाळ्यात गाव पाण्याविना करपलं!, सुधीर मुनगंटीवार यांनी दूर केली अडचण

    water supply problem in villages

    water supply problem in villages : चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे पोंभूर्णा तालुक्यातील १५ गावांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. महिन्याच्या सुरुवातीला आढावा बैठक घेऊन १५ गावांची पोंभुर्णा ग्रीड पाणी पुरवठा योजना सुरू करण्याचे निर्देश आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले होते. त्यानुसार कार्यवाही करीत प्रशासनाने या गावांचा पाणी पुरवठा सुरू केला आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईने होणारी अडचण दूर केल्याबद्दल गावकऱ्यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. rural water supply scheme

    एनडी हॉटेलमध्ये जुगाराचा बार

    पोंभुर्णा ग्रीड अंतर्गत १ जून २०२२ ला १५ गावांची पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे (मजीप्रा) कार्यान्वीत करण्यात आली. त्यानंतर मजीप्रातर्फे ही योजना जिल्हा परिषदेला हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न झाला. परंतू, १५ पैकी ८ गावांना पाणी पुरवठा नियमित होत नसल्यामुळे योजना हस्तांतरीत होऊ शकली नव्हती. त्याचवेळी मजीप्राकडे वीज देयकाचा भरणा करण्याकरीता निधी नसल्यामुळे ही योजना डिसेंबर २०२४ मध्ये बंद पडली. आणि १५ गावांची योजना बंद झाल्यामुळे पाणीटंचाई निर्माण झाली. public water supply system

    माजी उपसभापती पोंभूर्णा विनोद देशमुख यांनी यासंदर्भात आ. श्री. मुनगंटीवार यांना कळवले. त्यानंतर आ. श्री. मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथे दि. ५ एप्रिल २०२५ रोजी आढावा सभा घेतली. १५ गावांतील लोकांना पाणी टंचाई सोसावी लागत आहे. त्यामुळे योजना सूरू करण्याबाबत गावकऱ्यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांच्याकडे आग्रह धरला. आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ योजना सुरू करण्याचे निर्देश दिले.

    त्यानंतर आ. मुनगंटीवार यांच्या आदेशांनुसार जिल्हा परिषद चंद्रपूरतर्फे २५ एप्रिल २०२५ रोजी पोंभुर्णा ग्रीड पाणी पुरवठा योजनेच्या थकीत वीज देयकाचा ५.७१ लाख रुपयांचा भरणा करण्यात आला व पोंभुर्णा ग्रीड पाणी पुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सूरू करण्यात आला.

    गावकऱ्यांनी मानले आभार
    आ. श्री. मुनगंटीवार यांनी आढावा सभा घेऊन निर्देश दिल्यानंतर सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आमच्या गावांचा पाणीपुरवठा सुरळीत झाला, या शब्दांत गावकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

    या १५ गावांना झाला लाभ
    चक ठाणेवासना, नवेगाव मोरे, चक नवेगाव, मोहाडा रै, वेळवा, सेलूर नागारेडी, चक कोंसबी-1, फुटाना, देवाडा खुर्द, जाम तु., रामपूर दीक्षित, बोर्डा दीक्षित, कसरगट्टा, चक घनोटी-1, जाम खु. या गावांचा पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.

  • regional drama competition । चंद्रपूरमध्ये रंगणार महावितरणची नाट्य महापर्वणी!

    regional drama competition

    regional drama competition : चंद्रपूर : विद्युत पुरवठा अविरत ठेवणारे महावितरण आता कला क्षेत्रातही आपली प्रतिभा सादर करण्यासाठी सज्ज झाले आहे. महावितरणच्या नागपूर प्रादेशिक स्तरावरील आंतर परिमंडलीय नाट्य स्पर्धेचे आयोजन चंद्रपूर परिमंडलाच्या यजमानपदाखाली येत्या २ आणि ३ मे २०२५ रोजी प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे करण्यात आले आहे. या दोन दिवसीय नाट्य महोत्सवात महावितरणच्या चंद्रपूर, नागपूर, गोंदिया आणि अकोला परिमंडलांचे नाट्यसंघ आपले कला कौशल्य सादर करणार आहेत. government cultural programs

    चंद्रपूर जिल्ह्यात पार पडला सत्यशोधक विवाह


    दैनंदिन जीवनात प्रकाशाची ऊर्जा देणाऱ्या महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने दरवर्षी या नाट्य स्पर्धेचे आयोजन केले जाते. यावर्षीच्या स्पर्धेचे उद्घाटन महावितरणचे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांच्या हस्ते शुक्रवार, दि. २ मे २०२५ रोजी सकाळी ९ वाजता होणार आहे. तर, शनिवार, दि. ३ मे २०२५ रोजी सायंकाळी 7.00 वाजता महावितरणचे संचालक (संचालन व मानव संसाधन) अरविंद भादिकर यांच्या शुभहस्ते पारितोषिक वितरण समारंभ पार पडेल. या दोन्ही कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक परेश भागवत असतील. msedcl drama competition

    या महत्त्वपूर्ण सोहळ्याला संचालक (वाणिज्य) योगेश गडकरी व संचालक (वित्त) अनुदिप दिघे आणि संचालक (मा.सं.) राजेंद्र पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच, संचालक (वन प्रबोधिनी) चंद्रपूर, एम. श्रीनिवास रेड्डी, गोंदिया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी आणि अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


    या दोन दिवसीय नाट्य स्पर्धेत शुक्रवार, दि. २ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता चंद्रपूर परिमंडल श्रीपाद जोशी लिखित ‘रंगबावरी’ हे नाटक सादर करेल. सायंकाळी ४.३० वाजता नागपूर परिमंडलाचा प्रदीप फाटक लिखित ‘ये रे घना’ चा नाट्यप्रयोग रंगणार आहे. शनिवार, दि. ३ मे २०२५ रोजी सकाळी १० वाजता गोंदिया परिमंडल अतुल साळवे यांच्या ‘दि ॲनॉनीमस’ या नाटकाद्वारे आपली कला सादर करेल, तर दुपारी ३ वाजता अकोला परिमंडल डॉ. चंद्रकांत शिंदे लिखित ‘सिकॅरिअस’ हे नाटक घेऊन येत आहे. office drama competition


    अभिनय, संवाद, संगीत, प्रकाश योजना, नेपथ्य आणि दिग्दर्शन यांसारख्या नाट्य घटकांसाठी ही प्रादेशिक स्तरावरील आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धा अत्यंत चुरशीची ठरणार आहे. चंद्रपूरमधील रसिकांसाठी ही स्पर्धा एक उत्कृष्ट नाट्य मेजवानी असेल यात शंका नाही. नाट्यस्पर्धेचा स्वागताध्यक्ष आणि महावितरणच्या चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिश गजबे यांनी नाट्यप्रेमी रसिकांना या निःशुल्क आणि दर्जेदार नाट्यकृतींचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले आहे.

  • Satyashodhak vivah । सत्यशोधक विवाहाचा नवा आदर्श: लग्न खर्च टाळून शेतात फळवन आणि रस्ते!

    Satyashodhak vivah

    Satyashodhak vivah : चंद्रपूर – सुसा : आता लग्न म्हटलं तर हुंडा, भव्य दिव्य सजावट आणि रोशनाई, डीजे, बँड बाजा, दाग दागिने, पंचपक्वान्न याचा प्रचंड ट्रेंड निर्माण झालेला आहे. यासाठी अतोनात खर्च करण्याची परंपरा पूर्णता रुजली असतानाही चंद्रपूर जिल्ह्यातील सुसा या गावात कमीत कमी खर्चाचा सत्यशोधक विवाह सोहळा 28 एप्रिल 2025 ला पार पाडला. या लग्नात आगाऊ खर्च टाळून नवरदेवाने गावातील शिवारस्ते बांधले. तर गावातील आणि इतर नातेवाईकांनी सोबतच मित्रांनी लग्नानिमित्त जोडप्याला झाडांचा आहेर आणण्यात आला. simple village wedding

    चंद्रपुरातील प्रख्यात एनडी हॉटेलमध्ये जुगाराचे वारे, १० व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल

    सुसा गावातील श्रीरंग गणपत एकुडे यांचा मुलगा श्रीकांत आणि यवतमाळातील मोझर या गावचे गोपीकिसन गरमडे यांची मुलगी अंजली यांचा विवाह पार पडला. नवरदेव असलेले श्रीकांत एकुडे हे उच्चशिक्षित असून त्यांचे शिक्षण एम एस सी ऍग्री पर्यंतचे झाले असून ते परिसरातील प्रगतशील शेतकरी आहेत. सोबतच सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात. जेव्हा त्यांनी लग्न करण्याचा विचार केला तेव्हा त्यांची फक्त एकच अट होती. ती म्हणजे लग्न हे नोंदणी पद्धतीने किंवा सत्यशोधक पद्धतीने करायला मुलगी आणि कुटुंब तयार असावे.

    चंद्रपूर जिल्ह्यातील प्रगतिशील आणि कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सुरेश गरमडे यांच्या मध्यस्थीने हा योग जुळवून आणला. जेव्हा सुरेश गरमडे यांनी प्रस्ताव मुलगी अंजलीच्या वडिलांकडे ठेवला तेव्हा त्यांनी निर्णय घ्यायला थोडा वेळ घेतला. घरच्यांसोबत बोलून त्यांनी होकार कळवला. वधू मुलीची मानसिक कुचंबना करणाऱ्या लग्न जोडण्याच्या पारंपारिक पद्धतीला बाजूला सारत मुला मुलींच्या चर्चा व संवादाच्या माध्यमातून आधुनिक प्रगतशील विचाराने लग्न जोडण्यात आले. no cost wedding celebration


    लग्नात कोणताही अवाढ्यव्य खर्च करायचा नाही. हुंडा, भव्य दिव्य सजावट आणि रोशनाई, डीजे, बँड बाजा, दाग दागिने, पंचपक्वान्न या गोष्टी शंभर टक्के टाळायच्या. हेच पैसे सर्वांना उपयोगी अशा ठिकाणी वापरायचे हे दोन्ही कुटुंबाचे ठरले. Satyashodhak vivah

    शेतकऱ्यांच्या सोयीसाठी केले 2 हजार फूट शिवार रस्त्याचे काम
    पावसाळ्यात शिवार रस्त्यांची अवस्था फारच वाईट होती. शेतकऱ्यांना तर सोडा जनावरांनाही जाणे शक्य होत नाही. म्हणून श्रीकांतने लग्न खर्चातून बचत करत अतिशय अडचणीच्या असणाऱ्या दोन शिवार रस्त्याचे खडीकरण केले. यामुळे आता शिवारातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात सुद्धा ये- जा करता येणार आहे. शेतकऱ्याचे उत्पादनाला योग्य भाव न मिळाल्यामुळे व नैसर्गिक आपत्तीमुळे आर्थिक परिस्थिती बेताचीच असते. तरीपण कर्ज काढून लग्न थाटामाटात करण्याची परंपरा आजही कायम आहे. परंतु या युवा शेतकऱ्याने या परंपरेला बाजूला सारत शेतकरी हिताचाच विचार करत 2000 फुटापेक्षा जास्त लांबीचे शिवार रस्त्याचे खडीकरण केले. यामुळे शेतकऱ्यांना दळणवळण करणे सोयीचे झाले आहे.

    शेतात केली विविध फळझाडांची लागवड
    सत्यशोधक विवाह सोहळा असल्याने आहेर पद्धत ठेवायची नव्हती. आणि नाही कुठल्या कुलर, कपाट, फ्रिज, सोफा, भांडे यासारख्या महागड्या वस्तू सुद्धा हव्या होत्या. परंतु सृजनशील असलेल्या श्रीकांतने सर्व नातेवाईकांसमोर फळझाडं भेटवस्तू स्वरूपात देण्याचा संकल्प बोलून दाखवला. आणि आश्चर्य म्हणजे नातेवाईक आणि मित्रांनी सुद्धा या संकल्पनेला प्रतिसाद देत तब्बल 90 पेक्षा जास्त फडझाड भेट स्वरूपात दिली. यामध्ये 36 प्रकारच्या विविध फडझाडांचा समावेश आहे. Satyashodhak vivah

    fruit forest farming

    विदर्भात पिकत असलेल्या फळझाडासोबतच स्टारफ्रूट, वॉटर एप्पल, चकोत्रा, मलबेरी, लिची, रबर, अशा फडझाडांचा सुद्धा समावेश आहे. तर चारोळी कवट, बेल, मोह या जंगली फळझाडांचा सुद्धा समावेश आहे. सोबतच पावसाळ्यामध्ये विविध वेली, रानभाज्या, औषधी वनस्पती यांची त्या ठिकाणी लागवड करण्याचा संकल्प आहे. यामुळे त्यांचे शेतामध्ये 1600 स्क्वेअर मीटरचे एक फ्रुट फॉरेस्टच निर्माण होणार आहे.
    या लग्नाची पंचक्रोशीत सकारात्मक व नकारात्मक चर्चा होत आहे. कर्ज काढून लग्नात वारेमाप खर्च करून स्वतःच भविष्य गहाण ठेवणाऱ्या लोकांसाठी या विवाहाने आदर्श ठेवला आहे. त्यामुळे विवाहाचे कौतुक सुद्धा होत आहे. या समारंभाप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. fruit forest farming


    “शेतकऱ्यांनी अगोदर स्वतःचा आणि स्वतःच्या शेतीच्या विकासाचा विचार केला पाहिजे. सरकार किंवा समाजव्यवस्था शेतकऱ्यांचा विचार करत नाही ही वस्तुस्थिती असताना शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनीच पुढाकार घ्यायला पाहिजे. म्हणून मी शिवार रस्ते तयार केले. तसेच भविष्यात आपले लोकं जंगलाचं अस्तिव राहील का? जंगली झाडं फळं पुढील पिढीला पाहायला चाखायला मिळेल का? हे माझ्या समोर प्रश्न निर्माण झाले होते. म्हणून मी माझ्या शेतातच नातेवाईकांच्या मदतीने फ्रुट फॉरेस्ट तयार करण्याचं ठरवले. याला ते विरोध करतील पण माझे मित्र आणि नातेवाईक यांनी उत्स्पूर्त प्रतिसाद दिला. याचा मला भरपूर आनंद आहे. यामुळे लग्नसंस्थेत नवीन व्यवस्था निर्माण व्हावी अशी आशा आहे.”
    — श्रीकांत एकुडे.

  • How to become Mathadi Board member Chandrapur । माथाडी मंडळाच्या सदस्यपदासाठी अर्ज सुरू! संधी सोडू नका!

    How to become Mathadi Board member Chandrapur

    How to become Mathadi Board member Chandrapur : उच्च न्यायालयाच्या प्राप्त निर्देशानुसार, माथाडी अधिनियमाच्या कलम 6 अन्वये चंद्रपूर – गडचिरोली जिल्हा माथाडी व असंरक्षित कामगार मंडळ गठीत करण्याचे शासनाचे नियेाजन आहे.  या मंडळावर सदस्य  म्हणून कामगार/मालक प्रतिनिधी यांची नेमणुक करण्याकरीता इच्छुक पात्र व्यक्तीकडून 10 मे 2025 पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. Maharashtra Mathadi Act Section 6 recruitment

    इरई नदीतील गाळ आता शेतकऱ्यांना मिळणार मोफत

    कार्यरत इच्छुक मालक आस्थापना त्यांच्या असोसिएशन्स व मालकांचे प्रतिनिधित्व करू इच्छिणा-या व्यक्ती तसेच असंरक्षित कामगार, त्यांच्या संघटना व असंरक्षित कामगारांचे प्रतिनिधीत्व करू इच्छिणा-या कामगारांनी आपले अर्ज / नामानिर्देशीत व्यक्तीबद्दलच्या शिफारशी, संबधितांचे पूर्ण नाव, पत्ता व चारित्र्य पडताळणी दाखला तसेच माथाडी कामगार क्षेत्रातील कार्य, अनुभव इत्यादी तपशिलांसह 10 मे 2025 पूर्वी प्राप्त होतील अशा पध्दतीने सादर करावेत. 

                 मंडळास प्राप्त झालेल्या अर्ज व शिफारशीमधुन योग्य त्या व्यक्तीची निवड करून मंडळ सदस्यपदी नेमणुक करण्याचा अधिकार शासनाला आहे. कोणत्याही व्यक्तीचा अर्ज, नामनिर्देशित व्यक्तीची शिफारस कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार शासनाकडे राहील, असे  चंद्रपूर – गडचिरोली जिल्हा माथाडी व असंरक्षीत कामगार मंडळ, चंद्रपूर यांनी कळविले आहे.

  • Employment for acquired land farmers । खासदार प्रतिभा धानोरकर यांची गोवरी पौनी प्रकल्पग्रस्तांच्या नोकरीसाठी आक्रमक भूमिका

    Employment for acquired land farmers

    Employment for acquired land farmers : चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील गोवरी पौनी विस्तार योजनेतील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित नोकरी व इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने बैठक आयोजित करण्याची प्रत्राद्वारे मागणी केली आहे. Challenges in land acquisition process

    चंद्रपुरात सेवा हक्क दिन कार्यक्रमाचे आयोजन

    गोवरी पौनी विस्तार योजनेमुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांच्या नोकरी आणि पुनर्वसनासारख्या समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यासंदर्भात शेतकऱ्यांनी वारंवार पाठपुरावा केला, मात्र अद्याप त्यांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या विस्तृतपणे मांडल्या आहेत. यात प्रामुख्याने नोकरी संबंधीची प्रलंबित फाईल त्वरित मंजूर करणे, सर्व पात्र प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना दोन महिन्यांच्या आत नोकरी देणे, अधिग्रहित जमिनीच्या ठिकाणीच नोकरी उपलब्ध करणे आणि जोपर्यंत नोकरी मिळत नाही तोपर्यंत जमीन संपादनाची प्रक्रिया थांबवणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

    याव्यतिरिक्त, नोकरी वाटपात कोणताही भेदभाव न करता सर्व पात्र शेतकऱ्यांना एकाच वेळी सामावून घेणे, शेतकऱ्यांशी चर्चा करताना वेकोलीच्या उच्च अधिकाऱ्यांनी उपस्थित राहणे, SOP चा मुद्दा रद्द करणे, कोरपना तालुक्यातील विरूर (गाडेगाव) येथील जमीन संपादन आणि मातीच्या ढिगाऱ्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई करणे, तसेच सांगोळा येथील विशिष्ट सर्वे नंबर आणि वेकोलीच्या खाणकामामुळे होणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणीही खासदार धानोरकर (mp pratibha dhanorkar) यांनी केली आहे.

    खासदार प्रतिभा धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांची गांभीर्याने दखल घेतली असून, जिल्हाधिकारी आणि वेकोलीच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, असे आश्वासन खासदार धानोरकर यांनी दिले आहे. 

  • Kishor Jorgewar social initiatives । किशोर जोरगेवार यांच्या सामाजिक कार्यामुळे दिव्यांग मुलांना मिळाली सशक्तता

    Kishor Jorgewar social initiatives

    Kishor Jorgewar social initiatives : चंद्रपूर – आपल्या समाजातील प्रत्येक व्यक्तीला हक्काचे स्थान मिळाले पाहिजे. बौद्विक दिव्यांग मुले ही आपल्या समाजाचा अविभाज्य घटक आहेत. त्यांच्या आयुष्यात आनंद, आत्मसन्मान आणि स्वतंत्रतेची भावना निर्माण करणे, ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने हातात हात घालून या कार्यात सहभागी होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Support for disabled children

    आमदार जोरगेवार मुले पहलगाम मधील कुटुंब परतले

    श्री साई मतिमंद शिक्षण संस्था, चंद्रपूर द्वारा संचालित स्विकार दुर्बल मनस्कर (मतिमंद) मुलांची निवास शाळा, ताडाळी येथे मार्गदर्शन शिबिर आणि बस लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला रेखाजाई पिंपळशेंडे, अ‍ॅड. अभय पाचपोर, समाजकल्याण विभागाचे उपयुक्त राजेशजी पांडे, डॉ. दिलीप चौधरी, शाश्वत शेरे, शेरे, नंदकुमार फुले, जैन, मुधोळकर, वैभव सनास्कर, नलगंटिवार, अमोल मारुतकर आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

    यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, “श्री साई मतिमंद शिक्षण संस्था ज्या प्रकारे या मुलांच्या विकासासाठी कार्यरत आहे, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. केवळ शिक्षणच नव्हे, तर प्रेम, सहकार्य आणि योग्य दिशा या मुलांसाठी येथे दिली जात आहे. आजच्या या कार्यक्रमात नव्या बसचे लोकार्पण करण्यात आले आहे. ही बस या मुलांसाठी केवळ वाहतुकीचे साधन नसून त्यांच्या स्वप्नांना गती देणारे साधन ठरेल. शिक्षणाचा आणि विकासाचा हा प्रवास अधिक सुलभ व सुरक्षित व्हावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू. Mental disability education programs

    या मुलांसाठी केवळ भौतिक सुविधा पुरवणे पुरेसे नाही, तर त्यांना प्रेमाने, मायेने समजून घेऊन जगण्याची संधी देणे आवश्यक आहे. आम्हीही येथे आवश्यक त्या सर्व मदतीसाठी कटिबद्ध आहोत. ही मुले समाजाचा अविभाज्य भाग आहेत. त्यांना वेगळे न मानता, त्यांच्या गरजांनुसार विशेष प्रेम, काळजी आणि संधी देणे, ही प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी आहे असे आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

  • Sudhir Mungantiwar latest news । कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या न्यायासाठी सुधीर मुनगंटीवार यांचा यशस्वी संघर्ष

    Sudhir Mungantiwar latest news

    Sudhir Mungantiwar latest news : चंद्रपूर –  राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे ४५ कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला आहे.चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयात ४५ कर्मचारी कक्ष सेवक म्हणून नियुक्त झाले आहेत. आ. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे हे घडू शकले, अशी भावना व्यक्त करून कक्ष सेवकांनी त्यांचे आभार मानले आहेत. Chandrapur medical college jobs

    ताडोबा व्याघ्रप्रकल्पात मचाणीवरून निसर्गाचा अनुभव घ्यायचा आहे तर व्हा तयार

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर यांच्या अधिनस्त असलेल्या रुग्णालयात ४५ सुरक्षा कर्मचारी गत १० ते १५ वर्षापासून कंत्राटी तत्वावर कार्यरत होते. महाराष्ट्र सुरक्षा बल मार्फतीने नवीन सुरक्षा रक्षकांची भरती करण्यात आल्यामुळे उक्त ४५ कंत्राटी सुरक्षा रक्षकांना कामावरून कमी करण्यात आले होते, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. Contract workers appointment news

    या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेत, मे.स्मार्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मार्फतीने  सफाई कामगारांची भरती करण्यात येणार असल्याने या पदावर त्यांना सेवेची संधी मिळण्याची विनंती केली होती. याची दखल घेत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या सफाई कामगारांना सदर कंपनीमार्फत चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना पत्राद्वारे कळविले होते. त्या अनुषंगाने योग्य कार्यवाही करून ४५ सुरक्षा कर्मचाऱ्यांना मे. स्मार्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमार्फत कक्षसेवक पदावर नियुक्ती देण्यात आली असून त्यांना न्याय मिळाला आहे.

    कंत्राटी तत्वावर कक्षसेवक पदावर नियुक्ती मिळालेल्या गौरी उंदीरवाडे, रूपा येरगुडे, दीपक वर्मा, संध्या आडेकर, गुड्डू निमसरकार, पृथ्वीराज मरस्कोल्हे, ममता राठोड, अक्षय सुखदेवे, प्रेम बारसागडे, प्रियंका अमरपवार, विश्वनाथ उराडे आदींनी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात येऊन त्यांचा सत्कार केला व आभार मानले

  • Tadoba Machan stay experience । बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ताडोबामध्ये जंगलाची मचानीवरून सफर!

    Tadoba Machan stay experience

    Tadoba Machan stay experience : चंद्रपूर –  वाघ व इतर वन्यजींवाच्या हमखास दर्शनासाठी जगप्रसिद्ध असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामार्फत 12 मे 2025  ला बफर क्षेत्रात बुद्ध पौर्णिमेला निसर्ग अनुभव उपक्रम निसर्गप्रेमीसाठी राबविण्यात येणार आहे. Tadoba wildlife experience booking

    या उपक्रमासाठी बफर क्षेत्रातील चंद्रपूर, मूल, मोहर्ली, खडसंगी, पळसगाव व शिवणी या सहा वनपरिक्षेत्रातील 50 मचाणी सज्ज करण्यात आलेल्या आहेत. निसर्ग प्रेमीकरिता ताडोबातील वन्यजीवन मचाणीवर बसून अनुभवण्याची ही सुवर्ण संधी आहे.

    ताडोब्यातील वाघोबाला उन्हाचे चटके, सफारी वेळापत्रकात बदल

    या प्राणीगणनेमध्ये सहभागी होण्यासाठी 28 एप्रिल ते 5 मे 2025 या कालावधीत http://mytadoba.mahaforest.gov.in/ या संकेत स्थळावर बुकिंग सुरु होणार असून एकूण 100 निसर्गप्रेमी यामार्फत बुकिंग करू शकतात. सदर उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रती व्यक्ती 4500 रुपये इतके शुल्क आकरण्यात येणार आहे. Machan stay Tadoba

    सहभागी होणाऱ्या पर्यटकांनी संकेतस्थळामार्फत 1500 रुपये अदा करून भरलेल्या रकमेची पावती सबंधित पर्यटन गेटला दाखवावी. उर्वरित रकमेमध्ये जिप्सी शुल्क  2 हजार रुपये, पर्यटन गेट ते मचाण प्रवास खर्च व मार्गदर्शक शुल्क  1 हजार रुपये इतके सबंधित पर्यटन गेटवर रोख स्वरूपात देण्यात यावे.

    सहभागी होणाऱ्या निसर्गप्रेमींनी शाकाहारी जेवणाची व पाण्याची व्यवस्था स्वतः करावी तसेच कॅमेरा व सर्चलाईटला सदर उपक्रमामध्ये परवानगी नाही. इतर माहितीकरिता वरील संकेत स्थळावर भेट देण्यात यावी.

    सदर उपक्रमाविषयी काही अडचणी असल्यास कार्यालयीन वेळेस श्री. सुमित कोहळे, 8421461698 (सहाय्यक पर्यटक व्यवस्थापक, उपसंचालक बफर कार्यालय, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प यांच्याशी संपर्क साधावा.