Tag: News34 chandrapur

  • Chandrapur RTO office timing । चंद्रपूर RTO ऑफिसचा वेळ बदलला! उष्माघात टाळण्यासाठी बदललेले तास जाणून घ्या!

    Chandrapur RTO office timing

    Chandrapur RTO office timing : चंद्रपूर, दि. 22 एप्रिल :  चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते तापमान लक्षात घेता जनतेला उष्माघाताचा त्रास होऊ नये, याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे देण्यात येणाऱ्या खालील सेवांच्या वेळेत पुढीलप्रमाणे बदल करण्यात येत आहे. Chandrapur transport department news

    चंद्रपूर मनपाचा राज्यात गौरव

    योग्यता प्रमाणपत्र देण्याकरिता बाबूपेठ – बल्लारपूर बायपास रोड येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकवर होणारी वाहन तपासणी (पासिंग) तसेच कार्यालयात होणारी पक्की अनुज्ञप्ती चाचणी (Driving Test) 23 एप्रिल पासून सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत व दुपारी 4 ते 6.30 वाजेपर्यंत करण्यात येत आहे. ज्या अर्जदारांनी वाहन 4.0 या वाहनप्रणालीवर यापुर्वी वेळा घेतल्या असल्यास त्यांनी देखील सदर वेळेत उपस्थित राहून कामे करून घ्यावी. इतर कामकाज पुर्वीप्रमाणेच होईल.

    तरी सर्व वाहन मालकांनी व चालकांनी याची नोंद घ्यावी,  असे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

  • Maharashtra municipal administration awards । राज्यभरातून चंद्रपूरचा गौरव! मनपाला मिळाले प्रतिष्ठेचे ‘राजीव गांधी पुरस्कार’

    Maharashtra municipal administration awards

    Maharashtra municipal administration awards : चंद्रपूर 22 एप्रिल  :- चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये राबवलेल्या नागरी उपक्रमांसाठी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांना राजीव गांधी गतिमान प्रशासन पुरस्कार 2023-24 आणि 2024-25 या वर्षातील दोन पुरस्कारांद्वारे मुंबई येथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते नागरी सेवा दिनानिमित्त सन्मानित करण्यात आले. Chandrapur Municipal Corporation news

    चंद्रपुरात उष्णतेचा कहर, शाळांना ५ दिवसांची सुट्टी जाहीर करा

       2023-24 वर्षाकरीता मालमत्ता कराची नॅच प्रणाली यशस्वीरित्या राबविल्याबद्दल व 2024-25 ला सौंदर्यीकरण अभियान, जलाशय व पाणीसाठे यांची स्वच्छता, शाळा इमारत नूतनीकरण, सुंदर माझे उद्यान व सुंदर माझी ओपन स्पेस स्पर्धा, रस्त्यांचे सुशोभिकरण, विविध शिल्प उभारणी इत्यादी विविध कार्ये यशस्वीरीत्या राबविल्याबद्दल महानगरपालिका गटात तिसरा पुरस्कार चंद्रपूर मनपाला मिळाला आहे. ही सर्व कार्ये आयुक्त विपीन पालीवाल यांच्या कार्यकाळात झाली असल्याने त्यांना राजीव गांधी गतिमान प्रशासन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. Rajiv Gandhi Administrative Awards 2024


      महानगरपालिका स्तरावरून थेट प्राप्त होणाऱ्या प्रस्तावांच्या गटामध्ये ही निवड करण्यात आली आहे. प्रशासन लोकाभिमुख करणे, त्यात निर्णयक्षमता आणणे आणि सर्वांच्या सहकार्यातून उत्तम प्रशासन कार्यान्वित करण्यासाठी वर्ष 2023-24 आणि वर्ष 2024-25 यां दोन वर्षांत राज्यस्तरावर तसेच तालुका, जिल्हा, विभागीय स्तरावर व महानगरपालिका स्तरावर “राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता (प्रगती) अभियान राबविण्यात आले. या स्पर्धेत सहभागी सर्व कार्यालय व अधिकाऱ्यांचे विविध निकषांवर परीक्षक मंडळाकडून परीक्षण करून सदर पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.


        अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त संदीप चिंद्रवार,विधी अधिकारी अनिलकुमार घुले शहर अभियंता विजय बोरीकर,उपअभियंता रवींद्र हजारे,संगणक अभियंता अमुल भुते या चंद्रपूर मनपाचे सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे व शहरातील नागरिकांचे अभियानात सहकार्य मिळाल्याबद्दल आयुक्तांनी आभार मानले आहेत.  


    2024-25 चा पुरस्कार – मनपाने राबविलेल्या सुंदर माझे उद्यान ” व ” सुंदर माझी ओपन स्पेस स्पर्धेत लोकसहभागाने मोठ्या प्रमाणात उद्याने व विविध भागांचे सौंदर्यीकरण व सुशोभीकरण करण्यात आले होते. जवळपास 3400 नागरिक यात प्रत्यक्ष -अप्रत्यक्षरीत्या सहभागी झाले होते. विविध शिल्प व कारंजे चौक सौंदर्यीकरण अंतर्गत उभारण्यात आले. मनपाच्या 15 शाळा या भौतिक सोयी सुविधांनी सुसज्ज करण्यात येऊन या शाळांना आयएसओ मानांकन सुद्धा मिळाले. विद्यार्थी नागरिक,स्वयंसेवी संस्था यांच्याशी जुळुन प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयाने विविध उपक्रम राबविण्यात आल्याने या वर्षीचा पुरस्कार सुद्धा मनपास प्राप्त झाला.  Rajiv Gandhi Administrative Awards 2024

  • chandrapur heatwave school closure । चंद्रपूरात उष्णतेचा कहर! – शाळांना ५ दिवसांची सुट्टी जाहीर करा

    chandrapur heatwave school closure

    chandrapur heatwave school closure चंद्रपूर २२ एप्रिल (News३४) : सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू असून तापमानाने ४५ ते ४६ अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला आहे. जागतिक पातळीवर चंद्रपूर शहराची नोंद चौथ्या क्रमांकाच्या सर्वाधिक उष्ण शहरांमध्ये झाली असून भारतात सर्वाधिक तापमान असलेले शहर म्हणूनही चंद्रपूरचे नाव पुढे आले आहे.या पार्श्वभूमीवर शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व शाळांना किमान पाच दिवसांची तात्पुरती सुट्टी जाहीर करण्यात यावी किंवा शाळांच्या वेळापत्रकात तातडीने बदल करण्यात यावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा यांना निवेदनाद्वारे केली आहे. chandrapur heatwave

    जुगार खेळायचं? तर चला गडचांदूर

    आ. जोरगेवार यांच्या सुचनेनुसार भारतीय जनता पार्टीच्या एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विनय गौडा यांची भेट घेऊन सदर मागणीचे लिखित निवेदन सादर केले. यावेळी भाजपच्या माजी नगरसेविका छबू वैरागडे, शीतल आश्राम, मंजुश्री कासनगोट्टूवार, यश बांगडे, योगिता धनेवार, राशिद हुसेन, नकुल वासमवार, यश ठाकरे, मनीष पिपरे, वंश थोरात, आकाश पडगेलवार, बबन धनेवार, कार्तिक बोरवार, संजय महाकालीवार आदी उपस्थित होते.

    चंद्रपूरातील वाढते तापमान आणि उष्णतेची तीव्रता लक्षात घेता उष्णाघात, डिहायड्रेशन, अशक्तपणा, चक्कर येणे यांसारख्या समस्या विद्यार्थ्यांमध्ये वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः सकाळी व दुपारी शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत आहे.विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. या मागणीला पालक, शिक्षक आणि सामाजिक संस्थांकडूनही मोठा पाठिंबा मिळत आहे.

  • gambling in small towns । जुगार खेळायचं? चलो गडचांदूर

    gambling in small towns

    gambling in small towns : गडचांदूर (शहर) – चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर शहरामधील लक्ष्मी टॉकीज परिसरात सुरू असलेल्या अवैध जुगाराच्या अड्ड्यांनी पुन्हा डोके वर काढले आहे. वार्ड क्रमांक ४ या भागात सट्टा पट्टी, झेंडी मुंडी यांसारखे जुगार बेधडकपणे सुरू असून, स्थानिक प्रशासन व पोलिस यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

    चंद्रपुरात घरफोडी करणाऱ्या महिलेला अटक

    पोलिस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात मोहीम राबविण्यात येत असली, तरी गडचांदूरमधील काही भागांत हे धंदे खुलेआम सुरू असल्याचे चित्र आहे. कप्तान चांगला असला तरी सर्व सैनिक चोख कामगिरी बजावत आहेतच, असं म्हणता येणार नाही, असं या परिस्थितीकडे पाहून जाणवतं. local gambling news

    लक्ष्मी टॉकीज परिसरात कुणाचे अभय?

    या परिसरातील जुगार अड्डे कोणाच्या आश्रयाने सुरू आहेत, हा प्रश्न स्थानिकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकदा पोलिसांची गस्त होऊनही, जुगारांचे अड्डे पुन्हा पुन्हा उघडत आहेत. त्यामुळे कारवाई खरंच प्रभावी आहे का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

    कामगारांना जुगाराच्या गर्तेतून कोणी बाहेर काढणार?

    गडचांदूर हे एक औद्योगिक शहर असून, येथे सिमेंट कारखान्यांमुळे मोठ्या प्रमाणावर बाहेरील कामगार कामासाठी येतात. काही कामगार मिळालेल्या कमाईतून थोडेसे पैसे जुगारात लावून अधिक मिळविण्याच्या आशेने सर्व काही गमावून बसतात. परिणामी, अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडत आहेत.

    local gambling news

    आगामी धोका — ‘जुगाराचे हब’ बनण्याची शक्यता

    जर अशीच परिस्थिती राहिली तर गडचांदूर येथील काही भाग भविष्यात ‘जुगाराचे केंद्र’ बनतील, हे निश्चित. त्यामुळे स्थानिक पोलीस यंत्रणेस अधिक कठोर कारवाई करत या अड्ड्यांना कायमस्वरूपी बंद करण्याची गरज आहे.

  • Chandrapur house robbery । चंद्रपूरमध्ये घरफोडीचा थरार! लाखोंचा ऐवज लंपास

    Chandrapur house robbery

    Chandrapur house robbery : चंद्रपूर बातमी पोलीस कारवाईची – ​१४ एप्रिल रोजी डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपुरात भव्य रॅली काढत महामानवाला आदरांजली दिली. अनेक अनुयायी या दिवशी शहरातील बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ एकत्र आले होते. मात्र या संधीचा फायदा घेत चोरांनी बाबुपेठ येथील एका घरावर डल्ला मारला. विशेष म्हणजे या घरफोडी गुन्ह्यात एका महिलेचा समावेश होता.

    चंद्रपूर शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवीत ४ आरोपीना मोठ्या शिताफीने अटक केली असून या प्रकरणी ५ लक्ष ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. Ambedkar Jayanti theft

    डॉक्टरांचा निष्काळजीपणा चंद्रपुरात ११ वर्षीय मुलीचा मृत्यू

    पंचशील चौक बाबुपेठ येथील ४५ वर्षीय किरण मधुकर कांबळे हे १४ एप्रिल निमित्त निघालेल्या रॅलीत कुटुंबासह सहभागी झाले होते. रात्री ११ .१५ वाजता घरी कांबळे कुटुंब परतले असता मुख्य दाराला लावलेले कुलूप तोडलेल्या अवस्थेत होते. कांबळे यांनी आत प्रवेश केला असता घरातील सामान अस्तव्यस्त अवस्थेत होते, लोखंडी आलमारीत ठेवलेले सोन्या – चांदीचे दागिने व रोख असा एकूण ६७ हजारांचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. याबाबत कांबळे कुटुंबाने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. Festival day theft India

    गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांनी तपास सुरु केला, घटनास्थळी जाऊन पोलीस पथकाने पाहणी केली, याबाबत गुप्त माहिती मिळविण्यात आली, माहितीच्या आधारे पोलिसांनी महाकाली कॉलरी आनंदनगर मध्ये राहणाऱ्या व्यंकटेश उर्फ व्यंकय्या महेंद्र कोपेलवार याला ताब्यात घेऊन विचारपूस केली, त्याने याबाबत माहिती दिली कि सदर घरफोडी २९ वर्षीय भारती उर्फ मुस्कान व तन्वीर गेब यांच्यासोबत मिळून केली.

    या घरफोडी मधील सोने आरोपींने नागपुरातील मोहम्मद फैजान मोहम्मद वकील अन्सारी याला विकले, पोलिसांनी मोहम्मद फैजान ला अटक केली. आरोपींची यापूर्वी राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींनि चंद्रपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत घरफोडी, दुचाकी चोरी व राजुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तीन जबरी चोरी व नागपुरातून दुचाकी वाहन चोरी केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले. आरोपीकडून सर्व गुन्ह्यातील मुद्देमाल असा एकूण ५ लक्ष ४६ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.

    सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू व उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्चीरे, कोलटें, पोलीस कर्मचारी सचिन बोरकर, संतोषकुमार कणकम, भावना रामटेके, कपूरचंद खरवार, इम्रान खान, दिलीप कुसराम, रुपेश रणदिवे, राहुल चितोडे, इर्शाद खान, विक्रम मेश्राम यांनी केली असून पुढील तपास भावना रामटेके व संतोषकुमार कणकम करीत आहे.

  • Bogus Doctor Negligence Death । चंद्रपूर जिल्ह्यात बोगस डॉक्टरच्या निष्काळजी उपचाराने ११ वर्षांच्या मुलीचा मृत्यू!

    Bogus Doctor Negligence Death

    Bogus Doctor Negligence Death : चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील खांबाडा येथे बोगस डॉक्टर रूद्र रॉबीन मंडल हे कोणत्याही शैक्षणिक पदवी किंवा डिप्लोमाशिवाय महाकाली क्लिनिक चालवत आहे. डॉक्टरच्या निष्काळजीपणा आणि बेजबाबदार कार्यामुळे 11 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

    या संदर्भात मुलीच्या पालकांनी पोलिस प्रशासन, आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासनाला तक्रार करूनही डाक्टर व धनंजय मेडीकल चे संचालक वर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने मृत मुलीची आई शिला नाईक आणि वडील मोरेश्वर नाईक यांनी पत्रकार परिषदेद्वारे डॉक्टर आणि मेडकील संचालका वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास जिलाधिकारी कार्यालय समोर आरोग्य विभागाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार परिषदेत दिला आहे. bogus doctor negligence case India

    bogus doctor negligence case India


    मुलीचे वडील मोरेश्वर नाईक यांनी सांगितले की, त्यांच्या 11 वर्षांच्या समता नावाच्या मुलीची प्रकृती 30 जुलै 2024 रोजी अचानक बिघडली. तिला उपचारासाठी वरोरा तहसीलमधील खांबाडा येथील डॉ. रूद्र रॉबीन मंडल, महाकाली क्लिनिक येथे नेण्यात आले. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केली आणि तिला रक्त तपासणीसाठी खांबाडा येथील प्रयोगशाळेत पाठवले. जेव्हा चाचणीचा अहवाल डॉक्टरांना दाखवण्यात आला तेव्हा त्याला काही गोळ्या देऊन घरी पाठवण्यात आले. दुसयां दिवशी डॉक्टरांनी मोरेश्वर नाईक ला फोन करून पुन्हा रुग्णालयात बोलावले. डॉक्टरांनी मुलीला 100 मिली सलाईनमध्ये तीन इंजेक्शन देऊन चढविण्यात आले. काही वेळानंबर तीला डिस्चार्ज देण्यात आला.

    चंद्रपुरात हिट व्हेवचा कहर, ३ दिवस धोक्याचे

    घरी पोहोचल्यानंतर अर्ध्या तासाने, मुलीचे शरीर थंडीमुळे थरथर कापू लागले. मुलीची तब्येत आणखी बिघडली. सलाईनमुळे मुलगी अशक्त होऊ लागली. मुलीची अवस्था पाहून पालक काळजीत पडले. त्यांनी डाक्टर मंडल कडे नेल्यावर घरगुती उपाय करून पाहिले आणि मुलीच्या शरीरावर थंड पाणी शिंपडले आणि कोया कागदावर तिला काही औषधे लिहुन दिली. पण मुलगी औषधे घेण्याच्या स्थितीत नव्हती. त्यानंतर मुलगी बेशुद्ध झाली. मुलीची गंभीर प्रकृती पाहून डॉक्टरांनी तिला दुस_यां रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. Bogus Doctor Negligence Death

    मुलीच्या वडिलांनी तिला ताबडतोब हिंगणाघाट येथील एका चांगल्या डॉक्टरकडे नेले. संबंधित डॉक्टरांनी मुलीची प्रकृती अधिक गंभीर असल्याने तिला सरकारी रुग्णालयात रेफर करण्यास सांगितले. सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी अल्पवयीन मुलगी समता हिला मृत घोषित केले.

    वडील मोरेश्वर नाईक आणि शिला नाईक यांनी खांबाडा चे डाक्टर मंडल यांच्या निष्काळजी आणि बेजबाबदार कामामुळे आणि धनंजय मेडिकल स्टोअरचे संचालक यांनी बोगस डाक्टर च्या प्रिस्क्पीप्शन वरून औषधी दिल्यामुळे मुलीचा मृत्यु झाला. या संदर्भात डॉक्टर आणि मेडीकल संचालकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रशासनास केली आहे. कारवाई न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य विभागाविरुद्ध आंदोलन करण्याचा इशारा मोरेश्वर नाईक आणि शिला नाईक यांनी दिला आहे.

  • Rajura illegal liquor raid । दारूचा काळा धंदा उघड! राजुरात पोलिसांची मोठी कारवाई

    Rajura illegal liquor raid

    Rajura illegal liquor raid : राजुरा, 21 एप्रिल 2025 : राजुरा गुन्हे अन्वेषण शाखेने (DB) अवैध दारूविक्रीविरोधात मोठी मोहीम राबवली असून, 19 आणि 20 एप्रिल 2025 रोजी सलग दोन दिवसांत पाच वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण ₹12,13,250/- किमतीचा देशी व विदेशी दारूचा साठा तसेच वाहने जप्त करण्यात आली आहेत. Rajura police liquor seizure

    चंद्रपूर जिल्ह्यात पुढील ३ दिवस हिट व्हेव चा कहर

    ही कार्यवाही पोलिस अधीक्षक श्री. मूम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली व परि. पोलीस अधीक्षक श्री. अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वात पार पडली. यामध्ये राजुरा गुन्हे अन्वेषण विभागाचे प्रमुख पो.उपनि. पांडुरंग हाके, पो.उपनि. भिष्मराज सोरते, तसेच पोलीस अंमलदार किशोर तुमराम, विकी निर्वान, महेश बोलगोडवार, शफीक शेख, आनंद मोरे आणि अविनाश बांबोडे यांचा समावेश होता. Rajura crime news 2025

    पाच रेडमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल :

    🔸 रेड क्र. 1

    • 2 खोके रॉकेट देशी दारू (200 नग, प्रत्येकी 90ml)
    • एकूण किंमत : ₹10,000/-

    🔸 रेड क्र. 2

    • 200 नग खरड्याचे बॉक्समधील देशी दारू – ₹10,000/-
    • 25 नग (180ml) रॉयल ट्रॅक विदेशी दारू – ₹6,500/-
    • 25 नग (180ml) आयकॉनिक व्हाईट विस्की – ₹7,500/-
    • 12 नग (500ml) हंड्रेड थाउजंड बियर कॅन्स – ₹3,600/-
    • एकूण किंमत : ₹28,600/-

    🔸 रेड क्र. 3

    • 14 बॉक्समध्ये 1400 नग देशी दारू (90ml, ₹50/- प्रति नग) – ₹70,000/-
    • वाहन – महिंद्रा बोलेरो कँपर (MH 34 AV 1775) – ₹10,00,000/-
    • एकूण किंमत : ₹10,70,000/-

    🔸 रेड क्र. 4

    • 25 नग रॉकेट संत्रा देशी दारू – ₹1,250/-
    • वाहन – दुचाकी एक्सेस 125 (MH 34 BJ 3335) – ₹40,000/-
    • एकूण किंमत : ₹41,250/-

    🔸 रेड क्र. 5

    • 144 नग रॉकेट संत्रा देशी दारू (180ml, ₹100/-) – ₹14,400/-
    • वाहन – दुचाकी एक्सेस 125 (MH 34 CL 1843) – ₹50,000/-
    • एकूण किंमत : ₹64,400/-

    एकूण जप्त मुद्देमालाचा तपशील :

    दारू व वाहने मिळून एकूण किंमत – ₹12,13,250/-


    कडक कारवाईचा इशारा :

    राजुरा DB च्या या सखोल कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायिकांमध्ये खळबळ माजली आहे. पोलिसांनी अशा बेकायदेशीर कृत्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशा मोहिमा भविष्यातही सुरू राहणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

  • heat wave safety tips । ‘हीट वेव्ह’चा कहर! चंद्रपूर जिल्ह्यात येलो अलर्ट जारी

    heat wave safety tips

    heat wave safety tips : चंद्रपूर,  दि. 21 एप्रिल : गत आठवड्यापासून जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक 21 ते 24 एप्रिल या चार दिवसाकरिता चंद्रपूर जिल्ह्यात एक दोन ठिकाणी उष्मा लाटेबद्दल सतर्कता वर्तवण्यात आलेली आहे.

    नितीन गडकरी व सुधीर मुनगंटीवार यांची महत्वपूर्ण भेट

    जिल्ह्यात उष्मालाटेच्या संबंधाने येलो अलर्ट जारी केला आहे.  त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी,  असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केले आहे. how to stay cool in extreme heat


    एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात जणू सुर्यच आग ओकत असल्याचे तापमानावरून दिसून येत आहे. विदर्भातील नागपूर, अकोला व अमरावती जिल्ह्यांनी परवापर्यंत तापामनाचा उच्चांक गाठला होता. तो उच्चांक काल पासून चंद्रपूरने मोडीत काढनला आहे. कालपेक्षा आजच्या तापमानात तब्ब्ल 1 अंश सेल्सिअसने वाढ झाल्याने आज चंद्रपूरचे तापमान 45.6 झाले आहे. त्यापाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरानेही तापमानाचा उच्चांक गाठीत राज्यातील सर्वच जिल्ह्याना मागे टाकले आहे. आजचे चंद्रपूरचे तापमान देशात सर्वाज जास्त आहे. चंद्रपूर 45.6 तर 0.6 अंश सेल्सिअशाने वाढून ब्रम्हपुरीचे तापमान 45.0 झाले आहे.


    मे आणि जून बाकी असतानाच एप्रिल महिण्याच्या पहिल्या आठवड्यापासून विदर्भात सुर्य आग ओकत आहे. त्यामुळे विदर्भातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उष्ण शहर म्हणून ओळख असलेल्या चंद्रपूरने कालपासून त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. काल चंद्रपूरच्या तापमानात 0.6 अंशाने वाढ झाली होती. त्यामध्ये आज पुन्हा तब्ब्ल 1 अंश सेल्सिअश तापानाने वाढ झाली आहे्.

    आजचे चंद्रपूरचे तापमान 45.6 अंश सेल्सिअश ऐवढे नोंदविले गेले आहे. चंद्रपूरचे तापमान देशात सर्वाज आहे. एप्रिलमध्ये चंद्रपूरची रेकार्ड ब्रेक तापमानाची नोंद झाली आहे. याच जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहराचे तापमानही प्रचंढ वाढले आहे. 45.0 ऐवढ्या तापमानाची नोंद झाली आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून विदर्भातील अकोला, नागपूर, चंद्रपूर व वर्धेचे तापमान 44 अंशाच्या पार गेले होते. नागपूर व अकोल्याने परवापर्यंत चंद्रपूरला ही मागे टाकले होते. मात्र कालपासून चंद्रपूरचा पारा प्रचंढ वाढला आहे. heat wave safety tips


    आज सोमवारी विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यातील तापमानात घट आली आहे तर ब्रम्हपुरी, अमरावती,गडचिरोली मध्ये वाढ झाली आहे. सर्वात जास्त वर्धा 0.6, नागपूर 0.4, यवतमाळ, अकोला 0.2 तर गोंदिया वाशिम येथील 0.1 अंश सेल्सिअशने तापमानात घट झाली आहे. तर चंद्रपूर 1 , ब्रम्हपुरी 0.6, गडचिरोली 0.4, अमरावी व बुलढाणा 0.2 अंश सेल्सिअशने वाढ झाली आहे.


    हवामान खात्याने आज सोमवारी नोंदविलेले तापमान खालीलप्रमाणे आहे. त्यामध्ये आज विदर्भातील चंद्रपूर 45.6, ब्रम्हपुरी 45.0, अमरावती 44.6,अकोला 44.1, नागपूर 43.6, यवतमाळ 43.4, वर्धा 43.4, गडचिरोली 43.0, वाशिम 42.5, गोंदिया 42.1, भंडारा 41.4, बुलढाणा मध्ये 39.86 तापमानाची नोंद करण्यात आली आहे. चंद्रपूर व ब्रम्हपुरी शहरातील तापमानात प्रचंढ वाढ झाल्याने जिल्या, तील रस्ते सकाळी अकरा वाजतापासून निर्मण्युष्य पहायला मिळाले. अंगाची लाही लाही करणारा तापमान असल्यामुळे येथील अकुशल कामावर परिणाम झालेला आहे. heat wave safety tips

    21 ते 24 एप्रिल या कालावधीत उष्मालाटेबद्दल चंद्रपूरात येलो अलर्ट

    उन्हाळ्यामध्ये नागरीकांनी उष्ण लाटेपासुन बचाव होण्याच्या दृष्टीने घ्यावयाची दक्षता काय करावे ?

    • पुरेसे पाणी प्या, शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखा.
    • घराबाहेर पडतांना डोके झाकण्यासाठी टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करावा.
    • दुपारी 12 ते 4 वाजेदरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.
    • थेट येणाऱ्या सुर्यप्रकाशाला/उन्हाला अडविण्याकरिता घरातील पडदे आणि झडपांचा वापर करावा.
    • उष्णतेच्या लाटेच्या माहितीसाठी रेडिओ, टिव्ही, किंवा वर्तमानपत्रातील माहितीचा वापर करण्यात यावा.
    • हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. heat stroke prevention tips

    काय करु नये ?

    • उन्हात अतिकष्टाची कामे करू नये.
    • दारु, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेये घेऊ नये.
    • दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे.
    • उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नये.
    • लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये.
    • गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
    • बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी.
    • उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे, तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी.
    • चप्पल न घालता अनवाणी उन्हात चालू नये.
  • school alumni reunion । २५ वर्षांनंतर वर्ग पुन्हा भरला! विसापूर शाळेतील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा

    school alumni reunion

    school alumni reunion : विसापूर (ता. बल्लारपूर) – येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये सन 1999–2000 व 2000–2001 या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा आगळावेगळा स्नेहमिलन सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात आणि जुन्या आठवणींना उजाळा देत पार पडला.

    कार्यक्रमाचे उद्‌घाटन माजी मुख्याध्यापक श्री. सुभाष देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी श्री. रामचंद्र पोहणकर होते. शाळेचे सध्याचे मुख्याध्यापक श्री. चौधरी, तसेच कार्यक्रमाचे विशेष अतिथी म्हणून माजी शिक्षक श्री. गोपाल गावंडे, श्री. शत्रुघ्न बावनकुळे, श्री. संतोष मेश्राम, श्री. रवींद्र बंडीवार, श्री. दिनेश वरघणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. सुनील चौधरी, आणि सौ. मनोरमा खोब्रागडे, श्रीमती शोभा मडावी, श्रीमती नालंदा नळे/गावंडे, सौ. छाया तावाडे/नळे, सौ. पार्वती दुपारे, सौ. रत्नमाला खनके/गिरडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. alumni meet event

    चंद्रपूर ते शिर्डी थेट बससेवा सुरु होणार

    कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन व दीपप्रज्वलनाने झाली. राष्ट्रगीतानंतर सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

    माजी विद्यार्थिनी चंदा वैरागडे यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देताना उपस्थितांची मने जिंकली. “एकेकाळी शालेय स्पर्धांमधील स्पर्धा, शिक्षकांचे रागावणे आणि आजच्या यशस्वी जीवनात त्या आठवणींचा वाटा” या भावना त्यांनी शेअर केल्या.

    या स्नेहमिलनाचे आयोजन माजी विद्यार्थ्यांनी WhatsApp ग्रुपच्या माध्यमातून केले. जवळपास 70 हून अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले. या उपक्रमातून शाळेला रोख स्वरूपात मदतही करण्यात आली. school reunion celebration

    alumni meet event

    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. किशोर वडस्कर आणि सौ. उज्वला भोयर यांनी अतिशय सुंदररीत्या पार पाडले. आभार प्रदर्शन सौ. रेणुका साठोणे यांनी केले. स्नेहमिलनानंतर सर्व उपस्थितांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेत कार्यक्रमाची सांगता केली.

    कार्यक्रमात चेतन वानखेडे, रवी हरणे, तणवीर शेख, मनीषा भोंगळे, सुरेश बावणे, रवी नवले, कामेश मुन, प्रशांत टोंगे, राजू भारशंकर, राजेश थुल, विलास भोयर आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. तसेच गावातील सूरज टोमटे, गजानन पाटणकर, विद्या देवाळकर, प्रीतम पाटणकर, विजय इटणकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

  • Ballarpur road development । बल्लारपूरच्या रस्त्यांवरून ‘विकास’ धावणार? गडकरी-मुनगंटीवारांची महत्त्वपूर्ण भेट

    Ballarpur road development

    Ballarpur road development : चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांची भेट घेतली. आ. मुनगंटीवार यांनी विविध रस्ते व उड्डाणपुलांच्या कामासाठी दिलेल्या निवेदनावर ना. श्री. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. तसेच बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी आ. मुनगंटीवार यांच्या सदैव पाठिशी असल्याचा विश्वासही दिला. Mungantiwar road projects

    निवेदनामध्ये मूल शहरानजीक असलेल्या रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 मूल-चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंना आरसीसी काँक्रीट ड्रेन मंजूर करणे, केंद्रीय मार्ग निधीच्या (सेंट्रल रोड फंड) माध्यमातून बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील विकासकामांना मंजुरी देणे, तसेच कोठारी गावाजवळील 2 किमी अपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करणे यांचा समावेश आहे. Gadkari approved road projects

    चंद्रपूर ते थेट शिर्डी बससेवा सुरु होणार, खासदार प्रतिभा धानोरकर यांचा पुढाकार

    चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तहसीलमध्ये कोठारी गावाजवळील पुलानजीक 2 किमी रस्त्याचे अपूर्ण बांधकाम काम पूर्ण करण्याची विनंती आ. श्री. मुनगंटीवार यांनी केली. नॅशनल हायवे 353 बी बल्लारपूर-आष्टी राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम काम पूर्ण झाले आहे. 5 वर्षांचा कालावधीही पूर्ण झाला आहे. या मार्गावरील पुलाजवळ 2 किमी रस्त्याचे काम प्रलंबित आहे. या मार्गावर बर्‍याच ठिकाणी मोठे खड्डे असल्याने रहदारीला गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. तसेच याठिकाणी मोठे अपघातही झाले आहेत. या 2 किमी रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी गावकऱ्यांनी संबंधित विभागाकडे अर्ज केला आहे, परंतु आतापर्यंत कार्यवाही झालेली नाही, याकडे आ. श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधले.

    त्याचवेळी चंद्रपूर जिल्ह्यातील मुल-चंद्रपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 930 वर, केंद्रीय रस्ते निधीतून मुल शहराजवळील रेल्वे ओव्हरब्रिजचे बांधकाम व्हावे, असेही निवेदन त्यांनी ना. गडकरी यांना दिले. मुल शहराजवळील रेल्वे मार्गावरून मोठ्या संख्येने वाहने जातात. तसेच याच मार्गाने मालगाडीचीही वाहतूक होते. त्यामुळे प्रत्येक अर्धा तासाला रेल्वे क्रॉसिंगवर गेट बंद होतो आणि वाहतूक खोळंबते. परिणामी रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास अडचणी येतात. शिवाय सरकारी काम करणार्‍या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचण्यात बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागतो, याकडेही मंत्री महोदयांचे लक्ष वेधण्यात आले. Ballarpur flyover project

    मुल-चंद्रपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी अंदाजे ८ किलोमीटरचे आरसीसी काँक्रिट ड्रेन मंजूर करण्याची विनंतीही आ. श्री. मुनगंटीवार यांनी केली. हा महामार्ग बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुंना चंद्रपूर जिल्ह्यातील जानाळा, आगडी, गोंडसावरी, महादवाडी, अजयपूर, चिचपल्ली, वलनी, घंटाचौकी आणि लोहारा ही गावे आहेत. या गावांतर्गत महामार्गाच्या बाजुला जुना अरुंद नाला आहे. हा नाला तुटलेला असल्याने घाण पाण्याचा निचरा होत नाही. रस्त्यांची सुरक्षा आणि नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या नाल्याच्या पुनर्बांधणीच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे.

    या गावांतर्गत राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजुंना आरसीसी काँक्रीट नाल्याच्या मंजुरीची आवश्यकता आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरी रोडची रुंदी 7 मीटर आहे. याठिकाणी प्रस्तावित आरसीसी काँक्रीट ड्रेन आणि डांबरी रस्ता अश्या एकूण 48.08 कोटी रुपयांच्या खर्चाचे अंदाजपत्रक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या नागपूर येथील अधिक्षक अभियंत्यांना सादर करण्यात आले आहे. आपण त्यात लक्ष घालून कृपया तातडीने मंजुरी द्यावी, अशी विनंती आ. श्री. मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांना केली आहे. Gadkari approved road projects

    mungantiwar road projects

    बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील बल्लारपूर, मुल, पोंभुर्णा तालुक्यांमध्ये वेगाने औद्योगिकीकरण सुरू झाले आहे. हे तालुके चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेलगत आहेत. त्यामुळे रहदारीच्या दृष्टिकोनातून काही रस्त्यांचे व पुलांचे निर्माणकार्य आवश्यक असल्याची बाब आ. श्री. मुनगंटीवार यांनी मंत्री महोदयांकडे उपस्थित केली. यामध्ये पोंभुर्णा येथील नागपूर, नागभीड, सिंदेवाही, मुल, खेडी आणि गोंडपिंपरीला जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या उड्डाणपुलाची आवश्यकता आहे. तसेच बल्लारपूर तालुक्यांतर्गत किन्ही येथे मोठा उड्डाणपूल व येनबोडी, पळसगाव, किन्ही, इटोली, गिलबिली रस्त्यावर एका छोट्या उड्डाणपुलाची आवश्यकता आहे, असे आ. श्री. मुनगंटीवार यांनी निवेदनात म्हटले आहे. मुल तालुक्यातील उमा नदीवर तसेच अंधारी नदीवर देखील एका मोठ्या पुलाचे निर्माण कार्य करावे, असे निवेदन आ. श्री. मुनगंटीवार यांनी केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांना दिले आहे.

       – संभाव्य बदल आणि पुढील पावले