Chandrapur Shirdi direct bus : चंद्रपूर : चंद्रपूर ते शिर्डी व शिर्डी ते चंद्रपूर अशी थेट एस.टी. महामंडळाची बस सेवा तातडीने सुरू करण्यात यावी, अशी मागणी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे.
शिर्डी येथील साईबाबा मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून हजारो भाविक दरवर्षी शिर्डी येथे दर्शनासाठी जात असतात. कोरोना काळापासून हि बस सेवा बंद करण्यात आली आहे. रेल्वे गाड्यांचे बुकिंग वेळेवर उपलब्ध होत नसल्यामुळे आणि खाजगी वाहनांनी प्रवास करणे अनेकांना परवडत नसल्याने भाविकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे एस.टी. महामंडळाने थेट चंद्रपूर – शिर्डी अशी सेवा सुरू केल्यास भाविकांसाठी प्रवास अधिक सुलभ आणि सोयीस्कर ठरेल, असे मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले. Chandrapur to Shirdi bus
चंद्रपूरच्या महाकाली देवी मंदिरापासून ते शिर्डीच्या साई मंदिरापर्यंतचा धार्मिक प्रवास बस सेवेमुळे अधिक सुलभ होईल आणि ग्रामीण भागातीलही भाविक या सेवेमुळे लाभ घेऊ शकतील, असेही त्या म्हणाल्या. राज्य परिवहन महामंडळाने या मागणीचा गांभीर्याने विचार करून लवकरच ही सेवा सुरू करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
local crime news today : घुग्गुस शहरात हातात तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरविणाऱ्या गुन्हेगाराला घुग्गुस पोलिसांनी अटक केली. सदर आरोपीवर अनेक गुन्हे दाखल असून त्याला ६ महिन्याकरिता हद्दपार करण्यात आले होते अशी माहिती आहे. banned criminal entry
१९ एप्रिल रोजी नाणी उर्फ कार्तिक स्वामी कोडापे राहणार एलसीएच क्वार्टर नकोडा हा सायंकाळी ६ वाजेदरम्यान लता मंगेशकर चौकात हातात तलवार घेऊन स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत होता, याबाबत घुग्गुस पोलिसांना माहिती मिळताच त्याला तात्काळ अटक करण्यात आली.
आरोपी नाणी उर्फ कार्तिक कोडापे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून जानेवारी २०२५ मध्ये चंद्रपूर पोलीस दलाने ६ महिन्याकरिता जिल्हा हद्दपारीची कारवाई करण्यात आली होती, मात्र आरोपी हा पोलिसांची नजर चुकवीत हद्दपार कारवाईला न जुमानता घुग्गुस शहरात दाखल झाला व नागरिकांमध्ये दहशत निर्माण करायला लागला.
विशेष बाब म्हणजे हद्दपारीची कारवाई आरोपीवर झाली असताना सदर आरोपी घुग्गुस शहरात आला कसा? पोलिसांची गुप्तचर यंत्रणेला त्या आरोपीची चाहूल का बरं लागली नाही असे अनेक प्रश्न यावेळी निर्माण झाले आहे.
सदरची यशस्वी कारवाई घुग्गुस पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तायवाडे, पोलीस कर्मचारी संजय आतकूलवार, रवि वाभीटकर, नितीन मराठे, महेश भोयर व विजय ढपकस यांनी केली.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी, राजुरा नाका नंबर 3, स्टार बारसमोर सुझुकी स्कूटरवर बसून एक इसम आयफोनद्वारे ऑनलाईन बेटिंग करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी तत्काळ ठिकाणी धाड टाकून कारवाई केली.
सुझुकी एक्सेस स्कूटर (क्र. MH34 CC 7682) – अंदाजे किंमत ₹60,000/-
आयफोन 13 प्रो मॅक्स मोबाईल – अंदाजे किंमत ₹60,000/-
रोख रक्कम – ₹65,000/- एकूण मुद्देमालाची किंमत: ₹1,85,000/-
पोलिसांनी नमूद आरोपींविरुद्ध गुन्हा क्रमांक 191/2025, कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा सहकलम 49, 112 भादंवि अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. अटक आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून, फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
कारवाई पथक: या कारवाईत IPS अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली, गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोउपनि. भीष्मराज सोरते, पोउपनि. हाके, फौ. किशोर तुमराम, पो.हवा. विकी, पो.अं. शफीक शेख, पो.अं. महेश बोलगोडवार, पो.अं. शरद राठोड, पो.आ. आनंद मोरे व पो.आ. तिरुपती जाधव यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.
राजुरा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या बेकायदेशीर सट्टा व्यवहारांपासून दूर राहावे, तसेच अशी माहिती मिळाल्यास तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
Dr Ambedkar flyover Babupeth : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी बाबूपेठ येथील नवीन उड्डाण पुलाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उड्डाणपूल असे नामकरण करण्यात आले. या नामफलकाचे अनावरण करताना मनापासून आनंद झाला. हा नवीन उड्डाणपूल बाबूपेठवासियांसाठी चंद्रपूरशी मने जोडणारा ठरणार आहे, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. Sudhir Mungantiwar news Chandrapur
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बाबूपेठ येथील उड्डाण पुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले. या उड्डाण पुलाच्या नामफलकाचे अनावरण आ. श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘हा उड्डाण पुल व्हावा, अशी बाबूपेठ येथील नागरिकांची अनेक वर्षांपासून इच्छा होती. या पुलासाठी मी ६५ कोटी रुपये मंजूर करू शकलो, यासाठी मी भाग्यवान आहे. हा पूल बाबूपेठवासीयांची चंद्रपूरशी मने जोडणारा दुवा ठरेल, असा मला विश्वास आहे.
मी नशीबवान – मुनगंटीवार
भाजपा महानगरचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व येथे उपस्थितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करण्याचे आवाहनही आ. श्री. मुनगंटीवार यांनी केले. आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले, ‘लंडनमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून देता आला, ही माझ्या आयुष्यातील एक सौभाग्यशाली घटना आहे. १९२०-२१ मध्ये डॉ.बाबासाहेब लंडनमधील ज्या निवासस्थानी मुक्कामाला होते, तेथे जाऊन जनसेवेची ऊर्जा घेऊन येता आले, यासाठी स्वतःला नशीबवान समजतो.’
दीक्षाभूमीसाठी २ कोटी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या दोन जिल्ह्यांमध्ये दीक्षा दिली, त्यात चंद्रपूरचा समावेश आहे, ही आपणा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. मला स्वतःला मंत्री म्हणून डॉ.बाबासाहेबांच्या कार्याला, त्यांच्या विचारांना अभिवादन करण्याची संधी मिळाली. १२५व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने अनके वास्तू निर्माण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देता आला. दीक्षाभूमीसाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देता आला. आज मला त्यांच्या नावाने उड्डाणपुलाच्या नामफलकाचे उद्घाटन करता आले. या सर्व घटना माझ्यासाठी ऊर्जा देणाऱ्या आहेत, अश्या भावनाही आ. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केल्या.
महामानवाला सेवेतून अभिवादन चंद्रपूर रेल्वे स्टेशनजवळील उडिया मोहल्ला येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नवबौद्ध पंचशील मंडळ व साहेब मित्रमंडळाच्या कार्याचे अभिनंदन केले. बल्लारपूर येथे अभिवादन कार्यक्रमाला आ. श्री. मुनगंटीवार उपस्थित होते. तसेच पडोली येथे पाणपोई व महाप्रसाद वाटप करण्यात आले. सेवेचं रूप, समतेचं पूजन करत दुर्गापूर, नवरत्न बुद्ध विहार येथे आ. श्री. मुनगंटीवार यांनी पुष्पांजली अर्पण केली. चंद्रपूर आंबेडकर चौक येथेही आ. मुनगंटीवार यांनी डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी पाणी व बिस्कीट वाटप उपक्रमात आ. मुनगंटीवार यांनी सहभाग घेतला.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुर शहरात घडलेली ही धक्कादायक घटना पुन्हा एकदा child safety आणि law enforcement system वर गंभीर प्रश्न उपस्थित करते. अवघ्या 10 व 13 वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर repeated sexual abuse केल्याचा आरोप दोन नराधमांवर लागला असून, या प्रकरणाने संपूर्ण शहराला हादरवून सोडले आहे. “Justice for minors” ची जोरदार मागणी करत असताना, संतप्त जमावाने पोलिस ठाण्याला घेराव घालून आरोपींना त्वरित capital punishment देण्याची मागणी केली. अशा अमानवी कृत्यांविरुद्ध समाजाचा आक्रोश आणि पोलिस यंत्रणेची प्रतिक्रिया यावरून हे स्पष्ट होते की, आता वेळ आली आहे zero tolerance policy ची.
breaking crime news Maharashtra चिमूर – पैसे व खाऊ घेऊन देण्याचे आमीष दाखवून दोन नराधमांनी अल्पवयीन मुलींवर वारंवार अत्याचार केल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना काल सोमवारी चिमुर शहरात उघडकीस आली. रात्री साडेदहाच्या सुमारास चिमुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून दोन्ही आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली तर पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार केला. child abuse case India
जमावाचा रोष बघता आरोपींनी पोलिस ठाण्यात शरण घेतले. संतप्त झालेल्या जमावाने पोलिस ठाण्याला तब्ब्ल चार तास घेराव घालून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. रात्री तिन वाजेपर्यंत चिमुर शहरात प्रचंड तपणावपूर्ण स्थिती होती. सध्या शहरात तणावपूर्व शांतता असून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. minor girl abuse case
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चिमुर शहरातील एका वार्डातील एक 13 व 10 वर्षाच्या दोघी मैत्रिणीं होत्या. त्या सोबत शिक्षण घेत होत्या. शेजारी राहत असल्याने घरासमोर नेहमी खेळायच्या. काल सोमवारी एका 13 वर्षाच्या मुलीने रात्री साडेआठच्या सुमारास घरी बसून असताना आपल्या आईला दोघींसोबत घडलेल्या अत्याचाराच्या प्रकाराची माहिती दिली. मार्च महिण्यात दोघी मैत्रींनी दुपारच्या सुमारास घरासमोर खेळत असताना मोहल्यातीलच आरोपी रसिद रूस्तम शेख (नड्डेवाला) याने खाऊ देण्याच्या बहाण्याने घरी बोलविले. दोघी मुली घरी गेल्यानंतर त्यांचेवर आळीपाळीने अत्याचार केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुसरा आरोपी नसिर वजीर शेख (गोलावाला) यांनेही त्या दोघींना खाऊ देण्याच्या बहाण्याने घरी बोलाविले व दोघींवर अत्याचार केला.
माणुसकीला काळीमा फासणार हा प्रकार दोन्ही नराधम आरोपींकडून खाऊ देण्याच्या बहाण्याने माहे सप्टेंबर महिण्यापासून अल्पवयीन मुलींवर वारंवार सुरू असल्याची धक्कादायक माहिती तेरा वर्षाच्या मुलीने आपल्या आईला सांगितली. त्यांनतर रात्री साडेदहाच्या सुमारास पिडीतेच्या आईने चिमुर पोलिस ठाण्यात जावुन तक्रार दाखल करून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली. दरम्यान रात्रीच या प्रकाराची माहिती चिमूर शहरात पसरल्याने या घटनेचा शहरात सर्वत्र निषेध होऊ लागला. public protest against rape
या प्रकारामुळे नागरिक पोलिस ठाण्यासमोर जमा होवून या घटनेचा निषेध करू लागले. दरम्यान संतप्त झालेल्या नागरिकांपासून संभाव्य धोका लक्षात घेताच दोन्ही संशयीत आरोपींनी रात्रीच चिमुर पोलिस ठाण्यात जावून शरण घेतली. त्यानंतर पोलिस ठाण्यासमोर नागरिकांचा जमाव झाला. रात्री साडे अकरा वाजताचे जमावातील काहींनी पोलिस ठाण्यावर दगडफेली त्यामुळे प्रकरण चिघडले. पोलिस ठाण्याच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. तर यामध्ये एक महिला पोलिस व अन्य एक असे दोघे पोलिस जखमी झाले. त्यामुळे पोलिस विभागाने जमावाला पांगविण्यासाठी ठाण्यासमोर जमावावर लाठीमार केला. यामध्ये दोघे व्यक्ती गंभीर जखमी असल्याची माहिती आहे. ते गंभीर जखममी झाल्याने त्यांना नागपूरला पुढील उपचारार्थ हलविण्यात आले आहे. तर जखमी पोलिसांवर स्थानिक रूग्णालयात उपचार करण्यात आले. public protest against rape
या दगडफेकी घटनेनंतर जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांकडून लाठीमार झाल्याने जमाव संतप्त झाला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणाबाहेर जावू नये या करीता अतिरिक्त पोलिस बलाची मागणी केली. भिसी, नागभीड, शेगाव येथून अतिरिकत् पोलिस बल मागविण्यात आले. तर चंद्रपूर येथून दंगा नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले. सदर घटनेची माहिती पोलिस अधिक्षक, अप्पर पोलिस अधिक्षकांना देण्यात आली. अडीच ते तीन वाजेपर्यंपर्यंत जमावाने ठाण्याला घेराव घालून आरोपींना आमच्या स्वाधीन करा, त्यांना फाशीची शिक्षा द्या, लाठीमार केलेल्या पोलिसांवर कारवाईची मागणी लावून धरली.
तब्बल चार तास जमावाने पोलिस ठाण्याला घेराव घातला होता. लाठीमार झाल्याची माहिती शहरहात पोहचताच पाचशे ते सहाशे नागरिक पोलिस ठाण्यासमोर जमले हेाते. त्यांनतर लाठीमार घटनेचा निषेध म्हणून पोलिस ठाण्यासमोर टायरांची जाळपोळ करून घटनेचा रोष व्यक्त केला. त्यामुळे प्रचंड तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. पोलीस अधीक्षक व आप्पर पोलीस अधीक्षक, विविध पथकांसह रात्री तिनच्या सुमारास चिमुर पोलीस ठाण्यात दाखल झाले. आणि चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दंगा नियंत्रण पथकाने परिस्थीती हाताळल्याने तणावपूर्ण परिस्थिती हळूहळू नियंत्रणांत आली. public protest against rape आज मंगळवारी चिमुर शहरात परिस्थिती नियंत्रणात असून तणावपूर्ण शांतता आहे. आरोपी आणि पिडीतेच्या घराशेजारी, तसेच शहरात ठिकठिकाणी चोख पोलिस बंदोस्त लावण्यात आला आहे.
भारत सरकारने जाहीर केलेल्या New Education Policy 2025 अंतर्गत देशातील शालेय अभ्यासक्रमात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून एक महत्त्वाची मागणी केली आहे — इयत्ता 5 वी ते 10 वी च्या social studies syllabus मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार (Ambedkar Thoughts), छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व प्रेरणादायी शिकवण (Shivaji Maharaj Teachings) तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचे योगदान यांचा समावेश करण्यात यावा. त्याचप्रमाणे, भारतीय संविधानातील (Indian Constitution) काही महत्त्वाचे घटक शिकवले गेल्यास विद्यार्थ्यांना आपले अधिकार आणि कर्तव्य (fundamental rights and duties) यांची स्पष्ट जाणीव होईल. भारताच्या थोर महापुरुषांचे कार्य व संघर्षाची गाथा अभ्यासक्रमात आल्यास, नव्या पिढीला प्रेरणादायी आदर्श लाभतील आणि शिक्षण अधिक मूल्याधिष्ठित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
Ambedkar thoughts for students : देशात नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची सुरुवात 2025-26 या कालावधीत होणार असून सदर शैक्षणिक धोरणातील वर्ग 5 ते 10वी च्या अभ्यासक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, कार्य व संविधानातील काही घटक तसेच, महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य विचार यांचा अभ्यासक्रमात समावेश करण्याची मागणी खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेन्द्र प्रधान यांचे कडे पत्राद्वारे केली आहे. New education policy India 2025
छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य विचार तसेच, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य नव्या पिढीला प्रेरणादायी ठरणार असून नविन शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रमात भारतातील थोर महापुरुषांच्या विचार व कार्याचा अभ्यासक्रमात समावेश केल्यास नव्या पिढींला योग्य दिशा मिळणार असल्याचे मत खासदार धानोरकर यांनी केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेन्द्र प्रधान यांना पाठविलेल्या पत्रात आपले मत व्यक्त केले आहे. Importance of Constitution in education
संविधानातील काही घटक अभ्यासक्रमात समाविष्ठ केल्यास आपले अधिकार व कर्तव्य याची जाणीव नव्या पिढीला होणार असल्याने खासदार धानोरकर यांनी ही मागणी केली आहे. भारतातील थोर महापुरुषांचे कार्य व संघर्षाची गाथा नव्या पिढीला माहिती व्हावी याकरीता सामाजिक शास्त्रातील वर्ग 5 ते 10 वी च्या अभ्यासक्रमात याचा समावेश करण्याची मागणी खासदार धानोरकर यांनी केली आहे. यामुळे नव्या पिढीला थोर महापुरुषांचा प्रेरणादायी संघर्ष अभ्यासक्रमातून अनुभवता येणार असल्याचे मत खासदार धानोरकर यांनी व्यक्त केले आहे. या संदर्भात केंद्रीय शिक्षा मंत्री काय निर्णय घेणार हे देखील महत्वाचे ठरणार आहे.
“भारतीय संविधान व महापुरुषांचा अभ्यास लवकरच शाळांमध्ये?”
पंचमुखी हनुमान मंदिराच्या विकासास चालना देणाऱ्या ऐतिहासिक निर्णयामुळे स्थानिक जनता आणि भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. Panchmukhi Hanuman Temple Development News अंतर्गत, आमदार किशोर जोरगेवार यांनी मंदिर परिसरासाठी २५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याची घोषणा केली आहे. या प्रकल्पात भक्तनिवास, सौंदर्यीकरण, आणि भाविकांसाठी मूलभूत सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. पवित्रतेसह पर्यटनाला चालना देणारा हा उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यासाठी एक मोठे पाऊल ठरणार आहे.
Panchmukhi Hanuman Temple Development News : पवनसुत हनुमान म्हणजे निस्वार्थ सेवा, पराक्रम आणि भक्ती यांचे प्रतीक. हा देश नेहमीच सेवाभावी लोकांना स्मरणात ठेवतो. म्हणूनच भारतभर सर्वाधिक मंदिरे हनुमानाचे आहेत. हनुमानांसारखा सेवक होणे हे अत्यंत कठीण, पण प्रेरणादायक आहे. येथून समाजसेवेची प्रेरणा मिळावी यासाठी या संपूर्ण मंदिर परिसराचा विकास २५ कोटी रुपयांच्या निधीतून करण्यात येणार असल्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली. यातील पहिल्या टप्प्यातील पाच कोटी रुपये याच आर्थिक वर्षात उपलब्ध करून दिले जाणार आहेत. hanuman temple development
पंचमुखी पांढरकवडा हनुमान मंदिर येथील भक्तनिवासाच्या कामाचे शासकीय लोकार्पण रविवारी आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला सरपंच सुरज तोतडे, उपसरपंच समीर भिवापूरे, मंदिर देवस्थानचे लक्ष्मण सदलावर, कोषाध्यक्ष बाबूराव कुकडे, भाजपचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंह ठाकूर, रघुवीर अहिर, प्रकाश देवतळे, अजय जयस्वाल, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, बलराम डोडाणी, संजय तिवारी, माजी नगरसेविका छबू वैरागडे, मनोज पाल, वंदना हातगावकर, सविता दंढारे, संतोष नुने, मंदिर समितीचे विश्वस्त सहदेव कोल्हे, आशिष मासिरकर, ईमारान खान उपसरपंच विनोद खवले, प्रज्ञा बोरगमवार आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
बोलताना आमदार जोरगेवार म्हणाले की, आज पांढरकवडा येथील पंचमुखी हे पवित्र व ऐतिहासिक हणुमान मंदिर केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे, तर सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उन्नतीचे केंद्र ठरत आहे. येथे भक्तनिवास, परिसर सौंदर्यीकरण, भाविकांसाठी विविध सुविधा निर्माण करण्यात येणार असून, मंदिर परिसराचा समग्र विकास करण्याचा आमचा संकल्प आहे. आपण घुग्घूसला नगरपंचायतीचा दर्जा मिळवून दिल्यानंतर येथील विकासाला गती मिळाली आहे. उड्डाणपूल, ग्रामीण रुग्णालय, व इतर मूलभूत सुविधा आता अंतिम टप्प्यात आहेत, असेही आमदार जोरगेवार म्हणाले. kishor jorgewar news
पांढरकडा गावाजवळून जाणारा प्रस्तावित समृद्धी महामार्ग चंद्रपूरच्या भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरेल. मुंबईहून चंद्रपूरला येणाऱ्या पर्यटकांना शहरात प्रवेश करताना पंचमुखी हणुमान मंदिरासमोरूनच यावे लागेल. त्यामुळे या परिसराचे सुशोभीकरण व पर्यटन केंद्र म्हणून विकास करणे ही वेळेची गरज आहे. हे मंदिर सध्या ‘क’ दर्जात असून त्यास ‘ब’ दर्जा मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले सेवा हीच खरी श्रद्धा आहे. ही सेवा आपल्याला यश, समृद्धी आणि एकतेच्या दिशेने घेऊन जाते. असेही ते यावेळी म्हणाले. या लोकार्पण सोहळ्याला नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. परिसरात उत्साही वातावरण पाहायला मिळाले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक समतेचे योद्धा आणि सत्याच्या मार्गाने लढणारे थोर विचारवंत म्हणजे Dr Babasaheb Ambedkar. त्यांनी दिलेले संविधान हे केवळ कायद्याचे दस्तावेज नसून, ते एक सामाजिक परिवर्तनाचे शक्तिशाली माध्यम ठरले आहे. Babasaheb यांचा लढा हा दलित, शोषित आणि मागासवर्गीयांसाठी equal rights, social justice आणि education empowerment मिळवण्याचा ऐतिहासिक टप्पा होता.
आजच्या आधुनिक भारतातसुद्धा Dr Babasaheb Ambedkar यांच्या विचारांची relevance अधिक आहे. त्यांच्या विचारांमुळे आज लाखो लोकांनी शिक्षण, रोजगार, आणि सन्मानाचे जीवन मिळवले आहे. त्यांच्या स्मृती आणि कार्याचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचवणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे.
Dr Babasaheb Ambedkar : चंद्रपूर: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्ववंदनीय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समता, न्याय व बंधुत्व वृध्दिगत करण्याकरिता आपले जीवन समर्पित केले. त्यांनी विषमतेविरूध्द दिलेला लढा हा ऐतिहासिक होता. त्यांनी या देशाला दिलेल्या संविधानामुळेच आज आपणा सर्वांना अनेक अधिकार बहाल झाले असून या घटनात्मक अधिकारांनीच बहुजन समाजाने राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व अन्य क्षेत्रामध्ये प्रगतीच्या दिशेने वाटचाल केली आहे. 14 april news
एवढेच नव्हे तर आपला देश सुध्दा संविधानाच्या माध्यमातून प्रगतीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या महान विचारांचा वारसा स्विकारून सर्वांनी राष्ट्राच्या जडणघडणीत व प्रगतीमध्ये योगदान देणे हीच या महान राष्ट्रपुरूषास खरी आदरांजली ठरेल असे प्रतिपादन राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
डॉ. बाबासाहेबांच्या १३४ व्या जयंती पर्वावर हंसराज अहीर यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून नमन केले. त्यांच्या राष्ट्रीय योगदानाचे स्मरण करून आदरांजली अर्पण केली. या अभिवादन कार्यक्रमास माजी उपमहापौर अनिल फुलझेले, विठ्ठल डुकरे, रवि गुरनुले, राजु येले, डॉ. शरद रणदिवे, राजु अडपेवार, राजु घरोटे, प्रमोद शास्त्रकार, प्रदीप किरमे, संजय खनके, हंसराज रायपुरे, पुष्पा उराडे, शितल गुरनुले, कल्पना बबुलकर, शिलाताई चव्हाण, सुप्रिया सरकार, श्रीकांत भोयर, विकास खटी, गौतम यादव, पुनम तिवारी, स्वप्निल मुन, संजय मिसलवार, रविंद्र मुन, संदीप देशपांडे, तुषार मोहुर्ले, रवि लोनकर, अतुल रायकुंडलिया, राहुल सुर्यवंशी, मधुकर राऊत, राज कुमार, सुदामा यादव यांचेसह बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
चंद्रपूर महानगरपालिकेचा प्रशासकीय कारभार आता घेतोय एक पॉवरफुल डिजिटल वळण! पारंपरिक पेपरवर्कमधील negative points — फाईल गहाळ होणे, उशीर, टपालाची गडबड — हे आता इतिहास जमा होणार आहेत. कारण, आता सुरू झाली आहे “e office system in municipality” ची positive revolution! ही प्रणाली केवळ कागद वाचवत नाही, तर वेळ, manpower आणि resources यांचा योग्य उपयोग करत आहे. प्रत्येक तक्रारीचा digital tracking होतोय, आणि कामांची transparency आणि accountability वाढतेय.ही नवी प्रणाली म्हणजे फक्त एक tech upgrade नाही, तर smart governance कडे उचललेलं एक पॉवरफुल पाऊल आहे!
e office system in municipality : चंद्रपूर 14 एप्रिल – प्रशासकीय कारभार गतीमान आणि पेपर लेस करण्यासाठी आता चंद्रपूर महानगरपालिकेने ‘ई-ऑफीस प्रणाली’ कार्यान्वित केली आहे. त्यामुळे आलेल्या तक्रारींचे डिजीटल ट्रॅकिंग शक्य होणार असुन मनपाचे सर्व विभाग या प्रणालीशी जोडले जाऊन आता मनुष्यबळ, वेळ आणि कागदावरील खर्चही वाचणार आहे. e governance system in municipalities
महानगरपालिकेत दररोज मोठ्या प्रमाणात टपालांची आवक जावक नोंद होते. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या हस्ते पारंपारीक पद्धत टपाल संबंधित विभागाच्या टेबलवर पोहचवले जाते. त्यामुळे अनेकदा टपाल विभागप्रमुखांपर्यंत पोहचायला उशीर लागतो तर कधी कधी टपाल गहाळ होण्याचाही धोका असतो. त्यामुळे या सर्व प्रकाराला पायबंद घालतानाच ई ऑफीस प्रणाली सुरू करण्यासाठी आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल हे आग्रही होते. अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील उपायुक्त मंगेश खवले,उपायुक्त संदीप चिंद्रावार यांनी याकामी लक्ष केंद्रीत करत ई प्रणाली सुरू करण्यासाठी महत्वपूर्ण भुमिका बजावली.
काय आहे ई ऑफीस प्रणाली – ई – ऑफिस प्रणाली म्हणजे शासकीय कामकाज कागदविरहित (पेपरलेस) करणे. सध्या शासनात फायलींचा प्रदीर्घ प्रवास होतो. त्याऐवजी संगणकावरून अधिकाधिक कामकाज करण्यात येणार. मनपाच्या आवक-जावक कक्षात आवक-जावकची ई ऑफीस प्रणालीवर स्कॅनिंग करून नोंद केली जाईल. पोहच देताना त्यावर ऑनलाईन नोंद झालेला डिजीटल क्रमांकही असेल, त्यामुळे या क्रमांकावरूनच आपल्या तक्रारीची, इतर अर्जाचे पुढे काय झाले, हे ट्रॅकिंग करणे सुलभ होणार आहे. संबंधित टपाल हे ज्या त्या विभागाकडे पाठविले जाईल तिथुन विभागप्रमुख आणि त्या पुढे आवश्यतेनुसार उपायुक्त,अतिरिक्त आयुक्त व आयुक्त यांच्याकडे संबंधित फाईल संगणकावरूनच पुढे पाठविली जाईल.
विभागप्रमुखांसह कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण महानगरपालिका क्षेत्रात ई-ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्या सूचनांनुसार, मनपा स्तरावरील कार्यालयांमध्ये तैनात असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ई-ऑफिस प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे
With Ambedkar Jayanti celebrations set to bring thousands of followers onto the streets of Chandrapur and Ballarpur on April 14, 2025, the district police have implemented strict traffic diversions to ensure public safety and smooth movement. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने, चंद्रपूर आणि बल्लारपूर शहरातील काही मुख्य रस्ते वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. To avoid traffic congestion and accidents, police have appealed to citizens to follow alternative routes and cooperate with the authorities during the movement hours.
Chandrapur traffic diversion April 14 : भारतरत्न, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर व बल्लारपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला असून जिल्हा पोलीस अधीक्षकाने वाहनचालकांना पर्यायी मार्ग निवडण्याचा सल्ला दिला आहे. याबाबत आदेश जारी करण्यात आले.
१४ एप्रिल रोजी आंबेकर अनुयायी मोठ्या संख्येत बाबासाहेबाना आदरांजली वाहण्याकरिता एकत्र येतात, यावेळी वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये व कसल्याही प्रकारचा अपघात होऊन जीवित व वित्त हानी टाळण्याकरिता या संदर्भात पोलीस प्रशासनाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. मार्गाचा हा बदल १४ एप्रिल सकाळी ७ वाजतापासून रात्री १२ वाजेपर्यंत लागू असणार आहे. Ambedkar Jayanti 2025 traffic advisory Maharashtra
चंद्रपुरातील वाहतुकीत नेमका बदल काय?
दस्तगीर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा
मिलन चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा
श्री टॉकीज ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा
हे मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद ठेवण्यात येत आहेत.
सदरचे मार्ग नो पार्किंग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग कोणते?
नागरिकांनी शहराबाहेर जाण्यासाठी या मार्गाचा अवलंब करावा.
कस्तुरबा चौक ते दस्तगीर चौक, मिलन चौक-डॉ. पोटदुखे ते श्री टॉकीज मार्गे बिनबा गेट किंवा एकविरा वार्ड-बँक ऑफ इंडिया मार्गे जटपुरा गेटकडून जावे.
बल्लारपूर शहरातील वाहतुकीत बदल काय?
विसापूर टोल नाक्याकडून बामणीकडे जाताना पत्ता गोडाऊन चौक – गौरक्षण वॉर्ड ते फुटी दिवार पर्यंत हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाकरिता बंद असणार आहे.
बामणीकडून विसापूर कडे जाणारा मार्ग हा दुहेरी वाहतुकीकरिता सुरु असणार आहे.
रॅली मध्ये गर्दी वाढल्यास किंवा वाहतूक कोंडी झाल्यास गरजेनुसार बामणी चौक व विसापूर टोलनाका येथे काही काळाकरिता जड वाहतूक थांबविण्यात येईल.
जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत वेळेवर बदल होऊ शकतो, नागरिकांनी प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. Ballarpur traffic updates April 14