Chandrapur traffic diversion April 14
With Ambedkar Jayanti celebrations set to bring thousands of followers onto the streets of Chandrapur and Ballarpur on April 14, 2025, the district police have implemented strict traffic diversions to ensure public safety and smooth movement.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने, चंद्रपूर आणि बल्लारपूर शहरातील काही मुख्य रस्ते वाहनांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत.
To avoid traffic congestion and accidents, police have appealed to citizens to follow alternative routes and cooperate with the authorities during the movement hours.
Chandrapur traffic diversion April 14 : भारतरत्न, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त चंद्रपूर व बल्लारपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला असून जिल्हा पोलीस अधीक्षकाने वाहनचालकांना पर्यायी मार्ग निवडण्याचा सल्ला दिला आहे. याबाबत आदेश जारी करण्यात आले.
सुधीर मुनगंटीवार यांचे सामाजिक कार्य ठरले दीपस्तंभ
१४ एप्रिल रोजी आंबेकर अनुयायी मोठ्या संख्येत बाबासाहेबाना आदरांजली वाहण्याकरिता एकत्र येतात, यावेळी वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये व कसल्याही प्रकारचा अपघात होऊन जीवित व वित्त हानी टाळण्याकरिता या संदर्भात पोलीस प्रशासनाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. मार्गाचा हा बदल १४ एप्रिल सकाळी ७ वाजतापासून रात्री १२ वाजेपर्यंत लागू असणार आहे. Ambedkar Jayanti 2025 traffic advisory Maharashtra
चंद्रपुरातील वाहतुकीत नेमका बदल काय?
- दस्तगीर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा
- मिलन चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा
- श्री टॉकीज ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा
- हे मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद ठेवण्यात येत आहेत.
- सदरचे मार्ग नो पार्किंग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे.
पर्यायी मार्ग कोणते?
- नागरिकांनी शहराबाहेर जाण्यासाठी या मार्गाचा अवलंब करावा.
- कस्तुरबा चौक ते दस्तगीर चौक, मिलन चौक-डॉ. पोटदुखे ते श्री टॉकीज मार्गे बिनबा गेट किंवा एकविरा वार्ड-बँक ऑफ इंडिया मार्गे जटपुरा गेटकडून जावे.
बल्लारपूर शहरातील वाहतुकीत बदल काय?
- विसापूर टोल नाक्याकडून बामणीकडे जाताना पत्ता गोडाऊन चौक – गौरक्षण वॉर्ड ते फुटी दिवार पर्यंत हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाकरिता बंद असणार आहे.
- बामणीकडून विसापूर कडे जाणारा मार्ग हा दुहेरी वाहतुकीकरिता सुरु असणार आहे.
- रॅली मध्ये गर्दी वाढल्यास किंवा वाहतूक कोंडी झाल्यास गरजेनुसार बामणी चौक व विसापूर टोलनाका येथे काही काळाकरिता जड वाहतूक थांबविण्यात येईल.
जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी जारी केलेल्या अधिसूचनेत वेळेवर बदल होऊ शकतो, नागरिकांनी प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. Ballarpur traffic updates April 14
Leave a Reply