road accident today news । ओव्हरटेकचा प्रयत्न जीवावर बेतला! ट्रकखाली येऊन तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू

road accident today news

road accident today news : गडचांदूर, १५ एप्रिल: गडचांदूर-राजुरा राज्य महामार्गावर भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला. होली फॅमिली पब्लिक स्कूल जवळ सकाळी ११ वाजता ही दुर्दैवी घटना घडली. पाटण (जिल्हा आदिलाबाद ) येथील आकाश भोयर (वय २६) व प्रणाली फुसाम (वय २२) हे दोघे मोटरसायकलवरून गडचांदूर मार्गे बल्लारपूर येथे नातेवाईकांना भेटण्याकरिता दुचाकी क्रमांक mh ३४ y १८३५ ने जात होते.

२ अल्पवयीन मुलींवर अत्याचार, चिमूर पेटलं

त्यावेळी ट्र्क क्रमांक mh ३४ ab ४२८६ ला आकाश ने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी थेट दुभाजकाला आदळली, या धडकेनंतर दोघे रस्त्यावर पडले आणि मात्र ज्या ट्र्क ला ओव्हरटेक करण्याचा पर्यंत केला असता त्याच ट्रक खाली आल्याने प्रणालीचा जागीच मृत्यू झाला तर आकाश ला रुग्णालयात नेट असताना मृत्यू झाला. bike accident latest update

घटनास्थळ अतिशय हृदयद्रावक होता. अपघाताची माहिती मिळताच गडचांदूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून ग्रामीण रुग्णालय, गडचांदूर येथे शवविच्छेदनासाठी पाठवले.

घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, महामार्गावरील अपूर्ण कामांमुळे व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या अभावामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *